प्रारब्ध ..भाग १ आज सकाळी सकाळीच किसनरावांचे आणि सखुबाई चे घर सजलेले होते . संपूर्ण परिसर झाडलेला ,दारात शेणसडा टाकून रंगीत रांगोळी घातलेली . अंगणात एका बाजूस असलेल्या तुळशीची पूजा करून तिच्यापुढे उदबत्ती लावली होती . एका कोपर्यात एका लहान टेबलवर तांब्या आणि दोन चार भांडी ठेवली होती . टेबलाजवळ घरातल्या दोन चार प्लास्टिक खुर्च्या ठेवल्या होत्या,शेजारीच दोन सतरंज्या घातल्या होत्या . जवळच एका पिशवीत हार ,फुले इतर साहित्य होते . नुकतेच गावातले सनईवाले येऊन दाखल झाले होते . कार्यक्रम घरगुती होता पण ५० /१०० उंबरा असलेल्या त्या लहान गावात प्रत्येक जण एकमेकाच्या जवळचा होता त्यामुळे कार्यक्रमाला न बोलावता

Full Novel

1

प्रारब्ध भाग १

प्रारब्ध ..भाग १ आज सकाळी सकाळीच किसनरावांचे आणि सखुबाई चे घर सजलेले होते . संपूर्ण परिसर झाडलेला शेणसडा टाकून रंगीत रांगोळी घातलेली . अंगणात एका बाजूस असलेल्या तुळशीची पूजा करून तिच्यापुढे उदबत्ती लावली होती . एका कोपर्यात एका लहान टेबलवर तांब्या आणि दोन चार भांडी ठेवली होती . टेबलाजवळ घरातल्या दोन चार प्लास्टिक खुर्च्या ठेवल्या होत्या,शेजारीच दोन सतरंज्या घातल्या होत्या . जवळच एका पिशवीत हार ,फुले इतर साहित्य होते . नुकतेच गावातले सनईवाले येऊन दाखल झाले होते . कार्यक्रम घरगुती होता पण ५० /१०० उंबरा असलेल्या त्या लहान गावात प्रत्येक जण एकमेकाच्या जवळचा होता त्यामुळे कार्यक्रमाला न बोलावता ...अजून वाचा

2

प्रारब्ध भाग २

प्रारब्ध ..भाग २ मामाने स्टूलवर उभे राहून दाराला तोरण लावुन घेतले . मग मुहूर्तमेढ रोवली ,सगळ्या सुवासिनींनी तिची पूजा . लग्न इतक्या तातडीने ठरलेआणि मुहूर्त पण दोन दिवसात लगेच होता त्यामुळे मुहूर्तमेढ आणि साखरपुडा एकदमच होते सुमनने सुद्धा हळदी कुंकू वाहिले आणि नमस्कार केला “आता सर्व्या आया बायास्नी बी नमस्कार कर ग सुमे . मामीला होकार देऊन तिने आधी मामा आणि सगळ्या मोठ्या पुरुष माणसांना अगदी वाकुन नमस्कार केला मग मामीला आणि आलेल्या शेजारच्या बायकांना पण नमस्कार केला . तोवर शेजारच्या तीन चार आज्ज्या पण जमा झाल्या होत्या त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी पण तिची अलाबला घेतली “बायो सुमी तर ...अजून वाचा

3

प्रारब्ध भाग ३

प्रारब्ध भाग ३ यानंतर आलेले सर्व लोक नवरा नवरीला भेटायला येऊन त्यांना आहेर ,शुभेच्छा देऊ लागले . परेशचे मित्र,गावातल्या मैत्रिणी ,मिनू ही सगळी दोघांची मस्करी करू लागली. आलेल्या लोकांच्या एकमेकात गप्पा गोष्टी ,हास्यविनोद सुरु झाले . इकडे जेवणाची पण गडबड सुरु झाली . शेजारीच असलेल्या सोसायटीच्या हॉलमध्ये जेवायला टेबल खुर्च्या लावल्या होत्या . तालुक्याच्या गावातुन नेहेमीचे आचारी आले होते . गावातले दीडएकशे लोक जेवायला होते . शिवाय परेशच्या गावातले पण पन्नासभर लोक बोलावले होतेच . लोकांच्या पंगती बसु लागल्या . जिलेबी,मठ्ठा,मसालेभात हा बेत होता सोबत भजी ,पुऱ्या, कुर्मा असे पदार्थ होते . परेशच्या मामा मामींनी लग्नाचा अगदी थाटमाट केला ...अजून वाचा

4

प्रारब्ध भाग ४

सासु सासऱ्यांचा प्रेमळ निरोप घेऊन व त्यांचा आशीर्वाद घेऊन सुमन आणि परेश आपल्या सर्व सामानासहीत निघाले . सुमनला सासुचा खुप चांगला वाटला .. अगदी आपल्या मुलीसारखे ती सुमनला वागवत होती . निरोप देताना परेशला पण त्यांनी बजावून सांगितले होते की सुमनला जप,तिला त्रास होऊ देऊ नको . परेशने पण त्यांना तसा “शब्द” दिला होता . त्यामुळे सुमन सुखावली होती .. त्या गावातून तालुक्याला बस होती . आणि तिथून मुंबईची गाडी पकडायची होती . इथे आरक्षण वगैरे प्रकार नव्हता . बस इथुन जिल्ह्याच्या गावाला पोचल्यावर पुर्ण भरून जात असे . या दोघांना मात्र छान जागा मिळाली . परेशने सर्व सामान ...अजून वाचा

5

प्रारब्ध भाग ५

बस पुण्यात पोचली तेव्हा परेशने सुमनला जागे केले . ती दचकून उठली ..”अग दचकु नकोस अशी ,उठ पुणे जेवायचे आहे न ? भुक लागली की नाही ..? सुमनने स्वतःला सावरून साडी नीट केली आणि केसावरून हात फिरवून आपली लांब वेणी पुढे ओढुन घेतली आणि उठून उभी राहिली . मग दोघे मिळून बसमधून खाली उतरले. ते एक बऱ्यापैकी हॉटेल होते इथे अर्धा तास जेवण करण्यासाठी बस थांबणार होती . टेबल वर बसल्यावर वेटरला परेशने जेवणाची थाळी सांगितली ,सुमनला विचारल्यावर ती डोसा खाते म्हणाली तिच्यासाठी परेशने पेपर डोसा सांगितला . सुमनने हॉटेल असे पहिल्यांदा पाहिले होते ,तिला ते खुप छान वाटले ...अजून वाचा

6

प्रारब्ध भाग ६

आतल्या खोलीत गेल्यावर सुमनला दिसले की इथे पण खुप छान फर्निचर होते. एक डायनिंग टेबल , टेबलाशेजारी एक छोटी सेटी होती बसण्यासाठी . चमकता फ्रीज ,ग्यास शेगडी ,किचन कट्ट्यावर छान काचेची कपाटे होती . पण सध्या मात्र ती रिकामीच दिसत होती . जवळच एक मोठे कपाट दिसत होते कपड्याचे . दरवाज्याबाहेर बाल्कनी दिसत होती . सुमन बाल्कनीत जाऊन आली . बाल्कनीत एक टेबल ,पुस्तके ठेवलेले छोटे कपाट व एक छोटा बेड पण होता . सुमन म्हणाली ,”स्मिता ताई मी करू का चहा ?’ स्मिता हसली ,“उद्यापासुन तुझ्याच ताब्यात आहे किचन ... आणि मला ताई वगैरे नको स्मिता म्हण फक्त ...अजून वाचा

7

प्रारब्ध भाग ७

प्रारब्ध भाग ७ रात्री खुप उशिरा झोपून सुद्धा ... सकाळी नेहेमीप्रमाणे साडेपाच वाजता परेशला जाग आली . रोजच्या रुटीनमध्ये रोज सकाळी आठ वाजता बाहेर पडायला लागत असे . घरापासून दोन तास लोकल प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी पोचायचे असे . पुर्वी तो घराजवळच असलेल्या कंपनीत होता . पण जेव्हा प्रमोशन मिळाले तेव्हा त्याची कंपनीच्या दुसऱ्या युनिटला बदली झाली होती . जाग आल्यावर त्याने शेजारी पाहिले तर सुमन गाढ झोपेत होती . तिचे लांब मुलायम केस तिच्या अंगावर आणि उशीभर पसरले होते . तिच्या लांब लांब पापण्या झोपेत तिच्या गालावर विसावल्या होत्या . तिचा गोरापान बांधेसूद देह ,गुलाबी रसदार ओठ .. ...अजून वाचा

8

प्रारब्ध भाग ८

प्रारब्ध भाग ८ सकाळी नेहेमीप्रमाणे जाग येताच परेशने शेजारी पाहिले . सुमन गाढ झोपेत होती ..त्याने कूस बदलुन तिच्याकडे केले काल रात्रीची आठवण येऊन परेश सुखावला . त्याच्या हालचालीने अचानक सुमनला जाग आली . आपल्याकडे परेश बघत आहे असे दिसल्यावर ती एकदम सावध झाली . “किती वाजले हो ..आज जायचे आहे न कामावर तुम्हाला .. असे म्हणत ती लगबगीने उठू लागली . तोपर्यंत परेशने तीच हात धरून तिला परत आपल्या कुशीत ओढले . “जाईन ग मी... कशाला इतकी गडबड करतेस .. पुन्हा पाच दहा मिनिटे प्रणय चालू राहिला . मग मात्र दोघेही उठले आणि तयारीला लागले . सुमनने ब्रश ...अजून वाचा

9

प्रारब्ध भाग ९

प्रारब्ध भाग ९ नंतर चार पाच दिवस असेच गेले . सुमन रोज दुपारी स्मिताकडे जात असे . दोघींचे खुप जमत असे . शिवाय स्मितामुळे सुमनला मुंबईची माहिती मिळत होती . जवळपासची सगळी दुकाने देवळे ही पण स्मिताने तिला चांगली परिचित करून दिली . एके दिवशी स्मितासोबत ती लोकल मधील महिलांच्या डब्यातून तिच्या मैत्रिणीकडे जाऊन आली . लोकलचा प्रवास तिच्यासाठी एक थ्रील ठरला . त्या दिवशी शनिवार होता . स्मिता आज काही कामासाठी बाहेर गेली होती . त्यामुळे सुमन घरीच होती . दुपारी जेवण झाल्यावर ती टीव्ही पहात लोळत होती आणि बेल वाजली . आत्ता कोण आले असेल असा विचार ...अजून वाचा

10

प्रारब्ध भाग १०

सकाळी जाग आल्यावर सुमनने मोबाईल पाहिला तर आठ वाजले होते . तिने उठून दुध तापत ठेवले आणि परेशला जागे लागली . रात्री उशिरा झोपल्याने परेश जागा व्हायला तयार नव्हता . “ये ग तु पण झोपायला परत असे म्हणून तिला खेचू लागला . पण सुमनने त्याचे काही एक ऐकले नाही . त्याला उठवून त्याच्या हातात ब्रश दिला आणि बाथरूममध्य ढकलले . आज मुंबई फिरायला जायची तिला गडबड झाली होती . त्यांचे आवरत आले तोपर्यंत संतोष आणि स्मिता येत असल्याचा फोन आला . सुमनने नाश्ता तयार ठेवला होता ..कांदेपोहे चहा आणि खारी . आज आणखी एका नव्या फ्रॉकचे ओपनिंग केले होते ...अजून वाचा

11

प्रारब्ध भाग ११

प्रारब्ध भाग ११ सकाळी नाश्ता करताना परेश सुमनला म्हणाला .. “सुमन तु का नाही गेलीस स्मिता सोबत पार्लर कोर्सला तुला नवीन काहीतरी शिकायला मिळाले असते ,आणि तुझा वेळही चांगला गेला असता .” “छे मला नाही तसले काही शिकायचे ..मला नाही आवडत आणि तसला कोर्स करून मला कुठे काम करायला पार्लरला जायचेय .. मी तर फक्त कस्टमर म्हणुन जाईन तिथे ...” अचानक बाहेरच्या खोलीत निघुन जात सुमनने विषय संपवला .. परेशला तिच्या या तुटकपणे बोलण्याचे नवल वाटले . पुढील आठवड्यात सुमन घरीच होती . आता स्मिता नव्हती त्यामुळे आपल्या घरीच टीव्ही पाहणे क्रमप्राप्त होते . खरेतर तिला त्या लहान टीव्हीवर ...अजून वाचा

12

प्रारब्ध भाग १२

प्रारब्ध भाग १२ यानंतर काही दिवस चांगले गेले . सुमन आता मुंबईच्या आयुष्याला सरावली होती . ती खुष असल्यावर सुद्धा बरे वाटत असे . किती झाले तरी त्याचे प्रेम होते तिच्यावर.. एके दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेव्हा सुमन खुप खुशीत होती . “कपडे बदलुन जेवायला बसल्यावर त्याने विचारले “काय ग आज खुशीत दिसते .. “ हो आज मामांचा फोन आला होता. सोसायटीच्या सेक्रेटरीचे काही काम आहे मुंबईला त्यांच्यासोबत मामा उद्या येत आहेत . आपल्याकडेच येणार आहेत मुक्कामाला मला म्हणत होते माहेरपणाला चल ,लग्न झाल्यापासुन आलीच नाहीस तु गावी . “वा छान झाले मामा येत आहेत ते ,आणि तु ...अजून वाचा

13

प्रारब्ध भाग १३

प्रारब्ध भाग १३ रोज रात्री न चुकता परेशचा व्हिडीओ कॉल येत असे . तिचा तो मोठा नवीन रंगीत फोन व्हिडीओ कॉल बघुन मामा मामी आणि मुलांना सुद्धा गंमत वाटत असे . परेश त्यांच्या सोबत पण बोलत असे . किती मनमिळावु आणि समजूतदार जावई आहे असे वाटे त्यांना . चार दिवस झाल्यावर सुमनची सासरी जायची वेळ झाली . आता दोन तीन दिवस ती तिकडे राहणार होती मग परेश आला की त्याच्या सोबत परत जायची होती . फक्त शेवटच्या दिवशी दोघांना जेवायला बोलावले होते मामांनी इथूनच ते बस मध्ये बसणार होते . सुमनला सासरी सोडायला मामा स्वतः गेले होते . गेल्यावर ...अजून वाचा

14

प्रारब्ध भाग १४

प्रारब्ध भाग १४ रोज ती त्या सोसायटीकडे पाहता पाहता मनाने त्या आयुष्याची स्वप्ने पाहु लागली . कोण किती वाजता जाते ,कोण कधी बाहेरून येते हे आता तिला समजु लागले . आता दिवसाचा बराच वेळ तिचा बाल्कनी मध्ये जाऊ लागला . दुपारचे जेवण तिथेच असे ,संध्याकाळी मात्र परेश आल्यावरच ती आत येत असे .. नंतर पण सतत तिच्या डोक्यात तिकडचेच विचार असत. एके दिवशी अशीच सकाळी ती बाल्कनीत उभी असताना एका तरुणीने तिला हाताने इशारा केला . आधी तिला समजेना ही कोणाला इशारा करते आहे . पण तिचा रोख आपल्याकडेच आहे असे समजल्यावर तिने पण हसून हात हलवला . ती ...अजून वाचा

15

प्रारब्ध भाग १५

प्रारब्ध भाग १५ “अहो थांबा, थांबा एकटे कुठे चालला ..मी आहे न सोबत तुमच्या .. असे सुमनचे बोलणे ऐकताच गडबडीने थांबला . “कशी वाटली माझी मैत्रीण ..आहे न छान ..? असे विचारताच परेश फक्त हो म्हणाला . त्याच्या मनात बरेच काही विचार येत होते पण तो काहीच बोलला नाही . मग त्या रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त मायाचाच विषय होता . ती आनंदात असल्याने परेशची रात्र मात्र छान गेली . सोमवार पासुन परत परेशचे रूटीन सुरु झाले . आता एक दोन आठवडे तो खुप गडबडीत होता ,कारण मुंबईतल्या सगळ्या युनिटसना इन्स्पेक्शन साठी त्याला भेट द्यायची होती . आता ...अजून वाचा

16

प्रारब्ध भाग १६

प्रारब्ध भाग १६ पैसे हातात मिळाल्यावर सुमन निदान तेवढ्यापुरती तरी खुष झाली . आता आठ दहा दिवस तरी बरे ..पुढचे पुढे . रोज दुपारी माया तिच्या मावशीकडून परत आली की दोघींचे भेटणे सुरु झाले . कधी मायाच्या अपार्टमेंट मध्ये तर कधी बाहेर मॉल किंवा हॉटेलला .. सुमन बऱ्याच वेळेस पैसे खर्च करायचा प्रयत्न करायची पण माया नकार देत असे . तिला माहित होते सुमनची असे पैसे खर्च करायची ऐपत नाहीय . तरीही एकदोन वेळा तिच्या फार आग्रहामुळे मायाने तिला पैसे खर्चायची परवानगी दिली . एकदोन वेळा हॉटेलचे बिल आणि काही वस्तूंवर पैसे खर्च केल्यावर सुमनकडचे पाच हजार रुपये मात्र ...अजून वाचा

17

प्रारब्ध भाग १७

प्रारब्ध भाग १७ या पत्त्याच्या खेळाला “रमी” असे म्हणतात . आणि त्यासाठी लावायला प्रथम हजार ,पाचशे पुरे असतात. तुला खेळुन पैसे कमवायचे असतील तर सांग . हजार पाचशे हवे असतील लावायला तर मी देईन तुला. हे बघ शेवटी तो “नशिबाचा” खेळ आहे ..बघायचे आजमावून .. मी स्वतः रमी मध्ये भरपूर पैसे कधी हरले आहे तर कधी जिंकले पण आहे .. त्यातून तुला माझे हे बोलणे पटत नसेल तर राहू दे ..” असे मायाने म्हणताच सुमन म्हणाली .. “अग रागावू नकोस अशी ..बरोबर आहे तुझे बोलणे ...पटले मला .. तु म्हणतेस ते अगदी योग्य वाटते मला पैसे हे पैसेच असतात ...अजून वाचा

18

प्रारब्ध भाग १८

प्रारब्ध भाग १८ परेश थोडा साशंक झाला ...त्याने जास्त काही विचारू नये म्हणून सुमन म्हणाली “एवढा काय विचार करताय काय खाणार आहे का आपले दागिने .? विश्वास नाही का माझ्या माहेरच्या लोकांवर तुमचा ..? तिचे डोळे मोठे करीत कांगावा करणारे आणि रागावलेले बोलणे ऐकुन परेश थोडा बिचकला. समजुतीच्या सुरात तो म्हणाला ,”तसे माझे म्हणणे नाही ग ..फक्त एकदा दागिने त्यांनी नीट ठेवले आहेत ना हे विचारून घे .. आता पुढल्या महिन्यात दिवाळीला आपण जाणार आहोतच गावाकडे . त्या वेळेस तुला घालायला पण होतील आणि येताना घेऊन येऊ आपण .” “हे बघा तुम्हाला तसा काही संशय वाटत असेल तर स्पष्ट ...अजून वाचा

19

प्रारब्ध भाग १९

प्रारब्ध भाग १९ काही दिवसातच सुमनला ते काम सरावाचे होऊ लागले . तिचे कस्टमर पण वाढायला लागले ,रोज तीन तरी कस्टमर होत असत. त्यांच्याशी वागायची “खुबी” तिला चांगली जमू लागली . तिला आता जास्त “मागणी” येऊ लागली आणि “रेट” पण जास्त मिळु लागला . मावशी पण तिच्यावर चांगल्याच खुष होत्या हल्ली तिची रोज पाच सात हजार कमाई होत असे . अशी कमाई होऊ लागली तर लाख रुपये लवकरच जमतील असा तिला विश्वास होता . मिळालेले तिने ते पैसे कपाटात वेगळ्या पर्समध्ये साठवायला सुरवात केली . दागिने ठेवताना आलेले दहा हजार तिने आधीच बाजूला ठेवले होते. पूर्ण पैसे साठले की ...अजून वाचा

20

प्रारब्ध भाग २० - अंतिम भाग

प्रारब्ध भाग २० शनिवारी दुपारी जेवताना सुबोधने परेशला सांगितले उद्या सहज म्हणुन तुझ्या घरी मी येतो ,माझी वहिनींची ओळख दे . हल्ली मी रविवारी दुपारी तिकडेच येतच असतो .. सध्या एक खास “पाखरू” सापडले आहे एकदम देखणे .. पण ते फक्त दुपारच्या वेळेतच सापडत असते, संध्याकाळी नसते ते इतर वारी दुपारी आपण ऑफिसला असतो . पण रविवारी मात्र मी त्या पाखराची भेट चुकवत नाही ..” सुबोधच्या चेहेरा “मिश्कील” झाला होता . परेशला वाटले खरेच इतके सारे याच्या आयुष्यात होऊन सुद्धा हा किती आनंदी राहतो. “ठीक आहे ये तु उद्या घरी मग बघू “परेश म्हणाला . त्याने ठरवले आता उद्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय