देवयानी विकास आणि किल्ली - भाग १ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

 

   भाग 1

 

विकास एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट मॅनेजर होता. त्याला आज मार्केट व्हिजिट ला जायचं होतं म्हणून लवकर आंघोळ करून तयार होऊन निघायच्याच तयारीत असतांना मोबाइल वाजला. कोणी डीलर नी फोन केला असेल असं वाटून त्यांनी बघितलं पण अनोळखी नंबर होता. उचलावा की सोडून द्यावा  हा विचार करतच त्यानी फोन उचलला. एक मुलीचा आवाज ऐकू आला.

“हॅलो कोण बोलतंय?” – मुलगी.  

“मॅडम फोन तुम्ही केला, सॉरी. Wrong number” – विकास  

“अहो थांबा. फोन ठेवू नका.” – मुलगी  

“का?” विकासनी विचारलं. तो आता वैतागला होता. सकाळी सकाळी झंझट.

“हे खरं आहे की मी तुम्हाला ओळखत नाही. पण तसं या शहरात मी कोणालाच ओळखत नाही.” – मुलगी.  

“मॅडम तुम्ही मोबाइल वरून बोलता आहात लॅंडलाइन वरून नाही. मोबाइल वरुन  शहर कळत नाही.” – विकास  

“सॉरी पण प्रॉब्लेम असा आहे की मी घरात अडकली आहे आणि दरवाजा उघडत नाहीये. जरा हेल्प कराल प्लीज?” – मुलगी.

“कठीण आहे. तुम्ही कोणच्या शहरात आहात. हे प्रथम सांगा.” – विकास.  

“मी पुण्यात आहे. तुम्ही?” – मुलगी.

“मी पण पुण्यातच आहे. आता तुमचा प्रॉब्लेम सांगा.” – विकास.

“आमच्या घराचं जे latch आहे, ते दोन्ही बाजूनी फक्त किल्लीनेच उघडतं, घरात आल्यावर safety साठी आतून latch मध्ये किल्ली घालून ठेवायची म्हणजे बाहेरून duplicate किल्ली पण लावता येत नाही. आता झालय काय, की मी घरात आल्यावर बाहेरून किल्ली काढायची विसरून गेले, आणि आत येऊन, दरवाजा लावला. आता माझ्या जवळ दुसरी किल्ली पण नाहीये आणि असती तरी त्याचा उपयोग झाला नसता. आता फक्त कोणी तरी बाहेरून किल्ली फिरवून दार उघडेल तेंव्हाच ते उघडेल.” – मुलगी.  

“म्हणजे मी तिथे येऊन दार उघडावं, असं तुमचं म्हणणं आहे?” – विकास.

“हो. प्लीज.” – मुलगी.  

“कमाल आहे, पण ठीक आहे. कुठे आहात तुम्ही?”: - विकास.

“माहीत नाही.” – मुलगी.  

“व्हॉट? वय काय आहे तुमचं? तुम्हाला तुमचा पत्ता माहीत नाही?” – विकास.

“अहो, प्लीज तुम्ही चिडू नका. ती अतिशय अजिजीने म्हणाली. अहो विचित्र झालीय परिस्थिती. सांगायला सुद्धा अवघड आहे. पण सांगते.” – मुलगी.  

“सांगा.” – विकास.  

“सांगते, पण तुम्ही येणार ना माझी सुटका करायला?” – मुलगी.

“हो. जे तुम्ही सांगणार आहात, ते पटलं तर येईन.” – विकास.

“मी मुंबईची. इथे माझी मैत्रिण असते. इथे पुण्यात माझा इंटरव्ह्यु आहे आज, म्हणून मी काल पुण्याला आले. स्टेशन वर मैत्रिण घ्यायला आली होती. रात्रीची वेळ होती म्हणून मला कळलं नाही. आज तिला बडोद्याला  जायचं होतं म्हणून ती सकाळीच निघून गेली. तिला बाय करून मी घरात आले, बाहेरची किल्ली काढायची विसरून गेले, आणि हा गोंधळ झाला. आता मी घरात अडकल्यावर इंटरव्ह्यु ला कसं जाणार?” – मुलगी आता रडकुंडीला आली होती.

“ओके. तुमचं location  आणि पत्ता पाठवा.” – विकास.  

“याच नंबर वर?” – मुलगी.

“हो.” – विकास.  

पांच मिनिटांत लोकेशन मिळालं. पंधरा मिनिटांच्या अंतरावरच होती तिची सोसायटी.

“ओके. मला अर्धा तास तरी लागेल पोचायला.” – विकास.  

“चालेल. मी वाट पहाते. थॅंक यू.” – मुलगी.  

विकास नी मग 100 नंबर फिरवला.

फोन वरुन त्यानी सगळी परिस्थिती सांगितली. आणि म्हणाला की

“मी जाऊन तिला मदत करणार आहे पण मला तुमची पण मदत पाहिजे. ही मुलगी जर फ्रॉड असेल तर तुम्ही तिथे असलेले बरे म्हणून.” – विकास.

“ठीक आहे तुम्ही तिथे पोहोचा आणि बिल्डिंगच्या खालीच आमची वाट पहा. आम्ही टीम ला पाठवतो.” - पोलिस कंट्रोल रूम

विकास पोचला तेंव्हा पोलिस पोचले नव्हते. विकास बिल्डिंग च्या खाली वाट पहाट उभा राहिला. पांच मिनिटांत पोलिसांची गाडी आली.

आल्या आल्याच त्यांनी विचारलं

“तुम्ही वर गेला होता का?” – पोलिस.

“नाही तुमच्या सुचने प्रमाणे खालीच थांबलो आहे.” – विकास.  

“चला.” – पोळीकडे.  

तिसर्‍या मजल्यावर 302 नंबर च्या फ्लॅट मधल्या की होल मध्ये किल्ली अडकलेली दिसली. विकास नी किल्ली फिरवून दार उघडलं.

समोर पंचविशीतली डिजायनर पंजाबी सूट मध्ये एक सुंदर आणि स्मार्ट तरुणी उभी होती. सुटका  झाल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर होता पण तो पोलिसांना पाहिल्यावर गेला. आणि आनंदाची जागा भय मिश्रीत चिंतेनी  घेतली.

“मी, मी काय केलय, पोलिस कशाला?” – मुलगी.

इंस्पेक्टर हसले, “म्हणाले घाबरू नका. अडचणीत सापडलेल्यांना मदत करणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे. या साहेबांनी आम्हाला सगळी कथा सांगितल्यावर आम्हीच म्हंटलं की एकटे जाऊ नका. आम्ही पण येतो. आता आम्हाला सांगा काय भानगड झाली ते.”

तिने जे विकास ला सांगितलं होतं ते सर्व पुन्हा साहेबांना  सांगितलं. तेवढ्या वेळेत बाकी  पोलिसांनी सर्व घरात चक्कर मारली, आणि समाधान झाल्यासारखी मान हलवली.

“ओके मॅडम आता या पुढे काळजी घ्या. आणि आजू बाजूला कोण राहतं ही चौकशी करून त्यांचा फोन नंबर घेऊन ठेवा. म्हणजे पुन्हा असं जर काही झालं तर अडचण येणार नाही. तुमच्या  नशीबानी  पुण्यालाच फोन लागला. दिल्लीला लागला असता  तर काय केलं असतं? एनी वे, ठीक आहे काळजी घ्या.” – इंस्पेक्टर साहेब.  

विकास कडे बघून ती मुलगी म्हणाली की “जरा थांबता का? तुमचे आभार मानायचे आहेत. आपण जाऊन कुठे तरी जाऊन, कॉफी पिऊया का?” – मुलगी.

विकास काही उत्तर देणार, त्याच्या आत इंस्पेक्टर विकास ला म्हणाले की

“खाली चला या प्रकरणा बद्दल तुमचं स्टेटमेंट घ्यायचे आहे. आणि मग त्या मुलीकडे वळून म्हणाले की आमचं काम पांच मिनिटांत होईल, तेंव्हा तुम्ही खालीच या.” आणि विकास ला घेऊन ते खाली आले. जीप पाशी पोचल्यावर विकास म्हणाला काय स्टेटमेंट घ्यायचं आहे ?

“काहीच नाही.” – इंस्पेक्टर.  

“औँ, आत्ताच तर...” विकास बोलतच होता, पण त्याला बोलू न  देता इंस्पेक्टर म्हणाले की,

“समजा, आम्ही गेल्यावर जर ती मधाळ स्वरात म्हणाली असती की जरा पुढच्या खोलीत थांबता का, मी चेंज करून येते, तुम्ही काय केलं असतं?” – इंस्पेक्टर

“थांबलो असतो. अजून काय?” – विकास.

“करेक्ट, तुम्ही थांबला असता, आणि मग ती मुलगी, अर्ध्या कपड्यात बाहेर येऊन,  तुमच्या नावाने किंचाळली असती तर या अश्या परिस्थितीत तुम्ही काय करणार होता?” – पोलिस.

“माय गॉड, असं होऊ शकतं?” – विकास.

“साहेब, आमच्या नोकरीत आम्ही इतकं काही बघतो की पटकन कोणावरही विश्वास ठेवणं धोक्याच असतं हे पक्कं डोक्यात भिनलं आहे. आता ही मुलगी तशी सज्जन वाटते आणि प्रॉब्लेम पण तिने सांगीतला, तसाच होता. पण काय भरवसा? सुरवातीला असच नाटक असतं.  सिनेमात दाखवतात, भयंकर चेहऱ्याचे खलनायक. पण खऱ्या आयुष्यात काहीही असू शकतं. सुंदर मुलींच्या सापळ्यात अडकू नका एवढंच सांगतो. तुम्ही साधे सरळ दिसता म्हणून बोललो. थोडी काळजी घ्या. येतो आम्ही. आता आम्ही, ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यु ला जाणार आहे तिथे चौकशी करूच . बघूया काय खरं आहे ते.” एवढं बोलून, पोलिस निघून गेले.

तितक्यात ती मुलगी आलीच. विकास त्याच्या बाइक जवळ उभा होता.

“हाय” – मुलगी

“हाय”- विकास.

“कुठे जायचं? मला इथली काहीच माहिती नाही. तुम्हीच सांगा.” – मुलगी.

क्षणभर  विकासला तिच्या बरोबर कॉफी प्यायला जायचा मोह झाला. तिच्या सौंदर्याची त्याला भुरळच पडली होती. पण  विकासच्या डोक्यात इंस्पेक्टर ने दिलेले ज्ञान घोळत होतं ते म्हणाले होते की सुंदर मुलींच्या जाळ्यात अडकू नका. महागात पडेल. म्हणून तो म्हणाला

“हे बघा कॉफी राहू द्या. मला आज खूप काम आहे आधीच तासभर वाया  गेला आहे आणि तुम्हाला पण इंटरव्ह्यु ला जायचं आहे, तुम्हाला पण .उशीर होईल. आपण नंतर केंव्हा तरी कॉफी घेऊ.”

“माझा इंटरव्ह्यु संपल्यावर संध्याकाळी पांच ते सहा च्या दरम्यान चालेल?”- मुलगी

‘चालेल. बाय.” – विकास.  

“बाय. अँड थॅंक यू.” – मुलगी.  

विकास कामावर निघाला खरा पण त्याच्या डोळ्या समोरून त्या मुलीचा चेहरा काही हालत नव्हता. एकी कडे तिची आठवण येत होती आणि दुसरीकडे इंस्पेक्टर साहेबांचं ते वाक्य. सगळंच अवघड होऊन बसलं होतं.

एक सुंदर मुलगी कॉफी चा आग्रह करते आणि तिला ठाम नकार द्यायचा? काय वैताग आहे. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. असाच विचार कर करून त्याचा दिवस तसाच गेला. सगळी कामं, सगळ्या भेटी गाठी, यंत्रवत पार पाडल्या त्यानी, नजरेत भरतील, अशी कामं कुठेच झाली नाहीत. अशातच साडे पांच वाजता फोन वाजला.

“हॅलो मी देवयानी बोलते आहे.”

“कोण देवयानी?”

“अहो असं काय करता, किल्लीचा प्रॉब्लेम, आज सकाळीच तुम्ही येऊन मला सोडवलं ना, तीच मी.” – देवयानी  

“अच्छा, तुम्ही होय. मला तुमचं नाव माहीत नव्हतं म्हणून कळलं नाही.” – विकास.  “मी आता मोकळी झाली आहे. येता का आत्ता? आपलं ठरलं होतं, संध्याकाळी कॉफी घ्यायचं.” – देवयानी  

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.