Reshmi Nate - 12 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - 12

उशिरा झोपल्यामुळे विराटला सकाळी लेट च जाग आली....आज ऑफिस नव्हते म्हणून तो निवांत आवरून खाली आला. सकाळपासून पिहू दिसलीच नव्हती.

मॉम, पिहू कुठे आहे.

ती कॉलेजला गेली. तेव्हा त्याच्या लक्षात येते. तो ब्रेकफास्ट करून देवेश बरोबर साईट वर निघून जातो.

संध्याकाळी विराट घरी आला. आत आल्या आल्या पिहू चा हसण्याचा आवाज आल्याने विराट चा चेहरा खुलला. सकाळ पासुन बघितल नव्हत तिचा आवाज ऐकला नव्हता तर चुकचुकल्यासारखे वाटत होते. विराट फ्रेश होऊन खाली आला.

पिहू सगळ्याबरोबर गप्पा मारत बसली होती .विराट तिच्या जवळ चालला होता की पिहू चा मोबाइल वाजल्याने ती कॉल रिसीव करत बाहेर जाते.
विराट ही तिच्या मागे जाणार की आत्या ने हाक मारली. विराट आत्या जवळ जाऊन बसतो.

विराट,अमन च्या घरच्यांचा फोन आला होता. पुढच्या आठवड्यात साखरपुडा करू म्हणतात...

ह्म्म, मला कॉल केला होता. दिपा ची exam झाली ना...

हो,

पिहू फोन वर बोलून रूम मध्ये जाते. विराट ही नजर चुकवून रूम मध्ये येतो....पिहू तिच काम करत होती.

पिहू,विराट ने तिला मागून हाक मारली. पिहू ने त्याच्या कडे बघितले. विराट गालात हसत तिच्या जवळ आला .तो बोलणार की त्याचा मोबाईल वाजला .त्याने एक नजर मोबाईल वर टाकली मानवचा कॉल होता. एक नजर पिहू वर टाकत बॉक्स टाइप स्माइल करत कॉल रिसीव करत गॅलरीत जातो...
मानव दिवसभरात एकही कॉल केला नाही. आता तुला माझी आठवण आली. चुकीच्या वेळेस कॉल केला. विराट दात ओठ खातच बोलतो.

मानव त्यावर हसतो....दोघ थोड्यावेळ कामाच बोलून विराट फोन ठेऊन रूम मध्ये येतो...पिहू गायब 😂 त्याने एक सुस्कारा सोडला आणि खाली आला...सगळे जेवताना एंगेजमेंट च्या गप्पा मारत होते. विराट ने पिहू कडे बघितले...ती ही गुंग होती.....आल्यापासून मी स्वतः च धडपड करतोय बोलण्यासाठी...पिहू कधी वाट्त सुद्धा नाही तो मानतच बड़बड़ करतो....

विराट पिहू ची वाट बघत पोर्च मध्ये थांबला होता. पिहू पण तीच आवरून वर आली. विराटला बघून ती त्याच्या शेजारी येऊन थांबली. दोघ एकमेकांना कडे बघून एक स्माइल देत पुढे रिमझिम पडणार्‍या पावसाकडे बघतात....कुठून काय बोलावे म्हणून दोघे विचार करत होते.

अहो,

हहं ,विराट ने तिच्या कडे बघितल...

तुमची फ्रेंड त्रिशा तिला बर आहे ना ...काल खुप लागले होते हाताला...

त्रिशाच नाव ऐकून विराटचा पाराच चढला ,मी तुला तिचा P.A.
वाटतो का सगळी इन्फर्मेशन असायला....तो रागात बोलतो.

पिहू दचकून त्याच्या कडे बघते...तिला पुढे काय बोलाव कळतच नव्हते.

विराट, ss सुमन मागून येऊन बोलतात..

विराट सुमन वर एक नजर टाकून ताडकन निघून जातो.
पिहू सुमन कडे बघत वरवर हसत निघून जाते ....

विराट रागाने इकडून तिकडून फिरत होता...इथे आपल सोडून दुसर्‍याची चिंता पडलेली असते. पिहू रूम मध्ये येते...घाबरून त्याच्या कडे न बघताच फ्रेश होण्यासाठी जाते.

विराट डोळे झाकून राग शांत करायचा प्रयत्न करत होता. पिहू बाहेर आली तसे त्याने डोळे उघडून तिच्या वर नजर टाकली. पिहू ने नुकताच बाथ घेतला होता...तिचा सुगंध सर्वत्र पसरत होता. तिने पिंक व्हाइट कलर चा थ्री फोर्थ घातला होता. विराट तिला भान हरपुन एक टक बघत होता. पिहू ने घाबरून त्याच्या कडे नजरच फिरवली नाही ती ब्लँकेट घेऊन बेड झोपली... त्याने नजर फिरवली....

तो शक्य तितका राग कंट्रोल करत तिच्या जवळ आला.
पिहू,

हहं.... पिहू पटकन उठून बसली.

पिहू आइसक्रीम खायला जाऊ चल....

तुम्हाला हव का थांबा मी ...आणते...पिहू चालली होती.

🙄🙄🙄 पिहू ऐक. मी तुझ्या साठी..

म...मला, न...नको तुम्हाला हव ना आहे ना मी लगेच आणते...

😖😖😖पिहू sss तो दोन्ही हातांनी तिच्या दंडाला पकडतो पिहू घाबरून स्तब्धच उभी राहते. मी काय बोलतोय नीट ऐकून तरी घेत जा....

पिहूचे डोळे भरून आली होते. ती रडायच्या घाईत दिसल्यावर तो शांत झाला..त्याने तिचे हात हातात घेतले....मला तुझ्या बरोबर टाइमस्पेंड करायचा होता. सकाळपासून वेळ मिळाला नाही..तुला वाटत नाही का माझ्याबरोबर बोलावं वेळ घालवावा...

पिहू डोळ्यातल पाणी आवरत वरवर हसत मान हलवत त्याच्या हातातून हात सोडवते.

तो हसत हाताने चल म्हणतो.

मी चेंज करून आले.

, लांब नाही जायचे....इथेच जाऊन येऊ.

न...नको अस...मोठ्या आईंनी बघितले तर . ..

कोणी काही बोलणार ....आणि ह्यावर मला जास्त बोलायला लावू नकोस 😖😖😖चल आता....

ते...ते...ती न बोलता पळतच आत जाते .

विराट कपाळालाच हात मारतो....पूर्ण डोक आउट केल....

पिहू मिरर मध्ये बघून समोरची केस मागे घेत क्लच लावत स्लीपर घालते....विराट तिचा 😍 क्यूट चेहरा निहाळत होता.

ह्म्म चला....तो भानावर येत तिच्या मागे जातो. ती त्याच्या मागे मागे चालत होती.तो तिरकी मान करत बघत नाही अशी मान हलवतो.

पिहू खाली हॉल मध्ये येताच इकडे तिकडे बघत त्याच्या पुढे पळतच बाहेर जाते....विराट हसत बाहेर जातो.

दोघे ही गाडीत बसतात. विराट तिच्या वर नजर टाकून गाडी स्टार्ट करतो.

पिहू शांत पुढे बघत होती. विराट ही काहीच बोलला नाही.
बाहेरच वातावरण बघून विराटच मन प्रसन्न झाले. ती बोलत नसली तरी जवळ असल्याचे फिलिंग छान वाटत होती .

विराट -पिहू आइस्क्रीमच्या शॉप मध्ये जातात...

पिहू सगळे आइस्क्रीम बघत होती....

कुठल हवे....

अम्म, .. ती नजर फिरवत चॉकलेट चोको चिप्स कडे
बोट दाखवते.

विराट दोघांना आइस्क्रीम घेऊन बाहेर येतो....पिहू पाऊस बघत आईस्क्रिम एन्जॉय करत होती. विराटच घेण देण नव्हते 😅😅
विराट 🙄 तिच्या कडे बघत त्याची आईस्क्रिम पडतो.

ओह्ह, शीट्...

अहो,.... चला आपण दूसर घेऊ....

नको....it's okay....

अहो, पण....

ठीक ये तू फिनिश कर जाऊ आपण...

.पिहू आईस्क्रिम कडे बघत त्याच्या समोर कोन धरते....अहो, थोड...

विराट तिच्या डोळ्यात बघत तिचा हात पकडत आईस्क्रिम चा एक बाइट खातो. पिहू चेहरा लाल झाला होता....हृदय धडधड करू लागले...त्याने हात सोडला. पिहू चेहरा दुसरीकडे करत लाजत आईस्क्रिम खाऊ लागली .

दोघे ही निघू लागले...पाऊस बघून विराट ने छत्री उघडली
पिहु ,...😓

पिहु एक नाही दोन नाही...ती पुढे पावसात चालली

त्याने तिच्या मनगटाला पकडुन छत्रीत घेतले...आणि रस्ता क्रास केला.

ती गाल फुगवुन त्याच्याकडे बघु लागली.

गाडी जवळ आल्यावर त्याने तिला बसवुन तो ही बसला...
त्याने गाडी चालु करुन तिच्या वर नजर टाकत सीटब्लेट लाव .

हुहह..‌तीने रागाने सीटब्लेट लावला.

विराट गालतल्या गालात हसत पुढे बघु लागला.

तुम्ही हसू नका ..दरवेळेस तुमच ऐकणार नाही मी ती चिडुनच बोलली...

ठिक आहे....तो गालात हसत बोलला.

ती नजर रो‌खून बघत.. त्याच्या जवळ जात होती.

तो थोडा मागे झाला..तु काय करतेस...🙄

तिने पटकन विंडोलॉक उघडलं ,आणि स्वतःच्या साईडची विंडोची ग्लास ‌खाली घेतली..पावसाचे थेंब ती तिच्या चेहरयावर घेत हसत होती...

विराट ही तिच्या कडे बघुन हसु लागला...

थोड्यावेळाने त्याने ग्लास वर घेतली....

पिहु चेहरयावरच पाणी पूसत बोलू लागली...किती छान वाटतयं एकदम फ्रेश...त्याने त्याचा रुमाल काढुन दिला.ती घेऊन हात चेहरा पुसु लागली.

अहो ... अजुन घरी कस नाही आलो...रस्ता पण .🤔

लवकर कळालं,आता तु एवढ छान एन्जॉ‌‌य करत होती.मग म्हणटल थोडं लांब घेऊन जाऊ..लॉन्ग ड्रायव्हीय पण होते तसेच😉

पिहु ल‌ाजुन लगेच बाहेर बघु लागली.

बघु ,कशी ब्लश करतेस...😍

पिहुला अजुन लाजल्यासारख झालं तिने दोन्ही हाताने चेहराच झाकला.वि‌राटला ही तिला छेडायला मज्जा येत होती...

घरी चला आता तिने स्वतःला सावरत हळुच बोलली.त्याने गाडी रिवर्स घेतली.

पिहु स्लीपर‌ काढुन पाय दुमडुन हातात हात गुंफवुन बसली...
विराटने एक नजर टाकली...त्यानु गेअ‌र टाकुन त्याचा हात हळुच तिच्या हाताला लावला...

पिहु शहारुन अजुन हाताची बोट घट्ट करु लागली...

त्याने त्याच्या बोटाने तिच्या हाताची पकड जोर लावत‌ काढुन एक हात हातात घेतला..

पिहुची त्याच्याकडे बघायची पण हिम्मत नव्हती...ती लाजुन हात ओढत होती...

त्याने़ एक नज‌र बघितलं पिहु...इकडे बघ ..

अहं ह..ती मानेनेच नाही बोलली.

विराटने ही तिचा हात सोडला आणि गेअर वर ठेवला..

पिहु ने नजर चोरून त्याच्याकडे बघितले...त्याने परत तिच्याकडे बघितलंच नाही‌‌‌..

पिहुने त्याच्या हाताकडे बघितलं मनाची धडधड वाढली होती...तिने डोळे घट्ट मिटून हळुच हात त्याच्या हातावर ठेवला.☺

विराटने चमकुन तिच्याकडे बघितले...गालातल्या गालात हसत विराट ने तिच्या बोटांमध्ये आपली बोट गुंफवली.😊

तिच्या बोटांशी त्याच ‌खेळण चालु असताना पिहुच मन चलबिचल होत होते. पोटात गुदगुल्या होत होत्या..☺त्याच्याकडे बघयाची हिम्मत तर नव्हती..ती बाहेर बघुन लाजून लाल झाली होती.

गाडी थांबल्यावर तिने त्याच्याकडे बघितलं...त्याने हात सोडला..आणि तिच्या जवळ आला..

पिहु मागे झाली...अ...हो.ते घर तो ऐवढ्या जवळर आल्याने तोंडातुन शब्दच फुटत नव्हते..दोघेही एकमेंकांच्या डोळ्यात आरपार बघत होते.

तो गालात हसून तिचा सीटब्लेट काढतो..

पिहु त्याला ढकलुन पटकन उतरुन पळतच आत गेली.

विराट हसु लागला..वेडी फिलींग्स पण एक्सप्रेस करता येत नाही...एवढी लाजली तर कस होणार माझ ..😍

तो गाडीची चावी वॉचमनला देऊन आत येतो.

पिहु तर लाजुन पुर्ण ब्लँकेट ओढुन झोपली होती..त्याने एक नजर टाकली आणि हसू लागला...
.
.
.
.
.

वहिनी आठ दिवसांनी सारखपूड्याची तारीख निघाली. मी भटजींना विचारुन आले-सुधा खूश होत सांगते.

रोहिणी ,सुमन ‌खुश होतात.

चला आता तयारीला लागा...अमनच्या घरी फोन करुन सांगु ...रोहिणी म्हणते..

हो..पण वहिनी सगळी तयारी होईल ना...सुधा विचारत पडत म्हणते...

सुधा होईल‌ गं तु,नको काळजी करु ...सुमन

हो होईल सुधा सुमनने तर पंधरा दिवसात लग्न केलं तर साखरपुडा काय आरामात होईलं हो कि नाही सुधा रोहिणी कुचकं हसत बोलते.

सुमन काही न बोलता निघुन जाते.पिहु गुंजन कॅफे मध्ये बसले होते....तिथे त्रिशापण येते.हाय पिहू मागून त्रिशा हसून हाक मारते.

पिहू दचकुन मागे बघते...त्रिशाला बघुन पिहु पण गालात हसत हाय म्हणते.

तुम्हाला आवडत असेल तर मी जॉईन होऊ,

हो ..हो विचारते काय ये बस पिहु हसत बोलते.

कॉलेज सुटलं का..

हो ‌,ते असच आलो होतो निघणारच होते...तु कशी काय...

ह..हो ते माझी फ्रेंड येणार आहे ..अजुन आली नाही

हम्म...

मग काय म्हणतेस, पार्टीमध्ये एवढे गेस्ट असतात‌ ना बोलणंच झालं नाही त्रिशा नॉर्मल होत तिच्याशी बोलते..

हो ..ना...

पिहु मी निघते गुंजन बॅग उघलुन बाय करुन जाते..

तुला पण घाई आहे का ,

न नाही तस काही..

कॉफी ..

हम्म‌

त्रिशाने दोन कॉफी ऑर्डर केल्या.कशी चालु मॅरीड लाईफ तुझी -त्रिशा

पिहु गालात हसत हो छान..तु काय करतेस...

मी इंरटेरीयर डीझाईनर आहे ..माझा स्वतःचा बिझनेस आहे . विराटच हॉटेल ,ऑफिस मीच डिझाईन केलं तु बघितलं असेलच ..

हो.. खुप छान आहे.

त्याला इतक आवडलं माझ कामं त्याची बेडरुम सुध्दा माझ्याकडुन डिझाईन करुन घेतली..मी माझ्या आवडीने डिझाईन केली,

पिहु एक नजर तिच्याकडे बघत काॅफीचा एक स्वीप घेते..त्यावर ती काहीच बोलत नाही‌‌...

थोड्यावेळ दोघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात.

चल बाय ,मी निघते लेट होईल ..तु घरी ये निंवात बोलु ..

हो नक्की तु कधीही बोलव ...‌येईल मी बा‌य.त्रिशा हसत बोलते.

पिहु निघुन गेली.

विराट तुझ्यामुळे मला कोणाशी ही बोलाव लागतं त्रिशा दात ओठ खातच स्वतःशीच बडबडत होती...
.
.
.
.
.
.

पिहु आठ दिवसांनी दीपा ची साखपुड्‌याची तारीख निघाली आहे-सुधा

अरे ,व्हा छान कि पिहु हसून बोलु लागली.

उद्या तिच्या सासरकडचे येणार आहे.मग सगळे शॉपिंग जाणार आहोत.तु दुपारुन ये शॅापिंग साठी शॉपमध्येच हह.-सुमन

हो येते-पिहु

वहिनी रिषभ पण आला असता तर सुधा चाचरतच सुमनला बोलू लागली.

सुमन रोहिणी कडे बघते.

सुधा आत्ताच त्याने एवढा गोंधळ घालुन ठेवला आहे .विराट समोर नाव सुध्दा काढु नको....सहा महिने तिथुन हलु पण देणार नाही तो त्याला ...आत्ता कुठे घाबरून नीट काम करयाला लागलायं..त्यात जमिनीच‌ काम होत नाही म्हणून विराट त्याच्यावर ‌खूप चिडला आहे.त्याने जमिन विकून चांगल केलं नाही त्यासाठी विराटला किती त्रास झाला-रोहिणी

सुधाचे डोळे‌ पाणवतात‌ .पिहुला वाईटच वाटते.

.
.
.
.
.


दिल्ली जाव लागेल..मि.मेहताच्या हॉटेलच ओपनिंग आहे .-विराट‌

हो माहीत आहे एकत्रच‌ निघु-देवेश

हम्म...
.
.
.
.
.

रात्री विराट त्याच काम करत बसला होता.पिहु त्याच्या शेजारी येऊन बसली त्याने एक नजर टाकुन स्माईल दिली.
क्लासेस नाही येत का आता.

हो नाही ‌येत ते सर बाहेर गावी गेलेत महीनाभर तर नाहीयेत.

हम्म,exam कधी आहे ..

नेक्स्ट विक ,

आत्ताच स्टडी करुन घे परत दीपाच्या एगेंजमेंट मध्ये होणार नाही.

हो...

थोड्यावेळ दोघेही काहीच बोलले नाही‌.

अहो....

त्याने लॅपटॉप मध्ये बघतच काय म्हणून विचारले.

ते रिषभ दादांना पण बोलवुन घेतलं असतं‌ तर‌ पिहु हळुच म्हणाली

त्याने तिच्या कडे नजर रो‌खून बघितलं..कोण बोलल तुला विचार म्हणुन....

अ..हं कोणी नाही...ती मान हलवुन बोलते.

पिहु खरखर सांग..कोणी तुला विचा‌रायलं लावलं का ..तु सांगणार‌ आहे मी जाऊन विचारु.

पिहु घाबरते..नाही ,कोणच बोललं नाही..मी स्वतःच..ती शांत बसली

तो लॅपटॉप घेऊन बाहेर‌ गॅलेरीत येऊन बसला‌


पिहु ने तेव्हा मोकळा श्वास सोडला.त्याने बाहेरुनच तिला हाक मारली..

हो आले पिहु पटकन गॅलेरीत गेली...हह..

बस ..

ती काही न विचारता बसली...

तो शांतच बसुन त्याच काम‌ करत राहीला...

पिहूने एक नजर टाकत काय बोला‌‌‌यच आहे का

का अशीच बसू शकत नाही का ..

ह...हो ती शांत त्याच्या शेजारी बसते...लॅपटॉपच्या बटणावंरुन कळतच होते तो किती चिडला आहे.

ती पण मोबाईल बघत बसली...

त्याने तिच्या कडे बघितलं ..तिला झोप आली तरी ती बसली होती..

त्याने लॅपटॉप‌ बंद‌ केला..पिहु चल झोपु

हम्म‌ ती उठली तसे विराट ने तिला उचलुन घेतलं .पहिले ती गोंधळली पण त्याला विरोध केला ‌नाही. चेहरयावर हसू ही नव्हते..

पिहु स्माईल करणार नाही का... त्याने आत येत विचारात होता.
ती काही ‌न बोलता तिने चेहरा फिरवला .त्याने तिला अजुन वर उचलुन चेहरयासमोर आणलं .

हे काय करताय..पिहु चिडुन त्याच्या चेहयावर हात ठेवते..

तो हसतो किती घाबरते ...काही करत नाहीये..तु बोलत नव्हती ना,म्हणुन ‌तुला थोड बोलतं केलं

हे अस ..

त्याने तिला बेडवर झोपवलं .ती पण ब्लँकेट घेऊन ओढुन झोपली.

तो तिच्या शेजारी झोपुन तिच्या कडे बघु लागला.

पिहु...माझ्याकडे बघ,

मला झोप आली.ती डोळे बंद‌ करुनच बोलली.ती कुस बदलत बोलु लागली.

तो काहीच न बोलता डोळे झाकून ब्लँकेट ओढुन झोपला.त्याला ही वाईट वाटत‌ होते.आपण उगाच रियॅक्ट केला.तिने सहजच विचारले.
.

.
.
.

पिहू आणि वीरा दुपारुन कॉलेजमधुन शॉप‌मध्ये आल्या.,
सगळ्यांची शॉपिंग चालुच होती... वीरा थोडयावेळ बसली आणि निघुन गेली.

पिहु हे बघ मी तुझ्यासाठी साडी सिल्केट केली...रोहिणी हसत बोलु लागली..

🙄पिहु तर पूर्ण पणे ब्लँक ...लोकांसमोर एवढ छान बोलतात..घरात काय होते काय माहित.

पिहु वरवर‌ हसत ..सूमन एक नजर टाकुन रोहाणीकडे बघते,, हो छान आहे...

रोहिणी ताई खुप जीव आहे वाटत‌ं सुनेवर दीपाची सासू हसत बोलते.

हो, असणारच घरची पहिली सुन आहे .घरातल्या मुली गेल्याव‌र तिचेच लाड करयाचे‌त...रोहिणी पिहुच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलते‌

पिहु 😐 ला हसु येत होते...सुमन सुधा एकमेकांनीकडे बघतात.
(असे रीयॅलीटीमध्ये पण लोक असतात..😆😆😂😂😂)

सगळेजण साड्यांचीं शॉपिंग करुन ज्वेलरीच्या शॉप मध्ये जातात.

दिपाच्या सासरकडच्या समोर रोहिणी पिहुला काय घेऊ नी काय नाही अस चा‌ललं होते..पिहु तर वैतागली होती.ज्वेलरी काढ
घाल करुन‌‌. दीपाची सासू पण रोहिणीच बघुन दीपाला पण हे घे ते घे चाललं होते.

सूमन ने तर डोक्यालाच हात लावला.🤦🏻

आई काय चालु आहे मोठ्या आईचं पिहु हळुच कानात बोलली

सुमन गालात हसतात.जा मोठी आई हाक मारते.

सुमन हा हार आणि हे कंगन घेऊ .पिहुला ..छान दिसत आहे.

हो छान आहे -सुमन

घरी आल्‌यावर रोहिणी पिहुशी एक नाही दोन नाही तिला इग्नोर करुन निघून गेली.

विराटला यायला आज उशीर होणार होता..पिहु जेवण करून ‌रुममध्ये आली...थोड्यावेळ मम्मीशी गप्पा मारल्या.
नंतर असच वॉटसप बघताना तिने विराटच बघितले
पिहु शॉक लागल्यासारखी डी पी बघत होती...दरवेळेस विराट ब्लँक ठेवत होता नाही तर ‍हॉटेलचा लोगो ठेवत होता.तिने दोन तीन दिवस त्याच्या डीपी बघितलाच नव्हता.. त्याने दोघांचा पार्टीमधला सेल्फी काढला होता.तो‌ ठेवला होता..तिला तो किस्सा आठवुन हसु आले..तिने तो फोटो स्वेह करुन घेतला.किती वेळ तरी पिहु त्याच्या चेहरयावरुन हात फिरवत होती...मेसेज आल्यावर तिने चेक केला त्रिशाचा होता...गुडनाईट मेसेजला तिने पण रीप्लाय दिला...तिने तिचा डीपी बघितला..तर विराट आणि तीचा होता...
पिहु ब्लँकच झाली ..पण तो पार्टीमधला नव्हता मग कधीचा असेल ती विचारात पडली..नंतर तिने जास्त डोक्याला ताण दिला नाही कारण आता फ्रेंड्स बोलले तर असणारच पिक्स..
पिहुने सगळे पडदे ‌ओढुन अंधार करुन टीव्ही ऑन करुन मुव्ही बघु लागली.

विराट आल्यावर‌ त्याने बघितलं तर पिहु झोपली होती..टिव्ही ऑनच होता...त्यावर हॉरर मुव्ही लागला होता...

त्याने टीव्ही ऑफ केला..का‌य विचीत्र मूलगी आहे सारखी हॉरर मुव्हीच बघत असते घाबरते कि नाही काय माहीत...रोमान्सचा तर दुर दुर पर्यंत संबंध नाही...आणि विराट तु प्रेमात पडला त‌‌र ह्या मुलीच्या 😓 तो तिला ब्लँकेट ओढून फ्रेश होयला गेला.

.

.
.
.
.
.पिहु सगळ सामान नीट ठेवं ...आज दुपारुनच हॉटेलला जायच आहे...उद्या आहे एंगेजमेंट पण उदया दगदग होणार नाही म्हणुन आजच निघणार आहोत-सुमन.

हो ..पिहु

पिहु मी घेतलेली साडी आणि ज्वेलरी घालायची रोहिणी थोड जोर देऊन बोलते.

पिहु केवळ मान हलवते. रोहिणी निघून जाते.

पिहु संभाळुन राह उद्या पुर्ण कार्यक्रमात वहिनी काय तुला एकटी सोडणार नाही...सुधा हसत बोलते.

पिहुला पार्टीमधला किस्सा आठवतो..ती व‌रवर‌ हसुन निघुन जाते.

ताई हा कुठला स्टाफ आहे-सुमन

तो दोन दिवसासाठी मी मागवुन घेतला .गिफ्ट्स सगळे पॅक करुन घे -रोहिणी

हो -सुमन

पिहु तिच सामान सगळ नीट पॅक करते ..पहिले सगळे दागिने ठेवते.

वीरा रुममध्ये येते..वहिनी किती छान कंगन आहे .वीरा हातात घालुन फोटोज काढत‌ होती...पिहुबरोबर पण स्लेफीज काढते.वीराला सुमन हाक मारते ..वीरा हातात कंगन घालुनच निघून जाते .पिहुला ही मागण अवघड जाते..पण उद्या तर मोठ्या आईंने सांगितले घाला‌चे कस मागु ...पिहु विचार करता करता आवरुन घेते.

वीरा परत पिहुच्या रुममध्ये येते ‌‌..पिहु बाथरुममध्ये होती. वहिनी तुझे कंगन टेबलाव‌र ठेवले आहे ‌.

हो‌ ,हो ठेव आले ...

पिहु आवरुन पहिले कंगन बॉक्स मध्ये ठेवते...तिचा फोन वाजतो ती गॅलेरीत जाते.

सुमन एका स्टाफ मेंबरला गिफ्ट्स पिहुच्या रुममध्ये घेऊन पाठवते...ती मेड पिहुच्या रुममध्ये येते तिला कोणच दिसत नाही ती चेअर वर‌ ठेवते..तिची नजर बॉक्सवर पडते ती इकडेतिकडे बघत हळुच बॉक्स उघडते.त्यात कंगन बघुन तिचे डोळेच चमकतात.ती पटकन काढुन खिश्यात घालुन निघुन जाते.

पिहु रुममध्ये येते..गिफ्ट्स बघुन बॅगेत ठेवुन देते..बॉक्स पण न बघताच बॅगेत ठेवते.

दुपारुन सगळे हॉटेलला पोहचतात...

रीषभला बघुन सुधाचे डोळेच पाणवतात ती त्याला जवळ घेते ..रिषभ तु उद्या येणार होता ना,

हो पण दादाने बोलवुन घेतलं..

रिषभ नीट मन लावुन काम करं विराट मुळे आपण हे चांगल जीवन जगतोय...तुझी सख्खी बहिण आहे पण विराटने वीरा ,दीपा मध्ये कधी अंतर‌ केलं नाही.. हे बघ आठ दिवसात किती छान तयारी केली कोणी करत नाही एवढं.तु जमीन विकुन आला आणि त्याने तीच जमिन डब्बल किंमतीत घेऊन माझ्या नावावर केली.तु ही‌ नीट त्याच्या हाताखाली काम कर बाळा तुझ्या वडिलांना तर‌ कधी याची कदर नाही पण तु ही त्यांच्या सारख वागला तर‌ कस चालेल..

हो आई चुकलो मी परत होणार‌ नाही ..आई दिपा कुठे आहे .

हो आहे चल.‌

सुमन पिहुकडे बघतात.

तु बोलली विराटला रिषभ बद्दल ..

म्हणजे मी बोलले होते पण ते काहीच बोलले नाही.सुमन हसून तिच्या डोक्यावरुन हात फिरवुन निघून जातात.

संध्याकाळी,जवळचे रिलेटिव्ह येतात...छान लॉन सजवले होते.छान सॉग्स लावले होते‌..सुधाचे सासरकडचे आले होते..सुधा‌ पिहुला ओळ‌ख करुन देत होती..सगळे मेहंदी काढुन घेत होते..

पिहु़ मम्मी पप्पा कधी पर्यंत येणार आहे . -सुमन

थोड्यावेळाने ‌येतील आताच फोन केला होता ..पिहु म्हणते.

पिहु जा साडी हेवी झाली असेल दुसरी सॉफ्ट घाल मग मेहंदी काढ-सुधा ..

हो आले चेंज करुन ..पिहु रुममध्ये येते...ती बॅग उघडून साडी घेते ..तिच लक्ष बॉक्स कडे जाते..ती तो उचलते तिला तो हलका लागतो उघडुन बघते तर त्यात कंगन नव्हते..पिहुला दरदरुन घामच फुटला...तिने बॅगेतले सगळे दागिने चेक केले सगळे नीट असतात..पण कंगन नव्हते‌..पिहुला काहीच सुचत नव्हते..डोळे त‌र काटोकाट‌ भरले होते‌ ती आठवुन कुठे ठेवले..आईंनी उद्या विचारले तर काय सांगणार ..सगळ्यासमोर काय काय बोलतील..मम्मी पप्पा पण येणार त्यांना पण बोलेले तर विचार करत सगळी बॅग अस्थाव्यस्थ करुन बघत होती...घाबरुन मनाची धडधड तर खूप वाढली होती.

रुमचा दार चार पाच वेळा नॉक होते..पिहु दारकडे बघत डोळे पुसुन दार उघडते.....

विराट ब्लेझर‌ काढतच आत येतो..किती वेळचा डोर नॉक करतोय...तो घाईतच त्याची बॅग घेऊन उघडतो..तो चेंज करायला ड्रेस घेतो.पिहु कडे एक नजर टाकुन तुझ्या बॅगेतल सामान अस का टाकलंस ..पिहु..तो पिहुकडे बघुन परत बोलतो..

पिहु एकदा त्या सामानकडे एकदा विराट कडे बघत असते..

पिहु..काय झालं.विराट तिचा ब्लँक चेहरा बघुन विचारतो.

ते..तिला काय बोलव कळतच नव्हते..आत्ता पर्यंत थांबुन ठेवलेले अश्रु त्याने विचारताच निघु लागले.ती पटकन त्याच्या कुशीत शिरुन रडायाला लागते.....

विराट ब्लँकच होतो..तो हातातले कपडे बेडवर टाकुन पिहुच्या खांद्याला पकडुन थोड दुर करत चेहरा वर करुन विचारतो..काय झालं रडायला..कोण काय बोललं का..

ती मानेनेच नाही बोलते..

तो तिचे डोळे पुसतो ..तु रडायचं बंद‌ क‌र आणि सांग काय झालं.

माझ्याकडुन ..ना...ते मला मोठ्या आईंनी ...नविन कंगन घेतले होते..ती हुंदके देतच अजुन रडु लागले..

पिहु रड पहिले ,मग सांग तो चिडतच बोलतो..

पिहु अजुन बिलगुन रडु लागते..

पिहु शांत हो ना...तो पॅनिक होत बोलु लागला.मला नाही काही सुचत तु रडल्याने शांत होऊन सांग काय झालं तो तिच्या केसांवरुन हात फिरवत बोलतो...

पिहु त्याच्याकडे बघत माझ्याकडुन आईंनी घेतलेले नविन कंगन हरवले ..मी बॉक्स मध्ये ठेवले होते.पण आता नाहीयेत..मला खरच माहित नाही कंगन कुठे गेलेत‌.‌.सगळ चेक केले आणि स्वतः मी बॉक्स मध्ये ठेवले..

तु कंगन साठी रडते‌य...

पिहु डोळे पुसुन अहो, ते काय साधे सुधे कंगन नव्हते...उद्यासाठी मोठ्या आईंनी घेतले..त्यांनी व‌िचारले तर‌ काय सांगु ..ते खूप‌ महाग सुध्दा होते एवढी निषकाळजीपणाने कशी वागली मी.. पिहु ‌ ‌‌ रडुन सांगु लागली.

पिहु ते‌ कंगन का...घ‌रीच आहेत तो हसत म्हणाला.

पिहु रडायाच थांबुन काय म्हणाला तुम्ही

विराट गालात हसत तिचे डोळे पुसतो..मी मगाशी घरी गेलो होतो ना ते रुममध्येच होते साईडटेबलावर..

हे कस शक्य मी स्वतः बॉक्स मध्ये ठेवले होते.

ते मला माहीत नाही तिथेच होते...

एक मिनीट ,पिहु घाईत पटकन मोबाईल घेते...आणि त्याला फोटो दाखवते.हे असेच होते का....

मोबाईल हातात घेत हसत हा हेच होते.‌‌..

नीट बघा हेच होते.मला चांगल आठवत मी बॉक्समध्ये ठेवले होते.

तो तिचा चेहरा ओजंळीत घेतो..तिच्या डोळ्यात आरपार बघत पिहु हेच‌ आहेत...

तेव्हा‌ पिहुला विश्वास बसतो..चला ना घरी आपण घेऊन येऊ..

आत्ता ..नको मी उद्या घरी जाऊन घेऊन ‌येतो..तुला उद्या घालायचे आहेत ना ,

हम्म पण लगेच जाऊन आलो असतो ना...मला मोठ्या आईंची खुप ..ती पुढच बोलायची‌ थांबते...

मी आणतो, उद्या जाऊन सगळे गेस्ट खाली आहेत ..आणि आपण आत्ता गेलो तर चांगल नाही वाटणार...

हहह.‌.ती त्याच्या डोळ्यात बघत -तुम्ही नक्की आणणार ना ...प्लिज..

हो ,प्रॅामिस तो गालात हसत तिला मिठीत घेत बोलतो...

पिहु पण रिलॅक्स होते..तिच्या मनाच खुप मोठ ओझ कमी झालं होते.ती त्याच्या कुशीत डोळे झाकुन स्वतःच‌ मन शांत करत होती.
दार नॉक झाल्यावर द‌ोघेही भानावर येतात..पिहु पटकन बाजुला होते..ते‌..मी बघते...पिहु दार उघडायला जाते.

विराटच्या हातात‌ पिहुचा मोबाईल होता.त्याने तो पिक्स स्वतःला मोबाईलवर सेंड केला .‌

पिहु तुझे...सुमन पिहुच्या डोळ्यांकडे बघत शांत होते.

पिहु नजर चारुन आई..ते मी येतच होते.

पिहु तु रडतेस. सुमन तिचा चेहरा स्वतःकडे फिरवत विचारते...

ते आई..

सुमन विराट कडे बघतात..विराट पिहु का रडते तु काय बोलला त्या रागातच त्याच्याकडे बघून म्हणतात..

मी????-

आई ते काहीच बोलले नाही मला‌ ते. पिहु बोलणार कि

विराट जवळ येत मॉम तिला कारण लागत नाही रडा‌यला.
तिच काहीतरी सामान राहीलं आहे. घरी आत्ता चल म्हणते दिवसभर फिरून कंटाळा आला‌य मला..उदया आणतो‌ तर आत्ताच चल म्हणते.त्यासाठी एवढ रामायण चालु आहे..

पिहु विराट खर बोलतोय का-सुमन

पिहु एक नजर विराट कडे बघत मानेनेच हो म्हणते.

सुमन गालात‌ हसतात..पिहु राहीलं तर राहू देत.उद्या जाऊन आणेल..चल तुझे आईबाबा आलेत..

पिहुचा चेहाराच खुलला हो‌‌‌...मी आले आवरुन
.

हो ‌ये ..वि‌‌राट तुला मी नंतर बघते..सुमन त्याच्यावर‌ कटाक्ष टाकत‌ निघुन जातात..

मॉम मी काही केलं नाही गं तो ओरडुन बोलत‌ होता

सुमन जाता जाता तुला मी चांगल ओळ‌खते तु सांगु नकोस‌ मला.

तो पिहुकडे नजर रोखुन बघतो.

पिहु ओठांवरच हसु दाबत‌..ते ..मी आले..ती चाललीच होती‌ कि विराटने तिचा हात पकडला..काय खुप हसू येत आहे का..

न....नाही..मी हसत नाही‌‌.ती बारीक चेहरा करत बोलते.

तिचा इनोसंट फेस बघुन तो जोरात हसतो...

पिहू‌ रागानेच त्याचा हात झटकते.खरच आता आईंना सांगणार‌ ‌मी तुम्ही मला त्रास देता...सारख रडवतात..पिहु बाथरुम मध्ये जात बोलते.

विराट हसत गॅलेरीत जातो...मोबाईल घेऊन मानवला कॉल करतो...

हा बोल विराट

मानव मी एक पिक्स सेंड केला तसेच कंगन मला हवेत

मानव फोटो बघतो‌ ...कंगन तुला हवेत.

हो ...आता तुझ काम नाही,पण मला आत्ता कुठेच हलता येणार नाही म्हणुन तुला सांगतो‌.

हो आणतो रे पण कुठे मिळेल अशीच डिझाईन...

ते मला माहीत नाही ...(वि‌राट थोड विचार करुन )चार दिवसापुर्वी कुठल्‌‌या जेव्लरीशॉपच बिल पे केलं होतं तिथेच बघ..

हो बघतो...मी बाहेर‌ होतो..जसा वेळ मिळेल जातो..

हम्म मला उद्या सकाळी हवेत.

ओके

पिहु आवरुन आली ..तिचा हसरा शांत चेहरा बघुन विराट गालात हसत फ्रेश होयला निघुन जातो.

पिहु आवरुन खाली आली . आईवडींलाना बघुन ती पटकन मम्मीच्या गळ्यात पडली..

रेवती पण तिच्या केसांवरुन हात फिरवत तिचा चेहरयावर‌ पप्पी घेऊ लागल्या...

पिहु पप्पांच्या गळ्यात पडते ...भिमराव तिचा चेहरा ओंजळीत‌ ध‌रत डोक्यावर‌ ओठ टेकवतात.त्यांच लक्ष ज‌खमेचे निशाणाकडे जाते.ते हात फिरवत ...चिऊ जास्त दुखत होतं का..

नाही ओ पप्पा आता बर झालं ते ..

विराट येऊन दोघांच्या पाया पडतो.प्रांजल आली नाही

नाही तिची ‌exam आहे ना,म्हं‌णुन आली नाही -रेवती

हम्म,

पिहु जा मेंहदी काढुन घे-सुमन

हो ..मम्मी‌ मी आले‌ .‌हहह.

हो बाळा..

पिहु मेंहदी‌ काढत -व‌िराटचा विचार करत गालात हसत होती‌‌..तिला त्याच्या कुशीत सेफ वाटत‌ होते.अचानक त्याला,बघुन तिने़ मारलेली मिठी आठवुन गाल लाल होत होते.विराट इकडे तिकडे फिरत होता..तर पिहुची नजर त्याच्यावरच फिरत होती.


रेवती पिहुला‌ खाऊ घालत होती..

मम्मी बस मला ...पिहु तोंडातला घास खाता खाताच बोलते..

सगळ‌ संपवायच आहे ...किती खराब झाल्यासारखी दिसतेस.काय खातीस कि नाही.‌रेवती चिडतच बोलते..

अग रेवती तु तिला खुप दिवसांनी बघते म्हणून वाटतयं तुला...भिमराव .

तुम्ही शांत बसा....

पिहु खळखळुन हसते.पप्पा आपण शांत बसलेलेच बरे..अस म्हणत पिहु -भिमराव टाळी देतात‌.

विराट गेस्टशी बोलता बोलता त्याची नजर पिहुवर‌ पडते‌‌..तिच खळखळुन हसणं बघुन तिच्यात गुंतुन जातो..आईबाबांसमोर‌ कशी बिनधास्त असते आणि इ‌थे घाबरुन राहते...तोच कंफर्ट झोन त्याला त्याच्या प्रेमाने द्यायचा आहे ..हे त्याला जाणवुन येते...

पिहु तिची आई रुममध्ये येतात..पिहु‌ चेंज करुन मम्मीच्या मांडीवर‌ डोक ठेवुन झोपते..

पिहू बाळा‌‌‌..रेवती‌ तिच्या केसांवरुन हात फिरवतात‌..

हहह..पिहु डोळे‌ झाकूनच बोलते.

घरातले‌ सगळे चांगले आहेत ना.कोण तुला काही.

नाही गं‌ मम्मी सगळे चांगले‌ आहेत

आणि विराट..

ते पण खुप चांगले आहेत,पिहु लाजुन चेहरा लपवत बोलते‌

रेवती हसून कपाळावर‌ ओठ‌ टेकवतात...

थोडयावेळाने विराट रुममध्ये येतो...रेवती विराट कडे बघून गालास हसतात

पिहु झोपलेली बघुन आई तुम्ही झोपा ...मी,

नाही‌ नाही मी चाललेच होते...ते असच...त्या हळुच तिच डोक उशीवर ठेवतात...आणि निघुन जातात..

विराट दा‌र लॉक करतो.‌.तो फ्रेश होऊन पिहुच्या जवळ येतो..तिचे मेंहदीचे हात हातात घेतो...आणि हळुच दोन्ही तळहातांवर किस करतो..ती चुळबुळ केल्याने तो‌ लगेच हात हळुच नीट ठेवतो .
तो ही ती आज स्वतःहुन त्याच्या मिठीत आलेला क्षण आठवून स्वतःशीच‌ हसत असतो.
.
.
.
.
.
.
सकाळी सगळ्यांची एगेंजमेंटीची तयारी चालु असते...

विराट मानवची वाट बघत होता...मानव दिसल्यावर तो पळतच त्याच्याकडे गेला..मानव मिळालं का..

हो ,हे धर‌ ...तो हातात बॉक्स देतो..कूठे कुठे शोधुन आणलं मलाच माहीत...काहीही काम सांग तु आता मला

विराट हसत त्याला हग करतो..अरे तू आहे म्हणून तर मी निंवात आहे.. यार..

हो बस बस...जा आता मॅडमला दे..

एक मिनीट तु मॅडम नको बोलु वहिनी बोल..

अरे चांगल वाटत नाही..खर तूला पण मी सर बोलायला हवे..पण काय तु ऐकतच नाही..

काय बोललास..

विराट ,तुझा सारखा मित्र मला भेटला माझ जीवनच बदलुन गेलं

मानव. सोड

मी कुठे नशेच्या आधीन गेलेला त्यातुन तु मला बाहेर काढुन कोणी मला जॉब देत नव्हते.तु माझ्यावर विश्वास ठेवला .हेच खुप आहे.

मानव ,मागच काढयच नाही बोललो होतो ना.‌ ,आणि तुझ्यासारखा मित्र मला भेटला हेच माझ्यासाठी खुप आहे..डोेळे झाकून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.आणि मॅडम वैगेर बोल‌ायच नाही वहिनी बोल तु मला भाऊ मानत असेल तर.

मानव हसतो..ठिक आहे जा आता वहिनीला दे...

ह.हो..आलो मी..

अरे ,थांब तो बॉक्स काढ‌‌.

विराट जीभ चावत हो धर हा बॉक्स तो खिश्यात कंगन ठेवतो..पिहुने छान पॅरोट कलर मंजठा कलरचा पदर अशी कांझीवरम
सिल्कची साडी घातली होती‌...केंसाचा जुडा घालुन त्याला गजरे लावले होते‌...सुट होईल असा मेकअप ..गळ्यात एक
चोकर, हार मोठ मंगळसूत्र ,कमेरेला घुंगरू असलेला मेखला घातला‌ ...छान आवरुन ती रूममध्ये‌ विराट ची वाट बघत बसली‌ होती‌...
दार उघडल्‌याने पिहु वळुन बघते दोघांची नजर पडते..विराट ने छान पिच कलरचा कुर्ता घातला होता..कोपर्यापर्यंत स्लिव केले,होते एका हिरो सारखा दिसत होता.पिहु त्यालाच‌ बघत हरवुन जाते..विराट तिच्याजवळ येतो..

पिहु..

अ... हो...आणले तुम्ही कंगन

तो नाराज होऊन मान नाही म्हणून हलवतो..

पिहुचा चेहराच उतरतो...अहो...तुम्ही आणणार होता ना...

हे..हे...रडू नको आणलेत...तो पटकन काढुन दाखवतो.

पिहु रीलॅक्स होत श्वास घेते...काय‌ ओ तुम्ही का त्रास देता...पिहु चिडुन कंगन ओढायला हात पुढे करते तसे विराट लगेच कंगन मागे घेतो..अ..ह...अस नाही..

ती प्रश्नअर्थी नजरेने बघते..अहो द्या ना..ती परत हात पुढे करते

तो कंगन वर पकडतो...अ हं‌...

पिहु गाल फुगवुन त्याला पाठ फि‌रवुन थांबते.

विराट हळुच तिला मागुन मिठीत घेतो...पिहु लाजते..तो तिचे हात हातात घेत कंगन घालतो...तो तिच्यावर‌ नजर टाकतो ती लाजुन लाल झाली होती..गालावर‌ खळी पडली होती..मोगरयाचा सुगंध त्याला सुधारू देत नव्हता..तो स्वतःला साव‌रत तिला स्वतःकडे वळवतो...

पिहु अशीच हसत राह..अजुन काही नकोय‌ मला..पिहु त्याच्याकडे बघते...दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवुन जातात.विराट चा फोन वाजल्याने दोघांची तंद्री तुटते..विराट तिला सोडुन स्वतःला सावरत फोन रीसीव करतो.

पिहु बाहेर निघुन जाते...साखरपुडा होतो..सगळे गेस्ट गेल्‌यावर‌ संध्याकाळपर्यंत घरी येतात.पिहुचे आई वडील घरी येऊन लगेच निघुन जातात.पिहुचा चेहराच मुरजतो...यावर विराट काही करु शकत नव्हता..

दोन दिवसांनी पिहुची एक्झाम होती.....आठ -दहा दिवस विराट तिच्याशी मोजकच बोलायचा...आत्ता तिच मन त्याला विचलीत करयाच नव्हतं .पिहु तर विचारतच पडली विराट असा का वागतो‌य..नाही तर‌ सारख मागे मागे करत असतात...नंतर तिने पण सगळे विचार बाजुला ठेवुन स्टडीकडे फोकस‌ केला..

आठ दिवसांनी पिहु रीलॅक्स होते....आठ -दहा दिवस विराट तिच्याशी जास्त बोलतच नव्हता...संध्याकाळी सात वाजले तरी विराट आला नव्हता..तिने फोन केला.

त्याने रीसीव करत -हा‌ बोल पिहु..

अ..ते..पिहुला कळेनाच का‌‌य बोलावं .

हह.. काय तो थोड गालात हसत जोर‌ देऊनच विचारतो..

ते आईंनी सांगितले फोन करायला पिहु काही तरी सांगायच म्हणुन सांगते..🙄

विराट हसु दाबत मॉमला मी आत्ताच फोन केला होता ..मला उशीर होणार आहे ..

😬😬(तिची चोरी पकडली.) पिहु घाबरुन पटकन फोनच कट करते..

विराट हसत मोबाईल बघत असतो...मिसेस.पिहु विराट देशमुख आता खोट ही बोलायला लागली...

पिहु वेडी काय वाटत असेल.इइ...आता घरी आल्यावर कस फेस करणार..पिहु तु ना एक नंबर ची डफर आहे.ती स्वतःशीच बडबडत
रुममध्ये‌ गेली..

रुममध्ये आल्याव‌र तिला त्रिशाचा फोन येतो..दोघी हसत इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात...

पिहु चल मी ठेवते.मला बॅग पॅक करायची आहे..चार पाच डेज मला दिल्लीला जायच आहे..

हो हो चल बाय.‌-पिहु

अकराच्या दरम्यान विराट घरी आला..तो रुमपर्यंत येतो आतुन हॉर मुव्हीचा आवाज येत होता..तो कपाळालाच हात मारुन घेतो..तो आता गंमत करायचा विचार करतो..घाबरते का बघाव्...
पिहु मस्त पैकी चेअर वर बसून दोन पाय‌ टीपाय‌ ठेवुन मुव्ही बघण्यात बिझी होती..ती चॉकलेट खात होती..विराटने बाहेरुन लॉक उघडलं पिहुच लक्ष गेलं .पण कोणच आलं नाही..पिहुला वाटलं भास झाला ती परत टीव्ही कडे बघत ..आतुन दाराच लॉक वर खाली होत होती..पिहु चॉकलेट खायच सोडुन दारकडे बघते.तो पर्यंत लॉक थांबते...पिहु उठुन दाराजवळ जाऊन विचार करते..विराट आले असते तर गाडीचा आवाज आला असता..मला आला कस नाही‌‌‌..ती दार उघडून बाहेर येते..विराट पिलरच्या मागे थांबुन तिची‌ मज्जा बघत होता.पिहु पा‌यरी पर्यंत जाते..विराट हळुच रुममध्ये जातो...पिहु सगळी कडे नजर वळवुन परत रुममध्ये येऊन दार लावुन मागे वळून बघते
विराट जोरात‌ तिला भॉ करतो...

पिहु घाबरून जोरातच किंचाळते..अईइईई.ई आणि जागेवरच उड्या मारत होती..

विराट तिच्या जवळ जाऊन घाबरून तिच्या तोंडावर हात ठेवत अग मी आहे....मी ..

पिहु आणि विराट दोघेही धडपडत खाली पडतात..पिहु विराटच्या अंगावर पडते.

विराट तिला सावरतो..पिहु हहुुह...तो‌जोरातच ओरडतो.

तेव्हा कुठे तिचा आवाज बंद‌ होतो आणि त्याच्याकडे बघते...

मी आहे...इइइ....उठ माझी पाठ मोडून ठेवली..तो त्रासिक आवाजातच बोलु लागला...

पिहु घाबरून हळुच त्याच्या अंगावर उठुन लांगल का तुम्हाला...ती काळजीच्या स्वरात बोलते...

तो‌ नजर रो‌खून बघतो... नाही खुप मज्जा आली..तो पाठीला धरुनच उठत बोलतो..

पिहु जोरा जोरात हसते...मग अस कोण घाबरवतो का..

आता बोलून माझ डोक नको गरम करु..तो चिडुनच फ्रेश हो‌ण्यासाठी जातो..मज्जा करायला गेलो..माझ्यावर‌च भारी पडल तो स्वतःशीच पुटपुटत होता..

पिहुला तर अजुन हसु येत होते...

तो थोड्यावेळाने बाहेर येतो..आणि फ्रिजमधुन बॉटल घेत पाणी पित होता..

पिहु काळजीने त्याच्याजवळ जाते..अहो खुप जोरात लागलं का .

विराटला तिची काळजी बघुन छान वाटते...आता त्याला एवढ‌ही लागलं नव्हतं पण ती एवढ्या प्रेमाने विचारत होती..तर हा का मागे राहीलं.तो तिच्या कडे वळत खुप जोरात लागलं ..मला तो त्रासिक आवाजातच बोलतो.

बघु मी स्प्रे ,नाही तर आ‌यडेक्स नाही तर मसाज करुन देते...

दोन मिनिट तो दचकतोच..अहह.ऐवढ पण नाही..ठिक आहे ..

अहो ...रात्रभर त्रास होईल मी ..

(आता तिलाच सेवा करायची आहे तर ..तो तरी काय करणार )ठिक ये तो टि शर्ट काढायला लागतो

ओ..हहे..काय करता‌य‌ पिहु घाबरुन लगेच वळुन डोळे झाकते...

मग तुला कस कळणार‌ ..तो हसत बोलतो.

कळेल मला टीशर्ट काढायची काय गरज आहे..व‌रुन ही दाबु शकते.

तो डोक्यालाच हात लावत पालथा पडतो...तो गालात हसत स्टार्ट पिहु ..खुप पेन होतयं..

पिहु घाबरतच त्याच्याशेजारी बसते...हात लावु कि नको अस करत. तिने त्याच्या पाठीला स्पर्श केला..

तिच्या नाजुक बोटांचा स्पर्श होताच विराटच्या अंगावर‌ रोमांच भरभरुन वाहत होता.तो डोळे झाकून तिचा स्पर्श अनू्‌भवत होता.

पिहुच्या तोंडातुन आवाजच निघत नव्हता..अ...हो..इथे का...

तो डोळे झाकुन फक्त मानेनेच नाही म्हणतो...

ती थोडा हात पुढे घेत इथे तो परत मान हलवून नाही म्हणतो..दोन तीन वेळा ती विचारते..तो इथे नाही तिथे नाही करतच होता..पिहु चिडतेच अहो एकदा नीट सांगा....कुठे दुखत‌‌यं..ती रागाने त्याच्याजवळुन उठते..तो पटकन हात पकडुन तिला जवळ ओढून मिठीत घेतो..पिहु घाबरुन दोन्ही हातांनी त्याच्या दंडाला पकडते..

तो तिच्या डोळ्यात बघत होता..

पिहु नजर चोरुन इकडेतिकडे बघत त्याला लांब करत होती..पण तो एक इंच हालत नव्हता.

तो तिचा चेहरा स्वतःकडे करत ...पिहु...इथे दुखते...तो छातीवर बोट ठेवत बोलतो..ह्यासाठी काय करु शकते..

पिहु लाजुन नजर खाली करते...

बोल ना‌‌...तो हसत विचारतो..

मला माहीत नाही...

त्याचा इलाज फक्त तुझ्याकडे आहे...

ती त्याच्या शब्दाने मोहरुन जात होती..अंगाला गोड शहारा येत होता...दोघांचे ही श्वास जड झाले होते...

तो पिहुच्या थोड बाजुला सरकुन तिच डोक हातावर ठेवत‌..एका हाताने पोटाला पकडुन तिला जवळ घेऊन डोेळे झाकतो.

अहो..नीट झोपा..पिहु त्याचा हात काढत होती..

शु.शु..झोप‌ आलीये मला..तो ब्लँकेट ओढुन घेतो.

पिहु शांत त्याच्याकडे बघुन गालात हसत होती.. नकळत तिने तिच्या हाताने त्याला विळखा घालत डोळे झाकते...


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED