सुमन विराटला रुममध्ये बोलवतात.., मॉम तु बोलवलं तो सुमनच्या
मांडीवर डोक ठेवुन आडवा होतो.
पिहुच्या वडीलांचा फोन आला होता.
काय म्हणत होते.
तिच्या कॉलेजला आता सुट्टया आहेत ना,मग ..
तो नजर रोखुन बघतो..मग तो पटकन उठुन बसतो...
मग ते पंधरा वीस दिवस घेऊन जाऊ का विचारात होते..
नो मॉम!!!!! तो जोरातच ओरडला..
ये हळु....मॉम हसत बोलतात.
मॉम हे काय मधुनच ...मी पिहुला कुठेही पाठवणार नाहीये...तु नाही म्हणून सांग ..
अरे विराट वेडा आहेस का काही तरी बोलत असतो काय म्हणतील मी नाही बोलले तर...
मॉम ह्यावर आता परत डिसकशन होणार नाही तुला बोलता येत नसेल तर मी बोलतो...
सुमन कापाळालाच हात मारतात 🤦🏻तु काय बोलणार आहे.
सिंपल मी सांगणार मला पिहुशी शिवाय करमत नाही ..सकाळी उठल्यावर तिचा चेहरा बघायची सवय झाली आहे..
सुमन,जोरातच त्याच्या दंडला मारतात....
आईईई..तो दंडला चोळत इवळतो.
अक्कल आहे तिच्या वडीलांशी तू असलं बोलणार आहे..
मॉम तु मला हेच सांगायला बोलवली आहेस तर मी ऐकणार नाहिये...जर ती गेली ना मी तिला एक दिवसातच परत घेऊन येईल...गुडनाईट ..विराट पुढच न ऐकताच बोलुन निघून गेला...
अरे ऐक ना..काय कराव ह्या मुलाच...नंतर त्या विराटच ऐकुन,स्वतःशीच हसत असतात.
विराट रुममध्ये येतो..पिहु गॅलेरीत पावसाची थेंब हातावर खेळवत गुणगुणत होती...
स्वर्ग हा नवा वाटतो हवा...
साथ ही जणु ही उन्हात चांदवा...
स्वर्ग हा नवा वाटतो हवा...
साथ ही जणु ही उन्हात चांदवा
ऐक साजनी या खूळ्या क्षणी
वेड लावतो जीवा हा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही जणु ही उन्हात चांदवा
चिमणी घरटे सजले ये साजरे
इवले सुख ये फुलले आज रे
भरले घर ये आंनदाने
मन हे गाते गीत तुझे ऐकना..
ला...ला...ला..प्रेम गीत ..
पिहु स्वतःशीच हसत वळुन बघते..विराटला बघून तिचा आवाजच बंद होता.
तो तिच्या आवाजात हरवुन तिच्याकडे बघतो होता...तिचा आवाज बंद होताच तो डोळ्यांनेच तिला पुढे बोल म्हणतो..
पिहु लाजुन इकडेतिकडे बघत मान हलवुन नाही म्हणते...
तो नजर रोखून बघत तिच्या जवळ येतो..
ती त्याला नजर न मिळवताच लाजुन आत जायला लागते...तो तिचा हात पकडणार कि ती सोप्याच्या इकडुन पळत हसत आत निघून जाते...
विराट ही हसत आत रुममध्ये येतो...पिहु बेडवर बसुन मोबाईल बघत एक नजर विराट वर टाकत हसते..विराट तिच्या शेजारी येऊन बसतो..
पिहु थोडी सरकून बसते...
पिहु...मी फक्त बसलोय....😓
हहह ते..तुम्हाला कंफर्ट बसता येईल म्हणुन...ते..
😐
तो गालात हसतो..पिहु मी नेक्स्ट विक मध्ये दिल्ली ला जाणार आहे..
हम्म,लगेच तिच्या डोक्यात त्रिशा पण जाणार आहे ते येते.
पाच ते सहा दिवस लागतील..पार्टी पण आणि थोड काम सुध्दा आहे.
ओके पिहु गालात हसून बोलते... ..(ती थोडा विचार करते) तुम्ही एकटेच जाणर,आहे का
मी आणि देवेश जााणर आहे..
अ.हह.तिचा चेहरयाचे किंचीत भाव वेगळे झाले.
विराट ब्लँकेट ओढून आडवा झाला...त्याने त्याचा हात पिहुसमोर पुढे केला.पिहु गालात हसत त्याच्या हातात हात देत ती पण आडवी झाली...त्याने त्याची ब्लँकेट तिच्या अंगावरपण ओढली..
पिहुने🙈 लाजून डोळेच झाकले.
विराटची नजर तिच्या चेहरयावरच खिळली😍 पिहु ..
ती डोेळे झाकुनच हळु आवाजात हहह.बोलली.
त्याचे शब्द ओठांवर होते.😘पण घाई होईल म्हणुन शांत झाला..
थोड्यावेळाने पिहु डोळे उघडून त्याच्या कडे बघते.त्याला झोप लागली होती... त्याचे केस विसकटलेले होते....कपाळावर बारीक आठ्या पडल्याच होत्या ...तिने हळुच हात त्याच्या कपाळावरुन फिरवला ..लगेच कपाळावरची आठी कमी झाली. झोपल्यावर किती क्यूट दिसातात ती मानातच हसून बोलली...तिने हाताकडे नजर टाकली..विराट ने तिचा हात बोटांमध्ये गुंफवुन घट्ट पकडला होता...ती स्वतःशीच हसली..तिनेही डोळे झाकले.
.
.
हॅलो आंटी,त्रिशा घरात येत बोलते..पिहु ,सुमनच लक्ष जाते...
पिहु हसते.सुमन पण इच्छा नसताना हसतात.
ये बस -सुमन
त्रिशा बसते..
सूमन पण,तिच्या समोर बसतात...त्रिशा अशी अचानक काय काम होते का..
का,कामशिवाय येऊ शकत नाही का,मी त्रिशा हसत बोलते...
सुमन एक नजर पिहु कडे टाकून तस नाही..गं ...
मी बोलवलं आहे सुमन तिला रोहिणी मागुन येऊन बोलते...
त्रिशा रोहिणी कडे बघुन हसते...
ते मी नमन ची रुम रेन्युयेट कराव म्हटलं ,आता दोन महिन्याने येईल ना, म्ह़णून रोहिणी हसत बोलल्या.
सुमन यावर कहीच न बोलता.. पिहु चल ...मला थोडी हेल्प हवी होती...
हो..हो सुमन पिहुला घेऊन जातात.
रोहिणी त्रिशाला रुममध्ये घेऊन जाते..त्रिशा गेल्यावर सूमन रोहिणी कडे येतात...
ताई तुम्ही त्रिशाला बोलवलं का..
काय ,रोहिणी रागातच बघत बोलतात.
ताई तुम्हाला माहित आहे मी का बोलते...मला त्रिशा घरी आलेले पटत नाही...
एक मिनीट सूमन हे घर जेवढे तूझे आहे ना तेवढच माझे घरी कोणाला बोलवायच ते मी बघेल..जस तू मला न विचारता पिहुला सिल्केट केली तेव्हा मी काय बोलले का ..आली ना ती ह्या घरात माझी आवडी निवडी चा तु कधी मानपान ठेवते का...
ताई..तुम्ही गोष्ट वेगळीकडे घेऊन जात येत मी त्रिशा का नको म्हणते आत्ता कुठे दोघांचा संसार चालु झालाय त्यात पिहुला कळालं तर त्रिशा विराटच तिला काय वाटेल..
ते मला काय विचारते पिहुला सांग ना काय खरे आहे ते...
हो मी सांगणार आहे वेळ आल्यावर..पण आत्ता..
रोहिणी काही न बोलता निघून जातात...
पिहुला दोघींचा आवाज आल्याने तिने सगळ ऐकले होते..तिची धडकीच भरली...त्रिशा विराट मध्ये काय नातं आहे याचा उलगडा झालाच नाही...ती रुममध्ये येते...तिच डोक्यात सुन्न पडले होते...काय असेल आणि मला अजून का कोण बोलले नाही कोण...आईंनी अजून का सांगितले नाही.
विराट आला तरी पिहुच लक्ष नव्हतं ..विराटच आज जरा बाहेरच टेशंंन असल्यामूळे त्याने ही एवढे पिहुला निरखुन विचारले नाही...दोघेही रुममध्ये आले ...विराट जे बोलेल त्याच उत्तर देत होती...
.
.
.
.
पिहु ,वीरा ,दिपा बाहेर मॉल मध्ये आल्या होत्या..त्यांची शॉपिंग चालुच होती...पिहुला तिथे त्रिशा दिसली..दोघांची नजरानजर झाली.दोघी हसून जवळ येतात...
हाय पिहु..
हाय ,
शॉपिंग का त्रिशा हसून बोलते.
हो ते असच ,दिपा वीराच चालुच असते विकमधुन ...तूझी पण शॉपिंग का...
हो,ते दिल्लीला जायच आहे ना,म्हणुन त्रिशा बॅग्स सावरत बोलली..
वहिनी दादाला हा शर्ट का हा घेऊ वीरा जवळ येऊन पिहुला दाखवु लागली....
पिहु दोन्ही शर्ट वर नजर टाकते,वीरा हा नेवी ब्लु बघ ...कसा वाटतोय
पिहु, विराट ला स्काय ब्लु छान उठुन दिसतो..आणि विराटला लाईट कलर आवडतात...त्रिशा हसत सांगु लागली..
वीरा ,पिहु एकमेकांनाकडे बघु लागल्या..थँक्स त्रिशा बट तुझ ओपिनियन नव्हतं विचारले मी वीरा कुचक्यात बोलु लागली..
वीरा.. शुss...पिहु तिला शांत करत बोलु लागली..
वीरा निघुन जाते,
त्रिशाला राग आला होता पण तिने स्वतःवर कंट्रोल केलं..चल निघते मी अजून बॅग पण पॅक नाही माझी,विराटच काय लगेच ती बोलायची थांबते..
पिहु तिच्याकडे चकित होत बघते..त्रिशा तू आणि ...
नाही गं मी एकटीच चालले विराटबरोबर नाही..त्रिशा नाटकी दचकून बोलू लागली...
पण मी ह्यांच नाव घेतलेच नाही.
हो..ते...गं मला वाटल तुला वाटत असेल ..आम्ही दोघं एकसाथ चाललो म्हणुन बोलले .
पण मला का वाटेल.....
पिहु बाय ..त्रिशा घाईघाईतच निघुन जाते..पिहुच्या मनात अजुन असंख्य प्रश्न मांडुन.
पिहु त्रिशा काय बोलत होती हाच विचार करत राहिली..घरी आलं तरी तेच डोक्यात घुमत होते.त्यात ती सारखे वेगवेगळे डीपी ठेवत होती विराटच्या आवडीनिवडी मला माहीत नाही जास्त त्रिशा ला कस काय माहीत.. ते ही पिहुला खटकु लागले...तिच डोकच काम करेना..ती तिच्या विचारातच किचनमध्ये काम करत होती..तिने एका हाताने हातावरचा पदर खांद्यावर वर टाकला..मागे तो गॅसवर पडला..आणि ती वरच्या रॅकमधुन बरणी काढत होती..गीता जाळ बघुन जोरातच किंचाळली.. पिहुच्या हातातली बरणीच खाली पडली..आवाजाने सुधा -सुमन पळतच आले.
सुधा ने पटकन पाणी घेऊन पिहुच्या पदरावर टाकले.पिहुच्या तर तोंडातुन आवाज च निघत नव्हता.ती थरथर कापु लागली. सुमन ने तिला लगेच कूशीत घेतले.शु..काही नाही बाळा..शु...
विराट नुकताच फ्रेश होऊन खाली आला होता..गोंधळ बघुन तो किचनमध्ये आला..
पिहुला अस घाबरलेले बघून तो सुन्नच होत विचारतो.काय झालं
सूमन -सुधा विराटला बघून दचकताच..ते..काही नाही सुधा बोलते..
पिहु स्वतःला सावरत..थोडी नार्मल होते..
विराट ने पिहुवर नजर टाकली..साडीचा पदर आर्धा जळला होता,साडी पण भिजली होती...त्यावरुन त्याला समझलं
मॉम मला पिहु परत किचन मध्ये दिसयाला नको तो रागातच पिहुकडे बघत बोलतो.आणि ताडकन निघून जातो.पिहुने तर घाबरून त्याच्याकडे बघितलंच नाही.
आई ते...चुकुन पिहु हळु आवाजातच बोलते..
सुमन तिच्या डोक्यावरुन हात फिरवत ..राहू दे पुढच्या वेळेस नीट लक्ष देऊन काम करं जा साडी चेंज कर...चल मी येते...गीता सगळं आवरुन घे...
हो-गीता
सुमन पिहुबरोबर रुममध्ये येतात.
(विराट रागाने इकडेतिकडे फिरतच होता..पिहुला बघुन तिच्या जवळ येत-)घरात नोकर नाहीयेत का ,तू करत बसतेस..
पिहु काही न बोलता आत निघून जाते...
विराट काय हे,घाबरली आहे ती आणि तु अजून ओरड,
मॉम ,काय गरज आहे काम करायची...एवढे जण आहेत,आणि काम करायची ऐवढीच हौस असेलना,नीट करायच तो तिला ऐकू जाईल ह्या आवाजातच बोलत होता...
विराट शांत हो ,परत नाही होणार चुकुन झाले.
मॉम चुकुन ...अग काही झालं असते तर ...नाही.नाही.परत पिहु काही करणार नाही...त्याच्या आवाजात एक घाबरलेला जडपणा येतो.
ठिक आहे,पण आता बस ना,उगाच रडत बसेल.शांत हो...मी तिला वरच खायला पाठवते.
हम्म,विराट मोठा श्वास घेत चेहरयावरुन हात फिरवला.काय झालं असतं त्या भितीनेच त्याच हृद्य जोरात धडधड करत होते.पिहु चेंज करुन आली..तशी विराट ने तिला जवळ घेत मिठी मारली..
पिहु पण,त्याच्या कुशीत शांत पडुन राहीली..ती ही घाबरली होती अस अचानक झालं,...त्याने तिला थोड दुर केले आणि हाताला वैगेर भाजलं आहे का चेक करु लागला..पिहु यु ओके ना,..कुठे भाजलं नाही ना,
ती मानेनेच नाही म्हणते...
त्याने तिचा हात पकडला आणि गॅलेरीत घेऊन गेला..सॉरी,ते तुला अस बघून काही सूचलच नाही.का अशी कअेरलेस वागते..
ती त्याच्याकडे एक नजर बघुन त्याच्या हाताला विळखा घालुन डोक खांद्यावर ठेवते...
तो ही शांत झाला..त्याने तिचा हाताचा,विळखा काढुन तिला हाताने जवळ घेतले.पिहु ही त्याच्या छातीवर डोक ठेवुन त्याच्या हृद्याची ठोेके ऐकत होती...आज त्याच्या स्पर्शात माया, काळजी ,प्रेम ,भिती सगळे भाव जाणवुन येत होते.विराट तिला सोडुन तर देणार नाही आता त्याची तिला भिती वाटु लागली होती .सहा महिने होतच आले होते..तिला ही आता विराटची सवय होत चालली होती...पण त्रिशाच काय ...
पिहु शांत का आहे दोन तीन दिवस झाले तु बोलत नाही..त्याने हळुवार डोक्यावरुन हात फिरवत विचारले.
तिने त्याच्याकडे बघितले...
तो डोळयानेच काय म्हणुन विचारतो...
मला बाहेर जायच तुमच्यासोबत...पिहु हळुच बोलली.
त्याच्या चेहराच खुलला,काय ...जाऊ ना(,विराटचा आंनद गगनात मावेनासा झाला होता ..आज पहिल्यांदा पिहुने हक्काने़ त्याला काहीतरी मागितले होते..)
कुठे जायच कधी सांग मी एका पायावर तयार आहे..तो हसतच बोलतो..
कधी,ही....
अ...दिल्ली वरुन आलो ना,लगेच जाऊ दोन तीन दिवसांनी ,हहह..
पिहु गालात हसून हो म्हणाली.
दार नॉक झाल्याने विराट उठला...त्याने जेवण घेतलं ...पिहु पण आत आली.. अहो खाली गेलो असतो ना,कश्याला ..
हो गं मॉम ने पाठवलं आहे...धर
दोघेही गप्पा मारत हसत जेवण करतात.
,तुम्ही दोघच चालले दिल्ली ला..
हो का गं ...वन सेकंद तुला पण यायच आहे...
अहं..नाही..
घेऊन गेलो असतो ..पण तिकडे काम आहे..तुला बोर होईल..
पिहुला त्रिशाबद्दल विचारयचे होते पण हिम्मतच होत नव्हती...तिचा मनाचा गुंता कधी कमी होणार .
_______💞_______
त्रिशा,घरी आली .....ती तिच काम करत होती...पिहुला तिला बघून विचारायची इच्छा होत. होती..पण काय कस विचारायचे म्हणून ती विचारत पडली.
त्रिशाच लक्ष विराट च्या रुमकडे गेलं..पिहु खाली असल्याने तिने इकडे तिकडे बघत विराटच्या रुममध्ये आली...ती सगळी रूम निहाळत होती..तिने स्वतःच्या हाताने सजवली होती...त्यात तिच प्रेम होते...ती विराट चा फोटो हातात घेत त्याच्या वरुन हात फिरवते...तिचे डोळे भरुन येतात.का विराट का केला असं मी आपल्या दोघांची किती स्वप्न बघितली होती..रूम किती प्रेमाने सजवली होती मी आपण इथे आपली नविन लाईफ चालु करणार ...काय काय ..स..
.दाराचा आवाज आल्याने ती बोलायच थांबते.त्रिशा डोळ्यांच्या कडा पुसुन मागे वळुन बघते..रोहिणी होती...तेव्हा कुठे त्रिशा निशखतेचेे श्वास मोकळा सोडत तुम्ही आहात.
हो मीच आहे बाहेर चल...पिहु सुमन घरातच आहे बघितलं ना ,ती सुमन तर गोंधळच घालेन...
हम्म..
त्रिशा फोटो ठेव तो...
त्रिशा फोटो खाली ठेवते,
दोघी बाहेर येतात..तुला डोकं आहे अस कोणाच्या रूममध्ये जातं का-रोहिणी
आंटी त्या रुमवर माझाच हक्क होता.आणि सहा महिने होयला पाच ती सहा दिवसच आहे.मग मी आणि विराट...त्रिशा हसत बोलते.
हो तुला खूप सोपे वाटते का गं ..माझ काम झाल्ं कुठे अजुन.पहिले काम पूर्ण कर रोहिणी अशीच कुणाला मदत करत नाही...मी रक्कम सुध्दा मोजायला तयार आहे.पण काय
.
पैसे घेऊन मी काय करुन....पेपर्स तयार आहेत...तुम्ही विराट्च्या जीवनातून पिहुला काढुन बाहेर करा ..माझी जमीन तूमच्या नावावर ...अहं हं पण कधी जेव्हा माझ आणि विराटच लग्न होईल तेव्हा ..कळलं माझी फ्यूचर मदर इन लॉ...त्रिशा हसत निघुन जाते.
वर्षं झालं हेच चालु आहे चांगल लग्न झालं असते तर आता पर्यंत ती जमिन माझ्या नावावर असली असते...पण ह्या सुमनने मधेच गोंधळ घातला..रोहिणी रागातच स्वतःशीच बडबडत असते.
त्रिशा चाललीच होती तिची धडक सुधाला होती..
हाय आंटी,
सुधा तिच्या कडे कटाक्ष टाकततु इथे काय करतेस...
काम होते...तुम्ही कश्या आहात..
सुधा काही न बोलता निघून जाते..पिहु दोघींना बघतच राहते...त्रिशा पिहुवर नजर टाकुन स्माईल देत निघून जाते.
सुधा पिहुजवळ येते..पिहु वहिनी कुठे आहे,
आई,आत्ताच बाहेर गेल्या काय कामहोते का..
हो , ..ही त्रिशा कश्याला आली होती गं...
ते नमन च्या रुमच रेन्युयेशन चालु करणार आहे ना,त्यासाठी मोठ्या आईंनी बोलवलं
वहिनी काय बोलली नाही का,
कश्याबद्दल ...
त्रिशाशी जास्त बोलू नको,चांगली मूलगी नाही ती ,आणि विराट पासुन लांबच ठेव आगाऊ एक नंबर ची नको नको करून ठेवली होती विराटला तर,
काय पिहु ब्लँक होऊन विचारते..
सुधा दचकतेच काय तोंडुन निघाले पिहु मी ..मी नंतर येते..
आत्या थांबा ना,तुम्ही काय बोलत होता सांगा ना ,..त्रिशा आणि ह्यांच काय..
ते ..ते..पिहु काही नाही...सहजच बोलले
आत्या प्लिज ना,कोणी नीट सांगतच नाही हे तर नाव सूध्दा काढु देत नाही आणि आईंना तर तिला बघताच राग येतो..म्हणून मी काही विचारत नाही...तुम्हाला माहित आहे का ..
अगं पिहु मला जास्त काही माहीत नाही .तु वहिनींनाच विचार चल मी नंतर येते...
पिहुच मन बैचेन झालं होतं कोण काही ही सांगत नाही म्हणून...तिच्या लक्षात वीराच येते..वीराही कुचक्यातच बोलली होती.पिहु वीराच्या रुममध्ये येते...वीरा ..
हा वहिनी ये ना,
काय करते ..
काही नाही बस ये ,वीरा लॅपटॉप वर काही तरी करत बसली होती..
वीरा,तु त्रिशाशी अशी का बोली आपण मॉल मध्ये गेलो होतो..
वीरा तिच्या धुंदीतच होती..ते असच मला आवडत नाही ती..
का..
आधी इतकी,छान बोलत होती...नंतर ती नीट बोलत नाही म्हणुन मी कश्याला तिला भाव देऊ..दादाच आणि तिच लग्न मोडल्यापासुन ती इग्नोंर करत होती...
पिहुला तर शाॅक बसल्यासारख,काय त्रिशाच आणि ह्यांच लग्न,
हो तुला माहीत नाही...वीरा पिहुकडे बघत बोलली..
हहं...ते...मग लग्न का मोडलं
माहीत नाही मला काही..कोण मला काही सांगत नाही...मला त्रिशानेच सांगितले होते.घरातून कळालं नव्हतं वहिनी नंतर बोलु का माझ्या फ्रेंडचा व्हिडीयो कॉल येतोय..वीरा उठुन बाहेर आली पिहु खिळ्लयासारखी स्तब्ध झाली होती.तिच डोकच काम करेना...डोक्यात विचारांनी थैमान घातलं होते...लग्नात विराटचे हाव भाव , लग्नानंतर तो असा का वागत होता..सगळ्यांच्या कड्या ती जोडत होती...त्रिशाच विराटजवळ येणे तिच्या डोळ्यातंल पाणी ,पिहुला आता कोण खर कोण खोटं ह्यातला काहीच तर्क लागत नव्हता.सगळ्यांचे बाहेर एक रूप घरात एक रूप असे तिने पारखले होते...
संध्याकाळ झाली तरी पिहू एकटीच विचार करत गॅलेरीच्या दारात बसली होती..रुममध्ये लाईट्स सूध्दा लावली नव्हती...तिला आपल्या जीवनात कधी रस्ता दिसणार अस झालं होतं..कोण का,स्पष्ट बोलत नाही..हेच कळत नव्हते..
विराट ची रात्रीची फ्लाईट होती....तो सात -साडे वाजता घरी आला.
मॉम मी नऊ वाजता निघणार आहे...आलो फ्रेश होऊन
हो ये लवकर ताट वाढते..(सुमनच्या विचार करतात पिहु आल्यापासुन दिसलीच नाही...)
तो वर जाता जाताच हो बोलतो.विराट रूमच दार उघडतो...अंधार असतो..त्याने लाईट ऑन केली..समोर पिहु गॅलेरीत बसल्या जागीच झोपली होती....तो ब्लेझर काढून टाय लुझ करत तिच्या जवळ येत गुडघ्यांवर खाली बसतो...हळुच तिचे केस कानामागे सारुन तिला हाक मारतो..पिहु...
पिहु दचकुन डोळेच उघडते...
.
अगं मी आहे दचकायला काय झाले.... तो तिच्या केसांवरुन हात फिरवत म्हणतो..
पिहु नीट बसते...तुम्ही कधी आला....
आत्ताच आणि इथे का बसली उठ बेडवर झोप ..
पिहु एकटक विराट कडेच बघत होती... काय बोलाव काय नाही हेच कळत नव्हते.
त्याने तिचा हात पकडला..चल उठ .पिहु तिचा हात पटकन सोडवुन उठली.आणि त्याच्याकडे न बघताच फ्रेश होयला गेली.
विराट ते जरा वेगळच वाटलं ...तिचा चेहरा पण ब्लँक झालेला दिसत होता..त्याचा फोन वाजल्याने तो विचारातुन बाहेर येत फोन रीसीव करत बोलु लागला.
पिहु फ्रेश होऊन तिच्या तिच्या विचारातच होती..विराटशी कस बोलायच काय बोलायच ती गॅलेरीत आली...तो फोन वरच बोलत होता.
ते पेपर्स घरी का पाठवले...आता मी निघणार आहे काही वेळात...तो बोलून फोन ठेवुन वळतो..
तो पिहुला स्माईल देतो.पिहु पण वर वर हलक हसते.
पिहु तबियत बरी आहे ना,तो तिच्या कपाळाला हात लावत विचारतो...
ती थोडी मागे सरकत,ह हहं ..
ऐक,मी निघतोय थोड्यावेळाने...उद्या महत्तावाचे डॉक्यूमेंट्स येतील ते नीट संभाळून ठेव ..आल्यावर दे..
पिहु मान हलवुन हो म्हणते...
आलो मी फ्रेश होऊन .तो आत निघून जातो.
पिहुला बोलायच होते...पण,आता वेळ सुध्दा नव्हता.पिहु खाली आली ...
.
पिहु तबियत बरी आहे ना,आल्यापासुन दिसलीचनाही तु...झोपली होती.का,सुमन तिला जवळ घेत बोलतात...
हा ते ...कधी झोप लागली कळालंच नाही.
हम्म ,थकल्यावर होते. कधी कधी ...ये जेवण कर विराट कुठे त्याला ही निघायच ..
हो येत आहेत...विराट ही येतो...त्याच आई मॉम बरोबर बोलण चालुच असते...पिहु तिच्यातच हरवली होती..
विराट रुममध्ये येऊन बॅग चेक करत होता...
पिहु त्याच्या शेजारी येऊन थांबते...विराट तिच्या कडे एक नजर टाकत बॅग बंद करतो.
तो तिच्या कडे वळत-पिहु टेक केअर,फोर टु सिक्स डेज मध्ये परत येईल..
ती तो बोलत असतानाच त्याच्या मिठीत शिरते..
हे त्याच्यासाठी अपेक्षितच नव्हतं..अचानक तिने मिठी मारल्याने तो स्तब्ध उभा होता.. विराटच्या चेहरयावर हलकीशी स्माईल आली.
त्याने तिच्याभोवती हाताचा विळखा घालत घट्ट मिठी केली....
तिच्या मनात असंख्य वादळ तर उठलं होतं विराट तिच्या पासून दुर तर होणार नाही...ही त्याला बघायाची शेवटची वेळ तर नसणार...त्याच्या कामाच्या नादात तो विसरला असेलं पण सहा महिने होण्यासाठी पाच दिवस आहेत...आणि,थांबण्यासाठी त्याने प्रेमाची कबुली सुध्दा दिली नाही...पिहु अजुन त्याला घट्ट पकडुनच होती...
विराट गालात हसत वॉच मध्ये टाईम बघत ,पिहु..तो तिच्या केसांवरुन हात फिरवत म्हणतो...मला लेट होतोय,
ती अजुन ही त्याला बिलगुन होती..
विराटला तिच्या अश्या अनपेक्षित वागण्याचे छान ही वाटत होते..आणि प्रश्न ही पडत होते..
त्यानेच तिला थोड दुर केलं आणि तिचा चेहरा वर केला...दोघेही एकटक डोळ्यात आरपार बघत होते...
पिहु प्लिज, खरच लेट होतोय...(त्याला तिच्याशी खूप बोलायचे होते पण आत्ता त्याला हि वेळ नव्हता.त्याची इच्छा होतच नव्हती सोडून जायची ...पण कामापुढे त्याने स्वःताचा विचार कधीच केला नाही .तो त्याच्या इमोशनवर ताबा ठेवत जड मनानेच हसला.)
पिहुने बाजुला सरकुन हलकीशी स्माईल दिली.
दोघेही खाली आले...विराटने पिहुकडे बघून एक स्माईल दिली आणि निघुन गेला..
पिहु तो नजरेआड जाईपर्यंत बघतच होती..
पिहु मी आणि सुधा अमनच्या घरी चाललो उद्या -सुमन .
हं..हा..
पिहुला काय रात्रभर झोप आली नाही..विराट आणि त्रिशा चा विचार करुन डोक फुटायची वेळ आली होती....
.
.
.
.
सकाळी त्रिशा घरी आली.तिने पिहुकडे बघितलं आणि हसून रोहिणीच्या रुममध्ये गेली...पिहु विचार करत होती त्रिशालाच विचारलं तर..पण ती खर बोलेल कश्यावरुन
वहिनी हे भैय्याचं कामाची कागदं आली- मनी.
हम्म ,पिहु एनव्होलप आणि पेपर्स घेते...ती ते बघतच रुममध्ये जात होती .ती रोहिणीच्या रूम पर्यंत आली .तिला रोहिणीच आवाज आला म्हणून त दारात थांबली .
( दोघींना ही पिहुची चाहूल लागली होती.)
तुझं काय काम आहे दिल्लीला ह्ह्ह्ह ...
त्रिशा तिचा शेजारच्या चेअरवर बसत -ओह्ह्ह माय फ्युचर मदर इन लॉ विरट तिकडे आणि मी इथे काय करू ...त्याने स्वतःच बोलवलं आहे मला उद्या जाणार आहे मी.
पिहू ते ऐकून स्तबच राहते .
त्रिशा काय बोलतेस भान ठेवून बोल.
अहो आंटी मी खर बोलतेय...सहा महीने होत आलेत.पिहुचा वेळ संपला..
त्रिशा काय बोलतेस तुला कोण हे सांगितले विराट अस काही वागुच शकणार नाही.
मला हे विराट ने सांगितले आहे ..तो पिहुला डिवोर्स देऊन माझ्याशी लग्न करणार आहे....आणि आता त्यासाठीच मी दिल्लीला चालली आहे.
पिहुने तोडांवरच हात ठेवला...ती जे ऐकतेय ते खर आहे का .तिच्या कांनावर विश्वास बसतच नव्हता.डिवोर्स ची गोष्ट दोघांमध्येच होती.
विराट .....नाही नाही... त्रिशा अस नाही करणार तो सुमन ने जरी तुमच लग्न मोडुन जबरदस्तीने लग्न लावुन दिलं तो ते निभवणारच सुमनच्या शब्दाबाहेर नाही तो..आणि आत्ता दोघं एकमेकांना समजुन घेत आहेत..
हो आंटी त्याने प्रयत्न केला हे नात टिकवण्यासाठी पण काय,त्याला ते जमतच नाहीये...तेव्हा त्याने फोन करुन सांगितले कि त्याची चार पाच दिवसात कोर्टात नोटीस येणार आहे.
पिहुला विराटच अस अचानक बदल्याच तर्क लागला..ते फक्त आईंसाठी माझ्याशी अस वागत होते.पिहुला पुढच काही ऐकायची इच्छाच नव्हती...ती सरळ रूममध्ये गेली..
ती गेल्यावर दोघी हसू लागल्या...आंटी पिहु स्वतःहुन जाईल ना...
हो गं ह्या मुलीं सगळ सहन करू शकता पण त्यांच्या भावनांशी कोणी खेळलेले आवडत नाही....
त्रिशा चेहरयावर विजयास्पद हसु येत होते...
त्रिशा काय बोलली हे..तिला कस काय माहित आमच्या दोघांशिवाय हे कोणालाच माहीत नाही...मग हिला कस काय कळालं पिहुला दरदरुनच घाम फुटला...ह्यांनी सांगितल्याशिवाय तर तिला कळणार नाही..पिहु रुममध्ये येत स्टडीमध्ये ते पेपर्स ठेवते..तिच लक्ष एनव्होलप वर गेले..तिने ते उघडुन बघितले..वाचुन तिच्या पायाखालची जमिनच सरकली..कोर्टातुन नोटीस आली होती...पिहु ब्लँक होत काऊचवरच बसली.कालपासून घालमेल होत होती.. आज तिचे अश्रु डोळ्यातुन वाहु लागले. विराट अजुन विसरले नाही..उगाच मी नाही ते स्वप्न बघत होते.,...का हे एवढं सगळ करत होते.
फोन वाजल्याने तिची तंद्री तुटली....ती स्वतःला सावरत मोबाईल शोधु लागली..मोबाईल हात घेतला विराटचा फोन होता...त्याच नाव बघताच रागाने डोळे लालबुंद झाले होते.तिने रीसीव केला..ती बोलायच्या आतच तो बोलु लागला...
सॉरी पिहु ,कामामुळे फोन करायच लक्षातच आलं नाही...रात्री पण उशीर झाला होता...तु झोपली असेल म्हणून डिस्टर्ब केलं नाही...
काय करत होती..
तिने एक नजर पेपर टाकली..विराट ...
तिच्या तोंडुन त्याच नाव ऐकुन तो गालात हसला.त्याला अस अचानक ती विराट बोलली आवडलं ही होतं आणि तिच्या
बोलण्यातला रक्ष पणाही जाणवुन आला..
पिहु तु ठिक आहे स ना...विराट ला तिची शांतता पोटात धस्स करत होती...
हो मी ठिक आहे,माझी काळजी करु नका...आणि हो तुमचे इंपोरर्टंन्ट पेपर्स सुध्दा मी नीट ठेवले आहे...भेटले मला
हो का ,ओके...त्याला तिच अस बोलण काही वेगळच जाणवुन देत होते...
आणि हो एवढा त्रास का करुन घेतला मी तसही काही मागणार नव्हते तुम्हाला डिवोर्स नंतर ,एक साईन तर करायची होती..त्यासाठी कोर्टाची पायरी का चढायची.
विराट तर शॉकच होतो..त्याला ती काय बोलते लवकर लक्षातच येत नाही...तो त्या पेपर्सबद्दल बोलतच नव्हता.
पिहू तुझा काही तरी गैरसमज होतोय...मीं ऑफिसम.त्याच वाक्य पूर्ण होण्याच्या आधाची पिहु बोलली.
कोर्टातुन नोटीस आली आहे पाच दिवसांची तारीख आहे...मी साईन करुन ठेवलेत आल्यावर तुम्ही साईन करा...
पिहु लिसन,आपण शांतीने हया वर बोलु. ह्या गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या आहेत का,आता पेपर्स कोर्टात दिल्यावर तारीख येणारच एवढ डोक नाहीये का,तुला...ते आपल्यावर आहे आपल्याला डिवोर्स हवा आहे कि नाही...विराट तिच्यावर चिडुनच बोलतो.
आपल्यावर...हहं.. कधीपासुन ...सगळे निर्णय तर तुम्हीच घेता..मी फक्त त्यात हा म्हणायच ..
पिहु तु लिमीट क्रास करतेय....आपण आल्यावर बोलु...तो आवाज चढवुनच बोलतो.
नाही आत्ताच ,पिहु पण चिडुनच बोलते....
तो डोक्याला हात लावत चेअर वर बसतो...पिहु मी तुला फोनवर काय म्हणून समजावु....प्लिज ना,मी आलो कि बोलतो ना.. तो ही तिला शांतीत घेत बोलत होता...
तुमच आणि त्रिशाच लग्न ठरलं होत का..
वॉट,तो शॉक होतच विचारतो...
हो कि नाही...
तिच्या आवाजातला रोख त्याला जाणवुन येतो..ती आत्ता काहीच ऐकण्याच्या स्थितीत नाहीये..
हो ,पण ऐक ते..लग्न तो पुढच बोलायच्या आतच पिहुने मोबाईल बंद केला..
डॅमिट,तो रागानेच हात समोरच्या टेबलावर मारतो.,पिहू...पिहु..तु का समजून घेत नाही...त्याच डोक बधिर झाले होते. आत्ता फोनवर ही तुला काहीच समजु शकणार नाही .हे माहित असुन सुध्दा तु अस का करतेस..त्याला राग ही येत होता आणि मनाची धडधड वाढली होती.पिहु माझा वेट करेल का ....हा त्याला प्रश्न पडला होता...फोन वाजल्याने त्याची विचार शृखंला तुटली...त्याने स्वतःला सावरत फोन रीसीव केला....
पिहु मोबाईल टाकुन तिथेच बसून रडू लागते..विराट ने कधी मला आपलं मानलच नाही..फक्त आईंसाठी ते सगळ करत होते...मला आधीच कळायला हवे होते..मुर्ख ठरलीस पिहु तू...ती रडत स्वतःशीच बोलत होती....
पिहु स्वतःला सावरत उठली तिने डोळे पूसन मोबाईल हातात घेतला...तिने तिच्या वडीलांना फोन लावला.
हॅलो,
बोल बाळा,
पप्पा मी..ते..तिचा आवाज जड झाला होता..घरी काय सांगायच ते कसे रियॅक्ट करतील..पण मी इथे राहु शकत नाही.
भिमराव थोड चिंतेत विचारतात..पिहु तु ठिक आहे....
पिहु विचारातून बाहेर येत...हो पप्पा..ते तुम्ही येणार होता ना,घ्यायला ती नॉर्मल होत बोलली..
हो बाळा पण सुमन ताईंचा फोनच आला नाही..म्हणुन मी शांत बसलो..तुला यायच आहे का...
पिहुच्या डोळ्यातुन टचकन पाणी आलं तिला काय बोलव कळतच नव्हते...पप्पा मला तुमची खुप आठवण येतीय...तिच्या बोलण्यतला जडपणा भिमरावांच्या काळजालाच धस्स करुन लागला...
भिमराव जागचे उठले..चिऊ..तु रडत आहे..
रेवती हे ऐकुन काळजीने जवळ आली..आणि इशरयातच फोन मागु लागली..भिमराव हातानेच थांब म्हणतात..
चिऊ काय झालं आहे का ,बोल ना बाळा...मी आत्ताच निघतो कोणाला ही घाबरू नकोस...बोल ना चिऊ...
पप्पा ते तिच्या ओठांवर शब्द होते..पण विराटच्या बद्दल काळजी होती...पप्पा रागाने विराटला काही बोलले तर..
चिऊ ,मी काय विचारतोय...विराट काही बोलला का,
ती स्वतःचा कंठ दाबत नाही...नाही, पप्पा ते हॉलिडे पण आहेत आणि बोर पण होतय..किती डेज झालं मला यायची इच्छा आहे..पण कोणी मनावरच घेत नाही ...म्हणुन रडु आलं आता तुम्हाला एक सवय झाली माझ्याशिवाय राहायची ...म्हणून तूम्ही पण मला दुर्लक्ष करता..
हे ऐकुन भिमरावांचा जीव भांड्यात पडतो...नाही नाही बाळा अस कस होईल..तु तर आमचा जीव आहे आणि तुला विसरु अस होईल का..मी आत्ताच सुमनताईंना फोन करतो...उद्या येणार म्हणजे येणार आणि माझ्या चिऊला किती दिवस राहायच तेवढ्या दिवस ठेवणार कोणी काही म्हणु दे...आता हसून दाखव मला..
पिहु इच्छा नसाताना वरवर हसत हो म्हणते...मम्मी ला सांगा टेन्शन घेऊ नको उगाच नाही ते विचार करत बसेल..
भिमरावांनी रेवतीकडे बघितले..काळजीने तिचा चेहरा उतरला होता...रेवती पिहु तुला त्रास द्यायला यायच म्हणते....बोल धर..
रेवतीचे डोळे भरून येतात .रेवती डोळ्यांना पदर लावत हातानेच नको म्हणुन म्हणते.
चिऊ तुझ्या मम्मीचा आता रडायचा कार्यक्रम चालु झाला आहे नंतर बोल आता ..
पिहु हसत हो म्हणते.आणि फोन ठेवुन तिच्या ही डोळयांना पुर येतो..
सुमन सुधाला यायला उशीरच होता..गीता पिहु कुठे आहे...
वहिनी त्या रुममध्येच आहे जेवल्या सुध्दा नाही..
का,
माहीत नाही..
सुमन लगेच पिहुच्या रुममध्ये जतात...ते दार उघडून पिहुला हाक मारणारच कि झोपली होती.पिहुच डोक विचार करुन जड झाल्याने ती मेडिसीन घेऊन झोपुन गेली होती.
सुमन लाईट बंद करुन निघुन जातात..
सकाळी सुमनला भिमरांवाचा फोन येतो.
हा बोला दादा ,मी करणारच होते पण वेळ मिळालाच नाही.
सुमन ताईं ते पिहुला खूप इच्छा आहे यायची ...तुम्हीं परत काही बोललाच नाही..
हं..हा..ते जरा..आता काय बोलाव म्हणून सुमन यांना प्रश्न पडला.
पिहु आवरून खाली आली..ती तिच्या धुंदीत किचन मध्ये गेली...
सुमन तिच्याकडेच बघत होत्या.विराट ही नाही पाठवते आल्यावर बघु ..
दादा घेऊन जावा तसही मी ही दोन तीन दिवस बाहेर जाणार आहे विराटही नाही तिला बोर होईल.
भिमराव खुश होतात...मी आत्ता निघणार आहे..
आत्ता सुमन थोड शाॅक होतच विचारतात...
हो ते पिहुचा फोन आल्यापासुन रेवतीच मन होतयं तिला बघायच..
.काल तिला रेवतीची खुप आठवण येत होती..
हो समजू शकते...या तुम्ही..अस म्हणून सुमन फोन ठेवुन देतात.
सुमन किचन मध्ये येतात...पिहुचा चेहरा शांत दिसत होता..
पिहु
सूमनच्या आवाजाने पिहु भानावर येते.हंहह..आई..काय हवं होता का
सुमन एकटक बघत मानेनेच नाही बोलतात.तिचा चेहरा त्यांना वेगळच सांगत होतं
पिहु तू रडलीस का ...डोळे लाल झाले आहे..
पिहु नजर चोरुन नाही आई ..ते झोप ...पण तिला रडु आवरत नाही...पिहु हुंदके देतच चेहरयावर हात ठेवुन सुमनच्या कुशीत रडु लागते...
सुमन तर पूर्णपणे घाबरतात..पिहु काय झालं कोण काय बोललं का...त्या तिला बाहेर घेऊन रुममध्ये घेऊन जातात..
पिहु शांत हो,आणि सांग कोण काय बोललं ताई काय बोलल्या का..का विराट...सांग पिहु तु रडत बसल्यावर मला कस कळणार..
पिहु सुमनकडे बघते...आई मला आता इथे राहायच नाही...
अ..का...काय झालं कोण काय बोललं तुला...
पिहु डिवोर्स चे पेपर सुमनच्या हातात देते..
सुमन पेपर्स बघुन शॉकच होतात...हे..अस नाही..नाही विराट अस करुच शकणार..
आई हे मला ह्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्रीची भेट म्हणुन दिले आहेत..पिहु रागानेच बोलते..
हे ऐकुन तर सुमनला अजुन एक धक्का बसतो...
आई जबरदस्तीने कुठलं नातं टिकत नसते..का तूम्ही हे नातं जुळेल असा विचार करतात...
सुमनला काय बोलाव कळतच नव्हते.आपला मूलगा एका मुलीच्या भांवानशी कसा खेळु शकतो...आज त्यांना पिहुला कुठल्या शब्दाने काय म्हणुन सांगु अस झाले होते...
पिहु सुमनचे हात हातात घेते. ..आई...माझ्याकडे बघा..मी तुम्हाला कधीच दोष देणार नाही....पण प्लिज मला जाऊ द्या...नाही थांबु शकत मी अजून..मला..तिचे डोळे भरून येत वाहत होते..
सुमन तर काही बोलायच्या स्थितीतच नव्हत्या कुठल्या हक्काने तिला थांब म्हणायच..
पिहुला ही सुमनला वेळ देण्यासाठी रुममधुन निघून जाते..पिहु रुममध्ये येते...सगळी रूम ती डोळे भरुन हात फिरवत बघत होती..तिने विराटचा वार्डरोब उघडुन तिने त्याच्या सगळ्या कपड्यावरुन हात फिरवला.. त्याचा स्पर्श ती जाणवु लागते...डोळ्यातुन अंखड अश्रुंच्या धारा चालुच असातात...तिने सगळे दागिने काढुन ठेवले .फक्त लग्नात घातलेले मंगळसुत्र ती घालते....पिहुच मन तिला थांब म्हणत होते..आणि डोक नाही तिने आता डोक्यानेच विचार करायचा ठरवला..तिच्या आईवडींलानी काय घेतले होते ते तिने बॅग मध्ये ठेवले...पहिल्यांदा तो तिला मिठीत घेऊन झोपला होता..तो टिशर्ट तिने लपवला होता..परत त्याला दिसलाच नाही आणि त्याने ही कधी तिला विचारलेच नाही...तिने तो शर्ट स्वतःच्या कबोर्ड मधुन काढला आणि छातीशी धरून रडू लागली...विराट आईंना खुश ठेवण्यासाठी तुम्ही माझ्या भावंनाशी का खेळलात..डोळे पुसुन तो टीशर्ट तिने बॅग मध्ये ठेवला.ती गॅलेरीत जाऊन सोफ्यावर बसली...विराटचा फोन येत होता पण तिने कालपासुन एकदाही उचलला नाही...तिने मोबाईल हातात घेत स्विच ऑफ करुन कार्ड काढुन मोबाईल पण नीट स्टडी मध्ये ठेवुन दिला...
दुपारुन पिहुचे बाबा आले...सुमन ही पिहुला थांबु शकले नाही...
पिहुने जाताना मागे वळुन पुर्ण घर डोळे भरुन बघितलं.
पिहु निघायच...भिमराव तिला जवळ घेत बोलतात.
पिहु वरवर हसत हो म्हणुन गाडीत बसते...
विराटला तर पिहुचा काहीच संदर्भ लागत नव्हता...मॉम ला आत्ता फोन केला तर माझ्या आवाजातुनच ओळखून जाईल..म्हणुन त्याने फोन करायच टाळले. त्याने पिहुला परत फोन लावला...आता मात्र त्याच्या काळजाचा ठोका चुकला..आता पर्यंतची घालमेल तिचे शब्द आठवुन तो खालीच बसला...(जाताना मोबाईल पण ठेवुन जाईल) त्याच्या हातातुन मोबाईलच पडतो ..तो सुन्न झाला होता..
अंगातुन कोणीतरी त्राण काढुन घेतले अस झालं होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