सरप्राईज….- पार्ट १ Anuja Kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सरप्राईज….- पार्ट १

सरप्राईज….- पार्ट १

रोहन,जय आणि पूजा कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटले आणि त्यादिवसापासून तिघांची मैत्री झाली. पूजा तशी कोणाशीही एकदम मैत्री न करणारी होती. पण ती जय आणि रोहन ला भेटली तेव्हा तीघ एकदम चांगले मित्र कधी झाले हे पूजा ला कळल देखील नाही. हळू हळू त्यांची मैत्री एकदम घट्ट झाली. अभ्यासाबरोबर तिघांच्या आवडी निवडी देखील सेम होत्या. जशी जशी तिघांची मैत्री घट्ट झाली तसे तीघ एकत्र हिंडायला लागले. तिघांची समान आवड म्हणजे ट्रेक्स कारण असल्यामुळे कॉलेज मध्ये असतांना तीघ एकत्र ट्रेक करायचे... बाहेर भरपूर हिंडायला जायचे! पाहता पाहता कॉलेज संपल! तिघा चांगल्या मार्कांनी ग्रॅजूएट झाले आणि लगेचच तिघांनाही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी सुद्धा मिळाली. तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळाली त्यामुळे त्यांना रोज भेटण शक्य व्हायचं नाही. रोहन,जय आणि पूजा सुद्धा एकमेकांना विसरले न्हवते. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती कि कॉलेज संपल तरी ते एकमेकांनाच्या संपर्कात राहिले! कॉलेज संपल तरी तीघ न चुकता भेटायचे! रविवारी किंवा एखाद्या सुटीच्या दिवशी एकत्र जमून गप्पा मारायचे..... सगळी टेन्शन्स बोलून त्यावर तीघ एकत्र उपाय शोधायचे.

नेहमीप्रमाणे तीघ रविवारी न चुकता ब्रेकफास्ट ला भेटायचे. रविवार सकाळ....रोहन, जय आणि पूजा ठरवल्याप्रमाणे ब्रेकफस्ट ला भेटले....कॉलेज संपल्यापासून तीघ जमेल तेव्हा रविवारी ब्रेकफास्ट ला भेटायचे...

"काय खाणार? आज मी देते बिल..." पूजा उदार होऊन बोलायला लागली....

"वा वा...कंजूस पूजा बिल देणार..काय आहे तरी काय आज? काय विशेष? मी सोडून अजून कोणीतरी नवीन कोणी भेटलय वाटत.." रोहन पूजाला चिडवण्याच्या उद्देशानी म्हणाला...

“हाहा.. मी हसू का?” पूजा चिडली आणि चिडूनच रोहनशी बोलली, “डोंट बी मिन रोहन! किती त्रास देतोस..जास्ती त्रास दिलास ना तर खरच शोधेन दुसर कोणीतरी..यू नो..आय मिन इट....”

“पूजा आणि रोहन..तुम्ही भांडा अजून... मला मजा येतेय...हाहा! आणि खायच नंतर ठरवू....पण आधी फक्कड चहा हवाय मला...आत्ता चहा मस्ट आहे...” जय एकदम चहाबाज...कुठेही गेल तरी सगळ्यात आधी चहा पिणार... पूजा ला जय च सारख चहा पिण आवडायचं नाही आणि त्यावरून पूजा आणि जय मध्ये बऱ्याच वेळा वाद व्हायचे पण ह्यावेळी मात्र पूजा शांत राहिली.

रोहन नी चहाची ऑर्डर दिली आणि चहा येईपर्यंत सगळे शांत झाले...चहा आला.. आणि रोहन नी पुढची ऑर्डर देऊन ठेवली...

“जय,घे तुझा चहा...आणि चेष्टा बास!” रोहन एकदम सिरिअस होऊन बोलायला लागला.“महत्वाच ऐका,आपण मागच्या वेळी ट्रीप प्लॅन करत होतो पण तेव्हा फक्त चर्चा झाली आणि नक्की काहीच ठरलं न्हवत....आता आपण तीघ खरच ट्रीप च ठरवू.. बाकीची वायफळ बडबड आज नको! आज बाकी काही चर्चा नको..किती दिवस झाले तीघ कुठे गेलोच नाहीयोत.. कॉलेज ला असतांना किती हिंडायचो तीघ... आणि आता कसेबसे भेटतो आपण...ट्रेक ला जाऊन वर्ष झाल्यासारखी वाटतायत...आणि आय मिस गोइंग आऊट विथ बोथ ऑफ यू.” रोहन लगेचच मुद्द्याच बोलायला लागला...

"ग्रेट रोहन... मी पण चहा पिऊन तेच बोलणार होतो... अगदी माझ्या मनातल बोललास... कुठे जायचं आपण? पण रोहन,ट्रीप ला जायचं? आय थॉट,ट्रेक! आपण १ डे ट्रेक्स ला जातो ना नेहमी? ह्यावेळी ट्रीपच का आल तुझ्या डोक्यात? आणि कुठे जायचं ठरवतोयस? खर सांगायचं तर,भारी आयडिया आहे! काहीतरी वेगळ! तू काही प्लॅन केलाय? आता पाऊस चालू झालाय.... हवा पण मस्त आहे सो ट्रीप ला मज्जा येईल....बदल आणि आराम मिळेल... सारख काम काम मी तर जाम वैतागलो आहे! आय नीड सम रेस्ट! कुठेतरी हिंडून येण महत्वाच..."

“हो रोहन,आय ऑल्सो अग्री...मला पण कुठेतरी जायचच आहे... काम आणि रुटीन फार झाल.. निसर्गात जायचय आता.... मला ट्रीप किंवा ट्रेक..काहीही चालेल! आता ऊन पण कमी झालाय सो वी कॅन प्लॅन अ ट्रीप... ट्रेक किंवा ट्रीपनी मला फरक पडत नाही...तसही मला तुमच्या दोघाबरोबर हिंडायला आवडत! माझ्यासाठी ते महत्वाच आहे..” पूजाचा सुद्धा होकार आला.......

"बरोबर बोललीस पूजा!! मला पण तुम्ही दोघ बरोबर असलात कि काहीही चालेल! तस ट्रेक ला जास्ती मजा येते.. तरीही ट्रीप पण वेगळी आयडिया आहे! पण ह्यावेळी काहीतरी थ्रिलिंग ठरवू...नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ.. नेहमी आपण एक जागा ठरवून तिथे जाऊन येतो फक्त... त्यात काही मजा नाही.. कुठेतरी फक्त राहून यायची ट्रीप नको! काहीतरी वेगळ करू.."

"जय,भारी आयडिया!!! ट्रीप करायची पण ती पण थ्रिलिंग झाली पाहिजे... म्हणजे फक्त हॉटेल मध्ये जाऊन राहून यायचं इतक नाही करायचं! भरपूर हिंडायच..जे वाटेल ते करायचं आणि गाडीतून हिंडायचं.. कुठे वाटेल तिथे थांबायचं!! मग रात्री एखाद्या हॉटेल मध्ये राहायचं! मजा येईल अस काहीतरी नवीन करून!!! बाय द वे,पूजा तू सांग! तुझ काय? रहायची ट्रीप करणार आहोत!!! पण कुठे राहू,हॉटेल कस असेल सांगता येत नाही! तुला चालेल का? तू येणार का? तू आहेस 1 नंबर रडकी...जमणार असेल तरच ये...तिथे जाऊन रडारड नकोय...तुला काही बळजुबरी नाही..तू येणार नसलीस तर आम्ही दोघ जातो...दोघच असलो कि आम्हाला कुठेही हिंडता येईल...तू असलीस कि जरा काळजी घ्यावी लागते..उगाच आम्हाला टेन्शन... परत तुझे नखरे... इथे नको..तिथे नको.. हे खायला नको ते खायला नको! त्यापेक्षा तू घरातच बस.. ऑर तू काय ठरवती आहेस ते नक्की काय ते सांग!" पूजा ला चिडवायला रोहन म्हणाला...रोहन बरोबर जय सामील झाला आणि दोघ जोरजोरात हसायला लागले..

" शट अप रे रोहन... आणि जय तू उगाच हसू नकोस...मी रडकी नाहीये! आणि मी तुमच्याबरोबर सगळीकडे येते...अवघड ट्रेक्स पण केले आहेत.....तसही मी शूर आहे! कश्यालाही आणि कुणालाही मी घाबरत नाही..आणि मग ह्यावेळी का नाही येणार... बाय द वे, मी नखरे कधी केलेत रे रोहन? मी कधी म्हणते हेच खायला हव आहे,तेच खायला हव आहे? काहीही बोललेलं खपवून घेणार नाही.... कळल? आणि मी माझी काळजी स्वतः घेऊ शकते...माझी चिंता करू नकाच...त्यातूनही घाबरले तरी माझे २ शूर मित्रा आहेतच की...आणि तेव्हा पाहूच...कोण किती शूर आहे ते"

"हाहा...तेव्हा बघू ह आपण.... पण आधी कुठे जायच ते ठरवू..आणि आजच ठरवू...मग तयारी करता येईल...आणि आज ठरवलं नाही तर मग पुढच्या रविवारपर्यंत थांबव लागेल...माझा आठवडा बिझी असतो..मध्ये भेटता येणार नाही सो आजच ठरवू...आणि फोन वर ट्रीप ठरवायला मजा येत नाही! प्रत्यक्ष भेटून ट्रीप ठरवायला मजा येते!" जय म्हणाला....

" पूजा, मी गम्मत करत होतो ग... इतकी का चिडतेस लगेच?? जरा लाइटली घे कि! किती चिडत असतेस सारखी सारखी! आणि जय, एकदम बरोबर बोलतोयस...आत्ताच ठरवू.. माझा पण आठवडा बिझी असतो सो आठवडाभर भेटता येणार नाही..फक्त फोन वर बोलण होईल..पण फोन वर इतक नीट बोलता येत नाही! तसही आता ट्रीप फायनल झालीये.. आणि आय कॅन नॉट वेट टू गो आउट विथ बोथ ऑफ यू...नेहमी 1 दिवसाचा ट्रेक करतो पण ह्यावेळी आपण 2 दिवसाचा ट्रीप ठरवू..वेळ कमी वाटला तर अजून एखाद दोन दिवस वाढवू...ओके? आणि रात्री बाहेर असू...पूजा तू काका काकून्ना विचारून घे त्यांना चालेल ना....ते नाही म्हणले तर मात्र तुला येत येणार नाही...त्यांची परवानगी मस्ट आहे...सो तू आधी त्यांना विचारून घे...”

“ आई बाबा नाही म्हणणार नाहीत रोहन...त्यांना माहिती आहे कि, आपण दोघ रिलेशनशिप मधे आहोत...त्यांना वाटतंय आपण लवकर लग्न कराव..पण त्यांना माहिती आहे,मला इतक्यात लग्नाची घाई करायची नाहीये….आय नीड सम मोअर टाइम... आय नीड टू नो यू बेटर! सो ते काही बोलत नाहीत लग्नाबद्दल... आणि आपल्या ट्रीप ला ते नाही म्हणणार नाहीत....महत्वाच म्हणजे,आय ट्रस्ट यु बोथ..आय अॅम सेफ विथ यु बोथ...आणि आय लव यू रोहन!!! तू माझी नीट काळजी घेशील...आय अॅम शुअर ..आई बाबांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा माझ्यावरही विश्वास आहे सो नकार येणारच नाही पण तरीही मी त्यांना एकदा विचारून घेते....पण आत्ता आपण माझ्याकडून नक्की धरून चालायला काही हरकत नाही...”

"ग्रेट... पण काका काकू काय म्हणतायत ते कळव लगेच! आणि प्लॅन अॅज सच काही नाही..वाट नेईल तिथे नुसता हिंडायचं....जिथे थांबवस वाटेल तिथे थांबायच...वाटेल मिळेल ते खायचं! दमलो की रात्री हॉटेल मधे राहायच आणि नेक्स्ट डे पण सेम... वाट नेईल तिथे जायच... काही ठरवून जायचच नाही....कुठेतरी अनिश्चित ठिकाणी जाऊन पोचू मग मस्त वाटेल.. हि माझी आयडिया आहे! हाउ'ज ते आइडिया सांगा? पटतय का? की काही वेगळ आहे तुमच्या डोक्यात??" रोहन खाता खाता बोलत होता... त्याचा प्लॅन मस्तच होता...त्याला नकार येण शक्य न्हवत...

"नो ऑब्जेक्शन रोहन!!! ग्रेट आइडिया....आय डोण्ट हॅव एनि ऑब्जेक्षन.. पूजा तुला काय वाटतय?"

"भारी आहे आइडिया रोहन...ठरवून काही नाही करायच...डेस्टीनेशन न ठरवता केलेली ट्रीप...मज्जा येईल..आणि पाऊस असेल मोस्टली....मग अजुनच मजा येईल..पाऊसा मध्ये भिजायचं...इंद्रधनुष्य,धबधबे दिसतीलच त्याचे भरपूर फोटो काढायचे...पक्षी,किडे शोधत हिंडायचं.. निसर्गाचे भरपूर फोटो! निसर्गाच्या सानिद्ध्यात पूर्ण वेळ.... आणि जिथे जाऊ तिथे मी भरपूर खरेदी करणार..अमझिंग आयडिया आहे रोहन!! १००० लाईक्स..."

"ओके पूजा... पण शॉपिंग? मला खरेदी बोर होते खूप. पण तुला आवडत सो तेही करू!!! आणि तुझ्यासाठी धबधबे,इंद्रधनुष्य आणि पक्षी शोधू आपण! तू कसली गोड आहेस पूजा..लगेच स्वप्नरंजन चालू करतेस...सो ओन्ली आय लव यु सो मच पूजा...आणि गाडीनी जाऊ म्हणजे फ्लेक्सिबल असेल....वाटेत थांबवस वाटेल तिथे थांबता येईल...सो नाउ इट इस कन्फर्म्ड. ..मन्थ एण्ड ला आपली ट्रीप फायनल... फाइनल करायचं?..ह्या मन्थ एण्ड ला आपण जातोय..नाऊ आय वॉन्ट फायनल कॉन्फिर्मेशन फ्रॉम बोथ... जय तूझ फिक्स आहे..सो तू काही ठरवू नकोस...आणि आयत्यावेळी बदलू नकोस..पूजा तुझा काही प्रॉब्लेम नाहीए ना? नक्की ठरव! आणि सांग! परत एकदा भेट होईलच नाहीतर फोन वर बोलूच.. " रोहन लीडर असल्यासारखा बोलला....

"फायनल रे रोहन..." जय आणि पूजा खुश झाले आणि एकदम बोलले...

“नेक्स्ट वीक रविवारी भेट होईल आणि फोन वर बोलण होईल.. वाटल तर मध्ये एकदा भेटायचं बघू.. जमल तर भेटू! नाऊ आय कांट वेट फॉर मन्थ एंड...वी विल एन्जॉय..चलो आता मी पळतो...पूजा तू माझ्याबरोबर येतीयेस ना? जरा हिंडून येऊ...मग तुला घरी सोडतो! आणि जय,भेटू लवकरच....”

“येस...रोहन, थोड हिंडू मग सोड मला घरी...आणि हॅव अ गुड डे जय....भेटूच..”

“बोथ ऑफ यू एन्जॉय...आणि लवकरच भेटू..” जय इतक बोलून निघाला..

गाडीवर जाता जाता रोहननी पूजाला विचारल..“पूजा यु डोंट हॅव एनी प्रोब्लेम ना? तू एकटी मुलगी..रात्री आमच्याबरोबर सेफ वाटेल ना? म्हणजे रात्री राहायचं आहे म्हणून विचारलं! वेगळ्याच रूम मध्ये राहू बत स्टील! तुला योग्य वाटण महत्वाच! आपण आधी १ दिवसाचे ट्रेक्स केले होते.. आता ट्रीप करतोय आणि फक्त आपण तीघ! सो थॉट ऑफ आस्किंग यू.. जर तुला कम्फर्टेबल नसेल तर आपण नेहमीप्रमाणे ट्रेक करू! नो प्रॉब्लेम!”

“तू वेडा आहेस का रोहन? आपण काही दिवसातच लग्न करायचं अस ठरवलंय ना? मग मला काय प्रोब्लेम असेल? आणि आपण रूम शेअर कुठे करणार आहोत! मग काय टेन्शन? आय हॅव टोल्ड यू,आय ट्रस्ट यू..तू वेडवाकड वागणार नाहीस,खात्री आहे मला...मला काही टेन्शन नाही... उलट तुम्ही दोघ बरोबर असलात कि मला खूप सेफ वाटत! आणि आपण किती दिवस नाही किती वर्ष एकत्र आहोत!!! सो असा काही विचार करू नकोस..जय पण खूप चांगला आहे..तो चुकूनही वेडवाकड वागणार नाही....”

“मग गुड...आणि तुला माझ्याबद्दल इतका विश्वास वाटतो ते बघून मस्त वाटल... नात्यात विश्वास महत्वाचा! थँक्यू!! आता कुठे जायचं?”

“घरीच सोड अरे...काम पेंडिंग आहेत ती करते... परत कधीतरी जाऊ हिंडायला...” पूजा नी रोहन ला सांगितलं आणि रोहननी पूजाला घरी सोडलं...आणि तो म्हणाला...

“मिस यु पूजा...यु टेक केर पूजा...”

“मिस यु टू रोहन...तू पण काळजी घे!!..घरी पोचलास की फोन कर...भेटू लवकरच...”

सगळी तयारी व्यवस्थित झाली...जायचा दिवस आला....सकाळी सकाळी रोहन नी गाडी घेऊन जय ला पिक केल..पूजा कडे आला तेव्हा तिचे बाबा भेटले...ते रोहन ला म्हणाले....

"अरे रोहन...कसा आहेस? बऱ्याच दिवसात भेट नाही! आणि पूजाला लग्नाचा मूड आला का? काही बोलली का? कि अजून काहीच बोलत नाही? आम्ही तर तिला लग्नाबद्दल विचारण बंदच केल आहे!!..आणि तू जय कसा आहेस?...बरेच दिवसात दोघांची भेट झालीच न्हवती..तुमच्या ट्रीप च्या निमित्तानी तरी भेट झाली....तुमच काम कस चालूये? आणि एक सांगा,ट्रीप ची आइडिया कोणाची होती? मला पूजा नी सांगितलं, काही प्लॅन न करता जाणारात तुम्ही..मस्त कल्पना आहे....बरेच नवीन अनुभव मिळतील तुम्हाला.. तुम्ही एन्जॉय करा आणि रोहन, पूजा ची काळजी घे...ती वेंधळी आहे यु नो...नसते हट्ट करते... तिचे फालतू हट्ट ऐकू नकोस! आणि मी तुला सगळ्या परमिशन्स देतोय सो तिला ऐकावच लागेल.. आणि तू आहेस म्हणून आम्हाला काही काळजी नाही.. फक्त मध्ये मध्ये फोन करत राहा.. ते पण माहितीसाठी!"

"काका, मी मस्त आहे..जॉब मस्त चालूये...एकदम हेक्टिक आहे रूटीन" जय म्हणाला

"काका मी पण मस्त...काम नेहमीप्रमाणेच.... आणि पूजा आहे ना ती एकदम बिझी ठेवते मला ...” बोलता बोलता तो थांबला... त्यानी जरा विचार केला आणि परत बोलायला लागला.. “काका,मी तयार आहे लग्न करायला..पण पूजाच अजून तयार नाहीये! तिला अजून वेळ हवाय...मला अजून नीट समजून घ्यायचय.. घेऊ दे तिला हवा तितका वेळ!! मी वाट पाहतोय ती लग्नाला कधी हो म्हणते!! आणि काका, डोण्ट वरी..मी पूजा ची नीट काळजी घेईन...तुम्ही चिंता करू नका आणि फक्त दोनच दिवस जातोय.... अगदी वाटल तर अजून एक दोन दिवस वाढवू ट्रीप! काय ठरतंय ते तुम्हाला कळवू! आम्ही मधे मधे फोन करत जाऊच.. आणि तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवतो.. पूजा चे फालतू हट्ट ऐकणार नाही! तुम्ही निश्चिंत राहा! आता निघतो काका आणि काकू.." रोहन एकदम समजूतदारपणे म्हणाला..

"तुला पण दाद देत नाहीये का पूजा.. बघू आपण वाट पूजा चा होकार कधी येतो त्याची!"

"हो ना काका... फक्त वाट पहायची! अजून काहीच नाही आपल्या हातात! मी पण वाट पाहतोय पूजा लग्न करायला कधी होकार देते!"

"बास रे रोहन.. आणि बाबा! प्लीज हो! ट्रीप ला जातांना तरी त्रास देऊ नका! ट्रीप तरी एन्जॉय करू दे! लग्न थोड्या उशिरा केल तर इतका काय प्रॉब्लेम आहे मला तर कळतच नाही!" पूजा थोडी चिडून म्हणाली

"ठीके.. नाही बोलत पूजा! तो विषय नाही काढणार परत! आम्हाला चिंता वाटते म्हणून बोलाल जात! पण आता कानाला खडा.. नाही बोलणार परत लग्नावरून!! तुम्ही तीघ मजा करा! हॅपी जर्नी अँड एन्जॉय!! भरपूर फोटो काढा आणि मध्ये मध्ये आम्हाला पण फोटो पाठवा! पूजा.. तू पण मजा कर! फार काही विचार करू नकोस! आम्हाला तुझ लग्न पहायची घाई झाली आहे म्हणून बोलतो!" पूजाचे आई बाबा तिघांना म्हणाले... आणि दोघ रोहन कडे बघून मिश्कील हसून बोलले..

"थॅंक्यू काका आणि काकू...बाय!!"

"थॅंक्यू आई बाबा! प्लीज सारख सारख तेच तेच नका बोलू! मला मनापासून वाटत नाही तोपर्यंत मी माही करणार लग्नाचा विचार! आणि हो.. फोटो पाठवतो! आणि आई...बाबा बाय! आणि माझी काळजी करू नका! मी स्वतःची काळजी घेऊ शकते! आणि रोहन आहेच!"

"हो हो.. मजा कर!" पूजा ची आई म्हणाली

इतक बोलून तीघ त्यांच्या ट्रीप ला निघाले...

अनुजा कुलकर्णी.