श्रद्धा आणी अंधश्रद्धा ..
विषय इतका गहन आहे की कीती लिहावे आणी काय लिहावे याला मर्यादा च नाहीये
तसे तर डोळस पणे ठेवली जाते ती श्रद्धा आणी काही विचार ना कर्ता ठेवली जाते ती अंधश्रद्धा असे म्हणले जाते||
पण मानवी मनाचा विचार केला तर इतकी सोपी व्याख्या पण खुप अवघड होवून जाते .
देवावर विश्वास ठेवणे ही श्रद्धा खुपदा टिकेला पात्र ठरते
कारण देवाला कुणीच कधी पाहिलेले नाही त्यामुळे तो आहे का नाही ही शंका बऱ्याच वेळा निघते .
आणी जे नाहीये त्याचे भजन पुजन त्याच्या कडे काही मागणे याला काहीच अर्थ नाही असे” नास्तिक” लोक म्हणतात
यावर जरी देव दिसत नसला तरी त्याच्या मुळेच ह्या संसाराचे नियंत्रण होते आहे
त्यामुळे त्याची भक्ती व पुजा करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे असे “आस्तिक “ लोक म्हणतात
माझ्या मैत्रिणी कडे एका कोनाड्यात देवघर असे
मैत्रीण रोज बाहेर पडताना देवाला नमस्कार करून बाहेर पडत असे
तसे केले म्हणजे दिवस चांगला जातो अशी तिच्या मनाची धारणा होती
मध्यंतरी हे देवघर कोनाड्यातून काढुन तिच्या घरच्या लोकांनी स्वयपाक घराच्या जवळील खोलीत हलवले
मैत्रिणीला हे माहीत नव्हते ती रोजच्या शिरस्त्या प्रमाणे
कोनाड्यात नमस्कार करून बाहेर पडत होती
एके दिवशी तिच्या आईच्या हे लक्षात आले आणी मग तीने विचारले की देवघर
तर हलवले आहे मग तु कोनाड्यात कोणाला नमस्कार करतेस्
मैत्रिणीला यावर काही बोलायला सुचले नाही
अशाच एका मैत्रिणीची श्रद्धा होती की तिच्या कडे असलेला हिरवा स्कर्ट घातला की तीला पेपर खुप सोप्पे जातात
त्यामुळे ती परीक्षेच्या काळात फक्त तो आणी तोच स्कर्ट घालत असे!!!
घरचे लोक कीती जरी रागावले तरी तो स्कर्ट ती त्या काळात बिलकुल धुवत नसे तिची आई या गोष्टीबद्दल तिच्यावर खुप नाराज असे
एकदा आईने मुद्दाम च सकाळी तिचा स्कर्ट धुवून वाळत घातला
पेपर ची वेळ झाल्यावर कपडे बदलण्या साठी मैत्रीण स्कर्ट शोधू लागली
तीला तो सापडेना ..आणी समजले की आईने तो धुतला आहे
तीने घर डोक्यावर घेतले रडून रडून पण पेपर ची वेळ झाल्यावर तीला दुसरा स्कर्ट घालून जावेच लागले
आणी तीला तो पेपर खुप अवघड गेला त्याचा राग तीने आईवर काढला !!
पण खरे तर तीने अभ्यास च केला नव्हता म्हणुन असे घडले होते
आणी गंमत म्हणजे या पेपर ला ती चक्क बऱ्या मार्कांनी पास पण झाली ..
आता काय म्हणणार या अंधश्रद्धेला ?
माझ्या आईची पण एक गमतीदार समजूत होती अंधश्रद्धा च म्हणा ना ....
तीला वाटायचे प्रत्येक नव्या साडीची घडी मी मोडली म्हणजे तीला आणखी जास्त साड्या मिळतात
खरे तर या गोष्टीला तसा काही अर्थ नव्हता
पण तिच्या प्रत्येक नव्या साडीची घडी मीच मोडावी या साठी ती खुप आग्रही असायची
अगदी तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी सुद्धा तिच्या नव्या साडीची घडी मी मोडली आहे .
माझे एक ख्रिश्चन मित्र आहेत गेली कित्येक वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतो प्रार्थना या गोष्टीवर त्यांचा खुप विश्वास आहे
तसा प्रार्थने वर माझा पण विश्वास आहे
मना पासून केलेल्या प्रार्थने ला नक्की यश येते
प्रार्थनेत खुप शक्ती असते हे मी पण मानते
आयुष्यात काही प्रोब्लेम तर येत असतात
त्यातून काही ना काही मार्ग पण निघत असतो ..
पण माझ्या प्रत्येक प्रोब्लेम च्या वेळी ते स्वतः प्रार्थना करतात
आणी त्यांची अशी “ठामपणे समजून असते की त्यांनी येशू कडे केलेल्या प्रार्थने मुळे च माझा प्रश्न सुटला
अर्थात मी पण या त्यांच्या समजुतीला तडा जाऊ देत नाही
कारण शेवटी भावना महत्वाच्या ..त्यांच्या भावना दुखावणे मला शक्य होत नाही
त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत पण खुप वेगळी असते बर का
ते जेव्हा माझ्या साठी प्रार्थना करणार असतात तेव्हा
मी स्वत त्यांना फोन करायचा ..
आणी त्यांना विनंती करायची की माझ्यासाठी प्रार्थना करा
मगच ते ती सर्व प्रार्थना मला ऐकवतात आणी मग “आमेन “असे म्हणुन त्याची समाप्ती होत असते
ही प्रार्थना आपण जशी करतो तशीच असते पण त्यात दोन महत्वाच्या गोष्टी असतात
एक म्हणजे या प्रार्थनेतून मी जर माझ्या लायकी पेक्षा जास्त काही मागितले असेल तर मला क्षमा कर
आणी जर या प्रार्थनेत काही त्रुटी असेल तर ती पुर्ण कर
ही सर्व प्रार्थना मी मनापासून ऐकल्या मुळेचा सारे प्रश्न सुटतात ही त्यांची अंधश्रद्धा पण मला खुप आवडते !!
मध्यंतरी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्या साठी बिल पण मांडले गेले आहे
मात्र ही अंधश्रद्धा बुवाबाजी मंत्र तंत्र काळा जादू वगैरेच्या विरोधात आहे
एखादी व्यक्ती आजारी पडली असता तिच्या आजारपणाचे मूळ शोधून त्यावर डॉक्टरी इलाज करणे हे महत्वाचे असते
त्या ऐवजी एखाद्या बुवा .अथवा साधू कडे जाऊन त्यावर उपाय विचारणे
मानसिक अथवा शारीरिक रोगासाठी त्याच्या कडून गंडे दोरे अथवा ताईत घेणे
रोग बरा व्हावा म्हणुन कोंबडी बकरे याचा बळी देणे याने काहीच साध्य होत नसते
कारण हे बुवा लोक भोंदू असतात
लोकाकाकडून फक्त पैसे उकळणे हाच यांचा धंदा असतो
आणी एकदा का तुम्ही त्यांच्या तावडीत सापडला की मग सुटका नसते
खरा इलाज राहिला दुर चा ..पैसा मात्र पाण्या सारखा खर्च होतो
मानसिक रुग्णाचे तर या बुवा लोका कडून फार हाल केले जातात
कारण मानसिक रोग्याला होणारे भास किंवा त्याची होणारी चलबिचल
ही केवळ त्याच्या अंगी असलेल्या भूता मुळेच होत आहे असे समजून
त्याच्या अंगातल्या भूताला बाहेर काढण्या साठी त्याला झोडपणे ,उलटे टांगणे
मिर्च्याची धुरी देणे असले भयानक प्रकार केले जातात
खरे तर या जगात भूत वगैरे काही अस्तित्वात नाही .
पण भुताटकी आहे हीच एक अंधश्रद्धा आहे
आणी या बुवा लोकाच्या नादी लागून लोक पण त्यावर विश्वास ठेवतात
या अंधश्रद्धेचे मात्र तत्काल निर्मुलन होणे जरुरी आहे
म्हणजे इतकेच की श्रद्धेच्या बाबतीत पण”अंधश्रद्धा “ टाळता आली पाहिजे !!