prem - 6 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भाग -6

सोहम हळूच कोणाला ही न सांगता घराच्या बाहेर आला . समोर निशा उभी होतीच . सोहम ला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली . सोहमला तर काही काळेनाच . ती सोहम ला घट्ट पकडून च म्हणाली . सोहम माझ तूझ्यावर खूप प्रेम आहे .मी हे प्रेम लपवण्याचा खूप प्रेम केला .पण , नाही लपवू शकले .' ' उद्या तूझ लग्न आहे .' ' मला नाही ते सहन झाले . उद्या पासून तू दुसऱ्या कोणाचा तरी होणार . मला माहीत आहे .मी तुला अस नव्हत भेटायला यायला पाहिजे होत , पण मला एकदा तुला भेटायच होत .बघायच होत . तूला फोन केला .तू काही फोन उचला नाहीस .म्हणून मीच आले .तुला भेटायला . तू सुखी राहावे एवढेच मला वाटतय . तू ज्या मुलीशी लग्न करशील .तिला नेहमी आनंदात ठेव . ती जरा भानावर आली . ती त्याच्या मिठी तून जरा बाजूला झाली . अरे , मला तुला एकदा डोळे भरून पहायचे होते .ते मी पाहील . सोहम ला तर निशा काय बोलते ते काहीच कळेना .लग्न कोणाचे लग्न ? कोणाशी ? आणि ते पण उद्या ? तुला कोणी सांगितले . मी तर उद्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार आहे . तुला कोणी सांगितले , की उद्या माज लग्न आहे . यावर , निशा म्हणाली , बाबांनी सांगितल ........ सोहम आणि निशा दोघे विचारात पडले बाबांनी अस खोट का ? सांगितल असेल ? पण , सोहम लगेच म्हणाला , काहीही असो , तू तूझ प्रेम व्यक्त तर केलस . आणि मी फ़क्त लग्न तुझयशीच करणार .मग बघत बस मला अयुष्भर . सोहम च्या बोलण्यावरून दोघेही हसू लागले .
खूप वेळ झाला , कसला तरी कुजबुजन्याचा आवाज येत होता . म्हणून सोहम ची आई बाहेर पाहायला आली .तर सोहम आणि आणि एक मुलगी एकमेकावर असणाऱ्या प्रेमाची कबुली देत होते . सोहम च्या आईला ते द्रुष्य पाहून धक्काच बसला . आपला मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो काय , ती मुलगी त्याला भेटायला एवढ्या रात्री येते काय ? आणि तो आणि ती मुलगी त्यांच्या प्रेमाची कबुली देते काय ? आणि आपल्याला ह्यातील काहीच माहीत नाहीं . म्हणजे सोहम मधे जो बदल घडला तो ह्या मुलीमुळे तर नसेल . ह्या गोष्टी बदल मला सोहम आणि त्याच्या बाबांन शी बोललेच पाहिजे . म्हणून सोहम ची आई घरात आली . ईकडे रात्र जाहली म्हणून , सोहम निशा ला सोडवायला तिच्या घरी निघाला .सोहम नी गाडी काढली आणि तो निघाला . निशाचे घर येताच सोहम नी गाडी थांबवली . समोर बघतो तो काय ? निशाचे बाबा दारात ऊभे. समोर बाबाना पाहून निशा आणि सोहम दोघे ही घाबरले . बाबांनी त्या दोघांना आत यायला सांगितले . दोघे ही आतमधे आले आणि सोफ्यावर बसले . बाबा सांगू लागले .त्यानी निशाला सोहम च लग्न ठरलय ह्यासाठी सांगितल होत , की जे काही निशाच्या मनात आहे ते ओठावर यावर . आणि तसच जाहले . बाबांनी निशा आणि सोहम च्या लग्नाला परवानगी दिली . त्यानी त्याच्या गावाकडची जमीन विकण्याचा निर्णय घेतला .त्या पैशातून ते , आई च ऑपरेशन आणि निशा च लग्न करणार होते. निशाच्या बाबांनी सोहम च्या आई वडिलांना लग्नाविषयी बोलणी करायला बोलावले . सोहम ही हसत ' ' हो ' ' म्हणून निघून गेला .
सोहम घराजवळ आला . घराजवळ येताच , सोहमनी हळूच गाडी पार्क केली . आणि बेडरूम मधे येऊन तो झोपी गेला. पण , सोहम च्या आई च मात्र पूर्णपणे लक्ष सोहम वरच होत . तो घरात येयी , पर्यन्त ती जागीच होती . सोहम येताच तीने बेडरूम मधे जाऊन झौप्णयाचे नाटक केले . रात्रभर काही तिला झौप आली नाही .पण , ह्या प्रकऱणा बददल उद्याच सोहम शी बोलू .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठ्ताच सोहम च्या आई ने सोहम च्या बाबांना रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल सगळं सांगितल . सोहम च्या बाबांना ही ते ऐकून सोहम च्या आई प्रमाणे धक्का बसला . पण , नक्की सोहम च्या मनात काय आहे .हे जाणून घेणे ही महत्वाचे होते .त्यानी सोहम ला आवाज दिला . बाबांची हाक ऐकताच सोहम ला जाग आली . सोहम ला काही कळेना , सकाळी सकाळी बाबांनी कशासाठी बोलावले असेल . फार विचार न करता तो खाली बाबांकडे आला . सोहम येताच बाबांनी त्याला बसायला सांगितले . सोहम सोफ्यावर बसला . बाबांन सोबत आई ही उभी होतीच . सोहम च्या आई वडिलांनी एकमेकाकडे पाहिले . आणि बाबा बोलू लागले .' ' अह्मला , अस कळल की तुज एका मुलीवर , प्रेम आहे .' ' आणि ती मुलगी रात्री एथे तुला भेटायला आली होती . आणि नंतर तू तिला सोडायला तिच्या घरीही गेला होता . हे खर आहे का ? एवढे बोलून उत्तरे च्या आशेने सोहम च्या आई बाबांनी सोहम कडे पाहिले .
आता आई बाबांना सगळेच कळल्यामुळे त्याच्या पासून लपवून काहीच उपयोग नाही . आणि तसे पण तो निशा विषयी घरी सांगणार होताच . त्याने एक मोठा श्वास घेतला .आणि तो सांगू लागला . ' ' हो , बाबा तुम्ही जे बोललात , ते अगदी खर आहे . ' ' तीच नाव निशा , आमच्या कॉलेज मधे शिकवते . घरी तिच्या तिचे आई वडील असतात . म्हणजे ..........म्हणजे तिच्या आधीच्या नवऱ्याचे आई वडील , पण ती त्याना आई वडील च मानते .आणि ते ही तिला मुलगीच मानतात . मधेच , त्याची आई ओरडली , काय तिचे आधी लग्न जाहाले ? आहे , आणि अश्या मुलीवर तू प्रेम करतोय ? ......अग , आई माझ जरा ऐक .ती खूप चांगली मुलगी आहे . हो, तीच आधी लग्न झाले होते , पण आता तिने घटस्फोट घेतलाय .आणि तो मुलगा चांगला ही नव्हता . त्यानी तिच्याशी तिला फसवून लग्न केलय .त्याच आधी लग्न झाले होते , हे त्याच्या आई वडिलांना ही माहीत नव्हते . जेव्हा त्याना हे कळल तेव्हा त्यानी तिची साथ दिली . त्यानी त्याच्या वडिलांची सगळी संपती स्वतः च्या नावावर करून घेतली . आणि त्याना घराच्या बाहेर काढले . पण , निशानी त्याना स्वतः च्या आई वडिलांन सारखे सांभाळते . एवढी चांगली मुलगी आहे निशा .
बाबांनी सोहम चे ऐकून घेतले . त्यानी सोहम ला विचारले , जर अह्मला ती मुलगी पसंद नसेल तर ? अस , नाहीच होणार बाबा , ती खूप गोड मुलगी आहे .सगळ्याना आपलस करते . तुम्हा दोघांना पण ती खूप आवडेल . सोहम खूप आत्मविश्वासाने म्हणाला . सोहम , तुमच प्रेम लग्नापर्यन्त गेलय का ? सोहम च्या बाबांनी त्याला प्रश्न विचारला . हो, बाबा मला तिच्याशीच लग्न करायचय . सोहम परत आत्मविश्वासाने म्हणाला .........पण , ..........आह्मी तयार नसलो तर , ह्या लग्नाला सोहम चे बाबा म्हणाले .




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED