Prema Tujha Rang Konata .... books and stories free download online pdf in Marathi

प्रेमा तुझा रंग कोणता ....

प्रेमा तुझा रंग कोणता....

गिरीजा ला १२व्वीत उत्तम मार्क मिळाले आणि तिला एका नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज ला आरामात प्रवेश मिळाला... तिला इंजिनीअरिंग करण्यात काही रस न्हवता पण इतके चांगले मार्क मिळाले म्हणून तिच्या आई वडिलांना वाटल तिनी इंजिनीअरिंग कराव. दोघांच्या आग्रहास्तव तिला इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला!! खर तर, मनातून तिला आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ उत्तम लिखाण करायचं होत!! लेखिका होण तिच स्वप्न होत! ते स्वप्न तिनी खूप लहानपणीच पाहिलं होत!! पण तिच्या आई वडिलांची काही वेगळीच इच्छा होती! आपली मुलगी इंजिनीअर झाली कि तिला चांगला जॉब मिळेल आणि पुढे लग्नासाठीसुद्धा काही अडचण येणार नाही असा विचार करून तिच्या आई वडिलांनी तिला काय करायचं आहे हि गोष्ट लक्षात न घेता तिला इंजिनीअरिंग करायला आग्रह केला.. आई वडिलांचं म्हणन गिरीजा नी टाळल नाही आणि तिनी हि इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला... मनाविरुद्ध पण तिनी विरोध नाही केला!

गिरीजा च कॉलेज चालू झाल.. ती अभ्यासात हुशार होतीच पण तरीही तिचा कल जास्ती करून आर्ट्स च्या विषयातच होता! तिला वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करण्यात खूप रस होता!! इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये सुद्धा तिनी ज्यांना कलेत रस आहे अश्या लोकांशीच मैत्री केली... अभ्यासाबरोबरच तिनी तिची आवड जपली! इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये तिनी रायटिंग कॉम्पिटीशन मध्ये भाग घ्यायची आणि तिला तिची आवड जपण्यात यश मिळत राहील! तिच्या आई वडिलांच्या मताप्रमाणे तिनी इंजिनीअरिंग पूर्ण केल... आणि त्याचबरोबर आवडीलाही मुरड घातली नाही!

इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये तिचा असा वेगळाच ग्रुप असल्यामुळे इतर मुलांशी तिच कधी बोलणं सुद्धा झाल नाही... आपसूकच बरीचशी मुल तिच्यासाठी अनोळखीच राहिली होती! एकाच वर्गात असून सुद्धा तिला वर्गातली बरीच मुल माहिती पण न्हवती!

पाहता पाहता कॉलेज संपायची वेळ आली... गिरीजा आणि रोहित एका क्लास मधेच पण दोघांच कधी बोलण झाल न्हवत.. दोघ आपापल्या ग्रुप मध्ये बिझी असायचे.. इतर कुणाकडे पाहण्यात दोघांनाही रस आणि वेळही नसायचा!! गिरीजाचा ग्रुप म्हणजे कलेत रस असणाऱ्यांचा..आणि रोहित चा ग्रुप म्हणजे नाविन्याकडे भर असणाऱ्यांचा... दोन्ही ग्रुप्स चा एकमेकांशी फार संबंध यायचाच नाही! गिरीजा आणि रोहित दोघ विरुद्ध स्वभावाचे.. इतकी वर्ष दोघांना एकमेकांकडे पाहायलाही वेळ झाला न्हवता! पण दोघांची कॉलेज संपतांना धडक झाली.. दोघ गडबडीत होते आणि रोहित घाई घाई कुठेतरी जात होता! समोर न पाहिल्यामुळे रोहित येऊन गिरिजाला धडकला...दोघाची पहिली समोर समोरची भेट होती ती.. रोहित गिरिजाला धडकल्यामुळे गिरीजा जरा चिडली आणि चिडून बोलली,

“ए,लक्ष कुठे आहे? जरा समोर पाहत जा... मी आत्ता पडले असते..”

“ओह!!!... आय अॅम सॉरी..माझ लक्ष न्हवत...मी चुकून धडकलो तुला.. बाय द वे,सेम क्लास? मी तुझी बोललो आहे अस वाटत नाही... सो विचारतो आहे!”

“तू वेगळ्या क्लासरूमला आहेस मग इथे का आला आहेस? नाही ना... आता आपण इथेच धडकलो म्हणजे एकाच क्लास मधेच असणार ना...” गिरीजा खडूसपणे म्हणाली!

“हो? बरोबर आहे तुझा मुद्दा! मी वेगळ्या क्लास रूम मध्ये जाऊन कसा बसेन? हाहा! पण आपण एका क्लास मध्ये असून मी तुला ह्या आधी भेटलो कसा नाही...” जरासा विचार करून आणि आश्यर्यचकित होऊन रोहित बोलला..

“मला काय माहित.. तुला मी माहित नाही मग मी काय करू? तसही मलाही तू ह्याच क्लास मध्ये आहेस हे मलाही आत्ताच कळलय! अस नाहीये कि मी तुला पाहिलं होत... खर तर, मला तर कोणाकडे पाहायलाही वेळ नसतो.. माझे बरेच उद्योग चालू असतात.. सो...” गिरीजा चिडून बोलली...टी गोष्ट रोहित च्या लक्षात आल पण त्याकडे दुर्लक्ष करत आणि गालातल्या गालात हसत रोहित नी गिरीजा ला विचारलं.....

“ओह.. पण तू मला कधी दिसलीही नाहीस वर्गात...कॉलेज ला यायचीस कि नाही? आय नो,प्रॉक्सी लावत असेल कोणीतरी.. हाहा!”

“प्रॉक्सी... हाहा..." गिरीजा उपहासानी हसली... "मी हसू?” आणि वैतागून बोलली..

“हास कि..हसण इज गुड फॉर हेल्थ...! आणि उपहासानी हसती आहेस? खर हास कि...हाहा! बाय द वे, डोंट माइंड बर का... तू अशीच सारखी चिडत असतेस का? तुला हसता येताच नाही कि काय?"

"काय? मला हसता येत नाही? मला तू किती ओळखतोस? आत्ताच आली भेट झाली ना? आणि तरी सुद्धा तू इतक्या आत्मविश्वासानी कसा बोलू शकतोस.."

"मला वाटल म्हणून विचारतो आहे... आपण १० मिनिटांपूर्वी भेटलो पण तेव्हा पासून मी तुला एकदाही हसतांना पाहिलं नाहीये! तू वैतागलेली आणि चिडलेली च आहेस.. म्हणून कोणालाही तस वाटण साहजिकच आहे ना?"

गिरीजा नी थोडा विचार केला.. खरच रोहित शी बोलताना ती एकदाही हसली न्हवती!! तिचा स्वभाव तसा नसून पण ती तशी का वागली ह्याचा विचार ती करायला लागली... थोडा वेळ ती काही बोलली नाही हे पाहून रोहित पुन्हा बोलयला लागला...

"माझ बोलण इतक पटल कि त्यावर तू इतका खोल विचार करायला लागली आहेस? हाहा!"

"तू सारखा हसत असतोस का रे? काही कारणाशिवाय?..कारण तर हवय कि नाही हसायला? कि उगाच हसत राहायचं? तू काय असाच सारखा हसत असतोस? विचित्र वाटत नाही का?" गिरीजा गालातल्या गालात हसत बोलली!

"मे बी! हाहा! विचित्र काय वाटायचं? मी नेहमीच कारण न शोधता हसत असतो... मी हसराच आहे... आणि तुलाही हसता येत कि! हसत जा! बाय द वे, आता प्लीज चिडू नको!!! तुझा फोन नंबर देऊ शकतेस? इतके वर्ष एकाच क्लास मध्ये होतो तरी आपण एकदा सुद्धा बोललो नाही... आपण एकमेकांना ओळखतहि नाही..गम्मत आहे! आता परीक्षा झाली कि कॉलेज संपेल.. तुझा नंबर दिलास तर कॉलेज नंतर आपण कधीतरी भेटू शकतो..!”

“अक्चुअलि...यु आर करेक्ट! आय अग्री! बरोबर आहे! इतकी वर्ष आपण एकाच क्लास मध्ये असून आपण एकदाही बोललो नाही! आय कॅन शेअर माय नंबर! पण परीक्षेच्या वेळी मात्र मला तुला भेटता येणार नाही.. शेवटच वर्ष आहे आणि शेवटची परीक्षा त्याचबरोबर प्रॉजे्क्ट सबमिशन... मला आता भेटायला वेळ मिळणार नाहीये.. आणि सॉरी..मला तुझ नाव हि माहित नाहीये! तुझ नाव?”

“हो हो! सगळ संपला कि तर भेटू शकतो! मी कुठे म्हणलो..लगेच भेटू? परीक्षा माझ्यासाठी पण महत्वाची आहे... आणि मला सुद्धा प्रॉजे्क्ट सबमिशन आहेच कि! मी रोहित...आणि तू?”

“ओह रोहित! मी गिरीजा... माझा नंबर लिहून घे... तुला नंबर मिळाली कि मग मला मिस्ड कॉल कर..”

गिरीजा नी तिचा नंबर रोहित ला दिला... रोहित नी गिरीजा ला मिस्ड कॉल दिला...

“थॅंक्स...नंबर मिळाला...” गिरीजा म्हणाली...

“चलो बोलू कधीतरी... आता मी पळतो... मित्रांशी बोलायचं जरा... ते ओरडतायत माझ्या नावानी! आपण बराच वेळ गप्पा मारतोय! पण आता जायला हव! होप टू सी यु सून...”

“ओके... बाय.. नाइस टॉकिंग टू यु!”

“सेम हिअर! बाय..”

इतक बोलून दोघ आपापल्या मित्र मैत्रिणींबरोबर निघून गेले आणि आपल काम करायला लागले!...

कॉलेज संपल... दोघांनाही उत्तम मार्क्स मिळाले... पण परत दोघांची कधी भेट झाली नाही! आणि फोन नंबर असून सुद्धा दोघांमध्ये बोलण झाल नाही! गिरीजा आणि रोहित च्या ग्रुप मधले सगळे विखुरले.. गिरीजा आणि रोहित एकमेकांना विसरून गेले होते.. रोहित ला एका नामांकित कंपनी मध्ये जॉब मिळाला! त्याच्या अगदी मनासारखा जॉब! रोहित त्याच्या जॉब मध्ये बिझी झाला. गिरीजा ला जॉब करण्यात काही रस न्हवता पण गिरीजानी लिहायला चालू केलेलं.. पेपर,मासिका मध्ये तिचे लेख झळकायला लागले...

-----------------------------------------------------------------------------------------------

रोहित आणि गिरीजा आपापल्या आयुष्यात बिझी झाले... एक दिवस...रोहित त्याच्या कंपनी मधल्या मित्रांसोबत हॉटेल मध्ये गेला..... तो हॉटेल च्या बाहेर पडत असतांना समोरून गिरीजा तिच्या मित्रांबरोबर हॉटेल मध्ये शिरतांना त्यानी पाहिलं..... रोहित नी तिला पाहिलं आणि तो थांबला.. त्यानी त्याच्या मित्रांना पुढे व्हायला सांगितलं... आणि तो गिरीजा शी बोलायला गेला... गिरीजा समोर गेल्यावर तो म्हणाला..

“हे गिरीजा..आहे का ओळख?”

“हे रोहित ना...? हाय!”

“हो हो..रोहित! गुड यु रिमेम्बर मी! आणि आपण नेहमी योगायोगानेच भेटायचं का? आणि आपण फोन नंबर घेऊनही बोललो नाही कधी!”

“हाहा.." गिरीजा मनापासून हसली...."तू फोन केला नाहीस..आणि मला फोन करायला वेळ झाला नाही! आणि योगायोगानीच पण भेटतो आहे... ते महत्वाच!”

“अरे वाह! दिलखुलास हसतेस तू... गुड गुड!!! आणि काय करतेस सध्या? कुठे जॉब करतेस?”

“मी पण हसरीच आहे... आपण पहिल्यांदी भेटलो त्यादिवशी कोणतीच गोष्ट माझ्या मनासारखी होत न्हवती आणि तू मला धडकलास... मग माझी खूप चीड चीड झाली!!! तेव्हा चिडले म्हणजे मी सारखीच चिडत असते हे म्हणण साफ चुकीच होत तुझ!!! सध्या? हाहा! मी कुठेही जॉब करत नाही! पण जोरदार लिखाण चालूये..पेपर,मासिकात लिहिते! इंजिनीअरिंग केल पण जॉब न करता लिखाण करतीये...ऐकायला विनोदी वाटेल.. पण.... मला जॉब कधी करायचाच न्हवता! तू काय करतोस?”

“वाह! तू लिहितेस!!! भारी!!! ओह येस...मी परवा पेपर मध्ये पाहिलं होत तुझ नाव पण तीच तू असशील अस मला वाटलच नाही! म्हणजे एकाच नावाचे बरेच लोक असतात न त्यामुळे शुअर न्हवतो मी.... आणि खर सांगू का.. तू लिहितेस हे मी पूर्णपणे विसरूनच गेलो होतो! मी तो लेख वाचला पण लेख लिहिणारी तूच असशील अस खरच वाटल नाही! सॉरी! मी काही नाही...मनासारखा जॉब मिळालाय...एन्जॉय करतोय मनासारखं काम करण! तू सुद्धा मनासारखं काम करतेस.. नाइस!!”

“अरे डोंट बी सॉरी! इट्स ओके! आधी तुला कुठे माहित होत कि मी लिहिते? आय नो..एका नावाची हजारो लोक असतात... ती मीच हे तुला कळल नसेल हे मी समजू शकते!. डोंट थिंक अबाउट दॅट.... आणि बरोबर बोललास! मनासाख काम करता आल कि काम करतांना मजा येते! आणि ग्रेट! तू वाचलास माझा लेख! म्हणजे तुला वाचायची आवड आहे... आय थॉट.. तू अजिबातच वाचत नसशील!!!. तुला फक्त कामाची आवड आहे असच मला वाटत होत...”

“हे गिरीजा, कॅन यु डू मी अ फेवर?”

“हो...काय सांग कि!”

“तुझे लेख किंवा गोष्टी मासिकात किंवा पेपर मध्ये आल्या कि कॅन यु मेसेज ओर कॉल मी? तुझ्याकडे माझा नंबर आहे.. आहे ना? कि डिलीट केलास? मला तुझा लेख फार आवडला... तू खूप सुंदर लिहितेस... मला तुझे लेख आणि इतर लिखाण वाचायला नक्की आवडेल!!”

“नो नो.. नंबर डिलीट नाही केलाय! तुझा नंबर आहे माझ्याकडे... आणि थॅंक्स!!! मी नक्की तुला मेसेज किंवा कॉल करून तुला माझ लिखाण आल कि सांगत जाइन... आणि सांगायचं म्हणजे, ह्या महिन्यात मासिकात आलीये गोष्ट!”

“ग्रेट.. मासिकाच नाव सांग! मी घेतो ते मासिक विकत! आणि भारी ग! मला वाटल तरी मी लिहू शकणार नाही! हाहा!”

“अस नाही.. तू सुद्धा लिहू शकतोस... आणि तुला कामाची आवड आहे.. मला लिहिण्याची! बाकी काही नाही!! तुझी वाचून झाली गोष्ट कि रिपोर्ट दे बर का.... फक्त वाचून मासिक बाजूला ठेऊन देऊ नकोस!”

“नक्की.. वाचलं कि रिपोर्ट देतो! आणि तसहि तू मस्तच लिहितेस!!! आज परत योगायोगानी भेटून गप्पा झाल्या... नाइस मीटिंग यु! आता कधीतरी ठरवून भेटू..”

“ओके..आता मी जाते! मित्र थांबलेत खायला..”

“येस..मी पण जातोय बाहेर! माझे मित्र पण वाट पाहत असतील....”

“ओह... तुमच खाण झाल? आणि आम्ही आत्ता शिरलोय हॉटेल मध्ये! हाहा! भेटू असच”

“ओके..”

"आणि कधीतरी फोन किंवा मेसेज करत जा... इतकाही कंजूसपणा चांगला नाही! हाहा!"

"ओह माय गॉड... जस काही तू रोज १० मेसेजस आणि कॉल्स करत होतीस! हाहा!"

"हाहा.. टेक केअर!! होप टू सिया सून!!"

"सेम हिअर!! यु टू टेक केअर!!"

"बाय..."

इतक बोलून दोघ आपापल्या वाटेनी निघून गेले...पण त्यानंतर दोघांच बोलण एकदम वाढल.. गिरीजा न चुकता लेख किंवा गोष्ट आली कि रोहित ला सांगायला लागली! गिरिजाचे लेख किंवा गोष्टी वाचल्यावर रोहित न चुकता तिला अभिप्राय द्यायचा.. हळू हळू दोघांच भेटण चालू झाल.. त्यांच्यातली जवळीक वाढायला लागली.. आता दोघ एकमेकांना नीट ओळखायला लागले... आणि एक दिवस रोहित ला “साक्षात्कार” झाला,त्याच गिरीजा वर प्रेम आहे! त्याला गिरीजा आवडायला लागली...त्याला त्याच आयुष्य तिच्याबरोबर काढायचं होत... आणि रोहित ला ते लवकरात लवकर गिरिजा ला सांगायचं होत! पण रोहित नी ते लगेच सांगण टाळल.. बरेच दिवस दोघ भेटत राहिले..फोन वर त्यांच बोलण चालूच होत! पण रोहित तिच्याशी त्याच तिच्यावर प्रेम आहे ह्याबद्दल काहीच बोलला नाही! एका रात्री त्याला जाणीव झाली,आता लवकरात लवकर गिरीजा ला भेटून तो तिच्यावर प्रेम करतो हे सांगायला पाहिजे!! आता खूप दिवस थांबलो आणि आताच योग्य वेळ आहे अस वाटून आणि न राहवून त्यानी गिरिजाला सगळ खर सांगायचं ठरवलं...त्यानी गिरीजा ला भेटायला हॉटेल मध्ये बोलावलं...गिरीजा हि नकार न देता रोहित ला भेटायला आली..

“बोल...आज अचानक का भेटायला बोलावलं?”

"सांगतो.... आधी काय खाणार त्याची ऑर्डर तर देऊ..."

"ठीके... तू दे ऑर्डर!!!"

रोहित नी खायची ऑर्डर दिली आणि तो बोलायला लागला,

“महत्वाच सांगायचय...”

“बोल कि...”

“चिडू नकोस... मी तुला घाबरतो! तू कधीही चिडू शकतेस!! आणि कश्यानी चिडलीस हे कळण अवघड असत!. आणि तुझ लग्न ठरलं बिरल नाहीये ना? आय नो,लग्न ठरलं असतास तर तू मला सांगितलं नक्की असतस.. पण मी खात्री करून घेतोय!!!” इतक बोलून रोहित थांबला आणि त्यानी एक पॉज घेतला..

तितक्यात खायची ऑर्डर आली आणि खाता खाता गिरीजा बोलायला लागली,

"नाही नाही! मला नाही घाई लग्न करायची! तुझ लग्न ठरलं आहे का काय?"

"नाही ग...."

"आणि...मी कधी चिडते? फक्त एकदाच तर चिडले होते...जेह्वा आपण पहिल्यांदी भेटलो होतो.. आणि तुझ्यावर चिडले न्हवते... फक्त त्या दिवशी मूड अतिशय खराब होता... मी तुला सांगितलं होत ना? मी सारखी सारखी थोडीच चिडते? असे आरोप करू नकोस.... तू सांग... काय सांगायचं आहे?"

रोहित च गिरीजा काय बोलती आहे त्याकडे अजिबातच लक्ष न्हवत... तो स्वताच्या विचारात मग्न होता!!! आणि यांनी गिरीजा ला काहीच उत्तर दिल नाही!

गिरीजा रोहित काय सांगणार आहे ते ऐकायच होत..पण रोहित काही बोलत नाहीये हे पाहून ती त्याला बोलली..

“सांग कि...काय सांगायचं? किती वेळ लावणार आहेस? इतक काय महत्वाच आहे?”

गिरीजाच्या बोलण्यानी रोहित भानावर आला... आणि तो अजिबात वेळ न दवडता डायरेक्ट मुद्द्याचच बोलायला लागला..

“आय लव यु..विल यु मॅरी मी?” गिरीजा त्याच्याकडे शांतपणे पाहत होती.. पण जेह्वा रोहित तिला आय लव यु म्हणाला तेव्हा ती जरा उडालीच!!! त्याच बोलण तिच्यासाठी अनपेक्षित होत... पण तरीही तिनी रोहित ला उत्तर दिल, बोलली,

“आर यु सिरिअस?”

“हो ग... बरेच दिवस तुला सांगायचं होत पण मी ते सांगू शकत न्हवतो.. शेवटी आज सांगितल.... आणि मी अशी गम्मत कधीच करणार नाही...यु नो..”

गिरीजा थोडी अस्वस्थ झाली...“पण अचानक अस का वाटल? म्हणजे मी तुला फक्त फ्रेंड म्हणून पाहत होते..बाकी काही मी विचार केला न्हवता...”

“मी मला वाटल ते सांगितलं...पुढे काय तू ठरवायचं.. आय वोन्ट फोर्स यु.. मला तू आवडतेस... पण तुझा निर्णय घ्यायला तू फ्री आहेस!”

“आय नीड सम टाइम.. मी लगेच तुला काही सांगू शकत नाही...” ती म्हणाली..

“मी लगेच उत्तराची अपेक्षा करतही नाहीये... यु टेक युअर टाइम.. आय कॅन वेट!”

“ओके...” गिरीजा इतक बोलली आणि पुढे काहीच न बोलता ती तिथून निघून गेली... तिनी काही खाल्लं पण नाही!

रोहित नी मनातल सगळ सांगितल्यामुळे त्याला मोकळ वाटायला लागल... तोही बिल देऊन हॉटेल मधून निघाला... आणि त्यानी थेट घर गाठल...

घरी जाऊन गिरीजा नी बराच विचार केला...बराच वेळ ती विचार करत तिच्या खोलीत बसून राहिली... बराच विचार केल्यावर, तिनी मनोमन निर्णय घेतला आणि त्याच दिवशी रोहित ला भेटायला बोलावलं.. पण तिनी हॉटेल मध्ये बोलावण टाळल.. तिनी रोहित ला एका बागेत भेटायला बोलावलं... रोहित लगेच बागेत आला आणि आल्या आल्या त्यानी गिरीजा ला विचारलं,

“बोल...काय ठरवलं आहेस?”

“मी बराच विचार केला.. आणि आय ऑल्सो फेल्ट,आय लव यु... पण मी सांगते,मी काम करेन आणि पैसे मिळवेन ह्याबद्दल खात्री नाही..मला खर तर आर्ट्स ची आवड आहे.. म्हणजे मला लिहिण्याची आवड आहे... पण आई वडिलांच्या आग्रहास्तव मी इंजिनीअरिंग केल... तुला वाटेल इंजिनीअरिंग केलय म्हणजे बरोबरीनी काम करून पैसे मिळवू पण तस नाहीये..मी स्पष्ट सांगतीये! नंतर भांडण होण्यापेक्षा आधीच माहित असलेल चांगल सो सांगितल...”

“तू वेडी आहेस का? तू पैसे कमवावे अस मी म्हणणार पण नाही..मला आवडत म्हणून मी काम करतो आणि मला भरपूर पैसे मिळतात.. बायकोनी घरासाठी पैसे मिळवायला काम कराव अशी माझी अपेक्षाही नाही... माझ ठाम मत आहे,प्रत्येकानी आपल आयुष्य आपल्याला हव तस जगाव.. मनासारखं!!! बाय द वे, तू मला सांगितलं होतस, तू जॉब करणार नाहीयेस! तुला लिहिण्याची आवड आहे.. आणि तू खूप मस्त लिहितेस.. मग मी तुला का म्हणेन कि तू सुद्धा जॉब करून पैसे आणावेस! आणि पैसे मिळतातच ग... कामातल समाधान महत्वाच!! अजून काही शंका कुशंका आहेत? हाहा..”

“नो..हाहा!.. तुला आठवतंय का मी तुला सांगितलं होत कि मी जॉब करणार नाहीये?? मी तुला हे सांगितलं आहे हे मला आठवत न्हवत सो....” इतक बोलून गिरीजा गोड हसली आणि डोळ्यातून तिनी तिचा होकार रोहित ला सांगितला..

“तू खूप गोड हसतेस... आणि हसलीस म्हणजे तुझा होकार आहे ना? हाहा... विचारून घेतलेलं बर.. नाहीतर भांडत बसशील..."

"हो रे... सगळ बोलूनच दाखवायला हव का?"

"मग गुड... हाहा! आपण घरातल्यांना सांगून लवकरच लग्न करू..”

“येस.. मला वाटल न्हवत तू मला कधी प्रपोज करशील.... पण तू प्रपोज केलस, आणि मी हि होकार दिला!! सगळाच अनपेक्षित!! आजचा दिवस मला नेहमी लक्षात राहील...."

"हो ना... मला पण आजचा दिवस नेहमीच लक्षात राहील...."

"आता भूक लागलीये.. खायला घाल..”

“ओह हो..आत्तापासूनच होणाऱ्या नवऱ्याचा खिसा कापायला सुरु करणारेस का?”

“हाहा...हो..तसच समज.. तूच म्हणालस ना,तुला भरपूर पैसे मिळतात.... मग थोडे होणाऱ्या बायकोसाठी वापर.. तुला काही प्रॉब्लेम नाही ना?”

"तू म्हणजे ना...कसला प्रॉब्लेम असेल मला.... मी आनंदानी बायको साठी पैसे खर्च करेन.. कुठे जायचं सांग.. आज तुझा होकार आला म्हणून माझ्याकडून तुला ट्रीट!"

रोहित च्या प्रेमळ आणि समजूतदार वागण्यामुळे गिरीजा खुश झाली.... दोघ हॉटेल मध्ये जाऊन खाऊन आले..नंतर दोघांनी घरच्यांच्या सम्मतिनी लग्न केल...दोघांचा संसार चालू झाला... रोहित चे आई बाबा पण एकदम समजूतदार होते... त्यांनी सुद्धा गिरीजा ला कोणत्याच गोष्टी वरून विरोष केला नाही... लग्न होऊन बरेच दिवस झाले... रोहित नी आधीची कंपनी बदलली आणि एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायला लागला... साहजिकच त्याच काम आणि जबाबदाऱ्या वाढल्या. गिरीजा सुद्धा प्रसिद्ध लेखिका झाली.. रोहित सारखा कामात बिझी राहायला लागला... आणि गिरीजा पूर्ण वेळ लिखाण करायला लागली.. रोहित च काम खूप वाढल्यामुळे त्याच वागण जरा बदलल.. आधी प्रत्येक लेख आणि गोष्टीच भरभरून कौतूक करणारा रोहित एकदम बदलला... बदलला म्हणजे त्याचा कामाचा ताण इतका वाढला कि त्यातून त्याला वेळ मिळेनासा झाला... त्याला गिरीजा च लिखाण वाचायलाही वेळ नसायचा.. एक दिवस गिरीजा वैतागली आणि रोहित कडे गेली..रोहित नेहमीप्रमाणे काम करण्यात गुंग झालेला... त्यानी गिरीजा कडे पाहिलं देखील नाही.. ती लाडात येऊन रोहित ला म्हणाली,

“रोहित,काय करतोयस?”

“काम..दुसर काय करणार मॅडम..”

गिरीजा कडे न पाहताच रोहित नी उत्तर दिल... गिरीजा चिडली आणि बोलली,“सारख कामच करत बैस तू..रविवारी पण कसलं काम रे...”

“ऑफिस च.. हाहा!”

“काय वागण आहे तुझ? आणि सारखा सारखा हसू नकोस...” गिरीजा ची चिडचिड वाढत होती......

“का? मी काय केल? आणि का नको हसू?” गिरीजा कडे लक्ष न देता रोहित काम करत राहिला...

“ऐक...काम बंद करून माझ्याकडे बघून बोल..” रोहितला गुरकावत गिरीजा बोलली..

“ओके ओके... काम बंद करतो..." त्यानी लॅपटॉप बंद केला.." बोल काय म्हणती आहेस?”

“मी तुला मागे लिहिलेलं वाचायला दिल होत... ते कस लिहिलंय..काय बदल करू ते सांगितलं नाहीस.. तू काही बोलला नाहीस म्हणून मी ते मासिकाला दिल आणि ते मासिकात आलंय आणि ते पण तू वाचल नाहीस..? काय आहे हे वागण?”

“ओह.. गुड!! आणि अग,वेळ मिळाला नाही... मुद्दाम वाचल नाही अस थोडी करेन मी? मला माहितीये तू खूप सुंदर लिहितेस....” रोहित हसत बोलला..

“वेळ मिळाला नाही? वा वा! आणि प्लीज हसू नकोस..आधीच मी भयंकर चिडलीये...” गिरीजा च्या रागाचा पारा वर चढत होता..पण रोहित शांतपणे उत्तर देत राहिला...

“हो खरच वेळ नाही मिळाला... आणि इतकी का चिडलीस? मी पण कामच करतोय.. टाइमपास तर करत नाहीये ना? बाय द वे, तू माझ्यासाठी वेळ कधी काढतेस? मुद्दाम काढलेला वेळ? आठवतंय का?”

“तू बिझी असतोस आणि मी काहीच करत नाही का? मी पण बिझी असते.. कुठून देणार तुला वेळ?”

हे ऐकून रोहित हि एकदम चिडला... इतका वेळ रोहित शांत होता पण त्याला हि राग यायला लागला... आणि सुसंवादाच रुपांतर भांडणात व्हायला लागल...

“तुला वेळ नाही..मग माझ्याकडून कशी करतेस ग अशी अपेक्षा?” रोहित चिडून बोलला...

“मी लेखिका आहे...मला वेळ होत नाही.. तू काय जॉब करतोस..तू माझ्यासाठी थोडा वेळ काढू शकतोसच ना?”

“ओह हो..लेखिका...आणि मी जॉब करतो म्हणजे काहीच नाही? मला हि खूप जबाबदाऱ्या आहेत! मी काय फालतू काम करत नाही.. मी मोठ्या हुद्द्यावर काम करतो... मला खूप काम असत...खूप जबाबदारीच काम...”

“आहेच मी लेखिका...माझा लेख मासिकात आला कि लोक फोन किंवा मेल करून अभिप्राय देतात...त्यांना उत्तर द्यायची असतात...मला खरच वेळ होत नाही... इतकी लोकांना आपणहून बोलायचं असत माझ्याशी...त्यांना उत्तर दिलीच पाहिजेत ना...अनोळखी लोक आपणहून बोलतात आणि तू माझा नवरा असूनही एकदाही कौतुक करत नाहीस..”

“वेळ होत नाही.. आणि सारख सारख कौतुक काय करायचं? मला माहितीच आहे.. तू मस्त लिहितेस! आणि ते मी तुला किती तरी वेळा सांगितलं आहे... हल्ली काम वाढलय म्हणून वेळ नाही होत पण तू लगेच मी वाचतच नाही असा आरोप करू नकोस!”

“कौतुक नाही रे..पण २ चांगले शब्द बोलू शकतोस ना..पण नाही! तू आधी कसा होतास आणि आता कसा झाला आहेस! तू अगदी तुझ्या आई वडिलांसारखाच वागायला लागला आहेस... त्यांना पण मी केलेल्या कोणत्याही गोष्टीच कौतुक नाही... आणि त्यांच्या मनात असत म्हणे कौतुक...मनात असत मान्य पण बोलून दाखवायला नको का? कस कळणार समोरच्याला?”

गिरीजा च हे बोलण ऐकून रोहित भडकला...आणि आवाज चढवून बोलायला लागला..

“बास गिरीजा..माझ्या आई बाबांविषयी काही बोलू सुद्धा नकोस... त्यांना मध्ये आणायचं काहीही कारण नाहीये आत्ता! ते आहेत तसे आहेत.... आणि ते कधी तुला काही बोलत सुद्धा नाहीत.. त्यानी तुला कधी विरोधही केला नाही... माझी आई सुद्धा तुला काहीही त्रास देत नाही...आणि आपण दोघ बोलतोय आणि आत्ता त्यांचा संबंध सुद्धा नाहीये! माझ्या आई बाबांविषयी बोललेल मी खपवून घेणार नाही...”

“ठीके रे... मला कुठे हौस आहे त्यांच्याविषयी बोलायला...”

“बर झाल... बोलूच नकोस काही! जा तू तुझ्या फॅन्स ला उत्तर द्यायला... जे आहेत त्यांची तुला किंमत कधी कळणार नाही..” नेहमी हसतमुख असणारा रोहित त्या दिवशी मात्र भयंकर चिडला... आणि चिडूनच तो गिरीजा शी बोलला...

“ओके....” गिरीजा धुसपूस करत बाहेर निघून गेली...

गिरीजा आणि रोहित मध्ये एक प्रकारची दरी निर्माण व्हायला लागली.. दोघांमधला संवाद कमी ह्वायला लागला.. दोघ कधी बोलले तर त्याचा शेवट भांडणानेच व्हायला लागला.. गिरीजाच लिहिण्यात लक्ष लागेनास झाल.. ती एक दिवस वैतागून बोलायला लागली..

“रोहित,आता बास रे..”

“काय बास...... मी काही बोललो देखील नाहीये... हल्ली मी तुझ्याशी कमीत कमी च बोलतो! उगाच भांडण नको... मला कामच पण टेन्शन असत.. त्यात आपली भांडणं नको! कामावर परिणाम नको व्हायला”

“काय? मी भांडते? तू अगदी धुतल्या तांदूळा सारखाच आहेस कि काय? अगदी कधीच भांडत नाहीस... असा असशील तर मला न्हवत ह माहित! आणि तू स्वताहून कधी भांडतच नाहीस ना?"

"मी कधीच भांडत नाही..."

"ओह.... आत्ता पण तूच भांडतो आहेस! मला आता रोजची भांडण सहन होत नाहीयेत.. वी नीड टू गिव्ह इच ऑदर सम टाइम.. आय नीड तो थिंक अबाउट अवर रिलेशनशिप... आधी कधीतरी भांडायचो.... पण आता सारखीच भांडण होतात आपल्यामध्ये! साध बोलण बंदच झालय...आणि रोजच्या भांडणामुळे मला माझ्या लिहिण्यात लक्ष केंद्रित करता येत नाहीये..मी डिस्टर्ब असते सारखी...”

“म्हणजे काय?”

“मी काही दिवस आई कडे जाऊन राहणारे.. मग मी पुढचा विचार करेन.. मला वाटत आपण आता वेगळ होण्याचा विचार करायला हवा..”

“मलाही तसच वाटतंय....रोज रोज ची भांडण मला हि सहन होत नाहीयेत... तू जाऊन राहा आई कडे... आपण एक महिन्यानंतर भेटू... आणि काय करायचं ठरवू..”मलाही आत्ता खूप महत्वाच प्रॉजेक्ट आहे.. मलाही शांतता हवी आहे... बर झाल तूच म्हणलीस कि आई कडे जाते! मी ते म्हणलो असतो तर भांडण चालू केल असतस..."

“गुड.. आपले हे विचार तरी पटले..गुड टू नो! आता मी आवरते सामान आणि थेट आईकडे जाते.. मला माझी कादंबरी पूर्ण करायची आहे.. डेड लाइन १ महिन्याची आहे...१ महिन्यात कादंबरी प्रकाशित करायची आहे... सो मला शांतता हवी आहे लिहायला..”

“ओके...”

इतक बोलून गिरीजा सामान आवरायला निघून गेली... आणि रोहित आपल काम करायला निघून गेला... गिरीजा सगळ सामान घेऊन थेट आईकडे गेली..तिनी तिच्या घरची बेल दाबली..दार आईनी उघडल..गिरीजा सामान घेऊन आलेली पाहून आई बुचकळ्यात पडली..

“आई...बाजूला हो... मला सामान ठेऊ दे माझ्या रूम मध्ये..”

“काय झाल गिरीजा...एकदम सामान घेऊन का आलीस?” आश्यर्यचकित होऊन गिरीजच्या आईनी गिरिजाला प्रश्न केला..

“नंतर सांगते ग आई.. आधी मला जाऊदे माझ्या रुममध्ये... आणि जरा वेळ प्लीज डिस्टर्ब करू नकोस..मला कादंबरी लिहायला चालू करायचीये.. एका महिन्यात प्रकाशित करायची आहे..”

“ठीके..बोलू नंतर...आणि लिही शांतपणे कादंबरी..”

गिरीजा तिच्या रूम मध्ये गेली आणि दार लाऊन लिहायला लागली... तिनी कॉम्पुटर लावला आणि तिनी लिहायला चालू केल..तिला काय लिहाव हे सुचत न्हवत आणि तितक्यात बीप आवाज झाला...तिनी पाहिलं एक न्यू मेल... तिनी ते मेल वाचायसाठी उघडल...त्यात लिहील होत,

“मॅडम,बरेच दिवसात तुमचे नवीन लेख वाचण्यात नाही आले... हल्ली लिहित नाही का? तुमच्या नवीन लेखाच्या प्रतीक्षेत...”

तिला मेल पाहून बर वाटल.. खरच बरेच दिवसात तिनी काहीच लिहील न्हवत.. पण तरीही लोक तिच्या लेखांची वाट पाहतात हे बघून तिला हुरूप आला...तिनी मेल ला उत्तर दिल... “थॅंक्यू! माझ लिखाण वाचता...सध्या लेख नाही लिहिते पण सध्या कादंबरीवर लक्ष केंद्रित केलाय...लवकरच तुमच्यासाठी कादंबरी प्रसिद्ध होईल..” आणि मेल कोणी पाठवलय त्यांच नाव कुठे दिसतय का ते पाहायला लागली...पण मेल कुणी पाठवलय त्यांच नाव कुठेच न्हवत.. त्यामुळे तिनी ते मेल सेंड केल आणि परत कादंबरीचा विचार करायला लागली...

बराच वेळ विचार करूनही गिरीजा ला मनासारखा काही सुचत न्हवत.. आता कॉम्पुटर बंद करून निवांत बसून विचार करू असा विचार करत ती कॉम्पुटर बंद करायला लागली..तितक्यात तिला मेलबॉक्स मध्ये एक मेल दिसलं...तिनी उत्सुकतेनी ते मेल उघडल.. मगाशी आलेल्या इमेल अॅड्रेस वरूनच तिला अजून एक मेल आलेलं.. तिनी ते मेल उघडल..आणि ती ते पत्र वाचायला लागली,

“वा..कादंबरी!! तुम्ही लिहिलेली कादंबरी वाचायला मी उत्सुक आहे..”

तिनी नकळत त्या मेल ला उत्तर दिल,

“मी लिहायचा प्रयत्न करतीये पण काही सुचतच नाहीये..”

“मॅडम मी काही मदत करू?” गिरीजा च मेल गेल्यानंतर लगेचच त्याला उत्तर आल...

गिरीजा नी जरा वेळ विचार केला आणि उत्तर दिल, “चालेल...”

मध्ये जरा वेळ गेला...गिरीजा ला काही उत्तर आल न्हवत... आपण उगाच अनोळखी माणसाला “चालेल” बोलून गेलो अस वाटून ती कॉम्पुटर बंद करायला लागली..पण तितक्यात तिच्या मेल ला उत्तर आलेलं तिनी पाहिलं...तिनी काय लिहील असेल हे पाहायला मेल उघडल,

“मॅडम,तुमच्या आयुष्याची गोष्ट लिहा.. म्हणजे ती थीम घेऊन..गोष्ट मस्त होईल....प्रत्येकाच आयुष्य वेगवेगळ्या रंगानी भरलेल असतच... आणि सॉरी...तुमच्या सारख्या प्रसिद्ध लेखिकेला मी काही मदत करू का हे विचारण मूर्खपणाच होत..पण मी स्वताला थांबवू शकलो नाही.. खर तर,आम्हाला वाटल तरी आम्ही लिहू शकत नाही..आम्ही आपले सतत कामात मग्न.... आणि बरेच दिवस तुमच्याशी बोलायला होत पण दरवेळी ते राहून जात होत! तुमची कादंबरी लिहून झाली कि नक्की सांगा..”

तिनी मेल वाचल आणि तिचे डोळे लकाकायला लागले...तिला अनोळखी माणसाकडून आलेला सल्ला मनापासून आवडला... तिनी त्या मेल ला थॅंक्यू च मेल पाठवलं आणि ती लिहायला बसली... लिहिता लिहिता अनोळखी लोक पण किती मदत करतात आणि रोहित असा कसा वागला असा विचार करत ती परत खट्टू झाली... पण आपला मूड फ्रेश करत तिनी लिखाण चालू केल.. तिनी मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे मनोमन धन्यवाद मानले..पण तिला तितक्यात जाणवलं,आपण मेल कोणी पाठवलाय त्याचं नावही विचारलं नाही...तिनी मेलबॉक्स उघडला आणि त्या व्यक्तीला तीच नाव विचारलं... तिनी बराच वेळ वाट पहिली पण तिला काही उत्तर आल नाही... जरा वेळानी ती खोलीच्या बाहेर गेली आणि आईशी बोलायला लागली..

“आई..खायला दे ग काहीतरी...”

“आलीस का...काय देऊ खायला?? जेवायच्या वेळेसही बाहेर आली नाहीस..आता काय खाणार?”

“नाहीये ग इच्छा जेवायची...चमचमीत काहीतरी दे..”

“ठीके..मी तुझी आवडती कांदा भजी करते..”

आईनी भजी केली आणि ती घेऊन गिरीजा कडे आली,

“गिरीजा..आता सांग...काय झालाय? अचानक सामान घेऊन घरी कशी आलीस?”

“माझ आणि रोहित च भांडण झालाय.. म्हणजे भांडण रोजच होत! आज खूपच भांडलो आम्ही आणि मी आपल्या घरी यायचा निर्णय घेतला! एक महिना इथे राहणारे..मला माझी कादंबरी पण पूर्ण करायचीये आणि शांतता हवी आहे.. एक महिन्यानी कादंबरी प्रकाशित झाली कि आम्ही ठरवू..एकत्र राहायचं आहे कि नाही...” कांदा भजी खात गिरीजा आईला शांतपणे म्हणाली..

“तुमच पटत नाही? तू कधी बोलली नाहीस मला.. आणि पटत नसल तरी संसार मोडायला विचार करू नका! ”

“हो ग आई... आमच पटत नाहीये! आणि बघू १ महिन्यानी आम्ही काय तो निर्णय घेऊ... मला माझ्या निर्णयात तुमची साथ लागेल...चल मला वेळ नाहीये...भजी खाऊन परत जायचय कादंबरी लिहायला... एक महिन्यात पूर्ण करायचीये कादंबरी...आणि कांदा भजी मस्त झाली..”

“ठीके...”

भजी संपवून गिरीजा तिच्या रूम मध्ये जाऊन कादंबरी लिहायला लागली...कादंबरी लिहिताना तिच्या मनात सतत रोहित चा विचार चालू होता..आणि तिला सारख वाटत होत,आपण वागलो ते चुकीच कि बरोबर..आपण टोकाचे वागलो का काय अशी शंकाही तिच्या मनात आला पण ते विचार बाजूला सारून तिनी कादंबरीवर लक्ष केंद्रित केल...ती मध्ये मध्ये मेल पाहत होती पण त्या अनोळखी व्यक्तीकडून काही उत्तर आलेलं न्हवत...

बघता बघता गिरीजा ची कादंबरी लिहून पूर्ण झाली.. तिनी कादंबरीला नाव दिल, “प्रेमा तुझा रंग कोणता....” नाव ठरवतांना तिला रोहित ची आठवण येत होती पण तिनी मुद्दाम त्याला फोन करणं टाळल होत... रोहितनी ही एका महिन्यात गिरीजा शी बोलायला एकदाही फोन किंवा मेसेज केला न्हवता.. पुस्तक प्रकाशनाचा दिवस ठरला... तिनी आठवणीनी तिला मदत केलेल्या अनोळखी व्यक्ती ला पुस्तक प्रकाशनाला यायचं निमंत्रण दिल...तिला उत्तर आल, "थॅंक्यू...मी येतो..”

पुस्तक प्रकाशनाचा दिवस उजाडला.. पण गिरीजा खुश दिसत न्हवती.. तिला रोहित ची खूप आठवण येत होती.. पण तिनी त्याला आमंत्रण दिल न्हवत.. पुस्तक प्रकाशित झाल... नंतर वेळ मिळाल्यावर ती डोळे मिटून शांत बसून राहिली.. तिनी डोळे उघले पण तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले.. आपले अश्रू पुसत ती शांत बसून राहिली... तितक्यात समोरून रोहित येतांना तिनी पाहिलं.. त्याला पाहून गिरीजा आश्यर्यचकीत झाली... तो गिरीजा कडे आला.. त्यानी गिरिजाला पुष्पगुच्छ दिला आणि तीच अभिनंदन केल.. आणि हळू आवाजात बोलला..

“मॅडम,तुमच्या आयुष्याची गोष्ट हि थीम घेऊन कादंबरी लिहायची आयडिया कशी वाटली?”

गिरीजा एकदम स्तब्ध झाली...तिला काय बोलाव कळेना..तिनी रोहित कडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू तरळले...ती रोहित ला म्हणाली,

“तूच होतास ज्यानी मला माझ्या आयुष्यावर लिहिण्याबद्दल सांगितलं? आणि तू माझे सगळे लेख वाचत होतास ना...तरी तू खोट का बोललास? आपल्यात मुद्दाम गैरसमज का निर्माण केलास रे? मी नाव विचारलं होत तेव्हा हि तू उत्तर दिल नाहीस..आणि नाव कळू नये म्हणून नवीन मेल अड्रेस वरून मला पत्र पाठवलस.. का वागलास अस?”

“हाहा! हो...आधी घरी चल मग सांगतो सगळ..हि योग्य जागा नाहीये..”

“ठीके..माझ इथल काम लगेचच आवरेल आणि आपण जाऊ घरी..”

“कोणाच्या घरी?” मिश्कीलपणे रोहित म्हणाला..

“माझ्या...हाहा!”

"ओह..तुझ्या!! आय सी!”

गिरीजा काम आटपून रोहित बरोबर घरी जायला निघाली..दोघ घरी पोचले.. घरी पोचल्या पोचल्या गिरीजा नी भांडायला सुरु केल..

“तू चुकीच वागलास रोहित.. आणि तुझ वागण मला कळलच नाही... आधी भांडलास.. आणि मग मेल केलस! मी आई कडे जाते म्हणाले तेव्हा एकदाही जाऊ नकोस नाही म्हणालास...” गिरीजा ला पुढे काहीही न बोलू देता रोहित नी गिरीजाच्या तोंडावर हात ठेवला आणि तिच्या कानात म्हणाला..

“आय अॅम वेरी सॉरी..आणि आय लव यु अलॉट... आय मिस्ड यु.. आता अजिबात भांडू नकोस!!!” मग हळुवारपणे तोंडावरच हात बाजूला काढला..

गिरीजा लाजून लाल झाली...तिचा हात हातात घेत रोहित म्हणाला,

“मला सोडून प्लीज कधी दूर निघून नको जाऊस कधी..कितीही राग आला तरी! भांडण होणारच... पण लगेच आईकडे जाऊ नकोस... मी तुला किती मिस केल.. पण मी सॉरी म्हणालो असतो तरी तुझा राग गेला नसता... म्हणून आयडिया केली!”

“ओह.. तू आयडिया केलीस! गुड गुड! आणि नाही जाणार आता चिडून आईकडे! पण तुही मला वेळ देत जा... मी पण तुला खूप मिस केल... आणि मी पण सॉरी आहे.. मी इतक चिडायला नको होत!” गिरीजा इतक बोलली आणि हसत हसत रोहित बरोबर रूम मध्ये शिरली...

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED