bhakt chokhamela books and stories free download online pdf in Marathi

भक्त चोखामेळा

🌹महाद्वारीचा भक्त चोखामेळा🌹

🌹संत तेथे हरी... हरी तेथे संत...🌹.या उक्तीप्रमाणे भगवंत जिथे आपले भक्त राहतात...तिथे त्या त्या स्वरूपात प्रकट होतात.... आजच्या कथेत देव आपल्या भक्तांसाठी महार झाला ...
त्या संतांचे नाव भक्त चोखामेळा ... नामदेवाच्या काळातील वारकरी संप्रदायाचे संतकवी होते......
पंढरपूर पासून दूर राहणारे महार समाजाचे चोखामेळा...आपल्या भावभक्तिने देवालाही महाद्वारी येऊन दर्शन द्यावे लागले...असे महान भक्त👏👏
चोखामेळा यांच्या जीवनावर फक्त "महाद्वार ,"ही एकच कादंबरी लिहिली आहे...

🌹चोखा प्रेमाचा सागर....
चोखा भक्तीचा आगर..
चोखा प्रेमाची मावली..
चोखा कृपेची सावली🌹...
असे वर्णन संतांनी चरित्रग्रंथ मध्ये केले आहे...

त्यांच्या जन्माचे किंवा त्यांच्या मातापित्यांची माहिती नाही किंवा कुठेही उल्लेख आलेला नाही..त्यांचे स्वतंत्र असे चरित्रग्रंथ ही नव्हते.. म्हणून काहींनी त्यांना ईश्वर कृपेचे फळ असे संबोधले आहे..
.स्पृश्य अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या काळात चोखोबा यांना मंदिरात प्रवेश नव्हता.. गावगड्यातील शिवाशिवी चे वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता.. ते खूप अस्वस्थ झाले होते..त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता . पण देवाने त्यांना जवळ केले..
भगवंताचे वर्णन ऐकूनच ते मनापासून देवाचे नामस्मरण करीत होते..... त्यांना संतसंग लाभला... इतरा प्रमाणे त्यांनाही विठलाला उरा उरी भेट द्यावीशी वाटत होती.., वरच्या जातीचे लोक देवाला जवळून भेटतात त्यांच्या पायाचे तीर्थ घेतात पण आपण मात्र या सगळ्यांपासून वंचित आहोत.. अशा भावनेने ते उद्विग्न होत असे.. समाजातील स्पृश्य-अस्पृश्य वातावरणामुळे त्यांना कधीही देवाला जवळून पाहता आले नाही, परंतु ते सावळे गोजिरे रूप त्यांना महाद्वारातून च पहावे लागत असे,ही त्यांची खंत होती ..😔असं कोणतं पाप आम्ही केलं होतं म्हणून आमच्या जन्मी असे भोग यावेत की विठ्ठलाला जवळून पाहताही येऊ नये 😣😣

देव भवभक्तीचा भुकेला आहे, त्यांनी चोखोबांच्या हातून दही ताक खाल्ले.. चोखोबनी आपल्या अभंगातून भक्तीचा मार्ग आपल्या समाजबांधवांना दिला..🌹
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...
काय भुललासी वरलिया रंगा..

संत चोखामेळा हे ज्ञानेश्वर नामदेव यांच्या काळातले होय..
एकदा ते पत्नी सोयरा सोबत एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला आले...वारकऱ्यांच्या दिंड्या आल्या होत्या...सगळे वाळवंट फुलून गेले होते.. तेथे चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेव कीर्तन करत होते. सगळं वातावरण विठ्ठलमय झालं होतं.. तेथे बराच जनसमुदाय गोळा झालेला होता म्हणून चोखामेळा व त्यांच्या पत्नी तेथेच पण जरा लांबूनच त्या कीर्तनाचा आनंद घेत होते.. पत्नी सोयरा ही पतीनिष्ठ व विठ्ठलाची भक्त होती.. किर्तन झाल्यावर लोकांनी संत नामदेवाच्या पायी दर्शन घेत होते.. चोखामेळा यांना खूप भरून आलं व रडू आले ते आपल्या पत्नीला म्हणू लागले सोयरा बघ आपल्याला पांडुरंगाच्या दरबारात जाता आले नाही तरीही पांडुरंगाने आपल्याला नामदेवाच्या रुपाने या चंद्रभागेच्या तीरावर अच् दर्शन दिले आहे आज मला नामदेवा मध्येच पांडुरंगाचे स्वरूप दिसते आहे... नामदेवा मध्ये पांडुरंगाने आपल्याला देव दर्शन दिले आहे

काही वेळाने जनसमुदाय कमी झाल्यावर नामदेवाचे लक्ष या उभ्यांतावर गेले...तसे त्यांनी त्यांना जवळ बोलावून घेतले... संकोच याचे कारण विचारले तेव्हा चोखोबा म्हणाले महाराज मला काही अधिकार नाही तुमच्या चरणांना स्पर्श करण्याचा... नामदेव म्हणाले माणसं जरी तुम्हाला जवळ करत नाही पण देव मात्र भावाचा भुकेला आहे .. हे सगळं माणसांच्या अज्ञानामुळे आहे माणसांनीच माणसासाठी तयार केलेलं हे दृश्य अस्पृश्यच जाळ आहे..
चोखामेळा व त्यांच्या पत्नी लांबूनच पण नामदेवांच्या चरणांना स्पर्श न होता त्यांच्या पायाखालच्या मातीला नमस्कार केला... नामदेवांनी चोखामेळा च्या डोक्यावर हात ठेवून तीन वेळेस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असे म्हणाले..
चोखोबा चं अंग शहारलं.. नामदेवा कडून चोखोबांना विठ्ठल..... भक्तीचा नाममंत्र प्राप्त झाला...
. नामदेव हेच चोखोबाची पारमार्थिक गुरु होते. ...
संत चोखोबांनी अनेक अभंगातून आपली मुख आक्रंदन समाजासमोर मांडले...

🌹चंदनाच्या देव्हार्‍यात उभा पांडुरंग..
मुकेपणा आज माझा आळवी अभंग...

झिजविला देह सारा उगळीला जन्म ..
तेव्हा माझ्या हाती आहे खरा देवधर्म..
नका करू कोणी माझ्या समाधी चा भंग....

सोनियाची माती मातीचे सोने...
जोडलेले नाते तोडलेले धागे...
हातपाय असोनिया झालो मी अपंग...

चोखा म्हणे माझ्या जीवीचे जीवन..
वेळोवेळी पायी डोयी मी ठेवीन...
तुझे नाम गाता गाता गाथा गाईन....🌹

चोखोबा विठ्ठलाच्या भक्तीत एवढे रमले होते की त्यांना आजूबाजूचे कसलेही भान राहत नव्हते .. असाच एक एक विठ्ठलमय प्रसंग.. त्यांच्या पत्नी सोयराबाई या गर्भवती होत्या त्यांना जवळचे असे कोणीच नसल्याने त्यांच्या प्रसूतीच्या वेळी चोखोबा आपल्या बहिणीला आणण्यास म्हणून गेले..🙃
बहिणीचे घर लांब असल्याने ते घरातून पहाटेच निघाले होते वाटेत त्यांना वारकऱ्यांचा मेळा दिसला .. संत दिसतात चोखोबा करून येणे त्यांच्या भजन-कीर्तनात सामील झाले... संतांनी विठ्ठल नामाचा गजर चालू केला होता या सगळ्यात चोखोबांना आपल्या घरी परिस्थिती काय आपण करतो काय आपण कशासाठी आलो होतो आणि आपल्याला लवकरात लवकर घरी जायचे आहे असे कुठलीच भान राहिले नाही.👏👏
.. तिकडे पंढरपुरात विठ्ठलाला मात्र विटेवरी उभ्या राहिल्या जाईना... भगवंत रुक्मिणी मातेला म्हणाले :;हे जगत जननी माझा भक्त तिकडेच रमला आहे . तिकडे त्याच्या घरी त्याच्या पत्नीला प्रसूती कळा चालू झाले आहे ....तरी तू तिची मदत करण्यासाठी जातेस काय???
रुक्मणी म्हणाली भगवांता चोखोबा एक गरीब आहे आणि मी लक्ष्मी असल्याकारणाने मी गरिबाच्या घरी जात नाही... तरी तुमचे भक्त आहे तुम्हीच सांभाळून घ्या..🤗
सोयराबाईला प्रसूती वेदना होत होत्या त्यांच्या घरी वडीलधारी कोणीच नसल्याने त्या चोखोबाच्या बहिणीची वाट पाहत होत्या.. विठ्ठलाने चोखोबाच्या बहिणीचे हुबेहुब रूप धारण केले ...अंगावर फाटक्या चिंध्या आणि डोक्यावर बाळंतपणासाठी लागणारे साहित्य घेऊन झपाझप चोखोबाच्या झोपडीबाहेर आली.. सोयराबाई म्हणाल्या अक्काबाईसा तुम्ही खूप खुप लवकर आल्या.. तेव्हा भगवंत रूपातील अक्काबाईचा म्हणाल्या हो चोखोबा तिकडे सांगता ची मांदियाळी आहे ना तिथे आहे म्हणून मीच पुढे आले...
इकडे सगळे वारकरी कीर्तन संपल्यावर पंढरीनाथाच्या दर्शनास निघाले... आता चोखोबा ही लगबगीने आपल्या बहिणीच्या घरी तिला आणण्यास निघाली... आणि घेऊन घराकडे निघाली तोपर्यंत सोयराबाई ना पुत्ररत्न प्राप्त झाले होते . . त्याचे नाव कर्ममेळा असे ठेवण्यात आले....भगवंतांनी त्यांचे बाळंतपण करून कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते.. चोखोबा घरात येताच म्हणाले वाईच उशीर झाला,संत मंडळी चे दर्शन झाल्याने अक्काला घेऊन येण्यास उशीर झाला तेव्हा सोयरा म्हणाल्या नाही तुम्हालाच वेळ झाला असेल अक्काबाईचा तर केव्हाच आल्या आणि आता कपडे धुण्यासाठी नदीवर गेले आहेत.....
. तेव्हा चोखोबा आश्चर्यचकित झाले आणि ध्यानमग्न होऊन त्यांनी विठ्ठलाचा धावा चालू केला विठ्ठला हे सगळे तूच केले आहेस तुझ्याशिवाय कोण आहे जे मला वेळोवेळी मदत करणार????
आणि ते धावतपळत चंद्रभागेच्या तिरी विठ्ठलाला भेटण्यास निघाले तोपर्यंत भक्तांचा कैवारी तिथून निघून गेले होते ...पण नदीतीरी कपडे वाळत होते विठ्ठलाच्या पायाच्या खुणा वाळूमध्ये उमटलेल्या होत्या ...अबीर बुक्का तसेच तुळशी मंडळाचा घमघमाट सुटला होता ...आता मात्र चोखोबा धाय मोकलून रडू लागले... भगवंतांनी मला दर्शन दिले नाही??? माझ्या घरी येऊन काम करावे लागली.... आक्रंदन करू लागली चोखोबाचे आक्रंदन पाहून विठ्ठलाने त्यांना विराट रुपात दर्शन दिले .,💞

चोखोबांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने ते मजूर म्हणून कामाला जातात काम करतानाही ते सतत विठ्ठलाचा नामजप करत असेच एकदा मंगळवेढ्यात एका वाड्याचे बांधकाम चालू असताना वाड्याची भिंत मजूर असलेल्या बाजूने पडली व त्या खाली चोखोबा सहित अनेक मजूर गाडले गेले आणि चोखोबा विठ्ठल लीन झाले...पुढे संत नामदेवांच्या स्वप्नात येऊन भगवंतांनी दृष्टांत दिला की जाऊन चोखोबांच्या अस्थी घेऊन या...ज्या अस्ती तुन विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू येईल त्याच चोखोबाच्या अस्थी असतील... नामदेव गेले आणि प्रत्येक अस्थी कानाला लावून बघितल्या त्यात कुणा मधूनही आवाज येत नव्हता वाड्याच्या एका बाजूला कोपऱ्यात पडलेल्या अस्थी त्यांनी कानाला लावलेल्या आणि त्यातून विठ्ठल विठ्ठला चा आवाज येऊ लागला नामदेवांनी त्या आपल्या पीतांबरा मध्ये गुंडाळून घेतल्या आणि धावत पळत मंदिरात आले... विठ्ठल चरणी त्या अस्थी ठेवल्या...

💞त्यानंतर विठ्ठलाने नामदेवाला सांगितले की स्पृश्य अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या या समाजात माझ्या भक्ताने खूप काही सुचला आहे...माझे भक्त जेव्हा माझ्या दर्शना स्थितीतील त्यावेळेस प्रथम त्यांना चोखोबाची दर्शन घ्यावीच लागेल त्याशिवाय माझ्या दर्शनाचे फळ मिळणार नाही..💞.

💞धन्य तो पांडुरंग आणि धन्य त्याची भक्तमंडळी💞
आजही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या महा द्वारासमोर असलेली चोखामेळा महाराज यांची समाधी व मंदिर आहे..🌹. अशा या संताना माझे मनःपूर्वक मानवंदना...🌹

क्रमशः
(टिपःमाझ्या माहितीप्रमाणे मी प्रत्येक कथा सादर करीत आहे चरित्र ग्रंथांमध्ये अनेक प्रकारे लिहिले गेले आहे तरी मी तुम्हाला समजेल अशी लिहिते आहे..माझ्याकडून काही चूक उणिवा असल्यास हक्काने कळवा यापुढेही मी असेच दृष्टांत लिहिणार आहे तरी मला सगळ्यांनी वाचून कमेंट नक्की करा त्याने मला प्रोत्साहन मिळेल... वाचतात सगळेच वेळात वेळ काढून कमेंट करत जा... तुमच्या-आमच्या मधील, 💞 archu💞)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED