Gahir Paani - 2 books and stories free download online pdf in Marathi

गहिर पाणी...२

गहिर पाणी- पार्ट २

“ओके.... पण आता निवांतच आहे म्हणजे?” आरव आपल्याला फसवणार नाही ना अश्या शंके नी इरीका नी प्रश्न केला..परत फसवले जाण्याची भीती इरिका च्या मनात होतीच!

“तुम्ही विचार करू नका फार.. तुम्ही सेफ आहात! आता रात्र गडद होतीये..आपण हॉटेल मध्ये जाऊ मग निवांत बोलता येईल... आणि रात्री इथे भूतं येतात अस ऐकलय मी.. माझा विश्वास नाही पण एका गावातल्या माणसांनी मला हे सांगितलं. कोण जाणे खरच भूत असतील?” आरव छद्मी हसत बोलला.

"अस काही बोलून घाबरवू नका हो मला.. मला भीती वाटते भूतांच नाव जरी काढाल तरी!"

"ओके ओके.. नाही बोलत अस काही! पण लवकर आवरा आणि आपण माझ्या हॉटेल मध्ये जाऊ! मला आता झोप पण यायला लागली आहे."

आरव ला खर तर इरिका बरोबर तिच्या हॉटेल मध्ये जायचाच न्हवत. त्याला त्याच्या हॉटेल वर जाऊन झोपायचं होत! पण इरिका ला तो नकार देऊ शकला नाही. त्यामुळे मनाविरुद्ध पण आरव इरीका च्या हॉटेल जायला निघाले... हॉटेल ला जायचा रस्ता भीतीदायक होता.. हॉटेल मध्ये जायचा रस्ता स्मशानातून होता... आरव ला काहीतरी विचित्र वाटल... त्यानी इरीका ला विचारलं,

“इरीका..हा रस्ता बरोबर आहे ना?”

“हो.. स्मशान संपल कि लगेचच आहे हॉटेल! स्मशानाच्या जवळ हॉटेल आहे म्हणून जरा स्वस्त पडल... आणि कोणी शोधायला आल तर तिथे कोणी येणार नाही... सो सेफ हॉटेल शोधलं आणि तिथे राहत होते. त्यात माझ्याकडे फार पैसे न्हवते म्हणून ते हॉटेल घेण्यावाचून माझ्याकडे पर्याय न्हवता... आणि तू घाबरला आहेस?” हसत इरीका नी विचारलं....

“नो नो.. घाबरलो नाहीये! फक्त झोप येतीये सो विचारलं! अजून किती वेळ लागेल हॉटेल वर पोहचायला? लवकर जाऊन परत येऊ..”

“हो.. मला पण झोप येतीये! आणि हॉटेल आता आलच आहे...” स्मशानातून बाहेर पडतांना इरीका आरव ला म्हणाली..

आरव मनातून थोडा घाबरला..पण तो चालत होता.. आणि शेवटी ते हॉटेल पाशी पोहचले... ते हॉटेल जरा विचित्रच होत.. दोघ हॉटेल मध्ये शिरले.. हॉटेल मध्ये शिरल्या शिरल्या जिन्यावर एक काळी मांजर आडवी गेली... इरीका नी त्या मांजरा कडे दात विचकून पाहिलं आणि ती मांजर घाबरून म्याऊ म्याऊ ओरडत पळून गेली... हे सगळ पाहून आरव मनातून घाबरला! काय चाललंय हे त्याला कळत न्हवत.. हॉटेल च दार आल.. इरीका आत गेली नाही...ती दारात थांबली... तेव्हा च शांतता भंग करत वटवाघूळं उडत इरीका कडे आली.... आरव ला जाणीव व्हायला लागली कि हॉटेल मध्ये काहीतरी विचित्र आहे.... आपण इरीका बरोबर उगाच हॉटेल मध्ये आलो का काय ह्या भीतीनी त्याला घेरल.. पण स्वताची समजूत घालत आरव इरीका च्या मागून चालायला लागला.. तितक्यात हॉटेल मधले दिवे गेले... अंधारातून कोणीतरी इरीका जवळ आल... आरव नी निरखून पाहिलं... त्यानी पाहिलं एक म्हातारा माणूस एकदम समोर आला.. आणि करड्या आवाजात म्हणाला...

“बाई...लाइट गेले...आता उद्या पर्यंत लाइट येणार नाहीत..” बोलता बोलता त्यानी रॉकेल चा दिवा लावला.. आरव नी एक नजर त्याला पाहिलं... त्याच्या गालावर मोठी जखम होती.. अंधारात तो माणूस अजूनच भयानक दिसत होता... आरव ला त्या माणसाशी बोलायचं होत पण त्याला बोलायची हिम्मत झाली नाही...आरव च्या हृदयाचे ठोके वाढायला लागले...पहिल्यांदीच तो इतका घाबरला होता..... त्याची नजर इरीका ला शोधात होती...त्यानी इकडे तिकडे पाहिलं.. समोर इरीका आहे अशी खात्री करून तो निर्धारानी उभा होता..... तेव्हा च वाऱ्याची झुळूक आली आणि रॉकेल चा दिवाही वाऱ्यामुळे विझला.. त्यानी डोळे गच्च मिटून घेतले.. आणि इरीका चा हात धरला... तिचा हात बर्फासारखा थंड होता... त्यानी इरीका चा हात हातात घेतला आणि इरीका च्या हाताच्या थंड स्पर्ष्यानी तो दचकला... त्यानी एका क्षणात इरीका चा हात झटकून टाकला..... आता इथून पळून जाऊ असा विचार करत आरव मागे वळला... पण मागे पळणार तितक्यात हॉटेल च दार बंद झाल्याचा “किरर्र” आवाज आला... आणि आरव घामेघूम झाला.. काय चाललय हे त्याला कळतच न्हवत.. आता काय कराव हे त्याला सुचत न्हवत.. म्हातारा माणूस पण कुठेतरी गायब झाला... त्यानी इरीका ला हाक मारली पण त्याला उत्तर मिळाल नाही.... त्यानी अंधारात इरीका कुठे दिसती आहे का चाचपून पाहिलं पण इरीका हि कुठे दिसत न्हवती.. आरव थबकून खाली बसला.. तितक्यात त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला... तो सावधपणे उठला... हळू हळू चालायला लागला.... तितक्यात अंधारात तो कश्याला तरी अडखळून पडला.. अंधारात त्यानी कश्याला अडखळलो पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तिथे मेलेला माणूस असल्याचा भास झाला... त्याची भीती क्षणोक्षणी वाढतच होती.. भीतीमुळे तो परत मटकन खाली बसला.. आपण उगाच अनोल्काही मुलीशी बोललो ह्याचा त्याला पश्याताप व्ह्यायल लागला पण आता त्याचा काहीही उपयोग न्हवता हे सुद्धा जाणवलं. तेव्हा च इरीका समोरून दिवा घेऊन आली... आरव ला हुश वाटल. त्यानी एक नजर इरिका ला पाहिलं. आरव ला तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसले... त्याच पूर्ण शरीर भीती नी शहारून गेल. तरी तो हिम्मत करून बोलला...

“इरीका,कुठे गेली होतीस? आणि तुझ्या चेहऱ्यावर रक्त? तू पडलीस का? तुला लागल का काही?” आरव थरथरत इरीका ला म्हणाला......

“काही नाही! मला भूक लागली होती.." तिनी काळ्या मांजराकडे बोट दाखवलं.. रक्ताच्या थारोळ्यात ते मांजर मरून पडल होत..."आठवतंय ना? मी आल्या आल्या त्या मांजराने विचकून दाखवलं होत. मला ते अजिबात आवडत नाही...मला भूक सुद्धा लागली होती म्हणून...” खाऊन उरलेल्या काळ्या मांजराकडे रॉकेल चा दिवा दाखवत इरीका बोलली.. तिचा आवाज बदलला होता.. ती एकदम क्रूर दिसत होती.. तिच्या चेहऱ्यावर उजेड पडला. इरिका अत्यंत भयंकर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलेले होते! आरव नी एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि आरव च्या पायातले त्राण गेले... तो स्वताला सावरत उभा राहिला पण भीतीनी त्याच्या तोंडातून आर्त किंकाळी बाहेर पडली...तो इरीका कडे पाहून बोलला.....

“कोण आहेस तू? मला इथे का आणल आहेस..”

“हाहा.. मी कोण आहे? मी एक भूत आहे! आधी मी पण माणूस होते! एक सुंदर स्त्री होते मी... माझ आयुष्य मी आनंदानी जगत होते. त्यावेळी मी एका मुलाच्या प्रेमात पडले. त्यानी बरीच वचन दिली पण शेवटी त्या मुलानी फसवल.. आत्महत्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय न्हवता. आणि मी ह्याच समुद्रात आत्महत्या केली होती.. मी मेले. माझ शरीर नाश पावलं पण माझा आत्मा अतृप्त राहिला आणि मी ह्याच परिसरात हिंडत असते..."

"आरवच्या अंगावर भीतीनी शहरा आला.. त्याचा चेहरा एकदम पडला.."

"हाहाहा... काय झाल? भीती वाटती आहे कि काही आठवतंय?” इरिका हसत होती. हसतांना इरिका भयानक क्रूर दिसत होती..

आरव ला एकदम जाणवलं.. कि तो भूताशी बोलतो आहे! आणि तो थरथरत बोलला, "तू भूत आहेस? पण मला इथे का आणल आहेस? मी तुला काय केल आहे? मी तर तुला ओळखत देखील नाही. आणि इथे कोण मरून पडल आहे?” आरव घामेघूम झाला... इरीका नी आरवला उत्तर दिल... “होय.. तू भूताशी बोलतो आहेस? आणि बरोबर आहे,तू मला काहीच केल नाहीयेस...पण..." तिनी परत रडायला लागली.. "तू इथे का आहेस हे महत्वाच नाही... आणि इथे कोणीच नाहीये.. नीट पहा..” तिथे कोणीही मरून पडलेलं न्हवत....ती जोरजोरात रडायला लागली...आरव नी पुन्हा खाली पाहिलं..तिथे खरच कोणीच न्हवत... आरव ची भीती वाढतच होती...आरव रडवेला झाला...

“का करते आहेस तू हे सगळ? तुला काय हवय? आणि मला काहीही आठवत नाहीये.. माझ्या मागे का लागली आहेस?”

"तुला काहीच आठवत नाही? नेहा पण नाही?" इरिका बोलली

तितक्यात हॉटेल मधले दिवे आले... आणि समोरच्या खोलीच दार उघडल....तिथून कोणीतरी चालत आरव कडे यायला लागल.. आणि एकदम काहीतरी पडल्याचा आवाज आला.. चालत येणारी व्यक्ती एकदमच दिसेनाशी झाली. आरव सगळ पाहत होता आणि त्याची भीती अधिकाधिक वाढत होती. इतका ताण सहन न होऊन आरव ते सगळ सहन न होऊन बेशुद्ध होऊन खाली पडला...

जरा वेळानी आरव ला शुद्ध आली..त्यानी आजूबाजूला पाहिलं.. इरीका समोरच बसली होती.. तिचा क्रूर चेहऱ्यावर काळजी दिसत होती ... आणि तिच्या मांडीवर डोक ठेऊन एक मुलगी झोपली होती... आरव नी त्या मुलीकडे निरखून पाहिलं... आणि तो किंचाळला...

“नेहा? हि इथे कशी??”

“ओरडू नकोस...नेहा झोपली आहे! तिची झोप घालवू नकोस.. तिला विश्रांती हवी आहे!” इरीकानी आरव ला दटावल..

“हो... पण नेहा जिवंत आहे? मला तर कळल होत तिनी समुद्रात आत्महत्या केली.. मी पेपर मध्ये वाचल होत,नेहा नी समुद्रात आत्महत्या केली मग नेहा इथे कशी आली?” आरव च्या डोळ्यात पाणी आलेलं..

“हो नेहा जिवंत आहे! कोणीतरी तिला आत्महत्या करतांना पाहिलं असेल म्हणून पेपर वाल्यांनी तस छापल असे.. मला ते काही माहिती नाही! मला फक्त इतक माहितीये नेहा जिवंत आहे! आणि मी तिची काळजी घेते आहे! तू सांग, नेहानी जिवंत असायला नको होत का?” इरीका संतापाने लाल झाली.. ती अजूनच भयानक दिसत होती..इरीका च रूप पाहून आणि नेहाच्या आठवणीमुळे आरव रडायला लागला...आणि बोलला “नेहा माझी प्रेयसी.. मी खोट बोललो मला काहीच आठवत नाहीये! नेहा च आणि माझ प्रेम होत.. आम्ही इथे पळून येणार होतो आणि लग्न करणार होतो... पण...” आरव जोरजोरात रडायला लागला...

“काय पण?” इरीका आरव बरोबर रडायला लागली..

“मी आलोच नाही...फसवल मी नेहाला... आणि नेहा नी आत्महत्या केली.”

नेहाला आरवच्या बोलण्यामुळे जाग आली.. तिनी समोर आरव ला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आल.. ती बोलायला लागली..

“आलास आरव..किती वेळ लावलास? मी तुझी किती दिवस वाट पाहत होते..पण तू आलच नाहीस..”

“अ..अ” आरव नी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलू शकला नाही..

नेहा उठली आणि आरवच्या जवळ आली.. आरव नी नेहाचा हात हातात घेतला.. ती खरच जिवंत आहे अशी खात्री केली.. ती खरच जिवंत होती..आरव च्या जीवात जीव आला..आणि तो बोलायला लागला...

“नेहा... आय अॅम सॉरी! मी तुला इथे बोलावलं पण मी आलोच नाही.. मी घरच्यांना घाबरलो आणि आलोच नाही....आणि तुला इथे बोलवून मी आलोच नाही... माझी हिम्मत नाही झाली.. मी इतका पळपुट्या सारखा का वागलो मला नाही माहित.. आणि तुझ्या मरणाची बातमी ऐकून मी पुरता खचून गेलो होतो...मी स्वताला माफ करू शकत न्हवतो.. मी स्वताला दोषी समजत होतो.... आणि कोणालातरी घाबरून मी माझ वचन पाळल नाही....मला ह्या गोष्टीचा पश्याताप आहे म्हणूनच वर्षातले १ महिने मी इथे राहतो.. तुझी आठवण काढत एकटाच बसून असतो समुद्र किनाऱ्या वर! आज तुला पाहून माझ्या जिवंत जीव आला.. तू मेली नाहीयेस आणि तू जिवंत आहेस.. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय... पण तू इथे कशी आलीस?” आरव ला स्वताची चूक उमगली होती..

“आरव... आय लव यु.. मी तुझी किती वाट पहिली..पण तू आलाच नाहीस.. मी घरी काही न सांगतात पळून आलेले... बाबा भयंकर चिडले असणार ह्याची मला खात्री होती म्हणून मला घरी जाण शक्य न्हवत.. माझ्याकडे आत्महत्या करण्यावाचून काही पर्याय न्हवता... मी आत्महत्या करायला समुद्रात आत आत जात होते..पण तेव्हा च इरीका आली आणि तिनी मला आत्महत्या करण्यापासून वाचवल.. मग तिनी मला ह्या हॉटेल मध्ये आणल.. तेव्हापासून मी इथेच राहती आहे! इरिका माझी खूप काळजी घेते. तिची स्टोरी माझ्यासारखीच होती...तिलाही एका मुलानी फसवल म्हणून तिनी आत्महत्या केली होती समुद्रात.. ती मेली पण तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही.. मग तिनी ठरवलं,समुद्रात जे कोणी आत्महत्या करायला येईल त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांना त्याच खर प्रेम परत मिळवून द्यायचं.. मुलांनी फसवल म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलींना ती वाचवते..आणि मुलांना घाबरवून समज देऊन त्याचं प्रेम परत मिळवून देते...ह्यासाठीच इरीका नी तुला इथे आणल आणि घाबरवल..”

“म्हणजे इरिका मुळे आपण आज परत भेटतो आहोत? कुठे आहे ती? मला तिचे आभार मानायचे आहेत!"

आरव इरिका ला शोधायला लागला.. ती एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आणि ते अश्रू समाधानाचे होते.. तिनी अजून एका जोडप्याला एकत्र आणल होत! आरव आणि नेहा नी नी तिचे आभार मानले... इरिका सुद्धा त्यांना एकांत मिळावा म्हणून तिथून बाजूला जाऊन बसली. आरव नेहा जवळ आला आणि नेहा शी बोलायला लागला.."आय...आय अॅम सॉरी नेहा! मी खूप मोठी चूक केली.. मी तुला अस एकत सोडून द्यायला नको होत. आता मी तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा राहणार नाही. आता चल आपण दोघ मंदिरात जाऊन लग्न करू... आणि आता मी नाही घाबरत कोणाला.. आणि तुझी साथ आयुष्यभर देईन अशी खात्री ठेव!” नेहा चा हात हातात घेत आरव बोलला..त्याला स्वताची चूक समजली होती...

नेहाचे डोळे सुद्धा पाणावले.. ती काहीच बोलली नाही पण तिनी फक्त आरव चा हात हातात घेतला आणि त्याच्या खांद्यावर डोक ठेवलं.

इरीका दोघांच बोलण ऐकत होती.. आणि दोघांना लांबूनच पाहत होती. दोघांच बोलण ऐकतांना ती हळू हळू शांत होत होती.. तिच्यातला क्रूर पण पूर्णपणे गेला..आणि ती पहिल्यासारखी शांत झाली.. तिच्या चेहऱ्यावर समाधान आल.. ती उठून त्या दोघांच्या जवळ आली आणि बोलायला लागली,

“कधीही एकमेकांना फसवू नका... सुख समाधानानी नांदा.. आरव,मला तुला घाबरवायचं न्हवत पण मुलींना फसवणाऱ्या मुलांबद्दल मला खूप चीड आहे... तुला स्वताच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून तुला इथे आणल होत...आता मला जायला हव.. मला दिसतंय,अजून कोणीतरी समुद्रावर आत्महत्या करायला येतंय.. मी नेहा ला तिच प्रेम परत मिळवून दिल ह्यात मला खूप समाधान आहे! आता मला त्या आत्महत्या करणाऱ्या मुलीला वाचवायला हव.. आत्म्याला शांती मिळत नाही तोपर्यंत हे काम करत राहणार..”

"इरिका तू खूप चांगल काम करती आहेस! देव तुझ्या आत्म्यास लवकर शांती देवो!" आरव नेहा चा हात हातात घेत बोलला... नेहा सुद्धा आरव ला भेटून खूप खुश झाली होती. आरव सुद्धा नेहा ला आपल्या आयुष्यात परत मिळवून समाधानी झाला होता. त्यांची अपुरी राहिलेली स्वप्न आता दोघ पूर्ण करणार होते. दोघांनी एकमेकांना जन्मभर बरोबर राहायचं वचन दिल आणि हॉटेल मधून बाहेर जायला निघाले.

इरिका सुद्धा तिथे थांबणार न्हवती. ती जाणार होती अजून एका मुळीच आयुष्य वाचवायला. तिला आत्महत्या करणाऱ्या मुलीला लवकरात लवकर वाचवायचं होत. इरिका तिच्या आत्म्यास शांती मिळत नाही तोपर्यंत हे काम अखंड चालू ठेवणार होती. त्यात ती अजिबात खंड पडून देणार न्हवती. आरव आणि नेहा सुद्धा तिला मनापासून थॅंक्यू म्हणून तिथून निघाले.... अनपेक्षितपणे नेहा ला परत आपल्या आयुष्यात मिळालेलं पाहून आरव खूप खुश झाला होता. आणि नेहा सुद्धा बऱ्याच प्रतीक्षेनंतर आरव ला बघून समाधानी झाली होती. जाता जाता तिच्या आत्म्याला लवकर शांती मिळू देत हि प्रार्थना त्यांच्या तोंडी होती.. दोघ आता ठरवल्याप्रमाणे सुखी संसार करणार होते आणि त्यातच इरिका ला समाधान होत. आरव आणि नेहा दोघ हॉटेल च्या बाहेर पडले आणि थेट मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केल.. आणि आपला सुखी संसार चालू केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED