प्रेम भाग -7 Dhanashree yashwant pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम भाग -7

बाबा तुम्ही अस , नका ना बोलू ? ती खूप चांगली मुलगी आहे .तुम्ही फक्त एकदा तिला भेटा . आणि हो जर तरीही ती तुम्हाला नाही आवडली .तर मी तिच्याशी ........लग्न नाही करणार ......सोहम च्या डोळ्यात अश्रू वाहू लागले . पण , मी ईतर कोणत्या ही मुलीशी लग्न नाही करणार ....सोहम वाहत असलेले अश्रू पुसून म्हंटला .आता मात्र हे प्रकरण फार शांततेने हट्लावे लागणार आहे , हे बाबांनी ओळखले .म्हणून त्यानी पुढे सोहम शी बोलणे टाळले .
पण , सोहम जाताच त्याची आई फार संतापली . तिचा तोंडाचा पट्टा चालू जाहला . ' ' ही अशी कशी मुलगी सोहम नी पसंद केली .एकतर वयाने ह्यांच्या पेक्षा पाच वर्षाने मोठी , आधी लग्न झालेल , घटस्फोट झालेला . आधीच्या सासर च्या माणसाकडे ही राहते .' ' आपल्या सोहम ला अख्या जगात हीच मुलगी मिळाली . अशी मुलगी घरात आणली , तर जग काय म्हणेल . ' ' अहो , .......तुम्ही तरी त्याला समजावा .असा अविचारी पणा बरा न्हावे . पण , सोहम च्या बाबाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार येत होते . ' ' सोहम आपला एकुलता एक मुलगा ' ' ह्या एवढ्या मोठ्या संपत्तीचा एकुलता एक वारस . आणि त्याच्या साठी ही अशी मुलगी आपण पसंद करावी ......शक्यच नाहीं . ' ' आणि आपण तर , हा व्यवसाय वाढवण्यासाठी ' ' देशमुख ची मुलगी अनघा , ही ला सून बनवणार होतो .' ' देशमुखना ही आपला सोहम जावई म्हणून पसंद आहे . हे सगळं झाले , तर आपला बेत फसेल .
पण सोहम च्या डोक्यातून हे खूळ उतरवायच कस ? त्या मुलीच सोहम वर किती वर्चस्व आहे ते लगेच समजतय . सोहम मधे सुधारणा ही तिच्या मुळे च घढ्लि आहे .आणि जर काही कारणामुळे जर आपण त्या मुलीला नकार दिला . तर आपण सोहम ला गमावून बसू . तो ' ' अनघा शी लग्न ही करणार नाही ' ' . सोहम च्या बाबांना काही समजेना . त्यांच विचारचक्र चालूच होत .
ईकडे सोहम मात्र खूप खूष होता .त्याच्या मनासारखे होत होते . निशा नी त्याच्या प्रेमाला होकार दिला होता .सगळं जग त्याच्या हातात आले अस त्याला वाटत होते .आता घरीही कळल्या मुळे आणि तिच्या घरच्याना तो पसंद असल्यामुळे आता बिनधास्त निशाला कधीही भेटता येयील . आणि आपल्या घरचे काय आज न उद्या लग्नाला तयार होतीलच .मग , काय ' ' लग्न करून निशा आपल्या अयुषत , ह्या घरात येयील . आपण तिला राणी सारख ठेऊ . जे जे दुख तिने भोगलय , त्याच्या कितीतरी पटीने तिला सुख देऊ .' ' सोहम च मन अनेक स्वप्न पाहू लागले .
सोहमसारखी च अवस्था निशाची ही झाली होती , ती ही सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागली होती . समीरने तिच्या पहिल्या नवऱ्याने तिच्या सोबत जे वागले होते .त्यानंतर आपल्या अयुषत हा क्षण येयील , अस तिला कधीच वाटल नव्हत . आणि आपण ही कोणा अश्या व्यक्तीवर एवढे प्रेम करू अस तिला कधीच वाटल नव्हते . पण ', खरच आता तरी सुख मिळेल ना आपल्याला? निशाच्या मनात अविश्वासाची पाल चुक्चुक्ली . सोहम , चे आई बाबा आपल्याला स्वीकारतील ना त्याची सून म्हणून .त्यांची ही सुने बाबत काही स्वप्ने असतील . ते का स्वीकारतील अशी मुलगी त्यांची सून म्हणून ? .... तिचे मान अनेक प्रश्नाने ग्रासले गेले . एवढ्यात .....फोन वाजला . पाहते तर काय , सोहम चा मेसेज , तिला कॉफी शॉप मधे भेटायला बोलावले होते . त्याचा मेसेज वाचून तिच्या ओठावर अलगद हसू आले . तिने उरकायला घेतले , निळ्या रंगाचा ड्रेस तिने अंगावर चढवाला . हलक्या हाताने तिने केस क्लिप मधे अड्कवले . एक नजर तिने आरशात टाकली . तिला तिच्या सौंदर्याचाच हेवा वाटू लागला . खरच ........अस सौंदर्य नशिबाने च मिळत , ती मनातल्या मनात बोलून गेली . ती एकटक आरशात पाहत होती .एवढ्यात बाबांनी तिला आवाज दिला .आणि ती भानावर आली .
तिला बाबांना म्हणाली , बाबा मी सोहम ला भेटायला जाऊ का ? जेव्हा पासून आई आणि बाबांनी सोहम ला होकार दिल्या पासून निशा खूप खूष होती .आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिचे आई बाबा ही खूष होते .आपल्या मुलांनी जेवढे दुख तिला दिलाय . त्याच्या एक पटीने जरी आपण तिला सुख दिल , तर आपण खूप नशीबवान आहे . अस त्याना वाटे .
ईकडे सोहम आणि निशा कॉफी शॉप मधे आले . तोच तो कॉफी शॉप जिथे सोहम नी त्याच निशावर असणार प्रेम व्यक्त केले . पहिल्या वेळेस जेव्हा निशा त्या कॉफी शॉप मधे आली होती , त्यावेळी तिच्या मनात भीती होती . आणि आज ....
सोहम आणि निशा त्याच्या भावी आयुष्याच्या गप्पा मारू लागले . दोघे खूप खूष होते . पण , निशा मनात थोडी आपल्या नात्याविषयी भीती आहे .हे सोहम नी ओळखले होते . त्याने तिचा हात हातात घेतला . आणि त्याने तिला वचन दिले . ' ' जोपर्यन्त माझा श्वास चालू आहे , तोपर्यंत हा हात मझ्या हातातच राहणार .' ' तू विश्वास ठेव . तिने हसून त्याला प्रतिसाद दिला . तिने ही त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली ' ' मरण येयी पर्यन्त हा हात तूझ्याच हातात राहील .' ' दोघांनी जीवनमरनाच्या शपता खाल्या .पण , त्याच्या अयुषत पुढे काय वाढून ठेवलय .त्याना कुठे माहीत होते .
सोहम निशाला घरी सोडून त्याच्या घरी आला . तो घरात शिरताच , त्याच्या बाबांनी त्याला रूम मधे बोलावले .सोहम ही फार विचार न करता त्यांच्या रूम मधे गेला . बाबा रूम मधे सिगरेट ओढत बसले होते . सगळ्या रूम भर सिगरेट चा धूर झाला होता . सोहम रूम मधे येताच त्यानी सिगारेट वीझाव्ली . आणि त्याला शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसायला सांगितले . बाबा सिगरेट तेव्हाच ओढ्तात जेव्हा त्याना ऐखादा निर्णय घेणे अवघड असेल तेव्हाच . सोहम विचार करू लागला .बाबांना असा कोणता निर्णय घेणे अवघड जाहला आहे . पण त्याने बाबांना त्या विषयी विचारने टाळले . ' ' बाबा बोलू लागले , मी आणि तूझ्या आई ने एक निर्णय घेतला आहे .' ' कोणता निर्णय ? सोहम अधाशा सारखा विचारू लागला . ......बाबा ही अगदी शांततेत बोलले .तुज्या लग्ना विषयी . आता मात्र सोहम चे डोळे लूक्लूक्ले . ' 'काय निर्णय घेतला ' ' ? आह्मी दोघांनी ठरवलंय .....तुज ......लग्न त्या मुलीशी च होणार .... त्या निशाशी अह्मला ती सून म्हणून पसंद आहे . बाबांचे शब्द कानावर पडताच सोहम नी बाबांना आनंदाने मिठिच मारली . सोहम चा आनंद गगनात मावेना . पण , त्याला मधेच थांबवत बाबा म्हणाले .......' ' पण , आमची एक ...अट आहे .' '