Prem - 8 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भाग -8

अट , .....कोणती अट ? सोहम जोरात ओरडला . त्याच्या आवाजाने बाबा जरा घाबरलेच .पण , पुन्हा स्वतःला सावरत . म्हणाले , अरे .... तू समजातोस ? तस , काही नाही . एवढ्यात त्याची आई तिथे आली . तिने बाबाचे बोलणे ऐकले होते . पण , काहीतरी त्याच्या डोक्यात चाललय ? हे सोहम च्या आईने ओळखले होते .पण , त्याचा थांग मात्र लागत नव्हता . बाबा बोलू लागले , ' ' अरे , तू आमचा , एकुलता एक मुलगा , आमच्या ही काही अपेक्षा आहेत की नाही , तुझ्याकडुण ? ' ' तू शिकावे , मोठे व्हावे , हा व्यवसाय सांभळावं .अस अह्मल ही वाटते रे ...... जेव्हा मी तुज्याएव्ढा होतो , तेव्हा मला मुंबईला , जाऊन मोठ्या कॉलेज मधून ' ' बिज़्नेस विषयी ' ' शिक्षण घ्यायच होत .पण , परीस्तीथी मुळे ते नाही घेता आले . पण , तू ते शिक्षण घ्यावे अस , मला वाटतय . पण , तिथे जायचे का नाही ? ते तू ठरवायचे ........सोहमला बाबांचे म्हणे पटले . ' ' मुलगा म्हणून त्याच्या ही काही अपेक्षा असतीलच की , आणि त्या पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे . ' ' त्याने मुंबईला पुढील शिक्षण घ्यायला जाण्यास परवानगी दिली .' ' त्याने परवानगी देताच बाबा खूप खूष जाहले . बाबांचा आनंद पाहून सोहम ही खूष जहाला. सोहम बाबाना म्हणाला , मी पुढील शिक्षणासाठी मुंबईला जावे ? हीच तुमची अट होती ना . आता जरा शांत होत बाबा म्हणाले , नाहीं माझी अट दुसरीच आहे . दुसरी अट .....कोणती ? सोहम विचारात पडला .जरा शांतता पसरली .थोड्या वेळाने बाबांनी बोलायला तोंड उघडले . त्यानी सोहम च्या डोळ्यात पाहिले , आणि धाडसाने म्हणाले . जोपर्यंत तूझे मुंबईतील शिक्षण पूर्ण होत नाही , तो पर्यन्त तो निशाशी लग्न करू शकत नाही . सोहमला छोटासा धक्का बसला , त्याने बाबाना प्रश्ननर्थिक नजरेने विचारले .' ' बाबा , अस का ? ' ' थोडा वेळ थांबून पुन्हा बाबा बोलले . अरे , निशा सून म्हणून अह्मला, आवडली आहे .ती हुशार आहे .उच्चशिक्षित आहे , स्वतः च्या पायावर उभी आहे , ती नोकरी करते .........पण , तुज काय ? तू काय करतोस ? तुज शिक्षण पूर्ण नाही .तू माझ्या ऑफीस मधे मला मदत करतोस . पण , तूझ अस स्वतःच काय आहे . खरतर तू ती कंपनी एकट्याने सूध्ह नाही सांभाळू शकत . म्हणून मला असे वाटते की , तू आधी शिक्षण पूर्ण करावे आणि मग लग्न . सोहम ला ही बाबाचे म्हणने पटत होते . पण शिक्षण पूर्ण होई पर्यन्त निशा पासून कसे लांब राहायचे .मी मुंबईला जाणार ती एथे राहणार , मग अह्मला भेटायला पण नाही भेटणार , आणि निशा शिवाय आपण राहू ही शकणार नाही . आणि बाबांचे मन ही नाही मोडता येत . ' सोहम ला काय करावे ते काळेंनाच .' ' त्याने थोड्या वेळासाठी विषय टाळायचा ठरवला . त्यामुळे बाबाना सांगून तो रूम मधे शिरला .
सोहम च्या बाबांचा सोहमला मुंबईला पाठवण्यात वेगळाच प्लान होता . त्याना त्याला निशा पासून दूर करून ' ' अंजली ' ' त्यांच्या मित्राच्या मुलीच्या सहवासात आणायचे होते . सोहमच्या बाबांनी प्लान बनवला .आणि त्यात सोहम अडकला .सोहम ला त्याच्या बाबांचे म्हणे पटले .आणि त्याने मुंबईला शिक्षणासाठी जायचे ठरवले . त्यानी हे सगळं निशाला ही सांगितल .निशानी ही त्याला मुंबईला जायला होकार दिला . पण , निशाच मन मात्र दिन्धा स्तीत होत . आपण , सोहम ला मुंबईला पाठवून योग्य केले की नाही , ह्या विचारात च ती होती . पण , सोहम ने मात्र ठरवून टाकले होते .मुंबईला जायचे .तीन वर्षात शिक्षण पूर्ण करायचे आणि मग निशाशी लग्न करून ऑफीस सांभाळायच त्याबरोबर आई बाबाना ही सांभाळायच आणि सुखाचा संसार करायचा .
जाहले सोहम मुंबईला जायचा दिवस आला , सोहम मुंबईला जाणार म्हणून त्याच्या आईला खूप वाईट वाटत होते . पण , कदाचित तो मुंबईला गेल्यावर निशाला विसरून ही जयील , म्हणून त्याना जरा हायस वाटत होत .त्याना सोहम च्या बाबाच्या डोक्यात काय चाललय ह्याची जरा सुधा कल्पना नव्हती . याउलट सोहम चे बाबा मात्र खूप खूष होते .त्याचा प्लान आता अमलात येणार होता . निशाच्या जागी अंजली सून म्हणून ह्या घरात येणार . आणि त्याचा व्यवसाय ही पुढे नेहनार .
निशाची मात्र रडून वाईट अवस्था झाली होती , पण , सोहम साठी तिने ते मुकाट्याने गिळल होत . जर सोहम ला ते कळल तर तो मुंबईला जाणार नाही .ईकडे सोहम मुंबईला जायला निघाला .लागणारे सगळे सामान त्याने काळजीपूर्वक घेतले होते . सोहम च्या बाबांनी त्याला पुढील अभ्यासासाठी उपयुक्त असा लेपटॉप ही भेट म्हणून दिला होता . सोहम ला मुंबईला सोडवयाला त्याची गाडी येणार होती . सोहम जाता जाता निशाला भेटून पुढे मुंबईसाठी निघणार होता . सोहम ने आई वडिलांचा रीतसर निरोप घेतला . आणि तो मुंबईला जायला निघाला . वाटेत निशाच घर लागले . तो निशाच्या घरी गेला .निशाला भेटला .आणि कितीतरी मैलाचा प्रवास करून मुंबईत आला .
मुंबईत त्याच्या राहण्याची सोय त्याच्या वडिलांच्या मित्राच्या घरी म्हणजे अंजलीच्या घरी केली .सोहम मुंबईत आला . सगळं कस फिरत चित्र होत मुंबईत .कोणाला कोणासाठी वेळच नव्हता . सोहम ला ह्या सगळ्याची सवयच नव्हती . तो अंजलीच्या घरी आला , पण त्याच्या आई वडिलांनी त्याचा योग्य असा आदरसत्कार केला . त्याची योग्य काळजी घेतली . शिवाय अंजली मुळे त्याला एक चांगली मैत्रिण ही मिळाली .त्यामुळे सोहम ला फारस एकट वाटत नव्हते . पण , त्याला निशाची मात्र खूप आठवण येत होती . राहून राहून एक सारखा तिचाच चेहरा त्याच्या डोळ्या समोर येत होता .
जाहले , नवीन कोर्सला सुरवात जाहली . नवीन कॉलेज , नवीन मित्रमैत्रिणी , नवीन शहर सगळं कस नवीन नवीन होत . सोहम च ह्या नवीन साच्यात ढालयाचा प्रयत्न चालू होता . त्यात त्याला अंजली ची साथ मिळाली .अंजली खरच खूप गोड मुलगी होती . सोहम ला पाहिजे ती मदत ती करत होती . सोहम मधे ती एक चांगला मित्र पाहत होती .
जाहले , कॉलेज चालू होऊन चार महिने जाहाले , परीक्षेचे दिवस चालू जाहले . नोट्स काढणे , ते एकमेकांना शेर करणे . कॉलेज मधे सगळं अस चालू होत .
सोहम मनापासून अभ्यास करत होता . त्याला काही करून कॉलेजमधे प्रथम यायच होत . अंजली ही मनलावून अभ्यास करत होती . रात्र रात्र जागून नोट्स काढत होती . एके दिवशी रात्री सोहम आणि अंजली रात्रीचे एकत्र अभ्यास करत बसले होते . अचानक काहीतरी जाहले , आणिअंजली चक्कर येऊन पडली .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED