देवयानी विकास आणि किल्ली - भाग ५ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ५

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वहिनी , भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

भाग ५

भाग   ४  वरून  पुढे  वाचा ................

आता मात्र विकास ला खरंच राग आला. आत्ताच म्हणाली की फोन कापणार नाही आणि आत्ता  कापून टाकला. पण दोनच मिनिटांत रिंग वाजली आणि त्यांनी बघितलं तर विडियो कॉल होता. त्याला एकदम हर्षवायू झाला. त्यांनी फोन घेतला आणि तिची देखणी, हसरी, प्रसन्न मुद्रा बघितल्यावर त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला.

“तुझा हसरा चेहरा बघितला आणि भरून पावलो. आता सांग काय डिटेल्स आहेत ते.” आणि त्यांनी एक फ्लाइंग किस् फेकला. आणि देवयानी त्याच्या अॅक्शन मुळे  सुखावून गेली. लाजलीच चक्क. गालावर लालिमा आला आणि ते पाहून विकास? विकास होताच कुठे? तो तर पोचला होता सातवे आसमान पर.

“अरे, बोल ना काही तरी. लक्ष कुठ आहे तुझं?” देवयानी

“लक्ष कुठे म्हणजे? तुझ्याच कडे. माय गॉड देवयानी, काय सांगू तुला, माझाच मला हेवा वाटतोय.” – विकास

“असं काय घडलं?” देवयानी

“परी, परी मिळालीय मला. नुसतं तुला बघतच राहावसं वाटतं.” – विकास

देवयानी दिलखुलास हसली.

“बरं, मग मी आता अशीच बसून राहते आणि तू बघत रहा. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते आहे का?” - देवयानी

“काय?” – विकास

“मला का शिक्षा देतोयस? मला पण तुझ्याकडे बघायला लागतंय ना.”

आणि देवयानी पुन्हा खळखळून हसली.

विकासनी पण तिच्या हसण्याला साथ दिली.

“हं सांग, कशी आहे नोकरी?” – विकास

“जे आता करते आहे थोड्या फार फरकांनी तेच  करायचं आहे. पगार वाढ आहे पण कमी आहे. पण मी ते अॅक्सेप्ट केलं.” देवयानी 

“का?” – विकास.

“आता पुण्याला येऊन, तुझ्या बरोबर रहायचं म्हणजे थोडा त्याग करावाच लागेल न? मग केला.” – देवयानीचा खुलासा 

“माझ्या बरोबर राहायचं? काय मनात काय आहे तुझ्या? ते लिव इन वगैरे आपल्याला झेपायचं नाही हं मॅडम.” विकास एकदमच बावचळला

“छी,छी ss, काय बोलतोस, तुझ्या जि‍भेला काही हाड?” – देवयानी

“तुझा सुर तसाच होता. मग?” – विकास

“मी म्हणत होते की अजून एक महिना आहे, एवढ्या वेळात तू तुझ्या घरी बोल, आणि मी माझ्या घरी बोलते. वेळेचा सदुपयोग करू आपण. मला आता सुप्रिया कडे रहायचं नाहीये. मी जेंव्हा पुण्याला येईन, तेंव्हा मला आता आपल्या घरी राहायचं आहे.” – देवयानी

“सुप्रिया कोण?” – विकासचा प्रश्न

“अरे माझी मैत्रिण, जिच्या फ्लॅट वर मी थांबले होते, ती.” – देवयानी 

“ओके. मी या शनिवाराला जोडून सुटी काढतो आणि नागपूरला जातो. तू पण या शनिवारी बेळगाव ला जाऊन ये. माझ्या कडे काही प्रॉब्लेम होणार नाही. तू तुझ्या घरचं बघ. फक्त एकच कर तुझे चार पांच फोटो मला सेंड कर. मी माझे करतो. ओके ?” – विकासनी संमती दर्शवली.

“ओके. पाठवते. पण विकास, खास तुझ्यासाठी आता विडियो कॉल चालू आहे. आता तुझं समाधान झालं असेल न? - देवयानी

“किती भाव खाल्लास विडियो कॉल साठी. एवढ्या अर्ज विनंत्या केल्या असत्या तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुद्धा भेटीची वेळ दिली असती. पण तू कसलीss, एक नंबरची  खडूस !” – विकास

“ए तू मला खडूस म्हणालास? माझ्या सारख्या एवढ्या मृदु भाषिणी मुलीला तू खडूस म्हणतोस? देवयानीनी लाडिक तक्रार केली.

“नाही तर काय, सारख्या धमक्या देत असतेस फोन बंद करीन म्हणून. माहीत आहे न तुला मी कासावीस होतो म्हणून. गैर फायदा घेतेस माझ्या प्रेमाचा. “

देवयानी मिष्कील हसत होती. म्हणाली,

“मग असच असतं. मुलींनी अडवायचं आणि मुलांनी सहन करायचं.” – देवयानी 

“म्हणजे काय? हा काय लाइफ लॉन्ग प्रोग्राम आहे का?” – विकास

“मग? तुला काय  वाटलं?” – देवयानी

“कुठून शिकलीस हे?” – विकास.

“शिकायचं काय असतं त्यात? मुलींसाठी उपजतच असतं हे. मध हवा असेल तर थोडे काटे सहन करावेच लागतील.” – देवयानी मिश्किल पणे म्हणाली. 

“अरे असं आहे होय ! माझ्या लक्षातच आलं नाही. मधाची गॅरंटी आहे न! मग काटे सहन करू. वाटेल तितके बोचव.” विकास म्हणाला

“महाशय, आधी नागपूरला जाऊन या,  तिथे किती काटे बोचणार आहेत हे तुम्हाला माहीत नाहीये.” – देवयानी

ती चिंताच नाहीये, आमच्या कडे काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. आम्ही विदर्भातले लोक साधे आणि सरळ  असतो.” – विकास

“हे बघ लग्नाचा विषय आला की सगळे परिमाण बदलतात. अर्थात आमच्या घरी सुद्धा काही वेगळं असणार नाही म्हणा.” – देवयानी

“म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे तुला ?” – विकास

“नाही माहीत. पण माझा अंदाज आहे की आमच्या कडे चटकन होकार मिळणार नाही.” – देवयानी

“का ?”- विकास.

“अरे नागपूरच नाव काढल्यावर, ते किती दूर आहे, परत विदर्भातले, कशी माणसं असतील, आपण कर्नाटकातले, असे ढीगभर प्रश्न उमटणार आहेत. त्यांचा सामना करावा लागणार आहे.” देवयानी गंभीर पणे म्हणाली.

“मग?” – विकास

अटी  तटीने  किल्ला लढवावा लागणार आहे. पण तू नको काळजी करू. मी बघते काय करायचं ते. बरं पण आता बराच उशीर झाला आहे गुड नाइट. आणि तिने फ्लाइंग कीस ची परतफेड केली. आणि विकास काही बोलायच्या आत कॉल बंद झाला.

त्या शनिवारी संध्याकाळच्या फ्लाइट ने विकास नागपूरला गेला. आईला आणि त्याच्या वहिनीला जरा आश्चर्यच वाटलं कारण की तो येणार असल्याचं त्यानी सांगितलं नव्हतं. साधारण पणे  आदल्या दिवशी तो फोन करून सांगायचा.

“बाबा आणि भय्या दोघंही दिसत नाहीयेत. आज इतका उशीर झाला?” – विकास

“अरे ते दोघंही सकाळीच मुंबईला गेले आहेत. कसली तरी मीटिंग आहे. उद्या सकाळी येतील. पण तू कसा  अचानक आलास? काही खास आहे का? आधी बोलला असतास तर हे लोक मुंबईला गेले नसते.” विकास च्या आईने उत्तर दिलं. 

“असू दे. उद्या सकाळी तर येणार आहेत ना, मग झालं तर.” – विकास 

“अरे पण इतक्या तातडीने आणि न कळवता आलास, काय कारण आहे ते तरी सांग. काही अडचण आहे का?” आईने काळजी च्या सुरात विचारलं.

“नाही ग आई. असंच कंटाळा आला म्हणून आलो.” विकास म्हणाला. 

“बरं चल जेवायला काय करू ते सांग”. त्याची वहिनी तिथेच उभी होती. ऐकत होती की काय करायचं ते, तिने विचारलं.

तेवढ्यात अश्विनीचा म्हणजे विकासच्या वहिनीचा फोन वाजला. विकासच्या मोठ्या भावाचा म्हणजे भैय्या चा फोन होता.

“आम्ही आत्ता विमानात बसलो आहोत. आणि जेवायला घरीच असणार आहोत.”

“अहो, विकास पण आत्ताच आला आहे.” अश्विनीनी नवऱ्याला सांगितलं.

“अरे वा. चांगलच आहे की. चल विमान सुरू होतं आहे. ठेवतो.” – भैय्या

सगळे आल्यावर, रात्रीची जेवणं झाल्यावर समोरच्या हॉल मध्ये बैठक भरली.

“हं, काय मग विकास, काय म्हणतोस?” विकास चे बाबा विचारत होते.

देवयानीने जे फोटो पाठवले होते त्यांचे प्रिंट विकासने काढून आणले होते. ते सर्वांच्या समोर ठेवले.

“कोण आहे ही मुलगी? इतकी सुंदर मुलगी तुला भेटली कुठे?” – बाबा

देवयानी नाव आहे तिचं. आणि मग त्यानी सुरवाती  पासून सगळी कथा सांगितली.

“सगळं सिनेमातल्या सारखंच झालं की आणि तू सुद्धा सिनेमात असल्या सारखा एक दीड महिन्याच्या ओळखी वरून सरळ लग्नाच्या पायरी पर्यन्त पोचला?” आई  आश्चर्याने म्हणाली.

विकास म्हणाला “आई, देवयानी खरंच चांगली मुलगी आहे. मला म्हणाली, सगळ्यांची अनुमति घेऊनच पुढे जायचं. तुम्ही एकदा तिला भेटा, मग सगळ्या शंका दूर होतील.”

“अरे  पण पत्रिका तर जुळायला हवी. ती बघितली आहे का?” – आई

“ते तुम्ही बघा. मला त्यातलं काही कळत नाही.” – विकास

“ठीक आहे, तू तिची जन्म तारीख, वेळ आणि जिथे जन्म झाला त्या गावाच नाव मला दे. मी उद्याच गुरुजींकडे जाते. बाकी फोटोवरून तर मुलगी चांगली वाटते आहे. सुंदर तर आहेच. स्वभाव कसा  आहे ते भेटल्यावरच कळेल.” – आई 

“स्वभाव पण छानच आहे. मनमिळावू आहे. बोलण्यात मार्दव आहे. तू काळजी करू नकोस. मी उद्याच तिला फोन करून डिटेल्स मागवून घेतो.” -विकास 

विकास ची वहिनी म्हणाली की “पत्रिका पाहिल्यावर विडियो कॉल करशील का  म्हणजे आम्हाला पण बोलता येईल. ओळख होईल.” आईने पण मान डोलावली

दुसऱ्या दिवशी त्यानी देवयानीला फोन  केला.

“मुंबईला आहेस की बेळगावला?” विकासने विचारलं

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.