प्रेम भाग - 11 Dhanashree yashwant pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम भाग - 11

सोहम आणि अंजली घरी आले .अंजली च्या आई ने दार उघडले . एकतर अंजली चे आई बाबा व्यवसायानिमित्ताने सतत बाहेर असत , त्यामुळे तिची रवानगी तिचा सांभाळ करायला ठेवलेल्या बाई कडे असत . आणि मग ती मोठी झाल्यावर , तिच्या मित्र मैत्रिणी मधे ती व्यस्त झाली . त्यामुळे तिच्या अयुषत असा काही प्रकार घडला असेल , ह्याची जरा सुध्दा त्याना जाणीव नव्हती .
सोहमच्या सोबत जेव्हा अंजली जेव्हा गूण्गते असलेली पाहीली .तेव्हा मात्र अंजलीचे आई आणि बाबा दोघेही घाबरले . नक्की काय जाहाले , ह्या विचारात दोघेही होते .
सोहम शांतपणे अंजलीला घरात घेऊन आला .त्याने तिला शांतपणे बेडरूम मधे झौप्व्ले .तिच्या अंगावर पांघरूण घातले . तिची ती अवस्था पाहून तिचे आई वडील पुरते घाबरले. अंजली च्या बाबानी सोहम ला विचारले च.सोहम ने ही मोठा श्वास घेतला . आणि तो सांगू लागला . !अंजली गरोदर आहे . आणि तिच्या पोटातील मुलं हे माझंच आहे . हॉस्पिटल मधील सगळा प्रकार ही सांगितला . ह्या मुलाची जबाबदारी ही त्याने घ्याची ठरवली .त्याने अंजलीशी लग्न करायचा निर्णय घेतला . त्याला माहीत होते त्याच्या ह्या निर्णयाने निशा च्या मनावर फार मोठा आघात होईल .तरीही त्याने हा निर्णय घेतला होता .अंजलीच्या आई वडिलांना तर हे सगळं काय चाललाय काहीच कळत नव्हते. आपण आपल्या मुलीला वेळ देत नव्हतो .सतत कामात असायचो. म्हणून तिच्या कडे दुर्लक्ष जाहले. आणि हे सगळं जाहाले.पण, अंजलीच्या आई बाबांना सोहम फार आवडत असल्यामुळे, ते दोघे ही सोहम ला फार काही बोलले नाहीत.आणि तसं ही सोहम लग्नाला तयार असल्यामुळे, त्यानी लवकरात लवकर लग्न उरकून घ्यायचे ठरवले.
ई कडे सोहम च्या घरी अंजली गरोदर असल्या चे समजले . आणि तिच्या पोटात सोहम चे बाळ आहे . अंजलीला च्या बाबानी फोन करून हे सगळे सांगितले. लवकरात लवकर लग्न उरकून घ्याची विनंती ही त्यानी केली . सोहम च्या बाबांना काही केल्या ही गोष्ट पटत नव्हती . निशा वर त्याच जिवापाड प्रेम असताना तो अंजलीसोबत अस काही करेल, ह्यावर त्यांचा विश्वास पटेना .पण, अंजली ह्या घरची सून झल्यावर त्यांचाच फायदा होता. त्यामुळे सोहम च्या बाबानी ही लग्नाला परवानगी दिली . पण, सोहम च्या आईला मात्र हे सगळं पसंत नव्हतं. सोहम काही दिवस निशा पासून दूर राहिल्या वर तो निशा ला विसरून जयील .मग, आपण आपल्या आवडत्या मुलीशी त्याच लग्न लावून देवू, असं तिला वाटत होत पण, सगळंच आता फसल होत .सोहम असं काही करेल, असं तिला अजून ही वाटत नव्हतं. पण, मग तो हे सगळं कशाला कबूल करेल . सोहमच्या आई चे मन काही केल्या ते सगळं कबूल करेणा . काहीतरी नक्कीच गडबड आहे .
अंजली शुधीवर आली .हॉस्पिटल मधील झाला प्रकार तिला बऱ्या पैकी आठवत होता . पण, जेव्हा तिला कळलं की, तिला आणि तिच्या पोटातील बाळाला सोहम नि एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून स्वीकारलं तेव्हा जगात देव, असतो, आणि तो माणसाच्या रूपात च आपल्या भेटतो .ह्याच्या वर तिचा विश्वास बसला . खूप काही अंजलीने आज गमावलं असतं, पण फक्त सोहम मुळे आज तीच सगळं तिच्या जवळ सुरक्षित होत . सोहम चे आभार कसे मानावे तिला काही कळेना च . ती तडक उठली आणि सोहम च्या रूम मधे येऊं तिच्या पायावर पडली . तिच्या डोळ्यातील अश्रुनी जणू काही त्याच्या पायांना अभिषेक च।घातला . सोहम मात्र तिच्या अश्या वग्न्यानी थोडा ओषल्ला. त्याने अंजलीला वरती उचले .तिला खुर्चीवर बसवले .स्वतः तिच्या पायांजवळ बसला . तिचा हात हातात घेऊन तिला असा विश्वास करुं न दिला .की हे सगळं फक्त तो त्या तिच्या पोटातील जिवसठि हे सगळं करतोय . त्या बाळाच्या सुंदर आयुष्यासाठी . ते सगळं ऐकून अंजली खूप सुखाव्ली . सोहम ने तिला आराम करायला सांगितला . तीही आराम करायला तिच्या रूम मधे निघून गेली .
अंजलीच्या चेहऱ्यांवरचा आनंद बघून सोहं म मात्र खूप खुश जाहाला. त्याने दोन जीवांना वाचवण्याचा सुखद अनुभव होता तो . पण पुढच्या च क्षणी त्याचा चेहरा पडला , तो निषाच्या काळजीने . तिचा एकसारखा चेहरा त्याच्या डोळ्या समोर येत होता .आणि सांगत होता .,........तू ....फस्वल्स..... मला ...फस्व्ल्स...... तू प्रेम ....केलं होतस........ प्रेम .....प्रेम ...प्रेम .................. तुझ्या प्रेमावर माझा अधिकार होता . आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . सोहमला ते पहवेणा. नकळत त्याच्या तोंडातून शब्द गेले .अगं, नको ना रडू .मी नाही पाहू शकत तूझ्या डोळ्यात अश्रू . मी नाही फसवले तुला ...त्या अंजलीच्या पोटातील ते मुलं त्याची काय ह्या सगळ्यात चूक आहे .मी फक्त त्याला ह्या जगात आणायचं प्रयत्न करतोय . मी तुला वचन दिलेले मी नक्की पाळेन.अचानक दार वाजले .सोहंम भानावर आला . पुन्हा दार वाजले . सोहम उठला ,आणि दारा कडे गेला .त्याने दार उघडले. बाहेर अंजलीचे वडील उभे होते .सोहमनी त्याना आत बोलावले. ते आत मधे येताच त्यानी सोहम आणि अंजलीच्या लग्नाचा विषय काढला . लग्न लवकरात लवकर व्हावे, अशी त्यांची ई छा होती . त्यांचं त्याबाबत त्याच्या आईवडिलांशी ही बोलणं जाहले होते, ते ही लग्नाला तयार होते . शेवटी सोहम ने ही लग्नाला होकार दिलाच. मग अंजलीचे बाबा ही आनंदी मनाने लग्नाची तयारी करायला निघून गेले. अंजलीचे बाबांना अगोदर पासूनच सोहम जावई म्हणून पसंद होता . म्हणून तर त्यानी सोहम च्या बाबांना जर सोहम आणि अंजलीचे लग्न जाहले तर, व्यवसायात मदत करण्याची ऑफर दिली होती . पण, सोहम अश्या प्रकारे त्यांचा जावई होईल असं मात्र त्याना कधीच वाटले नव्हते .
अंजलीच्या घरात लग्नाचं वातावरण होते. सोहम चे आई बाबा लग्नासाठी अंजलीच्या घरी यायला निघाले होते . अंजली एकुलती एक मुलगी तिच्या आइवडिलचि असल्यामुळे सगळं तिच्या मनासारखे चालले होते . अंजली खूप खुश होते . ई कडे सोहम मात्र खूप दुःखी होता . त्याला काय पाहिजे? आणि काय नको? हेच त्याला कळत नव्हते . त्या बाळासाठी त्याने हा निर्णय घेतला होता . पण आता त्याला त्या बाळासाठी अंजलिशि लग्न करावे लागेल . खरतर त्याचं अंजलीवर प्रेम सुध्दा नव्हते . त्याचं तर खरं आणि पाहिलं प्रेम निशा होती . मनापासून त्याला निशा आवडत होती .पण आता त्याला निशा च मन मोडून अंजलीशी लग्न करावे लागणार होते . त्याचं अंजलिशि लग्न झल्यावर निशा च क्ष होणार? ह्याच टेन्शन त्याला होतच. पण, हे सगळं खरंतर निशा ला कसं सांगायचं ह्याच त्याला जास्त टेन्शन होत . तिला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा तर तिच्या सोबत कोणीही नसेल .आपण जो निर्णय घेतला तो खरतर योग्य आहे का नाही? ह्या बाबत च त्याच्या मनात शंका निर्माण जाहाली .
रात्र जाहाली, आता अंजलीच्या घरात जोरदार तयारी चालू होती . सोहम चे आईबाबा ही अंजलीच्या घरी येऊन पोहचले. दोन दिवसानी , सोहमचा आणि अंजलीचा साखरपुडा होता .