अनु अकरा वाजल्यापासून वैभव ची वाट बघत आहे. आता दुपारचे तीन वाजायला येत आहे, पण अजून वैभवचा ठावठिकाण नाही. अनु वैभवला बोलवायला जवळपास शंभरेक मिस कॉल लावले असतील, दीडशेच्या वर म्यासेज टाकले असतील, पण एवढे असूनही वैभवने तिला काही रिस्पॉन्स दिला नाही वा तिचा फोन उचलला नाही. अनुला वाटू लागले होते की, "आता बस्स झालं, आता आपल्याला जायला हवं, सलग चार तास रेस्टॉरंट मध्ये, कुठलीच मुलगी आपल्या बॉयफ्रेंड ची वाट बघत नसावी, तेही एकटी!, हा कहरच झालाय, इनफ इज इनफ!, आता त्याने किती ही सॉरी म्हटले, किंवा आपले लाळ पुरविले तरी त्याला माफ करायचे नाही. चार तास फुकट वाया गेलेत, सोबत इथे फुकट बसल्याचेही पैसे द्यावे लागतील, ते वेगळंच..."
वैभवनेच अनुला रेस्टॉरंट मध्ये बोलाविले होते. दोघांची डेटिंग म्हणजे भेट तेही रेस्टॉरंट मध्ये दुसऱ्यांदा होती. पहिल्यांदा दोघेही वेळेवर आले होते. दोघांचे रिलेशनशिप तीन महिन्यांचे, पण दोघांतील प्रेमाचा बॉण्ड जणू जन्मोजन्मीचाच. वैभव पोलीस खात्यात होता आणि अनु इंजिनिअर होती. दोघांनाही नोकरी असल्याने, आधीच दोघांनी ठरविले होते की, दोघे पुढे जाऊन लग्न नक्कीच करणार. पण लग्नाआधी एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजून घ्यायचे होते, म्हणून ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते.
डेटिंगच्या आधल्या रात्रीच वैभवने अनुला फोनवरूनच, दुसऱ्या दिवशी, सकाळी ठीक अकरा वाजता भाग्यद्वीप चौकातील 'रोम कपल रेस्टॉरंट' मध्ये येण्यासाठी सांगितले. ते रेस्टॉरंट भर चौकात होते, सोबतच अर्धे रेस्टॉरंट खोलीत म्हणजेच आत अंधारात होते, तर अर्धे बाहेर, म्हणजे रस्त्याचा नजारा बघत आपल्या पार्टनर सोबत गप्पे लढविता येऊ शकता येईल असे होते. ते रेस्टॉरंट त्याच कामसाठी फेमस होते, त्यांची इनकम ऑर्डर केलेल्या जेवणातून कमी, पण कपलच्या बसण्याच्या वेळेच्या चार्जेसवरून खूप कमाई होत होती. अनुनेही बाहेरचाच एक टेबल बुक केला होता, म्हणजे बाहेरचा नजारा डोळ्यात सामावून, वैभवसोबत मनसोक्त बोलायचा तिचा प्लॅन होता. दोघांनाही शहरात कसली भीती न्हवती, की कुणी दोघांना बघेल, दोघांच्या प्रेमाला लफडं सांगून शहरभर फिरत बसेल, कारण दोघांच्याही घरची परवानगी होतीच, तेही लग्नाची, म्हणजे ते दोघे बाहेर काहीही करू शकत होते. पण तरीही दोघांना आपल्या जबाबदाऱ्याची चांगलीच जाणीव होती.
अनु जेव्हा आपल्या घरून निघाली, तेव्हा तिने वैभवला फोन केला होता, त्या वेळेस वैभव ही म्हणाला की, तो ही लवकरच घरून निघेल, तोपर्यंत रेस्टॉरंटच्या एका प्लॉटची बुकिंग करून ठेव. अनु रेस्टॉरंट मध्ये येऊन चार तास झालेत, पण वैभवचा ठाव ठिकाण न्हवता. तो फोनही उचलत न्हवता, किंवा तो कुठे आहे, किती वेळ लागेल, काहीही सांगत न्हवता. पण अनुला समजले होते की, तो आपले म्यासेज बघत आहे, आपले फोनही तो मुद्दाम कट करत आहे, पण उचलत नाही आहे. अनुला वाटू लागले की, वैभवने स्वतःहुन रेस्टॉरंटला बोलाविले म्हणजे काहीतरी सरप्राईज असेल, कदाचित तो आपल्याला सर्वांसमोर प्रपोज करेल, किंवा डायमंड रिंग देऊन लग्नाबाबत विचारणा करेल, असे तिला वाटू लागले आणि मनात स्वप्ने रंगवू लागली. पण तो काही येत न्हवता. प्रत्येक मिनिटाला एक तरी फोन करत होती, मध्ये मध्ये म्यासेज टाकत होती, आणि बाकीच्या वेळेत, सोशल मीडिया वापरत होती. सकाळपासून जेवलेली नसल्याने, दोन अँपल ज्यूस, दोन ऑरेंज ज्यूस आणि एक मिक्स ज्यूस पिऊनही झालेत. मोबाईल वापरून वापरून चार्जिंग संपायला आली होती, पण वैभवचा पत्ताच नाही. शनिवार असल्याने व हाफ डे असल्याने ऑफिसचे जास्त लॉस झाले नाही, पण सलग चार तास वाट बघून बघून तिच्या दिमाखाची वाट मात्र लागली होती. पण काहीतरी सरप्राईज मिळणार ह्या आशेपोटी, ती त्याची वाट बघत होती.
आपले जरासे मनोरंजन करण्यासाठी ती बाहेर डोकावून रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांवर नजर टाकत होती. काही लोक तर आपले काम आटोपून परत त्याच रस्त्याने परतत होती, पण वैभवचा पत्ताच लागत न्हवता. गाड्यांना बघून बघून ती त्रासून गेली होती, नंतर ती झाडावर असलेल्या घरट्याकडे डोकावून बघू लागली. त्या पक्ष्यांना निरखून पाहू लागली. त्या पिलांची आई आपले भोजन आणून, आपल्या पिलांना ते भोजन भरवून, पुन्हा ती आकाशात उडाली. रेस्टरांत मध्ये जुन्या कपलची जागा नवीन कपल घेऊ लागलेत, तिच्याच पुढे एकाचे ब्रेक अप झाले, तर दोघांचे क्याच अप झाले, एकाने आपल्या प्रेयसी समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तर एकाची भांडण झालीत. एवढे सगळे होऊन होऊन गेले, पण वैभवचा ठावठिकाण लागत न्हवता.
अनु आधल्या रात्री, मध्यरात्री एक वाजेपर्यंत जागून एक पत्र लिहिले, ज्यात तिच्या मनात वैभव विषयी काय भावना आहेत, हे पूर्ण संक्षिप्त स्वरूपात लिहिले होते, म्हणजे जेव्हा रेस्टॉरंटमध्ये भेट होईल, तेव्हा ती त्याला ते पत्र देऊ इच्छित होती. तिच्या हातात राहून राहून, हातातील सुटलेल्या घामाने, ते पत्र नरम पडले होते, पण वैभव काही आलेला न्हवता.
वैभवला केलेला प्रत्येक फोन तो मुद्दाम कट करत असल्याने तिने त्याला फोन करणेही बंद केले होते. म्यासेजला सिन करूनही रिप्लाय देत नसल्याने ती खूप चिडलेली होती. दुपारचे तीन वाजायला आले होते. तिने ठरविले रेस्टॉरंट मधून जायचे. ती उठली, आपल्या हातातल्या पत्राला तिथेच टेबलवर ठेऊन, काउंटर वर पैसे जमा करून, आपल्या स्कुटी कडे जायला निघाली. मध्येच तिला वैभवचा फोन आला.
अनु एवढी चिंताग्रस्त झाली होती की, तिने मोबाईलला पटकन उचलून आपल्या कानाला लावला, आणि त्याच्यावर ओरडू लागली. वैभव तिला शांत करून म्हणाला की, "तू जे टेबल वर ते कागद ठेवलेस ना?, त्याला परत घे आणि नंतरच तिथून निघ." एवढेच बोलून त्याने फोन कट केले. अनुला वाटू लागले की, त्याने आपली क्षमा न मागता, इथे येणार की नाही, किंवा का येऊ शकला नाही, ह्याबद्दल चर्चा करण्याऐवजी हे काहीतरी भलतेच सांगत आहे, हे बघून तिचा राग पुन्हा अनावर आला. तिने लगेच त्याला फोन केला आणि पुन्हा त्याच्यावर ओरडू लागली. पण पुन्हा एकदा त्याने तिला थांबवून म्हटले की, "मी तिथे आता येऊ शकत नाही, पण तुनेच ठेवलेले ते कागद उचल आणि त्याला घेऊनच घरी जा, त्या कागदाला तिथेच ठेवलिस तर खूप भयावह होईल."
अनुला वाटू लागले की, तो कुठूनतरी आपल्याला बघत आहे, आणि आपली मस्करी करत आहे. पण चार तासापासून एवढी मस्करी कोण करतं?, हा विचार करून, त्या पत्राला आपल्यासोबत घेऊन न जाताच, आपल्या स्कुटीला चालू केले आणि आपल्या घरचा रस्ता पकडला. ते पत्र त्या टेबलावरच राहून गेले. अनु तिथून निघाली होती. पत्र तिथेच होते. त्याच रेस्टॉरंट मधल्या एका वेटरला तो लेटर दुरून दिसला. पण त्याला हे ठाऊक न्हवते की, ते काय आहे?, ह्याची शहानिशा करायला तो, त्या लेटर ठेवलेल्या टेबलाजवळ गेला. टेबल कमरेच्या खाली असल्याने, तो वेटर, त्या लेटरला घ्यायला जरा खाली वाकला. खाली वाकताच बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या वेटरला जरा धक्का बसला, आणि त्याच्या हातात असलेला सूपचा ऑर्डर, म्हणजे त्या सूपसोबत चिनी मातीचे भांडंही खाली पडली आणि खाली पडल्यानंतर फुटली. खाली खूप दूरपर्यंत ते सूप पसरले. त्या सूपला वेचून खालची जागा स्वच्छ करण्यासाठी, तिथेच कार्यरत असलेल्या एका बाईला सांगण्यात आले. पण ती बाई तिथे येईपर्यंत एक ग्राहक चुकून, त्याच सूप मुळे घसरून पडला, तो मोबाईल वापरत चालत होता म्हणून त्याला खाली काय आहे हे दिसले नाही. पण खाली पडताना, स्वतःला वाचविण्यासाठी त्याने आपला हात, जवळच असलेल्या एका टेबलाला आधार घेण्यासाठी पडकले, पण ते टेबल जास्त वजनी नसल्याने, तो माणूस टेबल सकट खाली पडला.
टेबलावर आधीच असलेल्या एका ऑरेंज ज्यूसचा ग्लास दूरवर जाऊन, एका माणसाला आदळला. त्या ग्लास मधील ज्यूस त्याच्या डोळ्यात गेला. त्याच्या डोळ्यांची आग होऊ लागली, स्वतःला सावरण्यासाठी तो पाण्यासाठी इकडे तिकडे पळू लागला. त्याला लगेच एक वेटरने पाणी आणून दिले. त्या माणसाने, लगेच त्या ग्लास मधले पाणी डोळ्यावर टाकले, आणि त्या ग्लासला जवळच असलेल्या टेबलावर ठेवायला गेला, पण तो ग्लास खाली पडला, तो ग्लास काचेचा असल्याने खाली पडून फुटला. पाणी डोळ्यावर टाकल्यानंतर त्याला जरा आराम मिळाला, पण डोळे अर्धवट खुलून असलेल्या अवस्थेतच एका खुर्चीवर बसायला मागे सरकला, पण मागे एक पाऊल टाकताच, खाली असलेला एक काच त्याच्या पायातील चप्पलीच्या आत शिरून पायात शिरला. तो ओरडतच पाय वर केला आणि पायात शिरलेला तो काचेचा तुकडा काढला, व रागातच तो तुकडा रेस्टॉरंटच्या बाहेर रस्त्यावर फेकला. एवढ्या वेळेत ती बाई येऊन खाली पडलेले सर्व साफ करू लागली.
बाहेर रस्त्यावर पडलेला काचेचा तुकडा, एका चालत्या कारच्या पुढच्या टायर मध्ये शिरला, तो टायर तिथेच फुटला आणि पुढे जाऊन बाजूच्या मेडिकल स्टोर मध्ये ती कार जाऊन आदळली. त्या कार मधील व मेडिकल स्टोर मधील लोकांची मदत करायला त्या घटनास्थळी लोकांची गर्दी होऊ लागली. मुख्य चौक असल्याने, गर्दीची संख्या जवळपास शंभर- दीडशे तरी होतीच. ही गर्दी प्रत्येक क्षणाला वाढतच चालली होती.
अपघात झालेली कार, दाबल्या गेल्याने, तिथे फसलेल्या लोकांना कार मधून बाहेर काढायला, खूप अडचण जात होती. गर्दी ही वाढतच होती, गर्दी एवढी वाढली की, रस्त्याची एक बाजू गच्च भरली होती, गाड्यांना पुढे जायला फक्त जराशी जागा उरलेली होती.
एक माणूस त्या गर्दीच्या बाहेर आला, आणि आपली सिगारेट काढून पेटवताच, त्या माणसाला, एक लहान मुलगा, ज्याला धड चालताही येत न्हवते, तो रस्त्याच्या मधोमध आला, आणि पुढून एक मोठी इंधनची ट्रक येत होती. त्या सिगारेट पिणाऱ्या माणसाला हे दिसताच की, त्या मुलाच्याच दिशेने ट्रक येते आहे, तो माणूस आपल्या तोंडात पकडलेली ती सिगारेट फेकून दिली आणि त्या मुलाला वाचवायला पळत सुटला.
त्या इंधन नेणाऱ्या ट्रक चालकाचे लक्ष गर्दीकडे होते, म्हणून त्याला ठाऊक न्हवते की पुढे कुणी आहे, पण जसे लक्ष पुढे गेले, तो ट्रकचालक घाबरून गेला, पुढे अचानक तो लहान मुलगा, व त्याला वाचवायला येणार एक माणूस दिसताच, त्या ट्रकचालकाने गाडी विरुद्ध दिशेने वळविली. ट्रक काही प्रमाणात वेगात असल्याने, डिव्हाईडरला भेदून दुसऱ्या लेन मध्ये जाऊन पोहोचली. पण ट्रकच्या मागे कॅटेनर मध्ये इंधन असल्याने, मागील बाजू वजनी होती, आणि म्हणूनच मागील बाजू खाली पालटली, आणि खाली कोसळली.
ट्रकची मागील बाजू खाली पडल्याने, कंटेनरच्या कोपऱ्यावर जास्त दबाव पडल्याने, तो भाग फुटल्या गेला आणि तिथुन इंधन बाहेर पडू लागले. त्या पूर्ण कंटेनरमध्ये रॉकेल होते. एवढा मोठा आवाज झाल्याने, गर्दी केलेले सर्व लोक मागे वळून बघू लागले, तर त्यांच्या मागे एक मोठा ट्रक खाली कोसळला होता.
त्या माणसाने ज्या ठिकाणी सिगारेट फेकली होती, नेमके त्याच बाजूने कंटेनरची फुटलेली बाजूने होती, जिथून तेल गळत होते. सिगारेट जळत्या अवस्थेंत असल्याने रॉकेलचे संपर्क जसे त्या जळत्या सिगारेट सोबत झाले, तसाच त्या रॉकेलला आग लागली. ती आग पेटत पेटत नेमकी कंटेनर पर्यंत पोहोचली आणि तसाच विस्फोट झाला. तो विस्फोट एवढा भीषण होता की, जवळच असलेल्या लोकांच्या पूर्ण गर्दीला काहीच सेकंदात आपल्या कवेत घेतले. तिथे जवळपास उपस्थित असलेले सर्व लोक मरण पावले. मृतांचा आकडा जवळपास दोनशेच्या घरात होता. सोबतच पूर्ण परिसर आगेमुळे राख झाला होता.
ह्या अपघातामुळे पूर्ण देश हादरला, सारेच लोक मृतकांसाठी हळहळ व्यक्त करत होती. पोलिसांची इन्कवैरी झाल्यानंतर समजले की, हा अपघातच होय, कुणीही ह्याला मुद्दाम घडविलेले नाही. वैभव अनुच्या घरी आला. ह्या पूर्ण घटनेला, अनु स्वतःला दोष देत होती.
वैभव, "अगं ह्यात तुझी काय चूक?, तू स्वतःला का दोष देते आहेस?"
अनु, "माझीच चूक आहे रे पूर्ण, हा बघ पूर्ण व्हिडीओ..."
अनुने त्या रेस्टॉरंटच्या CCTV फुटेज दाखविला, ज्यात सरळ सरळ दिसत होते की, अनुने आपली चिट्ठी ठेवली, ती चिट्ठी बघायला वेटर वाकला, मागून येणारा वेटर, वाकणार्या वेटरला आदळला, आणि हातातला सूप खाली सांडला. दुसरा व्यक्ती त्या सूपमुळे खाली पडला, पडताना दुसऱ्या टेबल वरचा ऑरेंज ज्यूस एका माणसाच्या डोळ्यात गेला. त्याला साफ करायला आणलेल्या पाण्याचे ग्लास चुकून खाली पडले, तो माणूस बसायला जाईल, पण एवढ्यातच त्याचा पाय त्याच पाण्याचा ग्लासच्या तुकड्यावर पडले, त्याने तो तुकडा पायातून काढून बाहेर फेकला, बाहेर फेकलेला तो तुकडा एका कारच्या टायरमध्ये शिरला व कारचा अपघात झाला. म्हणूनच गर्दी झाली, गर्दीत एक माणूस सिगारेट फुंकतो, गर्दीत एक लहान मुलगा रस्त्याच्या मधोमध जातो, पुढून ट्रक येते, ट्रक खाली कोसळते आणि लिक होते, रॉकेलचा संपर्क सिगारेट सोबत होतो आणि हा अपघात होतो.
हे पूर्ण बघितल्यावर वैभव अगदी शॉक होतो.
अनु, "बघितलास?, मी जर ते लेटर ठेवले नसते, तर हा एवढा मोठा अपघात झालाच नसता. पूर्ण माझीच चुकी आहे, माझ्यामुळेच एवढ्यांचे प्राण गेले.., पण तु मला फोन वर लेटर नको ठेऊ म्हणून का सांगत होतास?, तुला आधीच ठाऊक होते काय, असे होणार आहे म्हणून?"
वैभव, "खरंतर होय!, म्हणजे मी इथला नाही.., म्हणजे मी भविष्यातून आलेलो आहे, म्हणून मला हे आधीच ठाऊक होते, पण तू हे स्वतःवर नको घेऊस, हे सर्व योगायोगाने झालंय, ह्याला बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात, ह्यात तुझी काहीही चूक नाही. "
अनु, "तू भविष्यातून आला आहेस?, मग तू ह्या घटनेला थांबविलास का नाही?, तुला आधीच ठाऊक होते ना?, मग असे घडू का दिलेस?"
वैभव, "मी जरीही भविष्यातून आलेलो असलो तरी मी माझा भूतकाळ बदलवू शकत नाही, जे व्हायचं आहे ते होणारच आहे. असाच घटनाक्रम मी माझ्या भूतकाळात बघितला होता, पण त्यावेळेस ह्याची कारणीभूत त्या भूतकाळातील अनु होती, म्हणजे त्या वेळेस तू आतंकवादी होतीस, त्या काळातील अनुचे आणि माझे भांडण झाले होते, कारण मला कळले होते की, ती अनु आतंकवादी बनली आहे, तेव्हाच तिला ऑर्डर येतो की, एक मोठा विस्फोट घडवून आण, म्हणून ती मुद्दाम एका कारचे अपघात घडवून आणते, व एका अश्याच ट्रकला पाडून आणि त्याचा स्फोट घडवून आणला होता, तेव्हाही एवढेच लोक मरण पावले होते. म्हणून मी तो घटनाक्रम बद्दलविण्यासाठी इथल्या वैभवला किडण्याप केले, म्हणजे तुमच्या दोघांचे भांडण होणार नाही, आणि हा मोठा विस्फोट घडणार नाही. पण इथे आल्यानंतर समजले की, तू आतंकवादी नाहीयेस. पूर्ण टाइमलाईन चेंज झाली म्हणजे विस्फोट चुकता कामा नये आणि हा अपघात व्हायलाच हवे म्हणून तुला आतांकवादीचे टॅग दिले नाही आणि शेवटी बटरफ्लाय इफेक्ट द्वारे का होईना, पण अपघात झालाच. म्हणजे जे व्हायचे ते झालेच, ह्याला कुणीच बदलवू शकत नाही. पण मला हे नाही समजले, की तुला हा व्हिडीओ मिळालाच कसा?, म्हणजे त्या स्फोटात पूर्ण जळून बेचिराख झाले होते ना?, मग हा व्हिडीओ?"
अनु(मोठमोठ्याने हसत), "म्हणजे मी आता ऑफिसीयली टेरेरिस्ट?, वाह!, माझे स्वप्न शेवटी साकार झालेच, माझा पहिला मिशन सक्सेस.., तुला काय वाटलं?, मी साधी मुलगी आहे?, नाही... मी आधीपासूनच टेरेरिस्ट आहे, आता हा विस्फोट घडवून मी स्वतःला सिद्धही केले, माझा बॉस माझ्यावर खूप आनंदी होईल, यस!.."
वैभव, "व्हॉट?, हाऊ इज दिस पोसीबल?, तू टेरेरिस्ट तर नंतर बनतेस ना?, आणि मी माझ्या वेळेच्या अनुला म्हणजे भविष्यातील अनुला ठार केले, जेणेकरून ती ह्या टाइमलाईन मध्ये म्हणजे भूतकाळात येऊन मला अपघात घडायचे थांबवायला येऊ नये म्हणून.., पण तुला ठाऊकच कसे की, बटरफ्लाय इफेक्ट घडणारच आणि तू सक्सेस होणारच म्हणून?
"अनु, "तू जरी शहाणा असलास तरी मी तुझ्यापेक्षा देड शहाणी आहे. मी पण ह्या टाइमलाईन मधली नाही. इथली टाइमलाईन मधली अनु तर मेली!, म्हणजे तिला मीच मारले, तिला मारता येत न्हवते, कारण जसे आपण भविष्यात किंवा भूतकाळात जाऊन कुणाला हानी पोहोचवू शकत नाही किंवा घटना घडवू किंवा बदलू शकत नाही, तसे मी पण ह्या टाइमलाईन मधल्या अनुला मारू शकत न्हवती, कारण मी वेगळ्या टाइमलाईन मधून आहे, म्हणजे मी भूतकाळातुन आलेली आहे.
वैभव, "मग इथल्या अनुला मारलीस असे?"
अनु, "तिला बटरफ्लाय इफेक्ट ने मारले, आणि बटरफ्लाय इफेक्टबद्दल मला कुणी सांगितले ठाऊक आहे काय?, तुझ्या वेळेच्या अनुने, म्हणजेच तुझ्या टाइमलाईन मधल्या अनुने. ती मरण्याआधी, शेवटच्या क्षणी माझ्याजवळ आली, आणि तिने मला पूर्ण प्लॅन सांगितला, आणि बटरफ्लाय इफेक्ट बद्दलही सांगितले की, आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात स्वतःहुन काही करू शकत नाही, पण बटरफ्लाय इफेक्ट ने काहीही करू शकतो, आणि कुणालाही संशय येणार नाही, प्रकृतीला ही नाही, म्हणजे मी सफल ठरले..."
वैभव, "मला खूप कॅफ्युज होत आहे, म्हणजे तू ह्या टाइमलाईन मधली नाही.., एक मिनिट, मी जरा सोपं करतो, समजा सध्या आपण वर्तमान काळात आहोत. तर तू भूतकाळातली, आणि मी भविष्यकाळातला.., म्हणजे भविष्यकाळातली अनु भूतकाळात म्हणजे तुझ्या काळात तुला येऊन सांगितली की, असे घडवायचे, तू मग ह्या काळात म्हणजे वर्तमानकाळात आलीस, आणि वर्तमानकाळातल्या अनुला ठार केलीस, तिची जागा तू घेतलीस, रेस्टॉरंट मध्ये असे घडविले, आणि तुला असे वाटत आहे की तू तुझ्या प्लॅन मध्ये सक्सेस झालीस? (मोठ्याने हसून), मुळीच नाही...
आता माझा प्लॅन ऐक, मी तुला मारू शकत नाही, तू मला मारू शकत नाही, हे तर मानतेस ना?, कारण आपण वेगवेगळ्या टाइमलाईन मधून आलोय. मी माझ्या टाइमलाईन मधल्या अनुला म्हणजे भविष्यकाळातल्या अनुला ठार मारले, तू वर्तमान काळातल्या अनुला ठार केलीस, आता शिल्लक आहेस फक्त तू, जर तुला ठार केले, तर आत्तापर्यंत जे काही घडले ते काहीच घडणार नाही, कारण तू भूतकाळातली आहेस, तुझे पूर्ण अस्तित्व मिटून जाणार, ना रहेगा बाझ, ना बजेगी बासुरी..., म्हणजे माझा विजय पक्का...(मोठ्याने हसत)"
अनु, "पण असे शक्यच नाही, कारण तू मला मारू शकतच नाही, कारण दोघेही वेगवेगळ्या टाइम लाईनचे..."
वैभव, "तू विसरत आहेस की, तू वर्तमान काळात आली आहेस, म्हणजे तुझ्या भविष्यकाळात आणि म्हणजे माझ्या वर्तमानकाळात, आणि माझ्या वर्तमानकाळातला वैभव अजून जिवंत आहे, आणि त्याचा काळ असल्याने तो काहीही करू शकतो.., तुझा गेम खल्लास.., (मोठ्याने ओरडून) वैभव..., (बाहेरून वैभव आला), ठार कर हिला..."
वर्तमान काळातील वैभवने बंदूक काढली आणि तिला ठार केले, म्हणजे अनुचे पूर्ण अस्तित्व मिटले, वैभव परत आपल्या काळात गेला. तिथे कुठलाही प्रकार घडलेला आढळला नाही. म्हणजे तो अपघात घडला नाही.., म्हणजे वैभव जिंकला...
समाप्त...
(काही समजली की नाही कथा?,😅, समजली नसेल तर पुन्हा एकदा वाचा नक्की समजेल... माझ्या काही चूका झाल्या असतील तर नक्कीच सांगा, टाइमलाईन बद्दल..आणि कॉमेंट नक्कीच लिहा, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं वाचताना आणि शेवटी काय वाटलं, सारच लिहा कॅमेन्ट मध्ये...)
उत्कर्ष दुर्योधन लिखित...