अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१४) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१४)




रघुवीरच्या घरी भरपूर पाहुणे होते. जानकी नवीन घरी काहीशी गोंधळली होती.गृहप्रवेशा नंतर सगळे महत्वाचे विधी आटोपले.जानकीची व्यवस्था जिजींच्या खोलीत केली होती. रात्री जेवणे आटपून ती खोलीत चेंज करायला गेली.
गायत्री ,मुक्ता आणि राधा ताई तिच्या मदतीला होत्या.तिला एकटं वाटू नये म्हणून सगळे तिच्या अवती भवती राहत होते.जानकीने नवीन साडी सोडून साधी साडी नेसायला घेतली पण काही केल्या तिला साडी नेसता येत नव्हती मग गायत्रीने तिची मदत केली.जानकीने स्वतःला आरशात पाहिले. आज ती स्वतःच वेगळंच रूप ती बघत होती. चेहरा धुतल्याने तिचा मेकअप उतरला होता ,पण तिच्या डोळ्यांतील काजळ तसच होत. तसही तिला कुठल्या सौंदर्य प्रसाधन साधनांची गरज नव्हती. ती तशीच खूपच सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर हळदीच तेज होत. गळ्यात डोरल, एक लांब मंगळसूत्र आणि आणखीन काही दागिने ,भांगेत भरलेलं कुंकू सवाष्ण वेशात तीच सौंदर्य खुलून आलं होतं.
तिच्या सौंदर्याने कुणीही दिपून जाईल इतकी सुंदर ती दिसत होती..

" जानकी अग बस्स इथे, तुझी दृष्ट काढते .नक्षत्रासारखी सुंदर दिसतेय ती कुणाची नजर नको लागायला" जिजी तिला बसवत म्हणाल्या.मीठ मोहऱ्यानी त्यांनी जानकीची दृष्ट काढली.

" अन माझी नजर कोण काढणार ?मी पण खुप हँडसम दिसत होतो" रघुवीर खोलीत येत म्हणाला.

" हो अरे तुझीपण काढणारच होते पण आधी जानकी ची काढू दे नीट" जिजी म्हणाल्या.

रघुवीर ने एकवार जानकीकडे पाहिलं आणि क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला.

" काय भाऊराया..लक्ष कुठे आहे तुझं?अन इकडे काय करतोय तू?" गायत्री त्याला म्हणाली.

" ते सहजच तुम्ही सगळे झोपले का पाहायला आलो" रघुवीर जानकीकडे बघत गायत्रीला म्हणाला..

" आलं ते लक्षात आमच्या तू कुणाला पाह्यला आला ते, चल आता जा झोपायला .उदया सकाळी लवकर उठायच आहे" गायत्रीने त्याला लोटतच बाहेर काढल. तो गेल्यावर सगळ्या हसायला लागल्या..

जानकीने नवीन ठिकाणी झोप येत नव्हती ती सारख या कडावरून त्या कडावर होत होती.तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येत होती.डोळ्यांत पाणी येत होतं. सकाळी ती रोजच्या सारखी लवकर उठली. नवीन नवरदेव नवरीचा न्हानोरा झाला.सत्यनारायण ची पूजा पार पडली.दुपारी जानकी आणि रघुवीर अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन आले.संध्याकाळी लोकं तीर्थ प्रसादाला आले.
काही वेळाने घरातल्या व्यक्तींची धावपळ सुरू झाली .रघुवीर ची खोली फुलांनी सजवली.आज रघुवीर आणि जानकीच्या मधुचंद्राची पहिली रात्र होती.जानकी मनातून खूप घाबरली होती. गायत्रीने जानकीला सुंदर तयार केलं.तिकडे रघुवीरला ही तयार व्हायला लावलं.
घरातील सर्व दोघांची थट्टा मस्करी करत होते.लग्नाच्या नाटकात हा भाग येणार हे दोघांनीही माहिती होत. जानकीला रघुवीरच्या खोलीत पाठवलं ,पहिल्यांदाच ती त्याच्या खोलीत आली. तिने एकवार सगळीकडे नजर फिरवली. रघुवीरची खोली बरीच मोठी होती तिला आज सुगंधी फुलांनी सुंदर सजवली होती. जानकी आणि रघुवीर च्या साखरपुड्याचा दोघांचा आणि दोन्ही कुटूंबासोबत असलेला फोटो कोलाज फ्रेम करून लावला होता. खूप कुतूहलाने ती त्या फ्रेम कडे पाहत होती.

" काय मॅडम काय पाहताय?" रघुवीर खोलीत येत म्हणाला..जानकी दचकली..

" काही नाही हा फोटो पाहतेय " जानकी म्हणाली..

" अग जिजी म्हणाली म्हणून लावलाय..जानकी एक सांगु म्हणजे तुला राग येणार नसेल तर" रघुवीर म्हणाला.

" सांग न" जानकी म्हणाली..

" तू खूपच सुंदर दिसत होतीस लग्नात आणि आताही दिसतेय. मी सहज म्हणतोय राग नको मानून घेऊ" रघुवीर म्हणाला..

" राग कसला त्यात.. थँक्स फॉर कॉम्पलीमेंट आणि तूही खूप हॅन्डसम दिसत होता" जानकी हसून म्हणाली.

" अरे वा म्हणजे तुम्ही लक्ष दिलंत म्हणजे आमच्याकडे" रघुवीर म्हणाला.

" लक्ष काय द्यायच त्यात ,दिवसभर सोबत होतो आपण लक्ष तर जाणारच न" जानकी म्हणाली.

" अच्छा अस होय" रघुवीर हसत म्हणाला.

दोघेही गप्पात रंगून गेले. बराच वेळ गप्पा झाल्या आता जानकीला झोप येत होती.

" रघुवीर मला झोप येतेय कुठे झोपू मी" जानकी म्हणाली.

" एक काम कर तू बेडच्या या बाजूला झोप मी दुसऱ्या बाजूला झोपतो ,काय आहे न मला खाली झोप येत नाही" रघुवीर म्हणाला.

" ए नाही ह मी नाही झोपणार एकाच बेडबर"जानकी ताडकन उभी राहून म्हणाली.

" अग तुला विश्वास नाही का माझ्यावर" रघुवीर म्हणाला.

"विश्वास आहे पण मला उगाच रिस्क नाही घ्यायची " जानकी म्हणाली.

" म्हणजे विश्वास नाहीच ..बरं ठीक आहे एक काम कर तू इथे गादी घालून खाली झोप मी बेडवर झोपतो काय आहे न खाली झोपलं की माझी पाठ दुखते" रघुवीर म्हणाला..

" किती दृष्ट आहेस रे..मी पाहुणी आहे न तरी मला खाली झोपायला लावतोय.." जानकी म्हणाली..

" जानकी मला सवय नाही ग खाली झोपायची प्लिज समजून घे" रघुवीर म्हणाला.

" ठीक आहे झोपते मी खाली" जानकी थोडी रागात म्हणाली.

रघुवीरने जानकी ला गादी घालून दिली. बेडवर असलेलं फुलांची सजावट आवरून घेतली.जानकी खाली झोपली.दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांना अकोल्याला मांडव परतणीसाठी जायच होत म्हणून जानकी मनातून खुश होती. थकल्यामुळे तिला लगेच झोप लागली. रघुवीर अजून जागाच होता. त्याने एकवार जानकीकडे पाहिलं .झोपेत ती लहान बाळासारखी गोड अन निरागस दिसत होती.तिला बघून तो मनात हसला.

पहाटे पाच वाजता जानकीला जाग आली .तिने रघुवीर कडे पाहिले तो अजून झोपलेला होता. तिने त्याला हाक मारली पण तो काही उठली नाही. ती उठली आणि आवरायला गेली.अंघोळ करून आली .तिला साडी नेसायची म्हणून तिने खोलीतला पडदा लोटून घेतला.साडी कशी तरी तिने साडी गुंडाळली.

" ही साडी कशी नेसु मला तर नीट जमतच नाही आहे" साडीच्या निऱ्या आवरत जानकी स्वतःशीच म्हणाली..

" काही मदत हवी आहे का"?? रघुवीर मोठयाने म्हणाले.

" ए तुला काही वाटते की नाही साडी नेसताना पाहतोय" जानकी चिडली आणि घाबरली सुद्धा..

" अग मी नाही पाहात तुला तू स्वतःशी बोलतच इतक्या मोठ्याने आहेस की मला ऐकायला आलं म्हणून विचारलं" रघुवीर बेडवर उठून बसत म्हणाला..

" बरं बरं ठिक आहे..आणि तुही लवकर उठ जरा आपल्याला जायच न अकोल्याला" जानकी पदराला पिन लावत म्हणाली..

" काय उत्सुकता आहे न तुला माहेरी जायची" रघुवीर म्हणाला..



" हो मग असणारच " जानकी ने मधातला पडदा बाजूला करत म्हणाली..साडी नेसून ती तयार झाली होती. गुलाबी रंगाची बारीक नक्षीकाम असलेली साडी आणि मॅचिंग ब्लाउज घातलं होत.

" वा खूप गोड दिसतेस ग." रघुवीर तिच्या कडे एकसारखं बघत म्हणाला..

" आता माझं कौतुक राहू द्या.पटकन आवरून घे आणि चल " जानकी म्हणाली..

" ठीक आहे आवरतो मी" रघुवीर म्हणाला..

जानकी छान तयार होऊन स्वयंपाक घरात गेली.तिथे सगळं महिला मंडळ हजरच होत.सगळे मिळून जानकीची थट्टा करत होते.मग जिजींनी सगळ्यांना शांत राहायला सांगितलं.नवीन नवरी असल्याने कुणीही तिला कसल्या कामाला हात लावू दिला नाही. रघुवीर तयार होऊन आला.जिजींनी दोघांना मिळून देवाला नमस्कार करायला लावला..घरातल्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन जानकी,रघुवीर आणि त्यांना सोबत म्हणून जिजी ,आप्पा अकोल्याला मांडव परतणीसाठी निघाले...

क्रमशः