निकिता राजे चिटणीस - भाग २६ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग २६

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

 

भाग  २६ 

भाग २५  वरून  पुढे  वाचा .........

शशांक दामले

निकिता आणि वाघूळकरांना पण असच वाटत होत. त्यांनी पण माना डोलावल्या.

शशी मॅडम ला पण ते पटल. त्या म्हणाल्या की “तू, निकिता आणि देसाई तिघ मिळून ठरवा बिल्डर कोण ते, मग आपण बसू.” मीटिंग संपली.

दुसऱ्या दिवशी मी आणि निकिता बिल्डर कोण असावा याबद्दल रिसर्च करत होतो. त्यांच्या profiles बघता बघता लक्षात आले की या profiles मध्ये जाहिरातबाजीच जास्ती आहे. मग निकीताला म्हंटल की

“देसाइंनी दोन नाव सुचवली आहेत. त्यांनी त्यांच्या बरोबर काही कामेही  केली आहेत. दोघंही प्रामाणिक आहेत आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारे आहेत. दोघेही छोटे बिल्डर आहेत. पण reliable आहेत. त्यांना बोलाउन मीटिंग करूया का ?”

“चांगली आयडिया आहे. तू ओळखतोस का ?” – निकिता.

“हो म्हणजे माझे कॉलेज चे मित्रच आहेत. मी चांगलं ओळखतो त्यांना.” 

“:अरे मग हे आधीच नाही का सांगायचस, देसाइंचा  reference देऊन का सांगतो आहेस ?” निकिता नाराज स्वरात म्हणाली.

“अग म्हणजे असं नको वाटायला, की मी माझेच मित्र भरतो आहे म्हणून.”

“आता मात्र तू विचित्र वागतो आहेस.  अरे तुझ्यावर, माझा माझ्यावर जेवढा आहे त्यापेक्षा जास्त विश्वास आहे. तुझ्या मनात आमच्या आणि कंपनी विषयी वेडे वाकडे विचार येणारच नाहीत यांची मला 100 टक्के खात्री आहे. मी तुझ्याशी मैत्रिणी सारखी वागते आणि तुला असं बोलवत तरी कसं?” निकिता भावुक झाली होती.

“तू माझी असिस्टंट म्हणून काम करते आहेस, हे तुझं मोठे पण आहे. पण किती झाल तरी तू मालकीण आहेस या कंपनी ची.”

“शशांक असं काय घडलं आज, की तू असा बोलतो आहेस. माझ्या तोंडून काही अधिक उणं निघून गेल का ? तसं असेल तर सॉरी. अगदी मनापासून.” निकिता खूप हळवी झाली होती. आणि त्याला मी जबाबदार होतो. निकिता चा आवाज कांपरा झाला होता आणि डोळ्यात पाणी तरळत होत. मलाच फार वाईट वाटल मी फार विचित्र वागलो का ? चुकलच जरा. जरा नाही फार फार. मला वाटलच नव्हत ती एवढी हळवी मुलगी असेल म्हणून. आता परिस्थिती   सांभाळावीच लागणार आहे.

“अरे आमची झाशीची राणी रडवेली झाली ? निकिता इतकी संकटं  तुझ्यावर कोसळून सुद्धा, कधी तुझा ब्रेक डाऊन  झाल्याचं ऐकिवात नाही मग आजच का असं  डोळ्यात पाणी ? खूपच मनाला लावून  घेतलस माझं बोलणं.”

आता तिचा कंट्रोल सुटला आणि ती रडायलाच लागली. मला कळेच ना की या परिस्थितीत मी काय करायच ते. अश्या नाजुक आणि अनपेक्षित प्रसंगाला कसं तोंड द्यायचं? हे कुठल्याच कॉलेज मध्ये शिकवत नाहीत. तिला शांत करण गरजेचं  होतं. मी उठलो तिच्याजवळ गेलो आणि तिच्या डोक्यावरून हलका हलका हात फिरवला. निकिता calm down. मी अपराधी आहे तुझा, मी क्षमा मागतो तुझी, पण रडू नकोस. आपण ऑफिस मध्ये आहोत. कोणी इतक्यात आलं, आणि तुला अश्या अवस्थेत पाहील तर गहजब उडेल. शांत हो. मी तिच्या जवळ उभा होतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतो तिला शांत करण्यासाठी.

ती रडायची थांबली वर मान करून माझ्याकडे पाहिल आणि मला बिलगली. म्हणाली “प्लीज शशांक पुन्हा असं काही बोलू नको. मला हर्ट  करू नको. नाही करणार ना, प्लीज?”

आता काय करायचं, परिस्थितीने तर एकदमच वेगळं वळण घेतलं होतं. “नाही बोलणार.” मी लगेच म्हंटल. “पण तू शांत हो.” ती शांत झाली होती पण सोडायला तयार नव्हती. एक वेगळ्याच अनुभूति ची जाणीव होत होती. तीचं सान्निध्य एकदम सुखावून गेल. पण आता ती भानावर आली होती. न बोलताच वॉश रूम मध्ये गेली. मी तसंच उभा होतो माझ्या साठी निकिता अजूनही माझ्या जवळच होती. आणि तेवढ्यात दारावर टकटक झाली.

“कम इन मी म्हंटल.” देशमुख आले. “बसा” मी म्हंटल.

“आपले दोन मशीन  बदलायला झाले आहेत, मी आधी, बोललो होतो. ते आता पार बसले. आता काय करायच ? आपण ऑर्डर प्लेस केलेली आहे. पण यायला अजून 2 दिवस लागतील माझ पार्टी शी बोलण झाल. मी त्यांना म्हंटलं की लगेच पाठवा पण ते शक्य नाही अस म्हणाले.” – देशमुख.  

निकिता बाहेर आली एकदम फ्रेश दिसत होती. 10 मिनिटां पूर्वी जे काही घडलं, त्याचा मागमूसही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ती पण बसली.

निकिता मध्येच म्हणाली की “ही मशीनस् market मध्ये readyly available नसतात का?”

“नाही मार्केट मध्ये जे असतात त्यांच्यात बरेच बदल करावे लागतात म्हणून डायरेक्ट manufacturer कडूनच घ्यावी लागतात.” – देशमुख.

“ठीक आहे हे दोन दिवस वाया गेलेत पण हे कसे भरून काढता येतील याच प्लॅनिंग करा आणि ते तडीस न्या. म्हणजे delivery date चुकायला नको. हव तर त्या मशीन operators ना सुट्टी द्या आणि सांगा की हे काम त्यांना भरून काढायच आहे म्हणून.”

“ते सगळं ठरवून झालं आहे. तुमच्या कानावर घालायला आलो.” – देशमुख.  

“ओके.”

“साहेब प्रोजेक्टच कुठवर आल आहे? टेबलावरच्या कागदांकडे बघत त्यांनी  विचारलं.”

“तेच काम चालू आहे. सगळ फायनल झाल की सांगूच सगळ्यांना, आत्ता मात्र ही गोष्ट तुमच्या जवळच ठेवा. ठीक आहे कामाला लागा.”

देशमुख गेल्यावर मी निकीता ला म्हंटलं “माझ्यामुळे तू दुखावल्या गेलीस, याचं मला फार वाईट वाटतंय I am sorry for that. पण खात्री बाळग की माझ्या मनात तुला दुखवण्याचा मुळीच हेतु नव्हता. मी आपल गंमतीने तस म्हंटल. तुझ्या सारख्या सुस्वभावी मुलीला दुखवाव अस मला वाटेलच कस.”

“तू गंमतीने म्हंटल पण माझ्या मनाला फार लागल ते. promise me की असं  कधीही बोलणार नाहीस म्हणून.” – निकिता  

“I promise.”

“ओके मग आता काय करायचं? दोघांना फोन कर केंव्हा मीटिंगला बोलावतो आहेस?”– निकिता  

“हॅलो सारंग, शशांक बोलतोय. देसाई बोलले असतीलच आमच्या प्रोजेक्ट बद्दल.”

......

“ओके मग केंव्हा येतो आहेस एक preliminery मीटिंग करू. आज?”

......

“ओके.”

“निकीता, सारंग एक तासा भरात येतोय. चालेल ?”

“चालेल. पण आता आपल्याला, आपल्या बाजूनी तयारी करावी लागणार आहे. मला जरा brief कर म्हणजे त्यांच्या समोर माझी फजिती व्हायला नको. आणि त्यांच्यासमोर सारख सारखं मला विचारू नकोस. तूच बघ. मी तुझी assistant आहे मालकीण नाही हे लक्षात ठेव.” निकीताने आपली बाजू क्लियर केली.

त्यानंतर तिला brief करण्यात वेळ निघून गेला. तिला पण कॉन्फिडंस आलेला दिसला. म्हणाली “ओके आता मी तयारीत आहे. येऊ दे त्याला.”

“May i come in ?” सारंग आला होता.

“अरे सारंग ये ये बस. निकिता, हा सारंग, बिल्डर. आणि सारंग ही निकिता. आम्ही दोघ हे प्रोजेक्ट पाहतो आहोत.”

“Hi निकिता.” – सारंग.

“तुला देसाइंनी काय माहिती दिली, हे सांगशील तर बरं पडेल.”

“मी तासभर वेळ मागून घेतला तो त्यांच्याच साठी. आत्ता पर्यन्त त्यांच्याबरोबरच बोलत होतो. त्यांनी मला पूर्ण स्कीम सांगितली आहे.” – सारंग.

नंतर सर्व गोष्टी आधी ठरल्या प्रमाणे ध्यानात ठेऊन त्यावर सविस्तर

समाधान कारक चर्चा झाली. सारंग ला कॉंट्रॅक्ट द्यायच जवळ जवळ ठरलच, निकिता कडे पाहील तिने  पण मान डोलावली

“आता तुझ्या अंदाजा प्रमाणे overall प्रोजेक्ट कॉस्ट काय येईल ?”

“तुमच्या फॅक्टरी च्या मागे एक 5 एकर जमीन विकाऊ आहे. अर्थात ही 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अजूनही ती मोकळी आहे का बघाव लागेल. मी एकाला सांगून ठेवल आहे चौकशी करायला. ती जर मिळाली तर 5 करोंड जमिनी मध्ये जातील. आणि मग जमीन आपलीच असल्याने कन्स्ट्रकशन कॉस्ट ही कमी येईल. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 कोटी + 5 कोटी जमीन म्हणजे 35 कोटी च्या आसपास जाईल.” सारंग ने अंदाजे खर्च किती येईल ते सांगितलं.

मी आणि निकितानि एकमेकांकडे पाहिल. देसाइंनि जो आकडा सांगितला  होता त्यांच्या 50 टक्के ही कॉस्ट होती.

“पण सारंग, याच्यात आम्हाला कुठेही कमी प्रतीच सामान वापरायच नाहीये. अगदी लोखंड, सीमेंट, वाळू विटा पासून सर्व प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, टाइलस् वगैरे  आणखी काय काय असेल ते सर्व high class असलं पाहिजे. गुणवत्तेत वन मायनस नको. हे लक्षात घे. आणि मगच फायनल estimate दे.”

“या सर्वांचे detailed breakup सह estimate तुम्हाला मिळेल मग ती फिगर फायनल असेल. मुळात मी स्वत:च, quality conscious असल्याने क्वालिटी बाबत तुम्ही चिंताच करू नका.” – सारंग.  

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.