माकडाची डायरी....?? Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माकडाची डायरी....??

शाम्या माकडाची डायरी...


ही डायरी एका अशा माकडाची ज्याने काय गमावले त्याचे त्यालाच माहीत..... तो त्याच्या भावना मांडून, मानवजातीला काही सांगू पाहतोय..... त्याला अपेक्षा आहे की, इथे तरी त्याची आवाज तुम्ही ऐकाल..... आवाजच ऐकून चालणार नाही तर, त्याची मदत कराल ही आशा तो मनी बाळगून आहे..... करणार ना मग तुम्ही त्याची मदत....🥺🙏


दिनांक : २१ जानेवारी २०१९


माझे आजोबा सांगायचे, त्यांच्या काळी ते जंगलात स्वच्छंद फिरायचे, फळं तोडून खायचे, कोणाचा मार नाही किंवा कोणाची भीती नाही.... माणसं त्यावेळी त्यांच्याच अधिवासात असल्याने आमच्या अधिवासात घुसखोरी करणं क्वचितच! पण, आता काळच बदलला...... आजच्या डायरीचे पान माझ्या आयुष्यातील खूप जवळचे.... कारण आज मी माझा जवळचा मित्र विजेच्या ताराचा शॉक बसल्याने गमावला....😭 त्याचं ते शरीर रस्त्या मधोमध पडलेलं... मी तरी किती गयावया करायची? शेवटी एकाने धाडस करून, माझी मदत करायचं ठरवलं मात्र, बाकीच्यांनी त्याच्यावर हसून, त्यालाच आमच्या प्रजातीचा घोषीत करून टाकले... बिचारा तो तरी काय करेल... शेवटी लोकांच्याच भितीने स्व:निर्णय घेण्यास पाऊल मागे घेणारी ती प्रजाती या मुकं जनावरासाठी किती धाडस करू शकणार होती?! राहिला पडून माझा मित्र तसाच....😭 मी तरी त्याला कसं वाचवणार होतो? एकतर मी कोणाशी संवाद साधू शकत नाही आणि माणसांच्या प्रजाती इतका सक्षम ही नाही....! खूप वाईट वाटले आज....😭😭 लिहणं ही जड होऊन बसलंय.... राम्या कसा राहील रे मी तुझ्याविना....😭😭


दिनांक : २२ जानेवारी २०१९


काल जास्त काही लिहू शकलो नाही.... लिहिणार तरी कसा होतो? लहानपणी जन्मलो आणि चालायला ज्याच्यासोबत सुरुवात झाली.....😭 तोच आज....😭😭 जाऊदे आज रडणार नाही... कारण, राम्या म्हणायचा, "काय बे तू पण, माणसं रडली तर त्यांना ऐकायला सगळेच असतात कारण, त्यांचे रडणे दिसून पडते.... आपल्या माकडांच्या रडण्याला काय अर्थ? चल येऊ शेवंताच्या घरच्या कुरुड्या, पापडं खाऊन" त्याचं हे वाक्य ऐकून डोळ्यातून हसून पाणी वाहायचं... पण, आज हे म्हणायला ही तो नव्हता....🥺 म्हणून तर डोळ्यातून निघणारं पाणी हे आज वेगळ्याच कारणाने वाहत आहे....🥺 काय चूक होती माझ्या मित्राची..?? आमच्या अधिवासात तुम्ही माणसांनी घुसखोरी केली आणि आता आम्ही खायसाठी काही नाही म्हणून, कशी तरी पोटाची खळगी भरावी म्हणून, येतो आणि त्याला ही माणसं घुसखोरी मानून आमच्याच जीवावर उठतात... आज परत मी राम्या मेला तिथं जाऊन बघितलं तेव्हा समजलं... ज्या विजेच्या तारेच्या धक्क्याने तो गेला ती तार आमच्याच घातपातासाठी घोष काकांनी बसवून घेतलेली.... आजच मी त्यांचं बोलणं माझ्या कानाने ऐकलं.... माझ्या राम्याच्या डेड बॉडीकडं बघून त्यांना काहीच फरक पडत नव्हता.... हसत होती माणसं माझ्या राम्यावर.....🥺 दोष आम्हालाच की, आम्ही का त्यांच्या वस्तीत घुसलो?? अरे आम्ही खायचं काय मग? सगळी जंगलं तुम्ही नष्ट केलीत....🥺 काय बोलू मी आता... माझा राम्या, तो माझ्यासाठी काय होता हे ह्या माणसांना कसं समजेल! ज्यांनी एका जागेच्या तुकड्यासाठी स्वतःच्या बापाचा, मायचा आणि कधी तर भावाचा खून करायलाही मागे - पुढे बघितलं नसेल....! माझ्या राम्याने त्याच्या तुकड्यातून द्यायला कधीच मागे - पुढे बघितले नाही.... माझा राम्या माझ्यावर बसणारा मार स्वतःच्या आंगावर घ्यायचा..... देईल का ही मानवजात माझा राम्या मला परत.....🥺🥺😭

राम्या मिस यू रे भावड्या.....😭😭



तर, काय मग मंडळी करणार ना माझ्या शाम्याची मदत.... नाही काही तर एक भाकर त्याच्या नावाची शिजवणार ना, काही खात असला तर खाऊ द्याल ना.... घरात कशाला घुसेल तो जर बाहेरच तुम्ही भाकरीचा तुकडा दिला.... एवढं कराल ना..... प्लिज करा मदत....🥺🥺🥺🥺

राम्या सारखा अजुन बळी जाऊ नये.... हीच अपेक्षा करत शाम्या निरोप घेतो.....🙏