prem books and stories free download online pdf in Marathi

प्रेम ...

निशा एका कॉलेज मधे नुकतीच प्रोफेसर म्हणून जॉब ला लागली होती . मागचे सगळ विसरून नवीन सुरवात करायची अस तिने ठरवल होत . मधे जॉब सोडल्या मुळे पुनः नव्याने जॉब करणे तिला जरा अवघडच जाणार होत .
पण , आपल्या स्वतःसाठी जॉब आता ती करणार होती .आता तिच्या अयुषत आपल म्हणाव अस कोणीच राहील नव्हते . तिने ही आता ते सगळं विसरून एक स्वच्छ आणि निर्मळ अशी सुरवात करायची .
दुसरा दिवस उजाडला , निशा लवकरच उठली होती , लवकर कसली तिला रात्रभर झौप्च लागली नव्हती .जवळ जवळ चार वर्षाने ती आज जॉब वर जाणार होती .मनात हूर्हूर तर होतीच . निशाने पिंक कलर ची सुंदर अशी नेसली . त्यावर तिने मचीण्ग असे ब्लौउज घातले . त्यावर तिने मचीण्ग असे बांगड्या घातल्या .त्यावर मचीण्ग अशी सुंदर शी टिकली . तिने कपाटातल्या ड्रोवर मधे हात घातला , तिच्या हाताला मंगळसूत्र लागले .तिने त्या मंगळसूत्र कडे एक नजर टाकली . काहीतरी मनाशी ठरवले , आणि ते मंगळसूत्र पुन्हा ड्रोवर मधे ठेवून दिले .आज काही जाहले , तरी मन कमजोर पडून नाही द्यायचे .
तिने बँग भरली , आणि ती कॉलेजला जायला निघाली . ती कॉलेज मधे आली , ते भव्यदिव्य कॉलेज पाहून पुन्हा जराशी ती घाबरली . ती भीती मनात धरूनच ती पायऱ्या चढून स्टाफरूम मधे आली . स्टाफरूम मधे तिचे सगळ्यांनी स्वागत केले . तिला ही आता जरा बरे वाटले . थोड्या वेलणी घंटा वाजली . आणि कॉलेजचा पहिला तास सुरू जाहला . निशाही तीच उरकून पहिला तास घ्यायला निघाली .
ती कॉमर्स क्षेत्रातील तिसऱ्या वर्गातील शिकवायला आली . ती वर्गात येताच , वर्गात एकदम हशा पिकाला , नवीन प्रोफेसर म्हणून , आणि त्यात एवढी तरुण , म्हणून तिची टिंगल टवाळकी मुले करू लागली . त्यात ' ' सोहम' कॉलेज मधील अत्यान्त खोडकर मुलगा , टिंगल टवाळकी करण्यात पुढे होता . वर्गात होणार , गोंगाट ऐकून , प्रिन्सिपल तेथे आले . आणि त्यानी मुलांना रागावले . गोंगाट एकदम शांत झाला . आणि निशानी मुलांना शिकवायला सुरवात केली . प्रिन्सिपल आल्यावर मुले तेवढ्या पुरती शांत बसली , पण निशाची मान फळ्याकडे वळताच हळु हळु मुलानमधे कुजबुज चालूच होती .ह्यात सगळ्यात पुढे ' ' सोहम ' ' होता .निशा णेही कसा बसा तास संपवला . आणि ती स्टाफ रूम आली .
थोड्यावेळाने कॉलेज सुटले , आणि ती घरी आली . आता मात्र तिची भीती आणखीनच वाढली . कॉलेज मधे मुलाना कस शिकवायच. आज कसबस तिने सांभाळून घेतले , पण , रोज तर तस होऊ शकत नाही . तिने क्षणभर डोळे , मिटले आणि पुन्हा मनाशी निर्धार केला , काही जाहले तरी हा जॉब ती सोडू शकत नव्हती .
पुन्हा दुसरा दिवस उजाडला ,निशा कॉलेज मधे आली , वर्गावरती शिकवायला आली .पुन्हा वर्गात हशा पिकाला .पण , आज ती ही त्या हशात सामील जाहली . आज ती ही त्या मुलानप्रमाणे झाली . त्याच्या प्रमाणे ती ही गप्पा गोष्टी करू लागली .मुलांची आणि तिची चांगली गट्टी जमली .त्यातल्या त्यात सोहम ची आणि तिची चांगलीच गट्टी जमली .
मुलांना ही त्यांच्या नवीन मड्म फार आवडल्या .मग रोज निशा वर्गावरती गेल्यावर गप्पा गोष्टी होई .आता गप्पा गोष्टी होता , होता अभ्यास केव्हा होई , ते मुलांना सुध्दा कळत नसे .
सगळं कस छान चाल होत .निशाला आता सहा महिने जाहले होते , कॉलेज जॉइंट करून , ती ही आता खूप खूष राहू लागली होती . त्यात तिला सोहम सारखा चांगला विद्यार्थी , मित्र ही मिळाला होता , सोहमला ही तिचे शिकवणे , बोलणे , वागणे आवडू लागले होते .दिवसभर टवाळक्या करत फिरणारा , सोहम आता लायब्ररीत बसून अभ्यास करू लागला होता . येत्या सहामाही परीक्षेत त्याला चांगले गुण सुध्दा मिळाले होते . निशा आणि सोहम च्या भेटी आता वाढू लागल्या होत्या , निमित्त अभ्यासाच असल तरी त्या भेटी दोघांना ही आवडू लागल्या होत्या .निशाच्या अयुषत सोहम एक आनंदाची पर्वणी च होती .
मात्र सोहम ला निशा बदल मात्र मैत्री च्या पलीकडे काही तरी वाटू लागले होते . तिचा सहवास त्याला हवाहवसा वाटू लागला होता . तीच दिसन , वागणे , बोलणे सगळं त्याला आवडू लागले होते . पण , लगेच त्याच मन त्याला सांगत असे , अरे तू जे करतोयस ते चुकीच आहे , ती तुझी , ' ' शिक्षिका ' ' आहे , आणि तूझ्या पेक्षा मोठी ही ....तिच्या विषयी अस वाटण ही पाप आहे . पण , लगेच त्याच दुसर मन त्याला सांगत असे , अरे शिक्षिका असली म्हणून काय झाल .पण , तू तिच्यावर प्रेम करतोस . आणि कुठल्या ही , प्रेमवीराला त्याच प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार असतो . निदान तुज्या भावना तिला सांगून तर बघ .
शेवटी सोहम वर त्याच्या दुसऱ्या मनाने विजय मिळवला.आणि त्यानी हे सगळं निशाला सांगायच ठरवल .त्याने लगेच दुसऱ्या दिवशी अभ्यासाच निमित्ताने ' ' कॉफी शॉप ' ' मधे बोलावल . निशा ते थोडस वेगळ वाटल .पण , सोहम हा आता फक्त तिचा एक चांगला विद्यार्थी च नव्हता , तर मित्र ही होता . त्यामुळे तिने ही जास्त ना नू न करता , ' ' कॉफी शॉप ' ' मधे जाण्याचे ठरवले .
नेहमी प्रमाणे ती कॉलेज संपल्यावर , ती कॉफी शॉप मधे जायला निघाली .पण , तीच मन मात्र तिला तिथे जाण्याची परवानगी देत नव्हते .तिला आज अस का वाटतय ? तिला ही कळत नव्हते . हा ' ' कॉफी शॉप ' ' मधे नसले तरी , ती ह्या आधी कितीतरी वेळा अभ्यासाच्या निमित्ताने सोहम ला भेटायला जात असे . पण आज .....
विचार करता करता ती कधी कॉफी शॉप समोर येऊन उभी राहिली , तीच च तिला कळाले नाहीं . समोर ' ' सुटाबुटातला' ' सोहम पाहून तर तिला अजूनच नवल वाटले . सोहम नेहमी पेक्षा खूप वेगळा दिसत होता . तो जरा जास्त च चांगला दिसत होता .पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडावे असे . पण , पुन्हा तिच्या मनात प्रश्न उभा राहिला , आज सोहम एवढा का तयार होऊन आला असेल? त्याने तर आपल्याला अभ्यासाच निमित्ताने बोलवल होत ? मग ..........तो आपल्या शी खोट तर बोलला नसेल ना , पण , तो आपल्या शी का खोट बोलेल ? पण , अस सुटा बुटात तर तो पहिला कधी आपल्याला भेटला नव्हता .ऐत्क्यात बाहेर विचारात उभ्या असलेल्या निशा कडे सोहम ची नजर वळली . त्याने तिला आवाज दिला आणि आत बोलावले .आता निशा ची तंद्री भंग झाली .आणि फार विचार न करता तिने कॉफी शॉप मधे प्रवेश केला .


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED