पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १५

प्रिय सोना..
आता आपली पिलू मोठी होत होती आपली जबाबदारी थोडी कमी होत होती तुला जास्त वेळ बसले की मूळव्याधीचा त्रास सुरू झाला होता खूप अभ्यास करून तू याची सर्जरी कुठ व कशी करायची हे ठरवले होतेस  आपल्या फिरण्यात अडचणआपण युरोप टूर करण्यापूर्वी पुण्यात तुझे मूळव्याध ऑपरेशन करून घेतले होते तुला ही सर्जरी लेसर ट्रीटमेंट पद्धतीने हवी होती ज्यामध्ये ब्लड लॉस व त्रास कमी होतो याचा खर्च जास्त असला तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता पुण्यातील नामांकित सर्जन कडून आपण ही सर्जरी करून घेतली सर्जरी थोडी क्लिष्ट होती पण तुझे रिपोर्ट व तब्येत चांगली असल्याने एका दिवसात आपण घरी गेलो अशा प्रकारच्या सर्जरी साठी त्या दिवशी चार पाच लोक ऍडमिट होते त्यांच्या सगळ्यांच्या घरची लोक त्यांच्या सोबत दिवसभर होती आपल्या घरचे मात्र कोणीच पहायला आले नाही पण मी दिवसभर तुझ्या सोबत होतेच कोल्हापुरात एक दीड महिना विश्रांती घेऊन आता तू एकदम ओके होतास शनिवार रविवार पोरीच्या आईबाबांच्या सुटी साधून पुण्यातून आपण छोट्या छोट्या तुझ्या शब्दात “महाराष्ट्र माझा” टूर करू लागलो मात्र आता पोरगी मागे लागू लागली मला का नेत नाही मी येणार असे म्हणू लागली तिला चुकवून अथवा काहीतरी थाप मारून जावे लागे येताना तुला काहीतरी आणू अशी समजूत घालावी लागे नेहेमीच तिच्यासाठी ,तिच्या आईसाठी मी गावाहून येताना काहीतरी घेऊन येत असे आता या वर्षी वयाची तीन वर्षे पुरी झाल्याने तिला शाळेत घालावे लागले एक व्हॅन लावली शाळेत पोचवायला ती व्हॅन अपार्टमेंटच्या दारात यायची तू ,मी ,तिची मेड पोचवायला जायचो दुपारी आणायला पण जायचो छान गुलाबी शाळेचा ड्रेस घातलेले बाळ खूप गोड दिसायचे पण तिला आपल्यासोबत घरात खेळणे सोडून शाळेत जायला नको असायचे सकाळी दहापर्यंत उत्साही असणारी ती तिच्या मेडने वेणी घालायला हाक मारली की रुसून बसायची कधी कधी बाळाच्या डोळ्यातून पाणी यायचे मग तू तिला मांडीवर घेऊन काहीतरी गमती जमती सांगायचा अखेर नाईलाजाने बाळ व्हॅन मध्ये बसायचे कधीतरी चुकून आपण म्हणायचो आज खेळू दे घरात पण तिच्या आईबाबाला हे आवडत नसे शाळेच्या संमेलनात ती गाणी नाटकात भाग घेऊ लागली ते सगळे बघून मन भरून येत असे अक्षरशः “गोड बाळ” होते ते आता अधून मधून सुटीत आपण तिला पुण्यात फिरायला नेऊ लागलो आपल्या नातेवाईक लोकांकडे नेऊ लागलो कधी बागेत, हॉटेलात घेऊन जाऊ लागलो दोन वर्षाची असल्यापासून ती एकटीच आपल्याकडे कोल्हापुरला चार पाच दिवस राहत असे तिला कोल्हापूर, आपले घर , बाग  घरी येणारे मांजर फार आवडत असे आपल्याकडे असणारा जिमी कुत्रा तिने पाहिला नव्हता पण जेव्हा तिला एक मोठ्या कुत्र्याच सॉफ्ट टॉय भेट दिले तेव्हा तिने त्याचे नाव जिमी ठेवले होते हे सॉफ्ट टॉय आपणच पूर्वी जिमीची आठवण म्हणून आणले होते तेच तिला देऊन टाकले होते तिला सुटी लागली की आपण कोल्हापूरला घेऊन जात असू मग चार दिवसांनी तिचे आई बाबा घेऊन जात कोल्हापूरची वडा, मिसळ, भेळ, आईसक्रीम, लस्सी तिला फार प्रिय असे ते चार पाच दिवस आपण खूप मजा करीत असू घरी पण तिच्या आवडीचे अनेक प्रकार मी तिला करून घालत असे तिला आपल्या बागेत फिरायला खूप आवडायचे.तुझ्या सोबत ती झाडाना पाणी घालायची फुले तोडायची डोक्यात मोगरा घालायची.झाडाची अंजिरे तोडून खायला तिला फार आवडायचे तिचे आई वडील तिला इकडे फार दिवस ठेवायला तयार नसत त्यामुळे रात्र थोडी सोंगे फार अशी स्थिती होत असे कधी कधी सकाळीच तिला रंकाळा फिरवायला नेत असू तिथे पक्षी पाहायला तिला खूप आवडत असे ती मोठी होऊ लागली तशी तिला पुण्यात शाळेनंतर एक पाळणाघर लावले होते परस्पर ती तिकडेच जात असे संध्याकाळी परत येई आता तिथे आपली फारशी गरज राहिली नव्हती तरीपण एक रूटीन म्हणून आपण जात येत होतो त्याच वेळेस डिसेंबर मध्ये आपण पंधरा दिवस मध्य प्रदेश ट्रिप केली फार छान एन्जॉयमेंट झाली होती मन अगदी फ्रेश झाले पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला खुप आवडले होते परत कधीतरी निवांत तिथे येऊन राहायचे असे आपण ठरवले होते आता तुझ्या हौसेने जुनी गाडी देऊन तू नवीन टाटा टीगोर गाडी घेतलीस ही गाडी मात्र आपण लाल रंगाची घेतली कारण तू डॉक्टर म्हणून यापूर्वीच्या आपल्या   जवळजवळ चार गाड्या पांढऱ्या होत्या आता त्याचा कंटाळा आला म्हणून माझ्या आवडीच्या लाल रंगाची गाडी तू घेतलीस पोरीला पण ती गाडी खूप आवडली अधून मधून पुण्यातून आपल्या “महाराष्ट्र माझा “टूर पण चालू होत्याचमधे एकदा विमानाने जाऊन आपण नागपूर सुद्धा चार दिवस फिरून आलो डिसेंबर २०१९ ला आपण अंदमान टूर केली पाच सहा दिवसाची ती टूर आटोपून आपण कोल्हापूरला परतताना आपल्याला एअरपोर्ट वर समजले की सिंगापूर ,चीन या बाहेरच्या देशात कोरोना नावाच्या व्हायरस ची लागण झाली आहे फार काही तपशील नाही समजला लगेच 2020साल सुरू झाले काही दिवसात परिस्थिती अचानक गंभीर होऊ लागली कोरोना व्हायरस परदेशात इकडे तिकडे सापडल्याच्या बातम्या येऊ लागल्या तिकडून लागण झालेले लोक विमानतळ कर्मचारी पूर्ण तपासणी केल्याशिवाय सोडेनात हा रोग संसर्गजन्य होता असेही समजलं हळूहळू करीत मार्च मध्ये मोदीजी नी इंडियात लॉक डाउन आणले लोकांना घरातून बाहेर पडायची बंदी झाली सगळे जगच एक बंदीशाळा झाले फार कठीण दिवस होते तेसर्वांचीच जणू सत्वपरीक्षा चालली होती आपल्या पुणे ट्रिप पूर्ण बंद झाल्या नुकतेच फेब्रुवारी महिन्यात आपण पिल्लूला भेटून आलो होतो नंतर मात्र हा कोरोना चा धुमाकुळ सहा आठ महिने चालूच होता या काळात पिल्लू चे आपले व्हिडिओ कॉल चालायचे गप्पा, मोठ्या मोठ्या गोष्टी दर रविवारी चांगले तास दोन तास चालायचे यानंतर आपल्याला कोविड साठी तीन इंजेक्शन घ्यावी लागली हा भर संपल्यावर आपण पुण्यात जाऊन आलो पोरीला फार आनंद झाला होता यानंतर आपले पुण्यात जाणे थोडे कमी कमी होत गेले महिन्यातून एखादी चक्कर व्हायची फार तर महाराष्ट्र फिरताना व्हाया पुणे आपण जात असू आता आपल्या टूर जोरदार सुरू झाल्यातुझा अभ्यास चालू असायचा कोणती टूर चांगली आहे कधी जायचे वगैरे लगेच आपण दुपारी बाहेर पडून बुक करीत असू मध्यंतरी आपण कोणार्क भुवनेश्वर , अयोध्या वाराणसी अशा दोन टूर एकदम बुक केल्या होत्या चांगल्या वाटल्या म्हणून आठ दिवसाच्या अंतराने असलेल्या घेतल्या होत्या नेहेमी आपण डोळ्यांचे रूटीन चेक अप करीत होतोच त्यात समजले की माझ्या उजव्या डोळ्याची दृष्टि कमी झाली होती किंबहुना त्या डोळ्याने काहीच दिसत नव्हते बाब थोडी गंभीर होती तुझे मित्र डोळ्याचे स्पेशालिस्ट होतेच त्यांना दाखवले असता उजव्या डोळ्याच्या पडद्याला भोक आहे त्याचे ऑपरेशन करावे लागेल व त्यातच मोती बिंदूचेही ऑपरेशन करून टाका असा त्यांनी सल्ला दिला टूर कॅन्सल करून ऑपरेशन करायचे म्हणले तर भरलेले पैसे परत मिळेनात शेवटी आपण निर्णय घेतला की दोन्ही टूर पूर्ण झाल्यावरच हे ऑपरेशन करायचे दोन्ही टूर संपवून आपण 13 फेब्रुवारी रोजी परत येणार होतो 15फेब्रुवारी 23 ही तारीख ठरली ऑपरेशन ची आपली पहिली टूर कोणार्क भुवनेश्वर अशी होती ती छान पार पडली दुसरी टूर अयोध्या वाराणसी लखनौ अशी होती  अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम तेव्हा चालू होते ती सगळी प्रक्रिया पाहायला मिळाली रामलल्ला चे छान दर्शन झाले