टर्म्स अॅन्ड कंडीशन्स
.पार्ट १
नेहा मैत्रिणीकडे सांगून घराबाहेर पडली होती पण बराच उशीर झाला तरी ती घरी परतली न्हवती. तिची आई तिच्या फोन ची वाट पाहत होती. आई नेहा ला फोन करायची नी कारण तस केल्यावर नेहा विनाकारन तिच्यावर चिडायची! नेहा ची आई नेहाच्या फोन ची वाट पाहत होती. तितक्यात फोन वाजला.. आई पण नेहा च्या फोन ची वाट पाहून थकून गेली होती आणि ती तिची काम करायला लागली होती. त्यामुळे आईनी फोन उचलायला वेळ लागला आणि आई बराच वेळ झाला फोन उचलत नाही हे पाहून नेहा भयंकर चिडली. आई नी फोन उचलला आणि ती बोलायला लागली,
"हेलो.." आई नी फोन उचलला खरा पण तिला फोन उचलायला उशीर झाला होता म्हणून आई फोन वर आल्या आल्या नेहा ची आई वर चिडचिड चालू झाली,
"काय ग आई..किती वेळ लावलास फोन उचलायला? लगेच उचलता येत नाही का फोन?"
"अग नेहा, काम करत होते.. मग हात धुवून येईपर्यंत थोडा वेळ गेला तर इतकी का चिडतेस? आणि तुझ्यावर मी चिडायला पाहिजे! किती उशिरा फोन केलास.. मी किती वेळ तुझ्या फोन ची वाट पाहत होते पण तू फोन नाही केलास.. मी तुला फोन करणार होते पण तुझी उगाच चीड चीड नको म्हणून मी तुला फोन नाही केला."
"तुला माहितीये मी वेळ मिळाला कि फोन करते! त्यात इतक काय? न सांगता तर हिंडत नाही ना? आणि मी चिडणारच ना.. फोन जवळ ठेऊन काम करता येत नाही का? एनिवेज, मी तुला सांगायला फोन केला कि माझी गाडी पडली आहे...."
"काय? कुठे पडली गाडी? आणि तुला लागल नाहीये ना जास्ती? तू कुठे आहेस सांग लगेच.. मी किंवा हे येतो तिथे!" नेहा च बोलण ऐकून आई घाबरलीच!
"नो ग आई.. मला काही नाही झाल! पार्किंग मध्ये गाडी लावली होती तिथेच कोणाचा तरी धक्का लागला आणि गाडी पडली.. गाडी चालू होत नाहीये म्हणून जवळच मेकॅनिक होता त्याच्याकडे गाडी दिलीये! तू किती पॅनिक होतेस! इतक घाबरू नकोस! आणि मला सारख लहान मुलीसारख ट्रीट करण बंद कर!"
"तुला लागल नाहीये ना.. मग ठीके... आणि घाबरू नकोस काय? तुला काय जातंय अस बोलायला? आमच्या पोटचा गोळा आहेस तू! काळजी सतत वाटत असते तुझी! तू सांग, मी किंवा बाबांनी यायची गरज आहे का? आणि तू घरी कधी येतीयेस?"
"तू ऐक ग आई, आता मी जरा इथेच राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे जातीये!"
"आत्ता जाणार मैत्रिणीकडे? आणि तिच्याकडेच राहणार?? रात्री घरी नाही येणार?"
"नाही ग आई..."
"नेहा तुझ हे वागण मला अजिबात आवडत नाही! उगाच कोणाच्या घरी सारख काय जातेस राहायला? हल्ली तुझ मैत्रिणींकडे राहाण फार वाढलाय... बाबांना अजिबात आवडत नाही..तुला माहिती आहे ना? तरी तू तेच का करतेस?"
"कोणीतरी काय? ती माझी खास मैत्रीण आहे... आणि नेहमी कुठे जाते! कधीतरीच जाते कि... आई, आपण नंतर बोलू! मी घरी आले कि दे ह लेक्चर! आत्ता नाहीये वेळ... फोन चा बॅलंस नाहीये! बाय... येते उद्या! आणि उगाच सारखा फोन करू नकोस आणि मला चिडवू नकोस! मला माझ आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगू देत.. सारखी तुमची लुडबुड नकोय!"
इतक बोलून नेहा नी फोन ठेवला! नेहाची आई चिडली होती पण नेहा नी तिला काहीच बोलून दिल न्हवत! नेहा ची आई काही बोलणार त्या आधीच नेहा नी फोन बंद केला होता. आईला माहित होत नेहा अजून घरी आली नाही हे पाहून बाबा तिच्याबद्दल नेहाच्या आईला विचारणार! आता हि गोष्ट बाबांना कशी सांगायची ह्या विचारात नेहा ची आई होती! नेहाचे बाबा तर नेहाच्या अश्या वागण्यावर खूपच चिडायचे! त्यांना नेहा च बेजबाबदार वागण अजिबात आवडायचं नाही! आई नी कस तरी करून नेहा घरी येणार नाहीये हि गोष्ट नेहाच्या बाबांना सांगितली! आईच हे बोलण ऐकून बाबा भडकलेच पण आईनी बाबांची कशीबशी समजूत काढली! आणि हे आश्वासन दिल कि ती सारखी सारखी कोणाकडे राहायला जाणार नाही तेव्हा नेहाचे बाबा जरा शांत झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी येते म्हणणारी नेहा दुपार उलटून गेली तरी घरी आली न्हवती. शेवटी चिडूनच तिच्या आई नी तिला फोन लावला. नेहा बोलायला लागली,
"काय ग आई.. कश्याला फोन करतेस सारखा?"
"कशाला फोन करतेस काय? नेहा आता तुझ वागण बाबांना अजिबातच आवडल नाहीये! आत्तापर्यंत १० वेळा विचारलं त्यांनी तुझ्याबद्दल! किती वाजलेत आता? तू म्हणाली होतीस उद्या सकाळी येते पण सकाळ उलटून गेली, दुपार झाली तरी तुझा घरी पत्ता नाही?" आई चिडली होती आणि ते तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होत
"इतक काय आई.. मी काय आता लहान मुलगी आहे का? आणि जरा स्पेस द्या कि.. जगू दे मला माझ्या मनाप्रमाणे.. करू दे कि आयुष्य फेस! मला गरीब बिचारी बनवून घरी ठेवायचं का तुम्हाला?" नेहाचा सुद्धा आवाज चढला... "मी जनरल बोलले सकाळपर्यंत येईन! पण नाही जमल म्हणून इतक काय झाल?? मला लहान मुलीसारख ट्रीट करण बंद करा आता.."
"हो हो! तुझी स्पेस! तुला जरा जास्तीच स्पेस मिळती आहे अस नाही का वाटत? आणि आम्ही काळजी पण करायची नाही का तुझी? तुला जन्म दिलाय.. काळजी वाटणारच ना? आणि तुला माहितीये बाबांना तुझ अस घराबाहेर जास्ती वेळ असं आवडत नाही... बाबांचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि ते तुझी किती काळजी करतात हे कशी विसरतेस तू? तुला सगळ माहितीये आय गेस, तरीही तू तशीच वागतेस नेहमी! मागच्याच वेळी किती आरडा ओरडा झालेला घरी आठवतंय ना? आता लवकर घरी ये..."
"ओके.. येते जरा वेळात! आय मीन निघते आता! आणि किती सारख लेक्चर देतेस! अनिवेज...घरी आले कि बोलू!" नेहानी इतक बोलून फोन ठेवला आणि मैत्रिणीशी बोलायला लागली..
"आईची सारखी कटकट चालू असते.. जरा मनासारखं वागून देत नाही.."
"काय झाल? इतक काय चिडती आहेस?" नेहाची मैत्रीण आभा म्हणाली..
"काही नाही ग.. वैताग आलाय आईच्या वागण्याचा.. आणि बाबा अति काळजी करतात! मला नाही आवडत बंधनात राहायला...माझे अनुभव मला स्वतःला घ्यायचे आहेत.."
"काय झाल ते तर सांग.."
"जरा मोकळीक देत नाहीत आई बाबा... जरा उशीर झाला किंवा जरा कोणाकडे राहायला गेल कि चीड चीड करतात... मी काय आता लहान मुलगी राहिली आहे का? माझे निर्णय मला स्वतः घेऊ का देत नाहीत तेच कळत नाही... सारखी त्यांची मत लादत असतात... त्यांना वाटत मी त्यांच्या कोशात गुरफटून रहाव.. मुक्त म्हणून उडून द्यायचाच नाहीये.. "
"ओह.. पण त्यांना तुझी काळजी असेल.. म्हणून त्यांना आवडत नसेल तुझ कोणाकडे राहाण किंवा उशिरा घरी येण? माझी इच्छा आहे कि माझ्या आई बाबांनी अशी काळजी घ्यावी पण त्यांना स्वताच्या उद्योगातून वेळ मिळताच नाही.. सदा स्वताच्या उद्योगांमध्ये बुडालेले असतात..." आभाच्या डोळ्यात पाणी आल..
"ओह.. वाईट वाटून घेऊ नकोस! तू माझ्या घरी येतेस का? तिथे तुला नको तितकी काळजी मिळेल.. हाहा! जी मला अजिबात नकोय!" नेहा बोलली
"पुढच्या वेळी येते.. आज नको! आणि थॅंक्यु!!! तू इतक्या प्रेमानी मला तुझ्याकडे बोलावलस.."
"डोंट बी फॉर्मल आभा.. मी तुझ्याकडे येत नाही का.. तशी तू माझ्याकडे ये! आमच घर तस छोट आहे.. तुमच्या घरासारख मोठ नाहीये पण तुला हवी तितकी काळजी मिळेल तिथे.. मला तर इतक्या काळजीचा कंटाळा आलंय.. खरच!"
"घर किती मोठ आहे त्यापेक्षा घरात किती आपुलकी आणि आपलेपणा आहे हे महत्वाच असत नेहा! आणि नेहा तुझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे आहे त्यापेक्षा खूप आहे! सो असा विचारही करू नकोस कि तुला आता काळजी घेणारे नकोयत!"
"हाहा... ओके.. आता मी जाते! आईचा परत फोन आला तर मात्र ती खूपच चिडेल!"
"ओके.. भेटू परत! तू काळजी घे आणि आई शी भांडू नकोस!"
"नाही नाही भांडत आईशी! तू काळजी घे आणि भेटू लवकरच!!"
इतक बोलून नेहानी गाडी घेतली आणि ती घरी जायला निघाली. नेहा घरी आली आणि तिला पाहून आई बाबा काहीच बोलले नाहीत हे पाहून ती चकित झाली. तिला वाटल होत, आई बाबा दोघ तिच्यावर चिडतील! बारच लेक्चर पण देतील पण दोघ शांत होते. दोघाही तिला काही बोलले नाही. नेहा आवरायला तिच्या खोलीत गेली.
जरा वेळानी ती रुमच्या बाहेर आली आणि तिला पाहता क्षणी तिची आई बोलायला लागली,
"नेहा इथे बस..."
"का.. काही बोलायचय कि लेक्चर?" नेहा वैतागून बोलली,
"दोन्ही नाही... फक्त एक सांगायचं आहे! तुझ शिक्षण पूर्ण होईल आणि लगेचच मी आई बाबांनी तुझ लग्न लाऊन द्यायचं ठरवलं आहे.."
"काय?" नेहा किंचाळली "लग्न..इतक्या लवकर? माझ अजून लग्नाच वय सुद्धा झाल नाहीये! तू माझी मजा करतीयेस ना?"
"तुझ वागण आम्हाला दोघांनाही आवडत नाही... तुला स्पेस आणि फ्रीडम हव आहे न.. तुझ लग्न झाल्यावर तू आणि नवरा कसाही वागायला मोकळे असाल! आम्ही फक्त लांबून नजर ठेऊ.. पण काहीच बोलणार नाही! त्यामुळे कालच बाबांनी हा निर्णय घेतला."
"पण मला.." नेहा बोलत होती पण आईनी नेहा ला मधेच थांबवलं,
"आता पण नाही ऐकून घेणार.. तुला बऱ्याच वेळा आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला पण तू काही ऐकलाच नाहीस! तुला हव तस तू वागलीस. आता आमचा हा निर्णय तुला ऐकावच लागेल... त्यात आम्ही तुझ काही ऐकून घेणार नाही! स्पेस इत्यादी महत्वाच आहे पण जरा थोडी समजुतदारपणे वागविस इतकीच अपेक्षा होती!"
आईच बोलण नेहा नी ऐकल.. आणि नेहा एकदम टेन्शन मध्ये गेली.
"पण आई, मी अजून आत्ताच २२ वर्षाची झाले. काय घाई आहे माझ्या लग्नाची?" नेहाचे डोळे पाणावले..
"मला नाही माहित.. तो निर्णय बाबांचा आहे आणि तुला माहिती असेल ह्या निर्णयाबाबत बाबा कोणाचही ऐकणार नाहीत! त्यांनी एकदा ठरवलं कि ठरवलं... यु नो दॅट..."
"मी आजी आजोबांशी बोलते.. ते बोलतील माझ्या बाजूने! तुम्ही मला बळजुबरी करून लग्न करायला लाऊ शकत नाही!"
"आज्जी आजोबा? प्रयत्न करून बघ... एक तर आजी आजोबा तुझ्या साईड नी बोलणारच नाहीत आणि बोलले तरी बाबा त्यांच सुद्धा काहीही ऐकून घेणार नाहीत!!"
"पण आई... धिस इज नॉट फेअर!" नेहा रडवेली झाली..
"ह्याच वयात चुका होतात आणि चुका होण्या आधीच जर काळजी घेतली तर पुढे काही चिंता नाही! महत्वाच, लग्न कधीतरी करणारच आहेस ना? थोड लवकर केल तर कुठे बिघडलं? तुला हव तस थाटामाटात करून देऊ लग्न.. तू जे मागशील ते मिळेल लग्नात! पण लग्न हे होणारच! पण फक्त मुलगा आम्ही पसंत करणार आणि तू काहीही बोलायचं नाहीस!" आईच्या आवाजातला गंभीरपणा नेहा नी हेरला.
"आई पण मला नोकरी करायचीये ग.. कॉलेज लाइफ एन्जॉय केल आता जरा नोकरी मधली मजा करायचीये! माझी खूप स्वप्न आहेत.. मला मोठ्या हुद्द्यावर जायचं आहे!"
"तुझी स्वप्न आहेत माहितीये! ती तू लग्न झाल्यावर पण पूर्ण करू शकशील नेहा! आणि आम्ही तुला किती तरी वेळा समजवून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तू आमच अजिबातच ऐकल नाहीस! तू कोणाकडे जातेस, तुम्ही कोण मैत्रिणी असता... फक्त मैत्रिणी कि मित्र पण हे आम्हाला कस कळणार? तुला कोणी खास मित्र असेल तर तेही तू सांगितलं नाहीयेस!"
"नो नो आई.. आमच्या ग्रुप मध्ये मित्र आहेत पण आम्ही कोणाकडे राहायला जात नाही किंवा कोणाला राहायला सुद्धा बोलावत नाही! खरच ग आई.. मी काहीही चुकीची वागत नाहीये! विश्वास ठेव.." नेहा म्हणाली,
"ते तू आम्हाला कधी विश्वासात घेऊन सांगितलस? तू मैत्रिणीकडे गेलीस कि फोन करतेस मी आज घरी येत नाहीये! तू जबाब्दारिणी वागत नाहीस! मग आम्हाला दोघांना काळजी वाटण साहजिक आहे! तू काल गाडी पडल्यावर मला किंवा बाबांना बोलवायला हव होतस पण तू लगेच मैत्रिणीकडे पळालीस! कधीतरी मैत्रिणींकडे जाणं ठीके.. पण हल्ली तू वेळ मिळाला कि मैत्रिणीकडे राहायला जातेस! तिथे फक्त मैत्रिणी असतात कि... तुला समजतंय न मला काय म्हणायचं आहे? रात्री तुम्ही काय करता.. ते कळायला काही मार्ग नसतो.. हे वयच आहे जेव्हा नकळत चुका होतात... आणि तुझ्या मैत्रिणी कोण आहेत हे सुद्धा आम्हाला माहित नाहीये! तू प्रत्येकवेळी वेगळ्याच मैत्रिणी कडे जातेस.."
"सॉरी आई.. माझी चूक झाली. मी तुम्हाला सगळ सांगायला हव होत! मला कधी वाटल नाही कि मी काय करते ते सांगायची गरज आहे! त्यामुळे मी तुम्हाला कधी काही सांगितलं नाही! आणि मला कधी गरज वाटलीच नाही ग.. म्हणजे माझ्या ओळखीतले सगळेच असेल एकमेकांच्या घरी राहायला जातात..."
"तुला खरच मान्य आहे तुझी चूक? म्हणजे काय खात्री आहे कि तू परत तसच वागणार नाहीस? आणि मैत्रिणींच सांगत असशील तर त्यांच्याकडे चालत असेल अस वागण पण बाबांना आवडत नाही... त्यामुळे.. आणि तू आम्हाला कधी सिरीयसली घेतलच नाहीस! तुला वाटल हव तस वागल तरी चालेल..."
"आई तू प्लीज बोल ना बाबांशी... खरच इतक्या लवकर लग्न नाही करायचं! माझ्या मनाची तयारी सुद्धा झाली नाहीये लग्नासाठी..."
"ठीके.. मी बोलते बाबांशी पण तुझ वागण जर तू सुधारलं नाहीस तर मात्र..."
"आई मी नक्की सुधारेन ग वागण... मी कुठे जाते काय करते त्याची नीट माहिती सांगत जाइन! आणि आज पासून कोणाकडे राहायला जाण बंद! खरच आई.. "
आई गालातल्या गालात हसली... आणि म्हणाली,
"बघू, तू कशी वागती आहेस.. पण शेवटचा निर्णय बाबांचाच असेल..."
"ओके.. आता मी नक्की नीट वागेन... विश्वास ठेव माझ्यावर!" नेहा मनातल्या मनात घाबरली होती.. तिला मनाविरुद्ध लग्न करायचं न्हवत..
"ठीके.. मी बोलते बाबांशी!... "
इतक बोलून आई बाबांशी बोलायला निघून गेली आणि नेहा तिच्या रूम मध्ये गेली..
आई बाबांशी बोलली आणि बाबांनी आईच बोलण नीट ऐकून घेतलं.. आणि आईच्या सांगण्याला मान दिला.. काही दिवसासाठी तर त्यांनी नेहा च्या लग्नाबद्दल बोलायचं नाही अस ठरवलं! दोघांना हव ते झाल होत.. त्यानंतर दोघांनीही परत लग्नाचा विषय काढला नाही. खर तर, दोघांनाही वाटत न्हवत कि नेहा नी इतक्या लवकर लग्न कराव. त्यांना माहित होत, नेहाच्या मनाची तयारी अजून झाली नाहीये पण नेहाच अस वागण बघून त्यांनी तिच लग्न लाऊन दिलेलं बर असा विचार केला होता!! नेहा बदलली हे पाहून त्यांनी सुद्धा त्यांचा निर्णय बदलला.. त्या प्रसंगानंतर, नेहा एकदम परिपक्व झाली.. तिच वागण बदलल आणि तिला जबाबदारी ची जाणीव झाली! नेहा च कॉलेज संपल.. तिला चांगल्या कंपनीत जॉब मिळाला.. ती जॉब मधल आयुष्य एन्जॉय करायला उत्सुक होती. त्याचबरोबर तिच्या आई च्या सांगण्यानुसार तिच वागण सुद्धा एकदम बदलल.. नेहा एकदम व्यवस्थित वागायला लागली.. तिच्या वागण्यावरून कोणाला बोट ठेवायलाही जागा राहिली न्हवती. तिच लोकांकडे जाऊन राहाण बंद झाल. तिनी कोणाशीही बोलण बंद केल.. आणि फक्त ठराविक मित्र मैत्रीणींशी बोलायला लागली. तिच्यातला हा बदल पाहून तिचे आई बाबा खुश झाले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुजा कुलकर्णी.