Miss'tery - भाग 12 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Miss'tery - भाग 12

एक व्यक्ती निमूटपणे सगळे ऐकत होती... मनात राग असला तरी ती ते दाखवू शकत नव्हती...
तिच्या मनात विचार येऊ गेला... "निशेचे मंद चांदणे आकाशी चमकूदेत..सगळ्यांना स्वप्नांच्या जगात रमू देत... मग मी डाव साधेल.. 🤫"

नियती ने एक प्रस्ताव मांडला..
" आता मुंबई मध्ये बरेच शहर येतात.. पण मुख्य शहर म्हणजे..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,भायकळा,दादर, पण तो इथे कुठे राहणारच नाही.. असे कोणतेतरी ठिकाण किंवा शहर असेल जिथे कोणी त्याच्यावर संशय घेणारच नाही... आणि त्याचा नक्कीच बंगला वैगरे असणार.. "

" पण बंगल्यात राहायची जोखीम का घेईल तो? "आरोहीने सवाल टाकला..

" बंगला असा तसा मुळीच नसणार.. एकतर तो बाहेरून पडका वाटणाऱ्या बंगल्यात असेल, नाहीतर जंगलाच्या ठिकाणी.. उंच आणि दाट झाडीच्या इथं देखील असेल.. 
शक्यता आहे.. 🤔"

"नक्कीच.. पण तो एका फ्लॅट मधनं पण ऑपरेट करू शकतो कि..."शुभमने शंका व्यक्त केली..

" ते नाही होणार 😉.. जन्मापासून पैस्यात आणि बंगल्यात वाढलेल्या व्यक्तीला.. फ्लॅट मुळीच झेपणार नाही.. आणि तो  ही जोखीम घेणारच नाही.. आजू बाजूचे लोकं संशय नाही का घेणार त्याच्यावर.... वरतून म्हणतात कि तो खुप रागीट आहे.. जो माणूस रागीट असतो.. त्याचा गळा खूप उंच टिपेचा आवाज काढतो...😏
आता जर एवढे होत आहे त्याच्यासोबत का नाही तो ओरडणार.., चिडणार.., ह्याने तर उलटून लगेच लोकांला कळेल कि हा घोळ आहे."

"पण तो बाहेर कुठेतरी स्वतःचा ३bhk फ्लॅट पण बंधू शकतो कि..". दुर्गा म्हटली.

" yess, you are right.आपण ह्याचा ही विचार करू शकतो..तर मग असल्या ठिकाणी आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागेल. "

" आपण मोठ्या शहरांत देखील शोधले पाहिजे.. कारण असे गाफिल राहून चालणार नाही.. तो मेंदूशी खेळ ही खेळू शकतो.. आपले लक्ष त्याच्या राहायच्या ठिकाण्याच्या कारणामुळे...विचलित करू शकतो.."

नियतीला ही पटले.. " हरकत नाही.. पण मुख्यातः तो नक्कीच प्रॉपर मुंबई मध्ये असेल नाहीतर त्याच्या आजूबाजूच्या शहरांत असणार... लांब तो राहणारच नाही... कारण जर त्याला त्याच्या धंद्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे असेल तर तो जवळचीच जागा निवडणार..जेणे करून तो कधीही त्या ठिकाण्यांवर जाऊ शकतो.. आणि लक्ष देऊ शकतो "यात तथ्य होते हे सगळ्यांना समजले..

" पण जर तो बंगल्यात, फ्लॅट मध्ये किव्हा जंगलात राहतच नसेल तर काय..?? ". दुर्गाच्या ह्या कडू पण सत्य वाक्यासमोर 
सगळे फिके पडत होते.. तिचा प्रश्न हा संशय निर्माण करत होता..

" तु देखील बरोबर आहेस.. पण आता आपल्याला शोधल्याशिवाय काहीच कळणार नाही.. शोध घेणे खूप महत्तवाचे आहे.. 🙁"

" प्रत्येकाला आता आराम करायची फुरसत अजिबात उरलेली नाही.. सगळ्यांना डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागणार आहे."

"सगळ्यांनी पांगायला पाहिजे मुंबई मध्ये..तेव्हाच हे शक्य होईल..मी अजून काही अधिकाऱ्यांना अपॉइंट करते... म्हणजे थोडेसे काम सोपे होत जाईल...उद्या मग १० पर्यंत सगळ्यांनी आपापली  कामे उरकायची आणि निघून जायचे मोहिमेला 🤝"

" ठीक आहे सगळे झोपा आता.. उशीर झाला आहे.. ".🥱 सगळ्यांचे ताणलेले डोळे पाहून दुर्गा म्हणाली..

सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले.. रात्र पसरत होती. शांतीच्या रात्री.. कोणीतरी कट कारस्थानाचे काळे दिवे लावू पाहत होते..

" बॉस,.. या लोकांना तुम्ही कोणत्या शहरात राहत आहात याची खात्री पटली आहे..हरामखोर आहेत साले 😠😒. "

" त्यांला कळणार आहे का पण मी कुठे राहतो ते 🤣🤣. या जन्मात शक्य नाही ते... त्यांच्या विचारापलीकडे माझे विचार धावतात 😏.. काळजी नको करुस.. त्यांला काहीच सुगावा लागणार नाही.. 😉"

" मला तेवढे माहित आहे बॉस 😉.. तुम्हाला तोड नाही.. 😁 पण तरी सांभाळून.. ही नियती खूप हुशार वाटते.. 🙄"

" तिचा बंदोबस्त करेल मी लवकरात लवकर.. पण तु तुझं काम नीट कर.. "

" हो काळजी नका करू.. उद्या डाव टाकणारच आहे मी.. 😂😏"

" शाब्बास!!😉फोन ठेव " आणि फोन ठेवला गेला.. दोन्ही जण शैतानासारखे हसतच होते.. पण शैतान आणि यांच्यात काही फरक दिसत नव्हता!!

दुर्गा पहाटे लवकर उठली होती.. सगळ्यांसाठी नाष्टा बनवून ती निघणार होती..अभय आणि नियती देखील लवकर उठले होते.. अंघोळ करून ते बाहेर आले... आणि सोफ्यावर बसले...

दरवाज्यातून एक आवाज आला..
" आईssssss जगदंबाsssssss कृपा करो....... " आई जगदंबेचा भुत्या देवीची परडी घेऊन आला होता...दुर्गाने देखील ते ऐकले...त्या दिशेला तिने पाहिले.

" माय..देवी आईची परडी भर!!!! मोठ्या मनाने धान्य दान कर... तुझ्यावर नेहमी कृपा राहो आईची... आईला साकडं घालतू 🙏". भुत्या हात जोडत भक्ति भावाने म्हणला..

" आलेच मी 😊..बाबा तुम्ही आत या तुम्ही.. "
" नाही पोरी..परडी मागाया आलू हाये... अन्न दान कर.. तेवढीच या म्हाताऱ्याला मदत 😊.. "पुन्हा त्याने हात जोडले..
सुरकुतले डोळे हसमुख झाले होते..आशेचे तेज त्या डोळ्यात दिसत होते

अभय आणि नियती त्या भुत्या कडे बघत होते..
तो भुत्या देखील त्या दोघांकडे बघत होता..पण कोणत्या नजरेने ते त्यालाच माहित.

दुर्गा भात घेऊन आली..हाताच्या ओटीने तिने देवीची परडी भरली... भुत्या ओरडला..."आई जगदंबेचा उदो ss उदो sss"
ते उठले.. तोल दगमगला म्हणून दुर्गाने लगेच हात पुढे करून त्यांला सांभाळले. तोल सावरीत ते म्हणाले..

" पोरी.. तुझ्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांसमोर हाय... भोळेपणाचा कळस...लबाडी पोशाकाला मुकलेले...संशयाची मूर्ती"अभय आणि नियती सगळे ऐकत होते... दुर्गा देखील ऐकत होती.तिने मागे पाहिले.. अभय आणि नियतीकडे पण चेहऱ्यावरून वाटतं नव्हते कि तिला कळले.. तिने दुर्लक्ष केले.


"जाता जाता येक सांगतु ,येळ जवळ येत चालली हाय.. अन्यायला न्याय, गुन्ह्याला शिक्षा आन जगाला शांती समदं मिळणार हाय.. कर्म चुकवू नका... देव हाय.. समदं बघतुया त्यो..सुधारा न्हायतर जीवाला मुकाल.."बोलता बोलता डोळ्यासमोर काळोख दाटला.. पुन्हा तोल गेला. पण दुर्गाने पुन्हा सावरले..

" येतो पोरी.. चांगले कर्म करत रहा... देवी आईचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी हाय.. " दुर्गाने हात जोडले.. नमस्कार केला... त्या भुत्याने तिला भर भरून आशीर्वाद दिला..

" माझे कर्म मी करतेच बरबोर.. चांगले आहे का नाही माहित नाही.. 😏... पण आवडते म्हणून करते... आईचा आशीर्वाद आहे म्हणूनच तर सगळं नीट चालले आहे 😂" मनातच ती बडबडली आणि हसली..

मागे वळली.. तिला नियती ने सवाल केला.. " काय म्हणत होते ते बाबा.. सुरवातीला काहीतरी आगळे वेगळेच बोलले "

" माझ्या पण डोक्यावरून गेलं.. जाऊदे ना. त्यांच्या गोष्टी कधीच नाही कळणार.. "ती किचेन मध्ये निघून गेली... ताट ठेऊन आपल्या रूम मध्ये निघून गेली तयारी साठी..

बाहेर आली. तिने नियतीला निरोप दिला आणि सांगितले " नाष्टा करून ठेवला आहे... तुम्ही निघाला कि नीट क्लिनिक ला लॉक मारा ... चावी तुझ्याजवळच ठेव.. "

" हो काळजी नको करुस.. "

" थांब मी सोडायला येतो तुला. " अभय मागून म्हणला

" जसा विचार केला तसंच हा नालायक करत आहे.. 😠". चेहऱ्यावर हास्य ठेऊन मनातच म्हणाली..

" अरे उगाच तुला कश्याला त्रास.. मी जाईल 😊"

" नाही मी येणार " तो जरा रागात म्हणाला.

" बर ठीक आहे. ये. चिडतोस कश्याला "

ते दोघे निघाले.. दुर्गाने लोकेशन सांगितले.. तो तिला तिथे घेऊन गेला..एका इमारती समोर गाडी थांबली..

" चल मी येते.. "

" मी पण येतो तुला वर सोडायला "

" 🙂excuse me. तु माझ्या क्लायंट च्या पर्सनल life मध्ये येतो आहेस... तुला नाव जाणायचे आहे का. त्याचे नाव वेदांत आहे... जाऊन register बघायचा असेल तर बघ "..चिडीला आलेली दुर्गा म्हणाली..

" नाही नको मी जातो " आणि तो तिथून निघून गेला...

" bloody fool, जरा जास्तच वर वर करत आहे हा... ह्याला मी बघेलच.. "आणि ती आपल्या वाटेला निघाली.. पण तो लांब गेल्यावर..