समर्पण - १६ अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - १६

समर्पण -१६

पास नही होते फिर भी,
हमेशा साथ रहते है ।
जो खामोशी भी सूनले,
वही तो रुहानी रीश्ते होते है ।


मी आणि विक्रम आमच्या कामात कितीही बिझी असलो तरी एकमेकांच्या डोक्यात मनात मात्र नेहमीच असायचो... अजूनही आहोतच...कधी कधी अस व्हायचं की कामाच्या व्यापात बोलणं व्हायचं नाही किंवा एखादा मेसेज करायला ही वेळ मिळायचा नाही, मग कधीतरी रात्री मेसेज यायचा त्याचा... तेंव्हा पण फार काही विशेष बोलणं व्हायचं नाही, एवढंच की, 'जेवली का' किंवा 'थकली असशील, आराम कर' पण एवढे छोटेसे मेसेज ही मन तृप्त करून जायचे...कधी कधी तर अस व्हायचं की मला खुप प्रकर्षाने वाटायचं की विक्रम शी बोलावं अन त्याचा फोन यायचा आणि मी त्याला म्हणायची की मला खूप आठवण येत होती रे तुझी, तो बोलायचा मला तुझी आठवण नाही येत सोनू कारण मी तुला कधी विसरतच नाही...कधी कधी न बोलता ही एकमेकांच्या मनातल कळून जायचं, प्रश्न पडायचा मला...त्याला विचारायची मी 'काय म्हणायचं रे या नात्याला?', मग नुसतच हसायचा ...बोलायचा 'प्रत्येक नात्याला नाव असलच पाहिजे असं नाही...कारण नात्याला नाव दिल की अपेक्षा वाढतात आणि अपेक्षा वाढल्या की ते नात स्वार्थी होतं...आणि आपल्या मध्ये स्वार्थ नाही ना सोनू'...पण आमच्या आयुष्यात आलेल्या वादळाने ही मैत्रीही गिळून घेतली...आता फक्त त्या कधीही न जुळलेल्या पण तुटलेल्या नात्याचे अवशेष सोबत घेऊन फिरतो आहेत...

विक्रमला भेटून आल्यावर निश्चय पक्का झाला होता आणि हिम्मत ही दुप्पट वाढली होती,आता फक्त मी संध्याकाळ व्हायची वाट बघत होती की कधी अभय घरी येतो अन कधी मी त्याला बोलते विक्रम बद्दल...पण आज खूप उशीर झाला तरीही अभय आलाच नाही ऑफिस मधून त्यामुळे मी त्याला फोन केला कुठे आहेस हे विचारायला, तर तो बोलला

"सॉरी नैना, खूप वर्क लोड आहे आज यायला उशीर होईल मला किंवा जमणार ही नाही घरी यायला...मी कामाच्या गडबडीत विसरलो तुला सांगायचं, खूप खुप सॉरी.."

"नाही ठीक आहे , तू कर तुझं काम..."

"काय झालं? रागावलीस?"

"नाही अजिबात नाही, पण...."

मनाची तर खूप चलबिचल होत होती, खूप प्रयत्न करून तर आज हिम्मत एकवटली होती माझी अभय ला बोलण्यासाठी आणि जर तो आज घरी नाही आला तर, मी याच धुंदीत असताना अभय पुन्हा बोलला,
"काय झालं नैना, काही बोलायचं आहे तुला"

मी विचार केला हाच चान्स आहे, फोनवर तर फोनवर..मी सगळं सांगतेच अभयला, आता जास्त उशीर करण्यात काही फायदा नाही,
"हो बोलायचं आहे...अभय माझा ना एक मित्र..."

"काय हे नैना....मी माझ्या इतक्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून तुझ्याशी बोलत आहे अन तू आपल्या बद्दल बोलायचं सोडून मित्रांबद्दल सांगत बसलीस..."
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अभय मला थोडासा नाखुशी दाखवत बोलला,

"अरे म्हणजे आपल्या बद्दलच आहे तू ऐक तरी, माझा मित्र आहे ना विक्र..."

"हे बघ, मला ना खूप काम आहेत सध्या, मला नाही वाटत तुला काही महत्त्वाच बोलायच आहे त्यामुळे मी घरी आल्यावर सांग काय सांगायचं ते..."

आणि थोडंस चिडूनच अभयने फोन ठेवून दिला, माझं ऐकूनही घेतलं नाही, खूप वाईट वाटलं मला अन रागही आला त्याचा...तस तर आजकाल खूप बायको बायको करत फिरतो अन आज कामाच्या पुढे त्याला बायकोही नाही दिसली...हेच आवडायचं नाही मला अभयच...मला काय हवंय काय नको याबाबतीत स्वतःच निर्णय घेऊन मोकळा झाला...सगळं स्वतःच्या मनाप्रमाणेच विचार केला, त्याने हे समजून घ्यायला खुप उशीर केला की बायकोचही ऐकून घ्यायच असतं....आज अभयला या सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि तो वळवूनही घेत आहे, पण माझं मन मात्र या सगळ्यांपासून खूप लांब निघून गेलंय....

रात्री खुप उशिरा अभय घरी आला, त्याची वाट बघत मी न जेवताच झोपून गेली, त्याच्या जवळच्या चावीने जेंव्हा त्याने दार उघडलं तेंव्हा मला जाग आली, मी पटापट जेवण गरम करून त्याला ताट वाढायला घेतलं, तर तो बोलला,
"मी जेऊन आलोय ग, राहू दे ते ताट...आणि तू जेवलीस न?"
मी होकारार्थी मान हलवली फक्त, मी काही बोलणार तेवढ्यात पुन्हा अभय बोलला,

"मी तुझं ऐकून नाही घेतल म्हणून रागावलीस ना, पण मी कामात होतो ग अन तू तुझ्या मित्राचं सांगत होतीस...किती मित्र मैत्रिणी आहेत ग तुझे....सारखं त्या फोनची मेसेज टोन वाजत असते, मैत्री सोडून कधी नवऱ्याकडेही लक्ष दे..."

"एवढे वर्षे तुझ्याकडे लक्ष देऊनच काढली आहेत अभय तुझ्यासोबत...तुझचं काही घेणं देणं नव्हत माझ्याशी"
मी नकळतपणे बोलून गेली...

"ओहह...तर हा राग अजूनही आहे मॅडमला, बोललो ना तुला विसरून जा सगळं, आणि आता लक्ष देतोय ना तुझ्याकडे..घे मला जवळ..." आणि अभय माझ्या एकदम जवळ येऊन उभारला,

"अभय...प्लिज..उशीर झालाय, झोपायचं आहे मला.."
मी त्याच्या समोरून निघून जाणार तोच त्याने माझा हात पकडून मला त्याच्याकडे खेचलं,

"झोपशील ग...तसही उद्यापासून दहा दिवस आरामच आहे तुला, मग आजची रात्र जगून घेऊ दे तुझ्यासोबत"

"का? म्हणजे तू बाहेर जतोएस दहा दिवस? आणि मी एकटी काय करू इथे?"

"काम आहे ग नैना, आणि तुला सोबत घेऊन जायला तुझं ऑफिस नाही आहे का? उद्या सकाळची फ्लाईट आहे माझी..."

"मला आधी का नाही सांगितलं?"

"मला पण ऑफिस मधून निघतानाच कळाल ग, मग तुला आधी कधी सांगणार?"

"अभय मला बोलायचं आहे रे....सोड मला , तू बस आधी आणि ऐकून घे माझं काय ते"

"वेडी आहे का तू? अशी रात्र बोलण्यासाठी थोडीच असते आणि मला माहित आहे नेहमीप्रमाणे हेच विचारशील की मी मैत्रिणीबरोबर बाहेर जाऊ का...जा ग बिनधास्त... एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नको विचारात जाऊ मला...आता बोलणं बंद कर आणि फक्त माझ्याकडे बघ..."

कोणाचं ऐकेल तो अभय कसला...त्याच्या जिद्दीसमोर मी पुन्हा हरली...पण मीही ठरवलं होत की मी अभयला सगळं सांगूनच राहणार त्यामुळे मी सकाळी लवकर उठून माझ्याबद्दल अन विक्रम बद्दल सगळं काही एक कागदावर लिहून तो कागद अभयच्या बॅग मध्ये ठेऊन दिला,

"अभय, तुझ्या बॅगेत मी एक कागद ठेवलाय प्लिज वाचून घेशील, जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा "

"मी समोर असल्यावर तुला लव्ह लेटर लिहायची काय गरज पडली😜😜"

"अभय प्लिज....माझं ऐकून नाही घेतलं, कमीतकमी ते वाचून तरी घेशील प्लिज..."

"हो हो वाचेल मी...आणि एकटी राहू नको, नम्रताला बोलवून घे, मला उशीर होतोय मी निघतो आता..."
आणि अभय निघून गेला, मात्र माझी अस्वस्थता वाढवून गेला, माहीत नाही अभय ती चिठ्ठी वाचेल की नाही, आणि वाचली तरी त्याचा काय परिणाम होईल...

म्हणतात ना की नाती फुलांप्रमाणे असतात... हळूहळू एकएक पाकळी उलगडत जाते आणि त्या फुलांचा सुगंध दरवळत राहतो...आणि जर हा सुगंध कमी होत गेला तर, त्या फुलांच्या पाकळ्या वाळायला लागल्या तर...पाकळ्या तुटून पडतील हो ना? फुलांचा सुगंध कमी होत जातो ते नैसर्गिक आहे, पण नात्यांचा सुगंध कमी करायचा की वाढवायचा हे मात्र आपल्या हातात आहे, आणि त्यासाठी लागतं 'अंडरस्टँडींग'...व. पू. म्हणतात ना की "सोबत राहायला अक्षता नाही 'अंडरस्टँडींग' लागतं"...माझ्या आणि अभय च्या नात्यात ही 'अंडरस्टँडींग' खुप उशिराने आली...
----------------------------------------------------------

अभयला जाऊन एक आठवडा होत आला होता, तो नव्हता त्यामुळे नम्रता माझ्याकडे राहायला आली होती, पण तिला एक महत्त्वाच काम आल्यामुळे ती आज निघून गेली...तस तर शनिवारच होता आणि मला सुट्टी होती पण माझं मन मात्र कुठेच लागत नव्हतं... कारण तेच... अभय ने चिठ्ठी वाचली की नाही..अजून पर्यंत अभय त्याबद्दल काहिच बोलला नव्हता आणि माझी विचारायची हिम्मत ही नव्हती...माझा मूड खूपच ऑफ होता, एक तर अभय काही कामात असेल तर त्याला फोन केलेलं अजिबात आवडत नाही, खूप चिडतो तो...त्यामुळे मी फक्त कमापूरतच बोलायची त्याला, आता माझ्याकडे अभय घरी यायची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता...थोडं मन शांत व्हावं यासाठी मी मंदिरात जाऊन बसली, थोडा वेळ तिथे बसून घरी निघणारच तेवड्यात विक्रम चा फोन आला,

"काय चशमिश... सकाळपासून एकही मेसेज ला रिप्लाय नाही, आहेस ना पृथ्वीतलावर😜😜"

"आहे अजून...मी बाहेर आली होती मंदिरात त्यामुळे माझं लक्ष नव्हतं फोन कडे.."

"अरे देवा...इतक्या तरुण वयात मंदिरात जाऊन बसण्याची वेळ आली😂😂"

"मंदिरात जायला वयाच बंधन नसतं... आणि काय रे शहाण्या तू नाही जात का सत्संगात?"

"शुsss, ते टॉप सीक्रेट आहे असं सगळ्यांसमोर सांगायचं नसतं, कान्हा ऐकून घेईल ना तुझा"

"कान्हापासून काय लपून राहील आहे जे हे लपवता येईल, जाऊदे ते, काय म्हणतो, कसकाय फोन केला?"

"कसकाय केला म्हणजे? तुला फोन करायला मला तुझ्या परमिशन ची गरज नाही जाडे... आणि हो मूड ऑफ दिसतोय त्यामुळे सांगतोय एक तास देतो तुला...तयार हो पटकन, बाहेर जातोय आपण अन स्टेशन वर ये, मी वाट बघतोय तुझी"

"सगळं स्वतःच ठरवलं, मला विचारलं ही नाही, मी नाही येणार जा"

"हे बघ जास्त भाव नको खाऊ, अजून जाडी होशील😂😂...चल ना प्लिज सोनू"

"ठीक आहे, पण जातोय कुठे आपण ते तरी सांग"

"किडन्याप करून घेऊन जातोय तुला 😝😝..शोधत बसेल मग तुझा अभय तुला..."

"मी खरंच किडन्याप झाली ना तर अभय चे सोड तुझेच जास्त हाल होतील😜"

"ते होतील तेंव्हा होतील आता तू घरी जा लवकर आणि ये स्टेशनला..मी पोचतोच आहे तासाभरात.."

मी घरी जाऊन भराभर आवरलं आणि जायला निघाली... मनात आलं अभयला फोन करून सांगते की मी बाहेर जात आहे, त्याला कॉल केला तर त्याने कॉल कट केला मला वाटलं तो कामात असेल त्यामुळे मी पुन्हा त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही....स्टेशन ला पोचली तर विक्रम माझ्या आधीच पोचला होता, मी जाऊन गाडीत बसली,

"आत सांग कुठे जातोय आपण?"

"बोललो ना तुला की किडन्याप करतोय तुला😝😝"

"असं का? बघ बर, विचार कर आताच, माझ्या नवऱ्याला माहीत झालं ना तर सोडणार नाही तुला...खूप जीव आहे त्याचा माझ्यात"

"हम्म.."

"काय झालं? घाबरलास😂😂, सिर्फ धमकीसेही डर गये..."

"घाबरत तर मी कोणाच्या बापाला नाही सोनू...फक्त माझ्यामुळे तूला काही त्रास होऊ नये म्हणून भीती वाटते..."

"बाप रे ! सेंटी झाला तू...माझा मूड चांगलं करायला बोलावलं की अजून खराब करायला😜"

"तू चल तर सही, तिथे गेल्यावर तुझा मूड आपोआपच चांगला होईल"

विक्रम मला बीच वर घेऊन गेला...खरंच खुप छान वाटत होतं तिथे..जेंव्हा त्या समुद्राच पाणी माझ्या पायांना स्पर्शून जायचं खूप छान वाटतंय, मी कितीतरी वेळ ती गंमत बघत बसली...आणि विसरून गेली होती की मी अभयला काही चिठ्ठी पण लिहिली आहे,

"कस वाटतंय सोनू?"

"खुप छान वाटत आहे रे, तू का बसलायेस, तू पण ये ना इकडे"

आणि मी त्याला उठवण्यासाठी हात पुढे केला,

"हे काय झालंय सोनू?😮😮"
विक्रम माझ्या हाताला बघून बोलला,

"अरे काही नाही, चपाती भाजताना पोळलं थोडंस, होऊन जाईल दोन तीन दिवसात ठीक"

"हे थोडंस वाटतंय तुला? किती भाजलय ते...काळजी नाही घेता येत तुला स्वतःची...मूर्ख कुठली, स्वतःचा नाही माझा तर विचार करायचा.."
मी विक्रम ला इतकं चिडलेल पहिल्यांदा पाहिलं होतं...तो चिडला जरूर होता पण त्याचे पाण्याने भरलेले डोळे हे सांगत होते की त्याला माझी किती काळजी आहे...माझी छोटीशी जखम ही त्याला इतकी व्यथित करून गेली, का देवाने इतकं गुंतवल आम्हाला एकमेकांमध्ये, याचे परिणाम काय होतील हे विचार करूनच भीती वाटायची मला,

"सॉरी सोनू, पण तू ना काळजी घेतजा स्वतःची, त्यासाठी ओरडलो"

"ठीक आहे रे...पण ही काळजी, तुझे इतके फोन...हे सगळं नवीन नवीनच असतं..काही दिवसांनी मी बोर होईल तुला "

"म्हणजे? काय म्हणायचं तुला?"

"मला एक सांग विक्रम, म्हणजे बघ ना माझं आणि अभय च तर आधीपासूनच काही विशेष नव्हतं नातं.. त्यात मी तुझ्यात कधी गुंतली नाही कळलं मला, पण तुझं आणि दिशा च नातं तर चांगलं आहे ना, कमीतकमी आमच्या पेक्षा तरी बेटरच आहे, मग तू कसकाय माझ्यासाठी एवढा..."

"ओहह, म्हणजे तुला माझ्या तुझ्यासाठी ज्या फिलिंग्ज आहेत त्या खोट्या वाटतायेत...?"

"नाही रे...तस नाही पण..."

"पण काय? हे बघ सोनू, मी स्पष्टच सांगतो, जेंव्हा तू मला पहिल्यांदा बोलली ना तेंव्हाच माझ्या मनाला एक वेगळीच अनुभूती झाली होती...पण मी दुर्लक्ष केलं तेंव्हा, पण मग हळूहळू आपलं बोलणं व्हायला लागलं, भेटायला लागलो, मी कसकाय तुझ्या इतक्या जवळ आलो नाही कळाल मला...तुला बोलताना माझ्या मनाची जी अधीरता असते ना, मला दिशा सोबत कधीच नाही जाणवलं तस...आणि या गोष्टी ठरवून नाही होत ग..."

"हम्म...डायलॉग हा😜"
मी त्याला चिडवण्याचा उद्देशाने बोलली, तसा विक्रम कधी चिडत नाही पण हे ऐकून त्याला काय झालं काय माहीत त्याने जोरात माझा हात पकडला आणि माझ्या डोळ्यात बघत बोलला,

"तुला जोक वाटतंय हे सगळं, तुला माहीत आहे रात्री कित्तीतरी वेळ मला झोप लागत नाही हा विचार करून की तू माझी असूनही माझी नाहीस, अभयची आहेस पण समजवतो स्वतःला की कमीतकमी मैत्रीण म्हणून तरी तू आहेस माझ्यासोबत...आणि तुला हे सगळं ऐकून हसायला येत आहे, जोक वाटत आहे...हं?"

"नाही वाटत आहे मला जोक विक्रम...सॉरी मी मजाक करत होती...किती रागवशील, प्लिज माफ कर...बघ नाहीतर मी या समुद्रात उडी घेईल..."

"जा जाडे, तू समुद्रात गेल्यावर त्या समुद्राचं पाणी बाहेर येईल😝😝"

"😄😄बघ मनवलंच ना मी तुला, तू नाही जास्त वेळ राग धरू शकत माझ्यावर माहीत आहे मला.."

"मी नाहींच रागवू शकत ग तुझ्यावर...आणि तसही सगळ्यांना वाटायला माझा राग एवढा स्वस्त नाही.. तू स्पेशल आहेस त्यामुळे थोडासा रागावलो😊😊"

"किती स्पेशल ते पण सांग"

" बघ तू माझी खूप चांगली मैत्रीण आहे त्यामुळे तुझ्या फालतू च्या बकबकीसाठी तुला रागवू ही शकतो, आणि माझ्या रागवण्यामुळे तुला झालेला त्रासही मी नाही पाहू शकत कारण माझं तुझ्यावर खुप प्रे.."

"खूप काय? असं अर्धवट नको बोलून सोडू ना"

"तुला काय सगळंच सांगावं लागत का? तुझ्या छोट्या मेंदूत घुसत नाहीत का काही गोष्टी😜....अन तसही कोणतरी मला बोललं होतं , काही गोष्टी फील कराव्या लागतात बोलायच्या नसतात..."

"विक्रम...तू नसता आला माझ्या आयुष्यात तर काय झालं असत रे माझं?"

"तरी सगळं चांगलंच झालं असत सोनु, एवढा हळवा स्वभाव बदल तुझा, कोणच्या येण्यामुळे किंवा जाण्यामुळे स्वतःवर कधीच फरक पडू देऊ नको, आणि भावनिकदृष्ट्या तर कोणावरही अवलंबून राहू नको, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ्या आनंदासाठी किंवा दुखासाठी फक्त तूच जबाबदार आहे, बाकि कोणी नाही, कोणालाही स्वतःच्या सुखासाठी किंवा दुःखासाठी कारण बनू देऊ नको...इमोशनली स्ट्रॉंग हो..."

"तू असा काही बोलला की मला भीती वाटते रे तुझी..."

"माझी भीती? का बरं?"

"कोणाचं काय ते मला माहित नाही पण माझ्या आनंदासाठी किंवा दुःखासाठी मी तुझ्यावरच अवलंबून आहे विक्रम, आणि तू एकदम असा बोलतो आहेस, मला भीती वाटत आहे रे तू मला सोडून तर जाणार नाही ना"
मला खूप भरून आलं होतं, विक्रम अस काही बोलेल याची कल्पना ही केली नव्हती मी,

"वेडी आहेस का सोनू? मी सहजच बोललो, आणि मी इतका निर्दयी नाही ग की तुला इतकं जवळ करून तुझ्यापासून दूर निघून जाऊ...ते डोळे पूस आधी..खुप पाणी आहे समुद्रात सध्या😂😂"

"आता मी सिरिअस आहे तर तुला जोक सुचत आहेत, तुला ना मारायला पाहिजे खूप..."

"मारून घे तसही आठवडाभर मी तुझ्या हातात येणार नाही मार खाण्यासाठी.."

"का ? कुठे जतोएस आठवडाभर?"

"दिल्ली ला जायचं आहे ग, नवीन प्रोजेक्ट मिळालाय त्याचंच काम आहे , म्हणून तर तुला आणलंय ना सेलिब्रेशन साठी..."

"अरे वा, अभिनंदन.. म्हणजे आता आठवडा भर तुझ्यासोबत बोलणं होणार नाही, आणि माझ्या सोबत तर केलं सेलिब्रेशन अन दिशासोबत नाही?"

"तिला सोबत घेऊन जातो आहे ग, तूच बोलली होती ना बायकोला वेळ दे, तेच करतो आहे...आणि बोलणं का होणार नाही आपलं तुला वेळ मिळेल तसा करत जा ना कॉन्टॅक्ट मला"

"नको एवढं काही नाही, परत येणारच आहे ना तू तेंव्हाच बोलू, आणि तसही दिशासोबत चाललायेस, नवी सुरुवात कर, एन्जॉय करा लव्ह बर्ड्स..😜"

"आगाऊ झाली आहेस तू.."

"तुझ्या संगत चा असर आहे रे...आणि ऐक, वेळ बघून दिशाला सांगून दे हां आपल्याबद्दल"

"तू माझी काळजी नको करू, तू फक्त अभय वर लक्ष दे.."
विक्रम सोबत वेळ कसा जायचा काही कळायचच नाही, त्याच्या बोलण्यात मी एवढी गुंग व्हायची की वेळेच भानच राहायचं नाही...काय बोलला होता तो "मी इतका निर्दयी नाही"..नक्कीच नव्हता तो निर्दयी पण मग तो का वागला असावा माझ्यासोबत असा..म्हणजे अभय त्याच्याबद्दल जे बोलला ते बरोबर होत का, येणारी वेळच सांगणार होती...
----–--------------------------------------------------------
क्रमशः