Problem Solving Technic - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक....- पार्ट १

प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक....- पार्ट १

रात्रीचे 8 वाजले... नेहाचा आजचाही दिवस खराब गेलेला.. तिनी घड्याळ पाहिलं आणि ती स्वतःशीच बोलायला लागली,

"आयुष्यातला अजून एक दिवस कमी झाला.. अजून किती दिवस आयुष्य आहे काय माहित.. कंटाळा आलाय आता सगळ्याचा... मनाविरुद्ध किती आयुष्य जगायचं? आयुष्य जगतांना काहीच मजा येत नाहीये... रटाळ आणि कंटाळवाण झालाय आयुष्य! जाऊदे... काही झाल तरी पण जगाव तर लागणारच.."

नेहा नी हे बोलून मोठा सुस्कारा टाकला.. आणि स्वतःच सांत्वन केल! नंतर ती बेड रूम मध्ये शिरली! तिच्या आयुष्यात काहीच चांगल घडत नाहीये अस तिला सारख वाटत राहायचं.. त्यादिवशी सुद्धा तिच्या मनातून नकारात्मक विचार जात न्हवते! नेहमीप्रमाणे ती ८ ला झोपायची तयारी करायली लागली..दिवस खराब गेल्यामुळे ती वैतागलेली... तिला माहित होत इतक्यात झोप येणार नाही पण तरीही ती झोपण्यासाठी बेड रूम मध्ये शिरलीच! आणि तितक्यात दाराची बेल वाजली...

"गरज असते तेव्हा कोणी फिरकतही नाही... आत्ता मला कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये! खरच आत्ता मला कोणाचीही गरज नाहीये तेव्हा कोण आलाय त्रास द्यायला? आधीच माझा मूड खराब आहे.. कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये.. कोणाच तोंड सुद्धा पाहायचं नाहीये आणि अश्या वेळी कोण आलाय देव जाणे.." स्वत:शीच बोलत नेहा दारापाशी गेली.. दार न उघडताच वैतागून नेहा बोलायला लागली...

"कोण आलाय आत्ता? कोणाकडे जातांना फोन करून जायची पद्धत असते.. एक फोन करून विचारायचं......वेळ आहे का? आत्ता भेटायला येऊ का? घरातले झोपत असतील त्याची काही परवा नसतेच लोकांना..मनाला येईल तेव्हा लोकांच्या घरी जातात... कधीतरी येणार असाल तर एखादा फोन करून यायचं ना... डोक्याला विनाकारण ताप!"

रोहित नी नेहा च बोलण ऐकल.. त्याला नेहा खूप वैतागलीये हे जाणवल..पण तरीही त्यानी बंद दरवाज्यामागे असलेल्या नेहा ला शांतपणे उत्तर दिल,

"अग नेहा,मी रोहित... आत्ता फक्त ८ वाजले आहेत... तू इतक्या लवकर झोपतेस? तुझ्या घरावरून जात होतो म्हणून म्हणल भेटून जाऊ तुला आणि तुझ्या हातची मस्त कॉफी पिऊ... तुला डिस्टर्ब होईल अशी शंका सुद्धा न्हवती आली मला.. म्हणजे तू ८ ला झोपतेस अस मला स्वप्नात सुद्धा वाटल नसत! मला आधी माहिती असत कि तू इतक्या लवकर झोपतेस तर मी आलोच नसतो.. सॉरी!"

आपण चुकीच काहीतरी बोललो हे लक्षात आल्यावर ओशळलेल्या भावनेनी तिनी दार उघडल...

"ओह रोहित तू आहेस...सॉरी...मी झोपत होते सो दाराची बेल वाजल्यावर वैतागले! आणि तू सॉरी का म्हणतो आहेस? आत्ता अचानक कसा आलास? तू आत्ता भेटायला येशील अस मला खरच वाटल न्हवत.. ये कि आत..बस मी पाणी आणते!"

इतक बोलून नेहा पाणी आणायला आत गेली! रोहित घरात आला आणि सोफ्यावर बसला! त्यानी चौफेर नजर फिरवली. घर बऱ्याच दिवसात साफ सुद्धा केल नाहीये हि गोष्ट त्याच्या लक्षात आली. घरभर जळमट दिसत होती. समान विखुरलेलं दिसत होत. नेहा खूप डिस्टर्बड आहे हे रोहित ला जाणवलं.. पण त्या बद्दल काही बोलायचं नाही असा विचार रोहित नी मनोमन पक्का केला. तितक्यात नेहा पाणी घेऊन आली आणि तिनी परत बोलायला सुरवात केली,

“आता बोल कसा आहेस? आणि अचानक कस येण केलस? म्हणजे माझी आठवण आहे तुझा अजून! गुड टू नो!”

“असाच आलो... तूला डिस्टर्ब केल का मी? आणि आठवण आहेच ग..फक्त काम खूप वाढलाय हल्ली..वेळ मिळताच नाही!”

“तुझ काम वाढलय आणि मला काहीच करत नाहीये सध्या!" नेहा पुटपुटली..

"तू काही बोललीस?" रोहित म्हणाला..

"अरे काही नाही.. तू कसा आहेस सांग! आणि रोहित, फोन किंवा मेसेज न करताच अचानक आलास... ठरवून यायचास कि.. काहीतरी खायला केल असत!"

"हो अग.. मी इथे कामाला आलो होतो! आणि एकदम आठवण झाली तू इथेच राहतेस.. म्हणून आलो भेटायला.. बरेच दिवस आपली भेट झालीच न्हवती. तू सांग कशी आहेस?"

"मी ठीक आहे! आयुष्य कांटाळवाण झाल आहे. बर झाल तू आलास आज... आज कित्येक दिवसांनी कोणाशी गप्पा मारेन.. आणि किती दिवसांनी आलास! आत्ता वेळ मिळाला का? इतके दिवसात इतका बिझी झालास कि एक फोन पण करता आला नाही! फोन नाही किंवा मेल पण नाही! पण आज आलास बर झाल.... अरे,हल्ली खूप डिस्टर्ब असते! कोणीच मित्र मैत्रिणींशी काहीच संपर्क नाहीये...सगळेच बिझी आहेत! कोणी स्वतः फोन करत नाही आणि मी कोणाला फोन करायच्या फंदात पडत नाही.. आज बरेच दिवसांनी तुझ्याशी बोलल की बर वाटेल... यु नो, आई बाबांचा मध्ये डीवोर्स झाला.. मला धक्का बसला न्हवता पण इतक्या लवकर दोघ वेगळे होतील याची मला कल्पना न्हवती! मला वाटल होत, माझ्यासाठी तरी दोघ एकत्र राहतील... पण मला जे वाटत होत तस घडलच नाही! मग मी सुद्धा काही निर्णय घेतले.. माझ्या मनानी मी एकट राहायचा निर्णय घेतला! सो आता मी एकटीच असते इथे! इतक मोठ घर पण बोलायला कोणीच नाही! म्हणजे अर्थात तो निर्णय सर्वस्वी माझाच आहे... आय अॅम नॉट ब्लेमिंग एनीबॉडी... आणि सतत एकत रहावस वाटत... मी स्वतः कुणाशी फोन वर बोलण हल्ली मी टाळतेच.. आपल्या ग्रुप मधल तर कोणीच फोन करत नाही!"

"ओह.. अस आहे का? तुझ आयुष्य कांटाळवाण झाल आहे? आणि काका काकुंच कळल होत! पण तेव्हा मी भारता बाहेर होतो. नंतर कामाच्या गडबडीत डोक्यातून गेल तुला भेटायचं...आणि मी अचानक आलो ते तुला मुद्दामच त्रास द्यायला आणि चिडवायला. . हाहा! जोक्स अपार्ट,बरेच दिवसात भेट न्हवती... आज म्हणाल ह्याच एरिया मधे आलोय तर भेटून जाऊ.... बरेच दिवसात काही हाल हवाल नाही कळला तुझा! हल्ली मेल चेक करत नाहीस का? मी मध्ये तुला फोन करत होतो पण २-३ वेळा फोन बंद होता...नंतर माझ काम वाढल... परदेशवाऱ्या वाढल्या! आणि परत फोन लावायला जमलच नाही! आणि आज तू ८ ला का झोपती आहेस? इतक्या लवकर? आधी तर रात्री १२ शिवाय झोपायचं नाव घ्यायची नाहीस... मी कधी कधी ओनलाईन आलो कि पाहायचो तुला मग आता काय झाला एकदम? आज डिस्टर्ब का झालात मॅडम? सविस्तर सांग!"

"आज नाही.. गेली बरीच दिवस! मूड भयंकर बिघडला आहे... फ्रेश वाटतच नाही! काही करण्याची इच्छा होताच नाही! दिवस अक्षरशः ढकलती आहे! झोप पण लागत नाही! म्हणून हल्ली झोपेच्या गोळ्या घेऊन झोपते! आत्ताच झोपेच्या गोळ्या घेऊन झोपणार होते आणि तितक्यात दाराची बेल वाजली... मी जरा वैतागले होते! पण तुला पाहून जरा बर वाटल! आणि तू अजूनही रात्री हिंडत बसतोस का रे? थांब मी कॉफी करते..तुला माझ्या हाताची कॉफी आवडते ना? बट नॉट शुअर. आधीसारखी जमेल का? आणि लवकर घरी जा.. काका काकू तुझी वाट पाहत आसाशील ना...कशाला रात्री हिंडत बसतोस??"

नेहा नी मस्त कॉफी करून आणली आणि रोहित बोलायला लागला!

"नेहा,कॉफी मस्त झालीये! एकदम झकास!!! तू सांग,फ्रेश का वाटत नाहीये? आणि प्लीज,दिवस ढकलती आहे अस काही बोलू नकोस! तुझ्या तोंडून असल काही ऐकण्याची सवय नाहीये! बाय द वे,तू झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतेस नेहा? हे मला माहिती न्हवत.. किती दिवस घेतीयेस झोपेच्या गोळ्या?? आणि डोण्ट वरी अबाउट मी.. घरी माझी वाट कोणी पाहत नसेल... मी घरी जायच टाळतच असतो.. म्हणून काम झाल कि रात्री उशिरा पर्यंत फिरून मग घरी जातो फक्त झोपायला!"

"बरेच दिवस घेतीये झोपेच्या गोळ्या...मानसिक थकवा आलाय..डिटेल मध्ये तुला निवांत सांगेन कधीतरी!"

"कधीतरी का? आत्ताच सांग कि... मला वेळ आहे आत्ता? तुला झोप आली असेल तर भेटू नंतर!"

"नाही नाही... झोप नाही आली! तू बोल!"

"गुड.. तू सांग, बरेच दिवस झोपेच्या गोळ्या घेती आहेस? काय झाल एकदम? तू तर इतकी पॉझीटीव होतीस नेहा आपल्या ग्रुप मधल्या कोणालाही काही प्रोब्लेम आला तरी त्यांना तू त्यातून बाहेर काढायचीस ...आम्ही सगळे तुझ्या आधारानी आमच्या प्रोब्लेम मधून बाहेर यायचो! आणि आता तू अशी का झालीस? ह्याबद्दल मला कोणीच काही बोलल नाही..आणि तुही काही बोलली नाहीस! म्हणजे मला कल्पना न्हवती तू बॅड फेज मधून जातीयेस!”

“तुला माहितीये न रोहित,मला नाही आवडत अस सारख सारख कोणासमोर रडायला? आणि होते मी खूप पॉझीटीव पण आता नाही राहिली मी तशी! परिस्थिती नी बदलले मी.. मलाही कल्पना न्हवती कधी कि मी कधीतरी अशी डिप्रेस होईन! ह्यावेळी परिस्थिती नी मला बदलवल.. कोणतीच गोष्ट मनासारखी झाली नाही आणि मी अक्षरशः कोलमडले..”

“तू कोलमडली आहेस?" रोहित च्या भुवया उंचावल्या.."तू खरच डिप्रेस झालीयेस नेहा? काय? आर यु सिरिअस? म्हणजे माझा नाही विश्वास कि तू कधी डिप्रेस होऊ शकतेस!”

“आय अॅम व्हेरी सिरिअस! हि मजा करण्याची गोष्ट आहे का रोहित?? मला डिप्रेशन आलाय.. आणि मला नाही माहित,ह्यातून बाहेर यायला काय करू?”

“अजूनही माझा विश्वास नाही... नेहा जी इतकी स्ट्रॅांग आहे ती कधी अशी डिप्रेस होईल!"

"आता आहे ते आहे रे.. मी डिप्रेस झालीये आणि मी सदा दुःखी असते! नशिबाची साथ सुटून गेली आता जगू कशाला असे विचार येतात मनात.. म्हणजे आत्महत्येचे!"

"आत्महत्या? काय बोलती आहेस तू नेहा? काय झाल ग एकदम.. आय कॉन्ट सी यु लाइक दिस.. इतकी का बदललीस? तू मला काहीच सांगितलं का नाहीस? मी बिझी होतो पण तू एकदा सांगितलं असतस तर नक्की आलो असतो तुझ्याशी बोलायला! सम्हणजे मी इथे न्ह्वातोच आणि मी खूप बिझी झालो होतो कामात... आणि तुला माझी गरज आहे हि गोष्ट माझ्या कधी लक्षात आलीच नाही.. सॉरी!!! मला कधी अडचण आली असती तर मी मात्र तुला लगेच संपर्क केला असता.. मी चुकलोच!”

“तुझी चूक नाहीये रे.. रोहित! उगाच डोंट ब्लेम युअर सेल्फ! मी कोणालाच नाही बोलले... तुला वेळ आहे का आत्ता? खूप काय काय झालय आयुष्यात! आज इतक्या दिवसांनी मन मोकळ करावस वाटत आहे! मनात साचलेल सगळ बाहेर टाकून द्यायचं आहे! खूप दिवस एकटीच कुढत राहिले.. मी नेहमीच खंबीर होते त्यामुळे कदाचित आपल्या ग्रुप मध्ये सुद्धा कोणालाच कधी वाटल नसेल कि मला कोणाच्या आधाराची गरज आहे!”

“हो...वेळ आहे! डोंट वरी! मला घरी जायची घाई नसतेच! तू सांग...” रोहित म्हणाला..

“"आता जगण्यात काही अर्थ उरलाच नाहीए अस वाटतंय आता.. कशाला जगू बळजुबरिनी अस हि वाटत हल्ली? आयुष्या इतक बदलेल अस वाटलच न्हवत! एकामागोमाग एक नुसते प्रोब्लेम्स!! खरच सगळ्याचा कंटाळा आलाय आता..” नेहमीच आनंदी असलेली नेहा दुखी होऊन बोलली...

“काय झालाय सांगतच नाहीयस तू...नीट सांग"

"मधे आई बाबांचा डीवोर्स झाला...त्याचा खूप मनस्ताप झाला! मला वाटलेलं दोघांच माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी तरी वेगळे होणार नाहीत! पण मी चुकीची होते! स्वतःचा स्वार्थ सगळ्यांनाच प्रिय असतो! नात्यांना फार किंमत दिली जात नाही! रक्ताची नाती असली तरी! त्या वेळी मी कोलमडले.. तेव्हा मला मदत करायला एक चांगला मित्र मिळाला... फेसबुक वर! मी फेसबुक आणि त्या मित्राशी बोलायला अॅडीक्ट झाले! आम्ही रोज रोज बोलायचो.. मला त्याच्याशी बोलून मस्त वाटायचं! माझी सगळी दुःख मी विसरायला लागले होते. त्यानी मला मदत केली... आणि कस काय माहित नाही पण मला वाटायला लागल तोच माझ आयुष्य आहे! मी त्याच्यात खूप गुंतले होते आणि एक दिवस तो हि मला सोडून निघून गेला! त्यानी मदत केली हि गोष्ट वेगळी पण मला वाटलेलं तो आयुष्यभर साथ देईल! त्याला अजून कोणीतरी वेगळी मिळाली आणि आत्ता तर त्याच लग्न पण झाल आहे! म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा नात्यांना किंमत न्हवतीच! सगळे जण सोडून जातायत अस वाटायला लागल...त्यामुळे मला इतका ताण आला... मी पूर्णपणे कोलमडून गेले! कामात लक्ष लागेनास झाल... मध्ये जॉब सोडला... आणि मग एका मागोमाग एक असे प्रॉब्लेम्स चालू झाले! आता दिवसभर घरातच बसते नुसता विचार करत... मधे लोकांशी बोलायचा प्रयत्न केलेला पण कोणिलाही वेळ न्हवता माझ रडगाण ऐकण्यात...मला कोणाचीतरी सोबत हवी होती खरच... पण माझ्याशी बोलायला कुणाला वेळ नाहीये हे लक्षात आल आणि मी स्वताला एकट ठेवायचं ठरवलं! कोणीच बोलायला तयार न्हवत मग मी शेवटी कोणाकडून अपेक्षा कारणच बंद केल... तुला फोन केलेला पण तुझा फोन लागला नाही... बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा तुझ्याशी काही संपर्क झाला न्हवता. म्हणूनच मी तुलाही काही बोलले नाही... मला वाटल तू हि मला इग्नोर करतोयस...ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला नैरश्य आलय... झोपही लागत नाही...सारखे तेच तेच विचार... आणि सगळे नकारात्मक विचार! त्यानंतर अधिकाधिक डिस्टर्ब होत गेले....आता चक्रव्यूहत अडकल्यासारख झालाय... ह्या सगळ्यातून बाहेर पडता येताच नाहीये... खूप प्रयत्न केले तरी काही उपयोग नाही म्हणून मी आता प्रयत्नही सोडून दिलेत.... आणि रोजचा दिवस ढकलती आहे! मेल बघण पूर्ण बंद झालय आणि फोन कधीतरी चार्ज करते...एकटीच बसलेली असते... काही न करता..फक्त मनात सारखे विचार चालू असतात.."

"ओह माय गोड... मेल पण नाही पाहत! तरीच.. मला काही उत्तर नाही आल! आणि मी भारता बाहेर गेलो होतो... कामासाठी बरेच दिवस बाहेर होतो! त्यामुळे इथला फोन बंद होता! बाय द वे,यू वर जीमेल अॅडीक्ट ना? आणि आता जीमेल पहातही नाहीस! तू तुझ्या आयुष्यात काय काय झाल ते सांगितलस.... पण तरीही मला नाही वाटत तुला नैरश्य आल असेल.. तू इतकी कमकुवत नाहीयेस नेहा! आधी मनाशी ठरव कि मला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येणार आहे! बरोबर येईल झोप तेही झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय! तू सांग डॉक्टर कडे जाऊन त्यांच्या कडून गोळ्या घेतल्या कि मनानी घेतीयेस?"

"मला नाही जायाच रे डॉक्टर कडे... मीच पाहील ऑनलाईन आणि झोपेच्या गोळ्या मिळाल्या घरी! त्या झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतीये..." नेहा थोड वैतागून बोलली...

"ओह.. मला थोडा वेळ दे.. मी थोडा विचार करतो आणि आपण बोलू! बाय द वे, अजून एक कप कॉफी देऊ शकतेस?"

"हो देते कि.. आणि विचारतोयस काय? सरळ सांगायचं कॉफी दे.. कॉलेज मध्ये तर सगळ हक्कानी घ्यायचास.. आता इतका कसा बदललास?"

"हाहा... थोडे मॅनर्स शिकलोय आता.. आधी ते अजिबातच न्हवते! हाहा..."

"ओह..गुड गुड! तू पण बदललास म्हणजे! मी आणते फक्कड कॉफी!! तू कर विचार... आणि काही उत्तर सापडत आहे का ते शोध!"

"उत्तर तर मी शोधणारच.. यु नो.. मी प्रश्नांची उत्तर शोधतोच!"

"शोध शोध.. बघू काय करतोस आणि मला सगळ्यातून बाहेर यायला मदत करतोस.. आणि प्लीज डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला अजिबात नकोय! सम हाऊ मला गोळ्या घेऊन बर व्हायचं नाहीये!"

"हो हो... आय नो हाऊ यु आर! प्लीज कॉफी आण ना... माझ पण डोक जरा चढल आहे.."

"आणते.. आणते!" इतक बोलून नेहा स्वयपाकघरात गेली आणि कॉफी करायला लागली. तिच्या मनात प्रश्नाचं काहूर माजल होत पण रोहित ला भेटून तिला थोड तरी बर वाटत होत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED