संत सावता माळी Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संत सावता माळी

🌹संत सावता माळी 🌹

ज्याचे स्मरण केल्याने पापाचा नाश होतो...तो म्हणजे हरी..
पांडुरंगाचे नामस्मरण केल्याने तो आपल्याला प्राप्त होतो...

सोलापर जिल्ह्यातील आरण हे गाव संत सावतामाळी यांचे मुळगाव आहे.. दैव माळी हे सावतोबाचे आजोबा... पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुले होती...पूर्सोबा आणि डाँग्रोबा... पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते आपला पारंपारिक शेती व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत व पंढरपूरची वारी नित्यनेमाने करीत होते.. सदू माळी यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला .. या दांपत्याच्या पोटी साउतोबा यांचा जन्म झाला.. सावतोबाना लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची आवड होती ते विठ्ठल भक्तीमध्ये रमान झाले होते,.

आरं गावाचे वर्णन करताना संत नामदेवांनी म्हटले आहे..
🌹 धन्य ते आरण रत्नाची ती खान ..
जन्मला निदान सावता तो..
सावता सागर प्रेमाचे प्रेमाचे आगर
घेतला जन्म माळी या घरी..

धन्य त्याची माता धन्य त्याचे पिता
साठविला दाता त्रेलोक्याचा...

नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला ...
वंशी उद्धरी ला माळी याचा...🌹

आपल्या कोणतंही काम असो त्या कामातच आपण देव शोधला पाहिजे..." कर्मातच परमार्थ आहे "कर्म केल्याने देखील देव प्राप्त होऊ शकतो हे सावतोबाणी अवघ्या जगाला दाखवून दिले...
🌹 कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई माझी🌹
असे म्हणत त्यांनी निष्ठेने आपले काम चालू ठेवले ...प्रत्येक कामात हे नामस्मरण करत होते..त्यांनी आपल्या कामालाच ईश्वर मानले होते ,म्हणूनच काय की ईश्वरांना देखील त्यांना भेटायला त्यांच्या मळ्यात यावे लागले ...त्यांची ईश्र्वरावर असलेली अपार आणि गाढ श्रद्धा आणि सतत चे नामस्मरण ्यांची ईश्‍वराशी भेट घडून दिली होती.. म्हणून ते आजही समाज बांधवांना आपल्या अभंगातून प्रबोधन करताना दिसतात ...अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी देखील जनसमुदायाला संदेश दिला...
फळे फुले भाज्या आदींचा पारंपारिक व्यवसाय करत होते..

🌹आमची माळीयाची जात
शेती लावू बागायत 🌹
लसूण मिरची कोथंबीरी
अवघी विठाई माझी 🌹 ते एका अभंगातून म्हणतात..
अरगावापासून जवळच दोन मैलावर असलेल्या भेंड गावाच्या जनाई नामक मुलीशी सावतोबा चा विवाह झाला.. त्यांना विठ्ठल व नागा ताई अशी दोन अपत्ये झाली जनाई ह्या पण विठ्ठल भक्तीत होत्या..
एकदा नागा ताई ही आपल्या बाबाला सावतोबा बाबाना म्हणू लागली की आपणही पंढरीला जाऊ, पांडुरंगाचे दर्शन घेऊ सगळे जातात .मग आपण का जात नाही??? असे सांगतात की पांडुरंगाचे एकदा दर्शन झाले की तिथून परत यावस वाटत नाही.. म्हणून आपणही जाऊ तेव्हा तेव्हा म्हणाले अरे बाळा सगळ्यांनीच वारीला गेले तर कसं होईल??? येथे असलेल्या मळ्यामध्ये जनावरांमध्ये असलेला पांडुरंग त्याची सेवा कोण बरं करील??त्यांना सिधा कोण देईल . जेवू कोण घालील .. वारकरी येतील त्यांची सेवा कोण करील ???म्हणूनच आपण पंढरीला जायचं नाही ;!!
आपण येथेच असलेल्या संतांना मूक प्राण्यांना देव समजून त्यांची सेवा करायची. असे म्हणाले आणि सावतोबा मळ्यात गेले ...इकडे नागा ताई मात्र खूपच रडू लागली की मला पांडुरंगाला भेटायचय, पहायचय कोणी मला नेत कसं नाही...तेव्हा जनाई म्हणाल्या की तू वारकऱ्यांची जवळ निरोप दे ..असे ऐकत आहे लगेच उठल्या आणि घेऊन काही फळे घेऊन संतांच्या पालख्या निघाल्या चालल्या होत्या ..तेव्हां नागूबाई म्हणाल्या ही भाजी माझ्या विठ्ठलाला अर्पण कराल का ??माझा निरोप भगवंताला सांगाल का??? त्या देवाला म्हणावं तुझे काही भक्त इथेही आहेत त... कधीतरी येऊन त्यांच्या मळ्यात भेट देऊन जा आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.. आम्ही वाट पाहत आहोत ..

ब्राम्हण कर्म कनिष्ठ होते..सावतोबा च्या विरोधात असलेले ब्राह्मण म्हणाले जो सावता कधीही पंढरीला गेला नाही ..ही गेला नाही आणि स्वतःला विठ्ठल भक्त समजतो की त्या सावळ्याची सवत्याची मुलगीच ना तू तुला कोण म्हणलं की तुझा निरोप घेऊन आम्ही विठ्ठला ची जाऊ... त्यासाठी विठ्ठल भक्त असावं लागतं असे... स्वतःचेच काम करून ढोंग करावे लागत नाही ..तू जा इथून आणि आमच्या मागे येऊ नकोस.. असे म्हणून ते ब्राम्हण नागू ताई च्या हातून ती भाजी घेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिली व तिला तुडवत पुढे चालु लागली...
रडत रडत नागु ताई घरी आल्या घरी आपल्या बाबाला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला ...
तेव्हा सावतोबा म्हणाले ज्यांना सजीव प्राण्यांमध्ये यामुळे प्राण्यांमध्ये विठ्ठल दिसला नाही.. ते तीर्थक्षेत्री जाऊनही पवित्र होणार नाही .त्यांना विठ्ठल कसा बरे प्राप्त होणार !!!विठ्ठलच नामातच आहे.. आपल्या कामातच आहे असे म्हणून ते नागुला शांत करू लागली तू आता दुसऱ्या वारकर्यांच्या मेळाव्यात जाऊन त्यांच्याजवळ भाजीपाला देऊन विठ्ठलाला तुझा निरोप दे नागू तर म्हणल्या ठीक आहे असे म्हणून त्यांनी दुसऱ्या येणाऱ्या पालख्या जवळ भगवंतासाठी निरोप पाठविला...

सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.. सेना न्हावी नरहरी सोनार नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार आपल्या अभंगात वापरत असे..

🌹 न लगे सायास
न पडे संकट
नामे सोपी वाट वैकुंठाची 🌹
असा त्यांचा अनुभव होता... त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला...
सावतोबाना केवळ 45 वर्षांचे आयुष्य लाभले होते ते संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील मधील एकनिष्ठ भक्त संत कवी होते..

कर्तव्यआणि कर्म करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे . कर्मे ईशू भजावा...असे ते मानत होते...आपल्या कर्मातच ईश्वराचे नामस्मरण केल्याने तो आपल्याला प्राप्त होतो..असे सांगणारे ते एकमेव संत होते...
ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर ते कोणतंही जप ताप व्रत करून प्राप्त होत नाही तर तो अंत पूर्वक नामस्मरण साधनेने होतो..या वृत्ती चे होते...
हे एक कर्मयोगी संत होत... विठ्ठल हेच त्यांचे परमदेव्वत....ते कधीही पंढरपूरला गेले नाही.. प्रत्यक्ष पांडुरंगाच त्यांना भेटायला आले...
वैकुंठीचा देव आणि या कीर्तनी...असी त्यांची प्रतिज्ञा घेतली होत...

एकदा आषाढी एकादशी झाल्यानंतर रुक्मिणीने पांडुरंगाला विचारले की एवढी मोठी भक्तमंडळी पंढरपूरला तुमच्या दर्शनासाठी येतात त्या सगळ्यांनाच मोक्ष प्राप्त होतो का???? तेव्हा भगवंत म्हणाले ,नाही सगळ्यांनाच प्राप्त होतो असे नाही कारण ते सगळेच माझ्या प्राप्तीसाठी इथे येत नाही ..
जे मनातून ,अंतकरणाने ,भावभक्तीने मला शरण येतात फक्त त्यांनाच मी प्राप्त होतो ..बाकीचे काही भक्तमंडळी फक्त देखावा करण्यासाठी व आपले कार्य साधण्यासाठी येत असतात . त्यांच्या मनात मळभ असते त्यांना मी प्राप्त होत नाही किंवा मोक्ष ही देत नाही ..फक्त ते पंढरीला आले म्हणून त्यांच्या पापाचा नाश होतो पण त्यांना मोक्ष होत नाही .. माझे असे काही भक्त आहेत की जे माझ्या वारीला काय तर माझ्या दर्शनालाही आलेले नाही पण तरीही ते माझी प्रिय भक्त आहेत..

तेव्हा रुक्मिणी माता म्हणाल्या कि असे कोण भक्त आहेत जे कधीच पंढरपूरला आले नाही??? किंवा तुमचे दर्शन घेतले नाही?? तरीही तुम्ही त्यांची एवढी स्तुती करता!!!
भगवंत म्हणाले चला आज तुम्हाला त्या भक्तांचे दर्शन द्यायला दोघे जाऊ... तेव्हा भगवंत आणि रुक्मिणी माता पुष्पक विमानात बसून आरण गावाकडे निघाले ..तेथे सवतोबा आपल्या मळ्यामध्ये मोठ चालवत होते आणि भगवंताचे अखंड नामस्मरण चालू होते... तेव्हा विठ्ठल म्हणाले हे बघ रुक्मिणी हाच माझा भक्त ज्याला मी चराचरात श्वासामध्ये ही तो फक्त मलाच पाहतो...मुक प्राण्यांची सेवा फक्त मीच माणून करतो ...त्याने संपूर्ण जीवन फक्त ह्या मळ्यामध्ये घालवले आहे आणि तो त्याच्या करमलाच माझी ईश्वरसेवा मानतो आज त्याला दर्शन देण्यासाठी मी येथे आलो आहे ..या चराचारात , पानात, फुलात, फळात ,विहिरीत ,मळ्यात मध्ये सुद्धा मी त्याला दिसतो आहे... माझी चरण सेवा म्हणून तो या सगळ्यांची सेवा करत आहे.. या शेतीची मशागत करत आहे.. म्हणूनच त्याचा हा मळा असा फुलला आहे ..असे म्हणून विठ्ठल रुक्मिणी समिती विहिरीजवळ दर्शन देतात आणि म्हणतात...
सावतोबा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे...🤗 तू मला हवते वर माग 🤗
तेव्हा सावतोबा म्हणाले की देवा मला काही नको... कर्म सेवा हीच ईश्वर सेवा मानत असलेल्या मी आज तू मला साक्षात परब्रह्म सगुण विराट रूप दर्शन दिले आहेस . मी कृतार्थ झालो आहे ...माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे ...
तेव्हा भगवंत म्हणाले तू तुझा मळा सोडून जरी आला नसेल तरीही मी आज पासून नेहमीच तुझ्या भेटीसाठी या गावात येईल.. जो भक्त आपले काम करूनही माझे फक्त नामस्मरण करील त्याला🤗 त्याच्या कामातही मीच दिसेल तो भक्त मला प्राप्त होईल...❣️ अशाप्रकारे भगवंतांनी आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन दिले.🤗...

सवतोबची अभंगरचना रससिध आहे... त्यांचे खी अभांड पुढीलप्रमाणे...
🌹स्व कर्मा त व्हावे रत...
मोक्ष मिले हातोहात...
सवत्याने केला मळा...
विठ्ठल देखियेला डोळा...🌹

🌹प्रपंच असूनी परमार्थ साधावा..
वाचे आळवावा पांडुरंग...
मोट; नाडा, विहीर,दोरी....
अवघीं व्यापिली पंढरी...🌹
प्रपंच करता करता ईश्र्वर भेटतो...त्यांनी नाम किर्तनावर भर दिला..
असे अनेक प्रसंग आपल्याला त्यांच्या चारितकथनात आढळतो... आजही पांडुरंगाची पालखी संत सावता माळी यांना भेटण्यास अरण्य गावाला जाते 🤗....भक्तासाठी पांडुरंग आजही तत्पर असल्याचे या उदाहरणातून आपल्याला समजते सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात पण फक्त भगवंताची पालखी संत सावतामाळी यांना भेटण्यास या गावाला जाते...💞

क्रमशः (टिपः वरील लेख हा मी स्वतच्या विचाराप्रमणे मांडला आहे तरी काही चूक असल्यास मला हक्काने कळवा .. वाचन झाल्यानंतर नक्की रेटिंग द्या आणि कमेंट मध्ये कळवा मला अशाच कथा लिहिण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल वाचकांचे धन्यवाद.. खरंच 🌝तुमच्या-आमच्या मधील 💞 archu 💞)