नवरात्र उत्सव Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवरात्र उत्सव

यासर्व मंगल मांगल्येशिवे सर्वार्थ साधिकेशरण्ये त्र्यंबके गौरीनारायणी नमोस्तुते..👣

17 ऑक्टोबर 25 ऑक्टोबरपर्यंत यावर्षी नवरात्र उत्सव आहे..शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे.. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षात तून दोनदा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत... शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत.. देवीची उपासना केली जाते.. शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणूनच शारदीय...😊

अश्विन महिन्यामध्ये घटाची स्थापना करून दीप प्रज्वलित करून मनोभावे देवीची पूजा केली जाते... यालाच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणतात.. हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा आहे...शेतातील पिके तयार होत असतात ,तर काही तयार झालेली असतात. म्हणूनच शेतकरी सुद्धा खूप खुश असतो.. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटामध्ये देवीची स्थापना करतात.. नऊ दिवस देवांची पूजा त्यांना देव्हाऱ्यात तून बाहेर न काढता करणे किंवा कुमारिकेला देवी मानून त्यांना जेवू घालने, प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धती असतात.. नऊ दिवस दीप तेवत असतो.. काही घरात तर फक्त तिळाच्या तेलाचा वापर दिव्यासाठी केला जातो अखंड दिवा तेवत ठेवणे हे शांतीचे प्रतीक मानले जाते... घटामध्ये रोज एक माळ लावली जाते नऊ दिवस नऊ प्रकारच्या पानाफुलांच्या माळा देवीला घातल्या जातात..✍️✍️💞Archu💞

काही काही घरांमध्ये वेगवेगळ्या धान्याची पेरणी केली जाते व नऊ दिवसात त्यांना योग्य अंकुर फुटल्याने त्याला धन असे म्हणतात.. शेवटच्या दिवशी होमहवन केले जाते..याचे उद्यापन म्हणजेच विसर्जन विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होते... आपल्याकडे दसऱ्याला आपट्याची पानांची पुजा करून नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते..घटस्थापना करताना एका परडी मध्ये काळी माती घालतात.. त्यावर सुगड, मातीचा करा किंवा ते नसेल तर तांब्याचा तांब्या ठेवून त्यावर सात बोटे हळदीकुंकवाचे व स्वस्तिक काढून ठेवला जातो.. त्यावर नऊ किंवा सात विड्याची पाने ठेवून त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवतात.. त्या श्रीफळलाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात.. त्याला वेगवेगळ्या माळा घातल्या जातात.. हार वेणी गजरा घालतात..👣

घटाखालच्या काळ्यामातीत सात प्रकारची धान्य पेरतात.. जसे की गहू ,तांदूळ ,जवस ,तीळ इत्यादी... ह्या घटा जवळच अखंड नंदादीप तेवत ठेवतात.. त्या दिव्याची योग्य काळजी घेतली जाते व या नऊ दिवसात तो अखंड तेवत ठेवण्यासाठी त्याला कधीच विझु देत नाही.. दिवा म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान...ह्या घटावर वेगवेगळ्या फुलांच्या माळा सोडून सकाळ-संध्याकाळ आरती पूजा करून देवीची मनोभावे पूजा केली जाते.. उपासना केली जाते.. काही जणी दोन दिवस ,तर काही पाच दिवसांचा उपवास ठेवतात.. पण शक्यतो प्रत्येक घरांमध्ये नऊ दिवस ही देवीचा उपवास ठेवला जातो.. नवरात्रीतील देवीची उपासना ही प्रामुख्याने रात्री करतात.. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते.. रात्री मन शांत स्थिर असते.. त्याने एकाग्रता भाव लवकर साधतो.. एक दिवसाने घटाखालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याच्या उष्णतेने अंकुरत असते.. हळूहळू ते वाढत असते.. तेच त्या देवीचे घटा वरचे दर्शन होते....😊

देवीची नऊ रूपे.. 1..मा शैलपुत्री, 2..मां ब्रह्मचारिणी3.. मा चंद्रघटा,4.. मा कुष्मांदा,5.. मा स्कंदमाता,6.. मा कात्यायानी, 7..मा काल रात्री,8.. मा महागौरी,9.. माँ सिद्धिदात्री...⚡या नऊ दिवसात महिला वर्गात मात्र खूप मोठी पर्वणी असते.. काही ठिकाणी गरबा इत्यादी केला जातो.. या नऊ दिवसात नऊ प्रकारचे वस्र रंग हे देवीला असतात.. म्हणून सगळ्याच नऊ दिवस वेगवेगले रंग नेसतात.. राखाडी, केशरी ,निळा, लाल ,पांढरा ,हिरवा ,जांभळा,मोरपंखी आणि पिवळा.. ई...खतरा हा उत्सव म्हणजे उत्साहाची परभणी नाही का तुम्हाला काय वाटतं...तर मग मैत्रिणींनो तुमच्या घरी कशा प्रकारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो, हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा.. तुमच्या आमच्या मधीलच तुमची लाडकी.. ✍️✍️💞 Archu💞