प्रेम म्हणजे प्रेम असत.... Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम म्हणजे प्रेम असत....

प्रेम म्हणजे प्रेम असत....

जय आणि रितू बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... जय च रितू वर प्रेम होत पण रितू जय ला होकार सांगत न्हवती.. एक दिवस रितू नी जय ला भेटायला बोलावलं.. दोघ भेटले...

“तुला खरच लग्न करायचय माझ्याशी? नक्की ठरवल आहेस?” रितू नी क्षणाचाही वेळ न दवडता बोलायला सुरवात केली..

आपल्या मताशी प्रामाणिक असलेल्या जय नी रितू ला उत्तर दिल..

“तू किती वेळा हेच बोलणार ग? मी १०० वेळा सांगितलंय माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माहिती आहे...मला माहिती आहे, तुझही माझ्यावर प्रेम आहे तरी तुला माझ्याशी लग्न करायचं नाही... काय सारखा सारखा तोच तोच प्रश्न विचारतेस? तुला तेच परत ऐकायचं असेल तर आता परत एकदा ऐक, हो हो….अगदी १०० टक्के मला तुझ्याशो लग्न करायचं आहे.... तुला मी काय केल कि खात्री पटेल? आणि यु नो ,मी माझे निर्णय सारखे सारखे बदलत नाही.. यु नो मी जे बोलतो ते करतो आणि जे केल त्याचा कधी पश्चाताप करत नाही! बाय द वे,मी गम्मत करतोय अस वाटतंय का तुला? तुझा माझ्यावर विश्वास नाही?”

“आय नो जय,तू अशी गम्मत नाही करणार....आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे..माझ तुझ्यावर प्रेमही आहे.. पण प्रेम वेगळ आणि लग्न वेगळ!!! तू असा निर्णय घेतलास कसा त्याच मला आश्यर्य वाटतंय... माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे पण... तू समजून का नाही घेत रे?”

“पण काय? आता परत काय झाल रितू.. मी तुला कितीवेळा सांगितलय....माझ तुझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस.. तरी तू परत परत तोच विषय का काढतेस? खर सांगू का.... आता मला कंटाळा आलाय तेच तेच सांगून!”

“तू खूप अनुभवी..खूप फर्म आहेस आय नो... तुझे निर्णय तू सहसा बदलत नाहीस पण तू म्हणालास लग्न करू तेह्वापासून मला तुझ्या निर्णयावर डाऊट येतोय! तू अश्या निर्णयावर कसा येऊ शकतोस? मैत्रीपर्यंत ठीक आहे पण लग्न? मी बराच विचार केला काल रात्र भर!! यु नो,काल रात्रभर मला झोप आली नाही तुझ्याबद्दल विचार करून.... म्हणजे तसे बरेच दिवस मला झोप लागताच नाहीये.. तू जेह्वा मला सांगितलस तुझ माझ्यावर प्रेम आहे तेह्वापासूनच! म्हणूनच मी आज तुला भेटायचं ठरवलं... आणि तुला बोलावून घेतलं.. तू वेळ काढून आलास म्हणून बर झाल..”

“आपण चांगले मित्र तर आहोतच.. त्यात काही शंका नाही! पण तुझा लग्नाला नकार का? तास पाहायला गेल तर मला माहितीये तुला काय चिंता खातेय... पण आज तूच सांग! मलाही बघू दे,तू मला किती ओळखल आहेस... आणि मी तुला किती ओळखतो! आता बोल,मन मोकळ कर.. तुला जे जे वाटतंय ते ते सगळ बोल! आणि ह्यापुढे मी त्या विषयावर बोलण ऐकून घेणार नाही हे लक्षात ठेव...”

“अ..अ...” थोड चाचरत रितूनी बोलायचा प्रयत्न केला पण ती काही बोलू शकली नाही!

“काय झाल..बोल कि आता! मी ऐकतोय सांगितलं तुला.. काय आहे मनात स्पष्ट बोल! आज सगळ स्पष्ट होऊन जाउदे..” थोड चिडून जय बोलला..

“हो..२ मिनिट वेळ तर दे! कुठून चालू करू कळतच नाहीये! आणि जय,तू डॉक्टर आहेस. मी नाही! मी नाही तुझ्याइतकी मनानी खंबीर... आणि मला वेळ लागतो मन मोकळ करायला! तुझ्यासारखी मी पटापट बोलून मोकळी नाही होऊ शकत!”

“ओके... टेक यूअर टाइम.. मला सगळ माहिती आहे! अजून काय वेगळ सांगणार आहेस बघू... काही नवीन असेल तर ते ऐकयला मी उत्सुक आहे.... आय नो,तुझ्याकडे काही वेगळ नाहीये बोलायला! आय डोंट नो,व्हाय आय अॅम वेस्टींग माय टाइम...” जय वैतागला...आणि थोड वैतागूनच बोलला..

“तू वैतागला आहेस जय? अस काय बोलतोयस? तू सांग..मी काही बोलूच नको का? फक्त मनात कुढत राहते! ठीके??”

“सॉरी.... तू काही बोलत नाहीयेस आणि महत्वाच म्हणजे मला सगळ माहितीये..पण तुझा हट्ट आहे तुला मला सगळ सांगायचय आणि काही बोलत सुद्धा नाहीयेस म्हणून जरा वैतागलो”

“यू आर अ डॉक्टर ना?”

“हाहा.. आहेच प्रसिद्ध डॉक्टर! आणि मी डॉक्टर आहे म्हणून तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये? तस सांग कि स्पष्ट....पण हे लग्न न करायचं कारण असू शकत नाही! हाहा!”

“तू हसतो आहेस जय? मी सिरिअस आहे खूप! सिरिअस होऊन ऐक! मी काय बोलायचा प्रयत्न करतीये आणि तू काय बोलतोयस? चुकीचा अर्थ काढण्यात हुशार आहेस...” रितू चिडून बोलली...

“ओह माय गॉड.... तूच तर ते बोललीस... मी मनानी काही बोललो नाहीये! मी चुकीचा अर्थ काढायचा प्रश्न कुठून आला? आत्ता माझी काही चूक नाहीये.. उगाच मला ब्लेम करू नकोस.. आणि मी सिरिअस होऊनच ऐकतो आहे...”

“ओके..माझीच चूक.. मी नीट नाही बोलले..खुश? आता स्पष्ट बोलते..तुला माझा पास्ट माहितीये.. भविष्यात काय होऊ शकत हे हि माहिती आहे... तरीही तुझा असा निर्णय.. ती गोष्ट मला खटकती आहे....”

“आय अॅम अ डॉक्टर ना? मला तुझ्यापेक्षा जास्ती कळत ना? हे तरी पटतंय ना कि ह्यावर पण तुझ काही म्हणण आहे? असेल तर आत्ताच बोल... न कसला पास्ट? ”

“हो आहेच माझ म्हणण.. मी अडाणी नाहीये! आय नो, मला कधीही काही होऊ शकत... आज किंवा उद्या कधीही मरण येवू शकत.. एकदा मरणाला परतवून लावण्यात यश आल म्हणजे नेहमीच अस होईल का? पहिला अपघात म्हणजे हिंट असू शकते कि माझ मरण जवळ अल आहे? आत्ता मी बरी आहे पण मला कधीच काही होणार नाही ह्याची मला खात्री नाही.. तेह्वा तुला एकट सोडून मला आनंदानी जाताही येणार नाही मला.. मी गेल्यावर एकटा कसा राहशील? तू आहेस खूप ब्रेव... पण मी नाही! कश्याला अडकतोस माझ्यात इतका?” रितू च्या डोळ्यात पाणी आल.. आणि ती रडवेली होऊन बोलली.. “किती स्पष्ट बोलायला लावतोस रे..”

“ओह.. तू घाबरट आहेस म्हणजे! आणि खूप निगेटिव! पास्ट मध्ये तू एका मोठ्या अपघातातून बचावली आहेस आणि त्यामुळेच तू भीतीनी तुझा आज जगायला नकार देतीयेस? तु मरण डोळ्यांदेखत पाहिलं म्हणून तुला कदाचित भीती वाटते... पण मी तर म्हणतो तू एकदा वाचलीस म्हणजे तुला खूप आयुष्य आहे... आणि तू किती पुढचा विचार करतेस...उद्या कोणी पाहिलाय? कोणालाही माहित नसत,कोण कधी मरणार.. मरण कधी येऊ शकत... मी आज मधे जगतो...उद्याचा विचार करून मी माझा आज खराब नाही करू शकत! मला माझा आज तुझ्याबरोबर घालवायचाय! मी स्वतः डॉक्टर आहे! मरणाची आणि मरण पाहण्याच्या भीती कधीच गेलीये माझी...मी रोज मृत्यू पाहतो... कधी काही अपेक्षा नसतांना लोक जातात आणि कधी लगेच मरतील अस वाटत असतांना किती तरी वर्ष आनंदात जगलेल पाहिलंय मी... मला आधी प्रश्न पडायचा... मी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेऊ? मग हळू हळू मला कळत गेल,आपल्या हातात काहीच नसत... मरण तर नाहीच! त्यामुळे आत्ताचा क्षण हा सगळ्यात महत्वाचा.. तो मी जगतो! आणि थोडा फार माझाही वैद्यकीय उपचारांवरचा अभ्यास आहे म्हणून माझा त्यावरही विश्वास आहे... ”

“तू जे बोलतोयस ते पुस्तकात वाचायला खूप सुंदर आहे! पण खऱ्या आयुष्यात ते इतक सोप्प नसत ना? मी बी मी निगेटिव झालीये! पण मी खूप प्रक्टीकल आहे रे... माझ्यामुळे कोणाला त्रास होणार असेल तर मी ते करूच कशाला? आणि माझ्या हातावर आयुष्याची रेष लहानच आहे... म्हणजे मी फार वर्ष जगेन अस मला वाटत नाही..”

