रेशमी नाते - 16 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - 16

पिहुला त्रिशाचा फोन येतो...पिहु ब्लँक होत तिचा फोन उचलते...

हॅलो

पिहु मला तुझ्याशी बोलायच आहे...

आत्ता मी बाहेर आहे...

हो माहित आहे मी पण लग्नालाच आले आहे.

पिहु नजर फिरवून बघते..हम्म मग मी काय करू...

मला विराट आणि माझ्या नात्याबद्दल बोलायच होते...

पिहुचे डोळेच भरुन येतात..ती स्वतःला सावरते..हे बघ त्रिशा मला काही इंटरेस्ट नाहीये..ते तु आणि विराट,बघुन घे...

पिहु खूप महत्वाच आहे..विराट बद्दल एक गोष्ट सांगायची आहे..

त्रिशा....

पिहु एक ना,प्लिज मी स्टोरेज एरीया समोरच्या रूममध्ये तुझी वेट करत आहे...मला लवकर निघायच आहे....ती एवढं बोलुन फोन कट करते..

पिहु ब्लँक होते..त्रिशाला काय बोलायच आहे...ते पण विराट बद्दल ....जाऊ कि नको...ती खुप विचार करते...पण एकदा भेटून काय आहे ते क्लिअर तर‌ होईल..माझ्या मनाचा गुंता कमी तरी होईल.ती एका,स्टाफ मेंबरला विचारते स्टोरेज ऐरिया कुठे आहे.

पिहु स्टोरेज एरीया समोर येते..ती इकडेतिकडे बघत त्रिशाला हाक मारते...

त्रिशा मागून येते....पिहु...

पिहु दोन मिनिट दचकतेच हा, बोल लवकर पिहुला तिथली भयाण शांतता वेगळीच ज‌ाणवत होती.‌

हो बोलते ना एवढी का‌‌य घाई आहे..त्रिशाचा टोन पिहुला वेगळाच जाणवत होता...डोळे रागाने लालबुंद झाले होते.

त्रिशा आपण नंतर बोलु तु बहूतेक ड्रिं....क केली आहेस...पिहुला तिचा चेहरा बघुनच भिती वाटत होती..

पिहु जायला निघते तर त्रिशाने तिचा हात पकडला...हो,मी ड्रींक केली...फक्त तुझ्यामुळे तु...तु...तुच़‌ माझ्या लाईफ मध्ये काटा बनुन आली आहे.त्रिशा किंचाळुन रडतच बोलु लागली‌.

तिचा आवाज ऐकून पिहु पर्णपणे ब्लँक झाली होती...ती घाबरुन इकडेतिकडे बघ‌ु लागली...कोणीच नव्हतं...त्रि...शा...ती हात सोडवण्याचा प्रयत्न करु लागली..

कोणी नाहीये,इथे सगळे लग्न एन्जॉय‌ करता येत..

पिहुने तिचा हात कसाबसा सोडवुन घेतला.जी जायला वळली तर त्रिशाने मागून तिला ढकलले. ती स्टोरेज एरीया मध्ये जाऊन पडली...त्रिशाही आत येऊन दार लावते...त्रिशाच रुप बघून पिहुचा थरकापच उडला पिहु सरळ उभ राहत तिच्याकडे बघत‌‌ ..त्रिशा तु...

मला वाटलं आता विराटला तोंड दाखवणार नाही..पण काय आलीच लग्नला का आली परत विराटच्या लाईफ मध्ये‌...तो फक्त माझा आहे तु का आमच्या दोघांमध्ये येतेस...त्रिशा तिच्या अंगावर धावतच बोलु लागली.

पिहु तिच भयाण रुप बघुनच सुन्न होती...तिला काय बोलाव कळतच नव्हतं...मी....ते...तु ...

मी ते काय .हहहह.तु जर नसली तर आम्ही मस्त दोघे लग्न करुन आता किती छान राहीलो असतो....तु का आली त्रिशा रडतच तिला बोलु लागली...

पिहु थरथर कापतच बोलु लागली...त्रि....शा...मी नाही येत आहे तूमच्या दोघांमध्ये हे शेवटच भेटण असेल आमच तु आणि हे तुमची लाईफ जगु शकता‌‌‌....पिहु हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला सहारा देण्यासाठी बोलत होती...

त्रिशा शांत होत तिच्याकडे बघु लागली...हो ,तुझ हे शेवटच भेटण होते..ती हसतच बोलु लागली..पिहू तिच हसण बघुन मागे सरकते..

त्रिशा पटकन मागे वळू़‌न तिच्या समोर गन रो‌खून धरते...

पिहु त्या गन कडे सुन्न होतच बघत राहते...एकमिनीट तिला स्वप्नच वाटते...

पिहु गुड बाय तुझी लाईफ ऐवढीच होती...पिहुच लक्ष शेजाराच्या बटणाकडे गेलं...तिने पटकन ते बटण दाबले आणि सग्ळ्या लाईट्स ऑफ झाल्या..त्रिशाने गोळी चालवली‌..पिहू जोरातच ओरडुन किंचाळली...

त्रिशाला काहीच दिसत नव्हते...ती पिहुला हाक मारत होती.पिहु तु गेली का,आहेस ती हसत विचारु लागली...

तितक्यात विराटचा पिहुला फोन येतो...त्रिशा सावध होते‌ पिहु पटकन फोन उचलते‌‌.

पिहू कुठेस आहेस ,सांग मला विराट घाबरतच तिला विचारू लागला ...

मी...ते......ते....मी

हा...बोल पिहु मी आहे ना इथेच आहे..बोल ती घाबरलेली कळताच तो तिला शांतपणे समजावुन विचारु लागतो...

स्टो.....रेज ...ती बोलतच होती कि तिचा मोबाईल बंद झाला .
त्रिशा धडपडतच पिहु शेजारी येते.....

तशी पिहु शांत होऊन दूसरीकडे स‌करते..काहीच बोलत नाही...त्रिशा तिला शोधत इकडेतिकडे नजर फिरवु लागली..

पिहू ...पिहू ...विराट फोनवर जोरताच ओरडुन बोलत होता ...सगळे जवळ येत त्याला विचारू लागले. त्याच डोकंच सुन्न झालं होते...तो स्वतःला सावरत ...पि....हू ...

भिमराव जवळ येत पिहू काय विराट ...ते ही घाबरत विचारू लागले..रेवतीच्या तोंडातुन आवाज निघत नव्हता त्या पडणारच कि ...प्रांजल रेवतीला नीट धरते.

अ ...अ ...ते ..तो काही न बोलता पिहू काय बोली ते आठवत .स्टोरेज एरिया त्याला क्लिक होते.. तो घाबरत पळतच निघाला.त्याच्या मागे सगळे निघाले...कोणाला काहीच कळत नव्हते काय चालले.

दार आतुन लॉक होते...तो दार उघडणाचा प्रयत्न करत होता..त्रिशा.....त्रिशा...तो दा‌र वाजवुन तिला आवाज देत होता...त्रिशा एक नाही दोन नाही...पिहु पण काहीच बोलली नाही.

मानव किज कुठे ह्याची ...मानव पळत जाऊन डुप्लीकेट चावी घेऊन येतो...तो पटकन दार उघडून आत येतो तर फक्त त्रिशा होती.. आणि तिच्या हातात गन होती..

विराट दोन सेकंड तिला बघतच राहतो...तिचा अवतार बघून तर सगळेच शॉक होत बघत असतात...चेहरयावरुनच कळत होते..कि तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे..विराट सगळीकडे नजर वळवतो...पिहू ......तो पिहूला जोरातच आवाज देतो...

पिहू लपून बसलेली त्याच्या आवाजाने सावध होत उठून उभी राहते...सगळ्यांना पिहूला सु‌खरुप बघून जीवात जीव येतो...

अंधार असल्याने फक्त बाहेरचाच प्रकाश पडत होता...

विराट पुढे पाय टाकतो कि त्रिशा त्याच्यावर गन ताणून धरते .....

सुमन जोरातच ओरडतात ....विराट...

विराट मागे हो ...मी ...मी ...ट्री..गर दाबेल..त्रिशा अडखळतच बोलु लागली..

त्रिशा ..हे ...बघ ..(तो हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत तिच्याशी बोलत होता)...त्रिशा गन दे ...मला ....माझ ऐक....

ना....ही ...नाही...ती ट्रिगवर बोट ठेवते...वि...राट तू.... तू... पुढे येऊ नको मी पिहूला मारेन...ती गन पिहू कडे वळवते . पिहु कानावर हात ठेवत जोरातच किंचाळते ...

विराट घाबरून जागीच थांबतो.सगळे शॉक होतच बघत असतात ..रेवती भिमराव तर पिहुला अस बघुन पुर्णपणे घाबरून गेले होते..अंगातल सगळ त्राणच गेल होते .त्यांच्या काळजाच्या तुकड्याला असलं काही फेस कराव लागतं..हे स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता..

हे..बघ ..त्रिशा ..नो.....नो....शांत हो...मी जवळ येत नाहीये...पिहुचा काहीच संबंध नाहीये...इकडे बघ तु गन खाली घे‌..
विराट शांत होत तिला समजावत होता..

त्रिशा मानेनचे नाही म्हणते‌....

त्रिशा गन बघू इकडे ते खेळ नाहीये ..आपण बसून बोलू...तो तिला समजवण्याच्या सुरत बोलत होता .

त्रिशा हसते ..आता बोलायचं इतके दिवस मी मागे लागले होते तेव्हा नाही आठवलं तुला ...काय बोलला होता...पिहुच्या जवळपास भटकली कि काय करेन मलाच माहीत नाही.‌‌प्रेम करतो तू पिहुवर माझ प्रेम‌ दिसत नाही..तूला ...

त्रिशा...क्लाम डाऊन विराट एक पाऊल पुढे येतो.

मानव रीषभ स्टोरेज एरीया चा दुसरा डोर हळुच उघडतात...दोघेही विराट कडे बघतात..तिघांचे इशारे होतात.विराट त्रिशाला स्वतःच्या बोलण्यात अडकवत होता...त्यामुळे त्रिशाच लक्ष मागे गेलं नाही.

पिहू तर थरथर कापतच होती ...तिला फक्त तीचे आई वडील बाहेर दिसत होते...

पोलीस सुूध्दा येतात....सगळ वाताव‌रण भयानक झालं होते..त्यात मिडीया वाल्यांना सुध्दा भनक लागते‌....रोहिणीला तर झटकाच लागतो...त्रिशाच हे रुप बघुन ती पुर्णपणे घाबरून गेली होती..
मागुन मानव,रीषभ तिला पकडुन तिचा हात वर पकडला तसा,विराट पटकन पिहुच्याजवळ जाऊन तिला मिठीत घेतो..तिच्या चेहरयावर फक्त तो किस करत होता.ती थरथर कापतच होती...शु..शु....तो तिच्या दंडला पकडुन तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता..त्याचा जीव तिला जवळ घेऊन भांड्यात पडला होता...

पोलिसांनी ही पटकन त्रिशाच्या हातातली गन घेतली..त्रिशा ओरडत‌ किंचाळतच रडत होती...विराट,मी तूला सोडणार नाही....विराट sss

पिहुने एक नजर त्याच्याकडे बघितलं आणि डोळे झाकुन अंग सोडुन दिलं...विराट ने तिला पटकन पकडले....विराटचा हात पुर्ण रक्ताने भरला होता...तिच्या दंडाला आधीच गोळी लागली होती...लाईट्स कमी,त्या गोंधळात कोणाच पिहुच्या हाताकडे, लक्ष गेलच नाही..आणि पिहुला काय बोलाव तेव्हा सूचतच नव्हतं...विराट तिच्या गालाला हलवत खाली बसतो.‌.पिहु...उठ..पिहु....सगळे पटकन तिच्या जवळ येतात...

पिहूच्या दंडाला रेवती तिचा दूपट्टा घट्ट गुंडाळते...बाळा उठ ना रेवती...रडतच बोलु लागली‌.. भिमरावांचे पाय तर जागीच ‌खिळले होते...

विराटच्या डोळ्यातुन आज पिहल्यांदा पाणी आले होते...तो जोराताच ओरडला..‌पिहुssss उठ...तो तिला हलवु लागला पिहु काहीच रीयॅक्ट करत नव्हती...

काय म्हणावे या नियतीला
का,‌ अशी छळत आहे
रेशमी नाते हे आपले
जोडण्याआधीच तुटत आहे.😔😰😭

( मिनल घाटगे 😊 यांची ‌‌कविता आहे त्यांना मी माझ्या स्टोरी साठी कविता लिहायला सांगितली आहे. ह्यापुढे ही ज्या कविता मी टाकेल त्यांच्याच असणार आहे...)

मानव विराटला हलवतो...विराट अॅब्युलंन्स आली आहे...चल उठ ,त्याने त्याला भानावर आणलं..विराट ‌ने पटकन पिहुला उचलले... लग्नातली सगळी लोक सैरावैरा झाली होती...सगळे सुन्न होतच बघत राहीले...

ताई,सूधा ...मी पिहुबरोबर चालले तूम्ही... सुमन रडतच सुधाला सांगु लागली..‌

सुधा सुमनला जवळ घेते..वहिनी काही नाही होणार पिहूला...

हो..हो..सूमन बोलुन पटकन कारमध्ये बसते..

एक दिड तासात पिहुला पूण्यात आणतात...हाॅस्पिटलमध्ये आधीच सगळी तयारी मानव ने केली होती...अॅम्ब्युलन्स आल्यावर पिहुला पटकन ओपरेशन थेटर मध्ये घेतात जशी लाल लाईट लागली विराटला त्याच्या वडीलांच आठवलं तो स्तब्ध होते गुडघ्यांवर बसला ...मानव नमन ने त्याला धरलं...

दादा उठ ..नमन कंठ दाबतच बोलू लागला...दोघांनी त्याला कसबस उठवुन चेअरवर बसवलं....तो काहीच रीयॅक्ट करत नव्हता..

रेवतीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हते...भिमराव सुध्दा सुन्न झाले होते दामोदर त्यांना समजावत होते......प्रांजल रेवतीला सावरत होती..

सुमनला कुठे जावे कळत नव्हते..पण आत्ता विराट तिची गरज आहे ..त्या विराट च्या शेजारी बसुन त्याला कुशीत घेतात.विराट काही नाही होणार पिहुला....तु बोल ना,बाळा रड तु....

तो सुमन कडे बघत जोरातच बिलगुन रडायला लागतो...मॉम डॅड सुध्दा माझ्यामुळेच गेले ना,...हहह..

नाही अरे ..तु असा का बोलतोस...तो एॅक्सीडेंट होता...त्यात तुझी काहीच चुक नव्हती.सुमन रडतच बोलु लागल्या..

पण मॉम मी होतो ना बरोबर,मला काही झालं नाही त्यांना कस.....आणि आज माझ्यामुळे पिहुला...
(विराट आणि त्याचे बाबा कामानिमित्त बाहेर गावी गेले होते...येताना त्यांचा एॅक्सडेंट होतो..विराटला थोडफार ‌खरचटले होते..पण त्याच्या डॅडला डोक्याला मार लागलं होता.)विराट त्याचे वडील गेल्यावर रडलेला तो आज रडला..

अरे बाळा,तु तो विचार सोडुन टाक,स्वत:ला दोष नको देऊ...हे बघ काही होणार नाही....

डॉक्टर बाहेर येतात...

विराट ,भिमराव पळतच त्यांच्याकडे जातात...

बुलेट नाहीये लागुन गेली आहे ... खोलवर जखम आहे...पण काळजी करण्याच काहीच कारण नाहीये...जखम भरायला वेळ लागेल..ब्लड लॉस झाल्यामुळे त्या शुध्दीवर नाहीये..आतुन खुप घाबरल्या आहेत...शुध्दीवर आल्यावर‌ कळेन त्या कश्या रीयॅक्ट करतात...विराट काळजी करु नको. सगळ ठीक आहे. डॉक्टर त्याच्या ‌खाद्यांवर टॅप करत बोलतात..तेव्हा कुठे सगळे रीलॅक्स होत पिहु शुध्दीवर येण्याची वाट बघत होते...

पिहुला आयसीयु मध्ये शिफ्ट करतात...विराट पिहुला काचेतून बघत होता. तिला या अवस्थेत बघुन त्याचे डोळे भरुन येत होते.

सुमन रेवती शेजारी येऊन बसते...रेवती तिच्या गळ्यात पडुन रडू लागली...सूमन काय आहे हे...सगळ....

सुमनला गिल्ट वाटत‌ होते...पिहुचा काहीच संबंध नाही तरीही तिला सफर‌ क‌रावे लागत आहे.रेवती ..शांत हो. मी समजू शकते तुझ दुख...सुमन रेवतीला सहारा देत बोलत होती.

भिमराव सुमनच्या शेजारी येतात‌..सुमनताई...आम्ही आमची मुलगी खुप विश्वासाने दिली होती...हे काय भिमराव चिडुनच बोलतात...रेवती सुमन घाबरुनच उठुन उभ्या राहतात...दामोदर ही आवाज ऐकुन जवळ येतात.....

भिमराव ,आपण निंवात बोलु ...दामोदर त्यांना शांतपणे बोलत‌ होते..

दामोदरराव माझी मुलगी आहे आत तिच्यासोबत अस काही होईल आम्ही कधी स्वप्ननातही विचार केला नव्हता...आणि तुम्ही काय बोलताय निंवात बोलु...बोलताना भिमरांवचे डोळ्यातुन अंगारच बरसत होता...

रेवती जवळ जात ...अहो....शांत व्हा ना...पिहु बरी झाल्यावर बोलु आपण....

भिमराव रेवती कडे रागाने बघतात...रेवती आज आपल्या मुलीचा जीव गेला असता तर‌ ह्यांना काय नवीन सुन आणता येईल त्यांच्या घरात नांदायला .पण आपण आपली मूलगी कुठुन आणली असती...

रेवती रडतच चेअरवर बसते.

दादा,तुमच बरोबर आहे...पण...

सुमन ताई ,माझी पिहु खूप निरागस आहे...ती चार भिंतीच्या बाहेर कधी गेलीच नाही.नाही माहीत तिला जगात कशी लोक असतात...आत्ता कोण कुठली मूलगी गन घेऊन फिरते...काय हे तुमच्या साठी नॉर्मल असू शकते..पण आम्हाला नाही..‌.भिमराव पुढे बोलणा‌र‌ कि आतुन पिहुचा जोरातच किंचाळण्याचा आवाज आला..

विराट पळतच दार उघडुन आत आला...

तिला अजुन आठवुन त्रास होत होता...सगळ तिच्यासाठी खूप भयानक होते...ती जोरातच ओरडुन उठण्याचा प्रयत्न करत होती...नर्स ने तिला धरलं होते..विराट जवळ येऊन तिच्याशी बोलत होता..पिहु शांत हो कोणी नाहीये...शांत हो...मी आहे डोळे उघड‌...तो तिला मिठीत घेतो...ती थरथर कापत होती..ती हात हलवत होती विराट नें पटकन एका हाताने तिचा हात धरला. तिला आवाज कानापर्यंत पोहचत नव्हता..रेवती भिमराव जवळ आले...

बाळा मी आहे मम्मी गं डोळे उघड बाळा बघ. विराट तिला सोडतो.......रेवती तिला पटकन कुशीत घेते...

पिहुला काहीच सुधारत नव्हते...नर्स ने तिला झोपेचे इंन्जेक्श‌न दिले...ती शांत होत झोपी गेली....रेवती ने विराट ने तिला अलगद बेडव‌र झोपवले...

नर्सने सगळ्यांना बाहेर जायला सांगत होती...सुमन विराटचा हात पकडत बाहेर चल म्हणत होती...मॉम मी कुठेही जाणार नाहीये...तो हात सोडवुन पिहूच्या शेजारी बसुन डोक्यावरून हात फिरवु लागला..

नर्सने एकालाच थांबायला सांगितले...

सगळे बाहेर आले...भिमरावांना ही पिहुची काळजी लागुन गेली होती...

डॉक्टर आल्यावर तिच चेकअप केलं..

विराट त्या घाबरल्याने अस रीयॅक्ट झाल्या...थोडावेळ तर लागेल ना,...

विराट फक्त मान हलवतो..त्याच्यासाठी तो प्रसंग आठवुन अंगावर‌ काटा येत होता..मग पिहु किती घाबरली असेल...

आठ नऊच्या दरम्यान पिहुची हलचाल होत होती...विराट ‌ने तिच्या हातात हात घट्ट गुंफवले...

पिहु दचकली...तिच्या डोळ्यांच्या हलचालीवरुन तिला आठवत असवा...असे विराटला जाणवले..तो हळुच तिच्या केसांवरुन हात फिरवु लागला..पिहु शांत ...शांत...तो तिच्या कानाजवळ जात बोलत होता....पिह‌ु कोणीही नाहीये इथे मी आहे विराट...रीलॅक्स हो..शु sss....शुssss तो केसांवरून हात फिरवत होता तसे तिच्या डोळ्यांची हालचाल कमी होत होती.तिने हळूहळू डोळे उघडले...‌

विराट चेअरवरुन उठुन बेडवर ‌येऊन बसला.पिहु मी आहे...पिहु सगळी कडे नजर फिरवून त्याच्याकडे बघते..अजून झोप‌ असल्याने तिला काहीच सूचत नव्हते...तो वाकुन तिच्या कपाळावर ओठ टेकवतो...

पिहु डोळे बंद करून परत उघडते...तो तिच्या कपाळावर कपाळ टेकवतो....पिहु रीलॅक्स कोणीच काही करणार नाही तुला मी तुझ्यासोबतच आहे........हहह...तो अगदी प्रेमाने
तिला सांगत होता..

ती काहीच बोलत नव्हती...

तो सरळ होत तिच्या चेहरयावरुन हात फिरवत होता... ती एकटक त्याच्यकडेच बघत होती.

पिहु...काय हवं आहे...का....त्याने गालावरुन हात फिरवत विचारले..

पा.....णी...तिच्या तोंडातून आवाज निघाला...तो पाणी घेण्यासाठी उठु लागला..तर पिहुने त्याचा हात घट्ठ पकडुन ठेवला होता...मानेनेच त्याला नाही म्हणते...

आहे मी इ‌‌थेच... त्याने तिच्या हातावर किस केलं .तो हात सोडवु लागला..पण तिने हातच सोडला नाही..त्याने तसच एका हाताने जगमधलं पाणी ग्लासमध्ये ओतलं. तिला हळुच पाठीला आधार देत ग्लास तिच्या ओठांसमोर धरला..पिहुने दोन तीन घोट पाणी पिले..त्याने ग्लास बाजुला ठेवला..आणि तिला परत झोपवले..तो तिच्या शेजारी बसुन डोक्यावरुन हात फिरवु लागला. पिहु एका कुशीवर होत त्याचा हात डोक्याखाली घेऊन परत झोप लागली.

थोड्यावेळाने रेवती आणि सुमन आत आली....नर्स आत आली...प्लिज सर एकच जण थांबु शकते. पेशेंट खूप जणांना बघुन अजुन घाबरुन जाईल..

विराट ने रेवतीकडे बघितलं..त्यांचे डोळ्यातुन पाणी काय थांबत नव्हते...त्या पिहुच्या डोक्यावरुन हात फिरवत होत्या.

आई बसा तुम्ही मी बाहेर जातो..तो उठला ..पण पिहूने हात अजुन घट्ट पकडला होता...त्याने अलगद तिचा हात काढुन त्याच्या हातातलं वॉच तिच्या हातात ठेवलं...तिने लगेच मूठ बंद केली..विराटला जाणवले होते‌ तिला माझा सहवास जवळ हवा आहे...

मॉम बाहेर बसु...सुमनला जवळ घेत तो बाहेर आला.पिहु शांत झाल्यावर विराट ही रीलॅक्स झाला होता.

भिमरांवनी विराटला बघुन न बघितल्यासारख केलं .विराटला हि कळत होते..ते चिडले आहे आणि कारण ही तेवढ मोठे आहे...पण ही वेळ नव्हती कोणाला काय सांगा‌यच आणि काय समजावायच.

मानव खुप वेळ फोनव‌र बोलून विराट जवळ आला... विराट,देवेश ‌त्रिशाला सोडवण्याचा खुप प्रयत्न करत आहे....

विराट रागाने बघत सो वॉट,...तुला माहित आहे काय‌ करायच..कुठल्याही किंमतीत त्रिशा सुटायला नकोय तो बोट दाखवून त्याला धमकावतच होता...सर्वात चांगला लॉयर हायर कर ...मला ती बाहेर दिसायला नकोय...तिला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार‌ नाही तो रागात दाट ओठ घासतच बोलु लागला...

हम्म...

आणि मीडिया,

तो ही गोंधळ झाला होता...पण झाला तो सॉटआॅऊट,...

हम्म,त्याच लक्ष प्रांजलकडे जाते...तीही शांत एका चेअरवर पायात डोक घालुन बसली होती..विराट तिच्या जवळ जाऊन तिच्या शेजारी बसून डोक्यावरुन हात फिरवतो...प्रांजु...

प्रांजल ने डोक वर केलं ती विराटला रडतच बिलगली. जीजु दी ला काही होणार नाही ना...

प्रांजु शांत हो काही झालं नाहीये पिहुला..मी आहे ना काही होऊ देणार नाहीये...आत्ताच बोलली ती डोळ्यावर झोप आहे ना म्हणुन झोपली उद्या तिला फ्रेश वाटेल..मग डोक खा तिच तुझ्यासारख बोलायला शिकव तिला तो तिला हसवण्यासाठी बोलत होता.

प्रांजल हलके हसते...सुमन पण तिच्या जवळ‌ येतात...

मॉम रात्र झाली आहे .‌तू प्रांज‌लला पण घेऊन जा मामाकडेच राहू देत तिला...

हम्म .सगळे निघुन जतात पिहुचे आईवडील काही हलले नाही‌.

बाबा तुम्ही थोड ज्युस घ्या...विराट जवळ जाऊन बोलतो...

नाही ठिक आहे...मी

बाबा तुम्ही दुपारपासून काहीच खाल्ल नाही‌ेये आणि आईंनी सुध्दा जेवण नाही तर ‌थोड ज्युस घ्या,आईंची तबियत बिघडेल त्यांना पण तुम्ही आत्ता आधार द्या विराट शांतपणे प्रेमळ भाषेत सांगत होता...त्यांनाही पटत होते..ते काही न बोलता आत रुममध्ये गेले...

विराट ने नमनला सांगितले ,विराट आत आला .

भिमराव रेवतीला समजावत होते...रेवती नकोच म्हणत होती...

पिहु उठल्यावर खाते मी,आत्ता खरच काही नको..

आई मी आहे इथेच तुम्ही दोघं ज्युस तरी पिऊन या...

विराट खरच नकोय मला..

हो माहित आहे पण तुमची तबियत बिघडली तर,पिहुला कोण बघणार आहे...तिला आत्ता तुमची गरज आहे..मग तूम्ही स्वतःला त्रास करुन घेतला तर‌ तिला कोण संभाळणार विराट त्यावेळी एक जावई कमी आणि मुलगा जास्त वाटत होता..त्याने कसबस रेवतीला समजावलं

दोघे नमन बरोबर गेले.

विराटने डीम लाईट लावली...आणि पिहूशेजारी येऊन
बसला. त्यालाही डोळा लागला...

पिहुचे आईवडील थोड्यावेळाने आले...विराटला पिहुशेजारी झोपलेलेे बघुन दोघे एकमेकांनाकडे बघतात....

अहो,तुम्ही आणि विराट घरी जावा मी थांबते....

विराटला जायच असेल तर जाऊ शकतो...मी इथेच थांबणार आहे.. भिमराव बाहेर जाऊन सोफ्यावर बसले.रेवती शांत बाहेर जाऊन बसली....

भिमराव काळजीने रेवतीकडे बघु लागले...रेवती...

मी ठिक आहे जो पर्यंत पिहुशी बोलत नाही तो पर्यंत मला चैन पडणार नाही...

भिमराव रेवतीला जवळ घेऊन डोक्यावरुन हात फिरवतात..टेंशन नको घेऊ.दोघेही आज जे काय झाल तेच विचार करत त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही.

सकाळी रेवती विराटच्या,शेजारी येऊन डोक्यावरुन हात फिरवतात...

विराटला जाग आली ..तो सरळ होऊन नीट बसला..

विराट घरी जाऊन ये,कालपासुन इथेच आहेस काही खाल्लं सुध्दा नाही तु‌.

त्याने पिहुकडे नजर फिरवली ती झोपली होती..त्याचा हात घट्ट पकडला होता...त्याने हात हळुच काढुन घेतला..आई डॉक्टर आले तर फोन करा...

हो करते...विराट बाहेर जायला आणि भिमराव आत यायला .विराटने एक नजर बघितले...तर त्यांनी त्याला इग्नो‌र करत पिहु शेजारी येऊन बसले..

विराट ही निघुन गेला....

विराट पिहु उठली होती. का सुमन विराट आल्या आल्या विचारु लागली.

नाही मॉम झोपली होती..प्रांजल कुठे

हो आहे.. रात्री खुप वेळाने झोपली घाबरली ती

हम्म,मी आवरुन येतो.
.
हम्म..

विराट पटकन त्याच आव‌रुन येतो..मानवचा फोन येतो....

विराट फोन रीसीव करतो...हा बोल मानव

विराट देवेशला तुझ्याशी बोलायच अाहे..

आत्ता काय बोलणार आहे.जेव्हा वेळ होती काही केलं नाही आणि आत्ता बोलायच ...बिलकूल नाही, तो माझ्यासमोर यायला नको ,....

त्रिशाची अवस्था ठिक नाहीये...तो बेल साठी प्रयत्न करतोय‌,

बेल मिळता कामा नये...ती बाहेर आली तर मी तिचा जीव घेईन...तो रागातच फोन कट करुन आवरायला लागतो‌.

देवेश खुप प्रयत्न करत होता...पण विराटचा दबाव एवढा होता कि त्रिशाला बेल मिळतच नव्हती.. त्याला काहीच करता येत नव्हते...तो पुर्ण हतबल झाला होता....त्यात बदनामी झाली ती वेगळी..
.
.

.
.
पिहुला जाग आली

पिहु काही त्रास होतोय का .....रेवती तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलतात..

हह...तिचा हात जड झाला होता...गरगरल्यासारख होत होते..मम्मी माझा हात,

हो बाळा....थोड दु‌खेल तीन चार दिवस,तु फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घे गोळ्या घेतलं कि दुखायाचा कमी होईल..

हह...रेवतीने पिहुला फ्रेश करून थोडफार‌ खाऊन घातलं
डॉक्टर येऊन चेक करुन गेले..पिहुला विराट कुठेच दिसत नव्हता..तिच लक्ष साईड टेबलावर गेले विराटच वॉच होते...तिने हातात घेतलं .

भिमराव जवळ आले....

पिहु लगेच कुुशीत शिरली...दोघांचे डोळे भरुन वाहत होते..
अहो, तिला त्रास होतोय,तुम्ही अस वागला तर कस...

भिमराव स्वतःला सावरत ,चिऊ....तु घाबरू नकोस.हहह

पिहु मानेनेच हो बोलते...

विराट आणि सुमन दामोदर ‌थोड्यावेळाने येतात...

विराट सुमन आत येतात...पण पिहु नुकतीच झोपली होती.

विराट तिच्या जवळ येतो...आई,पिहु उठली होती..

हो उठुन फ्रेश होऊन ‌थोड खाल्ल तिने,ते औषधांचा असर असल्याने झोप लागली...

हम्म,

सुमनताई मला बोलायच आहे भिमराव बोलतात... पिहु नॉर्मल झाल्याने कालचे प्रश्न आता डोक्यात ‌थैमान घालत होते.

अहो,

आई ठिक आहे ,त्यांचा पुर्ण हक्क आहे सगळ जाणून घेण्याचा मॉम सगळ सांग...

भिमराव बाहेर जातात...सुमन,रेवती बाहेर येतात...

विराट पिहुजवळ बसतो..त्याच लक्ष तिच्या हाताकडे जाते...त्याच वॉच ती मुठीत घट्ट पकडुन झोपली होती.

विराट हलक हसून तिच्या कपाळावर‌ अलगद ओठ टेकवतो.

सुमन दोघांना विराट त्रिशाच्या लग्निबद्दल,डीलच सगळ आत्ता पर्यंतच सगळ सांगते.पिहुला कळल्यामुळे ती घर सोडुन आलीये,सुमन ने सगळे सांगितले फक्त डीवोर्सची गोष्ट सोडुन कारण त्याने अजुन काही तरी गैरसमज होईल...ती गोष्ट पिहुला सांगायची असेल तर सांगेल म्हणुन त्यांनी सांगितल नाही.

दोघे शॉक होतच एकमेकांना बघतात..सुमन तु आधी का बोलली नाही रेवती बोलते‌

रेवती त्रिशा,अस काही करेल वाटलं नव्हतं गं...

सुमनताई ,पिहुच्या जीवावर बेतली आहे ही गोष्ट...कसा ह्यापुढे आम्ही विश्वास ठेवायाचा...

दादा,त्यासाठी खरच आम्ही दोषी आहोत...आम्ही खूप लाईटली घेतलं...पण यापुढे

भिमराव सूमनला मध्येच ‌थांबवत...सूमन ताई पिहुला परत पाठवायच कि नाही ते आम्ही विचार‌ करुन सांगतो...पण आत्ता पिहूच्या बाबतीत मी परत रीस्क घेणार नाही.

रेवती सुमन एकमेकींकडे बघतात...

सुमनला काय बोलाव कळतच नव्हते.त्याही शांत झाल्या विराट चा विचार करु लाग्ल्या त्याला कळले तर कसा तो रीयॅक्ट करणार आहे ह्या विचारानेच त्यांना घाम फुटला.

पिहुला जाग आली तर विराट तिला समोर दिसला..

पिहु काहीच रीयॅक्ट न करता त्याच्याकडे एकटक बघु लागली....

पिहु ,काही त्रास होतोय त्याने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.
ती मानेनेच नाही बोलली

थोड उठून बसतेस

ती उठण्याचा प्रयत्न करु लागली.विराट ने तिला नीट बसवुन मागे उशी लावली..तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या खाद्यांवरुन हात घालत जवळ घेतलं ...पिहु पण त्याच्या कुशीत शिरली...डोळ्यातुन तर पाणी येतच होते...

पिहु‌..शांत हो.ना‌..मला आवडत नाही तु अशी रडलेली माहित आहे ना,त्याने तिचे डोळे पुसले...तिला पाणी पिऊ घातलं. हात दूखतोय का,

ती मानेनेच‌ नाही बोलते...

तूला बोलता‌ येत नाही का,तोंडाने सांग काय मान हलवतेस..

हहह ,..आ....ता नाही दुखत ये..ती हळुच बोलली

तो गालात हसत,तिच्या गालावर किस करतो....आता कुठे ती नॉर्मल बोलली तेव्हा कुठे त्याला बरं वाटले.

पाच सहा दिवस,तिची सगळ्यांनी काळजी घेतली...विराट ची डीसचार्जची घाई चालली होती‌.त्याला लवकरात लवकर मुंबईला पिहुला घेऊन जायच होते...तिच्या पासुन लांब रहाणं आता शक्यच नव्हते.

हॉस्पिटल मध्ये देवेश येतो...विराट डॉक्टरांशी बोलुन बाहेर आला तर‌ समोर देवेश होता....विराटची तळपायाची आग मस्तकातच गेली...

विराट ,मला....तो शांत पणे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता..

विराटचे डोळे रागाने लालबुंद झाले होते..तो धावतच त्याच्या अंगावर जाऊन त्याची कॉलर जोरात पकडुन त्याला ओढलं .हिम्मत कस काय झाली तुझी माझ्यासमोर यायची,आहहह.

मानव ने त्याला पकडलं...विराट हॉस्पिटल आहे.

विराट ,ऐकुन तरी घे,...माझ मला खरच माहित नव्हते त्रिशा अस काही करेन...ट्रस्ट मी,
दोघांचा गोधळ बघुन सगळे बघु,लागले भिमराव पण आवाज ऐकुन आले.

ओहहह, तु ह्यासाठी आला‌...काही ही कर पण ती जेल‌मधुन तिला शिक्षा होईपर्यंत तर तिची सूटका नाही..

विराट प्लिज तिची पर्ण,लाईफ स्पाॅईल होईल ...

हे तुला आधी कळायला हवे होते....अरे ती गन घेऊन गेली तरी तुझ लक्ष नाही काय म्हणाव...तुमचाच काही तरी गेम ‌प्लॅन असणार,

विराट सोड...मानव कस बस त्याला सोडवलं ...देवेश तु जा इथुन जा नाही तर मी जीव घेईल. तुझा विराट ओरडुनच बोलु लागला...

भिमराव तर विराटच हे रुप बघून घाबरुनच गेले ...

सर ,प्लिज मानव देवेशला बोलू लागला.देवेशने पण माघार घेत निघून गेला .

विराट क्लाम डाऊन ,हॉस्पिटल आहे...मानव त्याला शांत करत बोलला विराटच लक्ष भिमरांवाकडे गेले..तो शांत होतो.
भिमराव तिथुन निघुन गेले.

थोड्यावेळाने विराट आत येतो...पिहु शांत बसली होती..प्रांजलची बडबड चालु होती...प्रांजलच लक्ष गेलं

जीजु कधी आलात,ती बोलल्यावर पिहुच लक्ष दाराकडे गेलं.

आई कुठे ...

मम्मी घरी गेली ,येईल आता,

पिहु त्याच्याकडे बघुन हलकी हसली.तो ही गालात हसत तिच्या जवळ येऊन बसला..त्याने तिचा हात हातात घेतला..पेन होतोय का,

हहह...थोडा दुखतोय..

जीजु ती नाही कधी म्हणारच नाही,जो पर्यंत जखम बरी होत नाही...तस तिला विचारुच नका,ती दूखणारच म्हणा‌र प्रांजल कपाळाला हात मारत म्हणते.

विराट हसतो...

प्रांजु पेन होतोय मी मुद्दाम बोलते का,

हो रे दि पण ‌थोडफार दुखणारच ना,मग सारख बोल्याने कमी होणार आहे का,...एकच लावलं सकाळपासून ...

आता तुझी दि नाजुकच आहे तर काय करणार ‌विराट ‌तिच्या डोळ्यात‌ बघत म्हणतो.

पिहु लाजुन नजर खाली घेते..

जीजु...हे चुकीचे आहे,हहह.

विराट ‌पिहु तिच्या कडे बघतात...काय चुकीच आहे विराट बोलतो..

हेच मम्मी पप्पा सारख तुम्ही पण तिला नाजुक करुन ठेवलं...
हे सगळा घाबरटपणा फक्त अती लाडाने झाली..ती आणि आत्ता तुम्ही पण तसेच लाड करुन नाजुक करुन ठेवा...

रेवती आत येते..प्रांजु किती आवाज ,हॉस्पिटल आहे,किती बोलतेस,पिहुला आराम करु देत बोललं कि बडबडत बसली...

बघा,जीजु माझी तर कोणाला काळजी नसते,फक्त दी दी चालु असते ..आणि तूम्ही सुध्दा तिच्या बाजुने बोलता...प्रांजल नाटकी चेहरा करत बोलते‌.

रेवती प्रांजलच्या दंडावर हळुच मारते,काय आगाऊपणा आहे जा घरी आता..येऊ नको बोललं तरी यायच. जा आता घरी पिहुला आराम करायच तु इ‌‌थे थांबली ना,तिला झोपुच देणार नाही...

जेवण करुन घे,घरी गेल्यावर ....

ताट वाढुन ठेवली ना ,

विराट ,पिहु दोघेही हसतात..

हो गं आळशी मूलगी जा आता

दि झोप आराम कर ....प्रांजल बोलुन निघून जाते.

आई बाबा,कुठे आहेत...

काम होतं बँकेचे तिकडे गेलेत.येतील आत्ता,

हम्म...

भिमराव येऊन डॉक्टरांशी बोलायला जातात....पिहुला,दुपारुन डिसचार्ज मिळणार होता....

मि. सरनाईक मी मुंबईत पुढच्या ट्रीटमेंटबद्दल विराट शी बोलण झालं आहे..

भिमराव शॉकच होतात त्याहुन राग सुध्दा आला होता एका शब्दाने विराटने त्यांना सांगितले नव्हते .आणि विचारायच पण म्हत्वाच समजलं नाही.

डॉ. गो‌खले आम्ही इथेच घेणार आहे पुढची ट्रीटमेंट...कधी यायच परत चेकअप

डॉ.दोन मिनीट ब्लँक होत बघु लागले...अ.ह..हो..हो..दोन दिवसांनी घेऊन या..

हम्म,थँक्यु भिमराव रुममध्ये आले...पिहु झोपली होती.. रेवती सुमन बोलत बसले होते....

दोघी भिमराव आल्यावर शांत बसतात....

रेवती दुपारुन डिसचार्ज मिळणार आहे.

हो आत्ता विराट बोलला मला.. ...

विराट कुठे आहे...

सुमन उठुन समोर आल्या...दादा तुमचा राग मान्य आहे...पण पिहू विराटची बायको आहे ...

आपण बाहेर बोलू ,भिमराव एक नजर पिहुवर टाकून बाहेर येतात...विराट ही बाहेरुन नुकताच आलेला..

सूमन ताई,तूमची सुन नंतर पहिले माझी मूलगी आहे...आणि आत्ता तिची कंडीशन नाजुक आहे...अजुन आमच्या डोळ्यासमोरुन ते जात नाही....गोळी हाताला लागली ..आमच मन तयार होईल का तिला पाठवयाच ....विराट ने न सांगताच मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आमचा काही अधिकार नाही का आमच्या मुलीवर,

बाबा,..

सगळे विराट कडे बघतात..

बाबा मी आजच बोललो होतो आणि तुम्हाला सांगणार ही होतो...पण आपली भेटच झाली नाही...

विराट पिहुला मी मुंबईला पाठवणार नाहीये..भिमराव त्याच्याकडे रागाने बघतच बोलतात.

विराट एकदा सुमन कडे एकदा रेवती कडे बघतो...बाबा पिहु ह्यापुढे सेफ अ‌सणार आहे तिला परत कधीच कुुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही तो विश्वासाने त्यांच्या डोळ्यात बघत बोलतो.

विराट मी तुला विचा‌रत नाहीये ,सांगतो‌य...

मॉम ,पिहु उठल्यावर सांग मला तो एवढ बोलुन निघून गेला.

रेवती भिमराव एकमेकांनाकडे बघतात.

सूमनला तर टेंशनच आलं ..

पिहुला थोड‌्यावेळाने जाग येते..भिमराव तिच्या शेजारी बसले होते....बाबा तुम्ही कधी आलात पिहु उठुन बसत बोलली ,

मी मगाशीच आलो,आज घरी जायच आहे...खुश ना,

पिहु हसत हो म्हणते...

विराट ही येतो....पिहुकडे बघून तो हसत जवळ येतो...

थोडयावेळाने पिहु आवरुन बाहेर येते...विराट ती आल्यावर जवळ येतो...तसे भिम‌राव सुध्दा समोर येऊन थांबतात...विराट एक नजर त्यांच्याकडे बघतो.

तो पिहुचे दोन्ही हात हातात घेतो...

पिहु एकदा त्याच्याकडें आणि एकदा सगळ्यांकडे ब्लँक होत बघते...

पिहू आपण मूंबईला जातोय तु ‌येणार आहे का..

विराट तिची तबियत नाजुक आहे. आत्ता राहू देत नंतर घेऊन जाऊ आपण...सुमन त्याच्या जवळ जात बोलते...

मॉम ,विराट नजर फिरवत बोलतो.

पिहु तिच्या बाबांकडे बघते...तिला ही ऐवढ्या दिवसात जाणवले होते...कि भिमराव विराटवर चिडले आहेत.

विराट,हात सोड कुठल्याही गोष्टीत हट्ट करु नकोस...भिमराव पिहुचे हात काढुन घेतात...

पिहु दचकतेच ...

पिहु मी हे लास्ट विचारणार आहे तू येणार आहेस कि नाही...तो शक्य तितक्या नॉर्मल आवाजाात बोलत होता

पिहुच डोकच काम करत नव्हतं...

सुमन ताई हे काय आहे कळत नाही विराटला ती आहे का त्या मनस्थितीत ...

बाबा मला माहित आहे तुम्हाला माझ्या वर विश्वास नाहीये ...म्हणुन तुम्ही घाबरत आहे माझ्याबरोबर पाठवायला.पिहुची मी नीट काळजी घेईन.आणि हीच संधी आहे मला तुमचा विश्वास जिकां‌यची ..

विराट रस्ता सोड खुप वेळ झाला पिहु उभी आहे...जाऊ दे आम्हला आपण ह्यावर नंतर बोलु....

तो पिहु कडे बघत पिहु तुला यायच आहे कि,नाही माझ्याबरोबर

पिहु ला काय बोलाव कळतच नव्हते....

काही तरी बोल पिहु, हा नाही काहीही बोल.

पिहु काहीच बोलत नसल्याने विराटला राग आला होता...पण ती वेळ नव्हती...तो राग कंट्रोल करत तिचा चेहरा ओंजळीत घेतो...आणि कपाळावर किस करून तिच्या कडे न बघताच निघुन जातो..सूमन ही त्याच्या मागे जातात....

पिहु एकटक तो गेल्याने दिशेने बघत होती...

पुर्ण रसत्यात विराट एकही शब्द बोलला नाही,सुमनने ही काहीच विषय काढला नाही.

विराट ने डोळे झाकले..

अभी अभी भुल्ले भी न थे तुम्हे
ख्याल बांके फिर तुम आ गए
एहसास जो थे दिल में कहीं अन्ह्कहे
लफ़्ज़ों पे फिर वो यूं आ गए…

सांसों के सरज़मीं पर बरसात ला गए
एक झपकी में तेरे सौ ख़्वाब आ गए …

बेपनाह..बेपनाह …
प्यार है तुमसे…
बेपनाह..बेपनाह …
प्यार है तुमसे…

घरी आल्यावर रेवती ने पिहुची नजर काढली .पिहुच लक्ष नव्हते कश्यात विराट जे बोलला तेच डोक्यात होते..रेवती पिहुला जवळ घेतात...पिहु विचार करु नको बाळा ,पप्पांना थोडा वेळ दे...मग तेच स्वतः विराटला फोन करतील...घेऊन जा म्हंणुन हहह रेवती पिहुला समजावत असते...विराट ने तिच्या कडे एकदा ही बघितलं नव्हतं ते तिच्या डोक्यातुनच जात नव्हते....

मानती हूँ खुदा तुझी को
तू ही तो है रहबर मेरा
अब से खालीपन में भी तू
पास मेरे खड़ा…

तू है नहीं यही
ये न यकीन हुआ
कैसे करूँ ये खुद से बयां
बिखरी हूँ हर जगह
मैं रेत के तरह

न मेरे दर्द की है दवा…

सांसों के सरज़मीं पर बरसात ला गए
एक झपकी में तेरे सौ ख़्वाब आ गए …

बेपनाह..बेपनाह …
प्यार है तुमसे…
बेपनाह..बेपनाह …
प्यार है तुमसे…

टूट के बिखरा पड़ा हूँ
सांस लेना भी है सजा
जीने में अब्ब क्या रखा है
मर रहा सौ दफा…

कैसी ये साज़िशें
रूठी है रंजिशें
लेती है करवटें ज़िन्दगी…

अब्ब किस मोड़ पे आके रुका हूँ मैं
न कोई मोड़ है न कोई पता…

सांसों के सरज़मीं पर बरसात ला गए
एक झपकी में तेरे सौ ख़्वाब आ गए …

बेपनाह..बेपनाह …
प्यार है तुमसे…
बेपनाह..बेपनाह …
प्यार है तुमसे…


पाच दिवस झाले तरी विराटचा फोन आला नव्हता..पिहुला बैचेन झालं होते.विराट प्रांजलला पिहुच्या तबियतीबद्दल विाचर पुस करत होता...

सूमन विराटची वाट बघत बसल्या होत्या ...विराटला यायला रात्रच होती....

विराट किती उशीर सुमन जवळ जात बोलल्या...

तो काही न बोलता सोफ्यावर बसला....

सुमन त्याच्या डोक्यावरुन हात फिरवु लागल्या .स्वतःला त्रास करून काय मिळणार आहे विराट,फोन कर पिहुला बरे वाटेल

नो मॉम,मी आत्ता फोन करणार नाहीये..आधीची गोष्ट एक वेगळी होती...खुप प्रेमाने मी तिला समजावलं...पण तिला काही समजुनच घ्यायच नाही तर मी काही करु शकत नाही...मी तिला घेऊन आलो नसतो...पण एका शब्दाने ती हो बोलली असते तर‌ काय बिघडलं असते...

म्हणजे तु हे सगळ,

हो मॉम मी हे सगळ तिला माझ्यावर ट्रस्ट आहे कि नाही हे बघायच होते अँन्ड सी तिने नाही दाखवला ,तिच्या बांबासमोर तिने माझ्यावर ट्रस्ट नाही दा‌खवला तर ते कुठु‌न ठेवणार मॉम..म्हणजे अजुन ती पुर्णपणे माझ्यावर ट्रस्ट करत नाही हे कळतयं .

विराट ,ती घाबरली असेल वडीलांसमोर काय म्हणुन बोलणा‌र ती ...

‌मॉम प्लिज मला ह्यावर काही बोलायच नाही.

विराट मी उद्या पुण्याला चालली आहे पिहुला भेटुन थोडे दिवस तिकडेच राहणार आहे...

का,

जीजी आली आहे मामाकडे

हम्म,

रात्री पिहुला झोपच येत नव्हती..ती उठुन टेरेसवर आली. झोपाळ्यात बसून विराटच वॉच हातात घेऊन रडत होती...आज सहा दिवस झाले त्याने फोन सुध्दा केला नाही कशी आहेस म्हणुन पिहुला वाईट वाटत होते..

रेवतीला जाग येते पिहु शेजारी नाही म्ह़णून त्या घाबरुनच उठतात...दार उघडे होते...त्या बाहेर येऊन बघतात समोर टेरेसचा पण दरवाजा उघडा होता...त्या येतात...पिहु तु इ‌थे काय करतेस..
त्या तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलतात.

पिहु वर बघते..आणि परत डोळे पूसुन नजर खाली घेते.

रेवती तिच्या शेजारी बसतात.पिहु तिच डोक खाद्यांवर ठेवते...

मम्मी

हा बोल बाळा,

ह्यांनी फोन सुध्दा केला नाही मला सहा दिवस झाले ...ती रडतच बोलू लागली..

पिहु तु एकदा तरी विराट वर विश्वास दा‌खवयला हवा होता..मग रागा पेक्षा वाईट वाटले असेल त्याला. दिवस रात्र त्याने जागुन काढले .तुझ्याच जागी तो असला असता तर तु सोडुन राहिली असते..विराटला,मग तो तरी कसा सोडुन राहील‌. पप्पा फक्त तुझ मन बघत होते..पण तु काहीच बोलली नाही..पिहु स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक. किती दिवस आम्ही दोघे घेणार ..तु तुला काय‌ हव ते तुझ्या मनाला विचार दरवेळेस विराट पुढे होऊन नात टिकवण्याचा प्रयत्न करणार का तू पण एक स्टेप पुढे जा...दरवेळेस नात्यात अविश्वास दा‌खवुन चालत नाही...त्याने फोन केला ‌ नाही म्हणुन तु करणार नाही का, का त्यानेच करायचा त्याला एकट्यालाच गरज आहे का ....

पिहुला ही जाणवुन ‌येते आपण चुकतोय...

पिहु चल गार वारा भरपूर आहे .आत चल रेवती तिला आत घेऊन येते..,


सकाळी दहा अकराच्या दरम्यान ,विराटची मिटींग चालु असताना त्याचा मोबाईल ब्लिंक होत होता...त्याने एक नजर टाकली तर पिहुचा फोन होता..त्याने कट करून स्विच ऑफ केला.

पिहुने परत लावला तर फोन स्विच ऑफ येत होता.

ती खुप वेळ विचार करत होती...आतून एक प्रकराची भितीही वाटत‌ होती....अर्धा पाऊण तासाने तिने कॉल लावला तर रींग जात होती...तिची थोडी घालमेल कमी झाली पण त्याने उचललाच नाही.
पिहुला सुमनने मानवचा नंबर देऊन ठेवला होता कधी विराटचा लागला नाही तर कॉल क‌र म्हणुन.पिहुने घाबरतच मानवला फोन केला...

मानवने दोन तीन रींगमध्येच फोन उचलला..घरातले सगळ्यांचे नंबर त्याच्याकडे स्वेह असल्याने त्याने कानाला लावुन हा बोला वहिनी,

पिहु दचकतच हा..ते...हे आहेत का (नाव तर आधीपासुनच कमी घेत होती😂 )

कोण वहिनी🙄

वि...रा...ट ती हळुच म्हणाली..

ओहह😅 आहेत आहेत एक मिनीट हा...

पिहूची धडधडच वाढली,

विराट वहिनींचा फोन आहे...धर,विराट मोबाईल कडे बघत कनाला लावतो... मानव बाहेर जातो.

बोल लवकर ऐवढं काय काम काढलंस माझ्याकडे...

तुम्ही अस का बोलतायेत,कामात होता का...

नाही चिमण्यांना पाणी चारा देत बसलोय.. ,स्टुपिड ऑफिसध्ये काय‌ करणा‌र मी, तो चिडूनच बोलतो.

पिहु त्यावर काहीच बोलली नाही....

पिहु तुला काम नसेल तर झोप ...मला काम‌ करु देत विनाकारण माझा टाईम वेस्ट करु नको...

तु...म्ही नी....ट का बोलत‌ नाही..सॉरी..ती मूसमूस करतच बोलु लागली,

चालु झालं रडणं एक काम कर रड ..निंवात मग फोन कर हहह.

म....ला यायच ती पटकन बोलुन गेली...

(दोन सेंकेंद त्याला काहीच कळलं नाही.)काय‌???

मला तिकडे यायच ती हळु आवाजातच बोलली.

कुठे,त्याच्या चेहरयावर थोडी स्माईल येत होती..

अह...हहं...हं मला घरी यायच ,

कुठलं घर तुझ काही यायच नाही तु तिथेच बस हहह..तो ही काही फरक पडल्या नसल्यासारख बोलत होता.

अअअ.अ.. तुम्ही या मला घ्यायला,ती रडत लहान मुलांसारखी हट्ट करुनच बोलु लागली..

त्याला हसु येत होते ती बोलत होती तर तो हसु कंट्रोल‌ करत मी येणार नाहीये..जेव्हा चल बोललं तर आली नाही आणि आत्ता आठवण ‌आली का,

हो आत्ता आली ,मला बर नाहीये...आणि तुम्ही त्रास देताय,कळलं किती काळजी आहे माझी ...

नाही ये तुझी काळजी ठेव मला काम आहेत .भरपूर...

.तु...म्ही आला नाही तर मी निघुन जाईल कुठेतरी...नाही ..तर...मी औषध जेवण काहीच करणार नाही..मग मला त्रास होऊ दे .ती रडतच चिडुन बोलु लागली.

अच्छा धमक्या द्यायला शिकलीस. इमशोनल ब्लॅक मेल का,

हो तुमच्याकडुनच शिकले,..तुम्ही आजच यायच मला काही माहित नाही,ती ऐवढे बोलुन फोन कट करते...

विराट जोरजोरात हसतो. वेडी...तो मानव ला बोलवतो...ब्लेझर घालत त्याला आजच्या सगळ्या मिंटीग कॅन्सल कर म्हणतो...

विराट मि. मेहताबरोबर अर्जंट मिटींग होती...

तु बघ ते,मी पूण्याला चाललो

का रे अचानक,

हो महत्वाच काम आहे. मी आज खुप खुश आहे

मानव हसतो ओके ...

मम्मी हे येतील ना,

हो गं बाळा येतील तु जेवण कर...

आणि पप्पा...

मी आहे काळजी करु नकोस...तु खुश तर पप्पा पण खुश असणार टेंशन नको घेऊ.जेव आणि औषध घे...

पिहु वाट बघत बसली होती...दुपार झाली होती...फोन लावु कि नको म्हणुन विचार करत होती...विचार करता करता कधी तिला झोप लागली कळलंच नाही. तीनच्या आसपास विराट आला.रेवतीने दरवाजा उघडला विराटला बघुन त्यांना आंनद झाला

ये ना,बाळा...

विराट आत ‌येत नजर वळवुन बसतो.

रेवती पाणी आणून देते..

कोणी नाही का,..

प्रांजु कॉलेज आणि हे बँकेत...पिहु झोपली आहे...

हम्म...

जा फ्रेश हो....

विराट रुममध्ये येतो तर पिहु झोपली होती..तो तिच्याजवळ येतो...तिच्या दंडावरुन हात फिरवतो.डोळ्यात पाणी आलं होतं. हे सहा दिवस त्यालाच माहीत होते कसे काढले ...तिच्या चेहरयावरुन हात फिरवत दंडावर त्याने किस केलं..,ती त्याच वॉच घेऊनच झोपली होती. त्याला हसू आलं . तो ब्लेझर‌ काढुन फ्रेश‌‌ होऊन आला....चार वाजुन गेले तरी पिहुला जाग आली नव्हती..प्रांजल आली ..पिहु झोपली म्हणुन ती न आवाज करताच,विराट शी थोड बोलून तिच्या रुममध्ये गेली.

विराट ला कॉल येत होता तर तो बाहेर आला... पिहुची आणि प्रांजल ही रूम वरती होत्या आणि त्याला अॅट्याच टेरेस होते...तो जाऊन बाहेर बोलत बसला.

पिहु कूस बदलुन हळुच डोळे उघडते,समोर विराटच ब्लेझर दिसते.तिचे डोळेच ताट होतात.ती उठुनच बसते...घाईघाईतच ती त्याला शोधायला खाली जाते....

पिहु हळु गं पळतच ‌खाली आली ते बघून रेवती बोलली.

मम्मी ..हे कुठे..

विराट वरच होता....

दी टेरेसवर आहेत .

पिहु परत वर जाते...टेरेसवर विराट फोनवर बोलत होता....पिहुला विश्वासच बसत नव्हता...खरच विराट आहे का,एका शब्दात तो आला तिच्या साठी हेच ‌खुप होते...तिला त्याच्याबरोबर पूर्ण आयुष्य घालवायला.. विराटला जाणवताच त्याने वळुन तिच्याकडे बघितलं ..पिहु एक एक पाऊल त्याच्याकडे टाकत येत होती..

प्रेमात पडते रोज नव्याने
हरवते डोळ्यात रोज नव्याने,
जिंकले मन माझे तुझ्या अश्या प्रेमाने,
कशी राहु दुर श्वासाविना,
वेडी झाली,मी तुझ्या विरहाने,
जाशील ना मला घेऊनी
पत्नीच्या नात्याने,
तुझीच आहे सांगशील का हक्काने,
रंगेन तुझ्या रंगात तुझ्या सहवासाने,
स्वप्न सारे साकार करु
एकमेकांच्या प्रेमाने..
(मिनल❤ )

पिहू पळतच जाऊन टाचा वर करुन त्याच्या मानेला हाताचा विळखा घालुन रडू लागली.विराटने तिच्या कमेरला धरून वर उचललं तेव्हा कुठे तिची मान त्याच्या खांद्यावर आली..(आता तिची हाईटच त्याच्या खाद्यांच्या थोडी खाली लागत होती तर बिचारा काय करणार😂😂)
त्याने ही तिला रडु दिलं...त्याने लागलेला हात मानेवरुन काढुन ‌खाली घेतला..आणि दंडावर किस केल.पिहु तु कशी रडते ते बघायला मला बोलवली,...

हहहं.,ती रडतच बोलली.

हह,हहं काय ..

अहहंं नाही,मला सोडुन परत जायच नाही ,ती रडतच बोलु लागली..

तिच्या बालीशपणावर त्याला हसु येत होते..

मला खुप राग आलाय तुमचा ..

हम्म,त्याने तिला खाली सोडल आणि तिला मिठीत घेतलं...पिहु पण,त्याच्या शर्टात तिचा चेहरा लपवुन रडू लागली...

पिहु किती वेळ रडणार आहेस,आपण जर रडायच कॉम्पीटीशन ठेवलं ना,तुझा तर फस्ट नंबर येईल...

ती त्याच्या छातीवर दोन तीन फटके मारते..तुम्ही बिलकुल चांगले नाही फक्त मला त्रास देता...

काय करणार लडाची एकच बायको आहेस,मग तुलाच देणार ना त्रास...हहह तो तिचा चेहरा एका हाताने वर करत म्हणतो.

पिहु खुदकन हसून लाजतच त्याच्या मिठीत शिरली.

विराट तिला दोन्ही हातांवर अलगद उचलतो...आणि चेअर येऊन बसतो ‌पिहु त्याच्या मांडीवर त्याला बिलगुन बसली होती...पिहु चेहरा वर करून एकटक त्याच्या चेहरयाकडे बघत होती...

तो तिच्या गालावर हात फिरवतो...काय झालं अशी का बघतेस...

मन भरत नाहीये ...

हम्म,मी अस स्टेअर केलं कि राग येत होता आधी आणि तु केलं तर चालतं.

तुम्ही चिडला होता ना,

हो ,पण काय करणार तुझ्या एका फोनने राग निघुन गेला तो तिच्या हातावर किस‌ करत बोलला.

सॉरी, आपण घरी जाऊ ना,चला ना‌‌...

विराट हसत तिच्या कपाळाला कपाळ टेकवतो...वेडी,घेऊनच जाणार आहे मी,थोड बर वाटु दे मग जाऊ...

मी बरी आहे,..आत्ता जाऊ नाही तर उद्या जाऊ...

हो ..हो जाऊ ,इतकी काय घाई लागली...जखम नीट भरु दे किती विक दिसतेस चेहरा बघ...कसा झाला. तो तिच्या केंसावरुन हात फिरवत म्हणतो.

तुमच्यामुळे...किती राग आला तुम्हाला सहा दिवस साधा फोन केला नाही तुम्ही...ती नाराज होऊनच कंठ दाबुनच बोलते.

आता आज शेवटच रडून घे ह्यापुढे रडायच नाही...फक्त माझ्यासमोर हसायच हे डिंपल आहेत ना,माझा जीव आहे ते मला‌ सारखे दिसायला हवेत...समजलं ..

पिहु हसून लाजते. ती आज खुप दिवसांने मनमोकळे होऊन हसत होते.मानाचा सगळा गुंता निघुन मन शांत झालं होते...तिला काय हवय हे कळालं होते...

अहो, पप्पा नाही बोलले तर,

का,नाही बोललणार...हक्काची बायको आहे त्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण आहे...तो रुबाबत म्हणतो...

पिहु हसते,हो का...सांगा बर लग्नात कुठला रंगाचा शालु घातला होता...
तो नजर रोखुन बघतो...आता आयुष्यभर तु टोमणे मारणार आहे का,
ती त्याचा चेहरा हातात घेत त्याच्या गालावर किस करत हसतच हो म्हणते...

विराट हसत तिला जवळ घेतो. ..मला रगाला आणायच काम बिलकुल करु नकोस तो हळुच तिच्या कानात बोलुन तिच्या कानावर नाक घासु लागला.

पिहुला लाजल्यासारखच होते...ती कावरीबावरी होऊन ,बाजुला होत त्याच्याकडे बघते...ते..ते..मी मम्मी मला आवाज देतेय ती उठण्याचा प्रयत्न करु लागली..

त्याने तिला परत ओढुन बसवलं कोणीही आवाज देत नाहीये..आणि अशी जर माझ्यापासुन दुर पळालीस ना,मी सोडुन जाईल हहह.

आहहह,ती चिडुनच परत त्याला बिलगते..

विराट ही हसत ,घट्ट मिठी करतो.पिहु वर बघ,पिहु वर आकाशाकडे बघते...पक्षांचा थवा घराकडे निघाला होता...पिहु विराटकडे बघुन हसते.. तो तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो...

सुर्य अस्ताला जात होता....विराट पिहुच्या आयुष्यात रंगाची उधळण करून रेशमी नात्याची सुरवात करुन गेला.😍😍

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
कसा वाटला भाग नक्की कळवा😊

क्रमश: