गहिर पाणी...१ Anuja Kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गहिर पाणी...१

गहिर पाणी...

समोर अथांग निळाशार समुद्र.. नजर जाईल तिथ पर्यंत पाणीच पाणी.. समोर मावळणारा सूर्य... झोंबर वार सुटल होत... इतक्या सुंदर वातावरणात आरव एकटाच किनाऱ्यावर फिरत होता.. वेळच भान त्याला न्हवतच! अंधार पडला..गर्दी हळू हळू ओसरायला लागली... गर्दीतल्या एका माणसानी आरव ला सांगितलं,

“साहेब..अंधार पडल्यावर थांबू नका हिथ... म्या ऐकलय इथे रात्रीची भूतं येतात..”

आरव नी त्या माणसाच बोलण ऐकल पण त्याच्या बोलण्याला जास्ती महत्व न देता तो परत विचारात गुंग झाला.... आणि रेती तुडवत चालत राहिला. तो विचारात परत गुंगला.. आरव ला धोक्याची सूचना देऊन तो माणूस तिथून जायला लागला.. तो माणूस खूप गडबडीत होता आणि तिथे एकही क्षण थांबला नाही.. आणि लगबगीनी तिथून निघून गेला आणि आणि समुद्र किनाऱ्यावर तो एकटाच फिरत होता... विचारात गुंग... आजुबाजूच भान न्हवत त्याला...शेवटी तो दमला आणि पांढऱ्या शुभ्र रेतीवर बसला... तेव्हा लाटांच्या आवाजानी तो भानावर आला....

“इतका वेळ उलटून गेला.. आणि मला कळल पण नाही? कुठे हरवलो होतो इतक्या वेळ? माझ्या मनातून नेहा जात का नाहीये? आणि त्या माणसानी मला घाबरवायला सांगितलं कि इथे रात्री भूत येतात? उगाच अंधश्रद्धा वाढवायचे प्रकार!!! असो! मी नाही घाबरत भूतांना!! आणि माझा भूत असतात ह्या गोष्टीवर विश्वास सुद्धा नाही!” आरव स्वतःशीच बोलत हसत होता! त्याला बरेच प्रश्न पडले होते पण त्याच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं न्हवती म्हणून तसाच स्तब्ध बसून राहिला.. त्याला शांत बसायचं होत पण तेव्हाच त्या अनोळखी माणसानी मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. आरव शांत राहायचा प्रयत्न करत होता. जरा वेळानी तो शांत झाला सुद्धा! समुद्र भयानक दिसत होता. त्यानी चहुबाजूला नजर फिरवली.. रात्र गडद व्हायला लागली होती! चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. त्याला झोप यायला लागली होती म्हणून तो हॉटेल वर जाऊ असा विचार करत होता. तितक्यात त्याला समोरून चालत येणारी एक तरुणी दिसली... अंधार असल्यामुळे त्याला तिचा चेहरा नीट दिसला नाही पण ती २०-२२ वर्ष्याची तरुणीच आहे असा अंदाज आरव नी लावला.. आरव ला वाटल ती मुलगी त्याच्याशी येऊन बोलेल म्हणून आरव ती मुलगी त्याच्यापाशी येण्याची वाट पाहत राहिला... पण ती तरुणी त्याच्याजवळ आलीच नाही.. त्याला कळायच्या आतच ती मुलगी अंधारात कुठेतरी हरवून गेली. आरव चे डोळे त्या मुलीचा शोध घेत होते पण ती त्याच्या दृष्टीच्या पल्याड गेली होती. आरव चे डोळे तिचा शोध घेत राहिले.. बऱ्याच वेळ त्यानी त्या मुलीला शोधायचा प्रयत्न देखील केला पण त्याला यश आल नाही. त्याच्या मनातून टी मुलगी अजिबात जात न्हवती. तो त्या तरुणीचाच विचार करत होता.... हॉटेल मध्ये गेला पण ती मुलगी आरव च्या विचारातून जातच न्हवती... तिचा विचार करता करता च आरव ला झोप लागली. तो झोपून गेला..

दुसऱ्या दिवस उजाडला.. त्या दिवशी घडाळ्या चे काटे तर जास्तीच वेगाने फिरत होते. बघता बघता संध्याकाळ झाली. आणि आरव चे पाय परत समुद्र किनार्याच्या दिशेने जायला लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आरव समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसला... सुट्टीचे दिवस न्हवते तरी समुद्र किनाऱ्यावर बरीच वर्दळ होती पण आरव मात्र एकटाच होता! त्याला त्या गर्दी बद्दल काही वाटत न्हवत. तो स्वताच्याच विचारात मग्न होता. तो एकटाच बसला होता! ओळखीच कोणी नाही कि बोलायला कोणी नाही... आरव ला एकटेपणा आवडायचा पण त्या दिवशी मात्र एकटेपणा त्याला नकोसा वाटत होता.... त्याची नजर काल दिसलेल्या मुलीला शोधात होती. त्यादिवशी पण ती मुलगी त्याला कुठेच दिसली न्हवती. आरव किती तरी वेळ एकटाच किनाऱ्यावर बसून राहिला होता... अंधार हळू हळू गडद व्हायला लागला आणि परत तो किनाऱ्यावर एकटाच राहिला... किनाऱ्यावर मनुष्याची हालचाल जाणवेनाशी झाली..... त्यानी चहुबाजूला नजर टाकली.. अंधारच साम्राज्य पसरलं होता...आणि समुद्राची गाज ऐकू येत होती! इतक्या वेळ वात पाहून सुद्धा ती मुलगी आपल्याला दिसली नाही म्हणजे आता सुद्धा ती दिसणार नाही अश्या विचारात तो होता. त्याला काल दिसलेली मुलगी परत दिसेल अशी काडीमात्र आशा न्हवती तेव्हाच ती मुलगी त्याला परत दिसली... अंधारामुळे तिचा चेहरा दिसत न्हवता पण ती सुंदर आहे अशी खात्री आरव ला होती.. आरव तिच्याकडेच पाहत होता.. ती धावत धावत समुद्रात आत आत जात होती... क्षणभर आरव घाबरला.. त्याला जाणीव झाली कि ती मुलगी समुद्रात जाऊन आत्महत्या करायच्या विचारात आहे. अशी जाणीव झाल्या झाल्या तो तिच्याकडे धावायला लागला... त्याला त्या मुलीचे प्राण वाचवायचे होते! आपल्या डोळ्यासमोर कोणी आत्महत्या करताय हि गोष्ट त्याला सहन होत न्हवती. आरव समुद्राच्या दिशेनी धावला पण त्याक्षणीच ती मुलगी पाण्यातून बाहेर यायला लागली...आरवला काही कळायच्या आधीच ती थेट आरव जवळ आली! आरव ला तिच्याशी बोलायचं होत पण त्या मुलीनी आरव ला काही बोलायची संधी दिलीच नाही. वेळ न दवडता ती बोलली,

“हेलो..मला प्लीज किती वाजलेत सांगता का? अंधारावरून खूप रात्री झाली असेल असा मला अंदाज आलाय पण मला खरे किती वाजलेत ते हवाय... घाई घाई मध्ये मी घड्याळ घालायलाच विसरले आणि समुद्र किनाऱ्यावर मोबाईल कशाला म्हणून मोबाईल पण आणला नाहीये..” शांतता भंग होत होती. आरव ला तिच्या धापेचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता...ती घाबरली आहे हे आरव च्या लक्षात आल.. आपण घाबरलो आहोत हे लपवायचा प्रयत्न ती मुलगी करत होती! पण आरव नी ओळखल होत कि ती मुलगी घाबरली आहे.

“हेलो... आता ना... ११ वाजलेत! तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय? रस्ता चुकला आहे का? मी काही मदत करू?” आरव नी सुद्धा प्रश्नाला उत्तर दिल! खर तर,आरव नी तिच्या कडून अश्या प्रश्नाची अपेक्षा केलीच न्हवती. त्याला वाटल होत ती मुलगी घाबरली असेल. तिला सांत्वनाची गरज असेल. पण तस काहीच झाल नाही.

“रस्ता चुकले का? अ.. अ..." ती मुलगी एकदम शांत झाली... जरा वेळानी बोलली, "नाही.. रस्ता नाही चुकले!” सारवासारव करत ती मुलगी बोलली. ती मुलगी घाबरली आहे ही गोष्ट आरव च्या लक्षात आली होती. त्याला तिच्या धापा ला नीट ऐकू येत होत्या.

“रस्ता नाही चुकलात ना मग ठीके... पण धावत का आलात? तुम्हाला द्यायला माझ्याकडे पाणी सुद्धा नाहीये!"

"नाही.. मला पाणी नकोय! मी ठीक आहे!"

"ओके.. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू?” आरव म्हणाला..

“विचारा कि... आणि मला प्लीज अहो संबोधू नका... मी इतकी मोठी दिसते का?” ती मुलगी जरा शांत झाल्यासारखी वाटली. तिच्या जीवात जीव आला आहे हे आरव ला जाणवलं..

“हाहा... तुम्ही मोठ्या दिसत नाही पण मी अनोळखी लोकांशी लगेच अरे तुरे नी सुरवात करत नाही... बर,मला सांगा,आत्ता इतक्या रात्री समुद्र किनाऱ्यावर एकट्या काय करताय? इतक्या रात्री सेफ नसत समुद्र किनारी एकटी मुलगी फिरत असण..” आरव नी लगेचच काय हेतू नी ती मुलगी समुद्रात जात होती ते विचारायचं टाळल.

"अ...." त्या मुलीनी अडखळत बोलायचं प्रयत्न केला पण ती काही बोलू शकली नाही.. तिला जाणीव झाली कि बहुदा आपल्याला आत्महत्या करायला जातांना जातांना त्याने पाहिलं आहे.

“म्हणजे तुम्हाला ते सांगायचं नसेल तर सांगू नका... पण मी एक सांगतो! फुकटचा सल्ला देतोय पण तो गरजेचा आहे सो सांगतोय! एकटी मुळीच अस रात्री समुद्र किनाऱ्यावर फिरत जाऊ नका... रात्री अस फिरणं धोकादायक असू शकत म्हणून फक्त विचारलं एकट्या का आहात! इथे दारू पिऊन लोकं येतात रात्री... उगाच तुम्हाला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी बऱ्याच वेळा असा रात्री समुद्र किनाऱ्यावर हिंडत असतो.. कधी कुणी भेटलं तर त्यांची चौकशी करतो फक्त त्याच्या सुरक्षिततेसाठी.. आणि तुम्ही समुद्राच्या आट का जात होतात? मला ती गोष्ट विचित्रच वाटली. मला शंका आली कि...” आरव तिथेच थांबला.. त्यानी पुढच बोलण टाळल. पण ती मुलगी आरव च बोलण ऐकून जरा घाबरलीच. तिनी आरव ला काय सांगायचं असा विचार चालू केला. चोरी पकडली गेली कि जशी अवस्था होते तशीच अवस्था त्या मुलीची झाली होती. ती मनाविरुद्ध पण बोलायला लागली.

“सांगायचं नाही अस काही नाही... पण तुम्हाला विचित्र वाटेल.. तुम्हाला कदाचित अस वाटेल मी किती विक आहे. मला माझ्याबद्दल लोकांनी असा विचार केलेला अजिबात आवडत नाही. म्हणून सांगण टाळल.. म्हणजे आपण एकमेकांना ओळखतही नाही.. आणि एकदम कस सगळ सांगायचं अस वाटल!” ती मुलगी घाबरलेलीच होती..

"तुम्ही मला सांगू शकता.. आपण अनोळखी असलो तरी अनोळखी लोकं सुद्धा मदत करतात. म्हणजे तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी नक्की करू शकतो. आणि हो, तुम्हाला सांगावस वाटल तरच!"

“थॅंक्यू... तुमच्याशी बोलून बर वाटल.. मी जे सांगेन ते ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल.."

"तुम्ही सांगा तर खर.. "

"ओके.. प्लीज शांतपणे ऐका!" ती मुलगी म्हणाली.."मी समुद्रात आत्महत्या करायच्या इराद्यानी आले होते.. मी समुद्रात आत आत जात होते पण त्या क्षणी मला भीती नी घेरल आणि मी धावत बाहेर आले...तेव्हा मला तुम्ही दिसलात...आणि जरा हायस वाटल... खर तर मी पूर्ण हिम्मातिनी समुद्रात जात होते पण आत्महत्या करायला सुद्धा हिम्मत लागते. आयत्या वेळी मी घाबरले आणि बाहेर निघून आले. मी पूर्ण किनारा पहिला पण तुमच्याशिवाय कोणीच न्हवत. मी भयंकर घाबरले होते. मला तुमच्याशी येऊन बोलावस वाटल.. म्हणून मी तुमच्याकडे आले.” त्या मुलीनी एका दमात त्या अनोळखी मुलासामोर मन मोकळ केल... आणि ती मुलगी रडायला लागली..

“काय?" अर्णव किंचाळला... त्याचा आवाज जणू घुमंत राहिला... "तुम्ही आत्महत्या करायच्या विचारात होतात? मला वाटलच होत तुम्ही आत्महत्या करण्यासाठीच समुद्रात जाताय.. मला जेव्हा ते जाणवलं तेव्हा मी सुद्धा तुम्हाला मागे आणण्यासाठी येत होतो पण तेव्हा तुम्हीच उलट्या फिरला होतात. आणि आत्महत्या का करावीशी वाटली तुम्हाला? हा भयंकर मोठा गुन्हा आहे! तुम्ही शिकलेल्या दिसताय. म्हणजे तुम्हाला माहित असेलच." आरव ला जाणवलं आपण काय बोलतोय... "ते नंतर बघू, आधी मला सांगा! आता तुम्ही कश्या आहात? म्हणजे अजूनही तुम्हाला तसच वाटत आहे का? अजूनही तुमच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत? आणि बर झाल मी इथे होतो... आधी तुम्ही शांत व्हा.. मग बोलू सविस्तर...”

“ओके..." ती मुलगी आरव च्या बोलण्यानी जरा सावरली. "मी शांत होते! मग सांगते सविस्तर!” ती मुलगी बोलली.. ती थोडी शांत व्हायला लागली होती. चंद्राच्या प्रकाशात कितीतरी वेळ दोघ पांढऱ्या शुभ्र रेतीवर बसून राहिले.. आरवनीही शांतता भंग केली नाही.. तो त्या मुलीनी बोलायची वाट पाहत होता..जरा वेळानी ती मुलगी रडायची थांबली आणि एकदमच शांत झाली... आणि ती मुलगी तुटक पण बोलायला लागली

“हेलो...मी इरीका! तुमच नाव काय? आज तुम्ही होतात म्हणून मला खूप आधार मिळाला.."

“हाय... मी आरव! आणि डोंट बी फोर्मल इरिका! मी योगायोगानी इथे होतो आणि तुम्हाला मदत झाली मला आनंदच आहे! कोणी आत्महत्या करू नये असच मला नेहमी वाटत.. आता सांगा, तुम्ही आत्महत्या का करणार होतात? म्हणजे कारण काय होत? इतका टोकाचा निर्णय का घ्यावासा वाटला तुम्हाला?” आरव हे बोलला पण इरिका नी काहीच उत्तर दिल नाही.

परत जरा वेळ इरीका शांत बसून राहिली... जरा वेळ विचार करून ती बोलायला लागली...

“माझ एका मुलावर प्रेम आहे.. आम्ही दोघांनी इथे पळून येऊन लग्न करायचं ठरवलं होत.." शांतता भंग करत इरिका बोलायला लागली, "आम्ही दोघे वेगवेगळे इथे येणार होतो आणि इथे भेटून मग लग्न करणार होतो. पण तो आलाच नाही! मी १ आठवडा त्याची रोज वाट पाहती आहे इथे समुद्र किनाऱ्यावर पण तो आलाच नाही... मी घरी काही न सांगता पळून आलीये... माझे बाबा फार कडक आहेत आणि त्यांच्या मनाविरुद्ध मी हे लग्न करू शकले नसते म्हणून पळून आले... आता घरी परत गेले तर बाबा घरात घेणार नाहीत... आणि माझा प्रियकर आलाच नाही.. माझ्या समोर अजून काहीच पर्याय उरला नाहीये. जगायची आशा राहिलीच नाहीये म्हणून मी आत्महत्या करायला इथे आले होते.. पण मी आमहत्या करू शकले नाही...” एका श्वासात इतक बोलून झाल्यावर तिचा परत रडू फुटलं आणि ती रडायला लागली..

“ओह.. मला शंका आलीच होती कि तुम्ही आत्महत्या करण्याच्या बेतात आहात! म्हणूनच मी तुमच्याकडे धावत येत होतो पण त्या आधीच तुम्ही उलट्या फिरलात आणि माझ्याकडे आलात! इरीका.. अस बऱ्याच वेळा होत! कोणाकडून फासावलो गेलो आहोत म्हणून आयुष्य संपवाव वाटत. ते फार काही वेगळ नाहीये! तुम्ही रडू नका! घाबरुही नका! शांत होऊन ऐका,लगेच घरी जाऊ नका.. बाबा शांत होतील काही दिवसांनी..मग घरी जावा! तुम्ही आत्ता तुमच्या रूम मध्ये जाऊ नका... परत आत्महत्या करायला गेलात तर...त्यापेक्षा मी इथेच जवळ एका हॉटेल मध्ये राहतोय... रूम मोठी आहे आणि मी एकटाच! तुम्ही माझ्याबरोबर राहू शकाल...तुम्हाला माझ्यापासून काही धोका नाहीये! विश्वास ठेवा.”

आरव च अस बोलण ऐकून इरिका ला काय बोलाव सुचेना. ती आधीच झालेल्या प्रकारामुळे बावचळली असल्यामुळे तिला आरव ची बोलण पटल.. तिला अचानक कोणाचा तरी आधार मिळाला होता. अगदी अनपेक्षितपणे. त्यामुळे जास्ती विचार इरिका नी केलाच नाही आणि ती त्याच्या बरोबर हॉटेल मध्ये जायला तयार झाली..

“थॅंक्यू सो मच! तुम्ही होतात म्हणून मला आधार मिळाला! नाहीतर मी काय केल असत मला नाही माहित! आणि किनाऱ्यावर अजून कोणीच न्हवत ज्यांनी माझी मदत केली असती. तुमचे खूप उपकार झाले. हे उपकार कसे फेडेन माहित नाही मला..."

"उपकार समजू नका.. मी लोकांना मदत करण्यासाठीच इतक्या रात्री पर्यंत किनाऱ्या वर थांबतो. मी काही फार ग्रेट केल नाहीये ते माझ कर्तव्य होत!! आता जायचं माझ्या हॉटेल वर?" आरव बोलला...

"हो चालेल....मी आत्ता तुमच्या बरोबर तुमच्या हॉटेल मध्ये येते! पण माझ सामान दुसऱ्या हॉटेल मध्ये आहे! ते कधी आणू?.. माझ समान महत्वाच आहे! अजून कोणाला त्यातल काही मिळून उपयोग नाही. आणि माझा मोबाईल पण तिथेच राहलाय... मी माझ्या प्रियकराला भेटण्याच्या गडबडीत हॉटेल मधेच विसरले बहुदा! कोण जाणे तो फोन करत असेल...”

“तुम्हाला खरच वाटतंय तो तुम्हाला फोन करत असेल? आणि आत्ताच सामान आणायला हव आहे? आज रात्री माझ्याबरोबर माझ्या रूम मध्ये राहा आणि उद्या सामान घेऊ आणि पुढे काय करायचं ते बघू.. बाय द वे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? खात्री वाटत असेल तरच या माझ्याबरोबर...”

“नको.. माझ सामान घेऊन जाऊ! प्लीज... मोबाईल शिवाय मला राहता येत नाही! आणि तुमच्यावर विश्वास आहे. माझा बॉय फ्रेंड जसा वागला त्यानी मला खूप मनस्ताप झालाय. आणि आता मी जास्ती विचार करत नाही...मी माझ्या बॉय फ्रेंड वर विश्वास ठेवला पण त्यानी मला फसवलच.. मला गरज होती तेव्हा तो न्ह्ववता..तुमच्याशी बोलून मला आधार वाटला.. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे... आता मी तुम्हाला तू म्हणू? आणि तू पण मला तूच म्हण.”

दोघ बोलत बोलत चालत होते. बोलता बोलता चालत असल्यामुळे आरव कुठे जातोय हे पण त्याच्या लक्षात येत न्हवता.

“ओके! नो प्रोब्लेम! तुम्ही मला तू म्हणा.. आणि मी पण तुला तू म्हणतो! आता झालेल्या गोष्टीचा विचार नको करूस इरिका! बाय दवे, सांगायचं राहील,गुड टू नो यु ट्रस्ट मी..चला आपण तुमच्या हॉटेल वर जाऊन सामान आणू....”

“एक मिनिट, एक विचारू का?”

“हो विचार कि... तुम्ही इतक्या रात्री समुद्र किनाऱ्यावर एकटा काय करत होतात?”

“सांगतो... मी दर वर्षी १ महिना इथे येतो ...स्वतासाठी निवांत वेळ काढायला....गेली काही वर्ष येत होतो पण मागच्या वर्षी यायला जमल नाही....पण आता निवांतच आहे... जितके दिवस वाटेल तितके दिवस राहणार इथे.. आणि गरजू लोकांना मदत करतो...माझ आवडत काम आहे”

-------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.