देवयानी विकास आणि किल्ली - भाग १० Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १०

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 भाग 10

भाग  9 वरून  पुढे  वाचा ................

 

“आणि बाबा” सुरेश नी पुस्ती जोडली “उद्याच्या फ्लाइट ची तिकीट मिळतात का हे मी बघतो. आणि असतील तर बूक करून  टाकतो. इथून पुण्याला टॅक्सी करून जाऊ. प्रश्न मिटला. उद्याच्या उद्या नागपूर.”

देवयानीनी तिथूनच टाळ्या वाजवल्या. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

“मी सांगू का घरात सगळ्यांना?” – देवयानी

“एक अर्धा तास थांब. कोणची फ्लाइट मिळते आहे ते बघू दे. मग सांग. नाही तर असं कर, त्यांना सांग की बाबाच  फोन करतील म्हणून. म्हणजे कुठलंच कन्फ्युजन असणार नाही.” – सुरेश

“ठीक आहे.” – देवयानी

देवयानी खाली गेली. सगळे तिची वाटच पहात होते. सर्वांनाच खूप उत्सुकता होती. देवयानीनी सांगितलं की माझ्याशी बोलल्यावर आता वातावरण निवळलं आहे आणि थोड्या वेळाने बाबाच फोन करणार आहेत. सर्वांनाच फार आनंद झाला. लगेच अंकुश ने चहाची फर्माईश केली. आणि ती कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. देवयानीनी  आपोआपच किचन कडे मोर्चा वळवला.

देवयानीनी नुसता चहाच केला नाही, तर सर्वांच्या आवडती भजी पण तळली. मग काय आनंदी आनंदच. विदर्भातल्या लोकांना भजी, आलूबोंडा आणि समोसा अतिशय प्रिय. भजी खाऊन सगळ्यांच्या मधे एनर्जी आली आणि पुन्हा गप्पांचा  अविरत ओघ सुरू झाला. आता देवयानी पण रुळली होती, तिच्या स्वभावाचा पण आतापर्यंत सर्वांना अंदाज आला होता त्यामुळे तिची पण धुव्वाधार मस्करी चालली होती. आणि हे सगळं देवयांनीला नवीन होतं पण फार आवडून गेलं. असच तासभर चाललं होतं.

देवयानीच्या बाबांचा भगवान रावांना  फोन आला. सगळे गप्प बसले. बाबांनी फोन घेतला.

“हॅलो, बोला गोविंद राव, काय समाचार ?”- भगवानरावांनी  फोन घेतला.

“आमच्या मुलीशी मी बोलत होतो” गोविंद राव म्हणाले “आणि तिच्या तोंडून जे काही मी ऐकलं त्याने मी फार भारावून गेलो. अहो ही मुलगी एकटी तिथे आणि आमचा प्रोग्राम बारगळला त्यामुळे आम्ही सगळेच फार चिंतेत होतो. पण आता काळजी नाही. तुमचे आभार मानायला माझ्या जवळ शब्दच नाहीत.”

“अहो गोविंद राव आता तुमच्या मुलीची चिंता सोडा. आता ती आमची जबाबदारी आहे. देवयानीचा स्वभाव आमच्या इथे सर्वांनाच आवडला आहे. ती आमच्या घरात चटकन अगदी दुधात साखर विरघळते तशी रूळली आहे. तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण ते असू द्या. तुम्ही केंव्हा नागपूरला येणार ते सांगा.” भगवानराव उत्तरले.

“उद्या दुपारी बाराची फ्लाइट आहे पुण्यावरून. साधारण दीड वाजेल तिथे पोचायला. घरी कसं यायचं ते सांगा. आम्हाला नागपूरची काहीच माहिती नाही म्हणून.” गोविंद राव बोलले.

“अहो चिंताच नको. आम्ही येऊच की तुम्हाला रीसीव करायला, एयरपोर्ट वर, तिघंही येता आहात ना ?” – भगवानराव

“हो तिघंही येतो आहे.” – गोविंद राव 

“छान, प्रोग्राम बदलणार नाही न ?” भगवानरावांनी हलवून खुंटा बळकट केला.

“नाही, नाही आता ती शक्यता नाही. चला ठेवतो मग. उद्या भेटुच.” गोविंद रावांनी हमी भरली.

बाबांच्या तोंडून सर्व ऐकल्यावर अंकुश आणि भय्या मधल्या जागेत नाचायला लागले.

देवयानी आश्चर्यानी  बघतच राहिली अशी गंमत तिने आधी कधीच अनुभवली नव्हती. नाचता नाचता अंकुश नी मनीषाला आणि भैय्या ने अश्विनीला ओढलं. अंकुश विकासला म्हणाला अरे पाहातोस काय, तू पण ये, खेच देवयानीला पण. तिच्यासाठीच तर हे सगळं चाललंय. मग विकासलाही जोर चढला आणि त्यांनी देवयांनीला खेचलं. देवयानी आधी खूपच संकोचली पण मग भगवानराव  म्हणाले, जा ग लाजते काय अशी ! यमुनाबाईंनी पण संमती दर्शक मान हलवली. मग मात्र तिचा सगळा संकोच गळून पडला.

दहा पंधरा मिनिटं असा काही हंगामा चालू होता की देवयानीच्या घरच्या कोणी  बघितलं असतं तर त्याला वेडच लागलं असतं.

सगळे दमून भागून बसले. आता स्वयंपाक करायचं कोणातच त्राण नव्हतं. मग काय, बाहेरच जेवायला जायचा प्रोग्राम बनला.

दुसऱ्या दिवशी, सकाळीच देवयानीनी सुरेशला फोन केला.

“हॅलो, काय रे निघालात ना?”

“हो निघालो आहोत. पुण्याच्या रस्त्यावर आहोत. पण प्रोग्राम मध्ये थोडा बदल झाला आहे.” – सुरेश 

“ए तू मला घाबरवू नकोस, काय बदल झाला आहे? नीट मला समजेल असं सांग.” देवयानी थोडी कासावीस झाली.

“अग काही नाही, काल जरा गंमतच झाली.” – सुरेश 

“अरे देवा, आता काय झालं?” – देवयानी.

“ऐक ना, घाबरतेस काय अशी, खरंच गंमत झाली. ऐक तर खरी.” – सुरेश

“ओके सांग” – देवयानी 

“अग काल सकाळी,” सुरेशनी सांगायला सुरवात केली. “आपलं जे काही बोलणं झालं होतं, ते मी कालच दुपारी विश्राम च्या कानावर घातलं होतं. आणि विश्राम नी ते काका आणि काकूंना सविस्तर सांगितलं  त्यामुळे आता त्यांच्या मनात कसलीही शंका नाहीये. म्हणून आपण उद्या सकाळी निघू, असं सांगायला काल  संध्याकाळी काका काकू आणि विश्राम पुन्हा आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या दिवशी सकाळी मावशीशी वाद विवाद करण्याची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी त्यावेळी माघार घेतली होती.” - सुरेश

मग तो पुढे बोलला “एवढं झाल्यावर त्यांना नागपूर च्या प्रोग्राम बद्दल बाबांनी सांगितलं. मग काय, काका पण म्हणाले की अजून चार बूकिंग होतेय का पहा. विश्राम नी बघितलं आणि करून सुद्धा टाकलं. त्या मुळे  आता आम्ही सात जण येणार आहोत.”

देवयानी काय सांगते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तिने  सांगितल्यावर, सगळ्यांच्याच आनंदात भर  पडली. मग काय सगळेच कामाला लागले. 

एकदमच धाव पळ सुरू झाली. आता मोठे पाहुणे येणार होते, घर खूप मोठं आणि चांगलं होतं, पण पसारा सुद्धा कमी नव्हता. घर कसं आरशासारखे लख्ख दिसायला हवं म्हणून एकजात सगळे कामाला लागले. आश्चर्य म्हणजे देवयानी सुद्धा त्यांच्यात सामील झाली, आणि कोणालाही त्यात काही वावगं वाटलं नाही इतकी ती त्यांच्यात सामावून गेली होती. जणू काही ती या घरचीच होती, आणि तिच्यासाठी सुद्धा तिचे आई वडील आता पाहुणेच होते. देवयानी कामात हातभार लावत होती आणि बाकीचे सर्व तिच्याकडे कौतुकाने पहातच राहिले. मध्येच तिच्या ते लक्षात आलं आणि तिला एकदम लाजलीच. तिच्या नकळतच किचन मधे पळून गेली. ती कीचन मधे गेली आहे हे कळल्यावर सगळ्यांनी चहा, चहा असा आरडा ओरडा करायला सुरवात केली. यमुनाबाईंनीच मग जरा आवाज चढवून सांगितलं  की आत्ताच चहा आणि नाश्ता झालेला आहे, आता कामं करा, चहा मिळणार नाही. देवयानीची चहातून सुटका झाली.

काका मंडळी येणार म्हंटल्यांवर घर छानच दिसायला पाहिजे म्हणून सगळी नेटाने कामाला लागली होती. कुठलीही कसर राहायला नको होती. जेवणाचा मेनू सुद्धा देवयांनीला विचारून ठरवण्यात आला.

दुपारी एक वाजता विकास, देवयानी आणि अंकुश तिघं एयर पोर्ट वर पोचले. अंकुश त्याची गाडी घेऊन आला होता

घरी आल्यावर भगवानरावांनी सर्वांचे स्वागत केलं. घर पाहिल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा आली. घर पाहून सगळे खुश झालेले दिसत होते. इतक्या मोठ्या घराची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. घरी दोन दोन गाड्या होत्या. ते बघून, आपली मुलगी एका सुखवस्तू  घरात जातेय याचा त्यांना आनंद झाला. आल्यावर त्यांचं आंब्याचं थंड गार पन्ह देऊन त्यांचा श्रम परिहार केला. सगळे खुश. मग थोडा वेळ गप्पा टप्पा झाल्यावर जेवणाची वर्दी आली. या सगळ्या कार्यक्रमात देवयानी अगदी सराईता सारखी, अगदी घरच्या सूने  सारखी वावरत होती ते बघून तर त्यांना खूपच संतोष वाटला.

देवयानीच्याच सांगण्याप्रमाणे त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. वरतून खास विदर्भाची  चव म्हणून पाटवडीचा रस्सा आणि भरल्या वांग्याची भाजी. केली होती.

पाहुण्यांना सगळ्याच गोष्टींचं अप्रूप वाटलं. हसत खेळत जेवण झाल्यावर सगळे हॉल मधे येऊन बसले. देवयानीचे काका म्हणाले की

“तुमच्या घरचं हसतं खेळतं वातावरण पाहून खूप आनंद वाटला. एवढी सारी जनता आणि कुठेही वादाचा सुर नाही हे बघून खूपच छान वाटलं. देवयानीची निवड चुकली नाही याचा संतोष आहे.”

आता काकांनीच पसंतीची पावती दिल्यावर काही प्रश्नच नव्हता. सर्वांच्याच चेहऱ्यावर पसंती दिसतच होती. सुरवातीच्या विरोधाचा लवलेशही दिसत नव्हता.

“मग काका साहेब आता पुढे कसं ?” भगवानरावांनी विचारले.

“तुम्ही बोलायचं. आमची मुलीकडची बाजू आहे.” काका म्हणाले.

“आम्हाला काहीच नको. देवाच्या कृपेने कसलीही ददात नाहीये. फक्त एवढीच इच्छा आहे की साखरपुडा किंवा लग्न यापैकी एक नागपूरला व्हावं. आणि तुमची तयारी असेल तर दोन्ही नागपूरलाच करू.” भगवानरावांनी आपली बाजू मांडली.

देवयानीची आई हळूच गोविंद रावांच्या कानाशी  लागून म्हणाली की

“मावशीला पण इथे बोलवायला हवं. इथलं साम्राज्य पाहिल्यावर कदाचित तिचा पण विरोध मावळून जाईल. तुम्हाला काय वाटतं ?”

“तुझं म्हणणं बरोबर आहे कावेरी, पण जर तिने इथे येऊन भलतीच खुसपटं काढली तर प्रॉब्लेम होईल. आपण नागपूरला आहोत याचा विचार कर. सर्वांच्या समोर आपली शोभा व्हायला नको.” – गोविंद राव 

 

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे   

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.