Diner books and stories free download online pdf in Marathi

डिनर !

गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती. डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती. पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता. रस्ता निर्मनुष्यच होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होत जाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता, एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता. त्याने ए सी बंद करून ड्राइव्हर साइड्ची विंडो उघडली. गार वाऱ्याचे हलके मोरपीस चेहऱ्यवर झेलत, आवडती ट्यून ऐकत गाडी चालवणे त्याचा परमोच्य आनंद होता आणि तो, तो मनसोक्त उपभोगत होता. स्पिडो मीटरचा काटा शंभराच्या जवळपास तरथरत होता.

समोरच्या कोपऱ्यावर कोणीतरी रस्त्याच्या मधोमध उभाराहून लिफ्ट साठी अंगठा दाखवत होते. खूप अर्जन्सी असावी कारण ती व्यक्ती रस्त्याच्या साईडला न थांबता सेंटरला उभी होती. काही अडचण असेल का? गाडी जवळ अली तशी ती व्यक्ती एक स्त्री असल्याचे त्याला जाणवले. त्याने तिच्या जवळ गाडी उभी केली. तसे अश्या वेळी थांबणे धोक्याचे असते, पण त्याला त्याच्या तारुण्यावर आणि मस्सल पावर वर विश्वास होता.
"काय प्रॉब्लेम आहे?" त्याने गाडीच्या खिडकी बाहेर डोके काढून, तिचे निरीक्षण करत विचारले. ती एक तरुण स्त्री, स्त्री कसली? बावीस तेवीस वर्षाची मॉड तरुणी होती. तिच्या हातात एक पुडके होते. हॉटेलचा एखादा पदार्थ, पार्सल केलेला असावा.
"सर मला मदत करा! माझी शेवटची ट्रेन मिस झाली. कशी बशी येथवर आले, पण तोवर बस सेवा पण बंद झालीय! मला घरी जायचंय!"
तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. आवाज कसला स्वीट आहे! त्याच्या मनाने नोंद घेतली. ती मस्त उंच आणि सडपातळ होती. परफेक्ट फिगर. सगळं कस जिथल्या तेथे! डार्क रॉयल ब्लु जीन्स आणि व्हाईट शर्ट मध्ये एकदम 'खतरा' दिसत होती!
"सर, प्लिज नाही म्हणू नका!" तिने पुन्हा आर्जव केला.
तो भानावर आला.
"मग तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो का नाही केली ?"
"आता तुम्हाला काय वेगळं सांगू? एक तर ते थांबतच नाहीत, आणि हल्ली काय काय ऐकला येत, म्हणून मी पब्लिक ट्रांसपोर्टच प्रेफर करते. "
"मग -- मी?"
"तुम्ही जण्टलमन आहेत. कारण कोणी अश्या अपरात्री अनोळखी व्यक्ती साठी गाडी थांबवून चौकशी करत नाही. "
'जण्टलमन 'शब्दाने तो सुखावला. तिच्या रेखीव चेहऱ्या कडे पहात त्याने मानेचं गाडीत बसण्यास खूण केली. ती गाडीस वळसा घालून त्याच्या शेजारच्या सीटवर सीटबेल्ट लाऊन बसली. काय ग्रेसफुल चाल आहे! हि आणि अशीच आपली आपली स्वप्न परी असावी!
" तुम्हाला कोठे सोडू?"त्याने गाडी सुरु करत विचाले.
" या येथून साधारण पाच सात किलोमीटर वर एक डावे वळण आहे . तेथून पाचच मिनिटाच्या अंतरावर आमचा जुना वाडा आहे. तेथेच सोडा. "
चला म्हणजे अजून दहा पंधरा मिनिटे हि अप्सरा शेजारी असणार. तो सुखावला.
"थँक्स, तुम्ही आज एका असाह्य आणि गरजू तरुणीला मदत केलीय. माझा बच्चा वाट बघत असेल हो, घरी!"
"बच्चा!! म्हणजे ---"
"नो,नो, तुम्ही समजताय तसे काही नाही. माझे अजून लग्नहि झालेले नाही.'बच्चा' म्हणजे माझा लहान भाऊ! बिचारा आजारी असतो. !"
" आजारी? काय झालाय त्याला?"
"तो खूप ऍनिमिक आहे. त्याला रक्ताची खूप गरज आहे! पांढरा फटक पडलय हो पोरग! काही खातच नाही. म्हणून तर चव बदल म्हणून त्याच्या साठी बाहेरचे 'डिनर' घेऊन जातेय. तस मी त्याला सकाळी घरून निघताना प्रॉमिस केले होते आणि आज नेमका उशीर झाला." तिच्या हातातील पुडक्याचे गुपित हेच होते तर.
"प्लिज, आता लेफ्ट टर्न घ्या. हा या कच्या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला आमचा 'पॅलेस' आहे." तिने जुनाट वाड्याचा उल्लेख 'पॅलेस ' केल्याने दोघेही मोकळे पणे हसले. त्याने सफाईदार लेफ्ट टर्न घेतला.
"घरी अजून कोण कोण असत?" त्याने सावध प्रश्न विचारला .
"कोणी नाही! मी आणि बच्चा दोघेच! आई बाबा, मागेच बच्चा आणि हा जुना वाडा सांभाळायची साठी मला देऊन, देवाघरी गेलेत. "
"ओ सॉरी! बाय द वे मी शशांक. एकुलता एक. आई डॉक्टर, बाबानचा बिजनेस. मी एका मल्टिनॅशनल कम्पनित प्रोग्रामर म्हणून काम करतोय." तिने न विचारातही त्याने आपली माहिती दिली. तिचे पाच दहा मिनिटाचे सानिध्य त्याला सुखावून गेले होते. तीच बोलणे, वागणे, लहान भावाची काळजी, चेहऱ्यावरचे हाव -भाव, सगळंच त्याला आपलस वाटू लागलं होत. आता घराजवळ आलोच आहोत तर घर आतून पाहून घ्यावे, तिच्या भावाची पण विचारपूस करावी. सगळं ठीक वाटलं तर, चार दोन भेटी नंतर पुढचं विचारता येईल. असे विचार त्याच्या मनात घोंगावू लागले.
"बस थांबा! आलाच आमचा राजवाडा." त्याची गाडी एका थोरल्या गेट समोर उभी राहिली. समोर खरेच एक दुमजली जुनाट बांगला होता. अंधुक प्रकाशातहि त्याची भव्यता अधोरेखित होत होती. सगळी वास्तू अंधारातच होती, फक्त वरच्या मजल्यावर एका खिडकीत उजेड दिसत होता. बहुदा ती बच्चाची रूम असावी.
"खरे तर आपण जी मदत केलीय तिची परतफेड केवळ 'थँक्स ' या शब्दाने होणार नाही. तुमची हरकत नसेल तर ऐक ऐक कप कॉफी घेऊयात का? मी पटकन बनवते." तिने अजीजीने विनंती केली. हि बया बहुदा मनकवडी असावी! का 'घरात या ' हे आमंत्रण? पण तसे नसावे, आजारी असला तरी भाऊ घरात आहे. हे केवळ सौजन्य आहे. इतका वेळ आपण तिच्या सोबत बोलतोय एक अक्षरही वावगे बोलली नाही.
"तसा बराच उशीर झालाय. पण ऐका कॉफीला कितीसा वेळ जाणार. आणि तुम्ही इतक्या प्रेमाने ऑफर करताय कि 'नाही' म्हणवत नाही." तो गाडी खाली उतरला.
तिने गेट ढकलून उघडले. जून गेट कुरकुरल. बंगल्याचा भव्य दाराचे कुलूप उघडले. दिव्यांची बटने दाबून घरभर उजेड केला. जुने खानदानी दणकट फर्निचर, भव्य पेंटिंग्स, तलम पडद्याचा खिडक्या, तो सभोवताल पहात होता. त्या भव्य हॉल मधून वरच्या मजल्यावर जाण्या साठी जिना होता. उंच छताला नाजूकसा झुंबर हलकेच झोके घेत होते. खरेच तो राजवाडाच असला पाहिजे.
"आपण वरच जाऊ. बच्चाच्या रूम मधेच बसू . त्याची तुमची ओळखही होईल. त्याचाशी तुम्ही थोडे बोलत बसा,मी पटकन कॉफी करते. वरच शेजारी किचन आहे. "
"ठीक. "
दोघे जिन्यातून वरच्या मजल्यावर गेले.
००० बच्चाच्या रूमचे दार उघडेच होते. या घरात आल्यापासून शशांकला एक कुबट आणि जुनाट वास येत होता. पण हे साहजिकच होते. वास्तू जुनी होती आणि कितीही म्हणले तरी देखभाल त्या मानाने कमीच पडत असावी.
"ताई, तू आलीस!"
बच्चा अंथरुणातून उठून बसत म्हणाला. शशांक तिच्या मागून त्या रूम मध्ये आला. तो जुनाट वास बच्चाच्या खोलीत जरा ज्यास्तच येत होता. त्याने बच्चा कडे पहिले. बापरे! बच्चा म्हणजे कातड्याच्या झाकलेला हाडाचा सापळाच होता! त्याचा कातडीचा रंग 'पांढरा -फटक ' पेक्षाही पांढरा होता. त्याचे डोळे इतके खोल गेलेले होते कि पाच फुटांवरून सुद्धा शशांकला त्याची बुबळे दिसत नव्हती.
"हो, रे बच्चा. सॉरी आज जरा उशीरच झाला." ती म्हणाली.
"माझे 'डिनर'आणलेले दिसतंय!"
"हो ,हे काय. " तिने हातातली पिशवी हलवली.
तोवर शशांकने एक जडशीळ शिसवी लाकडाची खुर्चीवर बसकण मारली होती.
"ताई, तू पण माझ्या सोबत 'डिनर' कर ना.! तुला पण भूक लागली असलंच कि !"
ते खरेच होते. तिचे पण भुकेने आतडे तुटतच होते.
तिने मानेनेच होकार दिला, हातातले ते पुडके दूर भिरकावून दिले.
आणि दुसऱ्या क्षणी ते दोघे बहीण भाऊ शशांकवर तुटून पडले.!
कारण, तोच तर त्यांचे 'डिनर' होता!

सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED