देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३७ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३७

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३७       

भाग  ३६  वरून  पुढे  वाचा ......

 

“पूर्णिमा,” राजू म्हणत होता, “आज आपल्या कडे एक छोटीशी पार्टी आहे. माझा एक मित्र आणि त्याची पार्टनर येणार आहेत.”

“कशा बद्दल पार्टी आहे ? बर्थडे ?” – पूर्णिमा.

“पार्टी करायला काय लागतं ? असच करावीशी वाटली म्हणून.” – राजू. 

“ओके. नो प्रॉब्लेम. पण जर ही पार्टी तू सॅटर्डे ला ठेवली असतीस तर बरं झालं असतं. दुसऱ्या दिवशी काम करतांना झोप येते.” – पूर्णिमा म्हणाली. 

“चलता हैं यार. एखाद दिन के लिए चलता हैं.” – राजू.  

“ओके.” – पूर्णिमाची संमती.

“आणि हे बघ, मी तुझ्या साठी एक ड्रेस आणला आहे, खास पार्टी साठी.” – राजू म्हणाला आणि त्यांनी पॅकेट मधून ड्रेस काढून पूर्णिमाच्या समोर ठेवला.

“अरे वा, बघू.” – पूर्णिमा. 

पूर्णिमानी राजूने आणलेला ड्रेस बघितला. मिनी स्कर्ट ब्लाऊज आणि टू पीस यांच्या मधला अवतार होता तो.

“ईss, हा ड्रेस घालू मी घरात? पिकनिक ला स्विमिंग पूल वर आरामात ड्रिंक्स पितांना ठीक आहे, पण घरात? No way” पूर्णिमा जवळ जवळ किंचाळलीच.

“हो. मला काय वाटतं ते सांगू, माझी पार्टनर ब्यूटीफूल तर आहेच, पण मला ती हॉट आणि सेक्सी पण दिसायला हवी आहे.” – राजू. 

“माय गॉड, राजू, हे बरोबर नाहीये.” पूर्णिमा चिडून म्हणाली. “माझं काय प्रदर्शन मांडायला निघाला आहेस का तू? मी नाही घालणार हा ड्रेस.” पूर्णिमा ठामपणे म्हणाली. “आणि तुझ्या मित्रा समोर कशाला मी सेक्सी दिसायला हवं? तुझ्या साठी घालीन मी, पण आत्ता नाही.”

“पूर्णिमा अग असं काय करतेस? आजची थीमच ती आहे” – राजू. 

“काय थीम आहे?” – पूर्णिमानी वैतागून विचारलं.

“हॉट अँड सेक्सी पार्टनर ची.” – राजू.

“सॉरी, मला मान्य नाही.”– पूर्णिमा.  

“प्लीज.” – राजू. 

“नाही, आजिबात नाही.” – पूर्णिमानी विषय संपवला.

राजुचा चेहरा पडला. पण पूर्णिमानी त्या कडे लक्षच दिलं नाही. आणि वरतून पार्टी च्या वेळेस ती चक्क साडी नेसून बाहेर आली.

“हे काय? साडी वर पार्टी करणार तू?” राजुनी आश्चर्यानी विचारलं.

“यस. आपण भारतीय आहोत” पूर्णिमा म्हणाली. “आणि जेंव्हा बाहेरचे लोक येतात तेंव्हा आपण आपल्या पारंपारिक वेषभूषेतच असणं जास्त बरोबर आहे असं मला वाटतं.”

राजू काही बोलला नाही पण नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

रात्री राजुचा मित्र आणि त्यांची मैत्रीण आली. त्या दोघांना बघूनच पूर्णिमाला शिसारी आली. दोघांनीही आपल्या अंगावर खूप सारं गोंदवून घेतलं होतं. ज्या भाषेत ती  दोघं आपसात बोलत होते, पूर्णिमाला काही ही समजत नव्हतं. त्यांची भाषाच काय, त्यांचं इंग्लीश सुद्धा समजण्या पलीकडचं होतं. हे लोक राजूचे मित्र केंव्हा झाले असा प्रश्न पूर्णिमाला पडला. तिने तसं राजूला विचारलं देखील.

“पूर्णिमा अग त्यांच्या समोर काय विचारते आहेस?” – राजू.

“त्यांना मराठी कळतं का?” – पूर्णिमा.

“नाही. पण गेस्ट आहेत ते आपले.” – राजू. 

“ओके” – पूर्णिमा.

अर्ध्या खाणाखुणा आणि अर्धवट इंग्लीश असा त्यांचा संवाद सुरू झाला. मग ड्रिंक्स सुरू झाले. राजू, येतांनाच बरोबर बऱच काही खायला घेऊन आला होता, बाकी ऑर्डर केलं. पूर्णिमा ड्रिंक्स न घेण्या इतकी सोवळी नव्हती, पण आज का कोण जाणे तिने ड्रिंक्स ला हात पण लावायचा नाही असं ठरवलं. राजू तिला फार आग्रह करत होता. पूर्णिमाला कळत नव्हतं की राजू असा विचित्र का वागतोय ते. ड्रिंक्स च्या बाबतीत इतका आग्रह यापूर्वी त्यानी कधीच केला नव्हता.

ड्रिंक्स, डांस, पुन्हा ड्रिंक्स, जेवण पुन्हा डांस. पण पूर्णिमाचं आज कशातच लक्ष लागत नव्हतं. ते जोडपं काही तिला आवडलं नव्हतं. डांस करतांना तो माणूस तिला आवळण्याचा प्रयत्न करत होता. आणि असं झाल्यावर तिने राजू कडे पाहीलं होतं पण राजू, आपण त्या गावचेच नाही असा वागत होता. तिला आता राजुचा पण राग यायला लागला होता. शेवटी तर राजुच्या मित्रांनी  पूर्णिमाला पकडलंच. तो पूर्णिमाकडे अत्यंत आधाशी नजरेने पहात होता. तिच्या सर्व अंगावरून त्याची नजर फिरत होती. पूर्णिमाला त्याच्या नजरेचा अर्थ समजला. तिला या सर्व प्रकाराची शिसारीच आली. तिने त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न केला पण  त्याच्या बलदंड पकडीतून सुटायला पूर्णिमाला बराच त्रास झाला. आणि हे सर्व राजू पहात  होता आणि हसत होता. तो आणि ती मैत्रीण एकमेकांच्या मिठीत होती आणि एंजॉय करत होती. राजू तिला म्हणाला-

 

“एंजॉय, पूर्णिमा एंजॉय. आजची तसंही एक्स्चेंज पार्टनर पार्टी आहे. सो, एंजॉय.

तो काय बोलला त्याचा अर्थ लक्षात यायला पूर्णिमाला थोडा वेळ लागला पण जेंव्हा अर्थ लागला तेंव्हा तिच्या अंगावर नखशिखांत शहारा आला. तिच्या लक्षात आता यायला लागलं होतं की हे काही खरं नाही. या तिघांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. एक निर्णय घेऊन तिने फ्लॅट च्या बाहेर जाण्या साठी धाव घेतली पण राजू वाट अडवून उभा होता. पूर्णिमाचा आता संताप अनावर झाला होता. मागचा, पुढचा काहीही विचार न करता तिने राजूच्या कानाखाली एक सणसणीत ठेवून दिली. आणि म्हणाली,

“अरे तुझ्यावर काहीही हातचं न राखता प्रेम केलं मी, आणि तू माझा बाजार मांडायला निघालास? शरम वाटली पाहिजे तुला. बाजूला हो नाही तर मी पोलिसांना बोलविन.” आणि हातातल्या मोबाइल वर 911 टाइप केलं. बाजूला हो नाही तर कॉल बटन प्रेस करेन. राजू गालावर थप्पड पडल्यामुळे थोडा दचकला होता, त्याच्या संभ्रमावस्थेचा फायदा घेत पूर्णिमा धावत बाहेर पडली. सुदैवाने लिफ्ट जागेवरच होती. पूर्णिमा धावतच रस्त्यावर आली. आता फक्त एकच विचार होता की कॅब्   घ्यायची आणि सेजल कडे जायचं. तिथे थांबणेही धोक्याच होतं. राजू आणि त्याचा मित्र केव्हाही मागावर येऊ शकले असते. ती झप झप चालत राहिली.

रात्रीचा एक वाजला होता, अश्या वेळेला साडी नेसलेली बाई रस्त्यावर एकटीच जवळ जवळ पळते आहे, हे दृश्य अमेरिकेत सुद्धा दुर्मिळ होतं. शेजारी कार एकदम हळू झाली. पूर्णिमा आता मात्र खरंच घाबरली. आधीचं जे अवसान होतं ते गळून पडलं. ती आता धावायला लागली.

अहो थांबा. थांबा. एका बाईचा आवाज आला. मराठी आवाज ऐकून पूर्णिमा थबकली. कार थांबली आणि त्यातून एक पन्नाशीचा गृहस्थ  आणि एक स्त्री उतरली.

अहो थांबा. एवढ्या रात्री कुठे पळत निघाला आहात? काही प्रॉब्लेम आहे का?

पूर्णिमाला धीर आला. निदान मराठी कुटुंब दिसतं आहे. ती थोडी रीलॅक्स झाली.

“तुम्हाला कसं कळलं की मी मराठी आहे म्हणून?” पूर्णिमाने विचारलं.

“तुमच्या साडी नेसण्या वरून आणि चाली वरून.” आम्ही पण मराठीच आहोत.

“अहो, घाबरू नका. हे घ्या माझं कार्ड.” त्या गृहस्थाने त्याचं कार्ड पूर्णिमाला दिलं. “ही माझी बायको. अश्या अपरात्री साडी नेसलेली एकटी मराठी मुलगी धावंतांना पाहिल्यावर आम्ही न थांबता जाणं शक्यच नव्हतं. सांगा आता काय प्रॉब्लेम आहे आणि कुठे जायचं आहे तुम्हाला.” मग पूर्णिमाने  काय घडलं ते अगदी थोडक्यात सांगितलं. तेवढ्या वर सुद्धा ती बाई हळहळली

“बाई गss, एवढं सगळं झालं ? पण आता तू काय करणार आहेस? कुठे जायचं आहे.”

“माझ्या दोघी मैत्रिणी राहतात त्यांच्याकडे जाईन मग बघेन  काय करायचं ते.” -पूर्णिमानी सांगितलं.

“एक सुचवू का?” ती बाई म्हणाली, “रात्र बरीच झालेली आहे, आजची रात्र तू आमच्या कडे राहू शकतेस.” पूर्णिमाच्या चेहऱ्यावर चल बिचल दिसली म्हणून ती पुढे म्हणाली, “आमच्या घरी, सध्या  माझे सासू, सासरे आलेले आहेत, आमची तिघं मुलं पण घरी आहेत, बघ विचार कर. सकाळी तू उठून जा तुझ्या मैत्रिणींकडे. हे बघ घर आलच. तू आत  ये, बघ  आणि तुला नाही पटलं तर हे तुला पोचवून देतील.”

घरात शिरल्यावर पूर्णिमाला लगेच जाणवलं की हे फॅमिली होम आहे. मुलं तर झोपली होती पण आजी, आजोबा जागे होते. पूर्णिमा मग रात्री तिथेच थांबली आणि सकाळी ब्रेक फास्ट झाल्यावर कॅब करून रूम वर आली. एवढं सांगून झाल्यावर पूर्णिमा थांबली. नुसत्या आठवणीनी सुद्धा तिला धाप लागली. सेजल पुढे झाली आणि तिने पूर्णिमाला जवळ घेतलं. आणि थोपटलं. म्हणाली,

“देवाचे आभार मान. चांगली माणसं भेटली तुला. नाही तर काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. पण काळजी करू नकोस, आता तू सेफ आहेस.” मग नंतर कोणीच बोललं नाही. सेजल आणि देवयानी काही न बोलता किचन मध्ये गेल्या. जेवणाची व्यवस्था तर करावीच लागणार होती.

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.