prem - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भाग -5

निशा आणि तिचे बाबा आई च्या खोलीत आले . आई बेडवर झोप्लेली . बाबानी बोलयाला सुरवात केली . ' ' निशा , काल आपल्या घरी कोणी मुलगा आला होता का ? ' ' आणि तो मुलगा घरी गेल्यापासून तू खूप उदास आहे .रात्रीच नीट जेव्लीस पण नाहीस . आणि डोळ्यावरून समजतय तू नीट झोप्लीस पण नाही . आणि सकाळी ही लवकर च आलीस कॉलेजवरून . काय जाहले ? कोण तो मुलगा ? बोल निशा ........... बाबा , अस बोलल्यावर निशाला सोहम विषयी सांगणे भागच होते . ती
म्हणाली , बाबा तो काल आलेला मुलगा माझा विद्यार्थी आहे . ' ' सोहम ' ' नाव त्याच . फर्स्ट ईअर ला होता .आता सेकेंड एअर चालू आहे त्याच . तो फर्स्ट एअर मधे दोन वर्ष नापास झलेला . यंदा पास झाला . आणि पुढच्या वर्षाला गेला . गेली वर्ष भर आमची ओळख आहे . एक चांगले मित्र म्हणून .
पण , त्याला आता हे नातं , मैत्री पलीकडे वाटतय . तो मझ्या प्रेमात पडलाय . त्या दिवशी त्याने मला त्या विषयी कबुली दिली . पण , त्याला त्या दिवशी नकार देऊन मला माझा चांगला मित्र गमवय्चा नव्हता .म्हणून मी , त्याला घरी घेऊन आले .आणि समीर विषयी , मझ्या भूतकाळाविषयी सगळं काही सांगितल . पण तो .............काही न बोलता निघून गेला . आणि आज दोन दिवस जाहाले .तरी त्यानी मला कॉलेज मधे पाहून सुधा ना बोलला .ना फोन केला .
बाबांनी तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले . तिच्या बोलण्यावरून त्याना एवढेच समजले की , तीला काही जाहाले तरी ' सोहम ' ची आणि तिची मैत्री तोडायची नव्हती . त्यानी तीला जाऊन आराम करायला सांगितला . पण , बाबांना मात्र आता काय करावे ? ते कळेना . पण , आता त्याना निशाचा विचार करावा लागणार होता .तिच्यापुढे तीच अख्ह आयुष्य आहे . आपल्या मुळे आणि आपल्या मुलामुळे तिच्या अयुषत आधीच खूप प्रॉब्लेम झालेत . ह्यापुढे तिला कसला ही त्रास नको . पण हा सोहम .... कोण आहे .तो म्हणतोय त्याच निशावर प्रेम आहे . पण , ते खरच तस आहे का ? नाहीतर आपल्या मुलाप्रमाणे ........ पण , हा सोहम खर , बोलतोय की खोट ते कस ओळखायचे . आपण .....आपल्या मुलाला तरी कुठे ओळखू शकलो . पण , निशाला काय वाटत , हे ही महत्वाच आहे . तीच जर सोहम वर प्रेम असेल .तर आपण तिला ते मिळवून द्यायला मदत केली पाहिजे .
ईकडे सोहम अभ्यासाबरोबर बाबांना ऑफीस मधे सूध्ह मदत करू लागला . त्याच्यातला हा बदल त्याच्या आईवडिलांना मात्र फार आनंद देऊ लागला होता .त्यांचा मुलगा त्याना परत मिळाला होता अगदी त्याना हवा तसा . पण हा बदल त्याच्यात कसा जाहला , हे मात्र त्याना माहीत नव्हते . सोहम मात्र कॉलेज मधे जाऊन सुद्धा निशाशी बोलत नसे .तिला फोन करत नसे . कारण त्याला तिच्या मनात त्याच्याविषयी ओढ निर्माण करायची होती . तीने ही त्याच्यावर तितकाच प्रेम कराव अस त्याला वाटत होत . आणि त्याचा हाच डाव निशाच्या वर्मी लागला . तिला सोहम शिवाय काहीही सुचेना .तिची प्रत्येक रात्र ही रडून च पार पडत होती .कॉलेज मधे ही तीच फारस लक्ष नसे . तिची नजर प्रत्येकवेळी सोहम लाच शोधत असे. तिच्या मनाने कबुली दिली , की सोहम वर तीच खूप प्रेम आहे . पण तीच कर्तव्य , ह्या जगाच्या चालीरीती नेहमी आडव्या येत आणि ती शांत बसे . सोहम च्या अयुषत खूप सुख यावे असे तिला नेहमी वाटे . त्याच्या योग्याते ची त्याला कोणीतरी मिळावी . अस तिला वाटे .
ईकडे निशाच्या बाबा नी सोहम विषयी माहिती मिळवण्यास सुरवात केली . आणि त्याना बऱ्या पैकी ती मिळाली ही , सोहम हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता .फार वर्षापुर्वी त्याचे आई वडील गावावरून पळून आले . आणि शहरात येऊन त्यानी प्रेमविवाह केला . एथे आल्यावर त्यानी खूप कष्ट करून , हॉटेल चा धंदा टाकला .त्यांचे आता प्रत्येक शहरात हॉटेल आहे . देवाच्या दयेने त्यांच्या कडे सगळं होत . पण , त्याचा मुलगा ' ' सोहम ' ' तो मात्र वाईट वळनाला लागला होता . कॉलेज मधे जाऊन टिंगलटवाळक्या करणे , अभ्यास न करणे . मित्रांसोबत पार्ट्या करणे , दारू पिणे . हे सगळं तो करत होता .पण आता त्याला काय जाहले होते काय माहीत , पण आता तो सुधारला होता , त्याने वाईट गोष्टी सगळ्या सोडून दिल्या होत्या . निशाच्या बाबांना एकंदरीत सोहम आवडला होता .
सोहमचा शिक्षणातला रस पाहून त्याच्या बाबांनी त्याला बाहेरगावी शिकायला पाठवायचे ठरवले . त्याने अनेक पध्तिने त्याना नकार देण्याचा प्रयत्न केला .पण ते काय तयार होईना. त्याला निशाला सोडून जाणे शक्य नव्हते . त्याला वाटले जर त्याने तिच्याशी अबोला धरला , तर ती कदाचित तीच प्रेमाची कबुली देयील .पण तस काहीच होत नव्हत. शेवटी त्याला त्याच्या बाबांचे म्हणणे ऐकावे लागणार होते . त्यानी बाहेरगावी जायची तयारी केली . उद्या सकाळी तो जायला निघणार होता . रात्री त्याला झौप्च येयीणा .सारखी निशाची आठवण त्याला येत होती . तिच्या सोबत घल्वलेले आनंदाचे क्षणाची आठवण त्याला येत होती . निशाला जाताना भेटून जावे , अस त्याला खूप वाटे .पण , तस करून काही उपयोग नव्हता .गेली दोन महिने ते एकमेकशी बोलत नव्हते . आणि त्यानी ही ते मान्य केले होते , की निशा च त्याच्यावर प्रेम होत .त्याच्या मनाला खूप वाईट होत . तो असा विचार करत होता , तोच त्याचा फोन वाजला . त्याला आता कोणाशीही बोलण्याची ईछ्या नव्हती . त्याने फोन तसाच बाजूला ठेवला . तो उठून खिडकी जवळ आला .त्याची एक नजर आकाशा कडे गेली .किती चांदण्या सुंदर चमकत होत्या . पुन्हा फोन वाजला .पुन्हा त्याने दुर्लक्ष केले .
आता अर्धा तास उलटून गेला होता . त्याला खूप झौप आली होती . तो झौप्ण्यासाठी बेडवर आडवा पडला . पुन्हा फोन वाजू लागला .आता मात्र त्याला फार राग आला . त्यानी तो फोन रागाने उचला .पाहतो तर काय ? निशा चा फोन . तिने आधी पंधरा मीस कॉल दिले होते . सोहम ला आता स्वतःचाच राग येऊ लागला . ती कोणत्या प्रॉब्लेम मधे तर नसेल ना ? तिने दोन महिन्या नंतर फोन केला होता .आणि ते पण एवढे मिस कॉल . सोहम कोणता ही विचार न करता तिला फोन केला . रिंग वाजली . पहिल्याच रिंग मधे निशानी फोन उचला . समोरून आवाज आला , ' हेलो ' , मी निशा , सोहम मी तूझ्या घराजवळ आहे , तू आता मला भेटू शकतोस का ? सोहम ला काही समजेना .तो लगेच म्हणाला हो चालेलना .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED