When the poet's tangul bursts ..? books and stories free download online pdf in Marathi

शीघ्र कवीचं टेंगुळ जेव्हा फुटतं..?








मी गोविंद एक शीघ्र कवी.... हे बिरूद मीच धारण केलंय जेव्हापासून मी कविता लिहायला लागलो..... आज मी नवीन कवितेच्या शोधात आहे पण, कोणास ठाऊक आज मनात विचित्र भाव आहेत.... वाटतं आज काहीतरी साक्षात्कार होऊ शकतो..... चला बघूया!....

माझ्या घरापासून साधारण पंधरा ते वीस मिनिटांवर बसस्टॉप असल्याने पाई एकटं जाणं मी पसंत करतो.... त्याचं कारणही मजेदार आहे..... मला स्वतःचा सहवास आवडतो.... कस असतं ना, आपण स्वतःला कितीही शिव्या घाला, आपल्याला स्वतःचा कधीच राग येत नाही... पण, दुसऱ्या कोणाला जर आपण विचार न करता "तू" जरी बोललो ना तरीही त्यांच्या दाबून ठेवलेल्या भावना उफाळून येतात..... म्हणून, एकटा जीव सदाशिव असणं.... कधीही बरं, नाही का....! 😅😂

चला थोडं आरामात जाऊया...... आपल्याच विचारात निघालो आहे...... काय ना आत्या बोलली, कधी येत नाहीस! जर, आत्याच्याच गावी राहायला असतो तर, ती सुद्धा अशी नसती बोलली..... कारण, रोज मरे त्याला कोण रडे?! असो, जायचं आहेच म्हणून ठरवलं, जाऊन यावं आणि आपल्या पन्नास शीघ्र कविता लिहून काढाव्या...... तसे गावाकडे अनेक विषय मिळतात.... आणि मुख्य म्हणजे कवितेला विषय महत्त्वाचा, नाही का....! गावाकडचं प्रेम, गावाकडची "ती", झाडाची शांत सावली, झिप्री ती लाडाची.... या आणि अशा अनेक विषयांवर आपण फक्त कविताच नाही तर अख्खं कथालेखन करू शकतो.....😂 या विचारात असताना तन्द्री तोडली ती, एका आवाजाने.....

अनोळखी तो : "माफ करा काही मदत हवी होती.....😕"

आवाज अगदी सौम्य आणि अभ्यासपूर्ण वाटल्याने, मी मागे वळून बघितलं आणि बघतो तर काय! आम्हा तरुणांचे प्रेरणास्त्रोत साक्षात प्रसिद्ध कवी भानचंद्र नेवडे....🤩 डोळ्यात आदर आणि ओठांवर विनम्र शब्द आपोआप आले आणि मी बोलायला लागलो.....

मी : "आपण..... बोला ना मी काय मदत करू शकतो आपली.....☺️"

भानचंद्र : "अहो मी इथे नवीन आहे.... आपण मला जवळपासच्या बस स्थानकाजवळ सोडला असता तर खूप मदत झाली असती.....🙂"

मी : "नक्कीच का नाही.....☺️ या ना....😊"

आम्ही बसस्टॉपच्या / बस स्थानकाच्या 😝 दिशेने प्रस्थान केले..... काय बोलावं - काय बोलू नये हे तर स्वाभाविक होतच पण, मलाच बोलायची जास्त उत्सुकता म्हणून मीच सुरुवात केली.....😅

मी : "इकडे कुठं जायचं आपल्याला....?? पण, आपण इथे नवीन?"

भानचंद्र : "थोडं काम होतं जाऊन यावं म्हटलं...🙂 आणि हो इकडे मी माझ्या व्ययक्तिक कामाने आलो होतो...."

व्ययक्तिक काम म्हणून, मी जास्त काही विचारणं योग्य न समजता......

मी : "आपण खूप छान कविता करता... मी आपली प्रत्येक कविता मनापासून वाचतो..... काही तरी नवीन उमेद त्यातून मिळते.....☺️"

भानचंद्र : "अरे वाह..... खूप धन्यवाद...🙂"

मी : "बरं मग, आपली हरकत नसेल तर एक विचारू का?"

भानचंद्र : "का नाही! जरूर विचारा....🙂"

मी : "आपण कवी बनण्याचे कधी ठरवले आणि लिहायची शैली कशी विकसित केलीत?"

भानचंद्र : "मला वाटतं आपण हे बसस्थानकावर जाऊन बोललो तर बरं होईल..... कारण, ते सांगणं इतकं सोपं नाही....😄"

मी : "नक्कीच.... या... आलोच आहोत आपण.... मला ऐकण्याची फार उत्सुकता आहे.....☺️"

भानचंद्र : "बरं.....☺️"

मी तर खूप म्हणजे खूप जास्त उत्सुक होतो.... कारण, तरुणांचे ते ऊर्जास्त्रोत होते..... त्यांच्या कविता प्रत्येक तरुणाच्या काळजात घर करत..... जरी त्यांचे कवितेतील यमक जुळत नसले तरीही कविता यमक जुळवून घेणाऱ्या असायच्या.... उत्सुकता शिगेला पोहचणार की, आम्ही बसस्टॉपवर येऊन पोहचलो... तिथली गर्दी बाजूला सारत, त्यांना जागा करून दिली आणि त्यांच्याच शेजारी बसून, त्यांच्या सांगण्याची वाट बघू लागलो..... त्यांनी सांगायला सुरुवात केली.....

भानचंद्र : "आपण काय करता? व्यवसाय, नोकरी की अजुन काही?"

मी : "सध्या तरी मी माझं पदवी पूर्ण केलंय..... पुढे मला मोठा कवी व्हायचं आहे..... आणि त्यासाठी आपला आदर्श तर आहेच डोळ्यापुढे....🙂"

भानचंद्र : "नक्कीच.... आपण कुठल्या - कुठल्या कविता केल्या आहेत आजवर?"

मी : "दाखवतोच...."

मी अती उत्साहाने त्यांना माझ्या रचना दाखवल्या.... एक गंभीर भाव चेहऱ्यावर आणत, त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला......🤨

मी : "काही चुकलं का?😕😕"

भानचंद्र : "हे वाचून..... मी माझ्या भविष्याच्या सुरुवातीला ज्या चुका केल्या त्या आठवल्या....."

मी : "म्हणजे??"

मला काहीच कळत नव्हतं.... नेमकं त्यांना काय बोलायचं आहे....

भानचंद्र : "सांगतो..... आधी मला सांगा लक्ष्मी नगरची बस कधी पर्यंत येईल..... त्यानुसार मी माझं भूतकाळ आपल्याला सविस्तर सांगू शकेल....."

मी : "अजुन पाऊण तास काही ती बस येणार नाही.... आपण निवांत सांगू शकता......🙂"

त्यांनी सांगायला सुरुवात केली.......

भानचंद्र : "साधारण बावीस - तेवीस वर्षांचा असेल.... पदवी पूर्ण केली आणि एका नवीनच जोशात बाहेर पडलो.... महाविद्यालीन शिक्षण घेताना तसा कवितेचा छंद होताच म्हणून, म्हटलं कवी बनावं आणि कविता लिहायला लागलो..... कुठल्याही परिस्थितीवर सहज कविता करायचो आणि व्हॉट्स ऍप ग्रुपवर, इंस्टाग्रामवर इकडे - तिकडे पोस्ट करायचो...... खूप प्रशंसा व्हायची पण, हवं तितकं समाधान नव्हतं..... मग सहज एकदा उच्च दर्जाचं साहित्य वाचायला घेतलं..... असेच दिवसेंदिवस तहान - भूक विसरून वाचन सुरू केलं.... साहित्यातील बारकावे वाचून, त्यांची नोंद करत गेलो..... हळूहळू कवितेतील आणि कथेतील वेगळे अर्थ उलगडत गेले..... नंतर मला समजलं की, चांगल्या कवितेत यमक येऊ शकतात पण, फक्त आणि फक्त यमक जुळवून कविता करण्याचा विचार केला तर ते केवळ एखाद्या व्यंगापेक्षा जास्त काहीही नसेल...... तेव्हापासून मला चांगल्या कविता करण्याचं प्रोत्साहन मिळालं..... आज मी एक उत्कृष्ट कवी म्हणवून घेण्याचा जो मान मिळवला आहे तो त्या साहित्याचा अभ्यास करूनच..... आजकाल शीघ्र कवी खूप असतात..... खरं तर ते इतरांच्या मनोरंजनातून, स्वतःची छाप वाढवू पाहत असावेत.... पण, ती छाप दीर्घकाळ टिकून राहील याची शाश्वती नसते.... जर अस झालच तर मग होऊन गेलेल्या त्या श्रेष्ठ कवींना लाजवणारी ती बाब ठरेल.... निदान माझ्या बाबतीत असं घडू नये म्हणूनच मी स्वतःचा साहित्यीक संग्रह वाढवून आज एक कवी झालो..... आणि आपल्या सारख्या असंख्य तरुणांच्या प्रेरणास्रोतांपैकी एक होण्याचा मान माझ्या नावी नोंदवू शकलो.....☺️ हा होता माझा भूतकाळातील अनुभव...."

त्यांच्या या अनुभवावर काय बोलावे हेच अवघड होऊन बसले.... दुसरीकडे काही प्रश्नांचे निरसन करावे तर, बस तिच्या वेळेच्या आधीच आलेली.... म्हणून, त्यांना बसमध्ये बसवून मी माघारी परतलो आणि पाय वळले तिकडे, जिकडे जाणं माझ्यासाठी आता खूप महत्त्वाचं झालं होतं.... डोक्यात खूप विचार होते आणि ते म्हणजे, आजवर जे मी केलंय ते फक्त इतरांच्या मनोरंजनासाठी होतं? ते काहीही असो.... मला आज नकळत एक अशी व्यक्ती मिळाली होती.... जी, तिच्या अनुभवातून मला शहाणपण शिकवून गेली.... विचारात असतानाच मी त्या जागी जाऊन पोहचलो आणि नकळत तोंडून शब्द बाहेर पडले......

मी : "वाचनालयाची वेळ काय?"

ते ठिकाण होते एक प्रसिद्ध वाचनालय.....☺️📚

सहज सुचलेला विषय मांडलाय...... डोक्यावर ताण न देता वाचावा हीच दबावपूर्ण विनंती.....☺️


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED