रेशमी नाते - २ Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - २

विराट 💓पिहु


(मागच्या भागात सुजाता हे नाव मी विराटच्या काकुला दिल होतं नंतर मी ते चेंज करुन रोहिणी ठेवले.सॉरी एका ठिकाणी नाव चेंज कारयचे राहीले त्यामुळे गोंधळ झाला..)

पिहु:-आई तुम्ही‌ प्लिज रडू नका...मला कळतंय‌...

सुमन:- पिहुला मिठी मारतात. तु आराम कर काही लागलं कि सांग..सोनिका आहे वीराच्या रूममध्ये उद्या सकाळी लवकर निघणार आहे .ते दोन दिवसांनी आमवस्या आहे ना म्हणून उद्याच माहेरी जावे लागेल.पाच दिवसांनी परत‌ घ्यायला येते..(त्या,पिहुच्या चेहरयावरून हात फिरवत निघुन जातात..)

पिहु उठुन दरवाजा लावते..परत एक नजर रुमभर फिरवुन घाबरतच सगळ बघु लागली. समोर स्लाईडींगचा डोर होता...ती उघडु कि नको विचार करत होती..तिने हळुच उघडला.तर स्टडी रुम होती.. ती आत मध्ये जाऊन सगळ निहाळत होती...समोरचा कर्टन तिने उघडला तिथे जिम सेक्शन होते..सगळ नीट नेटके सामान ठेवले होते..फाईल्स ,बुक्स नीट रॅक मध्ये लावले होते...काऊच वरचे पिलो,पण नीट जस कोणी वर्षानु वर्ष हातच लावले नसतील.तिला तिची रुम आठवली सगळ सामान अस्थावस्थ असायच...चादर पण कधी तिने घडी केली नाही सगळ तर मम्मीच करायची. आता माझ कस होईल म्हणुन डोक्यात विचार घुमु लागले कॉल्थ स्केशन बघुन तर ती कोड्यातच पडली.
तिची ओढणी एकीकडे तर ड्रेस एकीकडे असे तिच कबोर्ड ..तिने घाबरुन कश्यालाच हात लावला नाही..शांत‌ परत बेडवर येऊन बसली...पाकळ्यांशी खेळत खुप वेळ विचा‌र करत बसली.नंतर तिला कंटाळा आला तिने झोपण्यासाठी सगळ्या गुलाबाच्या पाकळया बाजुला केल्या.ती सगळ्या खाली टाकणार कि मागुन आवाज आला.

विराट:-hey,stop....(पिहुने वळुन बघितले.)

पिहु विराटच्या आवाजाने घाबरलीच ती जागीच स्तब्ध उभी राहीली
(त्याच्या चेहरयावर आट्या पडल्या होत्या...)तिला तर काय
बोलाव कळलच नाही..

विराट:- काय‌ करतेस ???त्याने तिला कडक शब्दातच विचारले.

पिहुला काहीच‌ कळेना...तिने बेडवर‌ नजर‌ टाकत‌ परत त्याच्यावर टाकली..ते..ते...ते..

(विराट जवळ येत होता...तो अस जवळ येताना पिहुला घामच
फुटला...ती घाबरुन मागे सरकत होती...तिने कपाळावरचा घाम पुसला...त्याचा तो रागीट चेहरा बघुन तर ती फक्त रडायचीच बाकी होती.तिने घट्ट डोळे मिटले विराट जवळ येऊन खाली वाकला आणि बेडवरचे सगळ्या पाकळ्या वेचलेल्या हातात घेतल्या . )

विराट:-( पिहुच्या समोरुन बाजुला सरकत डस्टबिन मध्ये टाकत‌ बोलु लागला.पिहुने डोळे हळुच उघडले.) तु काय करत होतीस...ते फ्लावर्स खाली टाकतात का..??.

(तेव्हा पिहुला कळाले विराट काय‌ बोलत‌ होता. )

पिहु:- ते..ते...सॉरी...लक्षातच

(ती बोलत असताना त्याने हातानेच तिला थांब बोलला तशी लेगच शांत झाली..तो जाऊन चेअर वर बसला..तिला हातानेच ह्या चेअर बस बोलला...)

दोन मिनीट पिहुला कळलच नाही..अअअहह मी ..

विराट:- अजुन कोण आहे का इथे तुलाच बोलवतो...कम सीट हिअर..

त्याच्या आवाजाने पिहु पटकन जाऊन बसली.

(दोन मिनीट शांत बसत ) मला हे लग्न मान्य नाही.तुझ मला माहित नाही.पण मी खुप क्लिअर आहे. तु ही माझ्यासारखाच विचार करत असेल..पण कस बोलु कळत नसेल.
कारण मी तुला आणि तु‌ मला ओळखतच नाही तर पुर्ण आयुष्य कस ऐकमेकांसोबत घालणार...शक्यच नाही.

पिहुच्या काळजावर एक एक शब्द‌ घात केल्यासारखे वाटत होते..ती काय स्वप्न घेऊन आली होती .. ओळखत नाही पण ओळखायचा एकमेकांना जाणून घ्यायचा विचार तिने नक्की केला होता.‌डोळ्यातुन पाण्याचे थेंब न कळतच एक एक ओघळत‌ होते...

तिच्या डोळ्यातलं पाणी बघुन तो बोलायच थांबतो..एक टक तिच्या डोळ्याकडे बघत तो‌ हरवुनच जातो‌‌..तिच्या काळे चॉकलेटी टपोरे डोळे त्यात पाणी साचलेले एक एक थेंब ओघळत तिच्या ओठ्यांपर्यंत येत होते...नकळत त्याचे लक्ष तिच्या ओठांच्या खालच्या तिळाकडे गेले गुलाबी ओठांवर लाईट पिकं कलरची लिपस्टीक असल्याने ते तीळ ‌उठुन दिसत होते..त्याचा हात नकळत तिच्या गालापर्यंत गेला. तिने दिर्घश्वास घेतल्याने त्याची तंद्री तुटते पटकन तो हात बाजुला घेऊन नजर फिरवतो.....फस्ट टाईम त्याने तिच्या चेहरा नोटीस केला होता. (काय करतोय विराट तु तो मनातच बोलुन गेला)

विराट:-हे लिसन,

(ती डोळे पुसुन त्याच्याकडे बघते..)

वाय आर यु क्रायईंग ,मी अस काही वेगळ बोललो का,तो तिच्या समोर पेपर्स ठेवतो...

ती चकित होत पेपर्स कडे बघते ...

हे डिवोर्स पेपर्स आहेत...मी साईन केली तु ही क‌र सिक्स मंथ लागतील डिवोर्स होण्यासाठी तो पर्यंत तु इथे राहु शकते..मी तुला तु जेवढी हवी तेवढी अॅलमनी द्यायला तयार आहे....

अजुन एक शॉक लागला . लग्नाच्या पहिल्या रात्री सगळे आपल्या उज्वल भविष्याची स्वप्न बघतात...आणि रात्रीचे दोन वाजता डिवोर्स चे पेपर आपल्या हातात येतात..ती पेपर कडे बघत होती.

तिचा निराश चेहरा बघुन कुठेतरी काळजाच्या कोपरयात विराट ला गिल्टी वाटत होते.

पिहु मान ‌खाली घालुन हळु आवाजात अजुन काय बोलायचे आहे का???...

तिचे हे दोन शब्द विराटला आपण कुठला तरी अपराध करतोय हे जाणवून देत होते...तो उठतो‌..डोळे ताट करतच नाही म्हणून ताडकन बेडवरचा पिलो उचलून स्टडी रुममध्ये निघुन जातो...


पिहु एकटक शुन्यात नजर टाकुन बाहेर‌ बघत होती..तिने कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता अस काही घडेल ...तिचे डोळे पुर आल्यासारखे वाहत होते‌‌...नियतीने ही तिला साथ द्यायचे ठरवले होते..आकाश गर्जत होते..विजा चमकुन तुटुन पडत होत्या धो धो पाऊस पडत होता..

.
.
.
.
.

,रेवती:- पिहुची आई पटकन ऊठली अहो,...उठा..

भिमराव:-ताडकन उठले...काय‌ गं ..अशी का घाबरली..

काही माहीत नाही पण घाबरल्यासारख झालं ओ (रेवती बेडवरून उठुन खिडकी उघडुन बघत)...बाहेर ऐवढा कस पाऊस लागलाय अचानक..

(भिमराव पण शेजारी येऊन उभे राहिले) ते ही बाहेर बघतात..कधी कधी नियतीला मान्य नसतात काही गोष्टी मग असाच पाऊस कोसळतो...

(रेवती भिमरावांनाकडे नजर फिरवत)पिहु ठिक असेल ना,पहिल्यांदा‌ तिला आपल्या नजरेआड केले कशी असेल ती ..

भिमराव गालात हसतात..तुलाच घाई होती तिला स्वतःपासुन दुर करायची आणि आता काळजी करते...देवाला काळजी आहे सगळ देवावर सोडुन दे ...जास्त विचार करु नकोस..ती कधी सोडुन राहीली नाही ना म्हणून तुला भिती बसली उद्या येणार च आहे . मन भरुन बघ चल आता झोप...तबियत बिघडेल गार वारयाने ..पिहु मला ओरडेल माझ्या मम्मीची काळजी घेता येत नाही का पप्पा ...अस म्हणताना दोघांचे डोळे पाणवले...



पिहुला तिची लाईफ कुठे चालली काय.. चालुय काहीच कळत नव्हते..पुर्ण ब्लँक झाली होती.सकाळी डोळ्यावर कोवळे ऊन आल्याने तिला जाग येते ती विचार करता करता चेअर वर झोपुन गेली होती.ती दचकून उठते‌ तिला कालचे सगळे आठवत‌ होते..ती इकडे बघत बाथरुममध्ये जाऊन ओघंळ करून येते छानशी साडी दागिने घालुन ती बाहेर येते.


सु‌मन:- तिच्या जवळ जात डोक्यावरुन हात फिरवते..नीट झोपली ना बेटा...

हे ऐकताच पिहु त्यांच्या कडे एकटक बघते..(सगळ माहित असुन हे अस कस काय बोलु शकतात ती मनातच बोलते..)
पिहु वरवर गालात हसते..(.पण ते‌ हसण सुमनला सगळ सांगुन गेले त्यांचा चेहराच पडतो.)

ड्रायव्हर:- मॅडम‌ गाडी तयार आहे.

सुमन:-हा..ते..पिहु बेटा ड्रायव्हर सोडुन येईल ..पाच दिवसांनी मी येते घ्यायला ....

पिहु:- (गालात‌‌ हसत) ,आजी,रोहिणी,दामोदर यांच्या पाया पडते.
सोनिका पिहु निघुन जातात.
.

.
.

.(भुतकाळ)


सुमन:- विराट काळजी घे स्वतःची ही दुसरी वेळ आहे लागायची ,(त्यांचे डोळे वाहत होते)काय गरज आहे साईट वर जायची ,किती माणसे आहेत पण नाही स्वतःहुन बघायची गरज असते किती लागले आहे डोक्याला खूप जोरात लागले नाही म्हूणन..अस म्हणून ते हुंदके देऊन रडु लागल्या‌.

विराट ने जवळ घेतले मॉम काय तु पण कुठल्याही गोष्टी लावुन घेते..थोडस लागले आहे.

हे थोडस बोलतोय...तु..ही दूसरी वेळ आहे विराट पहिले कार अॅक्सेडेंट नंतर साईट वरुन रॉड पडतात.काय हे थोडक्यात जवळुन गेले.म्हणुन लागले नाही....


बस मॉम डोक चालवु नको .जास्त मला कळालं तुला काय म्हाणायचे.

कळलं तर त‌‌यार हो ना ..लग्नाला अरे तूझ्या बरोबरचे लोक संसाराला लागेल आणि तु अजून विचार पण करत नाही..गुरुजींनी मला सांगितले आहे ह्या महिन्यात तुझा लग्नाचा योग आहे...नंतर वर्षानेच मग आत्ताच करु ना..तू तयार तर हो मी एक छान मुलगी बघितली आहे....(सुमन बोलत असताना मणी येतो..भैय्या..
विराट नज‌र फिरवतो..

मणी:-भैय्या मोठ्या मालकांनी लवकर बोलवलं स्टडी रूममध्ये आई तुम्हाला पण.

सुमन:- हा आलो ..


दामोदर रोहिणी बसलेच होते...विराट सुमन येतात..

विराट:- बाबा तुम्ही बोलवलं .

दोमोदर:- हो ये बस ,सुमन ‌ये...बर वाटतयं विराट,परत‌ साईटवर जायच नाही ही माझी लास्ट वार्टींग आहे.

विराट:-पण बाबा...

रोहिणी:-विराट बाबा बरोबर बोलत आहे..परत जर गेला तर मी घराच्या बाहेर पाऊल ठेवुन देणार नाही...

विराट गालात हसतो ,ठिक ये जयाच्या वेळेस तुमची परमिशन घेऊन जाई ल ओके.

रोहिणी:-तु काही ऐकणारा नाहीये.यावर सगळे हसतात.

दामोदर:- विराट ...