“हाहा.. अगदी बरोबर! पुस्तकात वाचायला छान वाटत पण तस कधी जगून पाहिलं आहेस का?... खर सांगू,मी फक्त बोलत नाही..तर मी माझ आयुष्य अगदी तसच जगतो! आणि मी तुझ्यापेक्षा जास्ती प्रक्टिकल आहे! हातावरच्या आयुष्याच्या रेषेबद्दल बोलायचं झाल तर,माझ्या हातावरची आयुष्याची रेष लहानच आहे.. आता बोल! मी लवकर मरेन म्हणून मी आज जगण सोडून देऊ? खर सांगायचं तर माझा हातावरच्या रेषांवर विश्वास नाही.... मला मान्य आहे,तेही एक शास्त्र आहेच आणि ते बरोबर असेलही.... पण बरोबर असेल अशी कोण खात्री देऊ शकत का? खात्री दिली तरी त्यावर काही उपाय असतो का? होणार आहे ते होणार तर आहेच..त्यात आपण किती ढवळाढवळ करायची? आणि माझा वैद्यकीय शास्त्रावर जास्त विश्वास आहे! तू म्हणजे ना... वेडी आहेस..खरच! हात बघून तू तुझ आयुष्य कधी संपणार हे ठरवलस? अस होत नसत.. अगदीच बिकट परिस्थिती आली तर मी आहे कि.. प्रचलित डॉक्टर आणि माझ्याबरोबर बरेच हुशार डॉक्टर!! अमर तर कोणीच नाहीये! तुही नाही आणि मी हि नाही.... मी उद्या मरेन का परवा मरेन असा विचार करत आज संपवून टाकू का? मला माझ्या आयुष्यातले क्षण तुझ्याबरोबर घालवायचे आहेत! आणि त्रासाच म्हणशील तर,तू माझ्या आयुष्यात आली नाहीस तर मला त्रास होईल.....कळल का? आणि कोण जाणे,तुझ्या आधी मला मरण आल तर? कोण सांगू शकत?”

“काय बोलतो आहेस? तू कसा मरशील लवकर? तुला तर खूप लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत...तू खूप वर्ष जगणार!! आणि माझ पण तुझ्यावर प्रेम आहे.... म्हणूनच तुझ्याशी इतक्या मोकळेपणानी बोलतीये! मला इतकाच वाटतंय माझ्यामुळे तुला त्रास ह्यायला नको!”

“मला नाही होणार त्रास.... तुझ्यामुळे तर अजिबातच त्रास होणार नाही!! आणि मी तुलाही काही त्रास होऊन देणार नाही! तुला माहितीये का? मी तुला पहिल्यांदी पाहिलं तेह्वाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो... दिवसेंदिवस मी तुझ्यावर अजूनच प्रेम करायला लागलो! इतक प्रेम का कस ला माझ्याकडे उत्तर नाही.... तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो... प्रेम काही बघून होत नसत... हे तू मान्य करतेस ना? आधी तर मला तुझ्याबद्दल काहीच माहित न्हवत आणि मग मी हळू हळू तुला समजुन घेतलं! मला जे वाटल ते मी तुला सांगितलं...आणि मी ठरवलं,तुझ्याबरोबर राहून माझ आणि तुझ आयुष्य अजून खूप सुंदर करायच!! विश्वास ठेव,मी तुझ आयुष्य रंगांनी भरून टाकेन मी...तुझी सगळी स्वप्न,सगळ्या आकांशा मी पूर्ण करेन.. मरणाला घाबरून तू तुझा आज खराब करू नकोस हे नेहमी लक्षात ठेव.. मी तुझ्यावर प्रेम केलय...आणि प्रेमात काही अटी नसतात.. प्रेम म्हणजे प्रेम असत.. मोकळ्या मनानी केले कि ते प्रेम असत... ओह माय गॉड!!! वा वा..मी कविता करायला लागलो! हाहा..”

“तू इतका पॉझीटीव कसा आहेस रे?... मला जेह्वा जबरदस्त धक्का बसला आणि मला मानसोपचार तज्ञा कडे जाव लागल आणि जेह्वा हे नातेवाईकांना कळल तेह्वा ते कसे वागले मी पाहिलंय! लोक माझ्याकडे वेडी म्हणून पाहायला लागले...नातेवाईक सुद्धा बदललेले पहिले आहेत मी.. खरच जेह्वा मला माझ्या जवळच्या नातेवाईकांची गरज होती तेह्वा ते कधी फिरकलेही नाहीत.... मला गरज होती आणि ते एकदम बिझी झाले.... नंतर मीही ठरवलं,माझ आयुष्य मी एकटीनी जगू शकते..कश्याला कोणाच्या उपकाराची वाट पहायची? आणि तेह्वाच तू आलास माझ्या आयुष्यात! मित्र म्हणून आलेलास आणि नंतर तू म्हणलास प्रेम करतो! पण मी ते मान्य करायला तयार न्हवते! सगळच अनपेक्षित होत माझ्यासाठी म्हणून ते मी मान्य करायला तयार होत नाहीये! प्रेम स्वतः चालत माझ्याकडे आल तरी मी ते मान्य करत नाहीये...गम्मत आहे ना सगळी...” स्वतावर हसतच रितू बोलली...

“सोडून दे त्या लोकांना! जे आले नाहीत त्यांचा विचार करू नकोस! आता मी आहे ना? आणि मी तुला सांगितलं असत,तू आता ठणठणीत बरी आहेस... तुला मानसोपचार तज्ञाची सुद्धा गरज नाहीये..फक्त तुला माझ्यासारख्या पॉझीटीव लोकांबरोबर रहायची गरज आहे... हाहा! आणि मी तुला सिम्पथी देतोय अस समजू नकोस... मी तुला सिम्पथी द्यायला लग्न करणार नाहीये... माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून लग्न करणारे! मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस.. मी प्रेम करतो...काही अटींशिवाय..”

“येस.. आय अग्री! ज्या लोकांना माझी पर्वा न्हवती त्यांचा विचार कशाला करू मी? आणि तुझ्यासारख्या पॉझीटीव लोकांबरोबर राहू? हाहा... ए पण तरीही....”

“तू वेडी आहेस का ग रितू! इतक सगळ बोललो मी... तरीही परत पण... माझ्यावर विश्वास ठेव.. तुझ आयुष्य मी सुंदर करेन!! आयुष्यात काय झाल त्याची तुला आठवणही राहणार नाही.. तू पण फक्त आज चा विचार करत जगायला लागशील बघ माझ्यासारखी!!!”

“आय ट्रस्ट यु जय.. पण मला सारख वाटत,माझ मरण जवळ आल आहे..कळत नाही..माझ्याकडे किती वर्ष आहेत अजून!” हताशपणे रितू बोलली..

“डोंट वरी...अजून बरीच वर्ष आपण एकत्र राहू..माझा विश्वास आहे! आणि कोणाकडे किती वर्ष आहेत हे सांगता येत नाही ग अस.. मरण सोडून जगण्याचा विचार करून जगायला लाग.. बघ काय मस्त होईल तुझ आयुष्य!!! ए एक मिनिट..”

“म्हणजे कोणीही सांगू शकत नाही मी किती वर्ष जगेन..” रितू नी सुस्कारा टाकला.. पण सावरत ती पुढे बोलली, “काय झाल? एक मिनिट का म्हणालास?”

“मी डोळे बंद केले होते तेह्वा मला आत्ता काहीतरी दिसत आपल्या दोघाबद्दल!!! काय दिसलं असेल सांग पाहू...”

“काय पाहिलस तू.. मला नाही सांगता येत..”

“मला बऱ्याच वेळा आयुष्यात पुढे काय होणारे दिसत.. हसू नकोस!! मी एकदम सिरिअस आहे.... आत्ता डोळे बंद केले तेह्वा माझ्या डोळ्यासमोर आल.. आपण दोघ बरेच वर्ष एकत्र आहोत आणि तुझे आणि माझे केस पांढरे झाले आहेत..आपण झोपाळ्यावर बसून गप्पा मारतोय अस आल.. एक अक्षरही खोट नाही.. आणि कोण जाणे, माझ्यापेक्षाही जास्ती जगशील तू!!! आता मी दमलो ग.... आता तुझा होकार समजतो! फायनली तू लग्नाला तयार झालीस!! ग्रेट ग्रेट!!! आणि मी सगळ्यात जास्ती महत्व माणसाला देतो..आय व्हॅल्यू पिपल! कळल असेल ना आज? किती जगतो त्यापेक्षा कस जगतो हे माझ्यासाठी जास्त महत्वाच आहे!!! आता माझ आयुष्य तुझ्याबरोबर खूप सुंदर असेल...मला खात्री आहे!!” खुश होऊन जय बोलला...

“हाहा.. तुला भविष्यकाळ दिसतो.. खर का मला चांगल वाटावं म्हणून सांगतो आहेस? आणि यु आर राइट...आयुष्य कस जगतो हे महत्वाच!!! पण... ”

“परत पण? माय गॉड! आता काय पण?? आज तू खात्री करून घेच... बोल आता हे पण का होत?”

“पण लोक काय म्हणतील? तू इतका हुशार..शिकलेला..आणि माझ्याशी लग्न केलस?”

“लोक कोण आहेत? माझ आयुष्य मी हव तस जगायला मोकळा आहे...मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाहीये! माझ्या निर्णयात कोणाची लुडबुड मी खपवून घेणार नाही!! कळल? झाल तुझ शंका निरसन? कि अजून एखादा पण राहिलंय? जे काही असेल ते आत्ताच बोल...नंतर इतका वेळ ह्या विषयासाठी माझ्याकडे नसेल.. तुला हव तेह्वा मी वेळ काढेनच पण हा विषय काढलास तर मात्र मी तुला उत्तर न देता तिथून निघून जाईन हे लक्षात ठेव..” जय खंबीरपणे बोलला...

“नो नो...आता पण नाही! हाहा! आता हा विषय कधीच काढणार नाही!! आणि मला माहित न्हवत तुझ हृदय इतक मोठ आहे! तुला सगळ खर माहितीये तरीही तू माझ्यावर प्रेम करतोस आणि ते मला पटवून दिलस... थॅंक्यू माझी आयुष्यात आलास!! मी स्वताला भाग्यशाली समजते... कि माझ्या आयुष्यात तू आलास!!”

“सुटलो मी... हाहा! मी कोणी ग्रेट नाहीये! मला तू आवडलीस आणि ते सांगायला मी घाबरत नाही... मी आधी कोणाशीच लग्न करणारच न्हवतो..पण तुला पाहिलं आणि तुझ्यात मी माझी बायको पाहायला लागलो... पण मी हे लगेचच सांगण टाळल होत कारण आधी मला तुझ मन जाणून घ्यायचं होत... म्हणून आधी मी तुझ्याशी मैत्री केली... तू मैत्री करायला देखील तयार न्हवतीस पण आपण मित्र झालो आणि मग मी तुला सांगितलं माझ तुझ्यावर किती प्रेम आहे.. कळल? तू माझ्या मनातून जातच नाहीस.. सारखा तुझाच विचार येत असतो... आय लव यु वेरी मच!!! विश्वास ठेव कि खरच प्रेम आहे...मला जितक आयुष्य आहे ते तुझ्याबरोबर घालवायच आहे. आणि आता तुझा थॅन्क्सगिविंग करायचंय का? आत्ताच हॉटेल मधे कर! हाहा! मला भूक लागलीये प्रचंड... तुला समजून सांगता सांगता दमून गेलो.... पण फायनली तुला सगळ पटल आणि तुझा होकार आला.. आता जरा खाऊन घेऊ! आणि आता परत तो विषय काढू नकोस!! आता परत सगळ ह्याच विषयावर बोलायला मला वेळ नाही मिळणार इतका! आज कसातरी वेळ काढलाय..फक्त तुझ्यासाठी! मी तुला परत एकदा सांगतो,सगळ्यात महत्वाच आहे ते..तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस..कधीही स्वतःला एकट समजू नकोस.. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस आणि ते तू कधी विसरू नकोस!!!”

“ओके..आता परत तो विषय नाही! आणि इतक्यातच दमलास का रे? मग पूर्ण आयुष्य कस काढणार माझ्याबरोबर? मी अशीच आहे..मला खूप शंका येतात आणि मी ते बोलूनही दाखवते! बघ...अजूनही विचार कर! तुझा लग्नाचा विचार बदलला तर सांग!”

“हाहा... नक्की सांगेन माझा विचार बदलला कि... हॉटेल मध्ये खायला घाल आधी मग पुढच पुढे बघू...”

“बर,आत्ता तो विषय राहूदे...ते बघू नंतर,आता कोणत हॉटेल...तू सांग!”

“हाहा...कोणताही चालेल....तुला आवडत तिथे जाऊ!!”

“ओके”

दोघ हॉटेल मध्ये जाऊन मस्त जेवले... शेवटी रितू हो म्हणली.. दोघहि खुश होते!! जय नी खूप महत्वाचा मुद्दा रितू ला पटवून दिला होता म्हणून तो खुश झाला आणि चांगला जोडीदार मिळाला म्हणून रितू खुश होती!!! रितू आयुष्य एकटीनी काढू असा विचार करत असतांना जय तिच्या आयुष्यात आला आणि तिला तिच्या बेरंग आयुष्यात रंग दिसायला लागले! तीच आयुष्य जय च्या येण्यानी रंगीबेरंगी झाल...

दोघांनी लग्न केल... सुखी संसार चालू झाला... अगदी दृष्ट लागेल असा सुखी संसार... त्या दोघांवर जळणारे खूप होते.. ती गोष्टा कळूनही दोघांनी जगण बंद केल नाही.... काही लोक मागून नाव ठेवत होते..काही समोर! तरीही जय स्वताच्या निर्णयावर ठाम राहिला..लग्नाला एक वर्ष झाल...

“आज लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल....आपण काहीतरी मस्त प्लॅन करू" जय म्हणाला...

"1 वर्ष झाल सुद्धा? कळल पण नाही ना....कधी संपल एक वर्ष... मला तर आपण काल भेटल्यासारखे वाटतय... आजही इतक फ्रेश आहे आपल नात... थॅंक्स टू यु जय!!"

"मला पण आत्ताच आठवलं......आत्ता कॅलंडर पाहील तेह्वा लक्षात आल 1 वर्ष पूर्ण होईल उद्या! वेळ कसा गेला कळलही नाही ना...वेळ इतका आनंदात गेला... आणि हीच तर आपल्या नात्यातली जादू आहे.."

"जादू तर आहेच... तू इतका बिझी असतोस तरी माझ्यासाठी वेळ काढतोस..." रितू म्हणाली

"म्हणजे काय? मी डॉक्टर आहे म्हणून बायकोला वेळ देणार नाही अस कस करेन? वचन दिलय तुला...”

“वचन? तू मला वचन कधी दिलस? मला नाही आठवत!”

“हो का? लग्नाच्या वेळी सप्तपदी केलेली कि आपण... तेह्वा मी तुला वचन दिलेलं... एक नाही सात वचन!!! तुझा मित्र बनून राहीन आयुष्याभर.. तुझ्या सुख दुखात तुझ्याबरोबर असेन.. मी काय टाइमपास म्हणून धार्मिक पद्धतीनी लग्न न्हवत केल! मुद्दामूनच प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतलेला!”

“तुझ्या लक्षात आहेत सात वचन?”

“म्हणजे काय ग रितू!! मी सगळ नीट लक्ष देऊन ऐकल होत! मला धार्मिक पद्धतीनी लग्न करण्यात काही इंटरेस्ट न्हवता पण तुझा हट्ट म्हणून तुला हव तस लग्न अगदी मनापासून केल... आणि प्रत्येक गोष्ट समजून घेतली! मी कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक करतो,यु नो!”

“मला न्हवत माहित... तू लग्न पण लक्षपूर्वक केलेलस! हेहे!” हसू आवरत रितू बोलली..

“तू हसल्यावर खूप गोड दिसतेस... अशीच हसत राहा नेहमी!! तुझ्या या हास्यासाठी मी काही करू शकतो! खरच!! बाय द वे,तू खरच खुश आहेस ना?”

“ओह.. थॅंक्यू जय! हो मी खूप खुश आहे! तुझ्यासारखा इतका समजूतदार हुशार नवरा मिळालय मला मग खुश असणारच ना? तू मला जपतोस.. अगदी फुलासारखा!!! मला आयुष्याकडून अजून काहीही नको...”

“गुड गुड..आता सांग,लग्नाच्या वाढदिवसाला काय करायचं? तुला काय गिफ्ट हव आहे नवऱ्याकडून!!! काहीही माग.. तुला हव ते माग!! आणि मी सुट्टी सांगतो फोन करून! तू ठरव काय करायचं...” जय म्हणाला..

“तू सुट्टी नको काढूस जय... तुझी गरज सगळ्यांना आहे...तू आलास कि आपण घरीच साजरा करू लग्नाचा वाढदिवस!”

“ठीके... संध्याकाळी तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे... ओके? आता मी जातो हॉस्पिटल ला... भेटूच संध्याकाळी... तुला काय गिफ्ट हवय ते नक्की सांग! मी वाट पाहतोय!” इतक बोलून जय निघाला...

रितू विचार करायला लागली...जय काय सरप्राइज देणार आहे? बराच विचार करूनही ती कोणतीही निष्कर्ष काढू शकली नाही मग शेवटी तिनी विचार बंद केला आणि ती तिच्या कामाला लागली....संध्याकाळची वाट पाहायला लागली.. संध्याकाळी जय ला यायला उशीर झाला... दिवसभर दमून आला असेल म्हणून रितूनी काही बोलण टाळल.. तिनी जेवण वाढल.. तिनी स्वतः जय ला आवडणारे सगळे पदार्थ केले होते.. जेवणाच्या टेबल वर जय आला आणि त्यानी त्याच्या आवडीचे पदार्थ पाहिले आणि तू खुश झाला...खुश होऊन त्यानी बोलायला सुरुवात केली,

“मी तुला सकाळी म्हणाल होतो ना सरप्राइज बद्दल? सांगू काय सरप्राइज आहे? तू काही गेस केलास का? आणि गिफ्ट काय हवय?”

“तू आधी जेव जय.. मग आरामात बोलू....”

“हो हो.. जेवतो! पण आपण जेवता जेवता बोलू शकतो... आणि थॅंक्स..माझ्या आवडीचे पदार्थ तू केलेस... स्वयपाक मस्त झालाय!!! आणि आता सरप्राईज काय असेल सांग!!! तू सुद्धा खुश होशील सरप्राइज ऐकून सो आत्ताच सांगायचय... मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पहायचाय! तुला काय सरप्राइज असेल त्याची आयडिया आली?”थोड उत्साहित होऊन जय बोलला....

“नो अरे... मी खूप विचार केला... पण काही कळल नाही... गेस नाही करू शकले.. तूच सांग! आणि गिफ्ट काही नको रे... तू नेहमी असतोस माझ्या बरोबर तेच माझ्यासाठी गिफ्ट!!”

जय च्या चेहऱ्यावर हसू आल आणि त्यानी बोलायला सुरु केल, “ओह हो.. म्हणजे माझा खिसा कापायचा काही विचार नाही तुझा! गुड गुड..”

“मी तुझा खिसा कधी कापते ते? हाहा”

“बर.. ते बोलू नंतर! आधी सांग,तुला बाळांची खूप आवड आहे ना? तुला एक बाळ हव होत ना?”

“येस.. मला बाळ हव आहे.. पण मी तुला आधीच सांगितलय,माझ आयुष्य किती आहे ते माहित नसताना फक्त मला हवय म्हणून बाळाला जन्म देऊन वाऱ्यावर नाही सोडू शकत...मला ते पटत नाही.. सगळ्यांना बाळं आहेत मग मला पण बाळ हवय असा माझा अट्टाहास नाही.....मी परिस्थिती मान्य केलीये आणि ह्या निश्कार्ष्यावर आली आहे.. स्वताच्या नसत्या हट्टापायी मी अशी कधीच वागणार नाही...”

“आय नो रितू.... तुझ्या मनातून कधीही मरण येऊ शकत हे गेलेलं नाहीये! मी तुझ्या मनाविरुद्ध काही वागणार नाहीये... आणि मी तुला आपल बाळ हव अशी कधी म्हणलो? डोंट वरी! तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही!!”

“मग कुठून आणणार बाळ? तू दुसर लग्न करतोस का काय? मग २ आया एका बाळाचा सांभाळ करणार..अस काही?”

“वेडी आहेस का? मी दुसर लग्न करेन असा विचार कसा केलास तू? मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो..मी तसा कधी विचारही करू शकत नाही..”

“सॉरी..” रितू ला आपण चुकीच काहीतरी बोललो हे जाणवलं आणि ती रडवेली झाली...

“तू ऐकणार आहेस का माझ पूर्ण बोलण?”

“हो.. बोल तू..मी ऐकतीये!”

“मग ऐक शांतपणे.... माझ बोलण पूर्ण झाल कि तू बोल...मला मधे थांबवू नकोस... प्लीज!!!”

“ओके... नाही बोलत मध्ये.. आणि काही गेस पण करत नाही!”

“ऐक,मी “आपल घर” ह्या नावानी एक संस्था काढलीये...... त्यात ज्या मुलांना आई वडील नाहीत त्यांचा तिथे खूप चांगल्या पद्धतीनी सांभाळ करायचा.. तू! कारण मी हॉस्पिटल मध्ये बिझी असणारे... तुला मदत लागली तर मी नक्की असेन तुझ्या बरोबर पण तू सगळ काम पहायचं!! आणि मी त्या मुलांना अनाथ म्हणणार नाही कारण ती आपल्या बरोबर असणार आहेत...त्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आई मिळणार आहे... आपण आपल्या मुलांना नवीन आयुष्य द्यायचं..... त्याच शिक्षण, इतर सगळ तू पाहायचं!!!! फक्त तुला खूप काम कराव लागणार आहे... आजच सकाळी एक गोंडस मुलगी आलीये आपल्या घरी... आता तुला एक नाही...खूप बाळ मिळतील!!! मध्ये मी खूप बिझी होतो,आठवतंय ना? तेह्वा हेच सगळ काम करत होतो! तुला तिथल सगळ काम पहाव लागेल! त्याची जबाबदारी तुझी...”

रितू जय च बोलण शांतपणे ऐकत होती.. जय बोलत होता त्याचा तिनी कधी विचारही केला न्हवता...त्याच बोलण संपल आणि ती खूप खुश झाली.. ते तिच्यासाठी एक खूप मोठ्ठ सरप्राईज होत... ती आनंदानी बोलली..

“सुंदर!!! माझ्याकडे शब्द नाहीयेत.. तुझ सरप्राईज अस काही असेल असा मी विचारही केला न्हवता... खूप सुंदर कल्पना आहे तुझी!!! तू माझ्यासाठी इतक करतोयस? जय,थॅंक यु सो मच!! माझी मनापासून इच्छा होती,काहीतरी केल पाहिजे गरजू मुलांसाठी! आता एका नाही मी बऱ्याच मुलांची आई होऊ शकणार!! आणि आपल्याकडे आलेली बाळं अनाथ राहणार नाहीत ह्याची जबाबदारी माझी!!!! मी खूप खुश आहे! खूप मस्त सरप्राइज दिलस तू मला!!” आनंद रितू चे डोळे पाणावले.. जय च तिच्यावर खरच किती प्रेम आहे हे तिला जाणवलं.. जय नेहमी म्हणायचा “प्रेम म्हणजे प्रेम असत...अटींशिवाय केलेलं ते प्रेम असत!!” त्याचा अर्थ तिला उमगायला लागला...

“मलाही काहीतरी करायचं होत.. पण प्रत्येकवेळी राहूनच जात होत! पण मी ठरवलं...वेळ काढून काहीतरी करायच!! तू अनाथ मुल पाहून सैरभैर झालेलं मी पाहिलं आणि तेह्वाच ठरवलं संस्था चालू करायची... मला माहिती होत,तुला खूप आनंद होईल ह्या सरप्राइज नी! तू खुश आहेस ना? मला तेच हवय.... नेहमी खुश राहा.. मला अजून काही नको... तुला खुश पाहण्यासाठी काहीही करू शकतो मी!!”

“इतक प्रेम करतोस जय? मला कल्पना न्हवती रे....आणि मी खूप खूप खुश आहे!!! तू माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिलीस!! खूप खूप खूप थॅंक यु जय!!” खूप आनंदून गेलेली रितू बोलली..

जय च्या सरप्राइज नी रितू खूप समाधानी झाली...जय नी हळुवार पद्धतीनी रितू मन जपल होत.... काही दिवसातच संस्थेचा पसारा वाढायला लागला......मग रीतू नी तिचा सगळा वेळ त्या संस्थेसाठी द्यायचं ठरवलं.... रितू असंख्य मुलांची आई झाली!! ती आई न होता आईपण अनुभवत होती आणि ती खूप समाधानी झाली...

बरीच वर्ष उलटून गेली.. तरी रितू एकदम हेल्दी राहिली... तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली... तिला मनासारखं काम करायला मिळाल त्याचा परिणाम तिच्या हेल्थ वरही झाला.. तिच्या मनातून मरणाचा विचार दूर गेला! रितू तिच्या कामात खुश होती... जय म्हणल्याप्रमाणे मरणाचा विचार थांबल्यामुळे रितू च आयुष्य सुंदर झाल... दोघाचे केस खरच पांढरे झाले. बरीच वर्ष दोघांना सुखी संसार केला... जय ला दिसल्याप्रमाणे दोघ निवांत झोपाळ्यावर बसून गप्पा मारायला लागले..

“मस्त आहे ना किती आयुष्य... थँक्स जय!! तुझ्यामुळे मी जगायला शिकले.. आणि तू भरभरून प्रेम दिलस मला... समाधानानी सुंदर आयुष्य जागतीये मी..”

“आहे ना आयुष्य मस्त? मी सांगितलेलं ना तुला.. पण तू माझ्यावर विश्वास ठेवायला किती वेळ लावला होतास... आज मध्ये जगण खर जगण असत... आणि आयुष्यात जे नकोय ते करायचं नाही... आयुष्य म्हणजे बर्डन होऊन द्यायचं नाही!”

“हो ना... ए,मला आठवतंय तू सांगितल होतस.. तुला भविष्यातले प्रसंग दिसतात... तू सांगितलेलं तसच आपण झोपाळ्यावर बसून गप्पा मारतोय बघ.. आणि दोघांचे केसही पांढरे झाले आहेत..हाहा!”

“अरे हो कि! रितू..मी म्हणालो होतो ना.. तुला खूप वर्ष माझ्या बरोबर राहायचं आहे? मी पाहिलं होत आपल्या दोघांचे केस पांढरे झालेत आणि आपण झोपाळ्यावर बसून गप्पा मारतोय...मला खरच भविष्यातले काही प्रसंग दिसतात... हाहा...” हसू आवरत जय बोलला

“का हसतो आहेस जय? तुला अस काही दिसलं न्हवत का?”

“हाहा... बरोबर! मला भविष्यातल काही दिसत नाही.. मी भविष्याबद्दल विचारही करत नाही मग मला भविष्याबद्दल दिसेल अस तुला वाटलच कस? हाहा! मला फक्त तुझे नकारात्मक विचार बाजूला सारायचे होते.. मी तुला भविष्याबद्दल सांगितलं आणि तुझा त्यावर विश्वास बसला... आणि माझ काम सोप्प झाल!! तू सारखी मरण कधीही येऊ शकतो बोलत होतीस... मला तुझा तो विचार घालवायचा होता...तेह्वा मला जे सुचल ते मी बोललो होतो.... भविष्याबद्दल चांगल बोलण्यानी समोरच्या व्यक्तीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.. आणि जादू घडते!! तसा माझा अनुभव होता.. मनानी ठरवलं कि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात... तुझ्या आयुष्यात एका प्रेरणेची गरज होती.. मी तुला सांगितलं तू आणि मी सुद्धा खूप वर्ष जगू तेह्वा तुझ्या मनानी उभारी घेतली... आणि जेह्वा आपली संस्था चालू केली तेह्वा तर तू इतकी खुश झालीस.. तेह्वा तुला जगण्यासाठी नवीन उमेद मिळाली आणि तुझी इच्छाशक्ती काम करायला लागली.. आणि रिझल्ट तुझ्यासमोर आहे.. तुला आधी सारख वाटत होत कि मी कधीही मरेन.. त्यामुळे तुझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होत होता..मुद्दाम करत होतीस अस मी म्हणणार नाही....पण तुझ्या नकळत... पण जेह्वा तुला आयुष्यात जगण्यासाठी हेतू मिळाला..तुला खात्री झाली तू बरीच वर्ष जगू शकतेस तेह्वा तुझ नवीन आयुष्य चालू झाल.. तुझा जणू पुनर्जन्म झाला....तू नवीन उर्मिनी तुझ आयुष्य जगायला लागलीस.. आणि तुझ आयुष्य बहरत गेल..”

“जय..आय लव यु सो मच!!! तू जादू केलीस खरच!!! माझ्यासाठी तू जाद्दुगर आहेस! तू मला नवीन आयुष्य दिलस.. जगण्यासाठी मला प्रेरणा दिलीस... पण मी तुला काहीच दिल नाही रे...”

“दिलस कि..माझ्याबरोबर इतके वर्ष राहून तू मला खूप काही दिलस... आणि मी सांगितलं होत... प्रेमात अटी आल्या कि नात्यातलं प्रेम हरवून जात! प्रेमात अटी नसतात...प्रेम म्हणजे प्रेम असत...आणि अटींशिवाय असत ते प्रेम असत....”

“आज पटल मला... प्रेम म्हणजे प्रेम असत..तू केलस ते प्रेम असत!!!!!... आय लव यु आणि थॅंक्स....” रितू इतक बोलली. तिचे डोळे पाणावले...आणि तिनी जयचा हातात हातात घेतला आणि जय च्या खांद्यावर डोक ठेऊन कितीतरी वेळ ती शांत बसून राहिली....

अनुजा कुलकर्णी.

Email id-