प्रिय सोना.
दुसऱ्या टूर मध्ये आपण जेव्हा आपण लखनौ येथे होतो तेव्हा विमान तळावर सहज तू मुलाला फोन लावलास त्याला सांगितलेस 15 फेब्रुवारी रोजी आईचे ऑपरेशन आहे तेव्हा तो म्हणाला मी तेव्हा तिकडे येईन नुसते ऐकून सुद्धा मला धन्यता वाटली कारण त्याचा स्वभाव फार भावनिक नव्हता आता तर थोडा तुसडा झाला होता घरगुती काही बाबी जेव्हा मी बोलायचे तेव्हा बरेच वेळा आमचे खटके उडायचेतू कधी या गोष्टीत भाग घेत नसायचा तुझे त्याचे संबंध त्यातल्या त्यात बरे बोलाचालीचे होते माझे त्याचे पहिल्या पासूनच फार सूत नव्हते त्यामुळे त्याने मी ऑपरेशन साठी तिकडे येईन म्हणण्यावर बरे वाटले तुलाही थोडी मदत झाली असती कारण तुला एकट्याला धावाधाव करावी लागली असती तुला पण बरे वाटले ट्रिप संपवून घरी आलो लगेच दुसऱ्या दिवशी मला ऍडमिट व्हायचे होते सामानाची जेवढी होईल तितकी आवरा आवरी करुन तुझी उद्याची तयारी सुरू झाली काय काय न्यायचे रिपोर्ट, कपडे आहे वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऍडमिट झाले अद्याप मुलगा येणार होता ना त्याचा काही पत्ता ना फोन एक डॉक्टर आणि नवरा या दोन्ही भूमिकेत तुझी खूप गडबड चालू होती त्यामुळे त्याला फोन करायला तुला वेळच नव्हता मला नऊ वाजता ऑपरेशन टेबल वर घेतले होतेदीड ते पावणे दोन तास हे ऑपरेशन चालले होते मला लोकल अनास्थेशिया दिल्याने सगळे समजत होते तुला सुद्धा एक डॉक्टर म्हणून ऑपरेशन पहायला बोलावले होते ऑपरेशन नंतर माझ्या एका डोळ्याला पूर्ण पॅक केले होते दुपारी जेवणासाठी तिथलाच डबा सांगितला होता ऑपरेशन नंतर मी दोन तास ग्लानीत होते तू बहुधा माझ्या जवळच बसून होतासतुझ्या लक्षात आले होते की आपला मुलगा आला नाही पण तू त्याला तेव्हा फोन नाही केलास मला सुखरूप घरी घेऊन जाणे जास्त महत्वाचे होते दुपारी मी उठलेभूक लागली होती आपण दोघे मागवलेल्या डब्यात जेवलो संध्याकाळी डॉक्टर बघून गेले आणि घरी जायची परवानगी दिली पंधरा दिवस डोळा तसाच पॅक राहणार होता शिवाय दीड दोन महिने डोळ्याला पट्टी असणार होती त्यामुळे काही काम करायची परवानगी नव्हती मोबाईल टीव्ही मनाई होती घरी गेल्यावर मात्र तू आपल्या मुलाला फोन लावला तेव्हा त्याने तारीख विसरलो असे सरळ सरळ सांगितले याचा अर्थ आपल्याला उमगला होता आता तुझी चोवीस तास परीक्षा सुरू झाली घरचे काम, स्वयंपाक, माझी काळजी घेणे सुरू झाले इथे स्वयंपाकाची चांगली बाई पण मिळत नव्हती शिवाय तुला बाईचा स्वयंपाक आवडत नव्हता..तू काळजी करू नको मी करेन नाश्ता स्वयंपाक सगळे..असे तू मला समजावलेतुला स्वयंपाक येत होता पण पोळ्या जमत नसत चारपाच दिवस ब्रेड वर भागवल्या वर तू म्हणाला तू मला फक्त कणिक भिजवून पोळी लाटून दे मी भाजून घेईन मी होकार दिला सद्य परिस्थितीत इतके शक्य होते आता तुझी दिवसभर चांगलीच पळापळ सुरू झाली मला काळा चष्मा वापरायला सांगितले होते.पण कोणतेच काम करायची परवानगी नव्हतीसकाळी उठून मला चहा देऊन तू फिरून यायचा आल्यावर माझे आंघोळीचे पाणी काढून देऊन केर वारे सफाई आटोपून घ्यायची माझी अंघोळ झाल्यावर स्वतः अंघोळ करून नाश्ता कॉफी करून मला द्यायचा दोघांचं खाऊन झाले की स्वतः पेपर वाचताना मोठ्याने मला वाचून दाखवायचादुपारी परत भाजी आमटी भात सलाड.. जेवायची तयारी जेवण झाले की सगळी आवराआवर करून कशी तरी तुला तासभर झोप मिळेपरत पाच वाजता मला चहा द्यायचा संघ्याकाळी तू एक चक्कर मारून भाजी वगैरे घेऊन यायचा मग मला पुस्तक वगैरे वाचून दाखवायचापरत रात्री साठी खिचडी, उप्पीट असे प्रकार करायचा शिवाय दिवसभर मला वेगवेगळ्या गोळ्या वेगवेगळ्या वेळी हातात आणून त्या घेण्यासाठी पाण्याचा पेला हातात देत होतास नेहेमी सुद्धा गोळ्या औषधे हे सगळे तुच मॅनेज करीत होतास हातात देत होतास पण आता दिवसाला चार पाच गोळ्या असत ते ही काम तुच पार पाडत होतास उजव्या डोळ्याच्या ऑपरेशनमुळे मला उजव्या कुशीवर वळायची परवानगी नव्हती डाव्या कुशीवर अथवा सरळ झोपायचे होते पण रात्रीत मी सवयीने उजव्या कुशीवर वळत असे रात्रीत माझ्यावर लक्ष ठेवून मला परत कुस बदलायला तू हलवत असे खरेतर तुझी झोप खूप हलकी होती छोट्या छोट्या गोष्टीने तुला जाग येत असे आणि नंतर परत झोप लागणे कठीण होत असे पण या काळात तू माझ्यासाठी स्वतःच्या झोपेची पण पर्वा केली नाहीस असे जवळ जवळ दीड महिना तुझे रूटीन न कंटाळता चालू होते मधल्या काळात मुलगा ,सुन ,आपली छोटी येऊन मला बघून गेली त्या दोघांचं किरकोळ चौकशी केल्यावर काम झाले होते फक्त छोटी माझी काळजी घेत माझ्याशी गप्पा मारत बेडरूम मध्ये बसून होती मला उजवीकडे वळून देत नसे अब्बा आजीला गोळ्या कोणत्या द्यायच्या असे विचारून स्वतः मला गोळ्या, पाणी देत असे मी तिला म्हणे..तू आई आहेस माझी….त्यावर ती हसून..ये माझ्या मांडीवर डोके ठेव ..असे म्हणे पोरीचा फार जीव होता माझ्यावर दीड महिना काळानंतर आपण डॉक्टरना दाखवून आलो ऑपरेशन छान झाले होते पट्टी काढल्यावर मला छान दिसू लागले आयुष्यातला एक कठीण कालखंड तू माझ्या साठी सोपा करून दिला होतास पंधरा दिवसांनी परत मला सगळीकडे अधून मधून छोटे ठिपके दिसू लागले थोड्या वेळाने परत ते नाहीसे होत डॉक्टरना दाखविल्यावर ते म्हणाले डोळ्याच्या पडद्याची recovery प्रोसेस मध्ये आहे हळूहळू कमी होतील ठिपके तरी चार पाच महिने हा प्रकार चालला होता आपल्या पिल्लूला जेव्हा हे सांगितले तेव्हा तिला थोडी गंमत वाटली आजी परत ठिपके आले की सांग मी रागावून त्यांना सांगेन ठिपक्यानो अजिबात आमच्या आजीकडे यायचे नाही तिला त्रास द्यायचा नाही खरेच पोर खूप “निरागस “होती आजीला त्रास झालेला तिला आवडायचा नाही हळूहळू मी बाहेर हिंडायला फिरायला लागले तेव्हा तू म्हणालास गेले दीड महिना मी एकटाच हिंडत होतो तुझ्याशिवाय फिरायला मजाच येत नव्हती खरेच होते ते..कधीही कुठेही फिरताना आपण एकत्र फिरायचो आपल्या संपूर्ण पंचक्रोशीत आपण कायम एकत्र फिरणारी जोडी म्हणून प्रसिद्ध होतो ..बाहेर पडल्यावर आधी माझ्या मनात आले प्रथम आई अंबाबाईचे दर्शन घेऊ जेव्हा जेव्हा आपल्या दोघांच्या मनात अंबाबाईचे दर्शन घ्यायची ईच्छा होत असे तेव्हा तेव्हा देवळात गर्दी अगदी नाममात्र असे आताही आईचे अगदी निवांत दर्शन झाले तुझ्या सारखा जोडीदार दिल्याबद्दल यापूर्वीही असंख्य वेळा आईचे आभार मानले होते आताही मी आभार व्यक्त केले तिची ओटी भरून साडी चोळी नेसवली पेढे ठेवले कुंभार गल्लीतल्या दत्ताला जाणे तुला खुप आवडत असे आताही घरची भरपूर सोनटक्का फुले, पेढे घेऊन दत्ताला जाऊन आलो रिटायर झाल्या पासून दर वर्षी आपण बदामी येथे कुलदेवीच्या दर्शनाला जात होतो देवीला जेव्हा जेव्हा आपण साडी घेत असू तेव्हा तेव्हा त्यातला एक वेगळा रंग पसंत करायला लावून तु मलाही साडी घेत होतास यावेळी मी काळया रंगाची मस्त साडी घेतली तुझे बरेचसे शॉपिंग ऍमेझॉन वर चालायचेआपण दोघे देवीची साडी घेऊन बदामीला जाऊन तिला नेसवून ओटी भरून आलो त्यासाठी तिथे एक मुक्काम पण केला शाकंभरी देवीच्या गळ्यात वेगवेगळ्या फळभाज्यांच्या माळा असत ते आपल्या पिल्लूला खूप आवडत असे म्हणून तिच्यासाठी एक फोटो पण घेतला पुढील महिन्यात मामे भावाच्या मुलाच्या लग्नाचा योग आला त्यासाठी पुण्यात गेलो तेव्हा ही काळी साडी नेसून तुझ्या सोबत मी भरपूर भाव मारून घेतला मामेभावा कडून गडबडीत मुलाकडे आमंत्रण गेले नव्हते त्यामुळे त्यांनी या लग्नाला यायला नकार दिला होता आपण मात्र आपल्या पिल्लू साठी घरी जाऊन भेटून आलो होतो तिला खुप आनंद झाला होता मामे भावाने नंतर मुलाला माफी साठी मुलाला फोन केला पण त्याने तो घेतलाच नाही सगळीकडे असेच गैरसमजाचे धुके पसरले होते