विराट:-हहह...बाबा,

दामोदर:- मोहिते आपल्याबरोबर डील साईन करायला तयार झालेत.

विराट:- (चमकुन) दॅट्स ग्रेट बाबा..

दामोदर:-( दोन मिनीट शांत इकडेतिकडे बघत)बट एक अट ठेवली आहे त्यांनी...

विराट ब्लँक होऊन मॉम कडे बघत‌ परत दामोदर रोहिणी कडेबघतो.). काय बाबा?

दामोदर:- त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली आहे ...

विराट:- काय.??.

सुमन पण ब्लँक होते.

रोहिणी:-हो ,त्रिशा साठी तुला मागणी घातली त्यांना तु,परफेक्ट आहे त्यांच्या मुलीसाठी अस वाटतयं...

सुमन:- ताई हे लग्न का डील आहे ...मला अश्या गोष्ट पटत नाही.. त्या चिडुनच बोलतात.

रोहिणी:-सुमन, मला ही काळजी आहे विराटची...

विराट:-(गंभीर होत)मॉम,आई मी बोलु का ???
दोघी शांत‌ होतात..मी तयार आहे, त्रिशाची‌ लग्न करायाला...

सुमन:- विराट ,!!! तुला काय सगळ चेष्टा वाटतयं का लग्न हे आयुष्याभराच कमिटमेंट असते...

दामोदर:- सुमन बरोबर बोलतीय.तु भेट बोल मग आपण पुढच ठरवु..

विरट:-बाबा मला ही डील कुठल्याही कंडीशनमध्ये हवी‌ आहे.

सुमन:- ताई ,तुम्हाला ही माहित आहे वि‌राटच्या कुंडलीत दोष आहे..अशी कुठली ही मुलगी नाही चालणार...

विराट:- ओहह! कमॉन मॉम मी असल्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही.

रोहिणी:-‌सुमन तु कुठल्या जमान्यात राहते...हे सगळ भोंदुगिरी असते..पैसे उकळ्याण्यासाठी हे असते...

(सुमनला ही कळलं आत्ता तिच इथे काहीच चालणार नाही ती ताडकन रागाने उठुन निघुन गेली.)

दामोदर:- रोहिणी..काय हे सूमनचा आहे विश्वास तर तु का मध्ये पडतेस...

वि‌राट:- (उठत )बाबा,मी मॉम ला नंतर समजवतो..तुम्ही त्रीशा बरोबर माझी मिटींग फिक्स करा ..(बोलुन निघून जातो)
.
.

विराट त्रिशाची वाट बघत हॉटेल मध्ये बसला होता.

त्रिशा:- (लांबुनच वि‌राटला हाय करत येत असते)हाय हँडसम,अस‌ बोलत ती चेअर व‌र बसते.

विराटला दोन मिनीट अनकंर्फट वाटत‌ होते.तो गालात हसतो..

(विराटने वेटरला बोलवले.):- वन ब्लॅक कॉफी ..तु काय घेणार त्याने त्रिशाकडे नजर वळवली ...

त्रिशा:- कोल्ड कॉफी ती हसत बोलली.हम्म,मिस्टर विराट देशमुख फायनली तयार झाले...लग्नाला तिने त्याच्या हातावर हात
ठेवला.

त्याने हळुच तिच्या हाताखालचा हात काढला...दोन्ही हात एकमेकांनामध्ये गु्ंफवले...तो कुचक हसला)
विराट:- त्रिशा मोहिते...छान शोधुन काढलीस आईडीया ..दाद देतो तुझ्या डोक्याला..व्हाह..माझ्याशी लग्न करण्यासाठी ...ती मधे तोडत बोलते.

त्रिशा:-तुला माझ प्रेम‌ दिसत नाही विराट ...दोन वर्ष झाले .मी तुझ्या उत्तराची वाट बघते...किती प्रेम करते मी तुझ्याव‌‌र तु साधी नजर फिरवत नाही.काय कमी आहे माझ्यात ...

विराट तिला हातानेच थांब म्हणतो..त्याच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या...शटअप प्रेम वैगेरै ह्या गोष्टी माझ्यासाठी नाही येत...लेक्चर देऊ नकोस...मी तयार आहे लग्नाला ...मंडपात येऊन थांबेल ज्या दिवशी सांगशील त्या दिवशी येईन ..अस म्हणत तो ताडकन उठुन निघुन गेला...

त्रिशाचे डोळे भरलेले होते तिने स्वतःला सावरले आणि गोड हसली फायनली विराट तिला कुठल्याही परस्थितीत हवाच होता.
.
.
.


दामोदर फोन वर बोलत येत होते...हो,मी घरी सांगुन लग्नाची तयारी चालु करतो ..मि.मोहिते भेटु लवकरच (हसत)‌ फोन कट करुन येऊन बसतात.

रोहिणी:-काय झालं.

दामोदर:- लग्नासाठी मुहर्त बघुन सांगतो असे बोलले मोहिते.
सुमन कुठेे आहे ....

रोहिणी:- पुण्याला गेली .दोन तीन दिवसानंतर येणार आहे.

विराट येतो...आई मॉम पुण्याला अचानक मला काहीच बोलली नाही.

रोहिणी:- तुझ्या मामाकडे गेली ...‌‌येईल..

पण अस अचानक..विराट मॉमला कॉल लावतो..हॅलो मॉम मला न सांगताच गेली अस काय अर्जंट काम होते.

सुमन:- का काय झाल़ं माझ्यावाचुन काय काम अडत नाही तुझ ...


विराट:-मॉम काय बोलतेस तुला माहीत आहे तु घरात दिसली नाही तर मला‌ बैचेन होते..

सुमन:- हो,माहीत आहे ..पण मला त्या घरात किंमतच नाही तर कश्याला राहु.‌...दुसरयांचे सोड तु ही मला परकच समजतो...तुझे डॅड होते तेव्हा माझ्या बोलण्याला किंमत होती आता मी नसले तरी कोणाला फरक पडत नाही ...

विराट:-मॉम तु का अशी बोलते...तुला ही,माहित आहे माझ्यासाठी ही डील म्हत्तवाची आहे..

सुमन:-आणि मला तु म्हत्तवाचा आहे. मी तुझ्यासाठी जी मूलगी बघितली आहे ....तिच्या शी लग्न करायला तयार हो..नाही तर मला विसरुन जा...अस बोलुन सुमन फोन कट करते.

विराट:-मॉम...मॉम...शीट्स

रोहिणी:- काय म्हणते,सुमन...

विराट:-मॉम ने कुठली तरी मुलगी बघितली. काय‌ ते कुंडली वैगैरे जुळते ते अस लं काहीतरी...काय माझ तर डोकच काम करत नाहीये..मॉम ना कुठल्याही गोष्टीत हट्ट करत‌ बसते..

विराटचे मामा:-सुमन विराट तयार होईल का..मुलीचे घरातले खुप साधे आहे...तुमच्या स्टेटसला तर सुट होईल‌ अशी तरी बघ ना..

सुमन:- दादा स्टेटस पेक्षा दोघांची कुंडली छान जुळली हे म्हत्तावच आहे...आपण आता चालोलच आहोत बघु..त्यात रेवती माझी लहानपणाची मैत्रीण आहे .

विराटचे मामा:-विराट तयार होईल का.

हो तयार होणार मला माहित आहे तो माझ्याशिवाय एक मिनीट राहणार नाही ...उद्याच कसा येतो पळत बघ तु सुमन हसत बोलतात) जेव्हा पासून डॅड गेलेत त्याचे तेव्हापासुन फक्त आमच्यासाठीच जगत आला..आम्हा दोघांनी कुठल्या गोष्टीची कमी पडु नये , याचीच काळजी करत‌ असतो..स्वतःचा कधी विचार केलाच नाही...आमचा विचार करत करत स्वतः दगडाचा झालाय..मला वाटतयं ही मुलगी त्याच्या आयुष्यात आली ना त्या दगडाला पण फुलं उमलतील..आताही स्वतःचा नाही तर बिझनेस वाढेल म्हणुन लग्न करायला तया‌र झाला ...

विराटचे मामा:- देवाने कुठे तरी त्याच चांगलच लिहले असेल.तु काळजी करु नकोस जास्त..

सुमन गालात हसतात.
.
.
.
पिहुचे घर...

रेवती:- अहो गाडी दिसते सुमन आली वाटते...चला

भिमराव:- हो हो चल ...दोघे बाहेर आले..सुमन विराटचे मामा उतरले.

रेवती आणि सूमन लाहानपणीच्या मैत्रीणी ..दोघी गळ्यात पडतात.

भिमराव:- या,या आत बसु चला..
.
.
.
सुमन घराकडे नजर फिरवत सोप्यावर बसते... एक हॉ ल,एक किचन दोन बेडरुम छोटस घर,पण छान पध्दतीने सजव ले होते...

रेवती:- सुमन तुझ्या एवढ घर नाही हहह..

सुमन:- घर बघुन मला यायचे असले असते तर मी आले पण नसते...अस काही मनात आणु नकोस...

रेवती भिमराव यांना बरे वाटते..

सुमन :- रेवती मी तुला माझ्या मुलाची कुंडली पाठवली होती ..तू पण बघितली ना पिहू आणि विराटची पत्रिका जुळवून ...

रेवती :- हो बघितली दोघांची छान निघाली ...

सुमन:- मी विराटचा कुंडली दोष सांगितलं होता ...म्हूणन च बघ म्हणाले उगाच तुला नंतर शन्का नको ...

रेवती हसते ...

सुमन:- पिहू कुठे ...

रेवती:- हो आहे ना..प्रांजल पिहूला आण ...

प्रांजल पिहूला घेऊन येते ...

पिहू ने छान पिच कलरचा अनारकली घातला होता .केस मोकळे हलकासा मेकअप स्टोनची छोटीशी टिकली तीच रूप बघून सुमन तिला बघत बसली ...विराट ला शोभेल अशी होती...ये बेटा बस असं म्हणत सुमन ने पिहूला जवळ बसवलं ..

पिहू नर्व्हस होतच आईकडे बघत सुमन च्या शेजारी बसली ...

सुमन तिला प्रश्न विचारले ,पिहू ने पण घाबरतच उत्तरे दिली .

सुमन : रेवती विराट उद्या येणार आहे उदया ये तू घरी ...तुम्ही हि भेटा ..

भीमराव :- पिहू जा बाळा ..(पिहू प्रांजल आत निघून जातात )पण लग्न थोडं घाई होत नाही का....म्हणजे ती अजून शिकतेय ना...

सुमन:- मी पण घाई केली नसते दादा पण विराटच लग्न ह्याच महिन्यात झाले तर त्याचा कुंडली दोष नाहीसा होईल ...आणि पिहूच शिक्षण लग्नानंतर हि करू शकते ...या उद्या असं म्हणून ते निघून जातात

रेवती:- अहो तुम्ही पण एवढं चांगलं स्थळ आल आपली मुलगी राज करेल ...तिथे

भीमराव:- हो ग पण मुलगा कसा काय माहीत ..

रेवती:-अहो काय तुम्ही , आपण ऐकलंय आईला बहिणीला किती जीव लावतात लहान वयात नाव कमवलं मग चांगलाच असेल ना..आणि तुम्हाला सांगते. असे स्थळ परत मिळणार नाही तुम्ही उगाच मध्ये काही काढू नका ...पिहू तर आपली शब्दाबाहेर नाही ..

भिमराव:- बघु उद्या भेटुन ...

विराट सगळं काम सोडून आईला घ्यायला सकाळी नऊ वाजेपर्यंत टच ...

विराटचे मामा:-सुमन दार उघड विराट आलाय...

विराट रागानेच इकडेतिकडे चकरा मारत होता..मॉम‌ काय दरवाजा उघडायच नाव घेत‌ नव्हती.

सुमन:- तो लग्नाला तयार असेल तर मी त्याला तोंड दाखवणार आहे..आणि आता आलाच आहे तर मुलीला ही भेटायच ..

विराट ऐकुन जागीच थांबतो...मामा मॉमला सांगा मला आज संध्याकाळी दिल्ली ला जायच परत मी आठ -दिवस नाहीये....

विराटचे मामा:- ते तु आणि सुमन बघुन घ्या...मी कोणाला समजावु...मामा निघुन गेले..

विराट दाराजवळ येतो..मॉम..लिसन..मी काय बोलतो आपण ह्यावर नंतर बोलु मी दिल्ली वरुन आलो ना..

सुमन:- नाही आत्ता ते येणार आहेत .पिहु ला पण बोलवलं तिच्या शी ही बोल तु.

विराट :-‌ मॉम तु बाहेर ये मग बोलु आपण...

सुमन दार उघडते...विराट मॉमला बघुन दिर्घ श्वास घेत लगेच मिठी मारतो...मॉम तुला माहीत आहे ना तुझ्याशिवाय मी राहु शकत नाही...

आईचे ही डोळे भरून येतात..त्या डोक्यावरुन पाठीवरून हात फिरवते त्याच्या चेहरा ओंजळीत घेऊन कपाळाला किस करतात...
विराट ऐक ना माझ ‌‌..ती त्रिशा मला बिलकुल आवडत नाही..आणि तु त्रिशाशी लग्न केलं तर मी कधीच त्या घरात पाऊल ठेवणार नाही आणि तुझ्याशी कधीच बोलणार नाही..


विराट:- मॉम काय बोलतेस..

सुमन:- ठिक ये तु तुला हव तस कर मला काय करायचे ते क‌रेन..

दोघेही खुप वेळ शांत बसतात...

विराट:- कुठली मुलगी????

सुमन चमकुन:- माझ्या मैत्रीणीची मूलगी आहे .ती येणार आहे तु बोल तिच्याशी खुप छान आहे ...ती मला ..

विराट:-बस...कधी येणार आहे.दुपारी आपल्याला निघायच आहे.एवढ बोलुन विराट निघुन जातो.

सुमन खुश होते.

.
.
.

पिहुचे आईवडील येतात..सगळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात.विराट येऊन बसतो...आई मुळे तो पण वरवर हसुन त्याच्याबद्दल सांगतो..दोघांना विराट आवडतो..

सुमन:- पिहु आली नाही..

रेवती:-नाही ते तिचा लास्ट पेपर होता ना,..

सुपन:-हम्म..रेवती मी गुरुजींना लग्नचाी तारीख आज विचारली ,पंधरा दिवसाचा चांगला मुहर्त आहे..

रेवती भिमराव एकमेकांनाकडे बघतात..व‌िराट पण रागाने आईकडे बघत होता.

सुमन:-का काही प्रोब्लेम आहे का ?

नाही तस नाही पण तयारी सगळ नीट होईल का..

हो गं रेवती होईल सगळ तुम्ही फक्त मूलगी नारळ द्या काळजी करु नका

मॉम ..

सुमन कटाक्ष टाकतात.तो शांत बसतो.
.
.
.

घरी आल्यावर रेवती पिहुला सांगते.

पिहु :- मम्मी अग ऐवढ्या लवकर मी ओळखत पण नाही..

विराट:-हो ग राणी पण आम्ही भेटलो गं छान आहे...अहो,तुम्ही सांगा ओ.

भिमराव:-मला पण तेच वाटतयं गं पिहु बरोबर एकदा विराट बोलला असता तर.

रेवती:-अहो तो किती घाईत होता दिल्ली ला जायच होते.आता परत दहा दिवस नाही...आणि परत हे स्थळ गेलंतर‌. नाही नाही ..पिहुला पण परत लग्न योग नाहीये...सात आठ वर्षानी आहे..

पिहु:-पप्पा माझ लास्ट ईयर आहे अस कस अचानक.

रेवती:-हे बघ, पिहु लग्नानंतर पण शिकु शकते.बाळा तु सुखात राहशील...नंतर परत अस स्थळ येणार आहे का .अहो त्यांना होकार कळवा.मी ह्या बाबतीत कोणाच ऐकणार नाही.अस बोलुन रेवती आत निघुन जाते..

इकडे पण सुमनने तिच्या मनासारख केलं,डील कॅन्सल त्याचा राग रोहिणी ला आलाच होता..पण तिच्या पेक्षा सुमनच सगळे ऐकणार हे ही माहीत होते.सुमन ‌ने मुद्दामच पिहु आणि विराटची भेट करुन दिली नाही...तिला माहीत होतं वि‌राट विचार करणार नाही लग्नाच्या आधीच काहीतरी गोंधळ घालुन मोकळा होईल..पंधरा दिवसात लग्नसोहळा पार पडला.

शेवटी दोन्ही आईया स्वार्थी झाल्या.त्यांनाही दोष देऊन तरी काय फायदा त्यांच्या मुलांचे सुख महत्तावाचे होते.हे सगळे नियतीचे खेळ असतात...

.
.
.
दारावरची बेल‌ वाजते.
रेवती दार उघडते. पिहु दारात उभी होती मस्त ग्रीन कलरची पैठणी गळ्यात दागिने लक्ष्मीच रुप दिसत होती...एका आईला काय हव आपली लेक जिथे नांदेल .सुखात नांदु दे..आईला तिच बाहेरच रुप बघुन मन भरुन आले..पण पिहु आतुन तुटलेली हे तिने चेहरयावर आणुन न देता आईला जोरात घट्ट मिठी मारली..


सुमन विराटच्या रुममध्ये येतात.


(विराट फोनवर बोलतच आवरत असतो त्याने मॉम वर नजर टाकली..फोनवरच बोलण संपवुन फोन ठेवला..)

विराट:- गुड मॉर्निंग मॉम.

सुमन:- तु पिहूला काल काय बोलला ..(त्यांनी स्टडीरूमधुन पिलो आणून बेडवर नीट ठेवला.)

विराट :- काही न बोलता लॅपटॉप चेक करत होता..

सूमन:-विराट माझ्या प्रश्नाच उत्तर हवे ,(मॉमने लॅपटॉप बाजुला काढत्याने मॉम कडे बघितले )

वि‌राट:- तुला ही माहित आहे ..मी काय बोललो असेल मग विचारतेस का..

सुमन:- अरे त्या बिचारीचा काय‌ द‌ोष आहे .तिला का बोलला

सुमन:-मॉम‌ हे बघ जे नातं कधी जुळणारच नाही .त्या मुलीला मी आशा का दाखवु.तिनेही उगाच स्वप्न बघितली असतील.तिला मी वेळीच जाग केलं पुढे जाऊन तिला त्रास होणार नाही.

सुमन:-विराट ,काय बोलतो‌स...लग्न झालं आणि तिची जबाबदारी तुला एका दिवसासाठी नाहीतर आयुष्यभर घ्यायची...तु एकदा तिला जाणून घ्यायचा तर‌‌ प्रयत्न‌ कर..अरे हे नात कच्च आहे त्याला रेशमी धागा बांधुन रेशमी नाते कर मग बघ संसार तुमचा सु‌खाचा होईल.(मॉम समजवुन सांगत होती..पण तो तर त्याच्याच धुंदीत होता .)
(मॉम रागाने उठत) तुला आत्ता नाही कळणार ..जेव्हा पिहुची सवय होईल ना तेव्हा तुला तिची किंमत कळेलं.( त्या निघून गेल्या.)

(विराट ने मॉम कडे बघितले.त्याला तिचा कालचा चेहरा आठवला.तिचे पाणीदार डोळयातुन ओघळते अश्रु ..ते सगळ डोळ्यासमोरुन गेलं तो लगेच भानावर येत ताडकन उठला..बॅग घेऊन निघाला.)
.
.
.
.

विराट पाच -सहा दिवसाने ऑफिसला आला.तो ऐन्टर झाला तसा सगळा स्टाफ बुके घेऊन उभा होता...सगळ्यांनी त्याला काँग्रुज्युलेशन केलं त्यानेही वरवर हसत थँक्स केलं .तो‌ त्याच्या केबिन गेला..

मानव:-(पर्सनल स्केरटरी आणि त्याचा बेस्ट फ्रेंड) :-वि‌राट ऐवढ्या लवकर घाईत लग्न केलं ठिक आहे फक्त फॅमिली होती...बट आम्ही पण फॅमिलीच आहोत ना...एक पार्टी तरी द्यायची ..हह

विराट:- ..लग्नच झालं... कुठलं मेडल जिंकलो नाही पार्टी ‌द्यायला ..तरीही तु माझ्यातर्फ स्टाफसाठी पार्टी अरेंज कर ..

मानव:- अरे विराट ,तु आणि मॅम‌ पण हव्यात ना...कसा रे तु,अनरोमाँटीक...


विराट एक लुक देत ,ऑफिस मध्ये फक्त काम ...बस झाल्या चर्चा कामाला लाग...आणि हो ती मोहितेची मूलगी आली कि मी नाही म्हणुन सांग...

मानव:- दोन दिवस झाले फोन येत आहेत..मी बोललो ऑफिसला दहा बारा दिवस येणार नाही.

विराट:- हम्म..
.
.
.

.
.
.रेवती:- पिहु बाळा चल काही तरी ‌खाऊन घे..आल्यापासुन झोपली आहे...

पिहु :- (डोळे उघडत) मम्मी थोड्यावेळ नंतर खाते.

रेवती हसत डोक्यावरून हात फि‌रवत निघुन जाते.

पिहु आई गेल्यावर विचार करत‌ बसते..मम्मी पप्पांना कळलं तर त्यांना किती त्रास होईल..काय स्वप्न बघितली आणि काय झालं तिच्या डोळ्यातुन अश्रु निघतच होते.पण त्यांची तर‌ काय चूक आहे.काहीच डोक चालत नाही..आणि डिवोर्स ह्या शब्दाचा कधी जास्त विचार केलाच नाही आता त्याला कस सामोर जायच.काय माझ नशीब..कोणाला सांगता ही येत नाही.मोठ्या लोकांसाठी ह्या किती सोप्या गोष्टी असतात.बोलताना साध विचार पण केला नाही मला काय वाटेलं माणुसकी नावाचा प्रकार माहीतच नाही..
.
.
.


.

पाच-सहा दिवसांनी सुमन, वी‌रा पिहुला घ्यायला येतात.

सगळे गप्पा मारत जेवण करतात...सूमनला पिहुच्या नजरेत आपण दोषी आहोत हे कळत होते..पिहुच आधीच बोलण आणि आत्ताच बोलण्यात फरक पडला होता...घरी गेल्यावर‌ बोलु म्हणुन सुमन ही शांत होत्या ..

वीरा आणि प्रांजलची पण छान ओळख झाली होती.त्या एकाच वयाच्या असल्यामुळे त्यांच चांगलच जमत होते

भिमराव:- सुमन ताई...

सुपन:- हा बोला दादा.

भिमराव:- पिहुच्या शिक्षणाच बोलायच होतं..

सुमन:- हो बोला ना..

भिमराव:- आता आहे त्या कॉलेज मध्येच राहू दया माझ म्हण होतं एका वर्षासाठी कश्याला चेंज करायच.बघा विराट ह्यांना पटत असेल कळवा.

सुमन विचारात पडतात ..(पिहु इ‌थे राहीली कि विराटला ही तेवडच हवे)दादा.. अस कस ती इथे आम्ही सगळे तिकडे नको त्यापेक्षा एक तर घरची मोठी सुन लोक नाव ठेवतील ना..तुम्ही काळजी करु नका तिच वर्ष वाया जाऊ देणार नाही मी

जशी वीरा तशी मला पिहु आहे.

पिहु अजुन कोड्यात पडते..हे असे का वागतात..सगळी गुण माहीत असेल मुलाची पण ती प्रश्नअर्थी नजरेने बघत असते.पण जेवढा हयांचा दोष आहे तेवढाच माझ्या मम्मीचा पण आहे एकावर कस काय मी राग धरु शकते..तिच डोकच काम करत नव्हते.

भिमराव पण आता थोडे निश्चीत होतात.

पिहु जाताना परत रडू लागली .तिला सोडुन जायची इच्छा नव्हती.तिला काय कराव कोणाला काय बोलाव काहीच सुचत नाही ‌...आता आपण शांत राहव हाच तिला बेस्ट ऑप्शन वाटत‌ होता.

रात्रीचे आठच्या दरम्यान सगळे घरी आले..

सुमन:- पिहु जा फ्रेश होऊन ये...जेवण करु हह

पिहुने नजर‌ खाली करत फक्त मान डोलवली.

सुमन पिहू‌ जाईपर्यंत तिच्या कडे बघत होत्या.

पिहु फ्रेश झाली..ती चेजिंग रुममध्ये साडी चेंज करत होती.

विराट ऑफिसवरुन आला.तो त्याच्या त्याच्या धुंदीत फोन वर बोलत रुममध्ये चालला होता. डोरच लॉक त्याच्या चावीने उघडले आणि आत‌ गेला.बॅग जाऊन स्टडी रुममध्ये ठेवली श‌र्टची बटण काढतच तो चेजिंग रुममध्ये जाऊन पिहुला धडकला.

ती पडणार कि विराट ने तिच्या कमरेला पकडलं दोघांची नजरानजर झाली दोघेही एकमे़काना कडे ब्लँक होत बघु लागले.
विराट तिच्या डोळ्यात आरपार बघत होता.तिने ही दोन्ही हाताने त्याच्या शर्ट घट्ट पकडले होते....त्याने अलगद‌ तिला उभे केले..उभे राहाताना विराटाचा हाताच्या स्पर्शाने पिहुची तंद्री तुटते ती जारोतच ओरडली आआआआ..

त्याने दचकुन तिला‌ सोडले..तिला तो वरून .खाली बघत होता..तिने अर्धवटच साडी घातली होती..त्याला वळता ही येईना..तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला होता.

तु..म्ही....ती ओरडुनच बोलत होती.

त्याने तिच्या तोडांवर हात ठेवला.तशी ती लगेच डोळे ताट करत त्याच्याकडे बघु लागली.ती पुर्ण पुणे घाबरुन थरथरत होती.

विराट:(चिडत) ओरडते का...मी काही करणा‌र नाहीये.तु माझा शर्ट पकडला तो सोडला तर मी जाऊ शकतो...कळलं का..

तिच्या लक्षात येताच पटकन त्याच्या शर्ट सोडुन वळली..तो ही बाहेर आला..

ती थरथरत घाबरून पटकन आवरून घेते ...ती विचार करते दार लॉक होते आत आले कस काय..तिला राग सुध्दा तेवढाच आला होता.ती घाबरतच बाहेर येते ...विराट तिलान बघता आत जायला निघतो...


पिहु :- तु....तुम्ही ...दार लॉक असुन कस काय आत आला.ती घाबरत्या आवाजात त्याला बोलली.तिचा आवाज ऐकून विराट थांबतो.
(तो परत वळुन तिच्या समोर ‌येऊन थांबतो..).


विराट:-मला लक्षात‌ आले नाही नेक्सट टाईम मी परत अस काही होणार नाही काळजी घेईल..

(पिहु थरथरत्या आवाजातच नजर इकडेतिकडे करतच बोलू लाागली).हो घ्यावीच लागेल आता ह्या रुममध्ये सहा महिने तरी राहावे लागणार आहे...तु..तुम्ही आधी ऐकटेच राहत होता..पण आता मला ही ह्या ...ह्या...(ती पुढे बोलतच होती...विराट मध्ये बोलला)

बोलताना थोड स्पष्ट बोलं घाबरतेस का... मी काय खाणार नाहीये तुला...त्याचा कडक टोन ऐकुन ती त्याच्याकडे बघु लागली...

मी....मी...कुठे घाबरते...तुम्हाला तर मुळीच नाही ..सगळा जीव,एकवटुन ती बोलत होती..(तिच्या डोक्यात वेगळच विराट परत तिला,हात लावु नये आपल्याला वेगळया नजरेने बघु न‌ये ... म्हणुन जे येईल ते बडबडत होती.)

(त्याला तिच्या बोलण्यातुन कळलं होत ही वेगळाच काहीतरी
आपला गैरसमज करुन घेत आहे...)तो एकटक नजर रोखुन बघत तिच्या कडे वरून खालुन नजर टाकत फ्रेश होण्यासाठी ताडकन निघून गेला.

ती ही बाहेर आली .अजुन धडधड होतच होते तिला...

तो आत जाऊन बडबडत‌च होता..स्वतःला काय अप्सरा समजते का काय चुकुन झालं ..धड नीट‌ बोलता‌ येत नाही...काय‌ बोलत होती तिलाच माहित तिच्या सारख्या मुली दररोज पुढे मागे फिरतात..कधी माझी नजर पडत‌ नाही आणि ही कोण कुठली अस म्हणत असताना ...तो चेहरा धुवायला नळाखाली हात धरतो
तळ हातावर लीपस्टीक चे निशाणावर त्याचे लक्ष जाते..त्याच्या लक्षात येत त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला तेव्हा ओठांची लीपस्टीक लागली होती..तो‌ त्याच्यावरुन हात फिरवतो तिचा ओठांचा स्पर्श जाणवु लागतो..तिच्या कमेरला नकळत पणे हात लागला होता.‌ते त्याला आठवुन थोड वेगळच फिल होतं. फस्ट टाईम कोणाला तरी त्याने त्याच्या ऐवढ्या जवळ‌ येऊ दिलं होतं...भानावर यते तो लगेच सगळे विचार झटकुन फ्रेश होऊन बाहेर येतो.चेजिंग रुममध्ये‌ येतो..तिचे कपडे तसेच अस्थावस्थ असतात...काय करून ठेवलंय एका तासात माझ रूम तो रागातच आवरुन बाहेर येतो..
.

सगळे जेवायला बसले होते...पिहुला थोड ऑकवर्ड होते.वीराची ,दियाची बडबड चालु असल्याने ती थोडी रीलीफ होत जेवत होती...रोहिणी तर आल्या पासून पिहुशी बोललीच नव्हती..

दामोदर विराट बिझनेस डीसकस करत होते.

सुधा:- वहिनी उद्या पिहुला आमच्या घरी घेऊन जाते. मी तिची ओटी भरते.

सुमन हसत:- हो‌ जा घेऊन ...

सगळ्यांची जेवण झाली...

पिहु मावशींना मदत करत होती. किचन मध्ये ते नको म्हणत होत्या .

सुमन:- पिहु इकडे ये ,उद्या पासुन कर‌‌ मदत उद्या लवकर उठुन तुझ्या हाताने गोड काहीतरी कर..सुमन डोक्यावरुन हात फिरवतात.

पिहु बाहेर येऊन बसते..

सुमन:- विराट,मला बोलायच आहे...

विराट:- हा..मॉम.

सुमन:-पिहुच लास्ट ईयर राहीलं आहे मी म्हणत होते तिच वीराच्या कॉलेज मध्येच घेऊ...

विराट:-मॉम ,ऐवढी काय लग्नाची घाई लागली होती तुला तिचं स्टडी तर‌‌ पुर्ण होऊ द्यायचे होते..

तुला जेवढ बोललं तेवढ क‌र..सुमन बोलुन निघुन जातात.

पिहुला तर गप्पा मारायला वीरा,दिया मिळाल्या होत्या..त्या तिघी बाहेर गप्पा मारत‌ होत्या ...

सुमन:- वीरा दिया चला आता जाऊन झोपा उद्या पासुन कॉलेज चालु मस्त पंध‌रा दिवस सुट्टया मारल्या.

त्या पण ठिक ‌ये म्हणून निघून गेल्या.पिहु उठणार तर सुमन यांनी तिचा हात धरत परत बसवलं

पिहु ने नजर फिरवली..

सुमन:-पिहु ,विराट तुला काय बोलला असेल तर मी माफी मागते .

पिहु:- अहो आई हे काय बोलताय, प्लिज अस काही बोलु नका .मी समजु शकते कोणी कस लवकर अॅक्सपेट होईल का ..मला ही सगळ नविन तस त्यांना ही हे सगळ नविनच आहे...

सुमन:-एक विचारु

पिहु:-हहह.....

सूमन:-विराट काय बोलला तुला ....

(पिहु दोन मिनीट ब्लँकच होते काय बोलाव...डिवोर्स जर कळलं तर घरी पण कळु शकते.मम्मी ला कळलं तर काय होईलं आताच आजारातुन बरी झाली.)

सुमन:- पिहु ..पिहु..

पिहु:- अअअ.ते ..हे काही नाही अस वेगळ काही..आई तुम्ही काही काळजी करु नका मी ठिक आहे...

सुमन:- पिहु थोडा वेळ दे विराटला तो मनाचा चांगला आहे गं .पण परस्थितीमुळे तो जरा जगायच विसरुन गेला.तो त्याच्या डॅडच्या खुप जवळ होता अचानक ते..(सुमन यांचे डोळे भरून आले..)(.पिहुने त्यांच्या खांद्यावर हात ठेवुन आधार दिला.).तेव्हापासुन जो खचला .. परत त्याने आमच्या व्यतीरिक्त कोणालाच जवळ‌ येऊ
दिले नाही...त्यांनी त्यांचे डोळे पुसले..चल झोप ...उशीर झाला..उद्या लवकर उठ ...तरी मी येतेच उठवायला...

पिहु:- हम्म..(पिहु उठुन रुमकडे वळते.तिला तर रुममध्ये जायचच जीवावर आलं होत.).ती हळुच दार उघडते..विराट लॅपटॉप घेऊन बसला होता.त्याने तिच्या वर नजर टाकली.परत खाली बघतलं.दार उघडच ठेवुन आत आली..

विराट:- ऐ.सी.ऑन आहे,डोर लॉक कर.

पिहु:- हहह..ती परत वळुन दार लावते.ती शांत चेअर वर बसून मोबाईल बघत बसली

विराट:- तु बेडवर झोपु शकते...

पिहु:- नाही मी ठीक आहे ,तुम्ही झोपा बेडवर वर मी झोपेलं सोप्यावर तुमच काम झालं की ..

विराट:- मी आत स्टडी रुममध्ये झोपणार आहे..

पिहु:- हम्म..ती बेडवर जाऊन बसली...तिला झोप आली होती ..पण कस झोपायच विचार करत बसली..विराटला ही जाणवले तिला मी बसल्यामुळे ऑकवर्ड होत असेल.तो पटकन उठुन आत गेला.स्लाईडिंग डोर लावल्यावर ती आडवी होत रिलॅक्स झोपली.


सकाळी पिहुला पक्षांच्या किलकीलाहट च्या आवाजाने जाग
आली...ती डोळे उघडत इकडे तिकडे बघु लागली.तिने गॅलेरी बघितलीच नव्हती.ती पटकन उठुन बाहेर गेली..सगळीकडे छान छोटछोटी झाडे कुडींत लाईनीत लावली होती.. खाली आर्टीफिशियल लॉन होते..एका साईडला झोपाळा तर एका साईडला दोन चेअर खूप प्रसन्न वाटत होते नुकताच सुर्य उगवला होता...थोडासा गारवा तिचा चेहराच खुलला वातवरण बघुन बर्डसची चीवचीव ऐकुन ती ही गूणगुणु लागली..बर्डस इकडेतिकडे फिरुन ह्या वेलीवर‌ त्या वेलीवर झोका खेळत चीवचीव करत होते.तिला जाणवलं ते पाणी शोधत आहे.ती इकडेतिकडे बघते कुठेच पाणी ठेवले नव्हते.ती स्वतःशीच बडबड क‌रत होती इतक छान गार्डन टाईप केलं साध पाणी नाही..तिला आत काचेचा बाऊल दिसतो.ती आत जाऊन त्या बाऊल मधले मार्बलस काढुन टीपाॅय वर टाकते.त्या आवाजाने विराटला जाग येते तो उठुन बाहेर येतो..ती बाऊल घेऊन गॅले‌रीत जात होती...त्याच डोकच फिरते.सगळे मार्बलस इकडेतिकडे पसरले होते.तो रागानेच बाहेर जातो..ती बाऊल मध्ये पाणी भरत होती.

तो बोलणारच कि ती काहीतरी करत आहे म्हणुन तो गॅलेरीच्या दारातच थांबला.

तिने पाण्याने भरलेले बाऊल गॅलेरीच्या कटड्यावर ठेवले..हळुच मागे सरकली..तो तिलाच निहाळत प्रश्नाअर्थी नजरेनेच बघत होता..
दोन पक्षी पटकन पाण्यात चोंच घालुन पाणी उडवत पिऊ लागले
.
.
.
.

ती खुदकन हसली...तिचा,चेहराच उजळला..विराट तिलाच निहाळत होता..तिच हसण आज त्याने बघितलं होत..हसताना तिला गोड खळी पडत होती...तिच ते निरागस हसण्यातच तो गुंतुन गेला..झोपेतुन उठली तरी हसण्यानी तिच्या चेहरा फ्रेश दिसत होता..साडी सगळी चुरगाळलेली ,एका हाताने पदर वर घेत तिने खांद्यावर टाकला..चेहर‌्यावर मेकअपचा,एकही लवेश नव्हता..काल कपाळावर टिकली होती.आज नव्हती तर अजुन क्युट दिसत होती..तो तिच्यात हरवुन गेला.होता तिच गुणगुणने कानाला वेगळाच स्पर्श करत होता...तो टक लावुन तिच्या चेहरयाकडेच बघत होता.

तिने नजर विराटवर पडली...तिने त्याला बघितलं तसा तो दबकला...ती थोडी दचकून इकडेतिकडे बघत‌ त्याच्याजवळ ‌येऊ लागली.

त्याला वाटलं ,त्याची चोरी पकडली की काय ..आता काय लेक्चर देते काय माहीत कालच थोडी इमेज खराब झाली आता तर..अस मनात बोलत असताना.ती समोर येऊन थांबते.

ती केस मागे घेत ..सॉरी मी न सांगताच बाऊल घेतला..सॉरी ...

🙄 ती बाऊलच बोलत आहे हे कळताच तो लगेच रीलॅक्स झाला.

मागुन पक्षच्यांची गर्दीने बाऊल खाली पडला.ती (लगेच डोळे झाकत) हळुच एका डोळ्‌‌याने त्याच्याकडे बघते..

तो नजर रोखुनच बघत असतो.

सॉरी ..सॉरी..मी तुम्हाला नविन आणून देते ती बोलतच होती( तो डोक्याला अंगठ्याने घासत आत निघून जातो.त्याला तर त्या बाऊलच काही घेण देणच नव्हते )

तो काही बोलला नाही म्हणुन ती रीलॅक्स होती.

स्पीकर वर सॉन्गस जोरातच लावत वर्कऑऊट करायला लागला.

पिहु:- काय गाणी आहेत‌..सकाळी सगेळजण देवाची नाही तर मस्त हिंदी गाणी लावतात..आणि हे कुठली इंग्लिश गाणी आहेत‌..काय माहित ‌‌ती एकटीच बडबड करत आत येते.(बाहेरुनच स्टीडरुम वर नजर‌ टाकत.बेडवरची बँल्केटची घडी घालत.).मागच्या जन्मी हिटलरच्या हाताखाली कामाला होते का काय माहीत एक स्माईल देता येत नाही...काय रे देवा माझ्या गळ्यातच बांधायचा होता का हा दगड..हहहुह....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



क्रमशः












.