फुलपाखरू, छान किती दिसते!!! Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फुलपाखरू, छान किती दिसते!!!

फुलपाखरू, छान किती दिसते !!!

"छान किती दिसते फुलपाखरू,या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू".. रंगीबेरंगी फुलांवरून इकडून तिकडे बागडणारी फुलपाखर पहिली कि नकळतपणे ह्या ओळी ओठांवर येतात... नकोसा वाटणारा सुरवंट ते रंगात न्हाहलेल फुलपाखरू हि निसर्गाची अप्रतिम निर्मिती पहिली कि आवाक व्हायला होत!! एखाद निवांत क्षण निसर्गात पाहिलं कि कुठूनतरी एखाद रंगबेरंगी फुलपाखरू उडत येतांना दिसलं कि चेहऱ्यावर हसू येतच... एक क्षण फुलपाखराला पाहिल्याशिवाय राहवतच नाही. इतकी वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखर पहिली कि अक्षरशः वेड व्हायला होत!!! आणि तेव्हाच खात्री पटते, हि फक्त देवाचीच किमया असू शकते... किती ते सुंदर रंग.....लाल, पिवळा...निळाशार, पंधराशुभ्र...किती वेग वेगळे रंग! वेग वेगळे रंग आणि पंखांवरची नक्षी...समोर फुलपाखरू दिसलं कि नजर थेट जाते ती त्यांच्या मखमली रंगीबेरंगी पंखांवर आणि पंखावर असलेल्या सुरेख नक्षिकामावर...... देवानी त्यांना बनवतांना केलेली रंगांची उधळण पाहतांना डोळे अक्षरश: आश्च्यर्याने विस्फारतात!!....ते रंग आणि नक्षी डोळ्यात साठून राहते.....आणि फुलपाखरावर उन्हाची तिरीप पडली कि तर त्याचे रंग अजूनच खुलून दिसतात... आणि फुलपाखरू अधिकच सुंदर दिसायला लागत. त्या सुंदर फुलपाखराला पाहिलं कि त्याच्या मखमली पंखांना स्पर्श करायची इच्छा व्हायला लागते...फुलपाखरांच्या मखमली अंगावरून हात फिरवायचा मोह मला लहानपणी खूप वेळा व्हायचा....कित्येक वेळा फुलपाखरांना पकडण्याचा प्रयत्नही केला होता मी...पण प्रत्येकवेळी हुलकावणी देऊन ते निसटून जाण्यात यशस्वी ह्यायच...महत्प्रयासानी एक फुलपाखरू पकडण्यात मला यश आलेल.. मी त्या फुलपाखराला चिमटीत पकडून ठेवलेल.... ते सुटका करून घ्यायला फडफडत होत... त्याच्यापुढे माझ काही चाललच नाही आणि शेवटी ते जिंकलच. आणि उडून जाण्यात यशस्वी झाल!!! मला तेव्हा दुख झाल पण ते दुख फुलपाखरू उडून गेल्याच न्हवत..मला दुख झालेलं कारण नकळत मी त्या नाजूक फुलपाखराला दुखावलं होत. फुलपाखरू माझ्या चिमटीतून निसटून गेल आणि त्याचे रंग माझे हातांवर आले होते..... त्याक्षणी माझ्या अंगावर शहारा आला.. मी काही कारण नसतांना फुलपाखराला दुखावलं होत..मी इतकी दुष्ट का वागले अश्या विचारांनी तेव्हा माझ्या अंगावर काटाच आलेला...आणि त्याक्षणी एक विचार चमकून गेला,”इतकी नाजूक फुलपाखर,त्यांच आयुष्य जगतायत आणि मला हि आनंद देतायत..मग काही कारण नसतांना त्यांना हात लाऊन मी कशाला उगाच त्यांना दुखवू... उडू दे कि त्यांना मुक्तपणे....तेव्हा माझे डोळे उघडले होते....मला मजा येते म्हणून त्यांना पकडायचा अट्टाहास कशाला हवा होता? तेव्हा पासून मी ठरवल..आता फुलपाखरु पकडून त्याला त्रास द्यायचा नाही... लांबून पाहायचं....तेव्हा ठरवलं आणि ते आज वर कटाक्षानी पाळती आहे!! इकडून तिकडे,तिकडून इकडे मनसोक्त हिंडत असतात देखणी फुलपाखर...... त्यांना लांबून पाहण्यात किती मजा आहे......आता त्यांना उडतांना पाहिलं कि त्यांना स्पर्श न करताही त्यांचा हळूवार स्पर्श दुरूनच अनुभवते आणि स्मित हस्याबरोबर समाधान चेहऱ्यावर उमटलं कि खूप खुश होऊन जाते.... फुलपाखरू बागडतांना पाहिलं कि मनात आनंदाचे फवारे उडायला लागतात.

माझी आणि फुलपाखराची मैत्री त्या प्रसंगानंतर अजूनच घट्ट होत गेली... आता व्यस्त दिनक्रमात सुद्धा थोडा वेळ काढून फूलपाखर दिसतायत का याचा माझा शोध चालू असतो! फुलपाखराला एक नजर पाहिलं तरी मन अगदी लहान मुलाप्रमाणे नाचायलाच लागत... चेहऱ्यावरचा आनंद लपवण केवळ अशक्यच होऊन बसत. आपल्याच विश्वात रममाण होऊन इकडून तिकडून स्वच्छंद पणे हिंडत असतात ती...रस्त्यातून जातांना,घरामागे...कुठेतरी फुलपाखरू दर्शन देतच..... कधीही,कुठेही फुलपाखरू पाहिल्यावर नजर त्याच्यावर भिरभिरायला लागते.. लहानपणी त्यांच्यामागे धावता धावता वेळ कधी आणि कसा जायचा हे कळायचच नाही....आता पण कितीही घाई असेल आणि फुलपाखरू दिसलं कि १ क्षण थांबून फुलपाखराला डोळे भरून पाहण्याचा मोह आवरण खरच शक्य नसत. फुलपाखरू पाहिलं कि सगळी कामं बाजूला ठेऊन फक्त फुलपाखरा कडेच पाहत बसते मी... फुलपाखरांच बागडण पाहिलं कि मनहि त्या फुलपाखरांबरोबर कधी बागडायला लागत कळतही नाही. मनावरची सगळी जळमट एकदम साफ होतात. आणि राग,चिंता सगळ सगळ लांब कुठेतरी पळून जात....सगळी दुख क्षणात विरून जातात!! मनात कुठेतरी लपुन बसलेला आनंद पुन्हा एकदा धबधब्यासारखा भरभरून वाहायला लागतो...आणि मन फुलपाखरंबरोबर मुक्तपणे बागडायला लागत... छोटस फुलपाखरू, पण ते प्रत्येकवेळी कस जगायचं हे मला शिकवत असत!!! किती जगणार ते कुठे माहित असत त्यांना...तरी प्रत्येक क्षणी नुसती बागडत असतात...आणि न कळतपणे आनंदाची उधळण करत असतात!!... कधी एकटाच फुलपाखरु स्वतातच गुंग होऊन उडतांना दिसत तर कधी जोडी मुक्तपणे विहार करत असते.....थांबायचं त्यांना माहीतच नसत...इकडून तिकडे नुसती हिंडत असतात .. आणि पापणी लवेपर्यंत एकदम दिसेनाशी होतात. कधी कधी कुठल्यातरी पानेमागे जाऊन लपतात आणि त्यांना शोधतांना नाकी नौ येतात....डोळे त्यांचा शोध घेत असतात पण त्यांना समोर यायची इच्छाच नसते...खूप शोधल कि अखेर आमच्यातला लपाछपीचा चा खेळ संपतो आणि ती समोर येतात...मग माझ्या चेहऱ्यावर परत स्मितहास्य येत... कधी कधी मात्र ती दिसेनाशीच होतात.. पण डोळे अखंड त्यांचा शोध घेत असतात....क्षणार्धात कुठे जातात काय माहित? किती शोधल तरी ती दिसताच नाहीत..अक्षरशः काही कळायच्या आत फुलपाखर क्षणात कुठेतरी हरवून जातात... जशी कुठूनतरी एकदम येतात आणि क्षणार्धात कुठेतरी जातात. कुठून येतात ते माहित नसत आणि कुठे जातात हेही कळत नसत....शोध घ्यायचा तर तो कुठे? खरच, ती फक्त 2 क्षण येतात आनंद वाटायला...काही न बोलताही नुसता आनंद वाटत फिरत असतात ती...आणि त्याचं ते काम झाल कि ती न सांगता निघून जातात अजून कोणालातरी आनंदी करायला.....ती जातात पण त्यांचा शोध सदैव चालूच असतो...परत असच कधीतरी ती येणार आणि मला दिसणार असतात ती फुलपाखर..पण कधी दिसणार हे काही माहित नसत.. ती येतात ती खूप सारा आनंद घेऊन आणि जातांनाही जातात खूप सारा आनंद देऊन...माझ्या मनाच्या छोट्याश्या कोपऱ्यात मोठी जागा करून ठेवलीये त्यांनी...परत दिसणार असतातच पण तोपर्यंत माझ्या तर ती आठवणीत सदैव राहणार.....तिथून कधीच कुठेही जाऊ देणार नाही मी......आता परत कधीतरी असाच फुलपाखरू दिसेल आणि मी परत त्यांच्या बरोबर बागडायला लागेन.....पण तोपर्यंत आठवणीतली फुलपाखर आहेतच....

अनुजा कुलकर्णी.