Surprize - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

सरप्राईज... पार्ट 2

सरप्राईज...- पार्ट २

प्रवास चालू झाला...वाटेत जाता जाता तीघ निसर्गातले नवीन नवीन चमत्कार पाहत होते...तेव्हा च मस्त पाऊस चालू झाला...थंड वार सुटल..

"आता मस्त जागा पाहून थांबूयात..मला पाऊसात भिजयचय आणि फोटो ही काढायचेत..." पूजा नी रोहन ला ओर्डर सोडली..

"पाऊसात भिजण नॉट अलौड पूजा... काकांनी मला तुझी काळजी घ्यायला संगितलीये.... आणि हेही सांगितलं आहे कि नसते हट्ट ऐकून घेऊ नकोस! हाहा! काकांची ऑर्डर आहे ती नाही मोडणार! तू पाऊसात भिजून आजारी पडलीस तर? इथे डॉक्टर कुठे शोधू मी? आय कांट टेक रिस्क..तू गाडीतून पाऊस बघ आणि हवे तितके फोटो कढ पण पाऊसात भिजयच नाव काढू नकोस.." रोहन गुरकावला

"काय रोहन...तू पण...पाऊसात भिजून लगेच आजारी पडणारे का पूजा?" जय हसायला लागला

"जय...मी सीरीयस आहे...हसू नकोस आणि हसून परिस्थितीचा सिरीयसनेस घालवू नकोस.."

"ओके ओके..मी बोलत नाही आता...तुमच दोघांच चालू देत! पण रोहन मला चहा हवाय.... चहाची टपरी दिसतेय का बघ आणि गाडी थांबव"

पूजा मनाविरूद्ध म्हणाली.."बाबांची ऑर्डर? आणि ती तू ऐकणार?"

"हो ऐकणारच आहे! आणि ऑर्डर आहे म्हणून नाही फक्त! आय केअर फॉर यु पूजा!"

"ओह.. हाहा! ओके रोहन...नाही भिजत फक्त फोटो काढते सो थांबू जरा वेळ..चहाच्या टपरीपाशी थांबव... हवा गार झालीये आणि मला पण चहा प्यायचा मूड आलाय..."

“ग्रेट.. फायनली चहा प्यायला तयार झालीस पूजा!?" जय हसत म्हणाला..

"हाहा! आता जय बरोबर पूजा सुद्धा चहा बाज होते का काय? आणि मी पण चहा घेईन! गाडी चालवून दमलो आहे! जरा फ्रेश वाटेल चहा पिला कि!" इतक बोलून रोहन एक चहाची टपरी पाहून थांबला....मस्त पाऊस पडातांना गरमागरम चहा पीत तिघ निसर्गाच देखण रूप अनुभवायला लागले...चहाचा घोट घेत पूजा बोलायला लागली...

"पाऊस पडला कि नवीन चैतन्य येत ना... झाड टवटवीत होतात...सगळा आसमंत जणू आनंदानी नाचायला लागतो..... निसर्गापुढे सगळ फालतूच... माणसांनी कितीही प्रगती केली तरी निसर्ग नेहमीच वरचढ राहणार! आता आपण नेहमी पाऊसात एक ट्रीप काढलीच पाहिजे रे....कितीही बिझी असलो तरी... रोहन, तुला ह्या आधी अश्या ट्रीप कल्पना कशी सुचली नाही?"

"हाहा... नक्की एक तरी ट्रीप काढत जाऊ पाऊसात! अजून काही फर्मायीश? आणि आता निघायच का? की अजुन इथे थांबायचाय?" रोहन म्हणाला

"थांबू की रोहन... काय घाई आहे? आत्ताच पाऊसही थांबलाय सो इथे आजूबाजूला हिंडून येऊ थोड... पूजाला पक्षी, किडे आणि झाड पाहायला मिळतील...मग तीच डोक शांत होईल...नाहीतर ती कटकट करत बसेल...यु नो हर ना? हाहा...सॉरी पूजा, पण खर आहे तेच बोललो....हाहाहा!!"

"हसा तुम्ही फक्त...माझ्या बाजूने कोणी नसत! तुम्ही दोघ मिळून त्रास देता! आणि मी अशी कटकट करणारच आहे... काय म्हणण आहे तुझ जय? थांबायची आयडिया मला पण आवडली....आजूबाजूला हिंडून येऊ... गाडीत बसून कंटाळा आलाय मला पण.. आपल्याला वेळेच बंधन नाहीचे...सो हिंडून येऊ मस्त! वॉट से रोहन?"

"प्रिये, मी तुला कधी नाही म्हणेन का? हाहा..काही दिसताय का पाहु.. तुझ मन भरत नाही तोपर्यंत हिंडू..ओके?"

"प्रिये? हे काय नवीन खूळ रोहन? आणि काय रे,किती चेष्टा करतोस...रुड आहात दोघ... इनसेन्सिटिव....तुम्ही काहीही बोला पण मी आहे अशीच राहणार.... कळल रोहन? आणि माझी चेष्टा बंद करा दोघ..."

"ओके ओके...सॉरी... जय तू पण त्रास नको देऊ पूजाला.... आता खरच नो चेष्टा! तुझी गंमत करायला मजा येते पूजा....आणि तू चिडलीस की कित्ती गोड दिसतेस्... तुझा खोटा खोटा राग बघून मी परत परत प्रेमात पडतो तुझ्या......"

"हो का? आता पुरे करा माझ्याबद्दल बोलण......त्यापेक्षा पक्षी, किडे दिसतायत का ते पहा..."

चेष्टा मस्करी चालूच राहिली..पूजा मी मनसोक्त हिंडून घेतलं...हळू हळू अंधार पडायला लागला...परत आकाशात ढग यायला लागले...कधीही जोरदार पाऊस पडेल अस वाटायला लागल...दिवसभर मनसोक्त हिंडून झाल्यावर पूजा दमली आणि रोहन ला म्हणाली,

"रोहन, दमले मी आता...चांगल हॉटेल शोधू आता..."

“ओके..आम्ही पाहतो चांगल हॉटेल!!”

रोहन आणि जय नी चांगल हॉटेल पाहील आणि 2 रूम घेतल्या...रोहन पूजा ला म्हणाला

"पूजा २ रूम घेतल्या... एका रूम मध्ये आम्ही दोघ झोपु आणि एका रूम मधे तू झोप.... ओके? तू एकटी राहशील ना? काही प्रॉब्लेम नाही ना? रात्री घाबरणार नाहीस ना? " चिंतेच्या सुरात रोहन बोलला..

पूजा नी रूम पहिली.... रूम मस्त होती आणि ती बोलायला लागली..."रूम मस्त आहे रोहन.. आणि मी कश्याला घाबरू? तशीही मी पडल्या पडल्या झोपते सो काही टेन्शन नाही..आता जेवण करून येऊ...मला जाम भूक लागलीये.."

"ओके पूजा..फ्रेश होऊन घे.. मग जेवायला जाऊ...चल जय आपण पण फ्रेश होऊ"

तीघ रात्री जेवण करून आले...बाहेर मुसळधार पाऊस चालू झालेला...भीती वाटावी असा पाऊस पडत होता..

जय म्हणाला.."चलो...मी जातो झोपायला...रोहन तू येतोयस? कि पूजाला कंपनी द्यायला तिच्या रूम मध्ये जातोयस?"

“नाही जात पूजाच्या रूम मध्ये! दमलोय मी पण... खूप झाल ड्रायविंग! मी पण येतो झोपायला..गुड नाइट पूजा...”

“ओके..मी पण झोपते....उद्या आरामात ब्रेकफास्ट करून निघू! गुड नाइट!!”

इतक बोलून पूजा रूम मध्ये गेली..तिनी नाइट ड्रेस चढवला... आणि झोपायला लागली...ती झोपणार तितक्यात आकशात ढगांचा मोठा आवाज झाला..मोठी वीज चमकली आणि रूम मधले लाइट गेले...पूजा घाबरून गेली..तिनी तिचा फोन उचलला आणि रोहन ला फोन लावला...रोहन दुसऱ्या रूम मध्ये झोपायला लागलेला. त्यानी फोन घेतला...

“हेलो रोहन,माझ्या रूम मध्ये येतोस का जरावेळ? “

“का ग? काही प्रोब्लेम?"

"प्रॉब्लेम नाही.. पण एकटीला कसतरीच झाल! नीड युअर कंपनी!"

"ओके... आलो २ मिनटात...”

रोहन लगेचच पूजाच्या रूम मध्ये आला.. पूजा अंधारातच बसली होती. त्यानी लगेचच समोर ठेवलेली मेणबत्ती लावली...

“काय झाल ग? घाबरलीस का? शूर पूजा कशी काय घाबरली? तुला कोणी घाबरवल सांग मला.. आय नीड टू नो...” हसू आवरत रोहन बोलला...

“हो....घाबरले मी! तू हसू नकोस...पण पाऊसाचा आवाज आणि ढगांची गडगड इतकी आहे..त्यात वीज चमकली... आणि घाबरले मी... झोप गेली आणि आता मला झोप लागतच नाहीये...मी उठून पुस्तक वाचणार होते पण नेमके लाइट गेले.. इथे इनव्हर्टर पण नाहीये वाटत! सगळीकडे अंधार झाल आणि मला एकटीला भीती वाटायला लागली....म्हणून तुला फोन केला...तू झोपला होतास का?”

“हाहा...शूर पूजाला पाऊसाच्या आवाजांनी घाबरवल... गुड टू नो...कश्यालातरी घाबरतेस.. हाहा!”

“चेष्टा करणार आहेस का? मग जा तू....तू हक्काचा आहेस..म्हणून तुला बोलावलं ना?" पूजा थोडी चिडली.

“सॉरी.... बोल काय करायचं आता? गप्पा मारू जरा वेळ.."

"थॅंक्यू...तू आल्यावर बर वाटतंय..तुझ असण माझ्यासाठी महत्वाच आहे..." जीवात जीव आल्यावर पूजा बोलली..

"बाय द वे पूजा, मी हक्काचा आहे मग लग्न का नाही करत? किती बघायची मी वाट! आपण किती दिवस असेच नुसते हिंडणार? ह्या नात्याला नाव तर दिल पाहिजे ना? कि नेहमी असंच राहायचं? लग्न न करता?” रोहन थोडा सिरिअस होऊन बोलला..

"काय रे रोहन? आपण ट्रीप ला आलोय.. इथे पण लग्नाचा विषय? आत्ता प्लीज लग्नाबद्दल बोलून त्रास नको देऊस रे...आई बाबा पण नाही बोलणार लग्नाबद्दल अस म्हणतात पण सारखी कटकट करत असतात...आता तू चालू नकोस होऊस...”

“ओके..नाही बोलत लग्नाबद्दल!!! मला आता तुझ्याबरोबर राहायचं आहे ग.. आता नाही राहू शकत तुझ्याशिवाय! म्हणून खर तर हे बोलून गेलो!"

"मी विचार करते आता सिरीअसली! आणि प्लीज हा विषय बंद कर!" नेहमीप्रमाणे विषय टाळत पूजा बोलली

"लवकर कर विचार..आणि एक सांगू? चिडणार नाहीस ना?”

“बोल कि..परवानगी का घेतोयस? आणि नाही चिडत रे...”

“पूजा,मेणबत्तीच्या प्रकाशात तू अजूनच सुंदर दिसती आहेस...आधी कधी मी तुझ हे रूप पाहिलं न्हवत...आत्ता ह्याक्षणी तुला मिठीत घ्यावस वाटतंय...कॅन आय किस यू? ”

“रोहन... काय बोलतो आहेस? आपण आत्ता फक्त गप्पा मारायच्या आहेत. आपला लग्न अजून झाल नाहीये..सो स्टोप बीइंग ‌नॉटी...” पूजा वैतागली आणि चिडून म्हणाली

“कधी करणार ग तू लग्न? किती दिवस वाट पाहू? आपण ३-४ वर्ष एकत्र आहोत..पण तू लग्नाबद्दल बोललं कि ते बोलण टाळतेस.. प्रत्येकवेळी मी विचार करते आणि लवकर लग्न करू हेच सांगतेस!”

“काय बोलतो आहेस रोहन आणि एकटा का चिडला आहेस???” पूजा जरा सावरून बसली

पूजाच बोलण ऐकून रोहन एकदम शांत झाला... त्यानी झालेल्या प्रकाराबद्दल थोडा विचार केला! आपण काहीतरी चुकीच बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आल.. बोलायची वेळही चुकली होती.. हे त्याला कळल.. तो त्याक्षणी पूजाला म्हणाला...

“सॉरी.... मला नाही माहित मी ते का बोलून गेलो! तो एक नाजूक क्षण होता...तेव्हा मी माझ्या भावनांवर कंट्रोल ठेऊ शकलो नाही... तू खूप सुंदर दिसत होतीस... आणि मला तुझ्या जवळ यावस वाटल... वेरी सॉरी! मी तस काही बोलायला पण नको होत... मी तुझा विश्वास अस काही बोलून आणि वागून तोडू शकत नाही... आणि आय नो माय लिमिट्स..अॅड आय वोंट क्रॉस माय लिमिट्स!! मी तुझा किंवा तुझ्या आई बाबांचा माझ्यावरच विश्वास तुटू देणार नाही..”

“थॅंक्यू रोहन.... सो ओन्ली आय लव यू अलॉट!!!! आणि लग्न ना... करू लवकरच!! तू इथेच झोपतोस का रे? तू बाजूला असलास कि मला शांतपणे झोप लागेल...”

“इथे?” रोहन थोडा दचकून बोलला.

“हो..”

“मी इथेच झोपू आणि तुला काही प्रॉब्लेम नाही? आत्ता किस बद्दल बोललो तर किती चिडलीस! आणि आता इथे झोप म्हणती आहेस? तुझ वागण कळतच नाही ग!”

“नो नो... काही प्रॉब्लेम नाही! आय ट्रस्ट यु.. आणि तू जवळ असलास कि मला भीतीही वाटणार नाही... आता लाइट लवकर येतील अस वाटत नाही.... आय नीड टू बी विथ यु! आणि का चिडले माहित नाही!”

“ओके पूजा.. तो विषय बाजूला ठेऊ! तू झोप...मी आहे इथेच!! तुझा हात हातात दे आणि शांत झोप!!”

पूर्ण रात्र रोहन पूजाचा हात हातात घेऊन बसला..आपण हललो कि पूजा ची झोप जायला नको म्हणून तो अवघडलेल्या स्थितीत तसाच बसून राहिला...त्या अवघडलेल्या स्थितीत पहाटे त्याला झोप लागली..

सकाळी पूजाला जाग आली तेव्हा तिच्या लक्षात आल..रात्रभर रोहन तिचा हात घेऊन बसला होता अवघडलेल्या स्थितीत!! आणि तो तसाच झोपून गेला! हे कळल्यावर तिचे डोळे पाणावले...तिच्या डोळ्यातले अश्रू रोहन च्या तोंडावर पडले आणि तो खाडकन जागा झाला..

“काय झाल पूजा..का रडतीयेस? सॉरी..पहाटे माझा डोळा लागला! आणि रात्री माझ्याकडून काही चूक नाही ना झाली?”

“नाही नाही! तू काहीच चुकीच नाही वागलास! डोंट वरी! आणि तू वेडा आहेस रे रोहन..पूर्ण रात्र माझ्या जवळ अवघडलेल्या स्थितीत बसला होतास? आणि तसाच झोपलास? तू आडवा का नाही झालास?”

“पूजा तू इतकी शांत झोपली होतीस..हलून मला तुझी झोप घालवायची न्हवती...तसही मला जागरणाची सवय आहे..आणि काल रात्री साठी सॉरी आणि..भावनेच्या भरात मी काहीतरी बोलून गेलो..वेरी सॉंरी! बाकी तुझी झोप झाली ना नीट?”

“आय लव यू रोहन...आणि थॅंक्यू...” इतक बोलून तीनी रोहन ला घट्ट मिठी मारली..तीच हे रूप पाहून रोहन आवक झाला..

“लव यु टू पूजा...आता आमच्या रूम मध्ये जातो.. आणि आवरतो! जय उठला असेल! तो काय म्हणतोय बघू...”

“ओके..मी पण फ्रेश होते...आणि आपण ब्रेकफास्ट करून लगेचच निघू परत जायला.....”

“लगेच जायचं पूजा? का? हिंडू कि इथे थोड..अजून बरच काय काय पाहायला मिळेल......”

“नको आता आधी घर गाठायचं आणि आई बाबांना मी लग्नासाठी तयार आहे हे सांगायचय.. मला आता लवकरात लवकर लग्न करायचं तुझ्याशी.. तुला खूप दिवस थांबवून ठेवलं ना.. पण आता नाही... आता मला तुझ्याबरोबर राहायचय!”

“काय झाल एकदम? तुझा विचार एका झटक्यात कसा बदलला? कालच तू मला किती झापल होतस.. आणि आता हे? सगळ ठीक आहे ना? ”

“असच मला लग्न करायची हुक्की आलीये..तुला नाही करायचं का लग्न? नको असेल तर स्पष्ट सांग..” पूजा थोड चिडून रोहन ला म्हणाली...

रोहन तिच बोलण ऐकत होता! त्यानी क्षणाचाही विलंब न लावता पूजाच्या नकळत पूजाच्या बाबांना फोन लावला.. आणि फोन स्पीकर वर ठेवला...

"नाही नाही! मला लग्न करायचच आहे! आणि तू नक्की बोलती आहेस ना? बदलू नकोस तुझा विचार.." रोहन हसू आवारात म्हणाला

“नक्की...आता माझा निर्णय पक्का झालाय!! मला काल जाणवलं,तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस..मी खूप विचार केला...आता मला माझी सकाळ तुझ्याबरोबर चालू करायचीये आणि रात्र तुझ्याबरोबर संपवायची आहे.....लग्न करायला मी खूप दिवस वाट पाहायला लावली तुला...पण आता नाही!! आता लवकरात लवकर लग्न...”

पूजा हे वाक्य बोलली आणि तेव्हाच पूजा चे आई बाबा...रोहन चे आई बाबा, जय एकदम समोर आले....

"सरप्राईज ...."

पूजा नी सगळ्यांना पाहिलं आणि तिला धक्काच बसला!

"हे काय? तुम्ही सगळे इथे कधी आलात?"

"काल रात्री उशिरा! आम्हाला वाटत होत, ह्या ट्रीप मध्ये तू तुझा विचार बदलणार....आणि लग्नाला तयार होणार...म्हणून आम्ही म्हणजे आम्ही दोघ,रोहन, त्याचे आई बाबा आणि जय नी ही ट्रीप मुद्दामच हि घडवून आणली... तुम्ही काय काय करताय हे आम्हाला रोहन सांगत होताच! आम्ही रोहन शी बोलतच होतो... त्यानी सांगितलं तुम्ही कुठे राहताय.. मग आम्ही तडक घरातून निघालो.. काल रात्री उशिरा इथे आलो.. रोहन नी रूम बुक करून ठेवल्या होत्याच... रोहन खूप स्मार्ट आहे!" पूजाचे बाबा हसत म्हणाले...

"ओह माय गॉड! आई बाबा... काका काकू तुम्ही सगळ्यांनी हा प्लॅन केलेला?? रोहन तू आणि जय तू पण सामील होतास? हाहा! मला ह्या प्लॅन चा काही पत्ताच लागला नाही..हाहा! मला आत्ता लक्षात येतंय..आपण निघतांना बाबा तुझ्याकडेकडे बघून का हसले होते रोहन.....आणि न ठरवता केलेली ट्रीप न्हवती हि... रोहन नी बरोबर डेस्टीनेशन ला आणून सोडलं मला.... पण मला काहीच पत्ता कसा लागला नाही? म्हणजे मी असा विचार केलाच न्हवता कि मी लग्न कराव म्हणून तुम्ही अशी काही आयडिया काढाल! तुम्ही सगळ्यांनी मला गंडवल..पण झाल ते चांगल झाल! शेवट गोड तर सगळाच गोड...." पूजाच्या हसत बोलली...

पूजाच बोलण ऐकून बाबा म्हणाले “सॉंरी पूजा..पण तू लग्न करायचं सारख पुढे पुढे ढकलत होतीस...तुला रोहन तुझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहे ह्याची जाणीव करून द्यायची गरज होती.. आणि लग्न किती महत्वाच आहे, तुम्ही दोघ एकत्र राहाण किती महत्वाच आहे हे कळाव म्हणून हा सगळा खटाटोप होता.. "

"स्मार्ट विचार केलात.. मला तुमची हि आयडिया कळणं अशक्यच होत!"

"हाहा.. पण आता निर्णय पक्का आहे ना?"

"होय हो बाबा.."

"चला... फायनली पूजा लग्नाला हो म्हणली! पण तुझा विचार कधीही बदलु शकतो.. आणि कांट टेक रिस्क... आम्ही ह्याची सुद्धा काळजी घेतलीये! ह्याच हॉटेल मधे हॉल बुक केलाय... तू आवर आणि ये...तुझे कपडे आई नी आणले आहेत...अंगठ्या रोहन नी आधीच घेतल्या होत्या!”

"आई आणि बाबा,मला रोहन ला नीट समजून घ्यायचाय होत म्हणून मी थांबले होते..तुम्हाला माहिती आहे,मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप करायला आवडत नाही....आता माझी पूर्ण खात्री आहे, रोहन माझ्यासाठी बेस्ट नवरा आहे.. आणि सगळी तयारी आधीच केलीयेत? पण नेहमीप्रमाणे मला लग्न करावस वाटल नसत तर? हवेत केलेत सगळे प्लॅन्स! आणि हे टू मच केल तुम्ही सगळ्यांनी......माझ्याकडे शब्द नाहीयेत आता बोलायला....मी आले आवरून मग होऊन जाऊ दे आमच शुभ मंगल सावधान...."

“ह्यावेळी नाही तर परत कधीतरी तू तयार झाली असतीस.. आणि तुझा होकार ह्यावेळी पण आला नसता तरी आमची ट्रीप तर झाली असतीच! हाहा! पण ह्यावेळी रोहनला आणि मला सुद्धा वाटत होत तू लग्नाला होकार देणार!”

रोहन हसत म्हणाला,"प्रयत्न करत राहायचे..कधीतरी यश मिळतच!!! आणि काय पूजा...कस वाटल तुला आमच सरप्राईज ??"

"सरप्राईज ?? खर सांगू??.."

"हो सांग.. "

"एकदम झकास...आत्तापर्यंतच सगळ्यात सुंदर सरप्राईज होत..तू हॅपी आहेस ना रोहन?" पूजाच्या चेहऱ्यावर आनंद बोलायला लागला...

रोहन पूजाच्या कानात म्हणाला... “येस येस..आय अॅम वेरी हॅपी!! आणि पूजा काल रात्री जे झाल ते आमच्या प्लॅन मध्ये न्हवत... आम्हाला वाटल होत माझ्याबरोबर इतका वेळ एकत्र राहिलीस कि तुला कळेल आता लग्न केल पाहिजे... तू अशी अचानक मला तुझ्या खोलीत बोलावशील हे माहीतच न्हवत मला... तू मला तुझ्या खोलीत बोलवलं आणि पुढचा गोंधळ झाल... म्हणजे पाऊसाला धन्यवाद दिले पाहिजेत! तुला निसर्ग आवडतो ना.. बघ, त्या निसर्गानीच तुला जाणीव करून दिली कि लग्न केल पाहिजे! हाहा.. काल झालेलं अनपेक्षित होत! तुला मेणबत्तीच्या उजेडात मी पाहिलं आणि माझा मनावरचा ताबा सुटला.... आणि मी चुकून नको बोलायला ते बोलून गेलो...ते मी भावनेच्या भरात म्हणालो होतो... तू खरच खूप सुंदर दिसत होतीस आणि मी स्वत:ला थांबवू शकलो नाही!! ते प्लॅन मध्ये न्हवत! ते अनवधानानी बोललं गेल माझ्याकडून!! आय लव यू पूजा!! नाऊ कॅन आय किस यू?”

“हो हो! किती बोलशील आता? मी होकार दिलाय लग्नाला! आणि किस? थांब थांब,अजून थोडीशी कळ काढ....” मिश्कीलपणे पूजा म्हणाली... “काल रात्री जे झाल आणि आज सकाळी माझी झोप जाऊ नये म्हणून तू अवघडलेल्या स्थितीत बसून राहिला होतास त्यामुळेच तर मला कळल,तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस!!!! नाहीतर मी अजूनही लग्न पुढे ढकलत राहिले असते! जे झाल ते चांगल्यासाठीच! आय लव यु टू रोहन!! आता फायनली मी लग्नाच्या बेडीत अडकणार आणि तुला सुद्धा अडकवणार!! आता माझ्या बेडीतून तुझी सुटका नाही बर का... हाहा!” पूजा रोहन च्या कानात म्हणाली.

"मी किती दिवस ह्या क्षणाची वाट पाहत होतो पूजा... थॅंक्यू सो मच पूजा!!!" हे बोलून रोहन नी पूजा ला घट्ट मिठी मारली...

“दोघ काय बोलताय एकांतात?? आम्हाला पण कळू देत कि...” अस म्हणून सगळे जोरजोरात हसायला लागले...आणि हास्यकल्लोळ चालू झाला....

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED