Samarpan - 18 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - १८

समर्पण-१८

जिंदगी की करवट भी,
जानें क्या कमाल कर गई ।
आँखो से निंदे और निंदो से,
उसके सपने भी उडा ले गई ।


काही वेळा आयुष्यात अश्या घटना घडतात ज्याचा विचार आपण स्वप्नातही केलेला नसतो, त्यामुळे त्यातून सावरायच कस हेही सहजासहजी अंगवळणी पडत नाही...'विक्रम' माझ्या आयुष्यातील अशीच एक घटना...किंवा अस म्हणायचं त्या एका घटनेत माझं आयुष्य समावल होतं...माझ्या आयुष्याने खुप जबरदस्त कलाटणी घेतली होती, त्यातून सावरता सावरता मी अश्या एकटेपनाच्या वळणावर येऊन पोचली जिथे फक्त मी आणि माझा एकांत होता....आणि अभय??....अभय ही होता सोबत, पण त्याने जे मला दुःख दिल होतं त्यापेक्षा मला माझा एकांतच चांगला वाटत होता...कारण त्याने मला दिलेल दुःख तर मी पचवू शकली असती पण त्याने माझा स्वाभिमान दुखावला होता..

त्या रात्री अभय खूप चिडला होता, त्याचे असे रागाने भरलेले डोळे मी याआधी कधीच बघितले नव्हते, पण मला एक खात्री तर झाली होती की अभयच चिडण्याचं कारण एकच होत..विक्रम...त्याने त्याच्या डाव्या हाताने माझा उजवा हात इतका घट्ट पकडला होता ही माझ्या हातावर त्याचे व्रण उमटले होते...मी तरीही हिम्मत करून त्याला बोलली,

"अभय...दुखतंय मला...प्लिज सोड ना, काय झालं ते सांग तरी..."
मी अस बोलल्यावर त्याने माझे दोन्ही दंड पकडून मला भिंतीशी टेकवल आणि माझ्या जवळ येत मला बोलला,

"दुखतंय तुला नैना, खरंच? अन तू जे माझं मन दुखावलं त्याच काय?....मी बोललो होतो तुला नैना, माझ्याशी काहीही खोटं बोलून माझ्यातला राक्षस जागा नको करू...आता त्याचे परिणाम तुलाच भोगायचे आहेत..."
आणि तो माझ्या इतक्या जवळ होता, मला हा सगळा प्रकार खूप किळसवाणा वाटत होता, मी खुप शक्तीनिशी त्याला बाजूला केलं,

"अभय...प्लिज दूर हो आणि मला अजिबात हात लावायचा नाही, तुझी पिलेली जेंव्हा उतरून जाईल तेंव्हा बोलेन मी तुला, मी आता तुझं काहीच सहन करून घेणार नाही..."

मला अभयच्या या वागणुकीचा खूप राग आला होता, कसकाय अभय असा वागू शकतो माझ्यासोबत... माझी ईच्छा नसताना माझ्यासोबत.. छी...विचार करूनच माझं रक्त तापत होतं, मी त्याला बाजूला करून रूम मधून बाहेर जायला निघाली त्याने मला पकडून पुन्हा त्याच्याकडे खेचलं अन बोलला,

"ओहह...मी तुला हात लावलेलं आवडत नाही आहे तुला नैना, कस आवडणार म्हणा, तुझ्या विक्रमला पण तर आवडत नसेल ना मी तुला स्पर्श केलेला...हो ना ?"

"अभय....तो...विक्रम... म्हणजे तो माझा मित्र..."

"हं..खूपच चांगला मित्र आहे वाट्ते, नाही?? म्हणजे बघ ना इतका चांगला मित्र की तुझा नवरा घरी नसताना तू त्याच्यासोबत फिरायलाही जाऊ शकते बाहेर... हो ना नैना? कोण आहे विक्रम नैना ?? खूप जवळचा मित्र असेन हो ना....बोल नैना.."

अभयचा आवाज चढला आणि आता मात्र माझे हातपाय गळाले, ज्याची भीती होती तेच झालं...कुठेतरी हे वाटत होतं की अभय समजून घेईल, पण त्याने चुकीचा अर्थ काढला होता, पण तो तर बोलला होता की त्याने ती चिठ्ठी वाचलिच नाही मग कस त्याला कळाल...मी खूप रडत होती, त्याला रडत रडतच समजवण्याचा प्रयत्न केला,

"अभय...अभय प्लिज मला एक चान्स दे, मी सगळं सांगते तुला, प्लिज आधी तू शांत हो....मी सांगते ना तुला सगळं.."

अभय खुप जोरात ओरडला माझ्यावर त्याच्या हातात असलेला माझा हात झटकत तो मला बोलला,

"एक शब्द ही बोलायचा नाहीस तू...आणि तुला काय वाटत ग, मी मरत आहे तुला स्पर्श करण्यासाठी... अजिबात नाही..तूच आहेस जे मला जवळ येऊ देत नाहीस...मला आधी वाटल की महाबळेश्वर ला जे काही झालं आपल्यात त्यामुळे आपण जास्त जवळ येऊ...मुंबईला परतल्यावर वाटलं सगळं काही आता सुरळीत होईल, मी त्यादिवशी बाहेर जायच्या आधी प्रयत्न केला तुझ्या जवळ यायचा, तू मला थांबवलं नाही पण तूझी मनातून इच्छाही नव्हती...मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं नैना, मला अस वाटलं मी जबरदस्ती तर करत नाही आहे ना तुझ्यावर...आणि याच गिल्ट मध्ये मी कामावर लक्ष नाही देऊ शकलो आणि मी दोन दिवस आधीच घरी यायला निघालो, पण मला जे काही कळाल ना त्यामुळे माझी जमीनच गेली पायाखालची...."

"अभय मी तुला सांगणारच होती रे सगळं आणि मी खुप प्रयत्न ही केले होते तुला बोलण्याचे पण नाही जमलं.... त्यामुळे मी तुला ते एक कागदावर लिहून दिल, प्लिज विश्वास कर माझा..."

"विश्वसाच्या गोष्टी तर तू करूच नको नैना, अन तुझी ती फालतू चिठ्ठी वाचून काय होणार होत? काय माहीत त्यात किती खरं आणि किती खोटं लिहिलं असशील तू...."

"मी सगळं काही खरच लिहिलंय रे, आणि आता पण तू ऐकून घे मी सगळं खरं खरं सांगते तुला, पण तू प्लिज आधी शांत हो.."

"सांग मग...ज्या दिवशी मी तुला जेवायला घेऊन गेलो होतो बाहेर, तू ऑफिस मधुन किती वाजता निघालीस? आणि त्या दिवशी तर तू नम्रताला ही भेटणार होतीस ना स्टेशन वर? भेटलीस मग तिला? नाही कदाचित मी चुकीचं बोललो, तू नम्रता ला स्टेशन ला नाही, कोणत्यातरी आश्रमात भेटली असशील हो ना? आणि तुझी ही नम्रता म्हणजेच विक्रम ना नैना? बोल ना खरं खरं सांगायचं ना तुला, बोल मग आता"

खुप काही सांगायचं होत अभयला पण त्याचा राग पाहून माझे शब्दच निघत नव्हते आणि त्याचे एकावर एक प्रश्न मला भांबावून सोडत होते, पुन्हा एकदा माझी खराब वेळ मला आडवी गेली होती...आणि अभय ने मला कधी बघितलं आश्रम मध्ये आणि त्याला कस कळाल की त्या दिवशी स्टेशन वर विक्रम होता, नम्रता नाही....मला काहीच बोलायला सुचत नव्हतं, तेवढ्यात अभय पुन्हा बोलला,

"काय झालं उत्तरं नाहीत माझ्या प्रश्नांची तुझ्याकडे? की अजून काय खोटं बोलायच यायची जुळवाजुळव करत आहेस.....हाच विचार करत असशील ना की याला कसं कळाल? सांगतो...ज्या दिवशी तू नम्रताला भेटायचं बोलुन गेलीस नेमकं त्याच दिवशी मला नम्रताचा फोन आला, ती बोलली की तुझा फोन लागत नाही आहे आणि खूप दिवस झाले तुझं तिच्याशी बोलणं ही झालं नाही आहे..मला कळाल तू माझ्याशी खोटं बोलली पण मला वाटलं की तुला माझ्यासोबत यायचं नाही ऑफिसला, तू कम्फर्टेबल नाहीस त्यामुळे तू असं केलंस, मी ती गोष्ट तिथेच सोडली....पण नेमकं त्याच दिवशी माझ्या ऑफिसच्या एक मित्राने तुला तिथे आश्रम मध्ये बघितलं तुझ्या त्या विक्रम सोबत, काल जेंव्हा माझ्या मोबाईल च्या स्क्रीनसेवर वर त्याने तुझा फोटो बघितला तेंव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली...मला खूप वाईट वाटलं पण मी त्याला खोटं सांगितलं की तू तिथे गेली होती हे मला माहित आहे....पण तरीही माझं मन मानायला तयार नव्हतं नैना की तू अस काही करशील...मी तुला लगेच कॉल केला तर तुझा फोन बिझि येत होता.... माझे संयम मात्र सुटत जात होते, मग मी माझ्या एका मित्राकडून जो पोलीस मध्ये आहे, त्याच्याकडून तुझे कॉल डिटेल मागितले...त्यात तुला सगळ्यात जास्त फोन विक्रमचे होते....कोणतीही मुलगी आपल्या 'जस्ट अ फ्रेंड' सोबत एवढ्या गप्पा मारत नाही नैना.....आणि आज तर हैराण च झालो मी जेव्हा तू मला विक्रमच्या गाडीतून उतरताना दिसलीस....आता बोल तू...काय उत्तरं आहेत तुझ्याकडे माझ्या प्रश्नांची..?"

खरं तर अभयच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं होती माझ्याकडे आणि त्याला सगळं सांगायच ही होत पण या सगळ्या गोष्टी अश्याप्रकारे त्याच्या समोर आल्या की त्याने मला सरळ आरोपी घोषित करून मोकळा झाला...हो, कळतंय मला की मी अभयच मन दुखवलं होतं
आणि त्याच्या राग साहजिक होता त्याच्या जागेवर पण मला एक संधी तर द्यायची होती त्याने माझी बाजू मांडायला...मी विक्रम सोबत गेली होती आश्रम मध्ये पण ती परिस्थिती काय होती किंवा आमचा उद्देश काय होता, हे अभयला नव्हतं माहीत किंवा आज पण विक्रम सोबत बाहेर गेली होती आणि ते सांगण्यासाठी मी अभयला फोन पण केले होते हे अभयने ऐकून घेतलं नाही...किंवा मला या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून लपवायच्या नव्हत्या आणि ते सगळं सांगण्यासाठी माझी काय धडपड होती हे अभय समजू शकला नाही.... तरीही खुप हिम्मत करून मी अभयशी बोलायचं ठरवलं,

"अभय...हे बघ, मला मान्य आहे तुझ्या सगळ्या गोष्टी पण माझं एकदा ऐक तरी तू...मी गेली होती त्याच्यासोबत बाहेर आणि त्याचदिवशी मी घरी आल्यावर तुला हे सगळं सांगणार होति, आणि आज पण तुला सकाळी फोन केले होते रे मी, पण तू नाही उचलले माझे फोन...आणि..."

"कमाल आहे ना नैना तुझी..! म्हणजे एवढं सगळं करूनही तुला लाज वाटत नाही आहे, आणि तू मला प्रत्युत्तर देत आहेस....मानलं पाहिजे तुला, हॅट्स ऑफ टू यु..."

"अरे तू मला बोलायला चान्स तरी दे ना अभय, माझं काहीच ऐकून न घेता तू मला चुकीचं ठरवतोएस...माझं सगळं ऐकून घे आणि नंतर ठरव ना तू, मी चुकीची आहे की नाही आणि मग तू जे बोलशील ती शिक्षा मान्य आहे मला..."

"मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये नैना, तुझ्या ह्या भोळ्या चेहऱ्या मागे तुझं असही रूप आहे याची कल्पना नव्हती केली मी कधी...आणि शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार आहे, तू बघच आता फक्त.."

आणि अस बोलून तो माझ्या जवळ जवळ यायला लागला, माझं ह्रदय जोरजोरात धडधडत होत..एक तर अभयचा राग आणि तो शुद्धीवर नव्हता,

"अभय नको प्लिज...उद्या बोलू ना अभय, प्लिज रे हात जोडते माझ्या जवळ नको येऊ ...."

"नैना...मला तुझा चेहरा ही पहायची ईच्छा नाही आहे, तर बाकी गोष्टी तर दूरच...तू जा तुझ्या त्या विक्रम जवळच...तुझी जागा तिथेच आहे.."

आणि अस बोलून अभय बाहेर गेला, मीही त्याच्या मागे गेली बोलायला पण तोपर्यंत अभय सोफ्यावर आडवा झाला होता आणि मला बोलला,

"तुला जर वाटत असेल की आजची रात्र मी या घरात राहावं तर दूर हो माझ्या डोळ्यासमोरून, नाहींतर मी काय करेल याचा काही अंदाज ही लावू शकणार नाहीस तू..."
तो अस बोलल्यावर मी माझी पाऊलं मागे घेतली.... अभय रागात होता, मी त्याला काहीही बोलली असती तरी ऐकून घ्यायची त्याची मनस्थिती नव्हती त्यामुळे मी पण रात्रभर शांत राहण्याचा निर्णय घेतला...जेंव्हा समोरचा माणूस रागात असतो तो फक्त त्याचीच बाजू खरी समजत असतो त्यामुळे त्याची शांत व्हायची वाट बघनच सोयीचं असतं...

अभयला तर त्याच्या नशेमुळे झोप लागली असेल पण मी मात्र रात्रभर झोपू शकली नाही...रात्रभर माझ्या डोक्यात अभय अन विक्रम बद्दल युद्ध सुरू होतं..मी हे नाही म्हणणार की मी चुकली नाही पण अभयला दुखवायचा कोणताच हेतू नव्हता माझा आणि वारंवार मी त्याला विक्रम बद्दल कन्फेस करण्याचा प्रयत्न ही केला होता.....पण या गोष्टी किती खऱ्या आहेत हे फक्त माझ्या मनाला माहीत होत्या आणि दुर्दैवाने त्या गोष्टींबद्दलच 'प्रूफ' माझ्याकडे नव्हतं...अभयने जे डोळ्यांनी बघितलं ते सगळं खरं समजून गेला, एकदातरी माझ्या मनापर्यंत पोचून माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने...पण नाही... तो पुरुष ना...स्वतःची मैत्रीण आहे हे बायकोने समजून घ्यावं ही अपेक्षा ठेवणार पण बायकोचा कोणी मित्र आहे हे मात्र ऐकून घ्यायच्याही तयारीत नाही...
----------------------------------------------------------

रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही, हाच विचार येत होता डोक्यात की खरच माझ्याने खूप मोठी चूक घडली आहे का ? मी मान्य करते की विक्रम वर प्रेम आहे माझं...पण प्रेम मित्रावर करता येत नाही का? मला समजून घेणारा माझा सखा होता तो, मग ते प्रेम चुकीचं होतं? आणि काय बोलला अभय, जा तुझ्या विक्रम जवळ, तुझी जागा तिथेच आहे...याचा काय अर्थ समजावा मी....प्रेमाचा अर्थ म्हणजे शारीरिक जवळीकच आहे का?? पण त्यात अभय ची चूक तरी काय आहे...सगळा समाजच तस समजतो...इथे मनाचे नाते कोणाला समजतात....

दुसऱ्या दिवशी रविवार होता, सकाळचे नऊ वाजून गेले तरी अभय झोपेतून उठला नाही...माझं मन खुप बेचैन होत होतं, अभयशी बोलल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नव्हती...मी याच विचारात असताना अभय उठला आणि सरळ बाथरूम मध्ये गेला...त्याला ड्रिंक केलेलं सहन नाही होतं, खूप उलट्या केल्यावर बाहेर येऊन डोकं पकडून बसला...त्याची हालत मला बघवत नव्हती, मी त्याला निंबूपाणी घेऊन गेली तर त्याने माझ्या हातातला ग्लासच फेकून दिला...मी तरीही संयम धरून होती की अभय माझं एकदा तरी ऐकून घेईल...त्याने पटापट त्याच आवरलं आणि बाहेर जायला निघाला, आज रविवारी कुठे जायला निघाला म्हणून मी त्याला विचारलं,

"अभय...कुठे निघालास ? तुला बर वाटत नाही आहे, नकों जाऊस कुठे.."

"घरात राहील तर अजून जास्त बिगडेल माझं डोकं...आणि हे फालतू ची काळजी नको दाखवू, तुझ्या ह्या नाटकांमध्ये मी फसणार नाहीये आता.."

"अभय...तुला राग काढायचा आहे ना, माझ्यावर काढ पण प्लिज स्वतःला त्रास नको करून घेऊस..."

"माझा त्रास दिसतो तुला नैना, खरच?? तुला दोष देऊन फायदाच नाही..चूक माझीच आहे जे तुझ्या भोळ्या चेहऱ्यावर अन तुझ्या गोड बोलण्यावर हरवून गेलो...आज कळतय मला साफिया माझ्या आयुष्यातून गेल्यावर मी काय गमावल आहे....बाजूला हो जाऊदे मला...."

आणि अभय निघून गेला...कुठे गेला, कशाला गेला काहीच सांगितलं नाही...मी दिवसभर मूर्खासारखी त्याला फोन करत होती, मेसेजेस करत होती... ना त्याने माझे फोन उचलले ना मेसेजेसला रिप्लाय केला आणि नंतर तर फोनच स्विच ऑफ केला...मी कुठे चुकली कुठे नाही हा सगळा विचार मी तेंव्हा करतच नव्हती कारण मला तेंव्हा फक्त अभय ची चिंता होती आणि त्याच कारण एकच होत की तो रागात होता...रागात माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो, अभयने माझ्याबद्दल काय निर्णय घ्यावा याची मला चिंता नव्हती...मला काळजी एकच होती की रागात त्याने स्वतःला काही नुकसान करून घेऊ नये...पण त्याला तर माझी काळजी पण खोटी वाटत होती... मी दिवसभर एकटी फक्त हाच विचार करत होती की अभय सुखरूप असावा आणि फक्त एकदा त्याने शांततेत माझं सगळं ऐकून घ्यावं....माझ्या या टेन्शन मध्ये मी हे पण विसरली होती की आज विक्रम दिल्ली ला जात आहे, त्याचे एक दोन फोन येऊन गेले, मी उचलले नाही....

सकाळची दुपार झाली, दुपारची रात्र झाली अभय अजून घरी आला नव्हता...मला काहीच कळत नव्हतं काय करू, त्याच्या मित्रांना फोन करावं तर काही सोय नव्हती, त्यांनी जर काही गैरअर्थ काढला आणि त्यांनी अभयला सांगितलं तर..प्रकरण अजून चिघळेल त्यामुळे ते टाळलं मी....एक क्षणासाठी खूप प्रकर्षाने वाटलं की विक्रम ला फोन करावा आणि बोलऊन घ्यावं त्याला आणि जावं अभयला शोधायला पण विक्रम त्याच्या कामाने बाहेर जात होता आणि मला त्याच्या कामात अडथळा निर्माण करायचा नव्हता....खुप विचार करून मी एकटीच जायला निघाली अभयला शोधायला...मी बाहेर जायला दरवाजा उघडणार तोच अभय आला..रात्रीचे दहा वाजले होते आणि अभय पुन्हा त्याच अवस्थेत घरी आला...रागाने भरलेले डोळे, चेहऱ्यावर तीव्र संताप आणि पुन्हा ड्रिंक....तो येऊन आत मध्ये बसला, आणि मला बोलला,

"मग नैना.....आज कुठे फिरून आलीस...विक्रम बरोबर? तुम्हाला प्रायव्हसी मिळावी म्हणून गेलो मी बाहेर...संधीचा फायदा घेतला की नाही...?"

अभयचे शब्द मला बाणासारखे टोचत होते.. माझ्या कानांना ते ऐकावस ही वाटत नव्हतं....का आमच्या नात्याला एवढ्या तुच्छ नजरेने बघतो आहे अभय? आणि काय बोलला तो की त्याला सफियाला गमावल्याच दुःख आहे...मी तर कधीही त्याच्या आणि साफिया बद्दल असा विचार नाही केला, मग अभय का नाही समजून घेत आहे...बरं, समजून घेणं दुरची गोष्ट, तो तर माझं ऐकून घ्यायलाही तयार नाही...कसा समजून घेईल आणि का ऐकून घेईल...नवरा आहे ना तो....या गोष्टी कसा मान्य करेल...पण तरीही माझं पागल मन हे सांगत होत, थोडा वेळ जाऊदे नैना त्याचा राग शांत होउदे...अश्या गोष्टीवर रिऍक्ट करण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी टेंडन्सी असते...मी माझ्या मनाला खुप आवरत होती, पण माझा संयम किती काळ तग धरून ठेवणार होता माहीत नव्हतं...मी माझा आवंढा गिळत त्याला बोलली

"अभय... तुला नाही सहन होत ना मग का ड्रिंक केलयेस तू पुन्हा, माझ्यामुळे स्वतःला त्रास नको करून घेऊ...मला शिक्षा दे पण स्वतःची अशी हालत नको करून घेऊ..."

माझा मोबाईल त्याने हातात घेतला आणि मला फोन दाखवत बोलला,

"तुला खरंच काळजी होती माझी? मग हे काय आहे नैना, एवढं सगळं होऊनही त्याचे फोन का येतायेत तुला??"

"अभय, त्याला काहिच माहीत नाही रे, मी नाही बोलली त्याच्याशी आणि मी त्याला काही सांगितलं ही नाही, तो कामात आहे रे..."

"वा..खूप छान नैना, त्याच्या कामाची, त्याची चिंता आहे तूला... किती गहिरता आहे तुमच्या मैत्रीत...वा मानलं पाहिजे...काय माहीत मैत्रीच्या नावाखाली काय आहे.."

आता मात्र माझा संयम सुटला...प्रेमापेक्षाही जास्त आदर करत होती मी अभयचा...त्याच व्यक्तिमत्त्व, त्याची हुशारी, कुटुंबियांसाठी त्याच असलेलं प्रेम, सगळ्यांची काळजी करणं..या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या मला त्याच्या...पण माझं चरित्र आणि माझा स्वाभिमान त्याच्यापेक्षा ही मोठा होता...
"अभय...बस झालं आता...खूप काही बोलला तू माझ्या आणि विक्रम बद्दल, तुला जर पूर्ण सत्य माहीत नाही तर तू असे आरोप नाही लावू शकत... ?"

"पूर्ण सत्य?? काय आहे पूर्ण सत्य नैना? विक्रम कुठे जातो, काय करतो, कधी जेवतो सगळे अपडेट देतो तुला...खुप वेळा त्याचे मेसेज बघितले मी त्याचे तुझ्या फोनवर...काय गरज आहे त्याला तुला इतकी सगळी माहिती पुरवण्याची? कोण लागतेस तू त्याची??"

"जर तू त्याचे मेसेज बघितले होते मग तेंव्हाच का नाही विचारलं मला? मी सांगते का नाही विचारलं, कारण त्यात लपवण्यासारखं आणि विचरण्यासारखं काहीच नव्हतं... आणि मी विक्रमची कोण लागते किंवा तो माझा कोण लागतो हे समजून घेण्याच्या परिस्थितीत नाही आहेस तू सध्या....मी अजूनही विनंती करते तुला माझं सगळं ऐकून घे...आणि मग तुझा जो निर्णय असेल मला तो मान्य आहे.."

विक्रम माझा सखा होता, मला मानसिक आधार देणारा माझा मित्र होता, मला प्रेरणा देणारा माझा मेन्टर होता...असं नातं होत आमचं..त्याने कधीच मला अभयपासून दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी नेहमीच धडपड असायची त्याची.....याव्यतिरिक्त आम्ही कधी एकमेकांना त्या नजरेने बघितलच नाही....आणि अभयला फसवाव किंवा त्याला दुःख व्हावं हा विचार मी स्वप्नातही केला नव्हता...पण मी बोलली ना दुर्दैवाने या गोष्टींचा पुरावा माझ्याकडे नव्हता...आजची रात्र तर सरत होती पण पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्या, अभयच्या आणि विक्रम दिशाच्या आयुष्यात काय ओढावून ठेवलंय हे त्या विधात्यालाच माहीत होतं....

--------------------------------------------------------------

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED