वास्तविक प्रेम....? Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वास्तविक प्रेम....?




ती : "मी तुला होकार दिला तर, माझ्यासाठी काय करशील??"

तो : "हे बघ मी तुला स्वप्नांत भुलवून खोटं नाही बोलणार...... सध्या माझ्याकडे तुला द्यायला काहीही नाही... पण, भविष्यात तुला कमीपणा वाटेल अस मी कधीच होऊ देणार नाही.....🙂"

ती : "बरं......"

तो : "लग्न करशील मग माझ्याशी?"

ती : "ओके...... पण, मला बंधन नकोय....."

तो : "मी प्रेम केलं ना तुझ्यावर ते शेवट पर्यंत निभवण्यासाठी...... बंधनं कोणालाच आवडत नाहीत..... तू काळजी नको करुस..... कधीच तुला त्रास होणार नाही.... तू विश्वास ठेऊ शकतेस....😘"

तिला मात्र होकार फक्त त्याला पडताळण्यासाठी द्यायचा होता कारण, तिचा विश्वास प्रेमात नव्हताच.... आजकाल सगळे फक्त शरीराचा वापर करून घेण्यासाठीच प्रेम करतात ही उदाहरणं तिच्यासाठी नवीन नव्हतीच...... तिची एक मैत्रीण जिने खरं प्रेम केलं पण, तिचा वापर तिच्या बॉय फ्रेंडने करून घेतला..... इतकंच नाही तर तिला समाजात तोंड दाखवायला जागाही ठेवली नव्हती..... त्यामुळे ती कोणावरही विश्वास ठेऊन लग्नाचा निर्णय घेण्यासाठी खूप विचार करायची.......

तिचा होकार आहे अस समजून त्याच्या डोळ्यांत मात्र वेगळीच चमक होती......🤩 तो त्याच क्षणापासून तिच्या भविष्याचा विचार करत सगळी प्लॅनिंग करू लागला..... जास्त वेळ न घालवता त्याला जो व्यवसाय करायचा होता त्याचं प्रशिक्षण घेण्यात तो व्यस्त झाला त्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता..... तिला मात्र वाटायचे की, जसे इंस्टाग्राम वर दुसरे गर्ल फ्रेंड - बॉय फ्रेंड रिल्स बनवून पोस्ट करतात तसं त्यांनी सुद्धा करावं..... पण, त्याला वाटायचं की, रिल्स पेक्षा रिअल लाईफ मध्ये आपण काय करतो यावर फ्युचर ठरतं..... म्हणून, तो सगळं इग्नोर करायचा....

एक दिवस त्याने सहज तिला एका रिल्स मध्ये एका मुलासोबत बघितले आणि तेव्हाच तिला कॉल केला.....

तो : "तो मुलगा कोण होता.....🙄?"

ती : "कॉलेज फ्रेंड आहे तो....."

तो : "मला तू त्याच्यासोबत व्हिडिओ बनवला म्हणून जेलेसी नाही फक्त मला हेच म्हणायचं आहे की, आता वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ तू स्टडी करण्यात वापरावा म्हणजे, चांगलं फ्युचर आपण दोघं स्पेंड करू शकू.... ह्या सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग असतात.... उद्या दुसरा ट्रेंड येईल... पण, आपल्याला फ्युचर मधे फक्त आणि फक्त स्टडी युज फुल असेल हे कधीही लक्षात असुदे.....🙂 बाकी तुझी लाईफ तू कस जगावं पूर्ण तुझ्यावर आहे...."

ती : "hmmmmm हे सांगायला केला होता तर तू मला कॉल..... चल बाय....."

तो : "हॅलो......"

ती फोन कट करते.......

तो त्याच्या कामात बिझी होतो..... असेच काही दिवस जातात..... परत त्याला एक सजेशन येतं..... कपल चॅलेंज वाली रील तिची, परत त्याच मुलासोबत पोस्ट झालेली त्याला दिसते..... तो परत तिला कॉल करतो.....

ती : "बघितला असणार ना व्हिडिओ तू..... म्हणून केला कॉल नाहीतर तुला आठवण येते का माझी....."

तो : "नाही अग अस नाही काही..... मला फक्त एकच सांगायचं होतं.... तुझ्या व्हिडिओ वर ना खूप वाईट कमेंट वाचल्या मी..... मला नाही आवडलं आणि म्हणून मी तुला कॉल केला...."

ती : "लोकांचं कामच असतं ते त्यांना दुसऱ्यांना एक्सपोज करून तमाशा बघायला आवडतं.... म्हणून, काय आम्ही एन्जॉय करायचंय नाही का....🤷"

तो : "एन्जॉय फक्त त्या रिल्स मधूनच मिळेल अस कुठेय.... खरा एन्जॉय तर निसर्गात असतो.... मी येतोय काहीच दिवसात तुला भेटायला चल माझ्या सोबत तुला खरा आनंद काय हे समजेल....."

ती : "अरे तो कसला एन्जॉयमेंट ज्यात आपण कुठल्या तरी ओल्ड एज मध्ये जाऊन त्या घाण लोकांना हात लावायच....😣😖"

तो : "त्यातच खरा आनंद मिळतो..... कधीतरी मनातून करून बघ जसं तू रिल्स बनवून हा विचार करतेस ना की, ते रिल्स बघून लाईक्स अँड सबस्क्राइब करतील लोक.... मग तिथं जाऊन हा विचार कर की, माणुसकीच्या रांगेत तूच पहिल्या नंबर वर नेहमी असणार..... मग बघ किती समाधान मिळेल तुला....."

ती : "hmmmmm चल बाय...... मला जायचं आहे...."

तो : "ओके...... बाय"

काही दिवस दोघेही एकमेकांना कॉल, मेसेज करत नाही.... अचानक एक दिवस रात्री तिचा त्याला कॉल येतो.....

तो : "हॅलो... बोल ना रडतेस का तू..... काय झालं सांग ना....🥺"

ती : "तू आताच मिरा रोड ये..... लवकर......"

तो : "आलोच...... थांब तू तिथच थांब रडू नको.....😘"

तो जायला निघतो...... पोहचल्यावर त्याच्या पायाखालून जमीन सरकते..... समोर ती रस्त्याच्या कडेला हातात रक्ताने भरलेला रॉड घेऊन असते तर तिच्या समोर एक मुलगा ज्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असतो, विव्हळत पडलेला असतो...... त्याला काहीच समजत नाही...... तो पटकन खिशातून फोन काढून मित्राला बोलावून घेतो जो की, एक पोलिस अधिकारी असतो... आणि जाऊन तिला कुशीत घेतो.....

तो : "शांत हो..... काय झालं सांग सगळ..... शांत हो....😘😘"

तिला सुरक्षित असल्याची पूर्ण खात्री पटते आणि आपण आजवर ज्याची किंमत देखील केली नव्हती..... असा तो आज तिला या अवस्थेत बघून रागावणं सोडून, आधी तिची काळजी करत असलेला बघून, ती अजुनच रडायला लागते..... तो तिला खूप प्रेमाने कुशीत घेऊन शांत करतो...... ती शांत होत पर्यंत तिथे त्याचा मित्र पोलीस इन्स्पेक्टर आलेला असतो..... सगळं प्रकरण त्याच्या लक्षात येतं..... सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना घटना बघून कारणं समजून जातात...... (असं माझे मित्र पोलीस उपनिरीक्षक सचिन म्हणतात....) तो त्या दोघांच्या जवळ जाऊन डोळ्याने "काही काळजी करू नका तुम्ही घरी जा मी सांभाळून घेईल" अस सांगतो...... तो तिला घेऊन, घरी येतो....

तो : "पाणी......."

ती : "hmmm....."

ती पाणी पिऊन शांत झाली हे बघून, तो तिला विचारतो......

तो : "काय झालेलं तुमच्यात..... तू इतकं टोकाचं पाऊल उचललं......??"

ती : ".....त्याने माझ्यासोबत......😭😭😭😭"

तो : "हे बघ मी तुझ्यावर संशय घेत नाही फक्त मला सगळं सांग...... तितकंच तुला कमी त्रास होईल.....😘😘"

ती त्याला घडलेलं सर्व सांगते......

ती : "तो माझा कॉलेज फ्रेंड ज्याच्यासोबत मी रिल्स बनवायचे...... तो इतका चीप असेल वाटलं नव्हतं...... आधी माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा आणि त्यात मग आम्ही पार्टी वगैरे करायचो...... त्यातच मग तो माझा बेस्ट फ्रेंड बनला..... शेअरिंग - केअरींग सुरू होतं.... सगळं चांगलं चाललं होतं..... काल मला बोलला की आपण मूव्ही जाऊया तर मी त्याला बोलले डे शो बुक कर पण, त्याने नाईट शो बुक केला आणि मला त्या विचित्र रोड ने परत घेऊन रस्त्यात माझ्याशी......😭😭😭😭😭😭"

तो : "..... तू एकदम बरोबर केलं.... अशांना अशीच शिक्षा झाली पाहिजे...... मुलींनी वेळीच त्यांना आपला दैवी रूप दाखवला की, रस्त्यावर येतात साले.....🤬"

ती : "तुला माझा राग नाही आला.....🥺🥺"

तो : "तुझा राग आणि मला, छे...!! तुझ्या मनात चुकीची भावना नव्हतीच ना...... चुकीचं करणारा तो होता..... ज्याला कायद्याने शिक्षा होईलच..... तुझ्यावर तर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे.... आणि तो असच कुठल्या घटनेने तुटेल इतकाही नाजूक नाही ना....... प्रेम केलंय ग मी... आणि ते इंस्टाग्राम रिल्स सारखं काल्पनिक नाही तर वास्तविक......😘"

ती खूप वेळ त्याच्या कुशीत तशीच सुखावते.....🥰

तो : "तू आता एक काम कर घरी जाऊन ये.... परतल्यावर आपण छान डिनर डेट प्लॅन करू..... आणि मग तू मस्त स्टडी कर.... माझं स्किल ट्रेनिंग पूर्ण होतं आलंय मी सुद्धा माझा बिझनेस टाकतो..... दोन वर्षात माझं घर बनेल..... तेव्हा आपल्या लग्नाचा निर्णय मी घरी सांगेल.... मग आपण लग्न करूया.... अर्थात तुझ्या इच्छेने.....😊🥰"

ती : "इतकं प्रेम करतोस माझ्यावर.....🙂"

तो : "हो ग वेडे.....😘"

ती : "जर मला दुसरा कोणी आवडला असता आणि तुला मी नकार दिला असता तर....??"

तो : "तर त्यात काय माझं तरीही तुझ्यावर प्रेम असतं..... कारण, तुलाही तुझं स्वतंत्र निवडण्याचा पूर्ण हक्क आहे ना.... तुला कोणासोबत वेळ घालवायचा ते तू ठरवू शकतेस..... नाही का..... हा पण एक प्रॉब्लेम आहे जर मला होकार दिला तर मी तुझ्यासोबत रिल्स नाही बनवू शकणार....."

ती काही वेळ विचार करत.....

ती : "रिल्स मध्ये झळकण्यापेक्षा मला रिअल लाईफ मध्ये झळकण आवडेल.....🤩🤩"

तो तिला प्रेमाने कवटाळतो....... आणि त्यांचं अस हे वास्तविक प्रेम जिंकतं......

माझ्या एका मैत्रिणीची अशी इच्छा होती की, तिची लघुकथा मी माझ्या शब्दात लिहून काढावी म्हणून, लिहिलीय..... आजचं खरं वास्तव्य तिच्या कथेतून मला मांडण्याची संधी मिळाली त्यासाठी तिचे आभार....🙏😘

🙏🙏