जीवनातील गोंधळ Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

जीवनातील गोंधळ


का मन उदास झाले...


नाविन्याचा शोध घेता
न भान स्व: चे राहिले
नेहमीच पैशांनी तोलले जाणारे
अस्तित्व हे आज हरले...

स्व: चे स्वप्न जपता
मन आज हरवून गेले
काळजीने दुसऱ्यांच्या
परत ते भानावर आले...

परिस्थिती वाईट आली
त्यात मी गोंधळले
स्वतःस एकटं बघूनी
मी माझ्याच स्वप्नांत अडखळले...

नव्हते कशाचेच लोभ
पण, ते ही आज बोचले
आपल्याच माणसांनी
आज अस्तित्वाला प्रश्न केले...

मी भविष्यात रमताना
वास्तवात तर चुकत नाही ना!
हे प्रश्न आज मी स्वतःस केले
उत्तर म्हणून काही न गवसले...

मन हताश झाले
आपले असणारे हात परके झाले
ते नव्हतेच कधी आपले
मन ही सांगून गेले...

"मिच का?" हा एकच प्रश्न
पुनरावृत्ती त्याची मन करू लागले
विचाराशेवटी तू "दळभद्री"
सभोवतालचे वातावरण सांगुनी गेले...

सहनशीलता संपली
वाटलं संपवून टाकावे तन - मन
का आज इतके
दुःख अनुभवते आहे मन...

शेवट न दु:खांचा कधीच लाभला
पण, आयुष्याचा शेवट मज दिसू लागला
खंबीर मनाचे स्व:त्व
अखेर शरीर संपवू लागला...

प्रतिकूल परिस्थितीत
कसे राहावे आनंदी
कारण, उत्तर कधीच न मिळाले
का मन आज उदास झाले...😔
का मन आज उदास झाले...😔










ते माझेच होते...🤗

दूर होते ते जवळ आले
आदराचे रूपांतर रागात झाले...
आधी एक शब्द न बोलणारे
ओठ ते बोलके झाले...

सोबत होती एकमेकांची
पण, जाणीव जणू हरवली...
काळजी अबोल ती
गैरसमज वाढवत गेली...

दिवसामागून - दिवस ते गेले
पूर्वग्रदूषित विचार ना सरले...
लोकांनी ते परत हृदयी बिंबवले
मनाला ते न कधीच पटले...

जवळीक असून मनात होता दुरावा
ऋण वाढत गेले न झाला परतावा...
वेळ आली एकदाची
सरली इच्छा आशा - अकांक्षांची...

परत सौभाग्य सहवासाचे लाभले
जवळीक, प्रेम, काळजी हेच अबोल भाव अनुभवले...
न राहून मनाने ठरवले
ते कधीच परके नव्हते
ते माझेच होते...🤗




कधी - कधी आपण खरच खूप गोंधळून जातो... आपल्याबाबतीत जे काही घडतं ते किती टक्के चुकीचं याचा आपल्याला हिशेब सुद्धा लावता येत नाही.... वेगवेगळे विचार डोक्यात घुमत असतात.... नको ते विचार डोक्यात येतात आणि त्याचा परिणाम म्हणून डोळे अश्रूंना वाट मोकळी करून देतात..... अशाच गोंधळात असताना सुचलेल्या काही ओळी सामायिक करत आहे आनंद घ्याल ही नेहमीची निःस्वार्थ इच्छा...🙏

विचार कधीच यायचे थांबत नसतात ते बदलतही नसतात.... म्हणून, आपण विचारप्रवाह थांबवायचा का? तर, मुळीच नाही..... अजूनच जोमाने उत्साहाने विचार करायचे आणि ते ही सकारात्मक..... तेव्हाच आपण नैराश्य न येता आपल्या स्वप्नांना गाठू शकू.....

काही ओळी मांडू इच्छिते.....



का मानतोस तू हार

चल पुढं होईल तुझीच जयजयकार...

वाट नको आता कोणाच्या येण्याची

वाट काढून ध्येय गाठ तू प्रयत्नांनी...

म्हणतील तुला कोणी मूर्ख

तू रहा तुझ्याच स्वप्नांत गर्क...

स्वप्न पूर्ण होतात त्याचे

जो करतो स्मरण नेहमीच कर्माचे...

आपण कोण साखळी तोडू

नको तू हे प्रश्न मनी बाळगू...

नसतील कोणी तुझे आपुले

नको काळजी तू रहा मस्त रे...

नको काळजी तू रहा मस्त रे...


तर, मित्रांनो.... अशाच ऊर्जा पूर्ण विषयांना धरून मी येत रहाते आपल्या भेटीला नेहमीच..... सहज बसले असता काही सुचतं आणि सहजच बोटं मातृ भारती ऍप्लिकेशन वर रेंगाळतात.... लिखाणाची आवड जपणाऱ्या जनसामान्यांना हा प्लॅटफॉर्म ईतका सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल मातृ भारतीचे आम्ही ऋणी राहू....🙏

तशी मातृ भारती आणि माझी ओळख एक वर्षाच्या अलीकडील पण किती घट्ट नातं झालंय आमचं आणि हे क्षणात घडून आल्यासारखं मी अनुभवलं.... यातून भेटलेली एक मैत्रीण कधी इतकी जवळची झाली समजलेच नाही..... त्यासाठी धन्यवाद मातृ भारती....🙏🤗


सहज लिहावं वाटलं.....✍️







✍️खुशी ढोके