देवयानी विकास आणि किल्ली - भाग ६ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ६

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

भाग ६

भाग   ५  वरून  पुढे  वाचा ................

“स्वभाव पण छानच आहे. मनमिळावू आहे. बोलण्यात मार्दव आहे. तू काळजी करू नकोस. मी उद्याच तिला फोन करून डिटेल्स मागवून घेतो.” -विकास 

विकास ची वहिनी म्हणाली की “पत्रिका पाहिल्यावर विडियो कॉल करशील का  म्हणजे आम्हाला पण बोलता येईल. ओळख होईल.” आईने पण मान डोलावली

दुसऱ्या दिवशी त्यानी देवयानीला फोन  केला.

“मुंबईला आहेस की बेळगावला?” विकासने विचारलं

“बेळगावला. काय म्हणतोस? काय म्हणते तुमच्या घरची आघाडी?” देवयानीची उत्सुकतेने पृच्छा.

“तसं सगळं ओके आहे. फक्त कुंडली पाहायची आहे असं म्हणताहेत. बाकी तुझे  फोटो पाहिल्यावर  नाकारण्यासारख काहीच नव्हतं.” – विकासनी माहिती पुरवली.

“मला माहीत होतं ते. मी सगळे डिटेल्स तयार ठेवले आहेत. तुला लगेच पाठवते.”

“तुला माहीत होतं? कसं काय?” विकासनी विचारलं.

“आमच्याही घरी काही वेगळं झालेलं नाहीये. तुझा फोटो सगळ्यांना पसंत पडला आहे. पण दोन गोष्टींवर गाडी अडली आहे.” देवयानीनी सांगितलं. 

“कोणच्या?” – विकास

“एक तर इतक्या दूर मुलीला द्यायची का, आणि कुंडली जुळते का? म्हणून कुंडली बघायची आहे. त्यामुळे तू पण तुझे डिटेल्स पाठवून दे.” – देवयानी

“ओके. मी पण लगेच पाठवतो.” – विकास 

कुंडल्या जुळल्या. गुण फक्त 22 च जुळले, पण गुरुजींनी सांगितलं की no problem. बाकी पत्रिका उत्तम आहे. मुख्य म्हणजे लग्ना  नंतर भाग्योदय आहे. पुढे जायला हरकत नाही.

मग काय? आई आणि वाहिनी म्हणाल्या की “देवयानी ला फोन लाव. तिच्या घरी काय झालाय ते कळू  दे आम्हाला.”

विकास सुद्धा अधीर झाला होता. पण तो म्हणाला –

“आपल्या कडे सगळ्या गोष्टी भराभर झाल्या पण तिकडे काय परिस्थिती असेल आपल्याला माहीत नाही. जरा थांबू. संध्याकाळी लावतो फोन. किंवा जर सगळं ओके असेल तर. तीच करेल”

आई आणि वहिनींना काही पटलं नाही, पण बाबांच म्हणाले की “विकास च बरोबर आहे. थांबू आपपण संध्याकाळ पर्यन्त. कधी गुरुजी भेटतात कधी नाही, त्यामुळे थोड थांबूनच जाऊ. बाकी पत्रिका जुळताहेत म्हंटल्यांवर मला तशी काही अडचण दिसत नाहीये. तेंव्हा तुम्ही दोघी जरा सबुरीने घ्या.”

संध्याकाळी पांच  वाजता देवयानीचाच फोन आला.

“काय झालं?” विकासनी अधीर पणे विचारलं.  

दोन मिनिटं ती काहीच बोलली नाही. मग म्हणाली “अरे आईने आमच्या काका, काकू, मामा, मावशी वगैरे सगळ्यांना बोलावून घेतलं आहे.”

“कशाला?” – विकास

“आपल्या लग्ना बद्दल चर्चा करायला. इथे आमच्या मधे अशीच पद्धत आहे. लग्न म्हंटलं की सगळे गोळा होतात.” देवयानी म्हणाली.

“अँ, हे काय?” – विकास 

“हॅलो, मी नंतर फोन करते. मावशी आलेलीच आहे आणि आत्ता काका, काकू, आत्या वगैरे मंडळी कार मधून उतरतांना दिसताहेत. म्हणजे आता बैठक सुरू होईल. मी सगळं आटपल्यावर फोन करते. बाय.” -देवयानी

विकास जरा खट्टू झाला. बेळगाव ला काय होतं हे जाणून घेणं महत्वाचं होतं. पण आता तिच्या फोन ची वाट पहावी लागणार होती. रात्री जरा उशीराच अकरा

वाजता तिचा फोन आला. विकास ने ताबडतोब उचलला. तिचा आवाज जरा दबलेलाच येत होता.

“काय ग काय झालं. तुझा आवाज का असा रडवेला वाटतोय ?” विकास नी विचारलं.

“घोळ झाला आहे” – देवयानी 

“काय घोळ झालाय?” – विकास

“अरे  मघाशी सांगितलं ना की आमच्या इथे आईने सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं. सर्वांचं मत विचारायला.” – देवयानीनी सांगायला सुरवात केली.

“मग?” – विकास

“मी बोलले होते ना, तेच झालं, ज्याची मला भीती वाटत होती. सर्वांनी एकच मुद्दा उचलून धरला. की नागपूर इतकं दूर आहे, स्थळाची माहिती कशी मिळेल? उद्या काही कमी जास्त झालं तर काय करायचं? मुलगी लहान आहे. तिला तिचं हित कळत नाही.” देवयानीनी खुलासा केला  

“तू, अजून लहानच आहेस?” – विकास

“सगळ्यांच्या मते, हो. मी मुलगी आहे ना मग लहानच आहे. पण पुढे ऐक ना, सगळ्यांचं असं मत पडलं की ‘देवयानी लहान आहे तेंव्हा आपणच तिला समजावून सांगायला हवं. इतक्या दूर मुलगी द्यायची म्हणजे जरा टेंशन असणार. आपल्या आजूबाजूला, मुंबई, पुण्याच्या साइडचंच स्थळ बघा. आपल्याला मुलगी जड झाली आहे का?’ आणि आईला त्यांचं मत आता पटायला लागलय. मला म्हणाली की “पुन्हा एकदा विचार कर. ही सगळी आपली जिव्हाळ्याची माणसं आहेत. त्यांचं म्हणण पण मला बरोबर वाटतंय.” देवयानीनी डिटेल्स दिले.

“हे भगवान!  अब क्या करे?” – विकास

“अरे माझ्या मावशीने तर असं म्हंटलं की आपल्याला शहराची सवय आहे. मुंबई, पुण्याची गोष्ट वेगळी आहे, नागपूर सारख्या गाव खेड्यात आपल्या मुलीचा कसा निभाव लागेल? नको नको इकडचंच स्थळ बघा.” – देवयानी 

“नागपूर हे खेडं आहे?” – विकास

“अरे, या लोकांना मुंबई, पुणे, बंगलोर या पलीकडे काहीच माहीत नाही. ही शहरं सोडून बाकी सगळी खेडी असा पॉप्युलर समज आहे. मग सुरेश ने त्यांना गूगल उघडून नागपूर ची सगळी माहिती वाचून दाखवली. फोटो दाखवले.”- देवयानी

“मग?” – विकास

“काही नाही. पालथ्या घड्यावर पाणी” – देवयानी

“अग पण पुरुष मंडळींना तर माहिती असेल.” विकासने विचारलं.

“आहे ना. पण बोलणार कोण? कोणालाच नागपूर नको होतं. म्हणून कोणीच बोललं नाही.” – देवयानी निराश सुरात बोलली. 

विकास आता चवताळला.

“ते सर्व जावू दे खड्ड्यात. आपण काय करायचं आता, ते बोल. तुझा काय विचार आहे ?”

“मला तर काहीच समजत नाहीये. तूच काही तरी मार्ग काढ.” – देवयानी

“हे बघ, आई बाबांनी आधी हो म्हंटलं होतं ना, मग आता पुन्हा तू त्यांच्याशी उद्या सकाळी बोल आणि पहा प्रयत्न करून पटवून देण्याचा. मी पण घरात सर्वांशी बोलतो आणि बघतो काही मार्ग निघतो का. हे प्रकरण आता रेंगाळणार असं दिसतंय. पण तू रणांगण सोडू नको. लढ. आम्ही आहोतच तुझ्या बरोबर. आई आणि वाहिनी तर तुझ्याशी बोलायला अगदी अधीर झाल्या आहेत.” – विकासनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“ठीक आहे. पण तुझ्या घरून तर फूल सपोर्ट आहे ना. नक्की सांग ना म्हणजे मला पण बोलायला बळ येईल.” – देवयानी 

“मी फोन बंद करतो आणि विडियो लावतो. मग बोला तुम्ही लोक.”

“पण आत्ता सगळे झोपले असतील ना ?” – देवयानी

“नाही सगळे इथेच आहेत. तुझ्याच फोनची वाट होती.” – विकास

“आत्ता  बरीच रात्र झाली आहे. मीच  उद्या ताल माल पाहून सकाळी  कॉल करते.” देवयानी म्हणाली. तिच्याशी बोलायला मिळालं नाही म्हणून संगळ्यांचीच निराशा झाली.

सकाळी देवयानीच्या घरी काय बोलणं झालं ते इकडे कळलं नाही. पण देवयानीचा साडे अकाराच्या सुमारास फोन आला.

“हॅलो, बोल देवयानी.” विकास नी फोन घेतला 

“मी आज सकाळी किल्ला लढवला. आईला आणि बाबांना मी पटवून दिलं की एकदा तरी तुझ्या आई बाबांशी बोला आणि मगच ठरवा. समोरच्यांची बाजू काय आहे हे बघितल्या शिवाय निर्णय घेणं कसं चुकीचं आहे हे मी त्यांच्या गळी उतरवलं. आता दोघांनाही समोरा समोर आणण जरूरी आहे. कसं करूया?” देवयानीने  सकाळी काय घडलं ते सांगितलं. विकास खुश झाला. म्हणाला

“मला असं वाटतं की तू आधी  माझ्या आई, बाबा आणि वाहिनींशी विडियो लावून बोल. मग तुझं काय मत आहे ते सांग. मग ठरवू.” – विकास. 

ओके. असं म्हणून तिने विडियो कॉल लावला. विकासनी ओळख  करून दिल्यावर जवळ जवळ अर्धा तास बोलणं चालू होतं.

“कशी वाटली देवयानी?” बोलणं झाल्यावर सगळ्यांच्या कडे पाहून विकासनी विचारलं.

“दिसायला तर लाखात एक आहेच, बोलून चालून पण छान आहे. तू एवढा धीट कधी झालास रे?” आई बोलली.

“धीट कसला, तुम्हाला सगळं सांगितलं आहे. प्रवाहा बरोबर वाहत गेलो इतकंच. बाकी पायऱ्या तीच चढली. मी फक्त तिच्या बरोबर.” विकासची कबुली 

“अरे पण इतकी सुंदर मुलगी तुझ्यावर भाळली म्हणजे आश्चर्यच आहे.” – आई 

“अरे भागवान,” विकासच्या वडिलांनी कॉमेंट केली. “रोमिओ को देखो जूलिएट की नजरसे. अशी म्हणच आहे न.”

“तरी पण आश्चर्यच आहे. तू नीट चौकशी केलीस ना रे?” आईनी शंका व्यक्त केली.

“अग आई, तिच्याशी बोलल्यावर तुझं काय मत झालंय? किती वेळ बोलत होता तुम्ही दोघी जणी, ती अशी तशी वाटते का?” – विकास

“नाही रे. एकदम सोज्वळ वाटली. पण काय आहे की जन्माचा जोडीदार जरा पारखूनच  घ्यावा असं म्हणते मी.” आई नी पुन्हा मुद्दा उचलून धरला.

“आईचं म्हणण बरोबरच आहे विकास. आमचा होकार आहेच. पण एकदा त्यांचं घर बघून आल्यावर जरा समाधान होईल. असं कर तू देवयानीशी बोल आणि दोन्ही कुटुंबाची गाठ भेट अरेंज करा. म्हणजे त्यांच्याही मनात असेच विचार आले असतील तर, आणि ते तसे येणं हे साहजिकच आहे, त्यांच पण शंका निरसन होईल.” विकासच्या बाबांनी आईला पाठिंबा दिला.

विकासला पण ते पटलं. त्यांनी देवयानीला फोन लावला. तिला काय चर्चा झाली ते सांगितलं. आणि म्हणाला “आता तू आई, बाबांशी बोल आणि ठरवा काय ते. आणि मला सांग. देवयांनीला पण ते पटलं.” ती म्हणाली-

“मी आत्ताच आई बाबांशी बोलते आणि तुला कळवते. ठेवते फोन.”

तासा भराने देवयानीचा फोन  आला.

“बाबा म्हणतात की तुझ्या बाबांशीच बोलतो म्हणून.”

“ओके. मग आता बाबांना देतो.” – विकासने बाबांना फोन दिला.

दोघांच अर्धा तास बोलणं झालं.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.