प्रेम भाग - 15 Dhanashree yashwant pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम भाग - 15

सोहम सारखी अवस्था अंजलीच्या बाबांची जाहाली होती . झौप न झल्या मुळे त्याचे डोळे लाल दिसत होते .आणि एकसारख्या जांभया पण देत होते .पण, कोणाला दिसू नयेत म्हणून ते लपून छापून जांभया देत होते .सगळे गप्पा गोष्टीत रम्ल्या मुळे अंजलीच्या बाबा कडे कोणाचे च लक्ष नव्हते . पण, सोहम चे मात्र बारीक लक्ष होते . त्याचे हावभाव बघून त्याच्या मनात कसली तरी शंका आली . पण त्यानी तसे काहीच दाखवले नाही . सगळ्या चा नाश्ता उरकला .आणि जो तो आपल्या आपल्या कामाला निघून गेले . सोहम ने मात्र अंजलीच्या बाबा चा पाठलाग करायचा ठरवला . त्याने त्याना कळू न देता पाठलाग करायला सुरवात केली . आणि सोहम ला जी शंका होती, तसेच घडले . अंजलीचे बाबा, स्वतःच्या घरातून निघून त्याचं घरात शिरले, जे अर्जुन चे घर होते . पण ह्या ही वेळे ने ते मागच्या च दारातून गेले .जसे रात्रीचे ते गेले होते ,लपून छापून...... कोणी आपल्या ला बघत तर नाही ना ...ही भीती त्यांच्या डोळ्यात दिसत होती . अंजलीचे बाबा त्या घरात गेले, आणि थोड्यावेळाने त्याच्या बरोबर त्या घरातून अजून एक मुलगा बाहेर पडला , ते दोघे एका गाडीत बसले .आणि गाडी भरधाव वेगात पळू लागली . हा तोच मुलगा होता .जो त्याच्या आणि अंजलीच्या सख्र्पुड्यला आला होता .म्हणजे हा अर्जुन .....सोहम च्या एकदम लक्षात आले . तो पटकन त्याच्या गाडीत बसला . आणि अंजलीच्या गाडी चा पाठलाग करू लागला . पण ह्या वेळाने तो मात्र लपून छापून पाठलाग करत नव्हता . अंजलीच्या बाबांची गाडी वेगात पळत होती, त्याचं वेगात सोहम ची गाडी ही पळत होती .काहीही जाहले तरी, सोहम ला अर्जुन ला त्याच्या हातातून जाऊन नव्हते द्यायचे .आज जर अर्जुन त्याच्या हातातून सुटला तर फार मोठे संकट सोहम वर येणार होते .
अखेर सोहम च्या बाबांची गाडी रेल्वे स्टेशन।वर येऊन थांबली आणि त्यापाठोपाठ सोहम ची . सोहमने वेळ न दवडता गाडीतून उतरला . आणि अर्जुन ला शोधायला निघाला .त्याने रेल्वे स्टेशन वर चारी बाजूला पाहिले . पण त्याला ना अर्जुन दिसला, ना अंजलीचे बाबा . तो हताश जाहला, आपण यायला उशीर केला असं त्याला वाटू लागले . आता पुढे काय वाढून ठेवलय असं त्याला वाटू लागले . तो घरी जायला निघणार ऐत्क्यात, त्याला नुकत्याच आलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्यात अर्जुन चढला, असं वाटले .
त्याने नीट निरखून पाहिल्यावर त्याला जाणवले .की तो अर्जुनच आहे .
त्याने काहीही विचार न करता त्या रेल्वे मधे तो चढला. आणि त्याने पुढचा डब्बा पकडला . आता सोहम आणि अर्जुन वेग वेगळ्या डब्ब्यात होते . अंजलीचे बाबा रेल्व्वे स्टेशन वरून घरी निघून गेले . थोड्याच वेळात टी. सी. सोहम ज्या डब्यात गडबडीत शिरला होता .त्या डब्यात आले .आता, सोहम पुरता फसनार होता, कारण त्याच्या कडे टिक्किट नव्हते . अर्जुन ला पकडण्याच्या गडबडीत त्याने रेल्वे चे टिक्किट च काढले नाही .
टी .सी. एकऐकाचे टिक्किट चेक करत होते . ते सोहम च्या जसजसे जवळ येत होते, तसतसे सोहमला भीती वाटत होती . ते आता सोहम च्या जवळ येणार आणि त्याच्या जवळ तिकीट मागणार, ऐत्क्यात रेल्वे स्टेशन वर गाडी थांबली .आणि सोहम नी पळता पाय काढला . तो स्टेशन वर उतरला, आणि त्याच्या पाठोपाठ अर्जुन ही उतरला. त्याचे काहीतरी काम होते . सोहम ने अर्जुन ला पाहिले . आणि काहीही विचार न करता तो अर्जुन च्या समोर उभा राहिला . सोहम ला पाहून अर्जुन गड्बड्ला च .त्याला काय करावे काहीच कळेना, पळून ही काहीच उपयोग नाही, हे त्याला समजले .त्यामुळे सोहम ला सामोरे जाण्या व्यतिरिक्त अर्जुन कडे काहीच पर्याय नव्हता .
सोहम अर्जुन च्या समोर येताच फार चिढ्ला होता . त्याला काहीच सुचत नव्हते .हा तोच अर्जुन होता, ज्याने अंजली च आयुष्य बरबाद केले होते . त्याच्या आयुष्याचा पण खेळखंडोबा केला होता . पण त्याला काहीही करणे रेल्वे स्टेशन वरती योग्य नव्हते .म्हणून, सोहम ने अर्जुन ला बाजूच्या एका हॉटेल मधे नेहल्ले. अर्जुन ही काहीही न बोलता, सोहम सोबत गेला .त्याला ही ह्या सगळ्या गोष्टी चा कंटाळा आला होता .
हॉटेल मधे जाताच सोहम नी अर्जुन वर qlप्रश्नाचा भडिमार केला .,तू, कोण? आणि अंजलीशी असं का वागलास? अंजलीच्या बाबांचं आणि तुझं काय कनेक्शन आहे? आणि तू आता कुठे चाललास? असे एक ना अनेक प्रश्न सोहम नी अर्जुन ला विचारले . अर्जुन ही काही आढेवेढे न घेता सांगू लागला . , मी, अर्जुन मूळचा नाशिक चा ...गरीब कुटुंबात जन्माला आलेलो ..घरी 3 बहिणी लग्नाच्या... आई वडीलांची ई छा मी चांगलं शिक्षण घ्यावं .चांगली नोकरी करावी . म्हणून त्यानी मला मुंबई ला पाठवले . मी मुंबईत मझ्या मावशीकडे रहायचो. तिची ही परीस्तीथी बेताची मी नोकरी करून शिक्षण घेवू लागलो . सगळं छान चालले होते . पण, एके दिवशी ......मी गडबडीत कामावर निघालो होतो .आधीच उशीर झालेला. त्यात पाऊसाने हजेरी लावलेली ... मी कसाबसा पाऊसा पासून वाचत कामावर निघालो .मी बस स्टँड वर बस ची वाट बघत बसलेलो .तर तिथे मला एक मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी पावसा चा आनंद घेत नाचत बागडत होत्या . माझे लक्ष त्या मुलीन कडे गेले .त्यांत ली एक मुलगी खूप सुंदर दिसत होती . अगदी नक्षत्रासारखी . तिला सारखे पाहत च राहावे असं वाटत होत .मी तिला बगता क्षणी तिच्या प्रेमात पडलो . थोड्या वेळाने त्या मुली गाडीत बसून निघून गेल्या . पण ती, मुलगी मात्र स्वतःची छबी माझ्या मनात सोडून गेली .ती मुलगी म्हणजे अंजली..... काही जाहले तरी अंजलीचा चेहरा मझ्या डोळ्या समोरून जयीना. मग ......मी तिची एक झलक दिसावी, म्हणून सतत तिच्या मागे मागे फिरायचो . आणि त्यातूनच मला एके दिवशी कळलं, की, तिच्या कॉलेज मधे एक स्पर्धा आहे .आणि त्या स्पर्धेत जे कॉलेज जिंकेल त्याला गोवा ला जायची संधी मिळणार . आमचे कॉलेज चे विद्यार्थी सुधा त्या स्पर्धेत भाग घेणार होते . मग मी ही ठरवलं की ह्या स्पर्धेत आपण ही भाग घेऊ या .मग काय मी ही आमच्या कॉलेज कडून ह्या स्पर्धेत भाग घेतला .खरंतर, मी हे सगळं फक्त अंजलीच्या कॉलेज मधे जायला मिळेल .तिला बघायला मिळेल .तिच्या शी ओळख करता येयील .म्हणून हे सगळं करत होतो . पण, नशिबाने मझी साथ दिली, आणि त्या स्पर्धेत अंजलीच कॉलेज आणि माझं कॉलेज दोघांचीही टाय जाहली .आणि आमच्या दोन्ही कॉलेज ला गोवा ला जायला मिळणार होते . मी तर खूप खुश होतो . अंजली सोबत गोवा फिरायला मिळणार म्हणून, पण, बहुदा अंजलीला मी तिच्या असे मागे फिरणे आवडत नसावे, म्हणजे ती त्या चा दुसराच अर्थ काढत असेल . मी, एक बदमाश मुलगा आहे, असं तिला वाटत असेल .तिने तस मला बोलून ही दाखवलं होत .l