18 9 2020 पासून अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासा ची सुरुवात होणार आहे ...अधिक महिना हा साधारणपणे 32 महिन्यांनी येत असतो..आपल्या पंचांगात सौर वर्ष व चांद्र वर्ष यांचा मेळ घातलेला आहे.. अधिक मास हा धार्मिक कृत्यास पोषक आहे.. योग पर्व ,शुभाशुभ दिवस,याने हा महिना परिपूर्ण आहे अधिक मासलाच मलमास असेही संबोधले जाते...तर याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे.. त्याचे काही खगोलीय ,शास्त्रीय कारणही आहे ..ते आपल्या वाचनात नक्कीच असतील.. म्हणून त्याविषयी मी जास्त काही माहिती न देता, या अधिकच्या महिन्यात किंवा या धोंड्याच्या महिन्याच्या काही कथा मी तुम्हाला माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे...
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण , भगवान विष्णू,म्हणजेच परब्रम्ह पुरुषोत्तम भगवान आहेत ,म्हणून त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात..
म्हणूनच या महिन्यात श्रीकृष्णाची विशेष करून पूजा-अर्चा करतात.. तीर्थस्थान, व्रत ,उपवास ,नियम या आदीं मुळे सुख शांती मिळते..
ज्याप्रमाणे आपण चातुर्मास किंवा कार्तिक महिना करतो, त्याच प्रमाणे याही महिन्यात सकाळी पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे...
अंगाला उटीलाववी ..
नदीवर किंवा धार्मिक ठिकाणी स्नान करावे..
मन निर्मळ ठेवावे ...
या महिन्यात आवळ्याच्या झाडाखाली स्नानाला विशेष महत्त्व आहे..
या महिन्यात शक्यतो जेवताना मौनच पाळावे..
जेवण फक्त एकदाच करावे...
अधिक महिन्यात देवाजवळ रोज दिवा लावावा ..
आणि या महिन्याच्या समाप्तीनंतर तो ब्राह्मणास दान करावा..
या महिन्यात आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करावा..
उदाहरणार्थ, एखाद्या रंगाचे वस्त्र किंवा आवडते फळ..
या महिन्यातील दानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे..
हिंदू धर्मात मुलगी जावयाला ,लक्ष्मीनारायणाचा जोडा संबोधतात,.. म्हणूनच जावयाला तुपात तळलेले 33 पट्टीचे अनारसे देतात..
एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात तांब्याचा दिवा लावून ठेवून तो लावून जावयाला देतात..
अनारसा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक किंवा डाळीचे जाळीदार पदार्थ दिले तरी चालतात..
या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळ यासारख्या वस्तू देखील ती तेहतीस च्या पट्टीनेच दान करतात..
या महिन्यात पुरणाचे दिंड करून आपल्या इष्ट मित्रांना व नातेवाईकांना देतात ..या दिंडाला पुरण घातलेले धोंडे असे देखील म्हणतात.. म्हणूनच याचे नाव धोंड्याचा महिना पडले..
रोज गाईला पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा..
महिनाभर सतत देवाचे नामस्मरण करावे..
श्री नारायण श्रीकृष्ण भगवंताचे स्मरण करावे..
अधिक मासात केलेल्या पूजेचे दानधर्माचे फळ अनेक पटीने मिळते..
स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्र पत्रांचा आशीर्वाद मिळतो..
अधिक मासात उपोषणाला खूप महत्त्व आहे..
या मासात प्रतिदिन श्रीकृष्णाची पूजा करावी..
तीर्थस्थान एक महिना नाही केले तरी कमीत कमी एक दिवस किंवा तीन दिवस तरी करावे..
दीप दान करावे देवापुढे अखंड दिवा तेवत ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते ...
गो पूजन करावे..
तीर्थस्थान किंवा तीर्थयात्र करावी..
अधिक मासात काही करणे वर्ज आहेत जसे की ग्रहशांती वास्तुशांती महादेवाने विवाह उपनयन व संन्यास ग्रहण...
.....
पुरुषोत्तम महिन्याची पौरानिक कथा पुढील प्रमाणे...
धर्मशास्त्रात अधिक महिन्यात पुरुषोत्तम मास असे संबोधले जाते.. त्याच्याशी संबंधित एक काम प्रसिद्ध कथेचा प्रचलित असा हा भाग आहे..
हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार प्रत्येक महिन्याचा कोणी ना कोणी स्वामी आहे... प्रत्येक महिना हा कोणत्या न कोणत्या देवतेस प्रिय नक्की आहे..परंतु अधिक महिन्यात कोणत्याही देवतेला किंवा ईश्वराला स्वतःची पूजा करण्याची इच्छा नव्हती.. यामागे सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे अधिक मास हा दर तीन वर्षांनी येत असतो... आणि तीन वर्षापर्यंत कोणतीही देवता आपल्या पूजेपासून वंचित राहू शकत नव्हते..
म्हणजेच तीन वर्षापर्यंत देवतेला आपल्या पूजेसाठी वाट पहावी लागणार होती..त्या महिन्याचा कोणीही स्वीकार न केल्यामुळेच त्याला मलमास असेही म्हटले जात होते.. ह्यामुळे दुःखी होऊन अधिक महिना हा भगवान श्रीविष्णु कडे आपले दुःख घेऊन गेला.. भगवान विष्णूने त्याचे सर्व दुःख ऐकून घेतले आणि त्या महिन्यात स्वतः धारण करून त्याला स्वतःचे नावही दिले.. आणि म्हणूनच तेव्हापासून अधिक मास किंवा मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून प्रचलित झाला..
या महिन्यात भगवान श्री विष्णूची आराधना केल्याने नक्कीच वैकुंठास प्राप्त होतो..
या मासात मंगल कार्ये काम्या वृत्ती इत्यादींचा त्याग करतात.. त्यामुळे या मासात इहलोकी अनेक निर्भत्सना यांना सामोरे जावे लागले.. त्यामुळे व्यथित होऊन तो आपले गाऱ्हाणे घेऊन श्रीविष्णू कडे गेला व गोलकी असलेले श्रीकृष्ण भगवा तकाडे गेला.. भगवान श्रीकृष्णांनी त्याला अभयदान देऊन त्याला आपलेसे केले.. या मासात जे श्रद्धा भक्ती युक्त राहून व्रत, उपवास, नियम व दानधर्म करतील त्यांना त्याच्या दहापटीने पुण्य मिळेल असेही त्याला वचन दिले.. दिनांक 16 10 2020 शुक्रवार रोजी अधिक मासाची समाप्ती होणार आहे....
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कळवा यानंतरही मी अशाच काही कथा लिहीणार आहे....तुमच्या आमच्या मधील archu...
✍️✍️💞Archu💞