Lost love ........ # 42. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#४२.
................

..............

.......

.......

सकाळी........

रेवा उठून बघते तर काय....😲😲 ऋषी बेडवर नसतो...... ती अंघोळ वगैरे करून खाली त्याला शोधते..... पण, तो कुठेच नसतो..... ती सगळीकडे शोधून, हॉल मध्ये येऊन बसते....तो कुठेच नसतो.......😓

बाबा : "बेटा.....काय झालं...इतकी... टेन्शनमध्ये का आहेस....??🙄🙄"

रेवा : "बाबा ते.... काल रात्री ऋषी आलेला....तो थकला असेल म्हणून, मी काही विचारलं नाही...आणि आज तो परत गेलाय सकाळीच....... मी उठण्याआधी....🙄🙄"

बाबा : "हे काय नवीनच भानगड याची.....थांब कॉल करतोय...🤨."

बाबा कॉल करतात....

ऋषी : "हा बाबा.....बोला ना...."

बाबा : "कुठेय ऋषी....रेवाला काळजी आहे तुझी.... कळतंय का तुला.... काल उशिरा येऊन आज लवकर गेलास..... काय...?? काही प्रॉब्लेम असेल तर सांग बोलून सोडवू.🤨🤨 आपण....काय म्हणतोय मी...🤨🤨?..."

ऋषी : "नाही हो बाबा......येईल घरी..... बोलू तेव्हा.... आणि माझं थोडं ते काम आहे...काही दिवस मला वेळ नसेल.....😒"

बाबा : "ओके.....रेवाला कॉल करून घे....एकदा काळजीत पडलीय...."

ऋषी : "हो....."

बाबा : "टू.... टू....टू.... हॅलो... हॅल्लो.... ठेवला वाटतं...😣"

रेवा : "जाऊद्या बाबा....तो स्वतः सांगेल मला....आता मी नाही विचारणार....काय झालं वगैरे.....त्याला इतकं तर स्वतःच कळायला हवं ना..... घरचे काळजी करत असतील....नेहमी लहान मुलासारखा....काही झालं की, बोलून सोडवतो ना आपण सगळे प्रॉब्लेम मग याला काय होतं सांगायला....ते सर्व काही नाही...आता मी बोलणार नाही.... जोपर्यंत हा काही बोलत नाही....😤😤"

बाबा : "रेवा बेटा हे बघ तो कधीच काही सांगणार नाही....बघू आपण एकदा विचारून सांगितलं तर ठीक नाहीतर मग बघू काय होते पुढे....😒😒"

आई : "आला का ऋषी....😕😕"

बाबा रेवाला डोळ्यांनीच थांब मी सांगतो अस म्हणतात.....

बाबा : "काय हो राणी सरकार.....गेलेत की आपले राजकुमार सकाळीच.... ऑफिसमध्ये काही काम आहे..... म्हणून, तो काही दिवस असाच उशिरा येईल आणि लवकर जाईल म्हणाला....तुम्ही कशाला इतकी काळजी करता.....🤦🤦 स्वतःची काळजी घ्या आता...तब्येत कमी होत चाललीय....ठीक आहे...."

आई निघून जातात....

रेवा : "बाबा आईला खोटं का सांगितलं....सांगितलं का नाही, तो हे जाणून करतोय....🤨🤨"

बाबा : "तू हे इतकं ठामपणे, कसं म्हणू शकतेस.....तो हे सर्व जाणून करतोय.🙄🙄.."

रेवा : "हे बघा बाबा.....मला जर, कुठलीही प्रॉब्लेम असली....मी सर्वात आधी ऋषीला सांगते......पण, तो अस कधीच करत नाही....खूप वेळा विचारलं, तेव्हा सांगतो.... आता मी काय अंतर्यामी आहे का...🙄त्याच्या मनात काय चाललं बघायला....😖😖"

बाबा : बेटा तू शांत रहा....बघुया .....तो सांगतो का....😒"

रेवा : "बर.....येते मी..."
.
.
.
.
.
.
.
.
.
रेवा तिच्या रूम मध्ये जाऊन नोवल रीड करत बसते........ ययाति..... वी. स. खांडेकर.... लिखित....


वाचून झाल्यावर ती खाली जाते....अजून ऋषीचा काहीच पत्ता नसतो.....दुपारचे जेवण घेऊन सगळे...... विश्रांती म्हणून.... आपापल्या रूम मध्ये जावून झोपतात... सायंकाळी उठून जेवण तयार झाल्यावर.....रात्रीचे जेवण करून सगळे झोपायला जातात....आजही तो असच उशिरा येतो....पण, रेवा काहीही न बोलण्याचे ठरवते.....रेवा झोपायचे नाटक करते .....तो काय करतो, हे बघायला....तो फ्रेश होऊन झोपून जातो.......रेवाही झोपून जाते....

सकाळी.....

रेवा उठून बघते तो नसतो........रेवा मनाशी ठरवते....आज रात्री काहीही झालं तरी, त्याच्याशी ती बोलणार आहे .......ती बाबाला ही सांगते....बाबा तिच्या सोबत असतात.....रात्री........
.
.
.
.
.
.
.
.
बाबा : "बेटा आज बोलणार आहेस ना ऋषी सोबत.....थोडं शांततेत....आधी त्याचा मूड बघ.....आणि मग हळूच विचार..... जास्त त्रास नको करून घेऊस तू स्वतःला..... ऋषीच्या मनात काय असतं..... कुणीच समजू शकत नाही....लहान असताना त्याला कुणाकडून दुखावलं.... तरीही, कधीच बोलायचा नाही......बेटा थोड धीराने घे....काळजी वाटते बेटा म्हणून बोलतोय....समजतेस ना...😓."

रेवा : "हो बाबा कळतंय मला....मी सर्व व्यवस्थित विचारते.....हवं तर तो जरी चिडला मी शांत बसेल....पण, आज काय त्याच ते माहीत करावच लागेल....असच अबोला असला आणि काही विपरीत घडलं म्हणजे.....नाही नको....मला काही तरी याच बघावं लागेल....🤨"

तिकडून आई येतात....बाबा आणि रेवा दोघेही शांत होतात....

आई : अजून नाही आला का ऋषी.....तीन दिवस झाले मला अन्न गोड लागत नाही.....त्याला कळतंय की, नाही विराट...आईची काळजी करणं सोडून दिलंय त्यानं....जाते मी माझ्या रूम मध्ये.....तुम्ही जेवून घ्या....😣😣"

रेवा आईला डायनिंग टेबलवर हात धरून बसवते....

रेवा : "आई ऋषीला काहीही झालेले नाही....तुम्ही जेवून घ्या..... प्लीज आई....बघा किती अशक्त झालाय.....जेवून घ्या आई......बाबा आणि माझ्यासाठी थोडं तरी.....बाबा सुद्धा तीन दिवसांपासून नाही जेवलेत आई.... अश्याने कसं होईल......प्लीज आई..... तुम्ही आणि बाबा....या घरची ऊर्जा आहात.....मी बघते ऋषीचा काय प्रॉब्लेम आहे.....पण, आई - बाबा तुम्ही अस उदास नका राहू ना.....प्लीज....जेवून घ्या ना.....🥺🥺"

त्यांना समजवून ती थकून जाते.....पण, दोघेही काही प्रतिसाद देत नाहीत......ती रडत - रडत उठून रूममध्ये जायला उभी होते.......बाबा तिचा हात धरून बसवतात.....

बाबा : "रेवा बेटा.....प्लीज तू तरी थांब.... आजपर्यंत तूच या घरात भक्कम उभी रहात आलीय.....आताही आम्हाला तुझीच गरज आहे पोरी.....आमचा मुलाच्या लाईफमध्ये काय चाललंय आम्हालाच कळत नाहीये.....प्लीज पोरी..... बस.....सोबत जेवू.....🥺🥺"

रेवा बसते आणि सगळे जेवण करतात....... घरातील एखाद्या सदस्या मुळे घराची शांती अशी भंग होते.....काय आहे ते बोलून सोडवल पाहिजे.....🙏

रात्री जेवून सगळे.....झोपायची तयारी करत असतात..... तशीही झोप तर कुणाला लागणार नव्हती....पण, तरी......😖😖

रात्रीचे ११:०० वाजत होते......रेवा विचार करत होती.....

रेवा : "यार याचा काय प्रॉब्लेम झालाय..... माझ्या समजण्यापलीकडे आहे....आज पर्यंत कधीच असा तो न वागणारा......इतका कसा बदलून गेला.....का ऋषी असे काय घडले जे तू मला तर नाही निदान आई - बाबांनाही सांगत नाहीस....अशी कोणती प्रॉब्लेम झालीय यार.... अनिलला कॉल करते ऑफिस मध्ये कशी वागणूक आहे ते विचारते....."

ती पटकन ऋषीच्या ऑफिसच्या HR ला call करते.....

अनिल : "हॅलो मॅडम, इतक्या रात्री...सर्व ठीक तर आहे ना.....आजकाल तर सर ही ऑफिस मध्ये येत नाहीत....ते तर ठीक आहेत ना.....🤨"

रेवा : "काहिनही सहज केला कॉल.....हो तो वगैरे ठिक आहे....तू सांग कस चाललय डिपार्टमेंट च काम...... केलीय का Recruitment......एखादी पोस्ट असेल ना..... असिस्टंट ची वगैरे मला सांगशील.....ते अॅक्चुली ऋषी ला मी विचारणार होतें.....पण, तो सध्या खूप व्यस्त आहे ना ....आणि स्टाफ ची इन्फॉर्मेशन तुझ्याकडे असते ना म्हणून.....😣😣"

अनिल : "हो मॅडम सांगतो तस मी.....तुम्ही सरांची आणि आपली काळजी घ्या....🙏अजून काही मॅडम...??"

रेवा : "नाही नाही....असलं की करते नंतर....आणि मला आता आठवलं म्हणून कॉल केलंय... डिस्टर्ब तर नाही ना झालं...."

अनिल : "नाही हो मॅडम....उलट काही प्रॉब्लेम असेल म्हणून मीच पॅनिक झालेलो....पण, कळलं आणि सुखावलो.....🥰"

रेवा : "ओके....चल बाय.... गूड नाईट....🙂"

अनिल : "गूड नाईट मॅडम...🙂🙏"

रेवा परत विचारात मग्न........

रेवा : "मागील काही दिवसांपासून हा ऑफिसला गेलाच नाही...मग, हा इतका वेळ जातो कुठ....??🙄🙄 काही मोठा प्रॉब्लेम आहे वाटतं....यार ऋषी बोल ना माझ्याशी....😩😩"

रेवाचा कॉल वाजतो.....तिची तंद्री तुटते.....आणि ऋषी असेल म्हणून, ती फोन वर पटकन झाप टाकते.......पण, फोन शशांक करतो.....

रेवा : "हो शशांक बोल ना.....इतक्या रात्री काय झालंय.....सगळं ठीक ना.....??"

शशांक : "हेच मी, तुला विचारणार आहे....रेवा एक काम कर मी अॅड्रेस सेंड करतो त्यावर ये पटकन....लगेच निघ....आणि घरी सांगू नकोस....प्लीज....ये पटकन.....😓😓😩😖"

रेवा लगेच जायला निघते......आई - बाबा रूममध्ये असल्याने जाण्यात काहीच अडचण नसते....ती पटकन स्वतः ची गाडी घेते आणि निघते..... शशांकने दिलेल्या अॅड्रेस वर....🥺

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED