Shodh Chandrashekharcha - 15 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 15

शोध चंद्रशेखरचा!

१५---

कस्तुरीने फोन बंद केला. तिचे डोके जड पडले होते. आधी चंद्रशेखरच्या किडन्यांपींगचा फोन. किडन्यापर या इरावतीच्या हलगर्जीपणाने सुटला. आता हा दुसराच माणूस फोन करतोय! काय तर चंद्रशेखरची बॉडी ताब्यात आहे म्हणे याच्या! काय खरे काय खोटे परमेश्वरच जाणे. चंद्रशेखर मेल्याचे दुःख नाही. पण पोलिसी ससेमिरा मागे लागणार. या पोलिसांची डोकी वेडीवाकडी चालतात. चंद्रशेखरच्या मृत्यूने, सर्वात ज्यास्त फायदा आपल्यालाच होणार आहे. हे सत्य आहे. मग आपणच या अपघाताचे षडयंत्र रचले, असा आरोप पोलीस ठेवू शकणार होते! आता तर तो मेल्याचे कळतंय! म्हणजे खुनाचा आरोप सुद्धा अपेक्षित आहे! बापरे! आपले आता काय होणार? कस्तुरी धास्तावून गेली. आत्ता आलेला फोन इरावतील कळवू का नको?नकोच! काही उपयोग होणार नाही. मागे सांगून काय झाले? उलट आपण 'किडन्यांपींगची' खोटी माहिती दिली, आणि पोलिसांनची दिशाभूल केली म्हणून आपल्यालाच दोष देईल! त्या पेक्षा आधी चंद्रशेखरची बॉडी पाहून खात्री करून घेऊ, आणि मगच तिला कळवू. हेच योग्य आहे! तसे तिनलाख किरकोळ रक्कम आहे, पण हा हलकट माणूस म्हणाला ते खोटे नव्हते! मढ्याच्या टाळूवरलं लोणी खाणारे असतात असे ऐकले होते, लवकरच ते कसे असतात हे पाहू. काय स्टाईल या माणसाची, 'मी माणिक!' म्हणतो. अर्थात हे नाव खरे नसणार! कस्तुरीने तिनलाखाच्यां नोटा आपल्या मोठ्या पर्स मध्ये कोंबून ठेवल्या. बेडरूमच्या कपाटातील लॉकर मधून, छोटेसे रिव्हॉल्वर हि पर्सच्या एका कप्प्यात सारले. चंद्रशेखरने लग्ना नन्तरच्या, तिच्या पहिल्या बर्थडेला तिला हे 'प्रेसेंट ' दिले होते! चंद्रशेखरचे गिफ्ट्स नेहमीच सर्पराझींग असायचे.

त्या 'माणिक'चा फोन येईपर्यंत तिला काही काम नव्हते. तिने मिनी बारचे कपाट उघडले. पेग भरला, सिगारेट पेटवली. जेव्हा या भांगडीतून मोकळे होऊ, तेव्हा गॅलॅक्सि कंपनी, हा आलिशान फ्लॅट, शेयर्स, दोन फार्म हाऊस, सगळं, सगळं विकायचं, आणि सरळ स्विझर्लंड गाठायचं! चंद्रशेखर बरोबर हनिमूनला ती जेव्हा तेथे गेली होती, तेव्हाच स्विझर्लंड तिच्या मनात भरलं होत! पैसा असल्यावर पार्टनर मिळायला फारशी अडचण येणार नव्हती!

०००

"इन्स्पेक्टर इरावती!"

जोग साहेब फोनवर होते. इरावती खाड्कन खुर्चीतून उठून उभी राहिली.

"सर!"

"चंद्रशेखर केसच काय करताय? माझ्यावरच प्रेशर वाढतंय! काहीच प्रगती दिसत नाही! मला गृहमंत्रायलातून होणाऱ्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात! 'प्रयत्न चालू आहेत.' म्हणून तेथे चालत नाही. हल्ली स्पेसिफिक सांगावं लागत! आता फोन आला तर काय सांगू?" जोगबाबा भडकला होता. त्यांचंही खरं होत. सगळीकडे 'बाप' असतातच!

"सर, आमची टीम तपास करत आहे. लवकरच परिणाम दिसू लागतील!"

"इन्स्पे. इरावती! असं तुमचं गोलमोल उत्तर मी ऐकून घेईन, कारण मला ग्राउंडलेव्हलच्या अडचणी माहित आहेत! पण माझं कोण एकूण घेणार?"

"सर, आम्ही एक संशयित ताब्यात घेतलाय! तपास घेत आहोत!"

"ठीक! प्रोग्रेस कळवत रहा!"

"पण सर, आत्ताच मीडियाला ----" जोगांनी केव्हाच फोन कट केला होता!

इरावतीने कपाळाला हात लावला. जोग सरांना तिने पुन्हा फोन लावला. त्यांच्या रिसेप्शनिस्टने तो उचलला.

"सर, मिटिंग मध्ये आहेत. 'डोन्ट डिस्टरब' म्हणून इंस्ट्रुक्टशन आहे!"

डॉ.रेड्डी निघून गेले होते. विकीला पुन्हा त्याच्या सेल मध्ये बंद केले होते.

इरानेवतीने कॉफी मागवली. आणि पुन्हा त्या चंद्रशेखरच्या केस मध्ये डोके खुपसले. तिच्या इनबॉक्स मध्ये विकीच्या फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट आला होता. ते चंद्रशेखरच्या गाडीतील ठश्याशी जुळत होते! पण हि माहिती आता जुनी झाली होती. डॉ.रेड्डीच्या प्रयत्नाला यश आले होते, आणि विकीने जखमी चंद्रशेखरला त्या बंगल्याच्या गेट पर्यंत सोडल्याची, आणि तेथून कोणीतरी त्याला उचलूननेल्या पर्यंतची कथा सांगितली होती. कस्तुरीला किडन्यांपींगची धमकी देऊन, खंडणी मागणीस झालेल्या उशिराचेही स्पष्टीकरण झाले होते.

एक गोष्ट स्पष्ट झाली होती कि, चंद्रशेखरच्या मागावर कोणीतरी होते, आणि त्यानेच चंद्रशेखरला त्या, बंगल्याच्या गेट जवळून उचलले होते. ती रहस्यमय व्यक्ती कोण होती? त्याने चंद्रशेखरला का उचलले? उचलून नेण्यात, त्याला वैद्यकीय मदत पोहचवणे, हा हेतू नव्हताच! तसे असते तर एव्हाना चंद्रशेखर कोणत्या तरी दवाखान्यात असता, आणि सापडला असता! मदतीचा हेतू नव्हता तर मग, हा आटा पिटा का केलाय? ती रहस्यमय वक्ती, एखादा भाडोत्री माणूसहि असू शकणार होती! तसे असेल तर, त्याच्या मालकापर्यंत पोहंचणे अधिक त्रासदायक होणार होते. केस खूपच कॉप्लिकेटड होत चाललीय.

"मॅडम, टीव्हीवर जोग साहेब पत्रकार मिटिंग घेत आहेत! केस आपलीच आहे!" शिंदेकाकाच्या आवाजाने इरावतीची तंद्री भंगली.

"काय?"

इरावती टीव्ही स्क्रीनवर जोग साहेबांची मुलाखत पाहत होती.

"आम्ही संशयितास अटक केली आहे! येत्या चोवीसतासत चंद्रशेखरचा पत्ता लागेल! या अपघातामागच्या षडयंत्राचा सूत्रधारही आमच्या ताब्यात असेल! घाबरण्याचे कारण नाही, मुंबई आणि मुंबईतला प्रत्येक नागरिक, मग तो गरीब असो वा श्रीमंत, सुरक्षित आहे! विश्वास ठेवा,मुंबई पोलीस सक्षम आणि सतर्क आहे."

बोंबला! या जोग साहेबानी नको ती गोष्ट जाहीर करून टाकली होती! या केस मध्ये बक्षीचा धागा, जोग साहेबाना माहित नव्हता! हा फक्त इरावतीला माहित होता. म्हणजे तिला तसा संशय वाटत होता. खात्री नव्हती.

०००

बक्षीने जोग साहेबांची मुलाखत बघून टीव्ही बंद केला. त्याच्या सोबत सुलेमान होता. सिगारेट पीत बसला होता. बक्षीच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याला सिगारेटची चीड होती,आणि सुलेमानला त्याचे व्यसन होते. पण काय करणार? सुलेमान कामाचा माणूस होता, किमान या घडीला तरी. सुलेमानचे नेटवर्क जबर होते. अंडरवल्ड मध्ये त्याची एक विशिष्ट जागा निर्माण झाली होती. इंटरनेटचे किडे तो पळून होता.

"सुलेमान, जरा पत्ता करो, पुलीसने पकडा हुवा शक्स कोन है?"

तासाभरात बक्षीला हवी असलेली माहिती मिळाली. विकीला पोलिसांनी पकडले म्हणून, राहीमचाचाच्या सांत्वनासाठी आलेल्या लोकांतून हि माहिती बक्षी पर्यंत पोहंचली होती. विकीने जर चंदशेखरला कार मधून काढले असेल तर, तो त्याचे खिशे साफ करणार यात शंकाच नव्हती! आणि चंद्रशेखरच्या खिशात ते पाकीट असेल तर, ते पाकीट विकीजवळ आले असेल! ते पाकीट विकीच्या घरी असेल, किंवा ते विकिसोबतच असेल! आणि तसे असेल तर, ते पोलिसांच्या ताब्यात गेलाय! म्हणजे नको त्या जागी!!

०००

दुसरे दिवशी सकाळी पीटरची फिशिंगला गेलेली बोट परतली.

"मला जरा गोडाऊनची चावी दे. माझी 'प्रॉपर्टी सेफ' आहे का पहातो! आज डिलेव्हरी द्यायची आहे!"

"'प्रॉपर्टी' याने तर वो बॉडी?" पीटरने विचारले.

"व्हय!"

"पैले तीन रातोका 'लॉगिंग चार्जेस' देना पडेगा! रोजका दो हजार!"

"समदा भाडा देणार! डिलेव्हरी झाली की देणार!"

"क्या रे, माणिक कितनेमे डिलिव्हरी देताय?" पीटरने उच्छुकतेपोटी विचारले.

"तीन लाखमे, सौदा पटवलाय!" आपले तंबाखूने पिवळे पडलेले दात दाखवत माणिक हसला. पीटर मात्र अविश्वासाने त्या कळकट माणसाकडे पहातच राहिला! मुडद्याचे तीन लाख? असं काय सोन लागलंय त्याला?

"साला, क्या लफडा है? इतना पैसा तो जिंदे आदमीको भी नै मिलता!"

"पीटर भू, माणिक काय म्हणतो लक्षात ठिव!--'हर जान की और जानकारी कि एक किंमत होती है! बॉस !'" माणिक फिदीफिदी हसत म्हणाला, आणि गोडाऊनच्या किल्या साठी पीटर समोर हात पसरला!

कोल्डस्टोरेजच्या गोडाऊनची चावी माणिकच्या हाती देत, पीटर विचारात पडला,की आपल्याला असलेल्या 'माहितीचा' पैसा कसा करता येईल?

*******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED