हिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी निसर्गचित्रात दाखवतात तसंच होतं सगळं. सुंदर, देखणं. तिथे राहणारे दोघेही तसेच. शंतनू, उंचापुरा, धारदार नाकाचा , पाणीदार डोळ्यांचा, आणि शाल्मली, गुलाबी गोरी, बदामाकृती चेहऱ्याची, अपऱ्या नाकाची. नाजूक जिवणीची. हसली की गालांवर इतक्या गोड खळ्या पडत की पहाणाऱ्याला विसरच पडावा सगळ्याचा. दृष्ट लागावी असंच सगळं. शंतनू उच्चशिक्षित, बड्या कंपनीत मोठ्या हुद्दयाची नोकरी. शाल्मली ही उच्चशिक्षित पण नोकरी न करणारी. लग्न करताना त्याने तसं आधीच सांगितलं होतं. तिलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं. शिवाय त्याच्या हुद्द्याला साजेशा पार्ट्या ऑरगनाईज करणे, उत्तम पद्धतीने पाहुण्याना एंटरटेन करणे, घरादाराची नीट काळजी घेणे, ही वरवर साधी वाटणारी पण त्याच्या स्वत:च्या आणि नोकरीच्या दृष्टीने लांबवर परिणाम करणारी कामे ती लिलया पार पाडत होती. त्याला तिचा , तिच्या सौंदर्याचा सार्थ अभिमान होता. कोणत्याही पार्टीत हे दोघे आले की सर्वांच्याच नजरा यांच्याकडे वळत आणि त्याची आधिचीच रूंद छाती अधिकच रुंदावे. सहकाऱ्यांच्या डोळ्यातील हेवा त्याला सुखावून जाई.

Full Novel

1

प्रायश्चित्त - 1

हिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी निसर्गचित्रात दाखवतात तसंच होतं सगळं. सुंदर, देखणं. तिथे राहणारे दोघेही तसेच. शंतनू, उंचापुरा, धारदार नाकाचा , पाणीदार डोळ्यांचा, आणि शाल्मली, गुलाबी गोरी, बदामाकृती चेहऱ्याची, अपऱ्या नाकाची. नाजूक जिवणीची. हसली की गालांवर इतक्या गोड खळ्या पडत की पहाणाऱ्याला विसरच पडावा सगळ्याचा. दृष्ट लागावी असंच सगळं. शंतनू उच्चशिक्षित, बड्या कंपनीत मोठ्या हुद्दयाची नोकरी. शाल्मली ही उच्चशिक्षित पण नोकरी न करणारी. लग्न करताना त्याने तसं आधीच सांगितलं होतं. तिलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं. ...अजून वाचा

2

प्रायश्चित्त - 2

शाल्मली भराभर आवरत होती. एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज, त्यासाठीची तिची झालेली, राहीलेली तयारी, यांची मनातल्या मनात उजळणी सुरू तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते. दोन दिवसांच्या श्रीश ला घेऊन, वर्षभरापूर्वी शंतनू ला कायमचं सोडून जेव्हा ती आईबाबांबरोबर निघाली तेव्हा मनात प्रचंड काहूर होतं. भविष्यात काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नव्हता. पदरी श्रुती नसलेलं दोन दिवसाचं बाळ, ना नोकरी ना पैसा. आईवडिलांचा आधार काही काळापुरताच घ्यायचा हे मात्र तिने तेव्हाही ठामपणे ठरवलं होतं. नाही म्हणायला शिक्षण मात्र होतं , उत्तम मार्कांची डिग्री होती. पण नोकरी मिळेल? राहायचं कुठे? आईवडिल ,भाऊवहिनी ,त्याची दोन मुलं यांना त्यांची जागा पुरत ...अजून वाचा

3

प्रायश्चित्त - 3

शाल्मली ची धांदल उडाली होती आज. हात एकीकडे भराभर कामं उरकत होते तर दुसरीकडे डोक्यातले विचार वायुवेगाने भ्रमण करत एरव्हीची शांत शाल्मली आज मात्र जरा धास्तावली होती. आज श्रीश ला तिने आईकडेच सोडायचं ठरवलं. संध्याकाळच्या आधीच्या बॉसचा निवृत्ती समारंभ आणि नव्या बॉसचा स्वागतसमारंभ, असं ऑफिस ने एकदमच करायचं ठरवलं होतं. थोडा उशीर होणार होता. शिवाय तिच्यावर कार्यक्रमासाठी काही जबाबदाऱ्या ही सोपवण्यात आल्या होत्या. आधीच्या बॉसनी वडिलकीच्या नात्याने कालच तिला बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या. पण ते जाऊन नव्या माणसाबरोबर काम करावं लागणार, याचं नाही म्हटलं तरी तिच्या मनावर दडपण आलंच होतं. सगळी तयारी करून शेवटी ती निघाली. श्रीश ला जवळ घेऊन कुरवाळून ...अजून वाचा

4

प्रायश्चित्त - 4

शाल्मली उठली पहाटेसच आज. आज श्रीश झाला वर्षापूर्वी. आज ती आई झाली होती वर्षभरापूर्वी. जीवनातला परमोच्च आनंद दिला श्रीश ने तिला. तिने श्रीशला न्हाऊ माखू घातले. आईकडे गेल्यावर आजी, मामी ने त्याला ओवाळले. बच्चा पार्टीने केक आणूनच ठेवला होता, तो दादाच्या मदतीने श्रीश ने कापला. सगळ्यांनी ‘हैप्पी बर्थ डे टु श्रीश’ म्हटलं. दोन्ही मुलांनी कडेवर घेऊन त्याला नाचवला. श्रीश प्रचंड खूश होता. शाल्मली च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्या तिने हळूच पुसून घेतल्या. आज ऑफिसच्या पाळणाघरात वाटण्यासाठी शाल्मलीने कप केक्स, चॉकलेटस् घेतली होती. जवळच्या मूकबधीर मुलांच्या शाळेतही संध्याकाळी ती घेऊन जाणार होती श्रीश ला. आता सवय करायलाच हवी होती. ऑफिसमधे ...अजून वाचा

5

प्रायश्चित्त - 5

शंतनू जसजसा तिच्या घराजवळ जाऊ लागला त्याचं अवसान गळू लागलं. “परत त्या तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करण्याची ताकद तुझ्यात “मन बजाऊ लागलं. तो रस्त्याच्या कडेला थांबला. “काय करावं?” घालमेल होत होती जीवाची! मग तो गाडी कडेला लावून उतरला. मोकळा श्वास घेतल्यावर बरं वाटलं त्याला. समोरच मोठं खेळण्याचं दुकान दिसलं. तो आत गेला. समोरच एक मोठा टेडी होता. तो घेतला. कार्डवर लिहीलं “तुझ्या वेड्या बाबाकडून” मग शाल्मलीच्या माहेरचा पत्ता दिला. पोहचवायला सांगून तो परतीच्या वाटेला लागला. डोळे वहात होते. धूसर वाट होती पण निदान मार्ग मिळाला होता. प्रशांतने शाल्मली आणि श्रीश ला घराजवळ आणून सोडले. तिने वर बोलावले नाही. तो गाडी ...अजून वाचा

6

प्रायश्चित्त - 6

शाल्मली साईन लॅंग्वेज क्लासमधून बाहेर पडली. तेवढा वेळ श्रीश आईकडे राहायचा. त्याला खूप आवडायचं तिथे राहायला. मामा, मामी, मोठी आजी आजोबा, सगळे भरपूर लाड करत. या सर्वांचा शाल्मली ला खूप आधार वाटायचा. पुढच्या रविवारी सगळ्यांना जेवायला बोलवायचं तिने ठरवून टाकलं. तेवढीच वहिनीला एक दिवस स्वैपाकातून सुट्टी! आता तिला श्रीश च्या ट्रीटमेंटचं पहायचं होतं. काही पैसे तिने बाजूला काढून ठेवले होतेच. आज रात्री ऑनलाइन सर्च ती करणारच होती. शिवाय मेडिकल फिल्ड मधल्या काही मित्र मैत्रिणींचा सल्लाही घेणार होती. घरी येऊन तिने श्रीशचे मंमं,तिचे जेवण उरकले. श्रीश टेडीला घेऊन बेडवर चढला. मग तिने जरासे थोपटताच झोपीही गेला. शाल्मलीने लॅपटॉप उघडला. ...अजून वाचा

7

प्रायश्चित्त - 7

स्नेहल ने बेल वाजवली. शंतनू नुकताच आंघोळ करून बाथरूम मधून रोब घालून बाहेर येत होता. कामवाल्या मावशी असणार वाटून त्याने दार उघडले तर दारात स्नेहल. तो जरा गोंधळलाच. बस आलोच असं म्हणत आत गेला. हवेत त्याच्या आफ्टर शेव्हचा, शॉवर जेलचा मंद सुगंध दरवळत राहिला . कपडे घालून तो बाहेर आला. तुम्ही एकटेच धड जेवण नाही करणार म्हणून कंपनी द्यायला आले. शंतनू काहीच बोलला नाही. मग तीच उगाच विषय काढून बोलत राहिली. तेवढ्यात बाई आली. तिला शंतनूने फक्त साफसफाई करून जायला सांगितलं. ती गेल्यावर स्नेहल ने चट्कन जवळच्या हॉटेलमधून जेवण मागवलं. शंतनू म्हणाला “बाहेरच गेलो असतो.” “सर किती ऊन आहे बाहेर. मी ...अजून वाचा

8

प्रायश्चित्त - 8

घरी आल्यावर शाल्मलीने श्रीशला वरण भात भरवला. स्वत:ही चार घास पोटात ढकलले. श्रीशला लगेच झोप लागली. ‘दमलं बाळ माझं’ म्हणत तिने डोक्यावरून हात फिरवत ओठ कपाळावर टेकले. श्रीशने झोपेत हात गळ्यात टाकला तिच्या. दोघांचाच असा कोश तयार झाला. शाल्मलीला तो नाजूक हात दूर करवेना. तशीच पडून राहिली ती किती वेळ आपल्या सुकुमार बाळाजवळ. पण असं झोपून जाऊन चालणार नव्हतं. मग नाईलाजाने उठली. तो फॉर्म काढला. बऱीच माहिती विचारली होती. त्यात आधी कुटुंबात कोणाला काही अशी समस्या होती का हा प्रश्न निरनिराळ्या संदर्भात परत परत विचारलेला दिसत होता. क्षणभर शाल्मली थांबली. मग तिने फोन उचलला. साडेनऊ वाजत होते. शंतनूचा नंबर ...अजून वाचा

9

प्रायश्चित्त - 9

सॅम कालचे रिपोर्टस स्टडी करत होता. तेवढ्यात त्याच्या मित्राचा फोन आला. “अरे मी पाठवलेले रिपोर्टस पाहिलेस का? “ रे, बोललो आपण पण मिळाले नाहीत मला?” “काय सांगतोस? मेल चेक कर” “नाही आले रे, परत पाठव. थांब मी तुला टेस्ट मेल पाठवतो त्यावरच ॲटॅच कर” “बरं, पण मित्रा, जरा लगेच पाहशील का? पोराचा बाप मित्रय माझा, मागे लागलाय केव्हाचा.” “पाठव लगेच मी बघून सांगतो आजच” “धन्यवाद दोस्ता. हं आलीय टेस्ट मेल. लगेच पाठवतो.” “ओके.” मेल लगेचच आली. ॲटॅचमेंटस पहाताना काहीतरी ओळखीचं वाटलं सॅमला. मग लक्षात आलं हे तर श्रीशचे रिपोर्टस. परत नीट चेक केले. हॉस्पिटलही तेच, तारखाही, बेबी कोड नं ही ...अजून वाचा

10

प्रायश्चित्त - 10

शाल्मली ने एक भला मोठा निश्वास सोडला. तेवढ्यात रिसेप्शनिस्टने तिला बोलावले. आता मात्र शाल्मलीने त्याला कडेवर घट्ट पकडून ठेवले. अलॉट झालीच होती. “तुम्ही रुम मधे बसा. टेस्टस साठी बॉय घ्यायला येईल तेव्हा जा त्याच्याबरोबर. पैसे डिसचार्ज च्या वेळी घ्यायला सांगितलेत डॉक्टरनी.” शाल्मली काही न बोलता वॉर्ड बॉय बरोबर गेली रुममधे. इथे मात्र सर्व शांत होतं. पंचतारांकित हॉटेलची रुम वाटत होती ती हॉस्पिटल रुम पेक्षा. भिंतींवर मस्त निळ्या लाटा, त्यात रंगीत मासे असं सुंदर चित्र रंगवलं होतं. खिडक्यांचे पडदेही कार्टूनच्या चित्रांचे फार भडक नव्हेत पण प्रसन्न रंगांचे. दोन नवी कोरी टॉईज कॉटवर मांडलेली. बेडशीट वरही भावल्यांची चित्र. उशीला आकार टेडीचा. श्रीश ...अजून वाचा

11

प्रायश्चित्त - 11

ती ही मग रूमकडे जायला निघाली. सॅम आला तर आपण तिथे असावं. रुमवर आल्यावर श्रीशसाठी खाऊ आलाच होता. आवडीने खाल्ला तो. तेवढ्यात सॅम आला. आल्या आल्या त्याने हात सॅनिटाईज केले. श्रीशच्या कानामागचा भाग चेक केला. “हं, गुड.” “हं बोला मॅडम, काय प्रॉब्लेम?” “सॅम आपण बोललो तेव्हा श्रीश च्या एकाच कानाचं ऑपरेशन ठरलं होतं, त्याप्रमाणे खर्चही काढला आपण, मग फॉर्मवर दोन्ही कानांचं कसं लिहीलय?” “शाम, अगं आपलं एका कानाचं वगैरे कधीच काही बोलणं झालं नाही. हे बघ, दोन प्रकारे यावर उपाय करतात. एक म्हणजे एका कानात कोक्लियर इंम्प्लांट बसवतात आणि दोन्ही कानात हियरिंग एडस् बसवतात. म्हणजे आवाज ॲम्प्लीफाय पण करतात ...अजून वाचा

12

प्रायश्चित्त - 12

“श्रीशला ऐकू येईल ना आंटी आता.” तिने हसून मान हलवली. केतकी सतत तिच्या अधिक जवळ सरकून बसतेय असं तिच्या आलं. तिनेही मग केतकीच्या खांदायांवर हात टाकत तिला आपल्या जवळ घेतली. दोघीही अशा बसून राहिल्या. थोड्या वेळाने नर्सने तिला आत बोलावले. सॅम मास्क तोंडावरून गळ्यात अडकवत बाहेर आला. “ऑपरेशन व्यवस्थित झालं. काळजीचं काहीच कारण नाही. शाम श्रीशची भूल उतरली तरी झोपेल बराच वेळ तो. तशी औषधं दिलेली असतात. रिकव्हरी मधेच राहिल संध्याकाळपर्यंत. थोड्या वेळाने नर्स सांगेल तुला मग बघून ये. ओके? “त्याने तिच्याकडे नजर रोखत विचारलं. “हो!” तिला त्या नजरेचा अर्थ बरोबर कळला. जणू तो म्हणत होता “शाम, तू रडतेस? ...अजून वाचा

13

प्रायश्चित्त - 13

यासगळ्यात आपण शंतनूला बोलावलय भेटायला हे विसरूनच गेली ती. मग फोन वाजला तिचा दुपारी. “मी खाली आलोय. वर सोडत मला” म्हणाला. ती म्हणाली “थांब तिथेच.” मग तिने रिसेप्शनिस्टला फोन केला आणि म्हणाली “आत्ता विजिटींग अवर्स आहेत ना? मग त्या माणसाला विजिटींग पास द्या.” रिसेपशनिस्ट म्हणाली “नक्की ना मॅम? सेक्युरिटीला पाठवू का बरोबर?” “नको, त्याची गरज नाही, पण हा एकदाच, परत नाही द्यायचा कधीच.” “ओके मॅम” शंतनू वर आला. दारावर टकटक झाली. तिने दार उघडलं. शंतनू आत आला. बराच वेळ श्रीशकडे पाहत राहिला . शाल्मलीच मग म्हणाली “ तू का आता परत परत येतो आहेस आमच्या आयुष्यात?” शंतनू पाहत राहिला ...अजून वाचा

14

प्रायश्चित्त - 14

या दोघी जवळ पोहोचल्या तरी केतकीच्या बाबांचे लक्ष नव्हतेच. मग केतकीने हाक मारली. तसा भानावर आला. “मी याला नेतेय. केतकीला सोडायला आले. कांचन?” त्याने शाल्मलीकडे पाहीले. “७२ तासांची मुदत संपत आलीय. अजून .....” “हं.” “शुद्धीवर यायला हवीय ती ......” असहायता, डेस्परेशन त्याच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. ‘काय आणि कसा धीर देणार?’ “तुम्ही आत येऊन बोलाल का काही तिच्याशी? कदाचित मी तिच्याकडे नकारात्मक उर्जाच पोहोचवतोय का असं वाटतंय मला.” शाल्मली ला काय बोलावं कळेचना. पण मग तिने श्रीशला त्याच्याकडे दिलं आणि ती सरळ आत गेली, जाताना केतकी ला म्हणाली “चल तू ही.” केतकी जरा घुटमळली, पण मग तिचा हात घट्ट धरून ...अजून वाचा

15

प्रायश्चित्त - 15

हॉस्पिटल मधे पोहोचल्यावर ती तडक रूमवर निघाली, पण मग सगळ्यांसाठी काहीतरी ऑर्डर करावं म्हणून मग आधी खालच्या फ्लोअरवर गेली. ऑर्डर, आणि रुम नंबर सांगून लिफ्ट जवळ आली तर लिफ्ट साठी बरीच गर्दी होती. मग जिन्याने निघाली. दोन जिने चढून ओटी च्या फ्लोअरवर आली. तेव्हा केतकी तिथेच घुटमळताना दिसली. “का गं, घरी नाही गेलीस?” “नाही, आज आत्या नाही ना आली, मग डॅड मला सोडून कसा येणार?” “ओह, मग आता?” तिने नुसतेच खांदे वर केले. “कुठय बाबा तुझा?” “कांचन त्याला जराही सोडत नाहीय. हात धरून बस म्हणतेय.” “नंबर पाठ आहे डॅडचा?” “हो....” “सांग” तिने लगेच फोन लावला त्याला “मी केतकीला माझ्या रुममधे ...अजून वाचा

16

प्रायश्चित्त - 16

तो मुलांकडे गेला. श्रीशला कडेवर घेतलं. बहुधा त्याच्या कडेवर बसल्यावर श्रीशला खूप उंचावर बसल्यासारखं वाटत असावं. मज्जा वाटत असावी. केतकीला त्याने शाळेबद्दल विचारलं. आंटीला त्रास नको देऊस म्हणाला. नर्स म्हणाली डॉक्टर आलेत बोलावलय तुम्हाला. मग श्रीशला घेऊन निघाली. केतकीला जाताना हाक मारेन म्हणाली. सॅम वाटच पाहत होता त्याच्या केबीन बाहेर तिची. चेहरा लहान मुलासारखा उजळलेला. पटकन तिला आत नेलं. तिथे मी बसलेली. फोटोपेक्षाही कितीतरी सुंदर. नितळ कांत, बोलके डोळे, हसरी जिवणी. एखाद्या चित्रकाराने मन लावून जसं एखादं चित्र परिपूर्ण करावं तशी. तिलाही शाल्मली ऐकून माहित असावी. जुनी ओळख असल्याप्रमाणे मिठी मारली तिने. मागून सॅमला छान आहे अशी खूण केली शाल्मलीने. ...अजून वाचा

17

प्रायश्चित्त - 17

शाल्मली बाहेर पडली आणि तिने शंतनूचा नंबर फिरवला. शाल्मली ने दोन तीन वेळा शंतनूचा नंबर फिरवला पण आला. मग ठेवला फोन पर्समधे तर लगेच वाजायला लागला. शंतनूचाच कॉल. “हॅलो, मी शंतनू ” “हो बोल. तुझाच नंबर ट्राय करत होते बिझी लागला.” “तुलाच लावत होतो” “ओह, बोल ना.” “ते पेपर्स मिळाले?” “हो. आजच.” “वाचलेस?” “नाही.” “का?” “गडबड होते जरा. आता घरी जाऊन डिव्होर्स पेपर्सवर सह्या करून लगेच कुरियर करते.” “हं!” “तू का फोन करत होतीस?” शाल्मली ला पटकन शब्द सुचेनात. दोन क्षण शांततेत गेले. “बोल ना” “शंतनू, मी तुला एवढंच सांगायला फोन केला की तू तुला हवं तेव्हा श्रीशला भेटू ...अजून वाचा

18

प्रायश्चित्त - 18

सकाळी उठली म्हणण्यात अर्थ नव्हता. झोपलीच कुठे होती? पण बेडवरून उठली. केतकीचा डबा केला. तिला मधेच येऊन उठवून गेली. शहाण्या मुलीसारखं पटापट आवरलं सगळं. शाल्मली ला ती गप्प गप्प आहे हे जाणवलं. काल केतनला आपण किती मोठं लेक्चर दिलं नि आता आपणही तसंच वागतोय की. मग तिने केतकीचे केस विंचरून देताना तिला म्हटलं, “केतकी आता कांचनला घरी सोडतील तेव्हा तू पण जाशील घरी. मग आम्हाला खूप आठवण येईल तुझी. तू येशील ना आम्हाला भेटायला?” केतकी काही कळायच्या आत मुसमुसून रडायलाच लागली. बिलगलीच तिला. “आंटी, डॅडला सांगून मला इथेच ठेऊन घेना. मी कसलाच त्रास नाही देणार तुला. मी सगळी मदत ...अजून वाचा

19

प्रायश्चित्त - 19 - अंतिम भाग

ही हॉटेल रूमवर पोहोचली तेव्हा दार उघडच होतं. अख्खा रुमभर खेळणी पसरली होती. साईड टेबलवर हॉट चॉकलेटचा रिकामा फळांचा रिकामा डबा होता. बेडभर शंतनू पसरला होता आणि त्याच्या छातीवर श्रीश पालथा झोपला होता. हे दृश्य तिच्या मनात परत एकदा हजारो भावनांचा कल्लोळ उठवून गेलं. घशात बारीकसा हुंदका दाटला. पटकन एक फोटो काढून घ्यावा असंही मनात आलं. काय जाणो शंतनूचं मन परत बदललं आणि गेला सोडून बाळाला तर क्षणभर का होईना पण त्याने प्रेम केलं तुझ्यावर असं सांगायला पुरावा झाला असता. तिनं खरंच ओल्या नजरेनेच एक फोटो काढला. हळूच जाऊन त्या प्रेमाच्या कोषात विरून जावं आपणही ही भावना अनावर होऊन ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय