Samarpan - 15 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - १५

समर्पण-१५

अनक़हे अनसुने
अनछ़ूए रहते है ।
कुछ रंग प्यार के
अधुरे भी होते है।


का बनतात अशी नाती जे थोड्या दिवसांच सुख पण आयुष्यभर पुराव्या इतक्या यातना देऊन जातात...हो...यातनाच...फक्त दुःख देऊन जातात अशी नाती..या फक्त सांगायच्या गोष्टी असतात की ज्या व्यक्यिवर प्रेम केलं त्याच्यासोबतचे आनंदी क्षण आठवा... दुःख करत बसू नका वैगरे वैगरे... पण खरं तर हे आहे की आपण जेव्हा त्या व्यक्तीचा विचार करतो किंवा त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण आठवतो त्यानंतर हे पण वाटत की काहीतरी कारणामुळे ती व्यक्ती सोबत नाही आणि याचंच दुःख जास्त होतं...त्यापेक्षा हेच वाटत की ती किंवा तो भेटलाच नसता किंवा नसती तर बरं झालं असतं....खूप कठीण असतं कोणीतरी मनात खास जागा केल्यावर त्याला मनातून काढणं...

"नैना....नैना, उठ पटकन तयार हो..निघायचं आहे आपल्याला"
माझ्या कानावर अभयचे शब्द पडले...मी हळूच डोळे उघडले आणि विचार केला सकाळी दहावेळा आवाज दिल्यावरही न उठणारा अभय आज इतक्या लवकर कसा उठला? मी त्याला बोलली,

"काय झालं? इतक्या लवकर का उठलास?"

"इतक्या लवकर😮? मॅडम, नऊ वाजलेत टाईम बघा जरा, 😝😝"

मी वेळ बघितला खरच नऊ वाजून गेले होते..मी इतक्या उशिरापर्यंत कधीच झोपत नाही आणि आज का मला जाग नाही आली.. मी माझ्याच विचारात होती आणि अभय माझ्याजवळ येऊन बसला आणि माझा हात हातात घेऊन बोलला,

"काल रात्रीचा विचार करत आहेस नैना?"

तो अस बोलल्याबरोबर रात्रीचे सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तसेच्यातसे तरळले आणि मी स्वतःच्या डोक्यावरच हात मारून घेतला की मी हे काय करून बसली.... मूर्ख नैना थोडासा ताबा नाही ठेवता आला स्वतःवर..अभय तर भावनिक झाला होता तू तर शुद्धीवर होतीस, का नाही सांगितलंस विक्रम बद्दल त्याला...ही अशी..अशी सुरुवात करणार आहेस नव्या आयुष्याची? स्वतःच्या नवऱ्याला अंधारात ठेवून?....अश्या कितीतरी प्रश्नांनी काही सेकंदातच माझ्या डोक्यात काहूर माजवलं होतं.... मी अभयला काहीच उत्तर देऊ शकत नव्हती... त्याने माझ्यासमोर चुटकी वाजवत पुन्हा बोलला,

"काय झालं? कुठे हरवून जातेस सारखीसारखी?"

"हूं...अं...काही नाही...मी तयार होते पटकन.."

आणि अस बोलून मी अभयच्या नजरेला नजर न देताच उठली..कदाचित माझी हिम्मतच नव्हती त्याच्याकडे पहायची..पण त्याने मला पुन्हा थांबवलं आणि माझ्या समोर येऊन उभा झाला आणि बोलला,

"मला माहित आहे नैना तू काय विचार करत असशील?? तुला हेच वाटत ना की जर माझं साफिया वर इतकं प्रेम होतं तर काल रात्री आपल्यात जे झालं ते काय होतं?...हे बघ नैना, मी मान्य करतो साफिया ची जागा खूप खास आहे माझ्या साठी पण एक सत्य हे पण आहे की तू तुझी वेगळी जागा तयार केलीस..साफिया माझा भूतकाळ आहे अन तू माझा वर्तमान आणि भविष्य...त्यामुळे काल माझ्या अश्रूंसोबत साफिया ही वाहून गेली आता फक्त तू आणि तूच आहेस...आणि बायको आहेस माझी...आपला हक्क आहे एकमेकांवतरी"

हक्क?? हक्क असा गाजवल्यावरच मिळतो का? म्हणजे आपण एखाद्यावर हक्क गाजवला तर ती व्यक्ती आपली होते??? नाही...अस अजिबात नाही...हक्क मिळवायचा नसतो तो द्यायचा असतो..पण ही गोष्ट अभयच्या खूप उशिराने लक्षात आली..

मला खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं..माझं एक मन बोलत होत कि हे सगळं ज्याप्रकारे झालं ते चुकीचं झालं, माझं अभय वर प्रेमच नाही तर हा शारीरिक संबंध ही चुकीचा आहे..कदाचित भावनेच्या भरात झालेली एक चूक...आणि दुसरीकडे हे पण वाटत होत की ठीक आहे प्रेम नाही पण नवरा आहे तो माझा, एकनाएक दिवस हे झालंच असत तर त्यात चुकीचं काय आहे आणि तस पण मीच तर बोलली होती त्याला काही दिवस आधी की आपण फॅमिली स्टार्ट करायला पाहिजे मग आज हा गिल्ट का???

या सगळ्यांच उत्तर एकच होतं... विक्रम...हो विक्रमच...कान्हाने चुकीच्या वेळेवर बरोबर व्यक्तीला माझ्या आयुष्यात पाठवलं होत...
की चुकीच्या गोष्टी बरोबर व्हाव्यात यासाठी आमची भेट घडवून आणली होती...या सगळ्या गोष्टींच उत्तर वेळच देणार होती..

अभयला ऑफिस मधून बोलावणं आलं त्यामुळे आम्ही एक दिवस आधीच महाबळेश्वर वरून मुंबई परत यायला निघालो...येताना मात्र आम्ही एकमेकांशी जास्त बोललो नाही. अभय बोलला नाही कारण मला सगळं काही सांगून त्याने मन हलकं केलं होतं आणि माझं मन इतकं जड झालं होतं की कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा हेच कळत नव्हतं...खूप प्रकर्षाने वाटत होत की विक्रम शी बोलावं..तोच आहे जो माझी व्यथा समजू शकतो आणि मला काहीतरी मार्ग दाखवू शकतो पण त्याच्याशी ही काही बोलणं होत नव्हतं...या सगळ्या गोंधळात मला गाडीत कधी झोप लागली कळलच नाही....

"नैना..पोचलो आपण...किती झोपशील उठ.."
मी कसेतरी डोळे उघडले, डोकं खूप जड झाल्यासारखं वाटत होतं, हाता पायातून गरम वाफ निघाल्यासारखं वाटतं होतं, उभं राहायचीही ईच्छा होत नव्हती, तोपर्यंत अभय गाडीतून सगळं सामना काढून कमरेवर हात देऊन मिश्कीलपणे माझ्याकडे बघून बोलला,

"ड्रायव्हर तर बनवलसच मला, आता काय कुली पण बनवण्याचा विचार आहे का नवऱ्याला😄😄, कमीत कमी तुझी पर्स तरी उचल..."
त्याने पर्स माझ्या दिली आणि डोळे विस्फारून माझ्याकडे बघत बोलला,
"अग, किती ताप चढलाय तुला, बर वाटत नव्हतं तर सांगायचस ना आधीच, चल पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ"

"नको एवढं काही नाही, मी तापेची गोळी घेईल बर वाटेल मला, तू नको काळजी करू?"

"मी नाही तर कोण करणार तुझी काळजी, तू जाऊन आराम कर मी गोळ्या घेऊन येतो मेडिकल वरून"

मी येऊन झोपली घरात पण माझ्या डोक्यात सारखा एकच विचार येत होता की विक्रम शी माझी भेट आताच झाली आहे तरी मला अभयला त्याच्याबद्दल सगळं सांगायचं आहे..पण अभयने तीन वर्षे वाट बघितली मला साफिया बद्दल सांगायला? असं का? आणि जर आज साफिया हयात असली असती तरी अभयने एवढीच काळजी घेतली असती का माझी?...जास्त विचार करण्याची सवय किती घातक असते हे माझ्यापेक्षा जास्त कोणीच सांगू शकणार नाही कदाचित... त्यावेळेस या सगळया गोष्टी सोडून मी विचार करायला पाहिजे होता की अभयने सगळं काही विसरून माझा स्वीकार केला आहे तर मी पण एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे..पण म्हणतात ना वेळ गेल्यावरच शहाणपण येतं....

तीन चार दिवस विक्रम शी बोलणं झालं नव्हतं खूप आठवण येत होती त्याची, मी त्याला फोन केला

"काय जाडे..आलीस का मुंबई ला परत ?"

"विक्रम...प्लिज..माझा जोक करण्याचा मूड अजिबात नाही"

"हो माहीत आहे, रडण्याचाच मूड असतो नेहमी तुझा😏😏...आणि एक मिनिट आवाज का असा येतोय तुझा,बरं नाही ना तुला"

"हम्म..काही सिरीयस नाही रे बस थोडासा ताप आहे .."

"थोडासा? अग आवाज कसा येतोय तुझा.. नक्किच खूप जास्त ताप आहे तुला, आणि अभय कुठे गेला तुला सोडून, कळत नाही का त्याला तुला असं एकटीला सोडून कुठे गेला तो"

"विक्रम प्लिज अभय बद्दल काही नको बोलू, तो मला सोडून कुठेच गेला नाही..फक्त मेडिकल वर गेलाय औषध आणायला"

"ओहह सॉरी, तुला राग आला ना मी अभयबद्दल बोललो"

"राग नाही पण तू काही जाणून न घेता अभयला चुकीचं ठरवलं त्यामुळे वाईट वाटलं, त्यानेही खूप काही सोसलंय"

"एक सांगू सोनू?"

"बोल ना"

"मला असं वाटतंय...जाऊदे सोड काही नाही"

"बोल ना विक्रम काय वाटतंय?"

" झालीयेस ना अभयची? "

"विक्रम...😲😲 "

"सोनू... मला खरच खुप आनंद होतोय सोनू तुमच्या दोघांसाठी...आणि आज जस तू मला सूनवलस ना अभय साठी तसच नेहमी त्याची साथ दे, बघ तो तुला खूप खुश ठेवेन, आणि एक लक्षात ठेव प्रेमापेक्षा ही आदर महत्त्वाचा आहे...एकमेकांबद्दल हा आदर कधीच कमी नका होऊ देऊ तुम्ही.."

विक्रम अस काही बोलेल याची अपेक्षाच केली नव्हती मी...कदाचित यालाच मनाच्या तारा जुळणं म्हणतात... विक्रम काय म्हणायचा याला....हां..रुहानी रीश्ता...रुहानी म्हणजे आत्मिक..खरंच असंच होत आमचं...जिथे दोन आत्मा एकमेकांशी संवाद साधतात तिथे शरीर मिळो ना मिळो काय फरक पडतो...

"विक्रम, बोलायचं आहे रे खूप तुझ्याशी..."

"बोल ना ग"

"अस नाही...एकदा भेटशील"

"खूपदा भेटेल पण आधी तू बरी हो..आणि हो, काय चूक काय बरोबर याचा जास्त विचार नको करुस, एक लक्षात ठेव जे होते ते चांगल्यासाठीच होते...काळजी घे तुझी आणि अभय ची पण"

माझ्या फक्त आवाजावरून माझी तब्येत कशी आहे हे ओळखून घेतो, मी काही न बोलता माझ्या मनातल समजून घेतो..हा खरच 'रुहानी रीश्ता' होता आमच्यातला की काळानुसार बदलणार होता, हाच विचार मी करत होती तेवढ्यात अभय आला...

"नैना चल लवकर हे औषध घे अन अराम कर थोडावेळ मग बर वाटेल तुला..."

अभय हातात औषध आणि पाणी घेऊन उभा होता,

"अग घे पटकन, इतका काय विचार करत बसली एक गोळी घेण्यासाठी पण"

"अभय, जर साफिया तुला सोडून गेली नसती किंवा तिने तुला समजावलं नसतं तर काय केलं असत रे माझ्यासोबत"

माझ्या या प्रश्नांने अभय गोंधळला, कदाचित त्याला हा प्रश्न माझ्याकडून अपेक्षित च नसावा पण मला तर नक्कीच जाणून घ्यायचं होत याच उत्तर अभयकडून..

"ज्यादिवशी माझं लग्न झालं ना नैना त्याच दिवशी साफिया मला सोडून गेली अस मी मानतो...हा एक आहे की मी तुला या सगळ्या गोष्टी खूप उशिराने सांगितल्या कारण मला असं वाटत होत की जर मी सांगितलं तर तू कदाचित हा विषय घरच्यांपर्यंत घेऊन जाशील आणि या सगळ्यांनचा परिणाम पप्पांच्या तब्येतीवर झाला असता त्यामुळे मी टाळत राहिलो सांगायचं...तुला वाटत असेल मी खुप स्वार्थी विचार केला पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता... आणि राहिला प्रश्न साफियाचा तर ती मला फक्त एक मैत्रीण म्ह्णून भेटत होती, आणी ती लग्न करून दुबई ला गेल्यावर तर तेही बंद झालं...आणि ती मला भेटली ते चांगलंच झालं ना नैना, कारण जर तिने समजावल नसत तर इतकी चांगली बायको थोडी मिळाली असती मला....झालं समाधान की अजून चौकशी बाकी आहे माझी 😜"

मी विचार केला काय फरक आहे माझ्या आणि अभय च्या परिस्थिती मध्ये? खरंच तर आहे साफिया ने त्याला एक चांगली मैत्रीण म्हणून मदत केली नसती तर हा नवा अभय मला बघायला मिळाला नसता....आणि मला विक्रम भेटला नसता तर मी अभयला समजून घेण्याचा एक चान्स घेतला असता का? जो अभय मला डोळे उचलून बघायचा ही नाही तो माझी एवढी काळजी करायला लागलाय हे फक्त साफिया मुळेच तर शक्य झालंय...नक्कीच अभय मला विक्रम बद्दल समजून घेईल याचा विश्वास वाटायला लागला होता मला...
------------------------------------------------------------

दोन तीन दिवसांनी मला बर वाटायला लागलं आणि मी पुन्हा ऑफिस जायला लागली....विक्रमला भेटूनही खुप दिवस झाले होते पण कामाच्या व्यापात काही भेटणं शक्य होत नव्हतं..एक दिवस दुपारी विक्रम चा फोन आला,

"सोनू, तुझ्या ऑफिस च्या खाली उभा आहे...ये पटकन खाली"

" वेडा आहेस का रे विक्रम ?अस न सांगता कोणी येत का?"

"मी येतो ना😂😂, याला सरप्राईज म्हणतात बेटा, तुला नाही कळणार😜..येते आता की मी जाऊ"

"थांब, बॉस ला सांगू दे...येतेच"

मी पटापट माझं आवरलं आणि खाली आली तर विक्रम गाडीला टेकून माझी वाट पाहत उभा होता,

"u are impossible विक्रम, अस अचानक भयानक कोणी येत का...ते बर मला सुट्टी मिळाली, नाहीतर संध्याकाळ पर्यंत तुला इथेच उभं केलं असतं मी"

"थांबलो असतो मी त्यात काय...चल पटकन बस कॉफ़ी घेऊ आणि जाऊ, मला पण घाई आहे आज"

"एवढी घाई होती तर का आला?"

"मी कामाने आलो होतो इकडे ..रस्त्यातच तुझं ऑफिस आहे तुला न भेटता कस गेलो असतो, माझ्या लकी चार्मला भेटलो नसतो तर माझं एकही काम झालं नसत मग😜"

"तू ना एक नंबरचा फ्ल..."

" फ्लर्ट आहे , माहीत आहे ते 😂😂..पण तुला हसू येतेना यामुळे... बस तर मग माझा फ्लर्ट सफल झाला समज🤣,"

आम्ही कॉफी शॉप मध्ये पोचलो आणि मला न विचारताच विक्रम ने दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केली, मला कोणत्या वेळेला काय हवं असायचं हे विक्रमला बरोबर कळायचं...

"मग..काय आणलस माझ्यासाठी महाबळेश्वर वरून?"

"महाबळेश्वर ला गेली होती, मलेशिया ला नाही... तिथे काय मिळतं आणण्यासाठी?"

"साधं चॉकलेट आणलं असत तरी चाललं असत..पण तू कंजूस.. किस काम की ये दोस्ती😏...घोर कलयुग भगवान..."

"बस कर ना आता नौटंकी तुझी, मी परत आली त्याचा काही आनंद नाही...चॉकलेट पाहिजे म्हणे "

"तू आलीस त्याचा खूप आनंद आहे ग..बर सांग कशी झाली ट्रिप?"

विक्रम ने हा प्रश्न विचारताच माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि मी त्याला अभय साफिया बद्दल सगळं सांगितलं, त्यानेही खूप शांतपणे सगळं काही ऐकून घेतलं...विक्रम चा हाच स्वभाव मला खूप आवडायचा, तो सगळं काही खूप शांतपणे ऐकून घ्यायचा अन मगच काहीतरी सल्ला द्यायचा,

" मला मान्य आहे सोनू, अभय ने या सगळ्या गोष्टी तुला आधीच सांगायला हव्या होत्या पण त्याने तुला सगळं क्लिअर केलं हे महत्त्वाच नाही का? तो आता सगळं विसरून मनापासून तुझ्यासोबत आनंदी आहे तर मग तू पण सगळं मागचं विसरून त्याची साथ देना"

"सगळं तर विसरेल रे मी पण तुला कस विसरायचं?"

"अस काय करतेस सोनू? आपण प्रॉमिस केलंय एकमेकांना की आपण आपल्या लाईफ पार्टनरला कधीच दुखवायच नाही...आणि अभय तुझ्यासाठी किती काय काय करतो...मग तू त्याचा विचार केला पाहिजेस "

"हो रे विक्रम, मला पण अभयसोबत सुखी आयुष्य जगायचं आहे पण अस नाही....त्याने साफिया बद्दल मला सगळं सांगितलं पण त्याला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही अजून, त्यामुळे मी त्याला आपल्याबद्दल सांगायचं ठरवलंय.."

"आपल्याबद्दल? तू नक्की ठरवलंय अस? म्हणजे तुला वाटत का तो आपली मैत्री समजून घेईल?"

" न समजून घ्यायला काय झालं? मी पण तर त्याला साफिया बद्दल समजून घेतलच ना आणि तस ही आपण काही चुकीचं करतोय का विक्रम? ठीक आहे मैत्री पेक्षा जर जास्तच आहे आपलं नात पण आपल्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत..."

"तुला समजत नाही आहे सोनू..कस सांगू तुला...हे आपल्याला माहीत आहे की आपण आपल्या मर्यादा सांभाळतो...पण तो नवरा आहे तुझा आणि कोणता नवरा आपल्या बायकोची अशी मैत्री चालवून घेईल? "

"ओके...म्हणजे अस असतं का बायकोनेच सगळं समजून घ्यायच नवऱ्याचं, आणि नवऱ्याने मात्र बायकोच काहीच ऐकून घ्यायचं नाही....आणि मला सांग उद्या दिशा ने तुला अस काही सांगितलं तिच्या एखाद्या मित्राबद्दल तर तुझ्यातला नवरा ही जागा होईल, हो ना? तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती विक्रम..."

" अग चिडतेस काय सोनू एवढी...मी इन जनरल बोलत होतो.. मला फक्त हे सांगायचं होत की आता कुठे तुझ्या आणि अभय मध्ये सगळं ठीक व्हायला सुरुवात झाली आहे आणि तू अस काही करू नको ज्यामुळे तुमच्या मध्ये गैरसमज निर्माण होतील, आधी तू त्याला समजून घे, तुमचं बॉंडिंग स्ट्रॉंग कर, त्याला विश्वासात घे अन मग सांग जे काही आहे...आणी अजून एक जर दिशा ने मला असं काही सांगितलं तर नक्कीच मी समजून घेईल कारण जर मी तिला बंधनं घातली तर ती माझ्या जवळ येणार नाही दूर जाईल माझ्यापासून, बंधनं नेहमीच अविश्वास निर्माण करतात सोनू, आणि कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा आहे.."

" मला पण तेच सांगायचं आहे विक्रम, कोणत्याही नात्यात विश्वास असला पाहिजे, अभयने विश्वास करूनच मला त्याचा भूतकाळ सांगितला ना आणि आता मी अस आपली मैत्री लपवुन त्याचा विश्वास नाही तोडु शकत ना आणि मीच का तू पण दिशा ला सांग आपल्याबद्दल...कारण जर उद्या चुकीच्या पद्धतीने या गोष्टी त्यांच्यासमोर आल्या ना विक्रम सगळं काही उध्वस्त होईल..."

"हम्म...बरोबर आहे तुझं..दुसरीकडुन त्यांना कळल्या पेक्षा आपणच सांगितलेल बरं... अभय सोबत राहून हुशार झाली आहेस ग, तुझा छोटा मेंदू काम करायला लागलाय😂😂"

"विक्रम😫😫, तू कोणत्याही परिस्थितीत मजाक करू शकतो ना, कधीतरी सिरिअस हो गधड्या..."

"मला असच राहू दे ग, जर मी सिरिअस झालो तर तुला त्याचा त्रास होईल...चल उशीर होतोय निघुयात आपण..."

खर बोलला होता विक्रम, त्याच्या सिरिअस होण्याचा त्रास मलाच जास्त झाला...अजूनही होतोय...आता फक्त हेच बघायचं होत की अभयला हे सांगितल्यावर तो कसा रिऍक्ट करेल...मनाला खात्री होती की तो नक्कीच समजून घेईल...पण प्रत्येक वेळेस आपल्याला जे वाटते ते होईलच हे जरुरी तर नाही ना....
-----------------------------------------–--------------------
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED