बारा जोतीर्लींगे

(28)
  • 177.8k
  • 23
  • 71.7k

बारा जोतीर्लींगे भाग १ शिव हे हिंदू धर्मातील देवांचे देव आहेत . तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली आहे. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाचे ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत आणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. 'शिव' हे संपूर्ण सृष्टीचे करता - धरता आहेत. हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांचे ते देव' मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली

Full Novel

1

बारा जोतीर्लींगे

बारा जोतीर्लींगे भाग १ शिव हे हिंदू धर्मातील देवांचे देव आहेत . तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न आहे. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाचे ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत आणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. ''शिव' हे संपूर्ण सृष्टीचे करता - धरता आहेत. हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांचे ते देव' मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली ...अजून वाचा

2

बारा जोतीर्लींगे भाग २

बारा जोतिर्लिंग भाग २ सौराष्ट्रातील सोमनाथ शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वांत पवित्र तीर्थ मानलं जातं ते सोमनाथ. सोमनाथचं विधीप्रमाणे दर्शन घेऊनच पुढील ज्योतिर्लिंगं पाहावीत असा संकेत आहे. हे मंदिर १६ वेळा उध्वस्त करण्यात आलं होतं व परत बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. गुजरातमध्ये सौराष्ट्रात वेरावळ बंदरावर वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे एक महत्त्वपूर्ण हिंदू मंदिर आहे देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमद् भागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. सर्व ज्योतिर्लिगातून सोमनाथ येथील मंदिराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात दररोज ...अजून वाचा

3

बारा जोतिर्लिंग भाग ३

बारा जोतिर्लिंग भाग ३ श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. आंध्र प्रदेशातील जिल्ह्यात हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे. असे मानतात की येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी ...अजून वाचा

4

बारा जोतिर्लिंग भाग ४

बारा जोतीर्लींग भाग ४ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे,व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते. येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिण दिशेस प्रिय नंदी स्थापित केले आहे. महाकालेश्वर मंदिर एका ...अजून वाचा

5

बारा जोतिर्लिंग भाग ५

बारा जोतिर्लिंग भाग ५ नर्मदेच्या डोंगरावरील ओमकारेश्वर -अमलेश्वर भारतातील बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेले ‘ओंकारेश्वर’ हे ज्योतिर्लिग मध्य नर्मदा नदीच्या किना-यावर आहे. नर्मदा व कावेरी या दोन नद्यांच्या मध्ये दीड किलोंमीटरचे बेट तयार झाले असून ते ॐ आकाराचे आहे. मांधावा नावाच्या पर्वतावर दोन मंदिरे असून त्यापैकी एक ओंकारेश्वर आणि दुसरे अमलेश्वर या नावाने ओळखले जाते. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थाने आहेत. दुसरे ॐकार या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असे म्हणतात. ...अजून वाचा

6

बारा जोतिर्लिंग भाग ६

बारा जोतिर्लिंग भाग ६ परळी वैद्यनाथ परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेचे एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. ब्रम्हा ,वेणू आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतो . हेमाडपंथी शैलीतले हे चिरेबंदी मंदिर तीन घाट,दगडी दीपमाळ,सभामंडप ,तीन गर्भगृहे व दोन नंदी या समावेत वसले आहे.हे मंदिर शाळीग्राम शीळेचे आहे ,व एका टेकडीवर आहे . याच्या शिखरावर प्राणी व देव देवतांची शिल्पे आहेत . बाजूला अकरा ...अजून वाचा

7

बारा जोतिर्लिंग भाग ७

बारा जोतिर्लिंग भाग ७ भीमाशंकर हे जोतिर्लिंग पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. या जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू,म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी सुद्धा येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय ...अजून वाचा

8

बारा जोतिर्लिंग भाग ८

बारा जोतिर्लिंग भाग ८ रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. या बेटालाच पंबन बेट म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे. हे श्रीलंका आणि तमिळनाडू यांच्यामधील मन्नारच्या आखातात येते. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती. सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध ...अजून वाचा

9

बारा जोतीर्लींग भाग ९

बारा जोतिर्लिंग भाग ९ औंढा नागनाथ हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक संतान ' या नावाने ओळखल्या जाणार्‍या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता. भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्‍या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात ...अजून वाचा

10

बारा जोतिर्लिंग भाग १०

बारा जोतिर्लिंग भाग १० काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसीत विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतूबूद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात ...अजून वाचा

11

बारा जोतिर्लिंग भाग ११

बारा जोतिर्लिंग भाग ११ त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र– नाशिक) त्र्यंबकेश्वर हे शहर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या पर्वताच्या पायथ्याशी आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे हे ठिकाण शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असुन ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर यानांवाने प्रसिद्धआहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टय म्हणजे या लिंगात ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे तीन देव असल्याचे समजले जाते, म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते. हेमाडपंती पध्द्तीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला हे ही या मंदिराचे वैशिष्टच आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बारा ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. येथील ...अजून वाचा

12

बारा जोतिर्लिंग भाग १२

बारा जोतिर्लिंग भाग १२ त्र्यंबकेश्वर हे स्थळ द्वीपकल्पातील भारतातील सर्वात लांब नदी असलेल्या गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून देखील ओळखले जाते. धर्मात गोदावरी नदी पवित्र मानली जाते. तीर्थराज कुशावर्त हे गोदावरी नदीचे प्रतीकात्मक मूळ मानले जाते आणि हिंदूंनी ते पवित्र स्नानासाठी पूजले आहे. त्र्यंबकेश्वर येथे काही धार्मिक पूजा केल्या जातात . भक्तांची श्रद्धा असते की अशा पुजा येथे केल्यास त्यांचे योग्य ते फळ प्राप्त होते या पूजा म्हणजे नारायण नागबली, कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राध्द या सर्वांची थोडक्यात माहीती अशा प्रकारे आहे .. नारायण नागबली या दोन पद्धती मानवाच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केल्या जातात, म्हणूनच या दोन पद्धतींना कामयु म्हणतात. ...अजून वाचा

13

बारा जोतिर्लिंग भाग १३

बारा जोतिर्लिंग भाग १३ केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडव वंशाचा राजा जनमेजय याने केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असुन येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. ...अजून वाचा

14

बारा जोतिर्लिंग भाग १४

बारा जोतिर्लिंग भाग १४ केदारनाथ याच्या अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील पंचकेदार ची कथा अशी सांगितली जाते.. महाभारत विजयी झाल्यावर पांडवाना भ्रातृहत्या च्या पापातून मुक्ति पाहीजे होती . यासाठी त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवायचा होता पण शंकर तर त्यांच्यावर रुसलेले होते . भगवान शंकरांच्या दर्शनासाठी पांडव काशीला गेले पण तिथे शंकर त्यांना भेटले नाहीत . ते सर्व त्यांना शोधत शोधत हिमालयात येऊन पोचले . भगवान शंकरांना पांडवांना दर्शन द्यायचेच नव्हते म्हणुन ते अदृश्य होऊन ते केदारला जाऊन राहिले. दुसरीकडे पांडवपण जिद्दीचे पक्के होते ते त्यांच्या मागोमाग केदारला गेले भगवान शंकरांनी तोपर्यंत बैलाचे रूप धारण केले आणि ते अन्य पशुत ...अजून वाचा

15

बारा जोतिर्लिंग भाग १५

बारा जोतिर्लिंग भाग १५ केदारनाथच्या माहितीसोबत तेथे २०१३ साली आलेल्या भयंकर आपत्ती बाबत माहिती घेणे संयुक्तिक ठरेल . २०१३ केदारनाथ समवेत उत्तराखंड मध्ये आलेले हे संकट हिमालयाच्या इतिहासात सर्वात भयानक म्हणावी लागेल . ही प्राकृतिक आपत्ती कशामुळे आली हे कोणालाच त्यावेळी समजु शकले नाही . बरेचसे कयास केले गेले पण नक्की कारण समजुन आलेच नाही . अगदी त्यावेळेस उपस्थित असेलेले प्रत्यक्षदर्शी लोक असोत अथवा देशातले नामवंत इतिहासकार, वैज्ञानिक, भूगर्भशास्त्री किंवा आपत्तीविशेषज्ञ सुद्धा त्याचा बारकाईने अभ्यास करून देखील एका विशिष्ट कारणा पर्यंत पोचू शकलेले नाहीत . त्या वेळेस केदारनाथच नव्हे तर नदीच्या प्रवाहासोबत पुढे ढकलल्या जाणाऱ्या रामबाड़ा, गौरीकुंड, सोनप्रयाग, चंद्रापुरी, ...अजून वाचा

16

बारा जोतिर्लिंग भाग १६

बारा जोतिर्लिंग भाग १६ सकाळी 7 वाजायच्या सुमारास एक ज़ोरदार आवाज़ ऐकु आला जणु काही एखादा पहाड तुटून पडला आणि मग केदारनाथ मंदिरात जोरदार पाण्याचे लोट येऊ लागले आणि पाण्याची पातळी वाढू लागली . ही विनाश लीला 20-25 मिनटा पेक्षा जास्त वेळ चालला नसेल ,पण तो काळ आत अडकलेल्या लोकांना जणु काही कित्येक तासासारखा वाटला . आत आलेले पाणी आपल्यासोबत विशालकाय दगड घेऊन आले होते . भूगर्भशास्त्र जाणकारांच्या भाषेत मोठ्या दगडांना बोल्डर आणि खुप मोठ्या दगडांना ब्लॉक म्हणले जाते . या परिभाषेनुसार अर्ध्यापेक्षा अधिक दगड हे ब्लॉक श्रेणी मधले होते म्हणजे भीमकाय दगड . या दगडांच्या धडकांमुळे सर्व काही ...अजून वाचा

17

बारा जोतिर्लिंग भाग १७

बारा जोतिर्लिंग भाग १७ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे घृष्णेश्वर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या मंदिराचा उल्लेख आहे. येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्या आस्तित्वात असलेले हे मंदिर इ.स. १७३०मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर अहिल्याबाईंनी आपल्या सासु गौतमीबाई उर्फ बायजाबाई यांच्या स्मरणार्थ या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा ...अजून वाचा

18

बारा जोतिर्लिंग भाग १८

बारा जोतिर्लिंग भाग १८ नागेश्वर ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ओंढा नागनाथा हे ही जोतिर्लिंग समजले जाते. हे गुजरातमधील द्वारका धामच्या बाहेर १ कि.मी. अंतरावर आहे. रुद्र संहितामध्ये या देवतांना दारुकावने नागेशम म्हटले गेले आहे. धर्मग्रंथ त्यांच्या उत्पत्तीची कथा ऐकण्याचा महान महिमा सांगतात. कथा श्रद्धापूर्वक ऐकणारा शिवभक्त स्वत:ला पापांपासून मुक्त करून दैवी शिवलोकाकडे वळतो. नागेश्वर शब्दाचा अर्थ नागांचा देव असा आहे. भगवान शिवाच्या गळ्याभोवती नेहमीच साप आढळून येतो. म्हणूनच, हे मंदिर विष आणि विषाशी संबंधित आजारांपासुन मुक्ती यासाठी प्रसिद्ध आहे. नागेश्वर शिवलिंग शिळेच्या गोलाकार दगडातून त्रिपक्षी रुद्राक्ष स्वरूपात स्थापित केले गेले आहे. इथे ...अजून वाचा

19

बारा जोतिर्लिंग भाग १९

बारा जोतिर्लिंग भाग १९ जागेश्वर जोतिर्लिंग नागेश जोतिर्लिंगप्रमाणेच हे सुद्धा पवित्र जोतिर्लिंग मानले जाते . डोंगरांची उंच शिखरे, गंधसरुचा भाग नदीच्या किनाऱ्यावरील सर्वाधिक पवित्र देवभूमी हे जागेश्वर' चे स्वतःचे अलौकिक सौंदर्य आहे. अल्मोडा (उत्तरांचल प्रदेश) पासून 34 किमी. फुले, फुलपाखरे आणि देवदारांच्या सावलीच्या अंतरावर वसलेले हे मंदिर त्याच्या अद्वितीय सौंदर्याचा जिवंत पुरावा आहे. हजार घंटा मंदिर अल्मोडाहून जागेश्वरला पोहोचताना सुंदर वन्य प्राणी नाही पाहीले तर 'बिबट्या वन विहार'मधील प्रवास अपूर्ण वाटेल . यानंतर थोड्या पुढे गेल्यावर कुमाऊंचे प्राचीन ऐतिहासिक मंदिर 'चित्ताई मंदिर' येते. या गोला देव मंदिरात हजारो घंटा आहेत. असे म्हटले जाते की भाविक त्यांच्या इच्छेच्या पूर्तीसाठी येथे ...अजून वाचा

20

बारा जोतिर्लिंग भाग २० - अंतिम भाग

बारा जोतिर्लिंग भाग २० बैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग झारखंड प्रांताच्या संथाल परगणा येथील देवघर मिठा या ठिकाणी आहे. जिल्ह्यातील परळी प्रमाणे हे ही जोतिर्लिंग पवित्र मानले जाते . श्री वैद्यनाथ शिवलिंग हे सर्व ज्योतिर्लिंगांच्या गणनेत नवव्या स्थानात आहे असे म्हटले जाते. भगवान श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याला 'वैद्यनाथधाम' म्हणतात. हे स्थान सध्या झारखंड प्रांतातील संथाल परगणाच्या दुमका नावाच्या जिल्ह्यात येते. वैद्यनाथ धाम मंदिर वैद्यनाथ धाम मंदिराच्या मधोमध प्रांगणात शिवाचे एक भव्य उंच मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक चंद्रकूप आणि सिंहाचा मोठा दरवाजा आहे. शिवलिंगाचा वरचा भाग हलका तुटलेला आहे, असे म्हणतात की जेव्हा रावण हे लिंग ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय