अंजलीच्या सांगण्यावरून सोहम तयार झाला . आजची अंजली आणि कालची अंजली ह्यात जमीनअसमान चा फरक होता . दोघे कॉलेजला जायला तयार जाहले .आज पासून त्यांची परीक्षा चालू झाली होती .दोघांनीही परीक्षेची तयारी जोरात केली होती .कालच सगळे विसरून दोघाणीही पेपर लिहायला सुरुवात केली . पहिलाच पेपर सोपा आल्यामुळे दोघेही खूश होते .
आठ दिवसानी अंजली आणि सोहम दोघांचे पेपर संपले . पेपर चांगले गेल्यामुळे सोहम खूप खूष होता.पण , अंजली च वागणे त्याला जरा वेगळे वाटत होते .तिच्या मनात काय चाललाय हे ओळखणे फार अवघड होते .ती ने तिच्या भविष्याचा काय विचार केला आहे , त्याला कलेनाच .पण , आज तिला सगळं विचारायचे .अस त्याने ठरवल . पेपर संपला , सोहम ने अंजलीला तिच्या सोबत हॉटेल मधे येण्यासाठी विनंती केली . अंजली ने ही फारसे आधेवेडे न घेता होकार दिला .दोघेही हॉटेल मधे आले .सोहम ने अंजलीच्या आवडीची ऑर्डर दिली .आता सोहम नी विषयाला हात घातला .तो विचारू लागला .अंजली तू काय ठरवलस ह्या बाळाविषयी ? आपली परीक्षा असल्यामुळे मी फारस तुला काही विचारल नाही .आणि तूझ्याकडे बघून तू ठोस असा काहीतरी निर्णय घेतला.असशील अस वाटतय . तो हे सगळं बोलत असताना त्याचा फ़ोन एकसारखा वाजत होता .पण , तो त्याच्या कडे दुर्लक्ष करत होता . ते बघून अंजली त्याला फोन घ्यायला सांगू लागली . पण तरीही त्याने दुर्लक्ष केले . मग अंजलीनेहि दुर्लक्ष केले . पुढे ती सांगू लागली .' ' तिने हे मुल ह्या जगात न आणण्याचा निर्णय घेतला होता .' ' तीच ते मत ऐकून सोहम ला तर फार मोठा धक्काच बसला .
तिने जो निर्णय घेतला त्याबदल खरतर त्याला तो अपेक्षित होताच .तरी पण त्याला त्याबदल धक्का बसला . सोहम विचारात पडलेला पाहून अंजली बोलू लागली . ' ' सोहम हा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय ' ' .मी तशी डॉक्टर ची बोलले ही .परवा दिवशी हे मुल ह्या जगात नसेल .बोलता बोलताच अंजलीचे डोळे भरून आले .ह्या मुलाने जन्म घ्यावा .हे सुंदर जग पहावे अस मला ही वाटत .पण माझा नविलज आहे . ' ' अर्जुन ' ' कुठे आहे ? हे मला माहीत नाही . त्याला कुठे शोधायच ? आणि शोधले तर तो ह्या मुलाला मान्य करेल का हे माहीत नाही ? आणि एकटी आई म्हणून ह्या मुलाला वाढवावे , तर हे जग हे सगळं मान्य करेल ? शिवाय आई बाबांची बदनामी होईल , ते वेगळच . म्हणून ह्या मुलाला मी ह्या जगात न आणण्याचा मी निर्णय घेतला . सोहम ला अंजली च म्हण , पटत होत .पण , त्याला ते मुल ह्या जगात यावे अस वाटत होत . पण अर्जुनला शोधणे ही तस अवघड होत .त्याच्या नावाशिवाय अंजलीला काहीच माहीत नव्हते . मग त्याला कस शोधायचे ?
जाहले , अंजली हॉस्पिटल मधे निघाली .तिथून ती मैत्रिणी कडे चार पाच दिवस रहायला जाणार होती .निदान घरी तरी तसच सांगितले होते . त्यामुळे घरच्यानी फारस काही विचारण्याचा संबधच नव्हता . अंजली एकटी निघालेली पाहून सोहम तिच्या बरोबर जायला निघाला . अंजलीला ही सोबत हवीच होती . दोघेही हॉस्पिटल मधे आले .डॉक्टर यायची वाट पाहत होते . दोघेही फार घाबरलेले होते . अंजलीच्या डोळ्यातून आसवे येत होती .कोणाचे लक्ष नाही हे पाहून ती पुसत होती . सोहमला तर फार वाईट होते .एक चिमुकला जीव ह्या जगात यायच्या आधीच कोणीतरी नष्ट करतय .आणि आपण त्याला साथ देतोय .त्याच मन त्याला वारंवार अस नको करू ? म्हणून सांगत होत .पण , तो काहीच करू शकत नव्हता .थोड्यावेळाने डॉक्टर आले .अंजलीला आत बोलावले .अंजली आत जायला निघाली . तिने एकदा तिच्या पोटावरून हात फिरवला . मोठा श्वास घेतला .डोळ्यातून घळघळ वाहणारे अश्रू पुसले . आणि हळु हळु पाऊले टाकू लागली . तिचा अंश आज तिच्यापासून ती दूर करणार होती . ती आत चेंजिंग रूम मधे गेली . आणि तिने घरून घालून आलेला ड्रेस काढला आणि हॉस्पिटल चा ड्रेस अंगावर चढवला . ती आत मधे गेल्यावर सोहम तिची वाट बघत बाहेरच उभा होता .ऐत्क्यात एक नर्स त्याच्या जवळ आली . आणि फॉर्म त्याच्याकडे देत म्हणू लागली .' ' हा फॉर्म भरून दया .' ' ......आणि हो, ....खरी माहिती लिहून दया ' ' ... सोहम तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतोय हे पाहून नर्स त्याला बोलली .' ' अहो , अस काय पाहताय ? ' ' तुम्ही ह्या मुलाचे बाबा आहात ना ? .....लग्नाआधी करताना काही वाटत नाही .मग आता कशाला काही वाटायला पाहिजे ......थोड्यावेळाने होताल दोघेही मोकळे ......पण , परत काही करताना थोडस भान ठेवा ......उगीच त्या निष्पाप जिवाचा बळी जातो . एवढे बोलून ती निघून गेली .
सोहम मात्र अजून त्याच विचारात होता .' ' बाबा ' ' .....आणि मी ह्या बाळाचा . .....त्याच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले . ते विचार त्याच्या प्रेमावर , निशाच्या आणि त्याच्या नात्यावर घाव घालणारे होते . असा अविचारी होऊ नको , अस त्याच एक मन काकूल्तीणे सांगत होते .तर दुसर मन त्या बाळाचा विचार कर अस सांगत होते . दोन्ही मनानी त्याच्या डोक्यात काहूर माजवले होते . काय चांगल काय वाईट काही कळेना . ऐत्क्यात त्याच्या समोर एक माणूस पेढ्याचा बॉक्स घेऊन उभा होता .त्याच्या आवाजाने सोहम च्या डोक्यातले विचार अचानक थांबले . त्याने सोहम च्या हातात एक पेढा ठेवला , आणि तो म्हणाला हा घ्या पेढा मी ' ' बाबा ' ' झालो . ' ' मुलगी ' ' जाहली .जगातील सगळ्यात मोठा आनंद मिळाला . सोहम त्याच्याकडे पाहतच राहिला . अचानक त्याचा निर्णय झाला .आणि तो पळत आत' ' ऑपरेशन रूम ' ' मधे आला .तर , अंजली बेड वर पडलेली .सगळी तयारी जाहली होती . ती थोड्याश्या गूण्गेतच होती . त्याने डॉक्टरची माफी मागितली .आणि बाप म्हणून अंजली च्या पोटातल्या बाळाची जबाबदारी घेतली . डॉक्टरनी ही ' ' एका पापातून आपली सुटका झाली ' ' म्हणून देवाला धन्यवाद दिला . सोहम नी हळूच अंजली ला आधार दिला . आणि तिला घेऊन तो निघाला . अंजली गूण्गेत असल्यामुळे तिला आधाराची गरज होती .त्याने तिला गाडीत बसवली .आणि तो निघाला .त्याला माहीत होते , ह्या निर्णयामुळे सगळच बदलणार होते .त्याच्या आणि निशाच्या नात्याला तडा जाणार होता . जिच्यावर एवढे प्रेम केले .जिच्यासाठी तो ह्या शहरात आलता , सुधारला होता , शिकण्याची आवड निर्माण झाल्ती .तीच व्यक्ती आज त्याच्या पासून दूर झाली होती .पण , हे सगळं तो एक नवीन जीव वाचवण्यासाठी केले ह्याच त्याला समाधान होत . आणि निशा हे सगळं समजून घेयील असा त्याचा विश्वास होता . दोघेही घरी आले .